Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
येकून पत्रे येकेतालीस त्यापैकी वाईकर भाऊ याची समापत्रे तीनी व देशपांडे याचे पत्र येक येकून च्यार पत्रे तपसीलवार लेहून बाकी पत्रे सदतीस अक्षरशाहा वाचून पचाइतानी पाहिली या मधे तुम्हा तिघाचा तपसील भाऊपणाचा व भोगवटियाचा लागत आला या पत्रा वरून तुमचा भाऊपणा खराखुरा ऐसा पचाझ्तानी निश्चये करून तुम्हा उभयेतास विचारिले की तुह्मी या स्थलास राजी असाल तरी येथेच निवाडा करून आगर तुह्यास दुसरे स्थळ पाहिजेसे असेल तरी हे मायेस्थल करून तुह्मा उभयेतास मानेल ते स्थल देऊ ह्मणऊन तुह्मा उभयेतास आज्ञा केली त्या वरून तुह्मी उभयेतानी विनती केली की आह्मी ये स्थली च पचाइतास रजावद असो तुह्मी पचाईत परमेश्वराचे ठाई आहा आम्ही येथे त्रिवाचा राजी असो त्या वरून तुह्मा उभयेतास राजीनामे लेहून देणे ह्यणऊन आज्ञा केली तुह्मी उभयेतानी राजीनामे लेहून दिल्हे बितपसील
राजीनामा बो। सदासिवभट बिन भानभट गिजरे क-हाडकर अग्रवादी सु॥ सलास अशरीन मया अलफ कारणे लेहून दिल्हा राजीनामा ऐसा जे नारायणभट बिन वीरेश्वर भट गिजरे व गोपालभट बिन रुद्रभट गिजरे या मधे व आह्मामधे कारवे व वडगाव व सेरे व दुसेरे व कोडोली येथील जोतिषाचा व कुलकरणियाचे घरीचे उपाध्यपण याची पत्रे श्रीमाहादेवी आपले बाप भानभटी मोरेश्वरभटापासी दिल्ही याचा वेव्हार करून उभयेता स्वामीपासी आलो स्वामीनी उभयेताच्या तकरीरा व जमान घेतले उपरी सभानाईकी उभयेतास विचारिले की तुह्मी या मज्यालसीच्या गोतास मान्य आहा की परस्थलास मान्य आहा ऐसे विचारिले त्यास या च सभेच्या गोतास मान्य असो ऐसे बोलिलो राजीनामा मागितला त्यास आह्मी मान्य होऊन राजीनामा दिल्हा आहे त्यास तुह्मी सभानाईक जेणेप्रमाणे न्याये कराल त्यास आह्मी मान्य असो अन्यथा होऊ तरी गोताचे आन्याई असो हा राजीनामा सही शके १६४५ शोभकृत नाम सवत्सरे जेष्ट शुद्ध प्रतिपदा भृगुवासर
राजीनामा बो। नारायेणभट बिन वीरेश्वरभट व गोपालभट बिन रुद्रभट गिजरे जोतिषी पश्चमवादी सु॥ सलास अशरीन मया अलफ शके १६४५ शोभकृत नाम सवछरे जेष्ठ शुध प्रतिपदा भृगुवासरे लेहून दिल्हा राजीनामा ऐसा जे भानभट बिन कृष्णभट व बावदेवभट बिन नीलकठभट गिजरे या मधे व आह्मामधे कारवे व वडगाव व सेरे व दुसरे व कोडोली येथील जोसीपणाचा व कुलकरणियाचे घरीचे उपाध्यपणाचा वेव्हार लागला ह्मणऊन उभयेता स्वामीपासी आलो स्वामीनी उभयताच्या तकरीरा व जमान घेतले त्याउपरी सभानाइकी उभयेतांस विचारिले की तुह्मी या मज्यालसीच्या गोतास मान्य आहा की परस्थलास मान्य आहा ऐसे विचारिले त्यास आह्मी या च सभेच्या गोतास मान्य असो ऐसे बोलिलो राजीनामा लेहून मागितला त्यास आह्मी मान्य होऊन हा राजीनामा लेहून दिल्हा आहे त्यास तुह्मी सभानाईक जेणे प्रमाणे न्याये कराल त्यास आह्मी मान्य असो त्रिवाचा मान्य असो यासी अन्यथा होऊ तरी गोताचे आन्याई हा राजीनामा लेहून दिल्हा सही छ २९ साबान
येणेप्रमाणे उभयेताचे राजीनामे घेऊन पचाइतानी तुमच्या तकरींरेबमोजिब तुमचा व दुसेरेकराचा व वाईकराचा वशावलीवरून भाऊपणा येक जाला मूलपुरुष रामेश्वरभट त्यास पुत्र तिघे बितपसील
