लेखाक १७२
श्रीशंकर
स्वामी
श्रीमत्परमहसादियथोक्तबिदारुकितश्रृगेरीसिव्हासनाधीश्वर
श्रीमत्छकराचार्यान्वयसजाताभिनयश्रीविद्यानरसिव्हभार
तीस्वामिकृतनारायणस्मरणानि
सकलगुणालकरण हरिगुरुभक्तिपरायण राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृद व समस्त अग्निहोत्री व समस्त राजकीय गृहस्त व समस्त ग्राह्मस्त गृहस्त वास्तव्यं क्षेत्रकरहाटक परमभक्तोत्तम या प्रति विशेषस्तु तुमचे कल्याण इछीत करवीरक्षेत्री छात्रसभासमवेत श्रीनिकट राहिलो असो तदनतर साप्रत पौष्यशुद्ध नवमीस श्रीची पुण्यतिथी ब्राह्मणसतर्पण उच्छव आहे सांग होणे लागतो या करिता आसिर्वाद पत्र लिहिले असे तरी तुह्मी समस्त विद्वज्जन सहसमुदाये येऊन मोहछाहा साग सपादिला पाहिजे एतद् विषई अनमान न करणे बहुत काय लिहिणे
