Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १५५
श्रीशंकर
आर्यस्वामी
श्रीमत्छकराचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्यानरसिहभारती
स्वामिकृतनारायणस्मरणानिवेदमूर्ती राजश्री नारायणभट गिजरे भक्तोत्तम या प्रति विशेषस्तु तुमचे कल्याण इच्छित असो तदनतर सप्तरुषी हून आपणास इनामतीचे लावणी विशई पत्र लिहिले होते पावले असेल पहिला वाटेकरी मृत्यु पावला हाली सभ्यसा वाटेकरी मिळऊन भुमीची लावणी करवणे ह्मणोन लिहिले होते त्या वर काही वर्तमान कळले नाही प्रस्तुत लावणी जाहली किंवा काय सविस्तर लिहिणे लावणी विषई आळस न करणे साप्रत पुष्य शुद्ध नवमीस श्री ची पुण्यतिथी आहे तरी समुदायसहित येऊन मोहत्छव साग सपादिला पाहिजे सुज्ञा प्रति विशेष लिहिणे नलगे सिके बदल कागद घेतला होता त्यास अद्याप सिका जाहला किंवा नाही हे कळले नाही अगर आह्मास प्रविष्ट हि जाहला नाही दानपत्रास सिका जाहला असिला तरी समागमे घेऊन येणे जाणिजे
महिकावती (माहीम)ची बखर
४ प्रकरण दुसरें व तिसरं हीं मूलत: शक १३७० त रचिलीं गेल्या मुळें, त्यांची भाषा मुळांत चोंभा कवीच्या भाषे हून किंचित् अर्वाचीन असणार हें उघड आहे. प्रकरण पांचवें व साहावें हीं अनुक्रमें शक १४६० व शक १४०० तील असल्या मुळें त्यांची भाषा मूळांत बहिरा जातवेदाच्या भाषे सारखी असली पाहिजे. आणि प्रकरण पहिलें व प्रकरण चौथें हीं दोन प्रकरणें शक १५०० च्या सुमारचीं असल्या कारणानें, त्यांची भाषा मूलतः एकनाथी भाषे सारखी असेल, हें सांगणें नलगे. प्रस्तुत छापील ग्रंथाची भाषा पहातां ती शके १३७० तील किंवा शक १४०० तील किंवा शक १५४० तील हि असलेली दिसत नाहीं. प्रत्यय, विभक्तिरूपें व क्रियापदरूपें बहूतेक बरीं च अर्वाचीनलेली सर्वत्र दिसतात. हा फरक नकलकारांनीं केला, हें जुन्या मराठी लेखाच्या अभ्यासकांना सांगण्याचे कारण नाहीं. नकलकाराचा धंदा करणारे प्रायः भाषेचे शास्त्रीय अभ्यासक नसतात. तेव्हां, जुनी भाषा जशी ची तशी राखण्या कडे त्यांचे लक्ष्य नसते. त्यांचें एक च एक लक्ष्य फक्त मजकुरा कडे असतें. मजकुराची जुनी भाषा डोळ्यांनीं पहावयाची व तिचा उच्चार स्वकालीन भाषे प्रमाणें तोंडातल्या तोंडांत जिभेनें करून ती नकळत झालेली अर्वाचीन भाषा हातानें लिहावयाची, हा परिपाठ महाराष्ट्रांतील नकलकारांचा सर्वत्र दृष्टीस पडतो. जुने लेख अनेक शतकांनीं नकल करतांना नकलकार मूळ भाषेंत नकळत फेरफार करतात, ह्यांत विशेष आश्चर्य नाहीं. स्वकालीन मूळ लेखांत हि फेरफार करणारे नकलकार महाराष्ट्रवाङमयांत आढळतात. उदाहरणार्थ, तुकारामाच्या अभंगांच्या तळेगांवच्या संताजी तेल्यानें केलेल्या नकलांत व कडूसच्या महाजनानें केलेल्या नकलांत, तुकाराम संताजी व पाठक हे तिघे हि समकालीन असून, अंतर आहे. संताजीच्या नकला कुणबाऊ आहेत व पाठकाच्या नकला बामणाऊ आहेत. मूळ तुकारामाचें लिखाण कुणबाऊ होतें कीं तिसरें च कांहीं होतें ही बाब स्वतंत्र च. ज्ञानेश्वराच्या ज्ञानेश्वरीला हि हा च विकार बाधलेला आहे. मी आज पर्यंत