Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १७८
श्री
प्रति श्रीपादस्वामि
श्रीमद्रमारमणचरणभजनपरायणात करणत्वाद्यनेकगुणग
णसपन्न राजमानविराजितेषु करहाटकपुरस्थिताशेषविद्व
द्वैदिकदेशाधिकारि रुद्राजीपडितप्रमुखेषु
खट्वागनगराधिप राजाधिराज कृष्णराजप्रभुवर्यसभालकार विद्वद्वदविहिता
नेकनत्याशीर्वचनानि विलसतु॥ लेख्यविशेषस्तु युष्मन्नगराधिवासि रामाचार्यानदाचार्ययो कृष्णातीरपुराणकथनविषये विवादे प्रसक्ते श्रीमत् रायसपत्रानुसारेण निर्णय कृत तत्रानदाचार्याणा पुराणकथनार्थ स्वामिना नूतनमाज्ञापत्र दृष्ट्वा तैरेवकथनीय रामाचार्ये कलहो न कर्तव्य इति रामाचार्यैरपि विद्वत्समाजेगीकृतमिति तत्रभवद्भिर्युष्माभि श्रीनिवासपडिताना आनदाचार्यपुराणश्रवणार्थ रामाचार्यस्थापित शपथादिमोचनेन पुराणश्रवणोन्मुखता सपादनीयेति विज्ञप्ति ।। पत्रार्थे स्वहस्ताक्षर करजगी त्र्यबकशर्मण ॥
साक्षिण गुरुनायककृष्ण
कुभारी विठ्ठल कल्लथे नरसिह
व्यासभट्ट मुजे कूर्मकृष्ण
व्यकटेश विश्वामित्री मगलूरकर कृष्णभट्ट
कोमटी नरसिह तोतरे बालभट्ट
अनत कत्शलकर अध्यापक गोविंद
बालकृष्ण मजर्थ मल्लारिभट्ट लोणीकर
व्यकटेश माडोगणे वासुदेव पुण्यस्तब
राम शर्मापि कोमटी भीमभट्ट
हरिभट्ट लाडगे रामभट्ट मगलवेढकर
नारायणभट्ट याद्वाचार्ये गंगाधर जेजूरीकर
तिमणाचार्ये पढरपूर आपडी रघूदेव
कदर्प व्यकटेश घोघरे नरहरीभट्ट
शेषभट्ट टोणपे श्रीनिवास ढोकीकर
रामभट्ट वक्रतुड पछाडे नरहरि
नरहरिभट्ट कोमटी नरहरि सोवले
कृष्णभट नामले कृष्णभट्ट देवळे
पाडुरग पढरपूर वेदव्यास जुगुल
गोपाल रणसिग शेषभट्ट अष्टपुत्री
नारायणभट्ट वैद्य शिरोले त्रिबक
बालभट्ट मगलवेढस्थ
सुभान्वब्दे ऊर्ज बहुलैकादश्यामनेकब्राह्मणसन्निधा वय लेखक सपन्न इ १ ति।।
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १७७
श्रीवेकटेशो जयति
।। सत्याभिनवतीर्थश्रीपादस्वामी ।।
॥ श्रीमद्धरिगुरुभक्तिपरायण-॥
॥ त्वाद्यनेकगुणसपन्न वेदशास्त्र- ॥
॥अग्निहोत्रादिषट्कर्मनिरत विद्व-॥
॥द्वर्येषु श्रीमत्खट्वागपुरस्था-॥
॥शेषब्राह्मणचरणारविंदेषु म-॥
॥गळवेढस्थ कृष्ण कृतानेकसाष्टा- ॥
॥गनमस्कारा लेख्यविशेषस्तु॥
॥उपरि स्वामि यानी दया करून पत्र लिहून पाठविले ते पत्र वेदमूर्ति नारायणभट्ट घेऊन आले लिहिला अभिप्राव कळला वे- + मूर्ति भीमाचार्ये करहाटककर त्याचे भाउ विठलभट्ट त्या वरि दुरग्रामण्य उठविले आहे व्यासभट्ट मठकरी नरशिभट्ट रड्डि या दोघानी यथे प्रकट केले त्या नतर समस्त ब्राह्मणानी अन्नोदकसबध वर्जिला मग विठ्ठलभट्ट बोलला की अपणास चदी मध्ये यानी दीना वरि दया करून