Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

 .स्थलसंबंधक माहिती ही ह्या बखरींत अशी च पूर्णपणें विश्वसनीय आहे. घणदिवी पासून चेऊल पर्यंतच्या समुद्रकिना-याच्या लगतच्या गांवांचा जो निर्देश बखरींत केलेला आहे तो नकाशा वरून पडताळून पहातां त्यांत विसंगतता बिलकुल नाहीं. प्रस्तुत बखरींत वर्णिलेल्या हालचालींचा प्रांत पश्चिमसमुद्रकिना-या पासून पूर्वे कडे सुमारे पंधरा वीस मैल रुंदीच्या आंत बाहेरचा आहे. कांहीं प्रांतांचीं व गांवांचीं नांवें महाराष्ट्र व गुजराथ ह्या बाहेरच्या देशांतील असून, कांहीं गांवांचीं नांवें उत्तर हिंदुस्थानांतील आहेत. तपशीलवार खुलाशा करितां गावांचीं, प्रांतांचीं, नद्यांचीं व किल्ल्यांचीं जीं नांवें बखरींच्या गद्य भागांत आलेलीं आहेत त्यांची याद अकारविल्ह्यानें खाली देतों-- (खालील मजकुर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

ह्या तीन शें शहाण्णव नांवां पैकीं नक्षत्रचिन्हांकित नांवें उत्तरकोंकणा बाहेरील गांवांचीं व देशांचीं आहेत. बाकीं राहिलेलीं ३३६ नांवें उत्तरकोंकणांतल्या महिकावतीच्या राज्यांतील गांवें, नद्या, तळीं, तीर्थे व डोंगर यांचीं आहेत.

