Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

लेखाक १७०

श्रीशंकर

श्रीमत्छकराचार्यान्वयसज्याताभिनवश्रीविद्यानरसिव्हभारती-
स्वामिकरकज्योद्भवश्रीविद्याशकरभारतीस्वामिकृतनारायण-
स्मरणानि

अनेकशक्ति सघट्टप्रकाशलह रीघन ध्वातध्व सो विजयते विद्याशकर भारती ।।
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृद वो। क्षेत्रकरहाटक भक्तोत्तम या प्रती विशेषस्तु तुमचे कल्याण इछीत करवीरक्षेत्री श्रीनिकट असो अत्रत्य कुशल जाणून स्वकीये लेखन करीत असीले पाहिजे, या नंतर श्रीकृष्णातीरी सीरगावी वैशाख वद्य नवमीस श्री आार्य याची पुण्यतिथी ब्राह्मणसतर्पण वार्षीकी उत्सव आहे तुह्मी सर्वत्राही येऊन महोत्साव साग सपादिला पाहिजे ये विसी आनमान न करावा आगत्यरूप आले पाहिजे बहुत काय लिहिणे आज्ञेयमुल्लसति

भोर-सांगवी-निंबकर

लेखांक २६४                                                                      श्री                                                         १६३९ कार्तिक शुध्द १                                                                                                          

श्री हरिभक्तपरायण राजश्री नरहरी गोसावी निंबकर वास्तव्य किले विचित्रगड गो। यांसि

सेवक मुदगल भट पंडितराय नमस्कार सुहूर सन समान अशर मया अलफ तुह्मी राजश्री            स्वामीस व राज्यास कल्याण इछून ईश्वरभजन करीत आहा याकरिता तुमचा योगक्षेम चालवणे राजश्री स्वामीस अगत्य यास्तव तुह्मास नूतन इनाम तर्फ उतरोली ता। रोहिडखोरे सुभा प्रा। मावळ येथे पडजमीन बिघे 305२० मौजे कानवडी बिघे 305१० व मौजे पळसोसी बिघे 305१० एकूण वीस बिघे पडजमीन खालिसा दिल्ही असे एविशी माहालास आलाहिदा पत्रे सादर असे पुत्रपौत्र वंशपरंपरेने चालेल तुह्मी स्नानसंध्या करून कल्याण इछून सुखरूप राहाणे छ २९ जिलकाद हे विनंती

                                                                                                              264

 

लेखांक १६९

श्रीमत्छकराचार्यान्वयसज्याताभिनवश्रीविद्यानरसिव्हभारती-
स्वामिकरकज्योद्भवश्रीविद्याशकरभारतीस्वामिकृतनारायण-
स्मरणानि
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृद वास्तव्य क्षेत्रकरहाटक या प्रती विशेषस्तु अत्रत्य कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत असावे या नतर पौष्य सीत नवमीस श्रीची पुण्यतिथी उत्सव आहे तरी तुह्मी समस्ताही येऊन महोत्सव साग सपादिला पाहिजे ये विसी अनमान न करावा अगत्यरूप आले पाहिजे बहुत काय लिहिणे आज्ञयेमुल्लसति

लेखाक १६८

श्रीविद्याशकर
श्रीमतत्परमहसादियथोक्तबिरुदाकितश्रृगेरीसिहासनाधीस्वर
श्रीमत्छकराच्यार्यान्वयश्रीविद्यानरसिहभारतीस्वामिकरकमल
सजाताभिनवश्रीविद्याशकरभारतीस्वामिकृतनारायण्स्मरणानि

सकलगुणालकरण हरिभक्तिपरायण राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृद व जोतिषी व उपाध्ये व समस्त गृहस्त वास्तव्य क्षेत्रक-हाटक भक्तोत्तम या प्रति विशेषस्तु तुमचे कल्याण ईच्छित करवीरक्षेत्रीं श्रीनिकट राहिलो असो तदनतर साप्रत पुष्यशुद्ध नवमीस श्रीची पुण्यतिथी आहे या करीता लिहिले असे तरी आपण ब्राह्मणसमुदायसहित येऊन मोहत्छाव साग केला पाहिजे ये विषयी अनुमान न करणे सुज्ञा प्रति विशेष काय लिहिणे

