लेखाक ९७
१६३३ कार्तिक शुद्ध ५
श्री
श्री राजा शाहु चरणि दृढ भाव सेनापति धनसिग सुत सताजी जाधवराव
'आज्ञापत्र समस्तसेनाधुरधर विस्वासनिधी राजमान्य राजश्री सताजी जाधवराऊ सेनापती ता। मोकदमानी मौजे सैदापूर पा। क-हाड सु।। इसने मया असर अलफ मौजे मजकूर वेदमूर्ती राजश्री ब्राह्मण समस्त क-हाडकर यास राजश्री स्वामीनी अग्राहार करून दिल्हे आहे ऐसीयास मौजे मजकुरी सरदेशमुखी आमचा खासगत ईनाम आहे त्याचा ऐवज आमचा होईल तो आह्मी ब्राह्मणास आपले तर्फेने दिल्हा आहे आकार प्रमाणे सरदेशमुखीचा ऐवज बिलाकुसूर साल दरसाल देत जाणे आमचे कमावीसदार असतील वर्तमान भावी कोण्ही उपसर्ग लावणार नाहीत जाणिजे प्रतिवर्षी नूतन पत्राचा आक्षेप न करणे तालीक लेहून घेऊन अस्सलपत्र भट गोसावियासि भोगवटेयास देणे जाणिजे छ ३ शोवल
मोर्तब सुद