१०. काल व स्थल हीं जीं ऐतिहासिक प्रसंगांच्या घटनेंतील दोन अंगे त्यांच्या विश्वसनीयत्वा संबंधानें विचक्षणा झाल्या वर, प्रसंगघटनेचें जें तिसरें अंग व्यक्ति तत्संबंधी प्राह्याग्राह्यतेच्या विचाराचा प्रांत लागतो. बखरीच्या गद्यभागांत (१) बिंबराजांची व नागरशाची हकीकत, (२) यादवांची हकीकत, (३) नायत्या राजांची हकीकत, (४) अमदाबादेच्या मुसुलमान पातशाहांची हकीकत, (५) पोर्तुगीजांची हकीकत, (६) रामनगरचा त्रोटक उल्लेख, (७) पट्ट्याचा त्रोटक उल्लेख, (८) देसाई, चौधरी, पाटील वगैरे अधिका-यांच्या मानापमानांची हकीकत, (९) पाठारे ऊर्फ पातेणे प्रभूंची हकीकत, व (१०) मनोर व मालाड ह्या महालांच्या उत्पन्नाची वगत, अश्या एकंदर दहा हकीकती दिल्या आहेत. त्यांत जीं व्यक्तिनामें आलीं आहेत, तीं सर्व उत्तरकोंकणांत शक १०६० पासून शक १४२२ पर्यंत वावरणा-या व्यक्तींचीं आहेत, त्यांत कल्पित कादंबरीवजा भाकडकथेंतील नांवा प्रमाणें काल्पनिक नांवें बिलकुल नाहींत. कथाभागाच्या ओघांत हीं नांवें जेथे जशीं यावीं तशीं च आलेलीं आहेत. त्या वरून खात्री होते कीं त्या त्या व्यक्ति त्या त्या कालीं व त्या त्या स्थलीं खरोखर च वावरत होत्या. निरनिराळ्या प्रसंगांच्या अनुरोधानें निरनिराळ्या काळीं निरनिराळीं चार प्रकरणें भिन्न भिन्न लेखकांनीं मूळांत लिहिलीं होतीं. तीं एकत्र करून व त्यांना दोन पद्य उपोद्घात जोडून, भगवान् दत्त नामें करून कोण्या इसमानें ही सबंद बखर निर्माण केली. प्रस्तावनांत भगवान् दत्त याणें मूळच्या चार गद्य प्रकरणांना पौराणिक राजावलींच्या ज्या दोन पद्य प्रभावळी बसविल्या, त्यांतील पौराणिक कथाभागाशी सध्यां आपणास कांहीं एक कर्तव्य नाहीं. त्यांतील प्राह्याग्राह्यतेची चिकित्सा अवकाश सांपडल्यास पुढें करतां येईल. सध्यां एवढें च सांगावयाचें आहे कीं मूळच्या चार गद्य प्रकरणांत भगवान् दत्त याणें कोणत्या हि प्रकारची ढवळाढवळ केलेली नाहीं. जशीं प्रकरणें हातीं आलीं तशीं चीं तशीं तीं भगवान् दत्तानें संकलित गद्यपद्य बखरींत गोंवून दिलीं. काल, स्थल, व्यक्ति, व तपशिल ह्यांत फिरवाफिरव काडीची हि केली नाहीं. बिंब राजांची किंवा यादवांची किंवा देसायांची किंवा पाठा-यांची तरफदारी करण्याचा अभिलाष भगवान् दत्त याला कोणता व असलेला दृष्टीस पडत नाहीं. उत्तरकोकणांत सवितावंशीय, सोमवंशीय व शेषवंशीय कुळांची पूर्वपीठिका काय होती, ती जाणण्याचा धार्मिक व सामाजिक हव्यास भगवान् दत्त याला होता असें दिसतें. राजांचीं भांडणें व राज्यांच्या उलथापालथी सर्वत्र कश्या होतात व उत्तरकोकणांत कश्या झाल्या, ह्या राजकीय बाबी कडे भगवान् दत्ताचें तितकें लक्ष्य नव्हतें. उत्तर कोकणांतील जातीजातींत वरिष्ट कोण, कनिष्ट कोण, ही सामाजिक व धार्मिक बाब जाणण्याच्या इच्छेनें दत्तानें हा संकलनाचा उद्योग केला आहे. भगवान् दत्तानें आपल्या पद्य प्रस्तावनेला वंशविवंचनकथा असें अन्वर्थक अभिधान दिलेलें पाहिलें, म्हणजे प्रकरणांचें संकलन करण्यांत त्याचा मूळ, मुख्य व एक च एक हेतू कोणता होता तें स्पष्टपणें नि:संदिग्ध होतें. भगवान् दत्ताचा हेतू हा असा धार्मिक व सामाजिक असल्या मुळें, मूळच्या चार प्रकरणांतील काल, स्थल व राजकीय व्यक्ति ह्यांच्या मध्यें घोटाळा उडवून देण्याच्या मोहास भगवान् दत्त बळी पडला नाहीं. भगवान् दत्ता प्रमाणें च केशवाचार्याचा हि हेतू धार्मिक व सामाजिक होता, राजकीय नव्हता. म्लेच्छार्णव होऊन, ज्ञात, धर्म व आचार बुडून गेला, सबब नायकोरावाच्या साहाय्यानें केशवाचार्यानें उत्तरकोंकणांतील म्हणजे महिकावती प्रांतांतील अठरा खूम जातीस ज्ञात, धर्म व आचार यांचें निरूपण केलें.

लेखाक २०८
७८९ ज्येष्ठवा॥ १३

श्रीशंकर
।। श्री।।


श्रीमच्छकराचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्याशकरभारती-
स्वामिकरकजोद्भवश्रीविद्यानरसिहभारतीस्वामिकृत नारायण-
स्मरणानि

वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री नरिसहादि।। ग्रामोपाध्ये वा। क्षेत्रकरहाटक परमसिष्योत्तम यासि विशेषस्तु तुमचे कल्याण इच्छित श्रीनिकट असो अत्रत्य कुशेल जाणोन स्वकीये लेखनी मानस सतोषवीत आसिले पाहिजे तदनतर श्रीगुरुविद्याशकरभारतीस्वामी याची अलीकडे फार च बिघडून अशक्तता जाहल्या मुळे श्री याणी जेष्ट वा। ११ भृगुवारी प्रात काली तास दिवसाचे सुमारे आह्मास सस्थानच्या साप्रदाया प्रमाणे विधियुक्त सन्यासआश्रम देऊन उपदेश करून सिष्य केले आणि सस्थानचा दरोबस्त अधिकार आह्मास देऊन जेष्ट वा। ११ रोजी सायेकालचे णवतासी श्रीगुरुविद्याशकरभारतीस्वामी हे समाधिस्त जाहले तुह्मास कलावे विशेष लिहिणे ते काय शके १७८९ प्रभवनामसवत्सरे जेष्ट वा। १३ महानुशासन वरीवर्ति

