Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १२६
१६९२ आश्विन वद्य ९
श्रीगुरुनिरजनशिवदासगुरु
करीना शके १६९२ विकृति नाम सवत्सरे आश्विन वद्य नवमी.शनिवार तद्दिनी काशिनाथ गोसावी शुक्ल वास्तव्य क-हाडक्षेत्र आमचे तीर्थस्वरूप कृष्णाजी नाईक व केशव नायकाचे तीर्थस्वरूप मैराळ नाईक मारुलबोहल्यात राहत असता आमचे तीर्थस्वरूप विरक्त जाले चौदा वर्षाचे होते मातुश्री बारा वर्षांची होती उभयता निघोन क-हाडी निरजन स्वामी होते त्यास शरण आले निरजनस्वामीनी अनुग्रह देउऊन त्याच्या सगतीने तीर्थयात्रा बहुत दिवस केल्या स्वामीनी शिवदासगोसावी नाम ठेऊन क्षेत्रात शुक्लवृत्ति करणे
ह्मणून आज्ञा केली भीक्षा करून आसता आमचे वडीलबंधू तीर्थस्वरूप नागशेबा व आह्मी जालो क-हाडी राहिलो आमचे चुलते मैराळ नाईक चाटेपन करू लागले मग मारुल सोडून सातारियास गेले तेथे दुकान घालून राहिले त्याचे दोघे पुत्र धोडोबा नाईक व केशव नाईक केशव नायकाचे दोघे पुत्र बाबू व गगाधर ते सातारियात व आह्मी क-हाजी राहिलो असता आमचे बधू नागेशबाबा वारणेत उखळवास गेले गावकराहून घेऊन मठ बांधून दिल्हा व दोन बिघे सेत देऊन स्थापना केली पुढे काळे करून नागेशबाबा कैलासवासी जाले मग आह्मी मठांत नरशिहा ब्राह्मण ठेविला पुढे, आह्मांस क्षेत्रात असता केशव नायकाचे पुत्र गगाधर दुखणेकरी आमच्या घरास आला आह्मी त्यास व केशव नायकास पत्र न पाठविता न बलाविता घरास आला आह्मी त्यास पुशिले येथे येयास कारण काय गंगाधर बोलिला आपणास बरे वाटत नाही व आपले बधू व भावजय मानीत नाहीत यास्तव तुह्मा पासीं राहीन पुढे सागाल त्याजप्रमाणे वर्तुणूक करीन आह्मा बरोबर च्यार महिने होता बरा जाला आह्मी बोलिलो की आपल्या घरास जाणे त्यास तो बोलिला की मी देशातरास जाईन परतु सातारियास जाणार नाही त्याजवरून आह्मी विचार केला गगाधरास स्त्री नाही त्याज वरून आह्मी विचार केला निस्पृह आहे नागेश बावाच्या मठात सरक्षणास योजावा मग मठास नेऊन गावकरास भेटऊन मठ व देवतार्चन त्याचे जें होते ते गगाधराच्या स्वाधीन करून सत्कर्म करून मठात राहणे ह्मणून सागितले गगाधराच्या भेटीस केशव नाईक आले ते हि मठात राहिले पुढे गगाधर आह्मा बरोबर च्यार महिने होता आमचा मेहुणा चिरजीव खडोबा यासी कळह करून प्रात काळी आह्मास न पुसत वारणेत गेला याला साक्षी जनार्दनाच्यार्य टोनपे व कृष्णाजी त्रिबक आहेत गगाधर पळून गेला त्याजवरून आम्हास क्रोध आला आम्ही केशव नाईक व गावकरास पत्र पाठविले जे तुह्मास मठात राह्यास समध नाही तुह्मी स्थळातर करणे आणिखी कोणाच्या स्वाधीन मठ करू त्यास गावकरानी राहून घेतले गगाधर आमचा सप्रदायी नव्हे अैसे आसता आह्मास बरे वाटेनासे जाले अत्यत अवस्था जाली त्याजवर गगाधरास आह्मी पत्र पाठविले तुज वाचून आह्मास कोणी नाही सर्व तुझे आहे देखत पत्र लवकर येणे गगाधराने आमचे पत्र मानिले नाही दुसरे पत्र पाठविले आमची अत्यत अवस्था आहे तरी अगत्य येणे आला नाही अैसी पत्रे आठ
