Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

त्यास राजश्री साहेब गणेशपंतास सुरनिसी सांगितरी सिवाजीपंतास सासवडचा हवाला सांगितला सिवाजीपंताचे पुत्र रखमाजीपंत होते त्यास किलेहायचा सरसुभा सांगितला आणि आपणाजवळ हुजूर ठेविले विसाजीपंतास कोकणात नसरापुरची माहालीची मजमु सांगितली तेसमई तोरण्याखाले शेणवडी गाव कानदखोराचा आहे तेथे नांदत होते रोजगारामुळे गावावरी पाटिलकी करावयास कोणी गेले नाहीत त्यावरी मोगलाची धामधूम जाली राजश्री राजाराम चंजीप्रांते गेले राजरी शंकराजीपंत राजाज्ञा किले वसंतगडी होते त्याजवळ राजश्री नारो यादव जाऊन पेशवाईची मुतालिकी करून राहिले त्यावरी राजश्री शंकराजीपंतास सुरनिसीचे पद जाले या प्रांतीची + + + केली त्या बि॥ राजश्री नारो यादव रोहिड्यास आले मौजे वोझर हा गाव आपणाकडे इनाम घेतला आणि सनदा घेउन आले ते समई मौजे मा।रचे खणीस मांडे बोलाऊन आणिले तेव्हा पाटिलकीच्या उत्पनाचा व तीन चावर इनाम सेताच्या उत्पन्नाचा तगादा लाविला आजीतागाईत तुह्मी पाटिलकी करीत आले आहा त्याच्या उत्पन्नाचा वसूल देणे ह्मणून तहसीलदार लावत तेव्हा मांड्यानी मजकूर केला की एक चावर इनाम विसाजीपंत याणी विकिला दोनी चावर उरला त्याचा वसूल घ्यावा ह्मणून बोलिले त्यास राजश्री नारो यादव याणी आपली मातुश्री भवानीबाई यास वर्तमान पुसिले त्याणी जाब दिल्हा जे तुह्मी पाटिलकीचे उत्पन मागता ऐसे च पेशजीच्या उत्पनात सातसे टके घेऊन घरास आले इनाम चावर विकिला नाही माडे विकीले ह्मणताती तरी त्याच्या दस्तूरचे पत्र आणवणे ऐसी बोलिली त्यावरून माडे खोटे जाले याकरिता किले राजगडी अटकेत ठेविले एक वरीस किलियावर होते त्यापासून काय घेतले हे कळले नाही त्याउपरी राजश्री शाहूराजे या प्रांते आले राजश्री बाळाजी विश्वनाथ यास प्रधानपद जाले त्याजकडून राजश्री हरि यादव याणी हुजूरचा सुभा केला तेसमई देशमुख व देशपांडे व गावगनाचे मोकदम व बाजे वतनदार जमा जाले तेव्हा गोताजवळ मजकूर घातला की मौजे वोझरची पाटिलकी आपली असता मांडे काय निमित्य खाताती याचा इनसाफ गोतमते करणे त्यास मांड्यानी जाब दिलहा जे तुमची पाटिलकी जुनरच्या फौजदारास दीड हजार रुपये घेऊन विकली आहे आपणास काल पडिला याकरिता विकली त्यास ते बोलिले जे त्यास नकळत वतन नविकले ते निगाड तुह्मी वारावे पाटिलकीसी तुह्मास संबंध नाही ऐसे गोताने बोलो + पाटिलकीचा महजर राजश्री हरिपंतास करून दिल्हा त्याणी गावात कारभारी ठेऊन पाटिलकीचे वतन चालवीत आहेत त्यास राजश्री नारो यादव व हरि यादव याणी आपणास पुसिले की वडिलाचे वतन सोडवावे परंतु आपल्या विभागास अल्प वाटा येतो तेसमई आपण उत्तर दिल्हे जे अह्मी तो गोसावी अमचा वाटा निमे आहे तो तुह्मी खाऊन पाटिलकी करा त्यास हरिपंत बोलिले जे तुह्मास पुत्र होईल तो वाटा निमे मागेल तेव्हा आपण बोलिलो जे पुत्र होऊन वाटा मागावया होय तो परयंत तुह्मी खाणे पुत्र जालियावरी एक भाकर दो ठाई करून समाधाने खाणे परंतु वतनाचा जिर्णोधार करणे ऐसे बोलिले त्यावरून त्याणी राजश्री बालाजीपंत प्रधान यापासी पाटिलकीचा करीणा विदित करून महजर करून घेतला ते समई त्यास काय काय खर्च जाला तो त्याणी आपणास सांगितले नाही त्यावरी राजश्री हरिपंत बोलिले की तीन सहस्र रुपये वतनास खर्च जाला तो वाटणीप्रमाणे अवघ्यानी घ्यावा तेव्हा आपण जाब दिल्हा की आमचा वाटा खात च आहा त्याउपरी आपणास जिउबा पुत्र जाला त्याच्या व्रतबंधास हरिपंती दाहा रुपये दिल्हे त्यावरी काही न पावले त्यास देवज्ञा जाली त्यावरी त्याच्या पुत्राने जिउबाच्या लग्नाच्या रिणास पांच रुपये दिल्हे

