Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २०२
१२७२ मार्गशीर्षवद्य ३
श्रीशंकर
।। श्री ।।
श्रीमच्छकराचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्याशकरभारतीस्वा-
मिकरकजोद्भवश्रीविद्यानरसिहभारतीस्वामिकृतनारायणस्मर-
णानि
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री रामकृष्ण दीक्षीत गिजरे वा। क्षेत्र- करहाटक परमशिष्योत्तम यासी विशेषस्तु तुमचे कल्याण इच्छीत श्रीनिकट असो अत्रत्य कुशल जाणोन स्वकीयलेखनी मानस सतोषवीत असिले पाहिजे तदनतर तुह्मी विनतिपत्र पाठविले ते पावले त्यात ऐवजा विशीचे लिहिले ऐसियासि तुमचा ऐवज मुदतीत पाठवावयाचा परतु सस्थानी स्वारीचे येणे होऊन प्रस्तुत गोमातकप्राती जाणेचे ठरोन निघणेची तयारी चालली आहे त्याज मुळे पाठविला नाही गोमातकाहून येता च दोन महिन्यात ऐवज येऊन पोहोचेल तुमच्या ऐवजा विषयीची काळजी रात्रदिवस आहे निरतर विनतिपत्रिका प्रेषून सस्थानदेवतेच्या परामृषास अविस्तरता असावी विशेष लिहिणे ते काय शक १७७२ साधारणनामसवत्सरे मार्गशीर्षवा। २ महानुशासन वरीवर्ति
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २०१
१७७२ आश्विनवद्य ३
श्रीशंकर
श्रीमच्छकराचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्याशकरभारती-
स्वामिकरकजोद्भवश्रीविद्यानरसिव्हभारतीस्वामिकृतनारायणस्मरणानि
श्रीगुरुभक्तिपरायण राजमान्य राजश्री नारायणराव दाजी देशपाडे रा। कोळेवाडी परमसिष्योत्तम यासी विशेषस्तु तुमचे कल्याण इच्छित श्रीनिकट असो अत्रत्य कुशल जाणोन स्वकीय लेखनी मानस सतोषवीत असिले पाहिजे तदनतर सस्थानदेवतेची स्वारी करहाटक मुकामी सचारउदेशे आगमन जाहले होते त्यावेळे तुह्माकडील पूजाद्रव्याचा ऐवज सस्थानी पावला नाही याज वरून हे आज्ञापत्र तुह्यास लिहिले आहे तरी वो।सपन्न राजश्री रामकृष्ण दिक्षीत गिजरे कराडकर याज कडे ऐवज देऊन पावती घ्यावी तुह्मी सस्थानचे पूर्ण साभिमानी तेथे विस्तारे लिहावे असे नाही विशेष लि॥ ते काय शके १७७२ साधारणनाम सवत्सरे अश्वीनवा । ३ तृतीया महानुशासन वरीवर्ति
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २००
१७७२ आश्विनवद्य ३
श्रीशंकर
श्रीमच्छकराचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्याशकरभारती-
स्वामिकरकजोद्भवश्रीविद्यानरसिव्हभारतीस्वामिकृतनारायणस्मरणनि
श्रीगुरुभक्तिपरायण राजमान्य राजश्री आनदराव दाजी देशपाडे वास्तव्य कोळेवाडी परमसिष्योत्तम यासी विशेषस्तु तुमचे कल्याण इच्छित श्रीनिकट असो अत्रत्य कुशल जाणोन स्वकीय लेखनी मानस सतोषवित असिले पाहिजे तदनतर सस्थानदेवतेची स्वारी करहाटक मुकामी सच्यारउदेशे आगमन झाले होते त्या वेळी तुह्या कडील पूजाद्रव्याचा ऐवज सस्थानी पावला नाही याज वरून हे आज्ञापत्र लिहिले असे तरी सदरहू पूजाद्रव्याचा ऐवज वो।सपन्न राजश्री रामकृष्ण दीक्षित कराडकर याज कडे देऊन पावती घ्यावी निरतर विनतिपत्रिका प्रेषून सस्थानदेवतेचे परामृषास अविस्मरता असावी विशेष लिहिणे ते काय शके १७७२ साधारणनामसवत्सरे आश्विनवद्य ३ महानुशासन वरीवर्ति