लेखाक २०७
१७८१ आषाढवा। ७

श्रीशंकर
सिका नकल

श्रीमत्परमहसपरिव्राजकाचार्यवर्यश्रीमच्छकराच्यार्यान्वयस-
जाताभिनवश्रीविद्याशकरभारतीस्वामिकरकजोद्भवश्रीविद्या-

नरसिहभारतीस्वामिकृतनारायणस्मरणानि

वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृद व ज्योतिषी व राजकीय ग्रहस्त व देशमुख देशपाडे व पाटील कुलकर्णी वा। को। सिराल व को। माहलचे गावगन्ना परमशिष्योत्तम यासी विशेषस्तु शके १७८१ सिद्धार्थीनामसवत्सरे क्षेत्रकरहाटकस्थ समस्त ब्रह्मवृद यानी समक्ष मठसकेश्वर मुकामी विनति केली की तुमची वहिवाट पूर्वापार क्षेत्राकड असोन हाली दिकत करितात ह्मणोन त्याज वरून हे आज्ञापत्र सादर जाहले असे तरी तुह्मी पूर्वापार क्षेत्रा कडे ज्ञातीधर्मप्रकर्णी वागत आल्या अन्वये वागावे विशेष लिहिणे ते काय आषाढ वा। ७ निशान मोर्तब
असल बरहुकुम नकल                रामचद्र बापूजी कारकून नि।। श्री
                                              शेरा
अजमितीचे पत्रा बरोबर क्षेत्रकरहाटक येथील समस्त ब्रह्मवृदा कडे रवाना मिति आषाढ वा। ७ शके १७८१ सिद्धार्थीनामसवत्सरे
बार अक २४            गोविद हणमत कारभारी नि।। श्री
सन १२६९ फसली     सस्थान करवीइ

लेखाक २०६
१७७९ फाल्गुनशु॥ ६

श्रीशंकर
।। श्री।।

 

श्रीमच्छकराचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्याशकरभारती-
स्वामिकरकजोद्भवश्रीविद्यानरसिहभारतीस्वामिकृतनारायण-
स्मरणानि

राजश्री वहिवाटदार व पाटीलकुलकर्णी व पोलीसकामगार देहाय गावगनासि विशेषस्तु शक १७७९ पिंगलनाम सवत्सरे मठ सकेश्वरा हून वेदशास्त्रसपन्न राजश्री नरसिह दीक्षित ग्रामउपाध्ये कराडकर हे अपले घरी कराडास जात असून बराबर त्याचा चिरजीव एक १ व गडी असामी एक १ बीनहत्यारी व घोड एक १ एणे प्रमाणे आहे त्यास मार्गी जातानी कोणी हरकत करू नये हा दाखला अज पासून पधरा दिवस पर्यत चालेल तेरीख छ ४ माहे रजब फालगुण शु॥ ६ महानुशासन वरीवर्ति

लेखाक २०६
१७७९ फाल्गुनशु॥ ६

श्रीशंकर
।। श्री।।

 

श्रीमच्छकराचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्याशकरभारती-
स्वामिकरकजोद्भवश्रीविद्यानरसिहभारतीस्वामिकृतनारायण-
स्मरणानि

राजश्री वहिवाटदार व पाटीलकुलकर्णी व पोलीसकामगार देहाय गावगनासि विशेषस्तु शक १७७९ पिंगलनाम सवत्सरे मठ सकेश्वरा हून वेदशास्त्रसपन्न राजश्री नरसिह दीक्षित ग्रामउपाध्ये कराडकर हे अपले घरी कराडास जात असून बराबर त्याचा चिरजीव एक १ व गडी असामी एक १ बीनहत्यारी व घोड एक १ एणे प्रमाणे आहे त्यास मार्गी जातानी कोणी हरकत करू नये हा दाखला अज पासून पधरा दिवस पर्यत चालेल तेरीख छ ४ माहे रजब फालगुण शु॥ ६ महानुशासन वरीवर्ति