लेखाक १९४
१७६५ज्येष्ठमास

श्रीशंकर


श्रीमत्परमहसपरिव्राजकाचार्यश्रीमच्छकराचार्यान्वयस-
जाताभिनवश्रीविद्यानरसिव्हभारतीस्वामिकरकजोद्भवश्री-
विद्याशकरभारतीस्वामिकृतनारायणस्मरणानि
श्रीमत्सकलगुणालकरण श्रीगुरुभक्तिपरायण मठाभिमानिधुरधर गगाजळनिर्मळात कर्ण सावित्रीबाई परमसिष्योतम यासी विशेषस्तु तुमचे कल्याण इच्छित छात्रसभासमवेत श्रीनिकट असो अत्रत्य कुशल जाणोन स्वकीय लेखनी मानस सतोषवित असले पाहिजे त्या नतर स्वस्थानदेवतेची स्वारी साचारउद्देशे निघोन कराडास आगमन जाहले आहे येथोन साता-यास जाणे होईल कैलासवासीरावजी कोलटकर
यासी अतकाळसमई सर्वप्रायश्चित केले ए विसी वेदशास्त्रसपन्न राजश्री बाबा दीक्षित गिजरे व रघुनाथ दीक्षित गिजरे वगैरे समस्त क्षेत्र करहाटक येथील ब्राह्मण तुह्माकडे आले आहेत क्षेत्रस्त ब्राह्मण विद्वान सत्पात्र आहेत सविस्तर मजकूर तुह्मास समजावितील निरतर विनतिपत्रिका प्रेषून सस्थानदेवतेच्या परामृषास अविस्मरता असावी विशेष लिहिणे ते काय शके १७६५ शोभकृतनामसवत्सर जेष्टमास महानुशासन वरीवर्ति