वडील दुसरा तिसरा
नरहरीभट रगमट गोविदभट
१ १ १
त्याचा वश हाली तुह्मी त्याचा वश हाली त्याचा वश हाली
नारायेणभट बिन वीरेश्वरभट विश्वनाथभट बिन बाळभट गणेशभट बिन नारायेणभट
व गोपालभट बिन रुद्रभट वाईकर दुसेरेकर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
येणेप्रमाणे तुह्मी तीनी समापत्रे वाईकर भावाची दाखविली त्यावरून तुमचा व दुसेरेकराचा व वाईकराचा भाऊपणा येक जाला विश्वनाथभट बिन बाळभट वाईकर यानी मनामधे देशपांडे याचे घरीच्या उपाध्येपणाच्या अशाचे भये धरून नपुत्रा नुपुत्री बोलिले तेव्हा त्याच्या वडिलाच्या समापत्रावरून तुह्मी व ते व दुसेरेकर ऐसे भाऊ पचाईतामुखे खरे जाहला व दुसेरेकर भाऊ याच्या वडिलांच्या खडिपत्रावरून भाऊपणा त्रिवर्गाचा येक जाला कागदपत्रावरून व वशावलीवरून पाहता परस्परे त्रिवर्गाचा भाऊपणा खरा जाहला त्याच्या दाखल्यास तुह्मापासी देशपाडे याचे कागद तीनी आहेत त्यापैकी पेशजीच्या वेव्हाराचे वेलेचा बितपसील
सौजन्य मोकदमानी मौजे रेठरे बु।। यासि रुद्राजी चदो देशकुलरणी प्रा! क-हाड सु।। सलास तिसैन अलफ तुह्मी पत्र पाठविले होते की गिजरे बहुत आहेत त्यास वृत्तीस समध कोणास आहे कोणास नाही हे लेहून पाठवणे ह्मणऊन लिहिले होते तरी त्यास आह्मी विचार केला त्यास वेदमूर्ती राजश्री मोरेश्वरभट क-हाडकर व ता। रा। बाळभट वाईकर व ता। रा। तिमणभट दुसेरेकर ऐसे त्रिवर्ग गिजरे याचे घर येक व मूलपुरुष येक या त्रिवर्गानी मिलोन पाचा गावीचे जोतिषपण व आमचे घरीचे व राजश्री कृष्णाजी शकर याचे घरीचे व रा। निरजन आवधूतराव याचे घरीचे व आमचे आवघे उबरजकर याचे घरीचे उपाध्यपण व सेरेकर कुलकरणी याचे तीनी घरीचे उपाध्यपण ऐसे या त्रिवर्गानी येथाविभागे भक्षावे ऐसे पुरातन आहे परतु आमचे तीनी घरीचे उपाध्यपण सापृत वाईक गिजरे करीत आहेत ह्मणऊन सेरेकराचे तीनी घरीचे उपाध्यपण व हाली मौजे कोडोली व मौजे दुसेरे येथील जोतिष दुसेरेकर गिजरे व क-हाड मोरेश्वरभट गिजरे ऐसे उभयेता मिलोन भक्षिताहेत तीनी गावीचा तो कथला आहे या करिता तुह्मापासी गिजरे व प्रथमशाखी व समुद्रखानी ऐसे उभयेता पाठविले आहेत तुह्मी समस्त गोत मिलोन जेणेप्रमाणे निवाडा कराल त्या प्रमाणे त्रिवर्ग गिजरे वर्ततील व आणिखी गिजरे बहिरभटाचे विल्हेचे आहेत व माहुलीकर गिजरे आहेत त्या उभयेतास व या त्रिवर्गास कोणेयेक गोस्टीविशी आर्थाआथी समध नाही जाणिजे रा। छ २९ माहे रबिलावल
येणेप्रमाणे देशपाडे याच्या पत्राच्या दाखल्यावरून तुम्हा त्रिवर्गाचा मूलपुरुष येक तुम्ही त्रिवर्ग भाऊ खरे व वृत्ती त्रिवर्गाची ऐसी खरी जाहली वृत्तीचे व भोगवटियाचे कागद तुम्ही पचाइतापासी सदरहू प्रमाणे दाखविले बिता।
६ वृत्तिपत्रे जुनी असल
१ रामेश्वर भटाच्या नावाचे दानपत्र
१ नरहरी भटाचे नावाचे दानपत्र१ कृष्णभट व भानभट याचे नावाचे दानपत्र
१ त्रिवर्व भाऊ याच्या वडिलाचे नावाचा महजर देसकाचा
२ मुतालिक पत्रे
१ अतभट व रघुभट याच्या नावाचे
१ अतभट भास्करभट याच्या नावाचे
------
२
----
६
१ पारसी पत्र झुने असल ४ खडिपत्रे
१ जाबिता ९ पेशजीची वेव्हारपत्रे
१ देशपाडे याची पत्रे ३ समापत्रे वाईकर भाऊ याची.
