Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २६३ श्री १६३१ मार्गशीर्ष शुध्द ५
१ वेदमूर्ति महाराज राजश्री दामोधरभट
२ धर्माधिकारी क्षेत्र पुण्यस्तंभ स्वामीचे
३ चरणसेवेसी रामाजी काउजी प्रभु चरणालागोन सा। दंडवत
४ सु॥ सन १११९ लेहून दीधले पत्र ऐसे जे आह्मी अगर
५ आमचे कोण्ही वौसीचे क्षेत्रास यात्रेस येतील त्यानी स्वा-
६ मीस तीर्थपुरोहित जाणोन क्षेत्रविधयात्रा तुमच्या वि-
७ द्यमाने करावी सही शके १६३१ विरोधीनाम संवत्सरे
८ मागेश्वर शुध्द ५ यवार भृगुवासरे छ ३ माहे सौवाल
९ हे पत्र रेवातीरीं लेहून दीधले असे हे विनंति१
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १६२
श्रीशंकर
श्रीमत्छकराच्यार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्यानरसिहभारती
स्वामिकृतनारायणस्मरणानि
सकलगुणालकरण हरिगुरुभक्तिपरायण राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृद व जोतिषी व उपाध्ये व आश्रित व राजकीय गृहस्थ व देशमुख व देशपाडे व समस्त गृहस्त वास्तव्य क्षेत्रक-हाटक भक्तोत्तम या प्रति विशेषस्तु तुमचे कल्याण इच्छीत करवीरक्षेत्री छात्रसभासमवेत श्रीनिकट राहिलो असो तदनतर साप्रत पुष्यशुद्ध नवमीस श्रीची पुण्यतिथी आहे या करिता लिहिले असे तरी आपण ब्राह्मणसमुदायसहित येऊन मोहत्सव साग केला पाहिजे सुज्ञा, प्रति विशेष काय लिहिणे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १६१
श्रीशंकर
आर्यस्वामी
श्रीमत्परमहसादियथोक्तबिरुदाकितश्रृगेरीसिहासनाधीश्वर श्रीमत्छकराचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्यानरसिहभारती
स्वामिकृतनारायणस्मरणानिसकलगुणालकरण हरिगुरुभक्तिपरायण राजमान्य राजश्री कृष्णाजी विठ्ठल सुभेदार प्रातक-हाड परमभक्तोत्तम या प्रति विशेषस्तु तुमचे कल्याण इच्छित करवीरक्षेत्री छात्रसभासमवेत श्रीनिकट राहिलो असो तदनतर येथील कुशल जाणोन आपले क्षेमकल्याण लिहून आशिर्वाद सपादित आसिले पाहिजे या नतर साप्रत पुष्यशुध नवमीस श्रीची पुण्यतिथी आहे तरी आपण समुदायसहित येऊन महोच्छाव साग सपादिला पाहिजे ये विषयी अनमान न करिता आले पाहिजे सुज्ञा प्रति विशेष लिहिणे नलगे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २६२ श्रीगणेशायनमः १६३० श्रावण शुध्द ५
१ दामोदरभट धर्माधिकारि पुन्यस्तंभस्त गं-
२ गागोदावरि तीर्थपुरोहित लीहोन दिल्हे सु-
३ भानजी राजे वा। खाणाजी राजे चोर जो आपले वौसी-
४ सीचे जे येतील ते यासि पुजतील तुह्मी देवास श्रावणमासी
५ अभिसेक करीत जाने तुह्मी तीर्थ उपाधे नाहीत आश्रीत आसा
६ हे लिहिले आपले सही शके १६३० सर्वधारीनाम संवसरे
७ माहे श्रावण सुध पंचमी
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १६०
श्रीशंकर
श्रीमछकराच्यार्यान्वयश्रीविद्याशकरभारतीस्वामिकरकमलस
जाताभिनवश्रीविद्यानरसिहभारतीस्वामिकृतनारायणस्मरणानि
