Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ११६
१६४७ मार्गशीर्ष वद्य १०
श्री
ता सौजेन्ये- मोकदमानी मौजे सैदापूर ता। हवेली पा। कराड यासी माहादाजी कृष्ण आ। देसमुख पा। मजकूर सु।। सीत असरीन मया अलफ वेदशास्त्र सपन्ये राजेश्री वीरेश्वरभट गिजरे हे राजेश्रीस्वामीचे तीर्थपुरोहित या करिता मौजे मजकुरी अग्राहारपैकी ईनाम इदलशाही जमीन बिघे । तीस बिघे जमीन ईनाम कुलबाब कुलकानू दिल्हा असे त्या जमिनीची देसमुखीची हकदारी भटगोसावी यास माफ केली असे तरी सदरहू जमीनीचे हकदारी होईल त्याचा तगादा वेदमूर्तीस न करणे प्रतिवर्षी ताजे सनदेचा उजूर न करणे जाणिजे छ २३ रबिलाखर
मोर्तबसुद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ११५
१६४६ आश्विनशुद्ध ६
श्री
आज्ञापत्र राजश्री कृष्णाजी विठल ता। मोकदमानी देहाय मौजे कारवे १ मौजे वडगाऊ १ मौजे सेरे १ पा। कराड सु।। सन खमस अशरीन मया व अलफ गोपालभट याचा व शामभट व भीवभट या मध्ये जोसीपणाचा कजिया लागला होता त्यावरून हरदूजण हुजूर आले त्याउपरी तुह्मा त्रिवर्गास आज्ञा केली की या उभयेतामध्ये खरा कोण आणी खोटा कोण हे श्री कृष्णेमध्ये घालऊन निवडून देणे ह्यणून सागितले त्यास आध्यापी निवडून पाठविले नाही यावरून काय ह्यणावे. याउपरी हे आज्ञापत्र तुह्या त्रिवर्गास सादर केले आसे तरी ती गावीचे बारा बलुते व भवरगावीचे पाटील मेलऊन या हरदूजणास श्रीकृष्णेमध्ये घालऊन खरा कोण आणी खोटा कोण हे सत्य स्मरोन वोडून काढणे येकाची रयात करून मुरवतीने काढाल, ह्मणजे तुमचे बेतालीस नरकात जातील बरे समजून सिताबीने निवडून पाठऊन देणे जाणिजे छ ४ मोहरम
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ११४
१६४५ भाद्रपद वद्य २
श्री
आज्ञापत्र राजश्री कृष्णाजी विठल ता। मोकदम मौजे कारवे मौजे वडगाव पा। कराड सु।। सलास अशरीन मया अलफ मौजे मजकूरचे जोतिषीपणाचे कजिया गोपालभट गिजरे व शामभट करमरीकर यामध्ये लागला याकरिता तुम्हास हुजूर आणून उभयेता जोसी तुमचे स्वाधीन केले की याचा कजिया निवडून देणे खरे खोटे करणे म्हणून आज्ञा केली त्यास तुह्मी आठा रोजाची मुदत मागितली होती त्यास आठ रोज होउनु अधिक जाले याकरिता याकडील हरकी गुन्हेगारीचे भटानी कतबे (दिले) आहेत त्याकडे दोनीसे रु।। येणे ते हुजूर रसदेस आणविले असे पाठवणे या कामास आबोजी माला पाठविला आहे यास उभयताकडून १ येक रुपया देवणे छ १५ जिल्हेज उभयता तुह्मी हाती घेतले आहेत श्रीकृष्णातीरी आपले बेतालीस पूर्वज स्मरोन श्रीकृष्णेमध्ये घालून ओढून काढणे कोण्हाचे भीड न धरणे छ १५ जिल्हेज भीवभट व समुद्रखाणी याचा कजिया मौजे सेरे याकडे आहे त्यास तुह्मी हाती घेतला त्याकडे शभर रु॥ येणे त्याचे शभर रु॥ देणे त्याकडील मसाला नीम रु| आबोजीस देणे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ११३