ज्ञानेश्वरीच्या जुन्या नव्या नकला सुमारें अडीचशें पाहिल्या. त्यांत कोणती हि एक नक्कल कोणत्या हि दुस-या नकले सारखी कोणत्याहि दहा सलग ओव्यांत नाहीं. रामदासाच्या दासबोधाची हि ही च दुर्दशा. देवांनीं छापिलेला कल्याणस्वामिलिखित दासबोध पांगारकरांना सांपडलेल्या ग्वालेरच्या दासबोधाहून अनेक स्थलीं भाषादृष्ट्या निराळा ! दोघे हि नकलकार रामदासकालीन, दोघे हि ब्राह्मण, दोघे हि गुरुग्रंथाचीं पूज्यभावें पारायणें करणारे. असें असून, दोघांच्या पाठांत भेद, अशी दुःस्थिति जर महाराष्टांतील प्रतिष्ठावंत ग्रंथकारांच्या ग्रंथांच्या नकलांची, तर कोंकणांत कोनाकोप-यांत लोळत पडलेल्या प्रस्तुत बखरींच्या निरनिराळ्या प्रकरणांच्या नकलांचा सांवळा गोंधळ काय विचारावा ! प्रस्तुत बखरीची शेवटली नक्कल शक १७४१ त झाली. मूळ सबंध बखर छापिली आहे त्या स्वरूपाला शक १६०० च्या सुमारास आली. शक १६०० पासून शक १७४१ पर्यंतच्या १४१ वर्षांत अनेक नकलांच्या कोशांतून नवे नवे जन्म घेऊन शक १७४१ त प्रस्तुत बखरीनें शेवटला हस्तलिखित जन्म घेतला. परंतु तेवढ्यानें च तिचें जन्मांतर संपलें असें समजूं नये. बखरीनें प्रस्तुत जो छापील जन्म घेतला आहे त्यांत कान्हे, मात्रा, इकार, उकार, अक्षरें इत्यादि अवयवांची किती छाटाछाट झाली आहे तें माझा मींच जाणें असें म्हणावयाला नको; प्रत्येक वाचक माझ्याप्रमाणें च बखरीचे हातपाय कापले गेल्या बद्दल, बखरीचा पुनर्जन्म सर्वावयसंपन्न होई पर्यंत, अखंड दुःख करीत राहील !
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १५४
बाळबोध
श्रीविद्याशकर
श्रीमत्परमहसादियथोक्तबिरुदाकितशृगेरीसिहासनाधीश्वर
श्रीमत्छकराचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्याशकरभारती
स्वामिकरकमलसजाताभिनवश्रीविद्यानृसिहभारतीस्वामि
कृतनारायण्समरणानि
स्वस्ति श्रीमत्सकलगुणालकरण वेदशास्त्रसपन्न यजनादिषट्कर्मनिरत राजमानविराजमान राजश्री करहाटकक्षेत्रस्थसमस्तब्रह्मवृदेषु तथा ज्योतिर्विदुपाध्यायेषु विशेषस्तु तुह्मी प्रल्हादजोशीपालिकरसमवेत पत्र पाठविले प्रविष्ट होवून लेखनार्थ विदीत जाले तुह्मी जे केले असेल ते शास्त्रोक्त च केले असेल येतद्विषयी सशय आहे असा अर्थ नाही परतु मठमर्यादा चालावे लागते जेथे राजकीय सत्ता जाली तेथे मठिची व क्षेत्राची उभयमर्यादा कोठून राहिली ब्राह्मण्यास कारण दोनि अह्मी बहिष्कृतपत्र पाठविले असता त्या पत्राचा अपकर्ष केला तो अभिमान तुह्मास असावा अह्मास कारण मर्यादाउल्लघन होवू नये या स्तव सविशदे तुह्मास लिहिले असे अतिसुज्ञतरेषु किमधिकलेखनेनेत्यलम्
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १५३
श्रीशकर
श्रीविद्यानरसिहभारतीस्वामिकृतनारायणस्मरणनि
वेदमूर्ति राजश्री नारायणभट गिजरे भक्तोत्तम यासि विशेषस्तु तुमचे कल्याण इच्छीत श्री पासी असो तदनतर येथील कुशल जाणोन स्वकीय लिहिणे या नतर मठ नि॥ दोनी गावीचे शेताचा इस्तावा भरिला या उपरि सदरहू शेतच्या भागाचा ऐवज जो काय असेल तो रा। आण्णाभटाचे घरी प्रविष्ट करविला पाहिजे ये विषयी आपणास अगत्य आहे तेथे विशेष काय लिहिणे रा। कृष्णभट कासीकर कासीस जात आहेत तरी रो। कृष्णाजी विठ्ठल जाताती यासि त्यास योग करून मार्गस्त करविले पाहिजे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १५२