हरिगुरुभक्तिपरायण राजमान्य राजश्री समस्त ब्राह्मण वास्तव्य कराड या प्रती विशेषस्तु तुमचे कल्याण इछित करवीरक्षेत्री छ्यात्रसभासमवेत श्रीनिकट असो तदनतर साप्रत पौष्यसित नवमीस श्रीची पुण्यतिथी आहे तरी आपण सहसमुदाय येऊन महोच्छाव साग केला पाहिजे बहुत कार्य लिहिणे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १५९
श्रीशंकर
श्रीमत्छकराचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्यानरसिहभारती
स्वामिकृतनारायणस्मरणानि
सकलगुणालकरण हरिभक्तिपरायण राजमान्य राजेश्री समस्त ब्रह्मवृद व ज्योतिषी व उपाधे व समस्त राजकीय गृहस्त व देशमुख देशपाडे व समस्त ग्रामस्त गृहस्त वास्तव्य क्षेत्रक-हाटक भक्तोत्तम या प्रति विशेषस्तु तुमचे कल्याण ईछीत करवीरक्षेत्री छात्रसभासमवेत श्री पाशी राहिलो असो तदनतर साप्रत पुष्यशुद्ध नवमीस श्रीची पुण्यतिथि ब्राह्मणसर्तपणउछव आहे तरी आपण ब्राह्मणसमुदायसहित येऊन मोहत्छाव साग करून गेले पाहिजे उत्छव आपला आहे. अनमान न करणे बहुत काय लिहिणे
महिकावती (माहीम)ची बखर
५. वसईच्या वालजी पाटलानें प्रस्तुत बखर ज्या मूळा वरून केली तें मूळ स्वतः दुस-या एका नकलेची नक्कल होतें असें म्हणण्यास प्रमाण आहे. तिस-या पृष्टांतील एकविसाव्या ओवीचा तिसरा चरण व एकाण्णवाच्या पृष्टांतील दहाव्या ओळींतील व एक्यायशीव्या पृष्टांतील सव्विसाव्या ओळींतील गाळलेला मजकूर वालजी पाटलानें ज्या नकले वरून आपली नक्कल उतरली त्या नकलेंत नव्हता, म्हणजे वालजी पाटला पुढें मूळ ग्रंथ नव्हता, नक्कल होती व ती नक्कल अपूर्ण होती. अपूर्ण नक्कले वरून अपर्ण नक्कल उतरल्यास, त्याचा दोष नकलकारा कडे येत नाहीं. परंतु मूळांतलि अक्षरें किंवा आंकडे नकलकारानें हलगर्जीपणानें किंवा अज्ञानानें वगळल्यास किंवा विपर्यस्त केल्यास किंवा निराळे व वाचल्यास, दोषाचा शिक्का त्याच्या कपाळा वर मारणें सर्वस्वीं वाजवी ठरतें. असें दोष वालजी पाटलाच्या नकलेंत खालील स्थलीं झालेले आढळतातः
पृष्ट | ओळ | अशुद्ध | शुद्ध |
३४ | वरून ३ | ११२५ | ११९५ |
४१ | वरून १४ | १२२८ | १२९८ |
६६ | खालून ६ | ११३५ | ११९५ |
७० | खालून १० | ११२५ | ११९५ |
१०६ | वरून १५ | ११२५ | ११९५ |
११९५ बद्दल ११२५, १२९८ बद्दल १२२८ व ११९५ बद्दल ११३५, अशीं अशुद्धें वालजी पाटलाच्या नकलेंत असलेलीं आढळतात. मूळ शक १३७० तील व १४६० तील लिखाणांत ११९५ व १२९८ असें आंकडे होते. ते वालजी पाटलानें ज्या नकले वरून आपली नकल उतरली त्या नकलेच्या लेखकानें ११२५ व १२२८ असे वाचले. असे अशुद्ध कां वाचले तर त्या लेखकाला शक १३७० तील व १४६० तील मूळच्या लेखांतील नवाचा जुना आंकडा अर्वाचीन दोहोंच्या आंकड्या सारखा भासला. शक १३७० त व शक १४६० त नवाचा आंकडा महाराष्ट्रदेशांत २ सारखा काढीत व शक १६०० नंतर किंवा सुमारास ९ असा काढीत. म्हणजे अर्वाचीन ९ नवाच्या आंकड्याचे प्रारंभींचें जें गोंडगोळें संपूर्ण चोहों कडून कडबाच्या आकाराचें वांटोळे आहे तें शक १३७० त डाव्या बाजूस किंचित् तुटलेलें म्हणजे २ सारखें दाखवीत. नवाचा हा जुना आंकडा शक १६०० च्या सुमारच्या नकलकारास ओळखतां येत नाहींसा झाला होता. त्या मुळें ११९५ व १२९८ हे जुने आंकडे