Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १०८
१६४४ चैत्रवाद्य ५ सोमवार
श्रीश्री सकलगुणमडित अखडितलक्ष्मीअलकृत राजमान्य राजेश्री देशाधिकारी व देशलेखक वर्तमान व भावी प्रा। क-हाड गोसावी यासी श्रीकराच्यार्ये पडित आसिर्वाद राज्याभिषेकशके ४८ शुभकृत नाम सवत्सरे चैत्र बहुल पचमी इदुवासरे मौजे सैदापूर पा। क-हाड प्रा। मजकूर हा गाव राजेश्री कैलासवासी स्वामीनी समस्त ब्राह्मण क्षेत्र कसबा क-हाड यास सर्वमान्य अग्रहार ईनाम देऊन पर्याय नाम सिवापूर ह्मणून ठेविले ऐसीयास त्याकाली पामारीचे देशमुखी व सरदेशमुखी राजेश्री कैलासवासी याणी रा। राजा कर्ण याचे स्वाधीन केली होती त्याणी क्षेत्रीचे ब्राह्मण भले विद्यावत व ब्राह्मणसमूहास हि विशेष व क-हाड क्षेत्र बहुत थोर कृष्णातीर पुराणप्रसिद्ध यास्तव त्याणी देशमुखी सरदेशमुखीचे हकदारी मौजे सिवापूर आग्रहारीची समस्त ब्राह्मणास धर्मादाय दिल्हा आणि पत्र दिल्हे जे सदरहू हकदारी तुह्मा समस्त ब्राह्मणास पुत्रपौत्रादि दिल्ही आहे ते भक्षून राजेश्री छत्रपति स्वामीस व राज्यास कल्याण चितून सुखरुप असणे ह्मणून पत्र दिल्हे व वेदमूर्ती मोरेश्वरभट व वीरेश्वरभट बिन विश्वनाथभट गिजरे यास सदरहू अग्रहार पैकी श्री कृष्णानदीस नित्याभिषेक करावया बद्दल भूमी ईनाम बिघे. तीस बीघे आह्मी नेमून दिल्हे त्याचे हकदारी वेदमूर्तीस देऊन त्याचे पत्र अलाहिदा दिल्हे व वेदमूर्तीचे ईनाम सदरहू तीस बीघीयाची हकदारी रा। रुद्राजी चदो देशकुलकर्णी पा। मा।र याणी आपली वेदमूर्तीस दिल्ही आणि आपले पत्र दिल्हे ऐसियास क-हाड ह्मणजे कृष्णातीर बहुत थोर क्षेत्र पुराणप्रसित्ध विख्यात तेथे ब्राह्मणसमुदाय बहुत व ब्राह्मण विद्यावत अग्निहोत्री आहेत वेदमूर्ती मोरेश्वरभट व वीरेश्वरभट हे पुरातन राजेश्री छत्रपतीचे तीर्थपुरोहित यास्तव अग्रहारमा।रीचे देशमुखी सरदेशमुखीची हकदारी राजेश्री राजा कर्ण याचे पत्रा प्रा। समस्त ब्राह्मणास चालवणे व उभयचा वेदमूर्तीस सदरहू तीस बिघे ईनामाचे देशमुखी व सरदेशमुखीची हकदारी व देशकुलकर्णसबधी हकदारी रुद्राजी पताचे पत्रा प्रा। सुरक्षित चालवणे प्रतिवर्षी नूतन पत्राचा आक्षेप न करणे या पत्राची प्रति लिहून घेऊन मुख्य पत्र उभयता वेदमूर्ती पासी परतून देणे छ ३ जमालिखर सु।। इहिदे अशरीन मया अलफ हे आशीर्वाद
बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १०७
१६४४ चैत्रशुद्ध ११
श्री
अज् स्वारी राजश्री चिमणाजी माणकेस्वर ता। मोकदमानी मौजे वडगाव १ मौजे कारवे १ मौजे सेरे १ पा। कराड सु।। सन इसने असरीन मया अलिफ मौजे मजकूरच्या जोतिसाचा कथला वेदमूर्ती रा । गोपालभट व केशवभट गिजरे याचा व शामभट व भिऊभट याचा आहे ऐसियासी कारवे मुकामी याचा कथला निवडावा ऐसा केला त्यास देशकाही अर्ज केला की वर्शप्रतिपदा जाले उपर निर्वाह करून देऊ त्यावरून वतन अमानत केले नहोते हाली वतने अमानत केली असत जे निवाडा होई तो पावेतो अमानत असो देणे कार्य प्रयोजन लग्नमूर्ती होईल त्याचे ते दिवाण रुजू न करणे छ ९ साबान
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १०६
१६४३ भाद्रपद १४
श्री