श्रीशंकर
श्रीस्वामिकृतनारायणस्मरणानि
वेदमूर्ती राजश्री नारायणभट व बाबदेभट गिजरे भक्तोत्तम या प्रती विशेष तुमचे कल्याण इछीत श्री पासी असो तदनतर मौजे सैदापुरी मठाचे इनाम आहे त्यास यदाचा गला काय जाहला हे कळावेया करिता लिहिले असे तरी काय गला जाहाला तो लिहून पाठविणे ह्यणजे बैल पाठवून आणवू काय ते उत्तरी पाठविणे रा। कृष्णाजी बाबजी पाठविला आहे मुग्ता सागतील त्या वरून कळेल बहुत काय लिहिणे राजेश्री आपाजीपत, देशपाडे कडील गला ४२ पावता करणे पा।
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १५१
श्रीविद्याशकर
श्रीविद्यानरसिव्हभारतीस्वामिकृतनारायणस्मरणानि
वेदमुर्ती राजश्री नारायणभट गिजरे यासी विशेषस्तु तुमचे कल्याण इछित
श्री पासी असो तदनतर मोजे सैदापूरचे शेताचा कौल हि पुरवला आणि लावणी झाली असता मठास विशेष गल्ला पावत नाहीं करिता लिहिले असे तरी वाटेकरी यासी सागून जो जिन्नस जाहला असेल तो आपण भट मिरजकर याच्या घरास पावता करणे ह्मणजे मठास पावेल आपण काही मठीच्या कामास अतर करीत नाही परंतु सुचना लिहिली असे आउशा प्रमाणे जिन्नस पिकेल तो पावता करणे बहुत काय लिहिणे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १५०
श्रीविद्याशकर
श्रमित्परमहसादियथोक्त बिरुदाकितशृगेरीसिहासनाधीश्वर-
श्रीमच्छकराचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्यानरसिहभारती
स्वामिकरकजोभ्दवश्रीविद्याशकरभारतीस्वामिनारायणस्मरणानि
स्वस्ति श्रीमद्वेशशास्त्रसपन्न षट्कर्मनिरत राजमान्य राजश्री समस्तब्रह्मवृद व समस्तदीक्षित वास्तव्य क्षेत्र करहाटक या प्रति विशेषस्तु तुह्मी पत्र पाठविले प्रविष्ट होऊन लेखनार्थनवणतृप्तीने चित्तानद जाहला पत्रार्थ की केशोपतास शुधपत्र दिले सारखे क्षेत्री प्रायश्चित्त घ्यावयासी आज्ञा करावी ह्मणोन तरी बहिष्कृतपत्र देता तुमच्या समते राजश्री रत्नाकरपताचे गुजारतीने दिल्हे शुधपत्र तुह्मी मागता च दिल्हे पूजाद्रव्य सस्थानास तुह्मी प्रविष्ट करावे ऐसे निर्गम जाहाले नतर येथे तो कशास पाहिजे केसोपत तुह्मा पासी आहे प्रायश्चितविधि करवून पूजाद्रव्य पाठवावे येथे वेचास पाहिजे तो अर्थ वेदमूर्ति माणिकभटाचे वाग्विलासे कळेल माहुलीकराचे उत्धटपण वेदमूर्ति जगो दीक्षिता समक्षा बोलणे जाहले ते सागता कळेल पुढे प्रसगास तुह्मास विदित असावे ह्मणून लिहिले असे सुज्ञा प्रति बहुत लिहिणे काय असे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १४९
श्रीशकर
श्रीमत्परमहसपरिवाजिकाचार्यश्रीमत्छकराचार्यान्वयसजाता-
भिनवश्रीविद्यानरसिहभारतीस्वामिकृतनारायणस्मरणानि
