Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १८६
१७५० मार्गशीर्ष वद्य ७
श्री
नकल
सिका
श्रीमत्परमहसपरिव्राजकाचार्याद्यनेकबिरुदाकितश्रृगेरीश्री-
मदभिनवोद्यडगगाधरभारतीस्वामिभि
प्रिय सिष्य समस्त ब्राह्मण उभयक्षेत्रमाहुली यासि आसिर्वादपूर्वक कृतनारायणस्मरणानि विशेषस्तु आज्ञा केली ऐसी जे ब्राह्मणाचे शुधपत्र कासीपत बेदरे या जवळ दिल्हे नाना दीक्षीत मठास शरण येऊन शुद्ध जाहल्या वर कारकुना बरोबर पत्र जावे ते न होता तुह्मी च पत्र घेऊन गावगन्ना फिरोन उधता करिता मठाचे पूजाद्रव्य घेता बड फिरविता असे श्रुत जाहले हे अब्राह्मण्यता याचे करणे नाही. नानादीक्षित शुध नाही त्याचा ससर्ग तुह्मी केल्याने तुह्मास । पूर्ववत् होईल हे समजोन द्विजतेस योग्य ते करणे गावगन्ना ब्राह्मणास उपसर्ग, दिल्ह्याने नीट नाही मठाचा कारकून बरोबर नसता गावगन्नाच्या ब्राह्मणा पासून पूजाद्रव्य घेतले ह्यणून समजले ऐशास ते पूजाद्रव्य मठास पावत नाही नानादीक्षित मठास शरण येऊन शुधता पावल्या सिवाय गावगन्ना पत्रे जाऊ नये मिती मार्गशीर्षवद्य ७ शके १७५० सर्वधारीनामसवत्सरे विशेष लिहिणे ते काय इति नारायणस्मरणानि
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १८५
१७४७ श्रावणवा। १४
श्रीमुद्गल
स्वामी
वेदमूर्ति राजमान्य राजश्री समस्त ब्राह्मण व राजकीय
ग्रहस्त का। ह्मसवड स्वामीचे शेवेसी
शेवक रघुनाथराव रामचद्र पडितराव नमस्कार विनती उपरी विशेष श्री सस्थान मठकरवीर याची स्वारी सच्यार-उद्देशे सातारियास आली होती ती च्यातुर्मास्याचे निकडी मुळे राजश्री हणमतराव दिवाण यास सातार मु॥ ठेऊन करवीरास निघोन गेली तुह्मा समस्ता कडील पूजाद्रव्य यावयाचे या करिता श्रीकडील कारकून राजेश्री मोरो बलाल जोसी यास पा। आहे तरी तुह्मा समस्ता कडील पूजाद्रव्य जमा करून मा।रनिल्हे जवळ स्वाधीन करून पा। द्यावे ह्मणजे श्रीकडे प्रविष्ट होईल कोणे गोष्टीचा अदेशा घेण्याचे कारणे नाही कलावे रा। छ २७ मोहरम सु॥ सीत अशरैन मयातैन व अलफ बहुत काय लिहीणे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १८४
१७३१
श्रीशंकर
श्रीमत्परमहसादियथोक्तबिरुदाकितसर्वतत्रस्वतत्रश्रीगीरी-
सिव्हासनाधीश्वरपचगगातीरकरवीरक्षेत्रनिवासश्रीमत्श-
कराचार्यान्वयसहज्याताभिनवश्रीविद्यानरसिहभारतीस्वामि-
करकजोद्भवश्रीविद्याशकरभारतीस्वामिकृतनारायणस्मरणानि
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृद व राजकीय ग्रहस्त व मोकदमानि देहदाय गावगनानि अहद क्षेत्र करवीर तहद श्रीक्षेत्रकासी यासी विशेषस्तु तुमचे कल्याण इच्छित श्रीनिकट असो तदनतर कर्नाटकप्रातातून दडधारी यती हे काशीयात्रेस जातात व काशीयात्रेस जावयाचे उद्देशे करवीरमठास येवून विनती केली जे आपणास मार्गी भिक्षा व संरक्षण व्हावयाचे दुर्घट त्याज वरून हे आज्ञापत्र तुह्मास दिल्हे असे तरी हे माध्यानकाली जेथे राहातील तेथे यासी भिक्षा व रात्रौ याचे सरक्षण करून पुढे मार्गस्थ करून द्यावे विशेष लिहिणे ते काय शके १७३१ शुक्लनामसवत्सरे माहानुशासन वरीवर्ति मोर्तब