लेखाक २०५
१७७८ फाल्गुनवद्य ३

श्रीशंकर
सिक्का नक्कल

श्रीमच्छकराचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्याशकरभरती-
स्वामिकरकजोद्भवश्रीविद्यानरसिहभारतीस्वामिकृतनारायण स्मरणानि
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृद व जोतिषी व राजकीय ग्रहस्थ व देशमुख देशपाडे व पाटील कुलकर्णी राहणार कसबे उबरज परमसिष्योत्तम यासी विशेषस्तु शके १७७८ नलनामसवत्सरे सस्थानदेवतेच्या स्वारीचे सचारउद्देशे सातारप्रातीं आगमन जाहले समयी गावगन्नानि पाहता हिंदुलोकात ज्ञातिधर्मास विरुद्ध वहिवाट होत असलेचे दिसून आले सबब ये विसीचा विचार सस्थाना कडून जाहला पाहिजे या करिता सदरहूच्या बदोबस्तास सस्था कडील मठाधिकारीपणाचे कामावर वो। राजश्री नानी बिन कृष्ण दीक्षित व सिताराम दीक्षित बिन बाबा दीक्षित उबराणी राहणार पाल या उभयतास नेमून आज्ञापत्रे दिली आणि ज्ञातिधर्मात विरुद्ध वागतील त्याजविसीचे सस्थानी कळून आज्ञे प्रमाणे बदोबस्त ठेवीत जाणे असी आज्ञा जाहली त्याज प्रमाणे सदर उभयता उबराणी यानी तजवीज ठेविली असून श्रीक्षेत्रकरहाटकस्थ ब्रह्मवृद यानी मठाधिकारीपणाचे आज्ञापत्र घेतले त्याज बद्दल उबराणी उभयता याज बरोबर द्वेष करून निग्रहपत्र पालीकर ब्रह्मवृद यासी लिहिले त्याची नक्कल उभयता उबराणी यानी हजर केली ती अवलोकनात येऊन हे आज्ञापत्र तुह्मास सादर जाहले असे तरी सदर कराडकर यानी उभयता उबराणी यासी द्वेषबुद्धीने निग्रहपत्र लिहिले हे अयोग्य आहे मठाधिकारी वगैरे याची वहिवाट पाहून निग्रह ठेवणे अगर शुद्ध करणे हा अधिकार मठकरवीरसस्थानचा कराडकर यानी दरम्यान धादल करून पत्र लिहिले हे बरोबर नाही कराडकर हे परभारे धादल करितात ए विसीचा बदोबस्त सवस्थानातून होणे प्रकारे होईल तुह्मी सदर्हू उभयता मठाधिकारी उबराणी राहणार पाल याचे घरी व पक्तीस अन्नोदकवेव्हार पूर्ववत्प्रमाणे करीत जाणे आणि कराडकर याणी पत्रे लिहितील ती कोणी मानू नये ज्ञातिधर्माचे कामात हिकडून ह्मणजे मठकरवीरसस्थाना कडून आज्ञापत्रे एतील तदनुसार तजवीज ठेवितील सदर्हू उभयता उबराणियासी सस्थाना कडील मठाधिकारीपणाची आज्ञापत्रे दिल्ही आहेत त्याज प्रमाणे वहिवाट ठेवणे विशेष लिहिणे ते काय मि।। फाल्गुणवद्य ३ महानुशासन वरीवर्ति मोर्तब असे

७ च्या आकृतींतील गांठीचें टोंक मूळ जुनाट लेखांत लेखणीच्या फटका-यानें जर किंचित् ओळीच्या खालीं ओढलें गेलें, तर साताचा आंकडा पांचा सारखा दिसण्याचा संभव आहे. माघशुद्ध पंचमीस शनिवार आहे. शनिवाराला सौरीवासर असें हि दुसरें नांव असे. सौरीवासरे हें जुनाट नांव परिचयाचें नसल्या मुळें व सौरीवासरे ह्या शब्दांतील सौ व री हीं अक्षरें पुसट झाल्या मुळें, परिचयाचा सोमवासरे हा शब्द नकलकारानें लिहिला असण्याचा संभव आहे. म्हणजे ही नोंद ‘‘शक १०६० माघशुद्ध ५ सौरीवासरे '' अशी, किंवा " १०६० माघशुद्ध ७ सोमवासरे " अशी, अश्या दोन त-हां पैकीं कोणत्या तरी एका त-हेनें मूळांत लिहिली. असली पाहिजे. पैकीं अमुक च त-हा मूळ टिपणांत स्वीकारिली होती हें निश्चयानें सांगण्यास साधन अहे. माघशुद्ध षष्ठी किंवा चतुर्थी किंवा अष्टमी म्हणजे ४, ६ किंवा ८ हे आंकडे मूळांत नव्हते, एवढें निश्चयानें सांगतां येतें. कारण, मोहिमेस मुहर्ता वर निघाल्याचा खुलासा नोंदींत केला आहे. माघशुद्ध पंचमी म्हणजे सर्व प्रसिद्ध वसंतपंचमी आणि माघ शुद्ध सप्तमी म्हणजे तितकी च सर्वप्रसिद्ध रथसप्तमी, माघशुद्ध चतुर्थीस, षष्ठीस किंवा अष्टमीस असा कोणता हि सुमुहूर्त नसल्या मुळें, वसंतपंचमी व रथसप्तमी ह्या दोन तिथींचे ५ व ७ हे दोन आंकडे शिल्लक रहातात. तसें च शनिवारा पेक्षां सोमवार हा दिवस गमनास सरस धरिला तर ७ च्या आंकड्यास प्राधान्य द्यावें लागतें; आणि मूळ जुनाट लेखांत " माघ शुद्ध ७ सोमवासरे " अशी अक्षरें होतीं असा निश्चय करण्या कडे प्रवृत्ति होत्ये. तात्पर्य, ह्या हि नोंदींतील तीथ व वार विश्वासपात्र आहेत. येणें प्रमाणें बखरींतील वर्ष, महिना, पक्ष, तीथ व वार असा सर्व तपशील मुळचा बराबर आहे. नक्कलकारानें आंकड्यांच्या व अक्षरांच्या वाचण्याच्या चुक्या केलेल्या आहेत. परंतु त्या बखरींची परीक्षा करण्याची संवय झालेल्या कोणा हि अभ्यासकास सहजासहजीं शुद्ध करून घेतां येण्या सारख्या आहेत.