श्रीमतसकलगुणालकरण हरिगुरुभक्तिपरायण राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृद व राजकीय ग्रहस्त व देशमुखदेशपाडे व ग्रामस्त वास्तव्य क्षेत्र क-हाटक भक्तोत्तम यासि विशेषस्तु तुमचे कल्याण इच्छित श्री पासीं राहिलो असों तदनतर इकडील वर्तमान तरी रा । बाबूराव पुराणिक पुराण सागावया समीप ठेऊन घेतला होता व आमचे पूर्वाश्रमीचा द्वेसी कासीकर ब्राह्मण हि त्यानी ठेवून घेऊन या सस्थानाची बहुता प्रकारे आस्था धरून आह्मास विचारणा केली नंतर ते गोष्टी अमान्य केली ते च चिती क्रोध धरून साप्रत नवरात्रा कारणे सकेस्वरास गेलो होतो तेथे हर्दू मठीचे सेवक एक दोघे व कासीकर व आपले विद्यार्थी ऐसे दाहा वीस मिळोन रात्रौ नग्नशस्त्र घेऊन मारण्या आले तो ईश्वरकृपेने जागृत जाहलो तो पळोन गेले प्रात काली विचारणा करू ह्मणोन मन माने तैसे तुफान करू लागले तात्काल शिक्षा करावी तरी तो काटक मुलूक ब्राह्मण मारिले जातील या करिता करवीरास पाठवून मागून आह्मी हि येथे आलो येथील ब्राह्मणानी बहुता प्रकारे विनति त्या विषई केली नतर निरोप दिल्हा शिक्षा करावी तर आह्मा योग्य नव्हे त्याचे कर्मास ते जातील ऐसे असता मागती त्या ब्राह्मणास व मठीचे सेवकास आपदेभट कासगावकर व सात पाच ढोगी ब्राह्मण मिळोन आह्मासी गरगशा लाविला आहे व मठीचा सेवक आहे तो बालकृष्णभट भटजी याचा रामभटाचा पुतण्या या करिता या दुर्शास्तव, ते हि या कर्मास प्रवर्तले आहेत तुह्मी मठसस्थानाचे अभिमानी आहा कळावे एदन्निमित्य लिहिले असे भेटी नतर सविस्तर कळेल येथील ब्राह्मण ऐसे आहेत सस्थान बुडऊ पाहताती परंतु आह्मी गणणेस आणितो ऐसे नाही कळले पाहिजे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २६१ श्री १६२२ वैशाख शुध्द १३
सही
१ शके १६२२ विक्रमनाम संवछरे वैशाख
२ शुध १३ सुक्रवार तदिवसी वेदमूर्ति
३ कृष्णभट धर्माधिकारी कसबे पुन्यस्तंभ
४ गंगातीर क्षेत्र यासि राजश्री आर्जोजी
५ राजे भोसले लेहोनु दिधले ऐसेजे क्षेत्री
६ चे तीर्थपुरोहितपण आपण तुह्मासि
७ दिधले असे आपली परंपरा जे क्षेत्रासि
८ येतील ते तुह्मासि मान्य करितील पहिले
९ आपल्या वडिलाचे तेथे कोनापासी तीर्थ-
१० पुरोहितपणाचे लिहिले आसैल तरी
११ तेच मान्य करून हे लिहिल सही तुह्मा-
१२ स वर्षासन रुपये १० दाहा रास केले
१३ आसेती प्रविष्ट होतील हे सही१
तेरीख १० जिलकाद
सन हजार ११०९ फसली
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १४८
श्रीविद्याशकर
श्रीमत्छकराचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्याशकरभारती-
स्वामिकृतनारायणस्मराणानि
सकलगुणालकरण हरिगुरुभक्तिपरायण राजमान्य राजश्री नारायणभट गिजरे क्षेत्र क-हाटक या प्रती विशेषस्तु तुमचे कल्याण इच्छीत करवीरक्षेत्री श्रीनिकट राहिलो असो तदनतर साप्रत पुष्य शु।। नवमीस श्रीची पुण्यतिथी आहे तरी तुह्मी समुदायसहित आले पाहिजे आणि तत्प्राती क्षेत्रास व राजश्री रुद्रमुनी व उमाजी गोसावी व वाईमाहुलीस पत्रे लिहून आपणा कडे पाठविले आहे तरी मुद्दाम येवडी पत्रे प्रविष्ट करवणार सुज्ञ असा सप्तऋषी वगैरे पत्रे लिहून पाठविली आहेत येवडी पावती करावी आपणा करिता निश्चिती असो जाणिजे