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १८३
१७३० श्रावणवद्य ९
श्रीशंकर
अनेकश क्तिसघटप्रका शलहरिघनध्वा तध्वसोविजयते विद्याशकरभा ।।रती ।।
श्रीमच्छकराचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्यानरसिहभारती
स्वामिकरकमलोद्भवश्रीविद्याशकरभारतीस्वामिकृतनारायण
स्मरणानि
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृद वास्तव्य क्षेत्रक-हाटक परमशिष्योत्तम यासी विशेषस्तु अत्रत्य कुशल जाणून स्वकीय लेखनी मानस सतोषवित असीले पाहिजे तदनतर तुह्मा कडून विनतिपत्र येऊन वर्तमान काही च समजत नाही जाणून हें पत्र देऊन वेदमूर्ती राजश्री बापूभट लाटकर मठसबधी यासी पाठविले आहेत तरी हे सागतील त्याचे उत्तर समर्पक पाठवून देणे विशेष लिहिणे ते काय श्रावणबहुल नवमी शके १७३० विभवनामसवछरे महानुशासन वरीवर्ति
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २६६ श्रीमोरेश्वरनरहरी
तालीक
स्वस्ति श्रीनृपशाळीवाहनशके १६५५ परिधावी नाम संवछरे चैत्र शुध प्रतिपदा + + + + तदिनी गणेश विश्वनाथ निंबकर यांणी वंशपरंपरेचा करीणा लेखन केला तो सभानाइकी परिसावा हकीकत अष्टविनायकाचे वोझर ता। हवेली पा। जुनर येथे पाटिलकी गणेश किटो निंबकर निजा शाही कारकून यांची त्यांस संतान पुत्र २ दोघे जण
जेष्ट पुत्र किटोपंत जाले यांस पुत्र कनिष्ट पुत्र बहिरोपंत जाले त्याचे
जाले चौग जण पुत्र विसाजीपंत त्यास संतान पुत्र
१ गणेशपंत वडील दोग जण
१ शिवाजीपंत १ शामजीपंत
१ रुद्राजीपंत १ गणेशपंत
६ गोपजीपंत -------
------ २
४ या उभयतां पैकी गणेशपंतास पुत्र
वडील गणेश किटो त्यास पुत्र जाला त्याचे जीवाजीपंत
नाम किटोपंत त्याचे पुत्र पिलाजीपंत
त्याचा पुत्र बहिरोपंत आहेत धाकटे
शिवाजी किटो त्यांस पुत्र चौग जण जाले
त्यांची नामे
१ वडील रखमाजीपंत
१ दुसरे यादोपंत
१ तिसरे केसोपंत
१ चौथे माहादाजीपंत
यादोपंतास पुत्र केसोपंताचे पुत्र गंगाजीपंत त्यांचे
१ नारोपंत १ हरिपंत पुत्र रामचंद्रपंत आहेत
यांस पुत्र यांस पुत्र
नागोजी त्र्यंबक हरि
यांस पुत्र
तीन पहिला
राघोपंत
दुसरा यादोपंत
तिसरा शिवाजीपंत
एणे प्रमाणे संतान आहे शिवाजी किटो धाकटे रुद्राजीपंत त्यांस वडिल पुत्र शामजीपंत त्यांस संतान नाही दुसरे शंकराजी रुद्र यांस पुत्र दोगे जण
१ रुद्राजीपंत
१ उमाजीपंत
---
२
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १८२
१७३० चैत्र शुद्ध ९
श्रीमत्परमहसपरिवाजकाचार्यवर्यपदवाक्यप्रमाणपारावार-
पारीणयमनियमासनप्राणायामप्रत्याहारध्यानधारणसमाध्य-
ष्टागयोगानुप्ठाननिप्ठागरिष्टतपश्चक्रवर्त्यनाद्यविष्टिन्नगुरुपर-
पराप्राप्तषडदर्शनस्थापनाचार्यव्याख्यानसिहासनाधीश्वरस-
कलवेदार्थप्रकाशकसाख्यत्रयीप्रतिपालकसकलनिगमागम-
सारहृदयवैदिकमार्गप्रवर्तकसर्वततत्रस्वतत्रादिराजधानीश्रीवि-
द्यनगरमहाराजधानिकर्नाटकसिहासनप्रतिप्ठापनाचार्यश्री-
मद्राजाधिराजगुरुभूमडलाचार्यतुगभद्रातीरनिवासऋष्यश्रृ-