श्रीमत् श्रौतस्मार्तकर्मानुस्टानपरायण राजमान्य राजश्री समस्त ब्राह्मण विद्वद् वैदिक क्षेत्र क-हाड स्वामी गोसावी यासि
स्नेहाभिलाषी हरीराजाचार्ये पडितराय नमस्कार उपरी वेदमूर्ती केशव भट बीन माहादे भट व वेदमूर्ती रुद्र भट बीन नारायण भट व वेदमूर्ती नरहरी भट बीन तीमण भट उपनाम गिजरे याणी किले पनालेचे मुकामी येउन विदित केले की आपणास योगक्षेमास उपाय काही नाही आपणास काही भूमी देविली पाहिजे ह्मणौन विदित केले त्या वरून मनास आणिता ब्राह्मण भले योगक्षेमाविणे श्रमी होतात ऐसे पाहून यास मौजे शिवापूर अग्रहार पैकी भूमि देबिली बिता।
वेदमूर्ती केशवभट बिन वेदमूर्ती नरहरभट बिन
माहादेवभट गिजरे यास तिमणभट गिजरे यास
भूमी बिघे २ भूमी बिघे
२
वेदमूर्ती रुद्रभट बिन
नारायणभट गिजरे यास
भूमी बिघे २श्री
येणे प्रमाणे भूमी देविली असे तरी यास मोजे मा।र अग्रहार पैकी गयाल व नकल जे असेल त्या ऐवजी त्रिवर्ग वेदमूर्तीस सदरहू भूमी बिघे ४६ साहा बिघे नेमून देणे छ २७ माहे जिलकाद सुहुर सन ईसने अशरैन मया अलफ हे नमस्कार
शुभ भवतु
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १०५
१६४१ पौषशु॥ ५
॥ श्रीविघ्ननाशोजयति ।।
हा गणपति
श्रीमच्चिरजीव शिवदास गोस्वामी या प्रति निरजन गोस्वामी
बिन नरसिह पाठक साख्यायन गोत्र वास्तव्य क-हाड
अशिर्वाद उपरि शके १६४१ वर्षे विकारी सवत्सरे पौष शुक्ल पचमी रविवासरे तद्दिनी श्रीकरहाटक्षेत्री दानपत्र तुह्यास लेहून दिल्हे ऐसे जे राजा शाहू छत्रपती याणी अह्मा यिनाम चावर १ येक मौजे ढेभु येथे दिल्हा आहे त्यांपैकी श्रीमप्रीत्यर्थ बिघे १५ पधरा तुह्मास यिनाम दिल्हा असे तथे धान्य उत्पन्न करून सत्कर्म सत्काळक्षेप करणे यास कोण्ही अन्यथा करील त्यास पचमहापातकाचे पाप घडेल हे दानपत्र लिहिले सत्य भुभवतु
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
पुणतांबे-जोसी
लेखांक २५४ * १५२८ पौष वद्य २
१ अज दीवाणे रख्तखाने खास बाजानिबू हुदेदारानी व खोतानी हाल व इस्तकबाल
२ व मोकदमानी कसबे पुणताबे पा। संगमनेर बावी बिदानद सु॥ सन सबा अलफ बा। हासी-
३ ल जकाती पैकी बा। ईनाम बा। माणीक जोसी बीनत रतनजोसी सा। कसबे मज-
४ कूर बंदगी हजरती मालूम केले जे आपणासी ईनाम आदा हासील जकाती कस-
५ बे मजकूर पैकी घोनस्केड ६ बा। फर्मान बसिका खास करकीर्दी बा। बु-
६ र्हान स्या व भोगवटे वजीरानी व मुकासाइयानी प्रमाणे भोगवटा व तसरुफा-
७ ती ता। सीत अलफ चालिले आहे व हुजती बसिका खास व भोगवटे वजीरानी
८ व मुकासाइयानी होते ते मोगलाचे फीतवेयामधे गु॥ जाले आहेती त्यापै-
९ की ममलकत मदारी मलीक अंबर भोगवटा आहे माहाली कारकून ताजा
१० फर्मानाचा उजूर करिताती तरी मोकरर फर्मान मर्हामती होये मालूम जाले बा।
११ इसरुफाती दीवाण आला माणीक जोसी बीन रतनजोसी सो। कसबे मजकूर या
१२ चा ईनाम सदरहू बा। हुजती सदरहू प्रमाणे मोकरर केले असे भोगवटा
१३ व तसरुफाती ता। सीत अलफ जैसे चालिले असेली तेणेप्रमाणे अज इ॥
१४ ---------------- पासून आदा करीत जाईजे हुजती बसिका खास
१५ व कितेक भोगवटे वजिरानी व मुकासाईयानी मोगलाचे फीरकेयामधे गु-
१६ मा। जाले आहेती त्याचा उजूर न कीजे औलाद व अफलाद चालवीत जाइजे