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १२५
१६८२ श्रावणशुद्ध १ सोमवार
श्री कृष्णा ( क) कुद्यती सगमो जयति
स्वस्ति श्रीमत् करहाटक क्षेत्रस्य समस्त ब्राह्मण व पचाईत यानी निवाडपत्र करून दिले दिले शके १६८२ वर्षे विक्रम नाम सवत्सरे श्रावण शुद्ध १ सोमवार ते दिवसी राजेश्री गोपाळभट्ट गिजरे याप्रति नारायेण दीक्षित गिजरे भिमदीक्षित गिजरे यादवभट्ट गिजरे बाळकृष्णभट्ट गिजरे धोडभट्ट गिजरे नरसिभट्ट गिजरे यानी लेहून दिले ऐसे जे तुमचा काळ समीप तुह्मास पुत्रापत्य नाही पुढे दोघी बायकाचे चालावे लागते याचा विचार काय केला त्यावरून तुह्मी बोलिला की आपले घर व शेते इनाम मौजे सैदापूर व कोणेगाव व कारवेवडगाव व शेरे व दुशेरे व कोडोली येथील ज्योतीष अपल्या विभागाचे आहे जो याचे योगक्षेमाचे चालवील त्याच्या स्वाधीन करतील तुह्मास सकट काय आहे ऐसे बोलिला त्यावरून पाच ग्रहस्त व अह्मी येउन अवघ्ये येकत्र होउन निश्चय केला की तुह्मा पाठीमागे यावत्काळ दो आहे तावत्काळ याचे चालउ त्या दोघीस मान्य करा मग दोघीस मान्य करून येणे प्रमाणे पाचाच्याविद्यमाने आपले अशाचे भाउ याच्या विद्यमाने करार केला बितपशील मूलि धाकटी नवरी आहे तीचे लग्न करायाचा समयी अह्मी विभागाप्रमाणे द्रव्य चोघाच्या विचारे देउ १
१ ज्योतीषगाव पाच १ इनामगाव दोन
५ २
घर क्षेत्रातील येक.१
१
ज्योतीष व, इनाम तुमच्या अशाचे आहे ते त्यानी दोघीनी भक्षावे अह्मास भक्षायास कारण नाही आपल्या घरात राहून काळक्षेप करावा पुढे किरकोळ खर्चास पाहिजे याजकरिता तुह्मा दोघीस ज्योतिषाचा व इनामाच्या ऐवजा वेघळे रुपये २१ पचवीस दरसाल देऊ त्याप्रमाणे भक्षून सुखरूप असावे यास जो अतर करील तो अन्यायी त्याला तुमच्या पाठीमागे तुमचा विभाग भक्षायास कारण नाही येणेप्रमाणे जो तुह्यात चालवील तोच भक्षील यास जो अतर करील तो देवब्राह्मण द्रोही त्याला पूर्वजाचा व कुळस्वामीचा शपथ असे हे पत्र लिहिले सत्य वळी सुमार २० वीस बिकलम बाळकृष्णभट ढवळीकर ॥००॥
येणेप्रमाणे पाच भाऊ मान्य गिजरे कागदपत्र वृत्तीचे जे तुह्मापाशी आहेत ते तुह्मापाशी जतन ठेवणे जे समई अम्हा कार्य लागल ते समयी येकाच्या गुजारतीने अम्हास देणे कार्य करून गुजारतीने तुह्मापाशी फिरोन देउ वळी २४ चवीस ।। ।।
साक्षी
१ पत्रप्रमाण मानभट्ट, वैद्य १ मोरो सीवदेव पारसनीस पा।
१ बाजिभट्ट मजकूर
१ गरूड नारायणभट्ट १ माणको रघुनाथ कुलकर्णी मौजे