८. बखरकारानें, अथवा खरें म्हटलें म्हणजे, प्रकरणकारांनी शक ४३९ पासून शक १७४१ पर्यंतच्या ह्या सत्तावीस मित्त्या आणिल्या कोठून ? शक १७४१ हा नकलेचा आंकडा गाळला, तर बाकीच्या सव्वीस मित्त्या बखरकारांनी किंवा प्रकरणकारांनीं आणिल्या कोठून, हें पहाणें जरूर आहे. संवत् १५३५ व संवत् १५०५ हे आंकडे सहाव्या व दुस-या प्रकरणांच्या समाप्तीचे लेखकांनीं स्वतः दिलेले असल्या मुळें त्यांच्या उगमा संबंधाचा प्रश्न च रहात नाहीं. बाकीच्या तेवीस मित्त्या प्रकरणकारांनीं आपल्या जवळ असलेल्या जुन्या टिपणांतून घेतल्या असल्या पाहिजेत. म्हणजे केशवाचार्यादि लेखकां जवळ जुनीं टिपणें होतीं असें झालें. संवत् ५७४ ऊर्फ शक ४३९ शकांतील नोंदीचें टिपण जवळ असणें म्हणजे प्रकरणकारा जवळ त्याच्या पूर्वीच्या एक हजार वर्षांचे जुनें टिपण होतें, असें कबूल करणें भाग पडतें. प्रकरणकार नुसते वर्षांचे आंकडे च तेवढे देऊन गप्प बसत नाहीं, तर तीथ, वार व महिना हि देतो. त्या वरून म्हणावें लागतें कीं प्रकरणकारां जवळ काळाचा बारीक तपशील देणारीं राजकीय बाबीचीं टिपणें होतीं. बिंबानें वर्षे ९ मास १ व दिन १४ राज्य केलें आणि प्रतापशानें वर्षे २८ मास ३ राज्य केलें, ह्या अर्थाच्या दोन नोंदी वरून तर असें दिसतें कीं प्रकरणकारां जवळ तत्प्रांतस्थ राजांचीं व राजवटींचीं तपशीलवार टिपणें होतीं. अशी तपशीलवार टिपणें ठेवण्याचा प्रघात भारतवर्षांत फार पुरातन आहे. कित्येक पुराणांतून कित्येक राजांच्या राजवटींचीं वर्षे महिने व दिवस दिलेले सर्वांच्या ओळखीचे आहेत. कित्येक पुराणांतून अमूक राजानें एक हजार वर्षे, अमुक राजानें दोनशें वर्षे, अमुक राजानें पांच हजार वर्षे राज्य केलें, अशी टिपणें सांपडतात. तेथें वर्ष म्हणजे दिवस असा अर्थ घेणें सयुक्तिक दिसतें. हजार दिवस म्हणजे सुमारें आपलीं सध्यांचीं अडीच तीन वर्षे होतात व वीस हजार दिवस म्हणजे आपली सध्यांचीं पन्नास साठ वर्षे होतात. साठ साठ वर्षे म्हणजे वीस-पंचवीस हजार दिवस राज्य करणारे राजे वर्तमान काली हि होऊन गेलेले आहेत, तेव्हां वीस पंचवीस हजार दिवसांच्या ऊर्फ पौराणिक वर्षांच्या आंकड्यानें भांबावून जाण्याचें कारण नाहीं. एखादा राजा शंभर वर्षे जगल्यास व त्यानें गर्भस्थ असल्या पासून राज्य केलें असल्यास त्यानें छत्तीस हजार वर्षे राज्य केलें असें पुराणांनीं म्हटले असतां तें ही विश्वासार्ह होईल. परंतु, पुराणें जेव्हां अमुक राजाने शत कोटी वर्षे ऊर्फ दिवस राज्य केलें, अश्या सारखीं विधानें करतात, तेव्हां त्यांच्या वरील विश्वास सहज व डळमळतो. असलीं विश्वासानर्ह विधानें प्रस्तुत बखरींत नाहींत. कालसंबंधक सर्व विधानें ह्या बखरीच्या गद्य भागांत मानवी आटोंक्यांतली असून, त्यांत अतिशयोक्तीची किंवा अद्भुताचा लवलेश हि नाहीं. कालाच्या तपशिला संबंधानें प्रस्तुत बखर बहुतेक पूर्णपणें विश्वसनीय समजावी.