उक्त प्रायश्चित देउन केले हे वर्तमान समस्त ब्राह्मणास ठाउके आहे मगळवेढेकर कृष्णाचार्ये तेथे होते त्यास ठाउके आहे मणून बोलला या करिता तुह्मी पत्रा मध्ये लिहिले तुह्मी चदी मध्ये असता हे वर्तमान कैसे जाहले ते यथास्थित सत्यपूर्वक स्वहस्ताक्षरे स्पष्ट लिहून पाठवणे ब्राह्मण मणून भीड कराल तरि पुढे जड जाईल तरि अह्मास अन्यथा बोलाव्यास काय अगत्य आहे अह्मी चदी मध्ये असता तेथे आले होते तेथे च च्यातुर्मास्य बैसले होते
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २६५ श्री १६४० श्रावण शुध्द ५
स्वस्ति श्री राज्याभिषेक शके ४५ विलबीनाम संवछरे श्रावण शुध पंचमी इंदुवासर क्षत्रियकुलावतंस श्री राजा शाहू छत्रपति स्वामी याणी नरहर गोसावी वस्ति किले विचित्रगड यांसि दिल्हे इनामपत्र ऐसे जे तुह्मी स्वामी सन्निध किले साताराचे मुकामी मुकामी विनंती केली जे आपणास राजश्री पंतसचिव येही गावगना जमीन इनाम करून दिली आहे त्याचे इनामपत्रक करून देऊन वंशपरंपरेने इनाम चालवीले पाहिजे ह्मणून त्यावरून मनास आणून स्वामी तुह्मावरी कृपाळू होऊन राजश्री पंतसचिव येही इनाम करून दिल्हे आहे तेणे प्रमाणे हे इनामपत्र करून दिल्हे असे बि॥
मौजे कानवडी ता। रोहिडखोरे मौजे पलसोसी ता। रोहिडखोरे
१०
१०
एकूण जमीन बिघे वीस कुलकबाब कुलकानु खेरीज हकदार तुह्मास व तुमचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेने इनाम दिल्हा असे राजश्री पंतसचिव येही दुमाला करून दिल्हा आहे तेणे प्रमाणे वंशपरंपरेने इनाम अनभऊन सुखरूप राहाणे लेखनालंकार
रुजू सुरुनिवीस सा। मंत्री
तेरीख ३
रमजानु सु॥ तिसा
बार सुद सुरु सुद बार बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १७६
श्रीशंकर
श्रीमत्छकराचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्यानरसिहभारती
स्वामिकृतनारायणस्मरणानि
सकलगुणालकरण हरिगुरुभक्तिपरायण राजमान्य राजश्री नारायणभट गिजरे यासी विशेषस्तु तुमचे कल्याण इछित करवीरक्षेत्री छ्यात्रसभासमवेत श्रीनिकट राहिलो असो तदनतर येथील कुशल जाणोन आपले कल्याण लिहून आशिर्वाद सपादित जाणे या नतर यदा आपले क्षेत्री दोनी मास चातुर्मास क्रमोन पुढे सचारास जावे हा हेतु चित्तात आणोन समस्तास व आपणास आशिर्वादपत्र पाठविले आहे स्थल राहाया पाहिजे या करिता स्थलाची अनकूलता करून ठेविले पाहिजे वरकड साहित्य तुमचे विचारे होणे ते होईल परतु आपणास पुर्वसूचने स्तव लिहिले असे दोनी मास कृष्णास्नान चातुर्मास अनुष्ठान क्षेत्री जाहलिया श्रेयस्कर असे हे गोष्टीचे अगत्य आपणास आहे च बहुत काय लिहिणे वरकड अर्थ रा। भगवंत सिवदेव मुग्तां सागता कळेल बहुत काय लिहिणे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १७५