शक १०६० त १३५ मिळविले म्हणजे संवत् ११९५ आले पाहिजेत, संवत् ११२५ येणार नाहींत, हें वालजी पाटलाला कळलें नसतें इतका तो मूढ होता असें म्हणवत नाहीं. त्याचा दोष एवढा च कीं आपण जो मजकूर नकलीत आहों त्यांत विसंगतपणा कोठें आहे की काय तें पाहून नक्क्ल करण्याचा अभ्यास त्याला नव्हता. नकलेची नक्कल-शब्दाला शब्द व अक्षराला अक्षर-बिनचुक केली म्हणजे आपलें काम यथाशास्त्र झालें, अशी वालजीची समजूत होती. त्या समजुतीला अनुसरून शक १०६० च्या आंकड्या बरोबर संवत् ११२५ चा आंकडा वालजीनें जसा चा तसा उतरून घेतला. पृष्ट ४१ वरील संवत् १२२८ चा आंकडा हि वालजीनें असा च भोळ्या भावानें जसा चा तसा उतरून घेतला व शालिवाहनशक ११६३ हा हि आंकडा जसा चा तसा संवत् १२२८ खालीं नकल करून ठेविला. शक ११६३ त १३५ मिळविले म्हणजे संवत् १२९८ येतात, ही साधी बाब त्यानें पडताळून पाहिली नाहीं. वालजीच्या व वालजीनें ज्या नकले वरून आपली नकल केली त्या नकलेच्या कर्त्याच्या ह्या दोन साध्या चुक्या इतक्या आश्चर्यकारक नाहींत. पृष्ट ६६ त खालून ६ व्या ओळींत तर वालजीनें व वालजीनें ज्या नकले वरून आपली नक्कल केली त्या नकलेच्या लेखकानें एक फार च घबाड चूकी नकलून ठेविली आहे. बिंबदेव कोंकणांत संवत् ११३५ त उतरला, हें वाक्य वालजीनें व त्याच्या पूर्वीच्या नकलकारानें बिनतक्रार, बिनसंशय व बिनतपास सबंद चें सबंद स्वीकारून, हलगर्जीपणाचा केवळ कळस करून टाकला. चुकीचा कां होई ना, पृष्ट ३२ वर बिंबदेवाचा कोंकणांत उतरण्याचा संवत् ११२५ वालजीनें स्वतः लिहिला आहे. तो च काल पृष्ट ६६ वर संवत् ११३५ म्हणून नकलतांना वालजीला जरा संशय यावयाला हवा होता. परंतु, चुकीचें हें हि घोडें वालजीनें, फाल्गुनांतील गाठीच्या गोड पदका प्रमाणें, सबंद चें सबंद मटकावून पचनीं पाडलें ! एवढ्यावर च वालजी थांबला नाहीं, पृष्ट ७० वर बिंबराजा अहिनळवाड्या हून कोंकणांत संवत् १२५ त आला, असें वालजीबोवांनी आपल्या नकलेंत सुंदर व स्वच्छ अक्षरांनीं साक्षेपानें लिहून ठेविलें आहे ! ! ! ११२५ ह्या संवताच्या आंकड्यांतील एकाच्या एका आंकड्यास वालजीबोवांनीं येथें लीलेनें काट दिला. तो काट प्रस्तुत छापील बखरींत लेखकाची नजरचूक म्हणून जसा चा तसा छापला नाहीं, दुरुस्त करून ११२५ असा पाठ छापला आहे. एवंच, ११९५ बद्दल ११२५, ११९५ बद्दल ११३५, १२९८ बद्दल १२२८ आणि ११२५ बद्दल १२५ असे अपपाठ वालजीच्या नकलेंत जे सांपडतात व जे सहज दुरुस्त होण्या सारखे होते त्यांचें पाप वालजीच्या, नाहीं तर वालजीच्या पूर्वीच्या नकलकाराच्या, माथ्या वर मारण्यास कोणती च हरकत दिसत नाहीं. सहज समजणारे हे दुरुस्त केलेले पाठ घेतले म्हणजे महिकावतीच्या ह्या बखरींत शकसंवताच्या आंकड्यां बद्दल कोणत्या हि प्रकारचा संशय घेण्यास फार च स्वल्प जागा रहात्ये.