१६४५ श्रावणशुद्ध १३
श्री
वेदमूर्ती राजश्री गोपालभट गिजरे व केशवभट जोसी स्वामीचे सेवेसी सेवक सताजी चव्हाण सुभेदार दि।। सरदेशमुखी प्रा। कराड दडवत विनती सु।। अर्बा असरीन मया अलफ शामभट व भीमभट यामध्ये व तुह्मा मध्ये कारवे वडगाऊ सेरे दुसेरे या तिनी गावीचे जोतिशाचे भाडण लागले होते त्यास भाडण सुरू जालियावरी दिवाणानें सेरणी तुह्माकडे रु॥ १०० सेभर केले त्याची सरदेशमुखी रु।। १० दाहा पावले जाणिजे छ ११ जिलकाद हे विनंती
मोर्तब सुद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ११२
१६४५ ज्येष्ठवद्य १४
श्री
वेदमूर्ती राजश्री गोपालभट व केशवभट गिजरे जोतिशी मौजे कारवे व मौजे वडगाऊ व मौजे सेरे गोसावियासि पोष्य कृष्णाजी विठल नमस्कार सु।। सलास असरीन मया अलफ तुह्मामध्ये व शामभट प्रथमशाकी व भीवभट समुद्रखानी यामध्ये सदरहू गावीचे जोतिशपणाचा कथला होता त्यास गोतमुखे उभयताचा निवाडा जाहला शामभट व भीवभट समुद्रखानी खोटे जाले तुह्मी खरे जालेत सदरहून तीन गावीचे जोतीश तुमचे तुह्मास दुमाला करून सेरणी रुपये १०० एक से करार करून सदरहू रुपये राजेश्री भास्कर गोसावियास देविले ते साताराचे मुकामी त्यास प्रविस्ट जाले मजुरा असेत छ २७शाबान
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
त्यावरून पडितरायानी आपणाकडून शामभय या बराबरी देऊन रायानी सागून पाठविले की यासि दुसरे स्थळ देणे त्यास पचाइतानी उत्तर दिल्हे की आह्मी काही दिवाण नव्हो यापासी काही सेरणी गुन्हेगारीचे कतबे घेतले नाहीत आह्मास काही लाभलोभ नव्हता आधीच उभयेता वादी यासी विचारिले की तुह्मास हे स्थळ मानत असेल. तरी कबूल करणे नाहीतरी आह्मी मायेस्थल होऊन तुह्मास दुसरे स्थल देऊ त्यास उभयेतानी पचाइतास अनन्यभावे विनती करून हे स्थल आह्मास मानले ह्मणऊन राजीनामे लेहून दिल्हे त्यावरून या उभयेताचा धर्मता न्याये करून झगडा विल्हेस लाविला आह्मी काही दिवाण नहो आह्मास काही सेरणी गुन्हेगारीचा तगादा करणे नाही ज्याप्रमाणे करीना जाहला तेणेप्रमाणे खरा जो आहे त्यास निवाडपत्र करून देऊ ऐसे पडितरायास सांगोन पाठविले आणि तुह्मास निवाडपत्र करून दिल्हें असे सदरहू पाचा गावीचे जोसीपण व उपाध्येपण तुमची वृत्ति खरी सदासिवभट बिन भानभट यासी आर्थाआर्थी समध नाही तुह्मी त्रिवर्ग भावानी आपल्या पुत्र- पौत्रादि - वशपरपरा वतन अनभऊन सुखरूप आसणे सदासिवभट बीन भानभट याचे तकरीरेप्रमाणे भाऊपणास खोटे जाहले व कागदाचे साक्षीमुले खोटे जाहले व वतनाचे भोगवटा नाही त्यामुले खोटे जाहले येकून तिन्ही कलमास खोटे जाहले तुह्मी आपले तकरीरे प्रमाणे भाऊपणास खरे जाहलेस व कागदपत्री खरे जाहलेस व पाचा गावीच्या भोगवटियामुले खरे जाहलेस त्यावरून तुह्मास हे निवाडपत्र करून दिल्हे असे परपरागत आपे वशपरपरा पुत्रपौत्रादि पाचा गावीचे जोसीपण व उपाध्येपण वृत्ति आनभऊन सुखरूप असणे सदासिवभट बिन भानभट यासी व याच्या गोत्रजास अर्थाअर्थी समध नाही हे लेहून दिल्हे निवाडपत्र सही