महिकावती (माहीम)ची बखर
सबब, त्यानें शका बरोबर संवताचा हि आंकडा आपल्या लिखाणांत नमूद करून ठेविला. परराज्य आलें म्हणजे सरकारी दिवाणांतून, कचे-यांतून, शाळांतून, जाहिरनाम्यांतून, वतनपत्रांतून, व सर्वत्र परकीय कालगणना व तिचा वर्ष, महिना, पक्ष, दिवस घटिका व पळें वगैरे तपशील सुद्धां येथून तेथून परकीय होऊन जातो व राष्ट्रांतील शेंकडा साडेनव्याण्णव जे पोटभरु लोक त्यांच्या डोक्यांत तो परकीय तपशील दोन तीन पिढ्यांत बेमालूम भिनून जातो आणि स्वकीय कालगणनेचा तपशील दैवदुर्विलसितानें परकीय वाटूं लागतो. परकीय कालगणनेच्या विषानें भारून गेलेल्या लोकांस विषमुक्त करण्याची हांव धरणा-या केशवाचार्या सारख्या विद्वानास व नायकोरावा सारख्या क्षत्रियास हि ह्या पोटभरूंच्या पंक्तीस, मनांत नसतां, बसावें लागून, परकीय संवताचा प्रथम उच्चार करावयास लागला आणि नंतर स्वकीय शकाचा दुय्यम दर्जानें उल्लेख करण्यांत समाधान मानावें लागलें. कालगणना अशा या दोन त-हांनीं करणें भाग पडल्या मुळें, संवत्सराचें नांव नमूद करणें सहज च, अशक्य जरी नव्हे तरी, श्रमाचें बनून गेलें. शकवर्षाचे संवत्सरनाम निराळें आणि विक्रमसंवताचें संवत्सरनाम निराळें. अश्या द्वैधीभावांत संवत्सरनाम मुदलांत च वगळून टाकण्याचा मार्ग बखरकारांना स्वल्पिष्ट श्रमाचा दिसला. संवत्सरनामाची ही जशी अडचण आली तशी अडचण तपशिलाच्या इतर कोणत्या हि बाबी संबंधानें आली नाहीं. शकगणनेंत व संवत्सरगणनेंत पक्षगणनेच्या बाबींत किंचित् वांधा यावयाचा आणि तो वद्यपक्षा संबंधानें यावयाचा. शकवर्षाच्या वर्तमानमहिन्याचा जो वद्य व दुसरा पक्ष तो विक्रमसंवताच्या आगमिष्यमाण महिन्याचा प्रथम पक्ष असतो. करतां, संवत् व शक ह्यांच्या आंकड्या बरोबर जर महिना आणि वद्यपक्ष दिला असेल, तर तो महिना व पक्ष शालिवाहनशकाचा कीं विक्रमसंवताचा तें गणित केल्याशिवाय ओळखतां येणें सुलभ नाहीं. प्रस्तुत बखरींत शालिवाहनशक व विक्रमसंवत् ह्यांचे आंकडे दिले असून, हा महिन्याचा वांधा अनुभवगोचर झाला नाहीं. त्याचें कारण असें आहे कीं, प्रस्तुत बखरींतील कालगणनेच्या तपशिलांत कर्मधर्मसंयोगानें वद्यपक्षांतील तीथ एक सुद्धां आलेली नाहीं. आली असती तर संशोधकदृष्टीनें बरें होते; मित्त्या तपासून घेण्याला वर्षांक, महिना, तीथ व वार या चार बाबींच्या जोडीला आणीक एक पांचवी बाब जास्त मिळाली असती व तपासणीची उतरणी जास्त सूक्ष्म झाली असती. शालिवाहनशक व विक्रमसंवत् ह्या दोन कालगणने प्रमाणें इसवीसनाचा --ज्याला बखरकार फिरंगी शक म्हणतो--हि उद्धार प्रस्तुत बखरींत, तत्कालीं त्या प्रांतांत फिरंग्यांचा अंमल असल्या मुळें, झाला आहे. शालिवाहनशक, विक्रमसंवत् व इसवसिन ह्यांचा उल्लेख ज्या प्रमाणें त्या त्या अमलाला अनुलक्षून ह्या बखरींत झालेला सांपडतो, त्या प्रमाणें--सकृद्दर्शनी आश्चर्याची गोष्ट वाटेल--मुसलमानी