१ राघों जोगदेउ याचें पत्र ११ खुर्दखतें इनामाची
१आनदभटास लिहिले पत्र १ वडगावकराचे पत्र
-------
४१
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
येकून समापत्रे तीनी पैकी पेशजीचे वेव्हाराचे पत्र आनदभटाचे नावाचे तीर्थरूप राजश्री रुद्रभट, क-हाडकर व तिमणभट दुसेरेकर गिजरे गोसावी यासी प्रती आनदभट गिजरे वाईकर साष्टाग नमस्कार विनती उपरी तुह्मी आह्मासी नेम करून गेलेती त्यास बोलिल्या नेमाप्रमाणे आले नाहीत आह्मी आठ दिवस मार्ग पाहिला मग राजकार्य होते ह्मणऊन गेलो, ऐसियासि तुह्मी जे कार्य आवलबिले आहे ते करणे त्यास काय बरे वाईट होईल त्यास तिसरे तकसीमेस आह्मी, मान्य असो जे काये पडेल तें देऊ येविशी आनमान न करणे श्रीमुख सवछर आशाढ शुध सप्तमी भृगुवासर हा नमस्कार पत्र येक १
का। पत्र पेशजीचे बाळभटाचे नावाचे शके १६१४ आगिरानाम सवछरे श्रावण शुध दशमी तदिनी रुद्रभट क-हाडकर व तिमणभट दुसेरेकर गिजरे यासि बाळंभट व समस्त बापभाऊ वाईकर यानी लेहून दिल्हे जे वृत्तीसमधे जे द्रव्य पडेल ते देऊ जे पडिले आसेल ते हि देऊ सवछर प्रतिपदेकारणें देऊ न देऊ तरी सवछर प्रतिपदेपासून कलातरासकट वैशाखमासी देऊ मुदतीस नेदू तरी वृत्तीस आह्मास समध नाही हे लिहिले सत्य साक्ष रामभट आरणके पत्र येक १
कित्ता येकपत्र हाली वेव्हराचे राजमान्य राजश्री विरेश्वरभट गिजरे क-हाडकर व केशवभट गिजरे दुसेरेकर स्वामी गोसावी यासि नारायेणभट बिन आनदभट व केशवभट गिजरे दुसेरेकर स्वामी गोसावी यासि नारायेणभट बिन आनदभट कटकट करून दुसरे व कोडोली येथील वृत्तीचा भाग वारून घेतला त्या मुले तुह्मास जे द्रव्य पडिले असेल व हाली तीही गावीचा कथला शामभट प्रथमशाखी व भीमभट समुद्रखानी यासि माडिला आहे तरी आसाध्य साध्य विचारे जे द्रव्य पडेल ते श्री स्मरोन तुह्मी सागाल त्याप्रमाणे देऊ आह्मी विभागपरत्वे देऊ यासि आह्मापासून अतर पडणार नाही तुह्मी आह्मासी छद्मयुक्त न वर्तावे शके १६४४ शुभकृत नाम सवछरे चैत्र वद्य शष्टी हे लेहून दिल्हे सत्य साक्ष रामभट बुधकर १ अनतभट ढवलीकर वास्तव्य पाराशर १ गोपालभट पोरे १ बहिरभट आरणके १
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
तकरीरकर्दे बो। नारायेणभट अध्यापक समस्त सभानाईक यासि लेहून दिल्ही तकरीर ऐसी जे भानभट गिजरे व मोरभट गिजरे उभयेता बोलिले की पत्रे आह्मास पावलीं भानभट बोलिले की मोरेश्वरभटी आपणापासी कागद मागितले मोरेश्वरभट बोलिले की आपणास पत्रे पावलीं पत्रे कशाची हे आपणास ठावकी नाहीत आपण स्वदस्तुरे काही गोही लिहिली नाही हे सत्य शोभकृत नाम सवछरे जेष्ट शुध प्रतिपदा भगुवासरे हे गोस्टी ईश्वर नाम सवछरीं जाहली उभयेता बोलिले मात्र पत्रे आपणादेखत भानभटी मोरेश्वरभटापासी दिल्ही नाहीत हे सत्य