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
ह्यापत्राच्या पाठीसी सदासिवभट बिन भानभट यानी साक्षी लेहून दिल्हे ते त्याच्या दस्तूरची साक्षी बितपसील दानपत्र १ येक मुतालिकपत्र १ येक याची असलपत्रे मोरेश्वरभटापासी दिल्ही असे त्यास साक्षी माहुलकर बहिरभट आफले हरिभट गिजरे आध्यापक नारायेणभट आफले नारायेणभट जानभटी ऐसी साक्षी त्यास पचाइतानी त्याचा निर्णये केला की मुख्य सदासिवभट यानी वतनाचा कागदपत्र नाही व दो पत्राच्या तालिका नाही ह्मणऊन कतबा लेहून दिल्हा वतनाचा कागद असोन पन्हाम करू तरी गोताचे अन्याई त्यास हा कागद वतनाचे बाबेचा खरा अगर लटिका परंतु यानी आधी नाही ह्यटिले मग उमगला तेव्हा त्याच्या च मुखे ते आन्याई कागद रद्द पचाईतानी पाहू नये परतु याची आशका राहू नये याकरिता पत्राचा शोध पाहिला तो कागद वरषे १९३ एकसे त्रियानव वर्षाचा त्यावरी साक्षी आहेत त्याचा शोध, पाहिला तो कोण्ही मरून तीस वर्षे जाहली आवघिया साक्षीचा शोध पाहता ऐसी वर्षापलीकडील कोण्ही साक्षी पुरवत नाही तेव्हा ऐसे दिसोन आले की यानी कागद मनसकल्पेच केला आणि साक्षीही मनसकल्पेच घातल्या कागद कृत्रिमी याचा शोध पाहता अगदीच बाष्कल, साक्षी याची द्रस्तुरे निराळी असावी ते अवघे दस्तुर आदिअत येक च तेव्हा साक्षी यानी साक्ष दिली त्यास व दस्तुरास ऐक्य जाहले तेव्हा साक्षी यानी काही च ठाऊक नाही ह्यटिले ते च गोस्टी खरी मुकुदभट आपल्या पितियाचे अक्षर ह्यणउन श्रीत निघेन ह्यणतो क्रियानष्ट साक्ष अप्रमाण ऐसा सिधात करून कागदकृत्रिमी ऐसा जाहला तेव्हा सदासिवभट बिन भानभट यासि वतनास समध नाही ऐसा सिधात करून ठेविलियावरी. तुह्मा उभयेता यादी यासी बैसवून समस्तादेखत करीना वाचून दाखविल्या त्यास आग्रवादी सदासिवभट बिन भानभट यासी पचाइतानी पृछा केली की तुह्मी तकरीर केली की आपला मूलपुरुष जोगदेवभट त्यास पुत्र तिघे येक मरलीकर येक दुसेरेकर येक आपण ऐसे खरे करून देऊ न देऊ तरी वृत्तीस समध नाही खोटे ह्यणऊन लेहून दिल्हे त्यावरून मरलीकर ह्यणिजे वाईकर व दुसेरेकर आणिले त्यास त्यानी साक्षी दिल्ही की सदाविभट बिन भानभट यासी आपणास समध नाही उपनामाचे मात्र देवरात गोत्री नारायेणभट बिन वीरेश्वरभट गोपालभट बिन रुद्रभट हे आपले भाऊ खरे ऐसी साक्ष दिल्ही तुह्मी आपला व त्याचा भाऊपणा खरा करून देऊ ह्यटिले त्यास भावाचा विचार ऐसा तुह्मास भाऊ नव्हे ह्यणतात या उपरी तुह्मास काये ह्मणावे ऐसी पृछा करिता सदासिवभट याची बोलायाची वाचा कुठित जाली तेव्हा दुसरी पृछा केली की तुह्मी दोनी पत्रे दिल्ही याचे साक्षी आहेत त्याच्यामुखे खरे