लेखाक २०४
१७७८ आषाढवद्य ९

श्री

यादी श्रीजगद्गुरुस्वामि कराडी आले त्या पूजे करिता सु।। सबा खमसैन मया तैन व अलफ शके १७७८ नलनामसवत्सरे आषाढवा। ९
इनामदार
रघुनाथदीक्षित गिजरे श्रावणशु॥ १
रामदेव
वारुजीकर श्रावणमास एक दिस पात्र २०० शु॥ २
गोवारकर भिक्षा घरी करायाची
रामपाठक
दादा गिजरे पाचुबरीकर
१ भाऊचार्य टोणपे
१ बाबूदी॥ वळवडे भिक्षा
१ सखारामदी॥ ढवळीकर भिक्षा
१ कृष्णदी॥ उबराणी
१ भाऊ पटवर्धन
१ मोरबापू आयाचित सापकर पात्र
----
५०

१ कृष्णभट आणा विदार भोजनास
१ दादा मोकासी वारुजकर
२ गोविंदभट गुलपी
१ बाळकोबा वळवडे
२ जयरामभट गोवारकर
१ नरसूआणा ग्रामोपाध्ये भिक्षा
१ रघुनाथदी।। गिजरे
१ रामकृष्णदी।। गिजरे
१ बाळदी।। आरणके
१ सिवाजी जोसी
१ भाऊदी।। गिजरे
१ नारायणदी।। उबराणी
१ रवळपाठक गोवारकर
१ चितामणभट बेलवडेकर वसूल
२ विठ्ठलभट आरलेकर
१ आतूच्यार्य टोणपे वसूल
२ बाबूराव लाटकर
१ नानाच्यार्य टोणपे
१ नारायणभट निगुडकर
१ मोरोपत दडवते
१ सखारामजोसी
१ मार्तडजोसी २ जयराम भाकरे
१ हरभट डोईफोडे
१ सदाशीवभट गर्दे
३ सखारामदी।। नवाथे
२ दादादी।। गिजरे
१ बाबाजी विठल गिजरे
२ भाऊ भिमाजी गिजरे
२ काशिनाथ जोसी
१ बाबाभट खामकर
१ रावजी खटावकर
१ सखारामभट वळवडे
१ नारायणभट वळवडे
१ रावजी पढरपुरे
२ भाऊ बिन कृष्ण जोशी
१ भिकभट वळवडे
१ भिकभट पढरपुरे
१ नाना बिन नागुभट गोवारकर
१ बाबाजी धोडी
२ बाबाजी विश्वनाथ जोशी
१ गोपाळा पोतदार
१ काशिनाथ ढवळीकर
२ भाऊ बाळकृष्ण जोशी
३ उद्धव जोशी रुजू नाना जोशी
मोर बापू
१ बडूदी॥ गिजरे
१ बाबाजी महिपत कडेगावकर
२ रघुनाथशास्त्री सप्रे
सिऊ पाटील
मोरदेव
बाळकृष्ण देव
श्रीधर पाठक
२ अनतदी।। उब्राणी
३ दादादी।। आटकेकर
२ श्रीधरआबा पुजारी
३ गोविंददी।।
२ नारायणभट गिजरे
१ सदाशिवभट टोणपे
३ विष्णुभट सप्रे
१ वसूल २ येणे
१ भटभट पढरपुरे
१ बाळ जोशी
१ नाना विदार
कृष्णा पाठक
१ नारायणभट पढरपुरे
२ विनायकदी।। गिजरे
गुडाजीबोवा सत
महादेवबोवा सत
३ कृष्णाचार्य कवठी
३ तीन रुपये
१ गोपाळभट ढवळीकर
२ बाळकृष्णभट बिन बाबणभट
ढवळीकर
१ नारायणदी। उंबराणी गौरवास येणे
१ नारायणभट ग्रामोपाधे
१ आपाजी हरी जोशी
२ गोविंदाचार्य घळसासी
३ गणेशभट आणा ग्रामोपाध्ये व्यकटाचार्य जगी
विष्णू सुध्धा २ दादादी॥ उबराणी
१ तात्याचार्य घळसासी     २ गणेशदी।। गिजरे भाऊ डोगरकर
१ वसूल वसूल
१ तात्या वळवडे          २ चितामणभट बावडेकर आषाड
१ बाळभट रागीन वा। ९
४ कोडदी।। गिजरे १ अतू टोणपे
माणिकदी॥ गिजरे २ बाळजोशी
३ नानादी।। उबराणी १ आपाजी हरी जोशी
३ बाळकृष्णदी॥ उबराणी १ विष्णुभट रामरामे
३ बडूदी॥ उबराणी महिपतदी॥ १ तात्याचार्य घळसासी
उबराणी