एणेप्रमाणे दोग पुत्र आहेत त्याउपरी रुद्राजीपंत धाकटे गोपजीपंत यास पुत्र मोरोपंत त्याचे पुत्र गोविंदपंत त्यास सतान नाही एणे प्रमाणे वंशावळी आहे त्यास पाटिलकीचा करीणा पाटिलकीचे गावी असता मलिकअंबर दिवाण निजामशाहा पातशाहा याणी मेहेरवान होऊन गणेशपंतास सरकार जुनरची खालिसा अंंमलाची करोडगिरीचा व्यापार सांगितला त्याणी पाटिलकीस गुमास्ता मकाजी माड्या ठेविला तो पाटिलकीचा कारभार करीत असे गावात पाटिलकीस इनाम पातशाहानी गणेशपंतास तीन चाहूर जमीन मोजे वोझर येथे इनाम दिल्ही त्याचे उत्पन व पाटिलकीचा मानभाग गणेशपंत अनभवीत होते त्यावरी सरकार जुनरचे देशमुख व देशपांडे व मोकदम पातशाहानी हुजूर बोलाविले जमाबदी करून रयतीस दिलासीयाचे कौल दिल्हे सिरपाव दिल्हे ते समई वोझरचा पाटील बोलाविला तेव्हा गणेशपंती मांड्या गुमास्ता होता त्यास सिरपाव देविला त्यास मांड्या गावास आलियावरी निमेचा पाटील ह्मणऊ लागला तेव्हा कटकट होउुन हुजूर दोगजण खडकीस पातशाहाजवल फिर्यादीस गेले तेव्हा पातशाहानी गणेशपंतास पेचिले की पाटिलकीस सिरपाव तुह्मी घ्यावा तो गुमास्तियास काय बदल देविला ऐसे पेचिले त्यावरी गावास आले मांडे निमे पाटिलकी करू लागले त्याणी दावा लाविला गणेशपंताच्या देव्हारा सोनयाची एक सेराची गाय व पाव सेराचे वासरू पूजीत होते ते घरीचे बटिकीस फिताऊन चोरून नेले त्यावरी गणेशपंती उपोशणे आरंभिली तेव्हा श्री देव गणेशमूर्ति मौजे मजकुरी आहे त्याणी स्वप्न दाखविले की तुझी सोन्याची गाय व वासरू तुझे बटिकीने चोरून नेली त्यास बटिकीस मार देता कबूल जाली आणि मांड्याचे घरीहून सोन्याची गाय व वासरू आणून दिल्हे त्यावरी बहुत द्वेश वाढला त्यास गणेशपंत सध्या करीत होते तो समय पाहून मांड्यानी वाडियात येऊन गणेशपंतास जीवे मारिले त्याचे पुत्र किटोपंत आले बेल्हेतर्फेची कमावीस करीत होते त्यास हे वर्तमान कळता च खडकीस पातशाहाकडे गेले मागे बहिरोपंत श्रीनरहरीचे मूर्ति घेऊन कोकणात कल्याण प्राते गेले मारियाचे वर्तमान किटोपती मलिकअबर साहेब यास विदित केले त्याणी बफजल हुकूम व जमाव समागमे दिल्हा त्याणी वोझरास येऊन माडे दावणी देऊन मारिले व त्या फितव्यात होते ते हि मारीले व त्याचे घरी वाटसरू राहिले होते ते देखील मारिले तेसमई माड्याची बाईल गरोदर होती ते माहेरास पळोन गेली तेथे प्रसूत जाली तिजला दोगजण पुत्र जाले किटोपती व्यापार के + + तेथे गेले माडे पाटिलकी करू लागले त्यावरी + + बाप विसाजी बहिरदेव जुनरास जाऊन देसमुख देसपांडियास भेटोन माड्यासी वाद सांगितला पाटिलकी खरी केली मांड्यानी पाटिलकीचे व इनामाचे उत्पन खादले होते त्या ऐवजपैकी सातसे टके घेतले गावावरी राहावे तरी आपले भाऊ परागंदा जाले याकरिता गावावरी राहिले नाहीत पैका घेऊन घरास आले त्याउपरी राजश्री सिवाजीराजे भोसले राज्य करू लागले त्याच्या दरशनास आपले चुलते गणेशपंत व सिवाजीपंत गेले