येणेप्रमाणे उभयेतानी साक्षी दिल्ही बाकी दोघे निवर्तले त्याच्या साक्षी बहिरभट आफले याच्या अक्षरे दोघाची साक्ष आहे त्याचा पुत्र आहे तो रुजू करून देईल ह्मणऊन सदासिवभटी करार केला त्यावरून बहिरभट आफले याचा पुत्र मुकुंदभट आफले यासि सत्य घालूत करीना विचारिला ते बोलिले की हें वर्तमान आपणास काही विदित नाही परतु हे अक्षर आपल्या तीर्थरूपाचे ह्यणऊन श्रीकृष्णेमधे निघोन खरे करून देऊ ऐसे प्रथमचि बोलिले त्यास पचाइतानी विचार केला की हे साक्षी आणि येकायेकीच श्री त निघो ह्यणताती त्याचा विचार काये आपले बापाचे अक्षर जाहले तरी त्याचे हातीचे पुस्तक अगर आणखी कागद गावातील आणून रुजू करून ऐक्यता करून दाखवावे ऐसे न करिता श्री मधे निघो ऐसे बोलिले तेव्हा अप्रमाणतेची गोस्टी दोघे जिवत साक्षी आहेत त्या पैकी एकाने तो आपणास काही च ठाऊक नाही दस्तूर आपले नव्हे काहीच स्मरत नाही ऐसी साक्षी दिल्ही दुसरियाने साक्षी दिल्ही की कागद दिल्हे परतु कशाचे दिल्हे हे ठाऊक नाही आपणादेखत हि दिल्हे नाहीत साक्ष हि आपले अक्षरे घातली नाही ऐसे बोलिला त्यास दोघे जिवत साक्षी त्याचा विचार या प्रकारीचा याच्या तो तीर्थरूपाच्या अक्षराची साक्षी ऐसे आसोन प्रमाण करीन ह्मणऊन वदला तेव्हा पचाझ्तानी अप्रमाण करून निरोप दिल्हा ऐसे तिघे साक्षी याची बोलीचाली लेहून त्या उपरी त्रिवर्ग वधूचा शोध पाहिला तुह्मास आज्ञा केली की तुह्मापासी भाऊपणाचे कागद आहेत ते पचाइतास वाचून दाखवणे त्यावरून तुह्मी ती पत्रे बजिनस आसले आणून दिल्ही त्यात वाईकरभटाची समापत्रे तीन बितपसील
आनंदभटाचे नावाचे बाळंभटाचे नावाचे नारायेणभाटाचे नावाचे
पत्र येक १ पत्र येक १ पत्र १
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
येणेप्रमाणे वाईकर विश्वनाथभट याने लेहून दिल्हे ते पचाझ्तानी मनास आणिले त्याचा विचार मनास आणिला तो वाईकर मोघम गोस्टी बोलतात आपण देशपाडे याचे घरीचे उपाध्यपण खातो त्यास कालकला कथला होईल या करिता मोघम बोलताती परतु या माघे याच्या वडिलाचे लिहिले पुसिले आहे तिघे भाऊ येक घर आहे तिघाचा मूलपुरुष येक खरे परंतु वाईकराचा भोगवटा सापृत पाचा गावी नाही आणि दुसेरेकर याचा व नारायेणभट व गोपालभट गिजरे क-हाडकर याचा भोगवटा सापृत देशपाडिये याच्या घरी नाही त्यास गावकीच्या वृत्ति ह्मणिजे कसालियाच्या आणि उपेद थोडिका आणि देशपाडे याचेथील उपेद्र विशेष आणि कसाला नाही त्यास आता भाऊ हाणवावे तरी प्रथमशाखे व समुद्रखानि यासि गोपालभट व केशवभट गिजरे यानी प्रथमशाखी व समुद्रखानि यासि वेव्हार करून ते उभयेता खोटे करून उभयेता गिजरे यानी वृत्तीचे साधन केले आहे त्यास वेव्हार समधे द्रव्य पडिले आहे हे गोस्टीचे तकसीम तिसरी द्यावी लागेल आणि देसपाडे याचेथील दोनी तकसिमा गोपालभट व केशवभटास द्याव्या लागतील हे गोस्टी मनात आणून कची बुधीने बोलतो परंतु हे त्रिवर्ग भाऊ खरे वाईकर आनदभट गिजरे ह्यणिजे प्रसिध राजमान्य त्याचे समापत्र व विश्वनाथभटाचा बाप बाळभट याचे समापत्र आसोन व आनदभट वाईकर याचा पुत्र नारायेणभट याचे हि समापत्र गोपालभट केशवभटापासी ऐसी तीनी पत्रे आहेत याचा शोध केला जाईल ऐसा निर्वाह करून सदासिवभट बिन भानभट यानी पत्रे दिल्ही ऐसी खरी करून देतो ह्मणऊन साक्षी लेहून दिल्हे सदरहू साक्षीप्रमाणे साक्ष घेऊन आले त्यास पचाझ्तानी सत्य घालून विचारिले त्यावरून साक्षी यानी तकरीरा लेहून दिल्हीया बितपसील