६. सहज दुरुस्त होण्या सारख्या आंकड्याच्या वाचनाच्या ह्या चुक्या लक्ष्य देण्या सारख्या हि नाहींत असा पक्ष कोणी केल्यास, त्याला उत्तर एवढें च कीं चिकित्सेच्या चापांत मोठ्या बाबी जश्या पकडून रंधाव्या लागतात, त्या च प्रमाणें क्षुद्र बाबी हि कानसून झिलवल्या विना बिनपूस निसटूं जाऊं देतां येत नाहींत. नकलांच्या नकला होतांना ह्या बखरींत आंकड्यांच्या ढोबळ चुक्या झाल्या आहेत, हें निर्विवाद आहे. तसेंच, जुन्या भाषेंतील शक १३७० तील प्रत्ययांचीं रूपें हि नकलांच्या नकला होतांना ह्या बखरींत अर्वाचीनलेलीं आहेत, हें चौथ्या कलमांत दर्शविलें आहे व अर्वाचीनलेले प्रत्यय वगळून, शक १३७० तील भाषेचा कोणता अवशेष प्रस्तुत छापल्या गेलेल्या बखरींत कायम राहिला आहे त्याचा तपास करूं. सर्वत्र महिकावती प्रांतांत म्लेच्छार्णव झाला, अशी ओरड केशवाचार्यानें व नायकोरावानें स्वत:च केली असल्या मुळें, ह्या म्लेच्छाक्रान्त कोंकणप्रांतांतील मराठी भाषेंत कांहीं यावनी शब्द सांपडल्यास त्यानें अजाण वाचक हि बिचकून जाण्याचा संभव नाहीं,

लेखाक १६७

श्रीशंकर

श्रीमत्छकराचार्यान्वयसज्याताभिनवश्रीविद्यानरसिव्हभार
तीस्वामिकरकज्योद्भवश्रीविद्याशकभारतीस्वामिकृतनारायणस्मरणानि
हरीगुरुभक्तिपरायण राजश्री कासिनाथ गोसावी वास्तव्य क्षेत्रक-हाटक या प्रति विशेषस्तु अत्रत्य कुशल जाणून स्वकीय लिहीत असावे तद नंतर पौष्यशुक्ल नवमीस श्रीची पुण्यतिथी वार्षिकी उत्साह आहे तर आपण सहपरिवारे येऊन महोत्साह साग केला पाहिजे बहुत काय लिहिणे आज्ञेयमुल्लसति


लेखाक १६६

श्रीशंकर

श्रीमत्छकराचार्यान्वयसज्याताभिनवश्रीविद्यानरसिव्हभार
तीस्वामिकरकज्योद्भवश्रीविद्याशकभारतीस्वामिकृतनारा
यणस्मरणानि

वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री त्रबक दीक्षित वास्तव्य क्षेत्रकरहाटक या प्रति विशेषस्तु अत्रत्य कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित असावे या नतर पौष्यसित नवमीस श्रीची पुण्यतिथी उत्छव आहे तरी तुह्मी सहपरिवारे एऊन माहोत्छह साग केला पाहिजे ए विसी अनमान न करावा आगत्यरूप आले पाहिजे बहुत काय लिहिणे आज्ञेयमुल्लसति

लेखाक १६५
बाळबोध

श्रीविद्याशंकर

श्रीमत्परमहसादियथोक्तबिरुदाकितश्रृगेरीसिहासनाधीश्वर श्रीमत्छकराचार्यान्वयसजातअभिनवश्रीविद्यानृसिहभारती
स्वामिकरकजोद्भवश्रीविद्याशकरभारतीस्वामिकृतनारायण
स्मरणानि