अंमल उत्तर कोकणांत तीन साडेतीन शें वर्षे चालल्या सारखा भासत असून हि हिजरीसनाचा किंवा फसलीचा आंकडा ह्या बखरींत एकदा देखील दिलेला नाहीं. हिजरीसन किंवा फसलीसन किंवा कोणता हि मुसलमानी सन न उद्धरण्याचीं कारणें चार संभवतात. एक कारण असें कीं उत्तर कोंकणांत मुसलमानी अंमल जितका स्थिर होऊन लोकांच्या संवयीचा व्हावा तितका कधीं च झाला नाहीं. दुसरें कारण असें कीं कोंकणच्या डोंगरी व रानवट झाडींतील रानटी प्रजेला मुसलमानी अंमलाचा स्पर्श बहुतेक न झाल्यासारखा होता. तिसरें कारण असें कीं केशवाचार्य, नायकोराव वगैरे मंडळीस म्लेच्छार्णवाचा मना पासून द्वेष वाटत होता. आणि चवथें व शेवटचें कारण असें कीं शक १४२२ च्या पश्चात् पोर्तुगीजांच्या हालचालीं पुढें मुसलमानांचें तेज ह्या प्रांतांत फारसें टिकलें नाहीं. अश्या ह्या चार कारणांचा समवाय होऊन, मुसलमानांच्या कालगणने कडे केशवाचार्यादि मंडळीनें अगदीं च दुर्लक्ष्य केलें. उत्तरकोंकणांत गांवगन्ना जर हिजरीसनाची किंवा फसलीची ओळख वरघाटच्या देशांतल्या प्रमाणें दाट असती, तर हे बखरकार हिजरीसनानें किंवा फसलीसनानें वाचकांचे कालज्ञान सवकारित्या वांचून सहसा रहाते ना, तेव्हां हें च खरें कीं मुसलमानी अमलाची पक्की मगरमिठी उत्तरकोंकणांतील झाडीला व रानांना जशी बसावी तशी बसली नव्हती. तशांत केशवाचार्यांदिकांचा म्लेच्छद्वेष तर अत्यन्त जाल्वल्य. सबब, प्रस्तुत बखरींत मुसलमानी कालगणनेचा उल्लेख हि नसावा हें युक्त च आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
मंगळवेढे
लेखांक २६७ १५९२ ज्येष्ट
अज दिवाण ठाणा पा। मंगळवेढा साहेब सदर
दर्या बो। राया बिन माहल नाईक मेटकरी पा। मजकूर सु॥ सन इहिदे सबैन अलफ कारणे लिहून दिल्हा कबूलकतबा ऐसा जे साहेब मेटाचे इजारती बाबे हुकूम फर्माविला तरी पंढरपूर व तुळजापूर व बाजे देवस्थाने उठोन गेली सीवाजीचे धुंदलीखाले मार्ग खोळंबला याकरिता मेटाची हासील कुली बुजून गेला आपणाच्याने खोती बिलकुल करवत नाही ह्मणौउनु मालूम केले तरी देसाईयानि पा। मा।र साहेबाचे बादगीस अर्ज करून सालमजकुराकारणे मेटाची हजारती होनु ३०॥. बाद तश्रीफ मुजत होनु .॥. बाकी होनु ३० आपुले सिरी ठेविले ते आपण कबूल असो इ॥ अवल साल ता। अखेर साल निर्या करून देईन हा कबवा सही
छ माहे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १९९
१७७२ आश्विनवद्य ३
श्रीमत्छकराचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्याशकरभरती-
स्वामिकरकजोद्भवश्रीविद्यानरसिहभारतीस्वामिकृतनारायणस्मरणनि
श्रीगुरुभक्तिपरायण राजमान्य राजश्री नरसिगराव सदासीव व कृष्णराव सिवराम देशपाडे ता। कोले परम सिष्योत्तम यासी विशेषस्तु तुमचे कल्याण इच्छीत श्रीनिकट असो अत्रत्य कुशल जाणोन स्वकीय लेखनी मानस सतोषवीत असिले पाहिजे तदनतर सस्थानदेवतेची स्वारी क्षेत्रकरहाटकास आगमन जाहले समई तुह्मा कडील पूज्याद्रव्य आले नाही जाणोन हे आज्ञापत्र लिहिले असे तरी वो। सपन्न राजश्री रामकृष्ण दिक्षीत गिजरे याज कडे सदरहू पुज्याद्रव्याचा ऐवज देऊन पावती घ्यावी निरतर विनतीपत्रिका प्रेषून सस्थानदेवतेच्या परामृषास अविस्मरता असावी विशेष लि।। ते काय शके १७७२ साधारणनामसवछरे आश्विनवा। ३ त्रितिया महानुशासन वरीवर्ति