दा। बो। नारायेणभट आफले सु॥ सलास अशरीन मया अलफ कारणे लेहून दिल्ही तकरीर ऐसी जे सदासिवभट बिन भानभट गिजरे या मधे व नारायेणभट बिन वीरेश्वरभट गिजरे या मधे जोसीपणाच्या वतनाचा कजिया लागून निवाडियाबदल आले त्यास सदासिवभट यानी लेहून दिल्हे की आपला बाप भानभट यानी मोरेश्वरभटापासी वतनाचा कागद येक व पिलभटाच्या नावाचा मुतालिकाचा कागद येक ऐसे दोनी कागद श्रीमाहादेवी दिल्हे त्यास साक्षी आह्मी आहो ह्मणऊन लेहून दिल्हे त्यावरून आह्मास श्री चा शफत घालून विचारिले तरी ते काही आपणास दखल नाही च्यार महिने जाहले सदासिवभटाने पचागासारिखा कागद गुडाळून तुमचे हातिचे अक्षर ह्यणऊन दुरून दाखविले परतु कागद आपण पाहिला नाही अगर आह्मास हे काही च दखल नाहीं हे लेहून दिल्हे सही शोभकृत नाम सवछरे जेष्ठ शुध प्रतिपदा भृगुवासरे शके १६४५
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
येणेप्रमाणे तिघाचा विस्तार आहे नारायेणभट गोपालभट आपले भाऊ सदासिवभट बिन भानभट हा आपले पदरीचा भाऊ नव्हे देवरात गोत्री मात्र त्यास आपणास समध नाही येणेप्रमाणे लेहून दिल्हे आहे हे श्री मधे निघोन याचप्रमाणे बोलो यासि अन्यथा जाहलो तरी आपणास वृत्तीस समध नाही हे लेहून दिल्हे सही तेरीख २९ माहे शाबान येणे प्रमाणे दुसरेकरानी तकरीर लेहून दिल्ही व वशावली लेहून दिल्ही त्याउपरी विश्वनाथभट बिन बाळभट गिजरे वाईकर यासि तुह्मा उभयेताचा करीना विचारिला त्यास विश्वनाथभट यासि पुसावे एक आणि बोले एक ऐसा चावळू लागला तेव्हा पचाइतानी त्यास ह्मटिले की तुमचे देशपाडे याचे घरीचे उपाध्यपणावरी समजोन राहिला ते वृत्ती व हाली जोसीपणाच्या वृत्ती येक करून त्रिवर्गास देत नाही तुह्मी काही सशये न धरणे भाऊपणा मात्र जैसा असेल तैसा सत्य सागणे ऐसे बोलिले त-ही त्याच्या चित्तास न येता आपल्या मनात सशये धरून नपुत्रा नपुत्री ऐसे बोले त्यावरून पचाइतानी निर्भर्छिला तेव्हा त्याने पचाइतापासी विनती केली की आपली आजी कासीबाई वाईस आहे तीस कुलकट ठाऊक आहे वाईस जाऊन पुसोन येतो ह्मणऊन समागमे मनुष्य घेऊन वाईस गेला मग तेथून येऊन तकरीर लेहून दिल्हा बितपसील
तकरीरकर्दे बो। विश्वनाथभट बिन बाळभट गिजरे वाईकर सु।। आर्बा अशरीन मया अलफ लेहून दिल्ही तकरीर ऐसी जे सदासिवभट बिन भानभट गिजरे व नारायेणभट बिन वीरेश्वरभट या उभयेतात पाचा गावीच्या जोतिषपणाचा कजिया लागून स्थलास आले तकरीरा लेहून दिल्हीया त्यामधे उभयेतानी लिहिले की आपण तिघे भाऊ येक वाईकर व येक दुसेरेकर व येक आपण ह्यणऊन लेहून दिल्हे त्यावरून आपणास बोलावून वडिलाचे सत्य घालून