लेखाक ९२
१६३६ चैत्रवद्य ५ गुरुवारस्वस्ति श्री राज्याभिषेकशके ३० तारण नाम सवत्संरे चैत्र बहुल पचमी
श्री. शिव नरपति हर्ष निदान मोरेश्वर सुत नीलकठ प्रधान
श्री. आई आदिपुरुष श्रीराजा शिव स्वामी कृपानिधी तस्य परशराम त्रिवक प्रतीनीधी
श्री राजा शिव छत्रपति याणी सुबेदारानी व कारकुनानी व लोक सुभे लस्कर व बाजे यासी आज्ञा केली ऐसी जे मौजे शिवापूर प्रा। क-हाड हा गाव स्वामीनी क-हाड क्षेत्रीचे ब्राह्मणास सर्वमान्य अग्रहार करून दिल्हे आहे तेथे तुह्मी मार्गी येता जाता नसता उपसर्ग लाविता ह्णणोन विदित जाले तरी गाव सर्वमान्य ब्राह्मणास दिल्हा असता तेथे तुह्मास उपसर्ग द्यावया गरज काय साप्रत हे आज्ञापत्र सादर केले असे तरी या उपरी मौजे मजकूरचे वाटे नव जाणे अत पर उपसर्ग देईल ह्यणिजे मुलाहिजा होणार नाही ऐसे जाणोन आज्ञेप्रमाणे वर्तणूक करणे निदेश समक्ष
रुजू सुरु निविस
सुरू सूद बार