लेखाक १९३
१७६४ आश्विन वा। ७

श्रीशंकर

श्रीमत्परमहसपरिव्राजकाचार्यवर्यपदवाक्यप्रमाणपारावार-
पारीणयमनियमासनप्राणायामप्रत्याहारध्यानधारणसमाध्य-
ष्टागयोगानुप्ठाननिप्ठतपश्चक्रवर्त्यनाद्यविछिन्नगुरुपरपराप्राप्त-
षड्दर्शनसस्थापनाचार्यव्याख्यानसिहासनाधीश्वरसकल-
निगमागमसारहृदयसाख्यत्रयप्रतिपालकवैदिकमार्गप्रवर्तक-
सर्वतत्रस्वतत्राश्रीमहाराजधानीश्रीमद्राजाधिराजगुरुभूमड-
लाचार्यऋष्यशृगपुरवराधीशपचगगातीरवासकमलानिकेत-
नकरवीरसिहासनाधीश्वरश्रीमच्छकरभगवत्पादजान्हवीज-
नितश्रीविद्यानरसिहपादपद्माराधकश्रीविद्याशकरभारती-
स्वामिभि
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृद व राजकीय ग्रहस्त वो। क्षेत्र श्रिया ळ यासी आज्ञा केली ऐसी ज शके १७६४ शुभकृतनामसव सरे आश्विन बहुळ सप्तमी रोज सौम्यवासरे त दिनी आज्ञापत्र प्रेषिल जे शृगेरीकर हे मलापहारीचे आलीकडे कधी च येणे चा साप्रदाय नव्हता हली महायात्रेस जाणे करिता धारवाडास आले आहेत या मार्गे येणार ह्मणोन निवेदनात अले अशाच मला पहारी पासून उत्तर देशात अच्यारविच्यारप्रायस्चितादीक करवणे अगर पादपूज्या व पूजाद्रव्य घेणे हा करवीरमठचा अधिकार नहून इतर कोणी हि स्वामी अले असता त्यास अधिकार नाही या प्रमाणे पूर्वापार साप्रदाय याजकरिता लि।। आहे तरी ये विसीचा बदोबस्त नीट राखावा तुह्मी सस्थानचे सिष्यसाप्रदाई त्या अर्थी विस्तार लिहून कळवाव असे नाही विशेष लि॥ ते काय महानुशासन वरीवर्ति

लेखाक १९२
१७६४ ज्येष्ठशुद्ध ७


श्री
नक्कल बालबोध
शिक्का


श्रीमत्परमहसपरिव्राजकाचार्यवर्यपदवाक्यप्रमाणपारावार-
पारीणयमनियमासनप्राणायामप्रत्याहारध्यानधारणासमाध्य
ष्टागयोगानुप्ठाननिप्ठतपश्चक्रवर्त्यनाद्यविछिन्नगुरुपरपराप्रा-
प्तषड्दर्शनस्थापनाचार्यव्याख्यानसिहासनाधीश्वरसकलनि- गमागमसारहृदयसाख्यत्रयप्रतिपादकवैदिकमार्गप्रवर्तक-
सर्वतत्रस्वतत्रादिराजधानीविद्यानगरमहाराजधानीकर्नाटक-
सिहासनप्रतिष्ठापनाचार्यश्रीमद्राजाधिराजगुरुभूमडलाचार्य-
ऋष्यश्रृगपुरवराधीश्वतुगभद्रातीरवासश्रीमद्विद्याशकरपाद-
पद्माराधकश्रीमदभिनवसच्चिदानदभारतीस्वामिगुरुकरकम-
लसजातश्रृगेरीश्रीनृसिहभारतीस्वामिभि

श्रीमदत्रभवच्छकरभगवत्पादाचार्यचरणपरिचरणपरायणैतदनादिसिद्धधर्म-
सस्थानमर्यादापरिपालनैकधुरीणश्रीशकराचार्यमुखारविदनिष्पदमानाद्वैतमक-
रदमिलिदायमानानदितसमस्तसज्जनसदोहपरमहसादिससत्सभाजनप्रवीण-
वैराग्यसमेधमानश्रीमद्वाराणसीस्थिताशेषदशनामधारीमडलीविषयेप्रत्य-
ग्र्बह्मैक्यानुसधानपूर्वक विरचितनारायणस्मृतयो जयतुतरा चतुसमुद्रमुद्रित-
वसुमतीमडलविश्रुताखिलजगत्पूज्यश्रीमच्छकरभगवत्पादपीठविषयिष्णी