माणीकभट घोडके वीरवड प्रा। मा।र
साक्ष बापुजी होनाजी कुलकर्णी का। मजकूर पत्रप्रमाण साक्ष गोपाल गोविंद कुलकर्णी का। कहाड
१
वेकाजी नरहरी कुलकर्णी का। कराड
१
अबाजी तुकदेउ कुलकर्णी मौजे कोरेगाव प्रा । मजकूर
१
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १२४
१६७६ फाल्गुन शुद्ध १४
श्री
राजश्री मोकदमानि मौजे सैदापूर गोसावी यासि
ठेवणाईत नरसनाक परवरी म्हार मौजे मजकूर सु॥ खमस खमसैन मया अलफ आह्मी परागदा होऊन अजीपर्येत बारा वरसे वाट पाहिली परतू माजी दाद केली नाही हली तूर्त सध्या उदईक होलिकापूजेन आले आहे तर साहेबी मौजेमजकूरचे माहार यास ताकीद करौन होलीस पोली बादितील त्यास ताकीद करौन माजी वाट जाहालियाखेरीज मजला गावावर नेहल्याविना होलिकापूजेन केले तर दैसमूख दैसपाडे याची दोही असै याउपर करोन होलीस पोली बाधली तर जिकडे माजी दाद होईल तिकडून करौन घेऊ पस्ट समजौन लिहिले असे बहुत काये लिहिणे कृपा कीजे हे विनती
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १२३
१६६६ अधिक आषाढवद्य ५
श्री काळभैरवप्रसन् ,
मूळतालीक बाळबोध
स्वस्ति श्रीनृप शालिवाहन शके १६६६ वर्षे रक्ताक्षी नाम सवत्सरे अधिक वद्य पचमी तद्दिनी राजेश्री तीर्थरूप अणा प्रति रघूने खडपत्र लेहुन दिल्ले एसे जे तुह्मी व अह्मी व भिमा ऐसे त्रिवर्ग विभक्त जहालो त्यास पचधातू तोळा व मासा व अडिका रुका हडे व भाडे व पोथी पुस्तक व पशू व दाणे कागदपत्र इनामाचे व वृत्तीचे व टाळगावीचे व धर्मादायाचे व ब्रह्मसभेचे ऐसे जे घरामध्ये जे होते ते तुह्मी अह्मी तीघानी अपलेले विभाग घेउन समजलो तीन घराची स्थळे त्यात वडिलाचा स्थळावरि तुह्मी राहावे रामराया बाबेति स्थळावरि अह्मी राहावे भिमान महारुद्रा बाबेति स्थळावरि राहावे ऐसे सतोषे करून तिघे जणे समजलो या खेरीज अग्रहारिचे शेत व टाळगाव वृत्ति ज्योतिषाचा विभाग व उपाध्येपणाचा विभाग व गावगन्ना इनाम व कोणेगाविचा इनामाचा विभाग व राजेश्रीचे तीर्थ उपाध्यपण अर्धे सैदापुरीचा तीर्थ उपाध्यपणाचे तीस बीघे आहेत त्याचा निमे विभाग व अणिखि तीर्थ- उपाध्यपण ऐसे समाईक आहे हे तुह्मी व अह्मी व भीमाने ऐसे तिघानि तीन ठाई यथाविभागे भक्षावे लेकराचे लेकरी भक्षून सुखरूप असावे परस्परे विवाद करायास समध नाहि यास जो अन्यथा करील तो देवब्राह्मण द्रोही त्यास श्रीची शफथ असे हे खडपत्र लेहुन दिधले सहि लिहिल्याप्रमाणे रघुनाथ मान्य वळी सुमार सदतीस ३७
गोही
बाबा दिक्षित गिजरे
पत्राप्रमाणे शिवरामभट्ट गिजरे पत्राप्रमाणे ढुढीराज पाठक क-हाडकर पत्राप्रमाणे साक्ष धोडभट्ट वैद्य धोडभट्ट गिजरे साक्षी
पत्राप्रमाणे साक्ष नारायण दीक्षित बिन्न यज्ञेश्वर दीक्षीत