श्रीविद्याशकर
आर्यस्वामी
श्रीमत्परमहसादियथोक्तबिरुदाकितश्रृगेरीसिव्हासनाधीश्वर
श्रीमत्छकराचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्यानरसिहभारती
स्वामिकृतनारायणस्मरणानि -
श्रीमत्छकलगुणालंकरण हरिगुरुभक्तिपरायण राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृद व समस्त गृहस्त वास्तव्य क्षेत्रक-हाटक भक्तोत्तम या प्रति विशेषस्तु तुमचे कल्याण इच्छीत करवीरक्षेत्री श्रीनिकट असो तदनतर साप्रत पुष्यशुध नवमीस श्रीची पुण्यतिथी ब्राह्मणसतर्पण उत्सव आहे या करिता लिहिले असे तरी आपण सहसमुदाय येऊन मोहत्छव साग केला पाहिजे अनमान न करणे बहुत काय लिहिणे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १७४
श्रीविद्याशकर
आर्यस्वामी
श्रीमत्परमहसादियथोक्तबिरुदाकितश्रृगेरीसिव्हासनाधी
श्वरश्रीमत्त्छकराचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्यानरसिहभार
तीस्वामिकृतनारायणस्मरणानि
स्वस्ति श्रीमच्छकलगुणालकरण हरिगुरुभक्तिपरायण राजमान्य राजश्री कृष्णाजी विठ्ठल सुभेदार व समस्त ग्रहस्त व देशपाडे या प्रति विशेषस्तु तुमचे कल्याण इच्छित करवीरक्षेत्री छ्यात्रसभासमवेत श्रीनिकट राहिलो असो तदनतर अत्रत्य कुशल जाणोन स्वकीय सुखानुभव लेखनद्वारा चित्त प्रमोदवीत असिले पाहिजे या नतर साप्रत पुष्यशुध नवमीस श्रीची पुण्यतिथी ब्राह्मणसतर्पण उच्छव आहे या करिता आसीर्वादपत्र प्रेसिले असे तरी आपण सहसमुदाय येऊन मोहत्छव साग सपादिला पाहिजे उत्छव आपला आहे येतदविषयी अनमान न करणे सुज्ञा प्रति बहुत काय लिहिणे -
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १७३
श्रीविद्याशकर
आर्यस्वामी
श्रीमत्छकराचार्यान्वयसजाताश्रीविद्याशकरभरती
स्वामिकृतनारायणस्मरणानि
सकलगुणालकरण हरिभक्तिपरायण राजमान्य राजश्री नारायणभट गिजरे वास्तव्य क्षेत्रक-हाटक भक्तोतम या प्रति विशेषस्तु तुमचे कल्याण इच्छित करवीरक्षेत्री छात्रसभासमवेत श्रीनिकट राहिलो असो तदनतर येथील कुशल जाणोन आपले कल्याण लिहून आसिर्वाद सपादीत असणे या नतर साप्रत पुष्यशुध नवमीस श्रीची पुण्यतिथी आहे या करिता लिहिले असे तरी आपण सहसमुदाय येऊन मोहत्छाव साग सपादिला पाहिजे बहुत लिहिणे नलगे राजश्री कृष्णाजीपताकडील वर्षासन गोदूमभिक्षा आली पाहिजे त्यास आपणास सागितले च आहे ऐसियासि त्याचा प्रसग करून प्राप्तावस करवणार सुज्ञ असा सर्वत्रास यात्रे करिता लिहिले आहे पत्रे प्रविष्ट करणार सुज्ञ असा