त्यानें ११२५ व १२२८ असे नव्या त-हेचे वाचले आणि हे चुकलेले आंकडे त्या नकलेंतून वालजी पाटलानें आपल्या नकलेंत शोध न करतां जसे चे तसे उतरून घेतले. वालजी पाटलानें जर एखाद्या जंत्री कडे पाहिलें असतें, तर शक १०६० ला संवत् ११९५ येतो, संवत् ११२५ येत नाहीं, हें त्याच्या तेव्हां च लक्ष्यांत येतें. परंतु, हा लहानसा शोध वालजीनें केला नाहीं. कारण ११२५ वाचण्यांत चूक होत आहे, असा संशय च मुळीं त्याला आला नाहीं. “स्वस्ति श्रीनृपविक्रमार्कसमयांति-संवत् ११२५ तत् राजिंद्रचक्रचूडामणौ शालिवानशके १०६० " असें वाक्य त्याच्या पुढें होतें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १५८
श्रीविद्याशकर
श्रीमत्परमहसादियथोक्तबिरुदाकितशृगीरिसिव्हासनाधीश्वर श्रीमत्छकराचार्यान्वयश्रीविद्याशकरभारतीस्वामिकरकमलस
ज्याताभिनवश्रीविद्यानरसिहभारतीस्वामिकृतनारायणस्मरणानि
श्रीमत्सकलगुणालकरण हरिगुरुभक्तिपरायण राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृद व समस्त ग्रहस्त क्षेत्रक-हाटक भक्तोत्तम या प्रति विशेषस्तु तुमचे कल्याण इछित करवीरक्षेत्री छत्रसभासमवेत श्रीनिकट असो तदनतर साप्रत पौष्यसीत नवमीस श्रीची पुण्यतिथि आहे या करिता लिहिले असे तरी आपण ब्राह्मणसमुदायसहित येऊन मोहत्साव साग केला पाहिजे अनमान, न करणे बहुत काय लिहिणे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १५७
श्रीविद्याशकर
श्रीमत्छकराच्यार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्यानरसिहभारती
स्वामिकृतनारायणस्मरणानि
श्रीमत्सकलगुणालकरण हरिगुरुभक्तिपरायण राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृद व ग्रहस्त क्षेत्रक-हाटक या प्रति विशेषस्तु तुमचे कल्याण इच्छीत करवीरक्षेत्री छात्रसभासमवेत श्रीनिकट राहिलो असो तदनतर अत्रत्य कुशल जाणोन स्वकीय लिहीत जाणे या नंतर साप्रत पुष्यशुध नवमीस श्रीची पुण्यतिथी ब्राह्मणसतपर्ण उत्सव आहे या करिता लिहिले असे तरी आपण सहसमुदाय येऊन महोत्साव
साग केला पाहिजे आनमान न करणे बहुत काय लिहिणे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १५६
बाळबोध
दिदीरा श्रीशंकर
श्रीमत्पमहसपरिव्राजकाचार्यवर्येणपरमश्रृगेरीमठवरपदभ
द्रसिहासनाधीश्वरेण श्रीमच्छकराचार्यगुरुवर्यसप्रदायोत्प
न्नेन यतिना विद्यानृसिहाख्येन प्रयुक्तान्यनतानि नारायणस्म रणानि
स्वस्ति श्रीमदगणितगुणगणमडणमडितोमारणचरणनलिनयुगलानवरतोपासनासा हितनेकशास्त्रविद्याकलापेषु करहाटकक्षेत्रग्रामस्थसमस्तब्रह्मवृदेषु तथा यज्ञेश्वरभट्टेषु श्री अत्र क्य मार्गशीर्षमितानगदिन पर्यतम् श्रीमन्निवासक्षेत्रे सु खतर निवसाम् शमिहाव्याहत वरीवर्त्यस्माक भावत्क कौशलमधिगतुमीहामहेतराम विशेषोदतस्तु पौषशुद्धनवम्यास्मत्परमगुरूणाम् पुण्यतिथि समागता वरिवर्ति तत्सागताविधानार्थ भवद्भि सप्तम्या समागतव्यम् श्रीमत्देव्याश्च दर्शनमपि भविता भवदीयदर्शनापेक्षाप्यस्माक वर्तते आगमने तदुभयमपि सिद्ध भविष्यति किम् बहु लेखनेन सुज्ञतरेष्विति दिक्
मोर्तब सुद