१७ दरहरसाल खुर्दखताचा उजूर न कीजे तालीक घेऊनु असेली फिराऊन दीजे
मो-
१८ करर बा। पा।ळून एकंदर ईनाम बराये सबा अलफ तेरीख १५ माहे रमजा-
१९ नु दरान रुके सा। रा। मोर्तब सूद
(शिक्का फारसी आहे)
रुजूमुश्रीफ
रुजू सुरनवीस
तेरीख १७ माहे जीलकादी खमस असर अलफ
फा। मीर्जा अहेलील फते
सप्रसूद तालीकसूद सप्रसूद सप्रसूद सुप्रसूद
मुश्रीफ दफ्तरखास मोर्तब सुरनिवीस
बार सूद बार सूद बार सूद बार सूद बार सूद
तालीक सूद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १०४
१६४० फाल्गुनवद्य ९
श्रीमशरुल अनाम देशमुख व देशपांडे कर्यात दुधगाऊ पा। हुकेरी यासी कृष्णाजी विठल सुहुरसन तिसा असर मया अलफ हुजुरून या प्रातीचे चौथाई हुजूर बाबतीचा कार्यभाग आह्माकडे सागितला आहे या करिता आह्मी आपले तर्फेने राजश्री शिवाजी केशव व रा । राघो विस्वासराऊ यासि त्या प्राते धदा सागोन पाठविले आहे ये विसी राजपत्रे हि सादर आहेत तरी तुह्मी मा।रनिलेसी रुजू होऊन का । मा।रचा तहरह करून ये तर्फेचा वसूल सुरलीत देत जाणे आणि ता। मजकुरास अजार न लागे ते गोष्ट करणे जाणिजे छ २२ रबिलाखर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखक १०३
१६४० पौषशुद्ध ७
श्री
राजमान्ये राजश्री कमाविसदार सावोत्रा प्रा। क-हाड यास नारो शकर सचीव सु॥ तिसा असर मया अलफ मौजे सैदापूर प्रा। मा।र हा गाव समस्त ब्राह्मण वास्तव्य क्षेत्र क-हाड यास इनाम सर्वमान्य आहे त्यास तेथील सावोत्रा ब्राह्मणास पूर्वी पासून दिल्हा आहे त्याप्रमाणे त्याकडे सालदरसाल पावत आहे तरी मौजेमजकूरचा सावोत्रियाचा अकार होईल तो वेदमुर्ती समस्तास पावेल तुह्मी मौजेमजकुरास वसुलाचा तगादा न लावणे पूर्ववत्प्रमाणे ब्राह्मणाकडे चालवणे जाणिजे छ ५ सफर
सुरू सुद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १०२
१६४० पौषशुद्ध ३ शनिवार
श्री
स्वस्ति श्री राज्याभिषेकशके ४५ विलबीसवत्सरे पौशशुध त्रितिया मदवासर क्षेत्रियेकुळावतस श्री राजा शाहू छत्रपती स्वामी याणी वेदमूर्ती समस्त ब्राह्मण क्षेत्र कराड यासी दिल्हे ईनामपत्र ऐसेजे तुह्मी स्वामी सनीध श्री माहादेवचे मुकामी येउन विदित केले जे मौजे सैदापूर उर्फ सीवापुर ता । हवेली कराड हा गाव समस्तास कुलबाब कुलकानू खेरीज हकदार व ईनामदार देखील हालीपटी व पेस्तरपटी जलतरु- काष्टपाषाणानिधी-निक्षेपआदी करून पडले पान चतुःसीमापुर्वक पूर्वमर्यादे प्रमाणे ईनाम पूर्वी करून दिल्हा आहे तेणेप्रमाणे चालत होते त्यास अलीकडे मुलुकात ताब्राची आमदानी जाहाली होती त्यामुले निमे वसूल त्याजकडे द्यावा अैसे जाहाले होते परतु त्यास ही पत्रे दाखविली सदरहू प्रमाणे त्यानी आपली पत्रे करुन देऊन चालवित होते प्रस्तुत महाराजाच्या स्वराज्यातील मोगल जाऊन अमल उलटा आण दुतर्फा अमल माहाराजाकडे जाहाला तर स्वामीनी दुतर्फा देखील मोगलाई एैवज जाहागीरदारी व फौजदारी व सायेर वगैरे बाब कुलबाब कुलकानू आपणास नूतन पत्रे करुन देऊन चालविले पाहिजे ह्यणून त्या वरून मनास आणिता तुह्मी थोर सत्पात्र क्षेत्री राहून श्रानसध्यादिशटकर्मे आचरोन. स्वामीस व स्वामीच्या राज्यास कल्याण चितोन आहा तुमचे