करून देऊ न देऊ तरी आपणास वृत्तीस समध नाही ह्मणऊन साक्षी याची नावनिसी लेहून दिल्ही त्या वरून सदरहू नावनिसीप्रमाणे साक्षी आणून सत्य घालून करीना विचारिला त्यास साक्षी यानी तुह्मादेखत साक्षी दिल्ही की आपणास काही ठाऊक नाही तेव्हा तुह्मी लेहून दिल्हे साक्षियाच्यामुखे खरे करून देऊ न देऊ तरी आपणास वृत्तीस समध नाही खोटे ते च गोस्टी तुमचे तकरीरे बमोजिब खोटि जाहली ऐसी पचाइतानी पृछा केली त्या वरी भोगवटियामुले खरे करून देऊ ह्मणऊन तकरीर केली त्यास तुह्मी वतनाचा भोगवटा खरा करून दिल्हा नाही येकून तिन्ही कलमे लटकी जाहली त्यास तुम्ही साक्षीमुले व वतनाच्या भोगवटियामुले व कागदपत्रावरून खोटे जाहलेस याउपरी तुह्मास नारायेणभट बिन वीरेश्वरभट व गोपालभट बिन रुद्रभट यासी कथला करावयास समध नाही यासी यजीजखत लेहून देणे ह्मणऊन पंचाइतानी आज्ञा केली त्यास सदासिवभट बिन भानभट व त्याचा भाऊ बाबदेवभट बिन नीलकठभट व त्याचे समस्त भाऊ यानी पचाइतापासी नेम केला की आपण साईकाली येऊन यजीजखत लेहून देऊ त्यास राजश्री मुद्गलभट पडितराव याच्या घरास जाऊन वर्तमान सागितले.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २५७ १५५५
१ अज रख्तखाने राजश्री स्याहाजीराजे दाईमदौलतहू
२ बजानेब हुदेदारानि हाल व इस्तकबाल व मोकदमानि कस-
३ बे पुणतांबे पा। संगमनेर बिदानद सु॥ सन अर्बा सला-
४ सीन अलफ त्रिंबक जोसी फर्जंद माणीक जोसी बीन रत-
५ न जोसी सा। कसबे मजकूर हुजूर येऊनु मालूम केले जे
६ आपल्या बापाच्या नावे इनाम दर सवाद का। मजकूर
७ जमीन बिघे पंधरा अज देवडी दरोन रुके सा आदा
८ विसाजी मोकदम बीघे पंधरा १५ जकाती रुके ६
९ बा। फर्मान रा। खास व खुर्दखत मलिकंबर व भोगवटे
१० वजिरानि माजी कारकीर्दी सालाबाद चालत असे तेणे
११ च प्रमाणे साहेबी खुर्दखत मर्हामती करावया रजा होये
१२ मालूम जाले तरी यासि इनाम सदर्हू बीघे पंधरा व
१३ देवडी दरोन रुके दर सवाद सदर्हू बा। फर्मान रा। खास
१४ व लि॥ मलिक अबर व भागवटे कारकीर्दी दर-
१५ कारकीर्दी सालाबाद चालले असेल तेणेप्रमाणे
१६ + + तुह्मी ही चालवणे दर हर साल ताजा खुर्दखता-
१७ चा उजूर न करणे तालीक लेहोनु अवली
१८ खुदखत परतोनु यापासि दीजे मोर्तब सुद
*
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
शके १४५२ हेमलबी नाम सवत्सरे कार्तिक शुध दशमी रविवार तदिनी राजश्री पिलभट गिजरे वास्तव्य क-हाड याचे जोतिष मौजे वडगाव. व मौ। कारवे याचे जोतिशाच मुतालिकी कबूल केली ऐसे मुद्गलभट बिन शभुभट प्रथमशाखी रामलिगकर यानी लेहून दिल्हे जे तुमची वृत्ति आसे आह्मास समध नाहीं आह्मी मुतालिक असो कलले पाहिजे हे सत्य आह्मास लेकराचे लेकरी समध नाही हे सत्य तुह्मास आह्मी स्वामित्व गाव टका १येक देऊ कुलकरणियाचे घरी लग्न मुहूर्त होईल ते तुमचे तुह्मी स्वामित्वामधे घ्यावे आह्मास समध नाही आह्मास वृत्तीस समध नाही जे कालीं आह्मास निरोप द्याल ते काली आह्मी जाऊ हे आमचे वडिलाचे सत्य आह्मास लेकराचे लेकरी समध नाही कलले पाहिजे हे सत्य कृष्णवेणी साक्ष