१, ७, ८, १०, २५ व २७ ह्या नोंदीं पैकीं आठव्या नोंदीत तीथ व वार दिले नसल्या कारणानें तिज संबंधानें विचक्षणा करण्याचें कारण च रहात नाहीं, बाकी राहिलेल्या पांच नोंदीं पैकीं (१) सत्ताविसाव्या नोंदींतील शक १७४१ च्या वैशाखशुद्धप्रतिपदेस मोडकांच्या जंत्री प्रमाणें राववार पडतो व दीक्षितांच्या जंत्री प्रमाणें शनिवार पडतो. अशी एकदोन दिवसांची तफावत मोडकांच्या व दीक्षितांच्या जंत्र्यांतून वारंवार आढळते. मोडकांनीं आपली जंत्री जुन्या पंचांगां वरून रचिली व जुन्या पंचांगांतील गणित प्रायः स्थूल असे, त्या मुळें जुन्या पंचांगांच्या हून किंचित् सूक्ष्म गणित करणा-या दीक्षितांच्या जंत्रींत तिथींचे वार वारंवार निराळे आढळतात. गणितदृष्ट्या दीक्षित यद्यपि बरोबर असले, तत्रापि साक्षात् जुन्या पंचांगांतून दिलेले तिथींचे वार इतिहासदृष्ट्या ज्यास्त प्रमाणिक समजणें इष्ट असतें. कारण इतिहासलेखक किंवा इतिहासलेखांच्या नकला करणारे सामान्य कारकून स्थूल पंचांगांचा च उपयोग करून काम भागवितात, सूक्ष्म गणित करीत बसत नाहींत आणि सूक्ष्म गणित करण्याची त्यांची लायकी हि नसते. सबब, सत्ताविसाव्या नोंदींतील वैशाखशुद्धप्रतिपदेला जो रविवार सांगितला आहे तो रास्त धरून, ह्या नोंदींतील कालगणनेचा तपशिल विश्वसनीय मानण्यास कोणती च हरकत नाहीं. (२) पंचविसाव्या नोंदींतील संवत् १५३५ ऊर्फ शक १४०० च्या चैत्रशुद्ध प्रतिपदेस गुरुवार दीक्षितांच्या जंत्रींत दिला आहे; तेव्हां ही नोंद विश्वसनीय आहे हें सांगावयाला नको. (३) दहाव्या नोंदींतील संवत् ५७४ ऊर्फ शक ४३९ च्या म. प्र, २,