चालविलेया श्वामीस श्रेयस्कर जाणून स्वामी तुह्या समस्तावरी कृपाळु होऊन मौजे मजकूर कुलबाब कुलकानू खेरीज हकदार व कदीम ईनामदार देखील मोगलपटी व जाहागीरदारी व फौजदारी व किलेदारी व सायेर वगैरे बाब व हालीपटी व पेस्तरपटी जलतरुत्रृणकाष्टपाशाणनिधीनिक्षेपआदी करून पडले पान चतुःसीमापूर्वक पूर्वमर्यादे तुह्मास व तुमचे पुत्रपौत्रादिवौशपरंपरेने अग्रहार सर्वमान्य करून दिल्हा असे तर सदरहू प्रमाणे तुह्मी समस्त वौशपरपरेने,ईनाम अनभऊन सुखरूप राहाणे लेखनालकार
रुजू सुरु सा।
निवीस मत्री ,
: तेरीख १
सफर सु।। तिसा बार सूद सुरु सूद बार बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १०१
१६४० पौषशुद्ध ३ शनिवार
श्रीस्वस्ति श्री राज्याभिषेकशके ४५ विलबी सवत्सरे पौष्य शुध त्रितीया मदवासरे क्षत्रियेकुलावतस श्री राजा शाहू छत्रपती स्वामी याणी राजश्री देशाधिकारी व लेखक वर्तमान व भावी प्रांत क-हाड यासि आज्ञा केली ऐसी जे समस्त ब्राह्मण क्षेत्र क-हाड याणी स्वामी समीप येऊन विनती केली की मौजे सैदापूर ता। हवेली प्रा। मा। हा गाव कुलबाब कुलकानू आपणास अघ्रार इनाम सर्वमान्य आहे तेथील उत्पन्नावरी योगक्षेम चालऊन श्नानसध्यादिक उपसर्ग लागला आहे तो न लागे ऐसी आज्ञा केली पाहिजे ह्मणोन त्यावरून क्षेत्रस्त ब्राह्मण थोर सत्पात्र याचे अविक्षेपे चालवणे स्वामीस अगत्य यानिमित्य मौजे सैदापूर ऊर्फ सिवापूर ता। हवेली प्रा। मार देखील मोगलपटी कुलबाब कुलकानू इनाम करार करून दिल्हा आहे समस्त ब्राह्मण क्षेत्र क-हाड यास पुत्रपौत्रादिवंशपरपरेने चालवणे आणि ब्राह्मण सत्कर्माचरण करून स्वामीचे कल्याण चितून सुखरूप राहात असे करणे मोगलपटीचा वगैरे उपसर्ग येकजरा न करणे यापत्राची प्रती लेहून घेउनु हे मुख्य पत्र भोगवटियास देणे जाणिजे लेखनालकार
रुजू सुरू सा ।
निवीस मत्री
बार सुद सुरू सुद बार बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २५३ श्री
राजश्री रंभाजी निंबाळकर गोसावी यांसि
अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य स्नेहांकित जयसिंग जाधवराऊ सेनापति रामराम एथील कुशल जाणून स्वकीय लेखन करीत गेले पाहिजे विशेष राजश्री जनार्दन गोसावी वास्तव्य मौजे मोरगांव ता। कर्हेपटार हे श्रीच्या पायापासी पुरातन आहेत याचा योगक्षेम अन्न आछादन अतीत अभ्यागत हव्यकव्य चालिले पाहिजे याजकरिता माहाराज राजश्री थोरले कैलासवासी स्वामी होते त्याणी जमीन चावर नीम यास इनाम करून दिल्ही तेणेप्रमाणे मोगलाई तर्फेचे जाहागीरदार राजश्री वणगोजी नाईक व राजरी मुधोजी नाईक व बजाजी नाईक व मिर्जा राजाची व पातशाह खालिसाची आहेत साप्रत मौजेमजकूर तुह्माकडे जाहगीर जाले त्यास तुमचे कमाविसदार अनमान करिताति याजकरिता जनार्दन गोसावी तुमचे भेटीस आले आहेत तुह्मी हि धर्मपरायण आहा पूर्वीपासून तुमचे निंबाळकरानी हि चांलविले आहे तेणेप्रमाणे तुह्मी हि आपले पत्र गांवकरास व आपले कमावीसदारास करून देऊन याचे इनामाचा प्रसग सुरक्षित चालोन हे स्नानसंध्या श्रीचे पायापासी एकनिष्ट करून तुमचे कल्याण चिंतून राहेत ते गोष्टी केली पाहिजे बहुत काय लिहिणे छ १९ जमादिलावल हे विनंति