लेखाक १७६
श्रीशंकर
श्रीमत्छकराचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्यानरसिहभारती
स्वामिकृतनारायणस्मरणानि
सकलगुणालकरण हरिगुरुभक्तिपरायण राजमान्य राजश्री नारायणभट गिजरे यासी विशेषस्तु तुमचे कल्याण इछित करवीरक्षेत्री छ्यात्रसभासमवेत श्रीनिकट राहिलो असो तदनतर येथील कुशल जाणोन आपले कल्याण लिहून आशिर्वाद सपादित जाणे या नतर यदा आपले क्षेत्री दोनी मास चातुर्मास क्रमोन पुढे सचारास जावे हा हेतु चित्तात आणोन समस्तास व आपणास आशिर्वादपत्र पाठविले आहे स्थल राहाया पाहिजे या करिता स्थलाची अनकूलता करून ठेविले पाहिजे वरकड साहित्य तुमचे विचारे होणे ते होईल परतु आपणास पुर्वसूचने स्तव लिहिले असे दोनी मास कृष्णास्नान चातुर्मास अनुष्ठान क्षेत्री जाहलिया श्रेयस्कर असे हे गोष्टीचे अगत्य आपणास आहे च बहुत काय लिहिणे वरकड अर्थ रा। भगवंत सिवदेव मुग्तां सागता कळेल बहुत काय लिहिणे