निरुपाधिकभक्ति रनवधिकश्रेयोनिदानमिति विदितमेव खलु सर्वेषा विशेषस्तु वयमहि शुगगिरिपुरा न्महायात्राकृते प्रस्थिता मध्येसरणि भाग्यनगरपरिवृढमहामात्येन चदूलालनाम्ना सभक्तिभावविरचिता विज्ञप्तिपत्रिकामुखावेदिता गुरुतरप्रार्थना मूरीकृत्य तदेतत्पुरमुपेत्य तत्कृतमन्यशिष्यकृत च पूजासत्कार मुपलभ्य तत श्रीकाशीक्षेत्र प्रति जिगमिषवोऽ भवान तत्रातरे कश्चिदुदन्तोऽस्माक श्रवणपदवी मध्यारूढ
कश्चिद्यति रह श्रीमच्छकराचार्याशिष्यपरपरा मनुगत शृगगिरिपीठाधिपति रिति वृथाप्रथामुत्पाद्य भगवत्पादपादैकयोग्यान् बिरुदाकानू कल्पयित्वा तै परित परिवारितो जनान्वचय न्नार्यावर्ते सचरतीति स च कृतकयति र्वाराणसी कदाचिदुपैष्यति चेत् तदा भगवत्पादसच्छिष्यै र्युष्माभि न बहुमतव्यो नार्हणीय तत्रत्यास्मन्मलेनैव प्रवेशनीय अस्मदागमनावधि स मिथ्यावादि काश्यामेव निरोत्धव्य वयमपि कतिपयै रेव दिवसै रागमिष्याम् भगवत्पादपीठे अकृत्रिमभक्तिशालिनो युष्मान्प्रति  किमितोधिक पत्रमुखेनाज्ञापनीय एतत्पत्रदर्शनोत्तर सत्वरमेव विज्ञापनापत्रिका प्रेपणीया इतोधिकानवधिकश्रेयोभिवृद्धये श्रीशारदेदुशेखररत्नगर्भहेरबादिदेवता प्रसादमत्राक्षता प्रेषिता सगृह्मता शोभकृत्सवत्सरीयज्येप्ठशुक्लसप्तम्या लिखितेय पत्रिका

लेखाक १९१
१७६३ फाल्गुनमास बाळबोध

श्रीक्षेत्रपाल प्रसन्

वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री रघुनाथदिक्षीत् गिज्रे व नागेशदिक्षीत्काका व गोविंददिक्षीत गरुड व अण्णादिक्षीत् उब्राणि बाबाटिक्षीत गिज्रे याशि प्रति नृसिहदिक्षीत ग्रामउपाध्ये वास्तव्य मठ सकेश्वर शिरसाष्टाग नमस्कार विनती विज्ञापना येथील क्षेम तागायीत् फाल्गूण वद्य १२ पर्यत अपले अशिर्वादे करून सर्व मडळी सुत्धा सुखरूप असे विशेष तीर्थहळीकर स्वामी येक अपण सस्थानी ह्मणून पुण्यास अले होते हे वर्तमान यथे श्री समजले नतर त्यास कोणि पूजा करू नये व पूजाद्रव्याचि पटी देवू नये अशी अज्ञापत्रे पाठविल्या वरून पुण्यात सभा होवून ज्या प्राति उत्तरदेशात् करवीरमठचा अधिकार इतर स्वामीनी सचारास फिर्ण्याचा अधिकार नाहि असा पूर्वी च निबध आहे त्या प्रमाण असावे असे ठरून तीर्थहळीकर यास पूजा न करिता शहरातून घालवून दिले ते प्रस्तुत वायी साता-यास अले आहेत् याजकरिता यिकडून सर्व क्षेत्रास पत्र रवाना झाली आहेत ते क्षेत्रास येतील याज करिता श्रीनि अपल्या समस्ताचा नावे अज्ञापत्र पाठविले आहे त्या प्रमाणे बदोबस्त जाहला पाहिजे येविषयि अपल्यास लिहिणे विषयी श्रीचे अज्ञा झालि ह्मणून लिहिले अहे बहुत् काय लिहिणे हे विज्ञापना