गोही
हरजी कान्हो यादव देसाई प्रा। नरसिभट आफले
क-हाड मसूरकर
१
लाहामाजीपत देशकुलकरणी प्रा। नरहरीभट पलसोडेकर
क-हाड १
१
कृष्णाजी पाटील मौजे रामभट वैद्य पालसोडेकर
बडगाव १
१
जानकोजी पाटील बिन १
वासुदेव पाटील मौजे कारवे वैद्य भास्करभट साक्षी
१ १
पिलाजी कुलकरणी मौजे पत्रप्रमाणे साक्षी पाऊसे
कारवे बलभट
कलमाजी कुलकरणी मौजे पत्रपा। साक्ष गरूड
वडगाव तिमणभट
१ १
जोगसेटी व बाबसेट चिखले चवडोबा नारोबा सराफ
माहाजन प्रा। क-हाड १
१
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
येकून तिघे वशावलीप्रमाणे येक जाहले सदरहू कागद एकेतालीस अक्षरशाहा वाचून पाहिले त्याचा दाखला वशावलीस घालून सदरहू भाऊपणास दुसरा मोझ्या घालून त्यावरी वतनाच्या भोगवटियामुले तुह्मी त्रिवर्ग भाऊपणास तिसरा माझ्या घालून पचाइतानी तुह्मी त्रिवर्ग वधू क-हाडकर व दुसेरेकर व वाईकर ऐसे खरे ऐसा सिधात करून ठेविला त्या वरी सदासिवभट बिन भानभट गिजरे याच्या तकरींरे बमोजिब सिधाताचा विचार पाहिला तो मुख्य हासील कलम तिघाचा भाऊपणा खरा करून द्यावा त्यास वाईकर व दुसेरेकर यानी आपला भाऊ सदासिवभट बिन भानभट नव्हे यास आपणास समध नाही उपनामाचे मात्र गिजरे देवरात गोत्री नारायेणभट बिन वीरेश्वरभट व गोपालभट बिन रुद्रभट हे आपले भाऊ ऐसी साक्षी पुरली त्यावरी दुसरे कलम श्रीमाहादेवी भानभट बिन कृष्णभट यानी कागद दोनी मोरेश्वरभटापासी दिल्हे बिता है ।
रामेश्वरभटाचे नावाचे दानपत्र पिलभटाचे नावाचे मुतालिकाचे
येक १ पत्र १
येकून पत्रे दोन्ही दिल्ही त्याचे साक्षी आहेत त्याच्यामुखे खरे करून देऊ ह्मणऊन साक्षीयाची नावनिसी लेहून दिल्ही त्याप्रमाणे सदरहू साक्षी यासी सत्य घालून विचारिले त्यानी आपणास काही ठाऊक नाही ह्मणऊन साक्ष दिल्ही तेव्हा दोनी हासिल कलमे होती ते त्याच्या च साक्षीमुले लटकी जाहली तेव्हा पचाइतास आशका येक होती की सदासिवभटाचे साक्षीपैकी नारायेणभट आफले यानी साक्ष दिल्ही की पचागासारिखा कागद गुडाळून दुरून दाखविला की तुमचे अक्षरे तुमची साक्षी आहे त्याचा शोध पाहावा व मृत साक्षी बहिरभट आफले त्याचा पुत्र मुकुदभट आफले आपल्या पित्याची अक्षरे साक्षीची ह्मणऊन श्रीत निघेन ह्मणतो याचा शोध करून पाहावा आशका देऊ नये याकरिता सदासिवाभट बिन भानभट यासी आज्ञा केली की तुह्मापासी साक्षियाची अक्षरे स्वहस्तीची आहेत ते पत्र आणून पचाइतापासी ठेवणे ज्याची अक्षरे ते हि आहेत त्याचा शोध करून त्या वरून सदासिवभटानी पत्र पचाइतापासी ठेविले मग समस्तानी वाचून पाहिले पत्र की लिखित मजकूर बितपसील