विचारिले की उभयतानी तुह्मी भाऊ ह्मणऊन लेहून दिल्हे तरी याचे सत्य स्मरून कोणता भाऊ आपला हा निर्वाह करून देणे त्यास आपले आजीने सागितले की आपला आजेसासरा सागत होता की आपली मूलवृत्ती वीरवाल्हे तेथील जोसीपण ते थिटियाच्या स्वाधीन करून ते स्थल सोडून आले कोणी वाईस राहिले कोणी माहुलीस राहिले कोणी क-हाडी राहिले परतु येकमेकाची वृधिअवरोध, धरीत नाही येणेप्रमाणे आपली आजी कासीबाईने सागितले ते लेहून दिल्हे सही तेरीख १ माहे रमजान
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
दा। बो। धोडभट बिन सिवभट जोतिषी कुलकरणी मौजे आसनगाव सु।। सलास अशरीन मया अलफ कारणे लेहून दिल्ही तकरीर ऐसी जे बाबदेवभट व सदासिवभट गिजरे या मधे व गोपालभट गिजरे या मधे पाचा गावीचे जोसीपणाचा कथला लागून स्थलास आले तकरीरा लेहून दिल्हीया त्यास गोपालभट यानि लेहून दिल्हे की आमचे गुजारतीने सदासिवभट व बाबदेवभट बोलिले की कागदाच्या तालिका अगर मोरेश्वरभटांचे हातिचा कागद व साक्षी नाहीत ऐसे क-हाडी बोलिले ह्मणऊन आपणास आणून सत्य घालून विचारिले तरी सदासिवाभट व बाबदेवभट बोलिले की आपणापासी तालिका अगर मोरेश्वरभटाचे हातिचा कागद आपणापासी नाही भानभटापासी दोनी कागद होते ते मोरेश्वरभटापासी दिल्हे ऐसे बोलिले हे सत्य तेरीख १९ माहे शाबान
येणेप्रमाणे उभयेतानी साक्ष दिल्ही उभता साक्षदार आले नाहीत तुह्मी आणिती ह्यणो लागलेस त्यास आह्मी पचातानी आज्ञा केली की त्या साक्षी वाचुन काही खोलबा नाही तुह्मी येकासयेक परस्परे घरी उदड गोस्टी बोलिला त्यास प्रमाण काये वादाचे काम मनास मानेल तैसे बोलतात याचे सत्य काये याची साक्ष कोठवरी पाहावी परंतु दोघाच्या साक्षीचा मोझा पाहून ते गोस्टी राहऊन मुख्य गोस्टी तुह्मी उभयेता वादी यानी वाईकर व दुसेरेकर याचा भाऊपणा लाऊन द्यावा व सदासिभटी साक्षीबदल लेहून दिल्हे त्याच्यामुखे साक्ष खरी करावी सदासिवभट यानी व तुह्मी वाईकर भाऊ आणिला दुसेरेकर प्रसगीच होता त्या उभयेतास पचाइतानी सत्य घालून तुह्या उभयेताची साक्षी विचारली त्यानी साक्ष दिल्ही बितपसील दा। बो। गणेशभट व रुद्रभट बिन नारायेणभट गिजरे दुसेरकर सु॥ सलास अशरीन मया अलफ कारणे लेहून दिल्ही तकरीर ऐसी जे सदासिवभट बिन भानभट गिजरे या मधे व नारायेणभट बिन वीरेश्वरभट गिजरे या मधे पाचा गावीच्या जोसीपणाच्या वतनाचा कजिया लागून स्थलास आले त्यास तकरीरा लेहून मागितल्या उभयेतानी तकरीरा लेहून दिल्हीया त्यात त्यानी लेहून दिल्हे की आपला तिघा भावाचा विस्तार येक आपण येक वाईकर येक दुसेरेकर ऐसे तिघे भाऊ ऐसे उभयेतानी हि लेहून दिल्हे तरी तुह्मी त्या तिघा भावातील आहा तुमचा भाऊ कोण आहे त्याचा तपसील लाऊन देणे ह्मणऊन आज्ञा केली ऐसीयासि आपला मूलपुरुष रामेश्वरभट त्यास पुत्र तिघे बितपसील
वडील नरहरी भट दुसरा रगभट तिसरा गोविदभट
१ १ १
हाली त्याचा वश हाली त्याचा वश हाली त्याचा वश
१ नारायेणभट्ट विश्वनाथभट आपण