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १७२
श्रीशंकर
स्वामी
श्रीमत्परमहसादियथोक्तबिदारुकितश्रृगेरीसिव्हासनाधीश्वर
श्रीमत्छकराचार्यान्वयसजाताभिनयश्रीविद्यानरसिव्हभार
तीस्वामिकृतनारायणस्मरणानि
सकलगुणालकरण हरिगुरुभक्तिपरायण राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृद व समस्त अग्निहोत्री व समस्त राजकीय गृहस्त व समस्त ग्राह्मस्त गृहस्त वास्तव्यं क्षेत्रकरहाटक परमभक्तोत्तम या प्रति विशेषस्तु तुमचे कल्याण इछीत करवीरक्षेत्री छात्रसभासमवेत श्रीनिकट राहिलो असो तदनतर साप्रत पौष्यशुद्ध नवमीस श्रीची पुण्यतिथी ब्राह्मणसतर्पण उच्छव आहे सांग होणे लागतो या करिता आसिर्वाद पत्र लिहिले असे तरी तुह्मी समस्त विद्वज्जन सहसमुदाये येऊन मोहछाहा साग सपादिला पाहिजे एतद् विषई अनमान न करणे बहुत काय लिहिणे
महिकावती (माहीम)ची बखर
माहाल, मुहिम, जमी, जमा, सरसुभेदार, सरसबनीस, सरचिटणीस, हवालदार, मुजुमदार, लस्कर, खजिना, सरजमातदार, ताबा, मुलुख, फौज, काबिज, जाब, विलाथ, कागद, रहित (रयत), मुजा, इनाम, फरास, बखाल, मोफत, दुकान, मसाला, जखात, बंदिस्त, खत, तालुका, हवाला, वसूल, खलक, बंदरकी, सिकाबंद, खूम, खासा, कबिला, सरफौजदार, वरातदार, गुमस्ता, कबूल, तागाईंत, खोती, शहाबाज, खबर, नामुस, खुशाली, बकसीस, हल्ला, अफदागीर, बेइजती, निशाण, महालदार, परगणा, हिसाब, महजर (मझर), सही, खबर, सुलतान, दरकार, जरूर, अर्ज, पातशा, मशीद, फत्ते, हुजूर, मजलस, कजिया, हासिल, दस्त, हरामखोर, कुफराणदार, मातबर, पैका, दिवाण, हुकूम, साहेब, गैबत, दुवा, ज्वाब, माफिल, हुशार, खेरीज, खून, खुषू, मुस्तेद, गर्ज, जाहागीर, वतन, अजम, शेख, वतनदार, बाबत, रुजू , पैराब, मदत, तह, जमीदार, (ठिकाण) दार, इजारदार, माह्, हे १०३ फारसीआर्बी शब्द ह्या बखरीच्या ३२ व्या पृष्टा पासून ६२ व्या पृष्टा पर्यंतच्या ४० पृष्टांत आले आहेत, त्या ४० पृष्टांत सुमारें बारा हजार शब्द आहेत. बारा हजार शब्दांत १०३ फारसी ऊर्फ यावनी शब्द ह्या बखरींत ज्या अर्थी आले आहेत, त्या अर्थी शक १३७० त कोंकणांतील मराठी भाषेंत शेकडा पांच षष्ठांश शब्द फारसी येत म्हणजे सरासरीनें शेकडा एक शब्द उत्तर कोंकणांतील लेखी गद्य मराठी भाषेंत फारसी येई, असे म्हणावें लागतें. हे १०३ फारसी शब्द वगळले म्हणजे बाकी राहिलेले सर्व शब्द ह्या शक १३७० तील बखरींत अस्सल मराठी आहेत. सबंद बखरींतील ह्या अस्सल मराठी शब्दांतून जुन्या अपरिचित अश्या सर्व शब्दांची व प्रयोगांची याद अपरिचत अर्थां सह खालीं देतों.