फाल्गुनशुद्ध नवमीस रविवार पडतो, सबब ही हि नोंद प्रमाणिक आहे. (४) सातव्या नोंदीतील संवत् १२९८, शक ११६३ च्या माघशुद्ध सप्तमीस मंगळवार येत नाहीं, परंतु पंचमीस येतो. करतां, ह्या नोंदींतील “ माघशुद्ध ७ भौमे' ह्या अक्षरांबद्दल “ माघशुद्ध ५ भौमे " असा पाठ घ्यावा लागतो. माघशुद्धपंचमीला भौमवार ऊर्फ मंगळवार पडतो. येथें नक्कलकारानें ५ बद्दल ७ वाचला हें उघड आहे. जुन्या ५ च्या आंकड्याच्या गांठीचें टोंक लेखणीच्या फटका-यानें किंचित् खालीं ओढलें न गेल्यामुळें चिन्ह साताच्या आंकड्या सारखें दिसूं लागलें आणि तें नक्कलकारानें सहजच सात म्हणून वांचलें. तात्पर्य, ह्या नोंदींत पांचाचा आंकडा सात म्हणून वांचला गेला. शक ११६३ माघशुद्ध ५ भौमे हा तीथवारांचा आंकडा विश्वसनीय आहे ह्यांत संशय नाहीं. (५) पहिल्या नोंदीत “ शक १०६० माघशुद्ध ५ सोमवासरे '' अशीं अक्षरें आहेत. अक्षरांच्या व आंकड्याच्या चुक्या नकलकारानें ह्या नोंदींत ज्या केल्या आहेत त्यांची दुरुस्ती दोन त-हांनीं करतां येते. नोदींत जितकी पदें असतात तितक्या पदांतील अक्षरां ऐवजीं किंवा आंकड्या ऐवजी निराळीं व अक्षरें किंवा आंकडे, जुनाट, पुसट वगैरे लेख नीट वाचतां येण्यास प्रतिबंध झाल्यामुळें, नक्कलकार गाळीत किंवा बदलीत असतांना वारंवार आढळतात. असा बदल प्रस्तुत नोंदींत दोन त-हांनीं झाला असल्याचा संशय सिद्ध करतां येतो. १०६० शकाच्या माघशुद्ध ५ स दीक्षितांच्या जंत्रींत सोमवार नाहीं, शनिवार आहे. त्या मुळें नकलकारानें ५ हा आंकडा दुस-या कोणत्या तरी आंवड्या करितां लिहिला असावा हा एक संशय; किंवा सोमवासरे हीं अक्षरें दुस-या कोणत्या तरी वाराच्या बद्दल लिहिलीं गेली असावीं, हा दुसरा संशय, माघशुद्ध ७ स सोमवार आहे. करतां, ७ च्या बद्दल नकलकारानें ५ हा आंकडा लिहिला असण्याचा संभव आहे.

लेखाक २०३
१७७८ आषाढशुद्ध ७

श्रीशंकर
।। श्री ।।


श्रीमत्परमहसपरिव्राजकाचार्यवर्यश्रीमच्छकराचार्यान्वयस -
जाताभिनवश्रीविद्याशकरभारतीस्वामिकरकजोद्भवश्रीवि-
द्यानरसिव्हभारतीस्वामिकृतनारायणस्मरणानि

वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्राह्मणवृद व जोतीषी व राजकीय गृहस्थ व देशमुख व देशपाडे व पाटीलकुलकर्णी वा। क्षेत्रकरहाटक परमसिष्योत्तम यासि विशेषस्तु तुमचे कल्याण इछित छात्रसभासमवेत श्रीनिकट असो अत्रत्य कुशल जाणोन स्वकीय लेखनी मानस सतोषवीत असले पाहिजे तदनतर सस्थानदेवतेच्या स्वारीचे सचारउद्देशे करवीराहून निघणे होऊन या प्राती आगमन जाहाले आहे. चातुर्मास्या करिता क्षेत्रमजकुरास स्वारीचे आगमन होऊन स्थातव्य व्हावे. हा मनोदय याज करिता वो। राजश्री कोडदीक्षित आरणके यासी आज्ञा होऊन पाठविले आहेत सविस्तर समजावितील स्वारीचे येणे आषाढशुद्ध १५ अगर वद्य ४ चतोर्थीस होईल तुह्मी संस्थानचे सत्सिष्य पूर्ण साभिमानी तेथे विस्तारे लिहावे असे नाही विशेष लिहिणे ते काय शके १७७८ नळनामसवत्सरे आषाढशुद्ध ७ महानुशासन वरीवर्ति