स्वस्ति श्रीमत्यजनादिषट्कर्मानिरत वेदमूर्ति राजश्री समस्त ब्रह्मवृद व दिक्षित व नारायणभट्ट दिक्षित वास्तव्य क्षेत्रकराटक या प्रति विशेषस्तु तुमचे निरोप घेउन मठास आलो निरतर स्वकिय कुशळपत्र पाठउन मानस तोषवित असावे तदुपरि मसुरकरानि पुजाद्रव्याचे सकल्प तुमच्या विदमाने केले आहे तरि त्यास तुह्मि लेहुन पुजाद्रव्य आणउन अताजि शिवदेव या समवेत पाठवणे या विशई आलष्य न करणे वरकड अर्थ याचे वाग्विलासे कळल बहुत लिहिणे नलगे तुमचे क्षेत्रि काय उरवरित असेल ते हि या पासि देउन पाठवणे

लेखाक १६४

श्रीशंकर


श्रीविद्याशकरभारतीस्वामिकृतनारायणस्मरणानि
राजमान्य राजेश्री सिताराम वेकाजी चिपडे वो। क्षेत्रक-हाड भक्तोत्तम या प्रती विशेषस्तु अत्रत्य कुशल जाणून स्वकीय लिहित असले पाहिजे या नतर तुह्मी विनतिपत्र पाठविले ते आले क्षेत्रमजकूरकर समस्त ब्रह्मवृदासी पूजाद्रव्य रुपये पावणाशे हे घेऊन तुह्या कडे आले आहेत यास काये आज्ञा ह्मणून पत्री लिहिले अशास सस्थानचे आगमन क्षेत्रमजकुरास होऊन आजी येकोणीस दिवस जाहले परतु क्षेत्रस्तास येणेस गाठ न पडली आणि मनस्वी वर्तणूक करून सस्थानासी अमर्यादा करावी असे त्यानी आरभिले आहे तरी या गोष्टीचा विचार करून पुजाद्रव्य घेता येईल प्रस्तुत तुह्या कडे आणिले आहेत न घेणे त्यास सस्थानसबधी कसाले प्रतीवर्षी पडू लागले तेव्हा त्याणी कोठवर सोसावे काही स्वास्ता आथवा कार्यप्रयोजन क्षेत्रात होत असावी तो हि प्रकार नाही दिवसेदिवस ब्राह्मणास काल कठीण चालला आहे याज करिता त्यास हरयेक विसी अनुकूलता न पडली ईश्वरइछानुरूप काल सानकूल होईल त्या समई ते घर प्रती मठास आणून देतील सदरहू प्रो। येवज न घेणे बहुत काय लिहिणे रा। छ २१ माहे शाबान आज्ञेयमुल्लसति

लेखाक १६३

श्रीशंकर

आर्यस्वामी
श्रीमत्परमहसादियथोक्तबिरुदाकितश्रृगेरीसिहासनाधीश्वर श्रीमत्छकराचार्यान्वयसजातअभिनवश्रीविद्यानरसिव्हभारतीस्वामिकृतनारायणस्मरणानि

सकलगुणालकरण हरिगुरुभक्तिपरायण राजमान्य राजेश्री समस्त ब्रह्मवृद व ज्योतिषी ऊपाधे व देशपाडे व समस्त गृहस्त वास्तव्य क्षेत्र- क-हाटक परमभक्तोत्तम या प्रति विशेषस्तु तुमचे कल्याण ईछीत करवीरक्षेत्री छात्रसभासमवेत श्रीनिकट राहिलो असो तदनतर येथील कुशल जाणून आपले क्षेमकल्याण लिहून आशिर्वाद सपादित असणे या नतर साप्रत पुष्यशुद्ध नवमीस श्री ची पुण्यतिथी आहे तरी आपण समुदायसहवर्तमान येऊन मोहोत्छाव साग सपादून गेले पाहिजे हे विषई अनमान न कीजे सुज्ञा प्रती विशेष काय लिहीणे जाणिजे