लेखाक १७४
श्रीविद्याशकर
आर्यस्वामी
श्रीमत्परमहसादियथोक्तबिरुदाकितश्रृगेरीसिव्हासनाधी
श्वरश्रीमत्त्छकराचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्यानरसिहभार
तीस्वामिकृतनारायणस्मरणानि
स्वस्ति श्रीमच्छकलगुणालकरण हरिगुरुभक्तिपरायण राजमान्य राजश्री कृष्णाजी विठ्ठल सुभेदार व समस्त ग्रहस्त व देशपाडे या प्रति विशेषस्तु तुमचे कल्याण इच्छित करवीरक्षेत्री छ्यात्रसभासमवेत श्रीनिकट राहिलो असो तदनतर अत्रत्य कुशल जाणोन स्वकीय सुखानुभव लेखनद्वारा चित्त प्रमोदवीत असिले पाहिजे या नतर साप्रत पुष्यशुध नवमीस श्रीची पुण्यतिथी ब्राह्मणसतर्पण उच्छव आहे या करिता आसीर्वादपत्र प्रेसिले असे तरी आपण सहसमुदाय येऊन मोहत्छव साग सपादिला पाहिजे उत्छव आपला आहे येतदविषयी अनमान न करणे सुज्ञा प्रति बहुत काय लिहिणे -