पत्राप्रमाणे साक्ष बाळाजी नाईक ह्मेत्रे बीन नरसाबा नाईक ह्मेत्रे
गोपाळभट्ट गिजरे
स्वहस्ताक्षर साक्षि
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १२२
१६६२ पौषवद्य ८
श्री
बंततीन रास आकार मौजे टेबल
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १२१
१६५८ मार्गशीर्ष शुद्ध ९
श्री
कौलनामा ता । मोकदमानि मौजे सैदापूर परगणे कराड सु।। ११४६ बिदानद दरीविला दादे कौलनामा ऐसा जे मौजेमा।र हा गाव परगणे मजकूरचे ब्राह्मणाकडे चालत आहे त्याप्रमाणे सरकारतर्फेने गाव ब्राह्मणाकडे दिला आहे तुह्मी कोणे बाबे शक न धरिता गांवावर राहून सुरलित वसूल देत जाणे सरकार तर्फेने काही आजार लागणार नाही बेवसवास राहाणे दरी बाब कौल असे जाणिजे छ ७ शाबान
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १२०
१६४८ वैशाखशुद्ध ४ रविवार
श्री
स्वस्तिश्री राज्याभिषेकशके ५२ पराभवनाम संवत्सरे वैशाखशुध चतुर्थी रविवासरे क्षत्रियकुलावतस श्रीराजा शाहू छत्रपती स्वामी याणी देशमूख व देशपाडे प्रा। कराड यास आज्ञा केली ऐसी जे वेदमूर्ती राजश्री नारायणभट बिन वीरेश्वरंभट उपनाम गिजरे गोत्र देवरात सूत्र आश्वलायन अग्निहोत्री वा । कसबे कराड हे बहुत थोर ब्राह्मण वेदशास्त्रसपन्न क्षेत्री राहून स्नानसध्यादि सत्कर्मे आचरोन स्वामीस व स्वामीच्या राज्यास कल्याण चिंतून आहेत याचा योगक्षेम चालविल्याने श्रेयस्कर आहे ऐसे जाणून त्याजवरी स्वामी कृपाळू होऊन मौजे टाळगाव ता। बारसे प्रा। मजकूर हा गाव पेशजीच्या मोकासीयाकडून दूर करून हाली वेदमूर्तीस कुलबाब कुलकानू स्वराज्य व मोगलाई अमल दो। दुतर्फा व इनाम तिजाई देखील हालीपटी व पेस्तरपटी जलतरूतृणकाप्टपाषाणनिधिनिक्षेपसहित खेरीज हकदार व ईनामदार करून नूतन ईनाम दिल्हा असे तरी तुह्मी मौजे मजकूर चतु सीमा पूर्वमर्यादे प्रमाणे वेदमूर्तीचे दुमाला करून पुत्रपौत्रादिवशपरपरेने ईनाम चालविणे प्रतीवर्षी नवीन पत्राचा आक्षेप न करणे या पत्राची प्रती लेहून घेऊन हे मुख्यपत्र भोगवटीयास परतोन वेदमूर्ती जवळ देणे जाणिजे लेखनालकार
मर्यादेय राजते
रुजू सुरू समंत सा। सा।
निविस सुमंत मंत्री सरकार
बरा सुद सुरू सुरू
बार बार बार बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २५८ १५९६ श्रावण शुध्द १
१ सके १५९६ आणंदनाम संवछरे श्री-
२ वण सुध पाडवा तदिवसी धनिको
३ नाम विठोजी बीन सोकरावा कुलकर्णी
४ मौजे गोडेगौ पा। संगमनेर यासि रि-
५ णको नाम तानाजी पा। मो। व बापूजी
६ जुपेढा मौजे मा। अलदुसी राजी
७ होउनु लेहोनु दीधले ऐसे जे तुह्मापासु-
८ न घेतले रुपये ८८५ आठसे पंचा-
९ सी यासी तुह्मास मौजे मा। ची कुलकर-
१० ण खइनु दीधले रुपये २५० अडीच-