१ गोपालभट वाईकर १
----
२
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
पैकी आहेत दोघे नारायेणभट आफले जानभटी येक, व नारायेणभट अध्यापक येक १ येकून दोघे बाकी दोघे त्याचे हातीचे दस्तूर बहिरभट आफले याच्या अक्षरे दोघाची साक्ष आहे त्याचा पुत्र आहे तो रुजू करून देईल सदरहू साक्षी यानी आपले बेतालीस स्मरोन श्रीकृष्णा स्मरोन पचाइत भले सिष्ट याच्या विद्यमाने साक्षी देतील ते खरी तेणेप्रमाणे वर्तो यासि दिकत करू तरी गोताचे आन्याई येणेप्रमाणे साक्षी याची नावनिसी लेहून दिल्ही त्याउपरी तुह्मा उभयेता वादी यासि पचाइतानी विचारिले की तुह्मी वाईंकर व दुसेरेकर भाऊ ह्मणऊन लेहून दिल्हे तरी उभयेता मुखे भाऊपणा पुरऊन देणे भाऊपणा पुरऊन देईल तो पचाइतमुखे खरा होईल ऐसे बोलोन वाईंकर व दुसेरेकर तुह्मी उभयेता वादे जाऊन त्यास घेऊन येऊन भाऊपणा त्रिवर्गांचा येक करून देणे ज्याचा भाऊपणा न लागे तो अनायासे च उडाला ऐसे सागितलियाउपरी दुसेरेकर भाऊ समीप सीधच होते वाईकरास घेऊन येणे ह्मणऊन तुह्मा उभयेतास सागितले व सदासिवभट बिन भानभट यासि सागितले की तुह्मी साक्षी लेहून दिल्हे त्याप्रमाणे घेऊन येणे व तुह्मास सागितले जे तुह्मी तकरीर केली की क-हाडी सदासिवभट व बाबदेवभट यासि बोली जाहली तेसमई त्यानी कागदाच्या तालिका व मोरेश्वर भटाचे हातिचा कागद व साक्षी ऐसे नाही ह्मटिले ते वेलेचे साक्षी सदरहू लेहून दिल्हे याप्रमाणे घेऊन तुह्मी येणेप्रमाणें तुह्मा उभयेता वादी यास आपले निसबतवार साक्षी व वाईकर भाऊ घेऊन येणे ह्मणऊन आज्ञा करून वाईकर भाऊ यासि स्थलीहून पत्र लेहून तुह्मापासी दिल्हे त्याप्रमाणे तुह्मी जाऊन निसबतवार साक्षी घेऊन आला क-हाडचे तुमचे चौघा साक्षीपैकी दोघे साक्षी बितपसील
पुरुषोत्तमभट आफले १ धोडभट वालिबे १
येकून दोघे या उभयेतानी साक्षीच्या तकरीरा लेहून दित्हीया बितपसील दा। बो। पुरुषोत्तमभट बिन बापूभट आफले माहुलीकर सु।। सलास अशरीन मया अलफ कारणे लेहून दिल्ही तकरीर ऐसी जे सदासिवभट गिजरे व बाबदेवभट गिजरे या मधे व गोपालभट गिजरे या मधे पाचा गावीचे जोतिषपणाचा कथला लागोन स्थल मजकुरास आले त्यास गोपालभट गिजरे यानी लेहून दिल्हे की आमचे गुजारतीने सदासिवभट व बाबदेवभट यासि क-हाडी बोली जाहली ते समई सदासिवभट बाबदेवभट बोलिले की आपणापासी कागदाच्या तालिका अगर मोरेश्वरभटाचे हातिचा कागद आपणापासी नाहीत भानभटापासी दोनी कागद होते ते मोरेश्वरभटापासी दिल्हे ऐसे बोलिले हे सही तेरीख १८ माहे साबान
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
दा। बो। रामभट बिन चद्रभट ढवलीकर सु।। सलास अशरीन मया अलफ कारणे लेहून दिल्हा. कतबा ऐसा जे गोपालभट गिजरे जोतिषी या मधे व सदासिवभट गिजरे क-हाडकर या मधे. पाचागावीचा जोसीपणाचा वेव्हार लागून मुंनसफी, बद्दल आले त्यास पचाइतमुखे निवाडा होईल तेणे प्रमाणे साधिल्याआर्थी वर्तवावे तुटल्याआर्थी निवारण करावे येखादेचे जमान देणे ह्मणऊन आज्ञा केली त्यास आपण सदसिवभट यास जमान असो साधिल्याआर्थी वर्तऊ तुटल्याआर्थी निवारण करून हा लेहून दिल्हा जमान कतबा सही तेरीख १७ माहे शाबान