लेखाक १९०
१७६३ फाल्गुनमास

श्रीशंकर

श्रीमत्परमहसपरिव्राजकाचार्यवर्यपदवाक्यप्रमाणपारावारपा-
रीणयमनियमासनप्राणायामप्रत्याहारध्यानधारणसमाध्यष्टा-
गयोगनुप्ठाननिप्ठतपश्चक्रवर्त्यनाद्यविछिन्नगुरुपरपराप्राप्तष-
ट्ददर्शनसस्थापनाचार्यव्याख्यानसिहासनाधीश्वरसकलनिग
मसाहृदयसाख्यत्रयप्रतिपालकवैदिकमार्गप्रवर्तकसर्वतत्र
स्वतत्रश्रीमहाराजधानीश्रीमद्राजाधिराजगुरुभूमडलाचार्य
ऋष्यश्रृगपुरगधीशपचगगातीरवासकमलानिकेतनकरवी
रसिहासनाधीश्वरश्रीमच्छकरभगवत्पादजान्हवीजनितश्रीविद्या
नरसिहपादपद्माराधकश्रीविद्याशकरभारतीस्वामिकृतश्रीभा
क्सपरिवाराणामनुदिनमेधमानभव्यप्रदनारायणस्मरणानि
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजेश्री ब्रह्मवृद व राजकीय गृहस्थ वा। क्षेत्र श्रीकरहाटक परमशिष्योत्तम यासी विशेषस्तु तुमचे कल्याण इछित छात्रसभासमवेत श्रीनिकट असो अत्रत्य कुशल जाणोन स्वकीय लेखनी मानस सतोषवीत असले पाहिजे तदनतर तीर्थहळीकर स्वामी हे श्रीगेरीकराचे नाव सागून सस्थानच्या साप्रदाया प्रमाणे चिन्ह करून त्या प्राती साचारार्थ आला त्याणी पुणे येथे येऊन जिनगरज्ञाती कडे पट्टी मागू लागला हे वर्तमान मठसस्थानी श्रुत जाहले वरून इकडोन समस्त ब्रह्मवृदाचे नावे पत्र देऊन वेदमुर्ती राजश्री व्यकट दीक्षित अथणीकर याची रवानगी जाहली त्या वरून समस्त ब्रह्मवृदाची सभा होऊन मलापहारी पासोन उत्तर प्राती आचारवेव्हारप्रायश्चित्तादिक करणे पूजाद्रव्याची पट्टी सर्व ज्ञाती वर करणेचा अधिकार करवीरस्वामीचा इतर स्वामीस अधिकार नाही हे समजोन त्या प्राती त्यानी फिरू नये अशी ताकीद होऊन पुणेशहरातून घालविले तो हाली सातारेइलाखेत श्रीक्षेत्र वैराज वगैरे ठिकाणी आला आहे ह्मणोन विज्ञात जाले त्यास तीर्थहळीकर यासी तुह्मी कोणी पादपूजा व पट्टी वगैरे न करिता जाणे विसी साफ सागावे इत पर कोणी त्यासि मिलाफी जाहले असता तुमचे विनतिपत्र पा । द्यावे ह्मणजे निग्रहपत्र रवाना करणेची आज्ञा होईल विशेष लिहिणे ते काय शके १७६३ प्लवगनामसवत्सरे फाल्गुणमास महानुशासन वरीवर्ति

लेखाक १८९
१७६२ माघमास

श्रीशंकर


अनेकश क्तिसघटप्रका शलहरीघनध्वा तध्वसो विजयते विद्याशकरभा रती ।।
श्रीमच्छकराच्यार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्यानरसिव्हभार-
रतीस्वामिकरकजोद्भवश्रीविद्याशकरभारतीस्वामिकृतनारायण-
स्मरणानि
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री रघुनाथ दीक्षित गिजरे रा। क्षेत्रकरहाटक परमसिष्योत्तम यासी विशेषस्तु तुमचे कल्याण इच्छित श्रीनिकट असो अत्रत्य कुशल जाणून स्वकीय लेखनी मानस सतोषवीत असले पाहिजे तदनतर वो। राजश्री नरसिव्ह दीक्षित याणी विवाहा प्रकर्णी मजकुराची विनति केली त्यास तुह्मी च मठ सकेश्वर मुकामी येणे ह्मणजे समक्ष च आज्ञा होईल तर सत्वर येऊन पाहोचावे विशेष लिहिणे ते काय शके १७६२ शार्वरीनामसवत्सरे माघमास महानुशासन वरीवर्ति ۔

