लेखाक ९३
१६२८ अधिकज्येष्ठ वद्य ११
कौलनामा अज् दिवाण ठाणे पा। मसूर ता। समस्त ब्राह्मण ईनामदार मौजे सैदापूर ऊर्फ सिवापूर कर्याती हवेली पा। क-हाड सु॥ ११०७ दादे कौलनामा ऐसा जे तुह्मी समस्त ब्राह्मण हुजूर येऊन अर्ज केला की आपणास महतकदम मौजे मजकूर ईनाम चालत आले आहे यास साहेबी आपले तर्फेने कौलम-हामत केलिया आपण गाव आबादान करून उत्पन्न होईल ते भक्षून स्नानसध्या अनुष्ठान करून आसीर्वाद देऊन कृष्णातीरी सुखे असो स्वामीस आसीर्वाद देऊ ह्मणोन अर्ज केला बराय अर्ज खातिरेस आणून कदीम सनद पाहून कौल म-हामत केला असे कोणे बाबे शक न धरणे गावी जे उत्पन्न होईल ते भक्षून सुखे असणे कोणे बाबे शक न धरणे आपले तरफेने काही आजार लागणार नाही दरी बाब कौल असे मोर्तब
तेरीख २४ माहे सफर