(पुढील मजकुर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
वर दिलेले सर्व शब्द रूपांच्या व अर्थांच्या दृष्टीनें जुनाट आहेत, हें जुनें मराठी सारस्वत व वाङमय पढणा-यांच्या नित्यपरिचयाचें आहे. प्रत्यय व प्रयोग पहातां, करूं आदरिली, विचार मांडिला, मुहिम अनमानिली, इत्यादि प्रयोग किंचित् जुनाट भासतील. सुंतो पासून निघालेला अर्वाचीन मराठी सून किंवा हून प्रत्यय ह्या बखरींत होन व होवोन अश्या अपभ्रंशरूपानें ब-याच स्थलीं आलेला आढळतो. त्या वरून दिसतें कीं होवोन हा पंचमीचा प्रत्यय सुंतो पासून निघालेला आहे, डाक्टर भांडारकर आपल्या प्राकृत भाषे वरील व्याख्यानांत म्हणतात त्या प्रमाणें हो धातू पासून निघालेल्या होऊन ह्या ऊनप्रत्ययांत धातुसाधिता पासून निघालेला समजण्याची अपरिहार्य अवश्यकता किंचिन्मात्र हि नाहीं. पाशीं बद्दल पें, पासून बद्दल पैं, स, ला, तें बद्दल पें-पैं हे प्रत्यय ह्या बखरींत आढळतात. ते जुने समजण्या पेक्षां अर्वाचीन अपभ्रष्ट समजणें जास्त सशास्त्र. चतुर्थींच्या स बद्दल सि व तृतीयेच्या सह बद्दल सिं हे जुनाट प्रत्यय ह्या बखरींत ब-याच ठिकाणीं योजिलेले आढळतात. तर बद्दल त (पृष्ट ४९ खालून तिसरी ओळ) हें तोंडी भाषेंत सध्यां येणारें अव्यय ह्या बखरींत एकदा आलेलें आहे. कीं ह्या अर्थाचा जे हा जुना अव्ययशब्द सर्वांच्या परिचयाचा आहे. त्याचा उपयोग ह्या बखरींत क्वचित् झालेला आहे. त्याच्या ऐवजीं कीं ह्या अन्वयार्थी जर हा शब्द ह्या बखरींत सररहा योजिलेला आढळतो. यत् तर्हि ह्या संस्कृत अव्ययाचा कीं या अर्थाचा जर हा अव्ययशब्द कोंकणांतील मराठींत त्या कालीं योजीत असें दिसतें. निदान बखर लिहिणारा जो केशवाचार्य त्याच्या तोंडी हा शब्द फार होता, इतकें तरी म्हटल्या शिवाय गत्यन्तर नाहीं. हेत मीं (देवी) पुरवितों (पृष्ट ५३, ओळ ९) हा प्रयोग हेत मीं (देवी) पुरविते किंवा पुरवित्ये ह्या अर्थी योजिलेला आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १७१
श्रीशंकर
श्रीमत्परमहसादियथोक्तबिदारुकितश्रृगेरीसिव्हासनाधी
श्वरश्रीमत्छकराचार्यान्वयश्रीविद्याशकरभारतीस्वामिकरक
मलसज्याताभिनवश्रीविद्यानरसिव्हभारतीस्वामिकृतनारायपास्मरण
श्रीमत्छकलगुणालकरण हरिगुरुभक्तिपरायण राजमान्य राजेश्री समस्त ब्रह्मवृद व आच्यार्य व जोतिषी व उपाध्ये व धर्माधिकारी व राजमुद्राधारी व समस्त कारकून व देशमुख व देशपाडे व पाटिलकुलकर्णी व समस्त व्यवसाई गृहस्थ वास्तव्य क्षेत्रकराटक सत्सिष्यसिरोमणी या प्रति विशेषस्तु तुमचे कल्याण इच्छित करवीरक्षेत्री छात्रसभासमवेत श्रीनिकट राहिलो असो तदनतर येथील कुशल जाणोन आपले कल्याण लिहून आशिर्वाद सपादित असणे या नतर मागे आपणास आज्ञा केली होती की एक वेळा क्षेत्रमजकुरी च्यातुर्मास राहवे त्यास दोन वर्षे अवकाष घडून आला नाही प्रस्तुत टाकळी क्षेत्र मजकुरी दोनी मास चातुर्मा(स) राहून पुढे स्वस्थानास जावे हा हेतू चित्तात आणून तुह्यास पुर्वसुचना कळावी ह्या करिता लिहिले असे तरी तुह्मी सर्वानी मिळोन राहवयास स्थलाची अनुकूलता करून ठेवणे वरकड साहित्य तो करोल च परतु अगोदर स्थल योजून नीट करून ठेवणे ह्मणजे दोनी मास कृष्णातीरी वास करू च्यातुर्मास अनुष्ठान सपादू तेणे करता तुह्मास श्रेयस्कर आहे वरकड अर्थ राजेश्री भगवत सिवदेव मु।। सागतील त्या वरून कळेल बहुत काय लिहिणे