पश्चमवादी गोपालभट बिन
रुद्रभट गिजरे ,यानी जमान दिल्हा
दा। बो। चितामणीभट बिन नारायेणभट वलवडे क-हाडकर सु।। सलास अशरीन मया अलफ कारणे लेहून दिल्हा कतबा ऐसा जे गोपालभट गिजरे जोतिषी या मधे ब सदासिवभट गिजरे क-हाडकर यामधे पाचा गावीचा जोसीपणाचा वेव्हार लागून निवाड्याकरिता आले त्यास पचाइतमुखे निवाडा होईल तेणेप्रमाणे साधिल्या आर्थी वर्तवावे तुटल्या आर्थी निवारण करावे एखादेचे जमान मागितले त्यास आपण गोपालभट बिन रुद्रभट यासि जमान असो साधिल्या आर्थी वर्तऊ तुटल्या आर्थी निवारण करून हा लेहून दिल्हा जमान
कतबा सही तेरीख १७ माहे साबान
सदरहू तुह्मा उभयेतापासून वर्तावयाचे जमात घेऊन सदासिवभट यासि पृछा केली की तुह्मी कागद दोन्ही दिल्हे ते साक्षीमुले खरे करून देऊ ह्मणऊन तकरीर केली तरी साक्षीयाची नावे सागून साक्षीमुले खरे करून देणे ह्मणऊन पचाइतानी आज्ञा केली त्यावरून सदासिवभट बिन भानभट यानी साक्षी लेहून दिल्हे बिता ।
१ नारायेणभट आफले जानभटी १ बहिरभट आफले
१ नारायेणभट आध्यापक १ हरिभट गिजरे
----- -------
२ २
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २५६ १५५२ भाद्रपद वद्य २
१ अज दीवाण रख्तखाने खास बजानिबु कारकुनानि पा। संगमनेर वावी व मुकासाइया-
२ नी व हुदेदारानी हाल व इस्तकबाल व मोकदमानी व महाजनानी कसबे पुनतां-
३ बे पा। मजकूर बीदानंद हर्ची जमीने चावर व नकद व तेल व निमके दर सवा-
४ द कसबे मजकूर दो। नख्तयाती ता। देहाय ता। ठाणे व पायेपोसी कुलबाब कुलका-
५ नू व फर्मासी चावर गज सरायेनी मौजा पैकी बदल इनाम रामभट बीन नर-
६ सिंहभट धर्माधिकरणी सा। कसबे मजकूर यास इनाम बा। लाजती हजर-
७ ती चांदबीबी साहेब दीधले आहे तेणे प्रमाणे हाली हुजती बसिका खास
८ करुनु देवविली आहे दर बाब आं की जमीन चावर व नख्त व तेल व मीठ दर स-
९ वाद कसबे मजकूर सुदीम सदरहू बाबा सु॥ सबा तिसैन व तिस्सा मया दरवज ई-
१० नाम दिला रामभट बीन नरसींहभट धर्माधिकरणी कसबे मजकूर यास इना-
११ म बा। लाजती हजरती चांदबीबी साहेब दिधले आहे तेणेप्रमाणे दीधले
१२ आहे बमहसुलेसी दुमाला कीजे औलाद व अफलाद चालविजे दर हरसाल
१३ खुर्द खताचा उजून न कीजे तालीक घेउनु असली फिराउनु दीजे
१४ बा। पा। वर्क बसिका खास एकंदर बा। सवाद दफता खास मोर्तब सुद
१५ जमीन चावर मजरे एकरूपे कसबे बा। हासील पैकी नकद व ऐन जि-
१६ मजकूर चावर एक प्रज नस
दरोन नकद रुके तेल दरोन
सोला ॥- १
मीठ
१।
१७ इसन्ने छ १५ सफर
१८ तेरीख १५ माहे
१९ पा। हुजूर रुजू हुजूर
रुजू मुश्रीफ
२० सप्रसूद सप्रसूद सप्रसूद सप्रसूद सप्रसूद
मुश्रीफ दफ्तरखास मजमू मोर्तब सुरनवीस
२१ बार सूद बार सूद बार सूद बार सूद बार सूद
२२ तालीक सूद मोर्तब सूद