लेखाक १८८
१७५९ चैत्रमास्

श्रीशंकर
गुरुस्वामी


अनेकश क्तिसघटप्रका शलहरिघनध्वा तध्वसो विजयते विद्याशकरभा रती।।
श्रीमत्परमहसपरिव्राजकाचार्यवर्यश्रीमच्छकराचार्यान्वयस-
जाताभिनवश्रीविद्यानरसिहभारतीस्वामिकरकजोद्भवश्रीवि-
द्याशकरभारतीस्वामिकृतनारायणस्मरणानि
वेदशास्त्रसम्पन्न राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृद व राजकीय ग्रहस्थ वा। क्षेत्रश्रीकरहाटक परमशिष्योत्तम यासी विशेषस्तु तुमचे कल्याण इच्छित छात्रसभासमवेत श्रीनिकट असो अत्रत्य कुशळ जाणोन स्वकीय लेखनी मानस सतोषवित असीले पाहिजे तदनतर श्री याचे प्रकृतीस स्वस्थता नव्हती दिवसो दिवस अशक्तता होत चालली याज मुळे पुढे सस्थानास अधिकारी पाहिजे यास्तव श्री नी चैत्रशु।। ८ गुरुवारी आश्रम देऊन सस्थानी स्थापना- केली नवमी भृगुवारी तृतीयप्रहरी समाधिस्त जाहले तुह्मास कलावे विशेष लिहिणे ते काय हेमलबीनामसवत्सरे चैत्रमास महानुशासन वरीवर्ति

लेखाक १८७
१७५१ कार्तिक शुद्ध ७


श्रीमत्परमहसपरिव्राजकाचार्यवर्यपदवाक्यप्रमाणपारावार-
पारीणयमनियमासनप्राणायामप्रत्याहारध्यानधारणासमा-
ध्यष्टागयोगानुप्ठाननिप्ठागरिष्टतपश्चक्रवर्त्यनाद्यविछिन्नगुरुप-
रपराप्राप्तषड्दर्शनस्थापनाचार्यव्याख्यानसिव्हासनाधी-
श्वरसकलवेदार्थप्रकाशकसाख्यत्रयीप्रतिपालकसकलनिग-
मागमसारहृदयवैदिक्रमार्गप्रवर्त्तकसर्वतत्रस्वतत्रादिराजधा-
नीश्रीविद्यानगरमहाराजधानिकर्नाटकसिव्हासनप्रतिप्ठाप-
नाचार्यश्रीमद्राजाधिराजगुरुभूमडलाचार्यतुगभद्रातीरनिवा-
सऋष्यश्रुगपुरवराधीश्वरश्रुगेरीश्रीविरूपाक्षश्रीविद्याशकरदे-
वदिव्यश्रीपादपद्माराधकश्रीमदभिनवशकरभारतीस्वामिक-
रकमलसजातश्रीमदभिनवोद्दडनरसिहभारतीस्वामिभि
अस्मदत्यप्रियेशिष्य अशेषवैदिकब्राह्मणसभामडळी व ग्रहस्थ ब्राह्मणसमुदाय वास्तव्य कराड यासी कृतानेकअसिर्वचनपूर्वक नारायणस्मरणपत्रिका विरोधीनामसवत्सर कार्तिकशु॥ ७ पावे तो मु।। कासिगाव येथे श्रीपूजातत्परत्वे कडोन आनदनिर्भरित असो साप्रत इकडून तुमचे गावास दिग्विजये करून तुह्या सर्वत्रास श्रीसदर्शनलाभ देऊन पुढे विजय करावे असे इछेने पूर्वसूचनार्थ श्रीमुख व फळमत्राक्षता देऊन पा। आहे सुसमई स्वीकार करून श्रीपूजनी तत्पर असावे उर्वरिता।भिप्राय आलेले मठीय ब्राह्मण सागता कळेल ये विसी मुख्य सिष्यगणा प्रती विशेष लिहिणे काय असे महानुशासन वरीवर्ति