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १९८
१७७२ भाद्रपदवद्य ५
श्रीशंकर
।।श्री।।
अनेकशक्ति सघट्टप्रकाशल हरीघन ध्वातध्व सो विजयते विद्याशकरभारती ।। श्रीमच्छकराचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्याशाकरभारती-
स्वामिकरकजोद्भवश्रीविद्यानरसिहभारतीस्वामिकृतनारायणस्मरणनि वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृद व जोतिषी व राजकीय ग्रहस्त व देशमुखदेशपाडे पाटीलकुलकर्णी वा। रिसवड यासि विशेषस्तु शके १७७२ साधारणनामसवत्सरे गणेशपत कुलकर्णी वा। मजकूर यानी पूज्याद्रव्याचा ठराव करून घेतला असून ठरावा प्रमाणे रुपये दिल्हे नाहीत जाणोन त्यास निग्रह ठेवणेची आज्ञा होऊन हे आज्ञापत्र सादर जाहले असे तरी सदर कुलकर्णी हुजूर येऊन पूज्याद्रव्याचा ठराव करून घेतले प्रो। रुपये देऊन सुध्धपत्र घेऊन येई तावत्कालपर्यत त्याचे घरी व पक्तीस अन्नोदकवेव्हार कोणी करू नये विशेष लि॥ ते काय भाद्रपदवा। ५ महानुशासन वरीवर्ति
बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १९७
१७७२ भाद्रपद शुद्ध १०
श्रीशंकर
श्रीमच्छकराचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्याशकरभारती-
स्वामिकरकजोद्भवश्रीविद्यानरसिहभारतीस्वामिकृतनारायणस्मरणानि
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृद व जोतिषी व राजकीय ग्रहस्त व पाटीलकुलकर्णी वा। कालगाव तर्फ कोळे यासि विशेषस्तु शके १७७२ साधारणनामसवत्सरे सस्थानदेवतेच्या स्वारीचे निघणे मठकरवीराहून सचारउद्देशे होऊन च्यातुर्मास्या करिता करहाटकक्षेत्री राहणे जाहले कारण येथील मुकामी श्रीकोटिलिगानुष्ठान श्रावणशु॥ १ पासून वा। ३० पर्यंत जाहाले त्याचे खर्चा बद्दल तुह्मा कडून पूजाद्रव्याचा ऐवज आणविला असे तरी सर्वा कडील पूजाद्रव्य एकत्र करून सस्थान नि।। कारकून याचे पदरी घालून पावती घ्यावी ह्मणजे तुमच्या कल्याणाची उत्तरोत्तर अभिवृद्धी होईल विशेष लि॥
ते काय भाद्रपदशु।। १० महानुशासन वरीवर्ति
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १९६
१७७२ भाद्रपद शु॥ ७
श्रीशंकर
श्रीमच्छकराचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्याश्करभरती
स्वामिकरकजोद्भवश्रीविद्यानरसिहभारतीस्वामिकृतनारायणस्मरणनि
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृद व जोतिषी व राजकीयग्रहस्त व देशमुखदेशपाडे पाटीलकुलकर्णी वा। मौजे काले यासि विशेषस्तु शके १७७२ साधारणनामसवत्सरे मौजे मा।र येथील असाम्या खाली लिहिल्या प्रमाणे
१ गणेश विठल कुलकर्णी १ बच्याजीपत
१ नाना रुद्र कुलकर्णी १ बाबाजी पेढरकर
१ हरि बहिरव कुलकर्णी १ सदू गोवर्धन
१ भाऊ गणेश जोशी १ गोपालपत
