लेखांक २६५ श्री १६४० श्रावण शुध्द ५
स्वस्ति श्री राज्याभिषेक शके ४५ विलबीनाम संवछरे श्रावण शुध पंचमी इंदुवासर क्षत्रियकुलावतंस श्री राजा शाहू छत्रपति स्वामी याणी नरहर गोसावी वस्ति किले विचित्रगड यांसि दिल्हे इनामपत्र ऐसे जे तुह्मी स्वामी सन्निध किले साताराचे मुकामी मुकामी विनंती केली जे आपणास राजश्री पंतसचिव येही गावगना जमीन इनाम करून दिली आहे त्याचे इनामपत्रक करून देऊन वंशपरंपरेने इनाम चालवीले पाहिजे ह्मणून त्यावरून मनास आणून स्वामी तुह्मावरी कृपाळू होऊन राजश्री पंतसचिव येही इनाम करून दिल्हे आहे तेणे प्रमाणे हे इनामपत्र करून दिल्हे असे बि॥
मौजे कानवडी ता। रोहिडखोरे मौजे पलसोसी ता। रोहिडखोरे
१०
१०
एकूण जमीन बिघे वीस कुलकबाब कुलकानु खेरीज हकदार तुह्मास व तुमचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेने इनाम दिल्हा असे राजश्री पंतसचिव येही दुमाला करून दिल्हा आहे तेणे प्रमाणे वंशपरंपरेने इनाम अनभऊन सुखरूप राहाणे लेखनालंकार
रुजू सुरुनिवीस सा। मंत्री
तेरीख ३
रमजानु सु॥ तिसा
बार सुद सुरु सुद बार बार