११ शावर खइनु कुलकर्ण दीधले असे बा-
१२ की रुपये ५३५ पाचसे पचतीस राहि-
१३ ले हे रुपये कुलकर्णाचे सीरी आपण
१४ घेतले असेत णुबार मौजे मा। रीचे
१५ कुलकर्ण मीरासी करुनु दीधले असे
१६ हे लिहीले सही आधी रुपये घेतले म-
१७ ग खत लेहोनु दीधले तुह्मी कुलकर्ण
१८ मौजे मा।रीचे लेकराचे लेकरी कुल-
१९ कर्ण करुनु उत्पण खाने व मुशा-
२० हीरा खाते नादणे भोगणे अर्जानी करणे
२१ सदरहू रुपये बेरीज आठसे पंच्या-
२२ सी घेतले असेती यासी कोण्ही
२३ बीलाहरकती करील तो गोताचा*
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ११८
१६४८ वैशाखशुद्ध १ गुरुवार
श्री
स्वस्तिश्री राज्याभीषेकशक शके ५२ पराभवनाम सवत्सरे वैशाखशुध प्रतीपदा गुरुवासरे क्षत्रियकुलावतस श्रीराजा शाहू छत्रपति स्वामी याणी मोकादमानी मौजे टाळगाव प्रा। क-हाड यास आज्ञा केली ऐसी जे वेदमूर्ती रा। नारायणभट बिन वीरेश्वरभट उपनाम गिजरे गोत्र देवरात सूत्र आश्वलायन अग्निहोत्री वास्तव्य क्षेत्र कसबा क-हाड हे थोर ब्राह्मण वेदशास्त्रसपन्न सत्पात्र क्षेत्री वास करून स्नानसध्यादि षट्कर्मे आचरोन स्वामीस व स्वामीच्या राज्यास अभीष्ट चितून आहेत याचा याचा योगक्षेम चालविलेयाने श्रेयस्कर आहे ऐसे जाणोन स्वामी याजवर कृपाळू होऊन मौजे मजकूर पेशजीच्या मुकाशियाकडून दूर करून हाली वेदमूर्तीस नूतन ईनाम स्वराज्य मोगलाई अमल येकूण दुतर्फा देखील हालीपटी व पेस्तरपटी व ईनाम तिजाई कुलबाब कुलकानू खेरीज ईनामदार व हकदार पुत्रपौत्रादिवशपरपरेने ईनाम करून दिल्हा असे तरी तुह्मी यास रुजू होऊन मौजेमजकूरचा ऐवज आकार प्रमाणे भटगोसावियास व याचे वशपरपरेने याजकडे वसूल देत जाणे प्रतिवर्षी नूतन पत्राचा आक्षेप न करणे या पत्राची प्रती लेहून घेऊन हे पत्र भोगवाटियास. भटगोसावी याजवली
परतोन देणे लेखनालकार
रुजु सुरु सुमत सा॥ सा॥
निविस सुमत मत्री सरकार
तेरीख २९
साबान सु।। सीत अलफ
बार सुद सुरु सुरु
बार बार बार बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ११७
१६४७ फाल्गुन वद्य ६
श्री
रो ।राऊजी पाटील मौजे कोडोली व रो। रखमाजी पाटील मौजे दुसेरे
व वेदमूर्ती गोपालभट य केशवभट गिजरे जोतिसी देहे ५ पा। कराड गोसावियासि
इमानपत्र बो। अपाजी साबाजी कुलकर्णी मौजे मा आसीर्वाद नमस्कार सु॥ सीत असरीन मया अलफ कारणे लिहिले ऐसे जे गणेश भास्कर या मधे व आपणा मधे भाऊपणाचा गर्गशा लागला व्होत्ता तो व आह्मी उभयता आपणामधे समजलो त्यानी व आह्मी परस्परे स्वदस्तुरे पत्रे येकमेकास तुमचे साक्षीने लेहून दिली त्या पत्रात शफत लिहिल्या आहेत त्याप्रमाणे उभेतानी वर्तावे नवदीगर करील तो अन्याई लेहून दिल्हे इमानपत्र सही छ १९ रजब हास्ताक्षर अपाजी साबाजी