१ अताजी अण्णाजी कुलकर्णी १ कृष्णाजीपत गाडगीळ
--- ----
५ ५
एकूण दाहा असामी याज कडे पूजाद्रव्य येणे असून त्याचे वसुला करिता कारकून पाठविला असता पूजाद्रव्य न देता सस्थानाशी दाडगावा केला ह्मणोन निवेदनात आले जाणोन सदरहू दाहा असामीस निग्रह ठेवणेची आज्ञा होऊन हे आज्ञापत्र सादर जाहाले असे तरी त्याणी हुजूर येऊन आपले कडील मा।राची विनति करून तीर्थप्रसाद घेऊन शुद्धपत्र घेऊन येई तावत्काल पावे तो त्याचे ह्मणजे दाहा असामीचे घरी व पक्तीस अन्नोदकवेव्हार न कर्णे आज्ञा असे विशेष लि।। ते काय भाद्रपद शुद्ध ७ महानुशासन वरीवर्ति
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १९५
१७७२ श्रावणवद्य ८
श्री
ही अर्जी बिन नावाची सबब परत पाठविली असे तारिख ४ माहे सपटेबर सन १८५० इसवी
(इग्रजी सही)
Sccretary to Govt
यादी समस्त ब्रह्मवृद क्षेत्रकरहाटक सु॥ इहिदे खमसैन मया तैन व अलफ आमचा सर्व हिदू लोकाचा जगद्गुरुस्वामि मठ करवीर याची स्वारी क्षेत्र मजकुरी येऊन राहिली आहे त्याचा धर्म आषाढ शु॥ १५ पासोन भाद्रपद शुद्ध पौर्णिमे पावे तो येका स्थली राहावयाचे सीमाउलघन करावयाचे नाही व श्रावणमासी येक महिना भर श्री कोटी लिगा वगैरे अनुप्ठानास ब्राह्मण लाविले आहेत आणि दररोज पाचपाच सेहे ब्राह्मण भोजन होत असते त्याचे आह्मी सर्व हिंदू लोक सिष्य सबब आह्मा पासून आमचे सतोषाने गुरुदक्षिणा घेतात कोणा वरी जुलूम जाजती करीत नाहीत असे असता मेहेरबान कमीशनर साहेब इलाखा सातारा याणी स्वामीनी सातारे इलाखेत येऊ नये व कराडात राहणेचे कारण नाही बेताबाचे पत्र पाठविले व स्वामीस घालऊन द्यावे ह्मणोन मामलेदार यासी हुकूम पाठविला त्याज वर श्रीस्वामी हुकूमा प्रमाणे जावयाचे परतु भाद्रपद शु।। १५ पर्यत सीमा उलघन करावयाची नाही असा अनादि सिद्ध धर्म आहे व स्वामी कोणा वर जुलूम जाजती हि करीत नाहीत पौर्णिमा झाल्या वर निघून जाऊ असे पत्री श्रीस्वामीनी साहेबास लिहिले असता ते न मानिता स्वामीनी राहू नये राहिल्यास जितके दिवस राहतील तितके दिवस दररोज दाहा रुपये प्रमाणे दड घ्यावा असा हुकूम मामलेदार यास पाठविला त्याज वरून मामलेदार याज कडून निघण्या विषयी व राहतील तितके दिवस दाहा रुपये प्रमाणे दडा विसी सक्त तगादा आहे त्याज वरून अर्ज करीत आहो तरी खुदावताचे राज्यात कोणाचे धर्मास विरुद्ध आजी पर्यत नाही ज्याचा जसा धर्म असेल तसा चालविणे विसी खुदावताचा अभिमान पुरा आहे आणि हे तरी जगद्गुरु आमचे सर्व हिदू लोकाचे ते आमचे गावी येऊन राहिल्याने आह्मास मोठा सतोष जाहला आहे आह्मा वर जुलूम जाजती काही नाही असे असून कमीशनरसाहेब यानी श्रीस्वामीचे बेताबेचे पत्र लिहून निघून जाणे विसी मामलेदार याज कडून सक्ती चालविली आहे ती न होता व दड न घेता स्वामी राहतील त्यास हरकत न व्हावी असा साहेबानी आम्हा वर मेहेरबानी करून जरूर हुकूम जाहला पाहिजे तारीख २१ माहे शवाल श्रावणमास शके १७७२ साधारणनाम सवत्सरे सन १८५० इसवी ता. २९ माहे आगष्ट