गपुरवराधीश्वरश्रृगेरिश्रीविरूपाक्षश्रीविद्याशकरदेवदिव्य-
श्रीपादपद्याराधकश्रीमदभिनवशकरभारतीस्वामिकरकमल-
सजातश्रीमदभिनवोद्यडनृसिहभारतीस्वामिभि
अस्मदत्यतप्रियसिष्य कराडीक्षेत्रस्थितासेष विद्वन्महाजन तथा समस्त गृहस्थमडळीस वेदोक्त आशिर्वचनपूर्वक नारायणस्मरणपत्रिका विभवनाम सवत्सर चैत्र शुद्ध ९ वास्तव्य मसूरग्राम येथे श्रीपूजातत्परत्वे आनदनिर्भर असो साप्रत उदईक आपले ग्रामास आगमन करून सर्वत्रास श्रीदिव्यसदर्शनलाभ द्यावे ऐसे निश्चय केले कारणे पूर्वसुचनार्थ फलमत्राक्षता पाठविले असे सुसमई स्वीकार करावे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १८१
१७३० चैत्र शुद्ध ९
श्रीशकर प्रसन्न
यादी ग्रामस्त मडळी मसुरास श्रीमत राजश्री बापू गोखले याज कडेस गेली श्रीजगद्गुरुमठ हपीविरूपाक्ष श्रीशृगेरी यास भिक्षा करून पूजाद्रव्य दिले त्यास आह्मी देत नाही ह्यणून फिर्याद शके १७३० चैत्र शु।।स गेले बि॥
१ अबाचार्य घलसासी १ रामाचार्य घलसासी
१ माणिक दीक्षित उबराणी १ बाजी दीक्षित उब्राणी
१ भाऊ दीक्षित गिजरे १ माणिक दीक्षित गिजरे
१ नागेशभट अणा ढवलीकर १ आबाभट पढरपुरे
१ बालभट दुबापे १ अणा दीक्षित खीरसागर
१ गणेश दीक्षित गिजरे १ रामचद्र भट ग्रामोपाध्ये
१ हरभट सागवडे ----
--- ६
७
--
१३
एकूण तेरा असामी जाऊन कराड सुभा राजश्री व्यकटराव मराठे यास पत्र आणिले तात्या गिजरे याजकडे प्रायश्चित्ताचे रुपये येणे ते देत नाहीत तर त्याजकडे भटजीनी रुपये रुजू करून बाकी स्वामीचा पटीचा ऐवज भटजी देतील ह्मणोन पत्र मिति मा।र
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १८०
श्रीवेंकटेश
थोरले श्रीपाद स्वामी
स्वामीनी
श्रीमत्परमहसपरिव्राजकाचार्यत्वाद्यनेकगुणसपन्नेषु
श्रीमत्सत्यपूर्णश्रीपास्वामिषु
बिन्नाह रुद्राजि चदो देसकुलकर्णि प्रात करहाटक दासानुदासक्रित अनेकदडप्रमाणपूर्वक लेखन॥ सगळगीस आलेत हे वर्तमान ऐकोन परमसमाधान पावलो विशेष अमचे ग्रामस्त टोणपे गोवीदाचार्य दर्षनास आले आहेत तरि यास अह्मी आपुले कडुन क्रिष्णातिरी मसुरउतार बेटखडकसन्मुख पुराणस्थल नेमून बहिरवतीर्थाचे पश्चमभागी यास दानपत्र करून दिल्हे त्या पासून पुराण सागत आहेत त्यास भिमाचार्य कलह करित आहेत भीमाचार्याचे पुराणस्थल नरसिहतीर्थ पुरातन आहे मसूरउतारास यास येक बाणाची मर्यादा असे यास आज्ञा करायास स्वामि समर्थ आहेत व्यासपूजा अह्मी सगमी स्मार्त्त बालक्रिष्णभट याचे पूजा करून अनुक्रमे सर्वाची पूजा करी तो विदित होये हे विनति
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १७९
।। श्रीरामचद्रायनम ।।
श्रीमत्परमहसपरिव्राजकार्यत्वाद्यनेकगुणसपन्नै श्रीमद्रामचद्रदेवीदिव्यश्रीपादपद्माराधकै श्रीमत्सत्यनाथतीर्थश्रीपादकरकमलसजातै श्रीसत्याभिनवतीर्थश्रीपादै अस्मत्स्वामिपरमप्रियशिष्य रामचद्रराजपडितप्रभुवर्यान्पतिकृत नारायणस्मरण वय अस्मच्छ्रीस्वामिना परमानुग्रहेण स्नानदेवतार्चनव्याख्यानानि कृत्वा ईश्वरसवत्सर कार्तिक शुत्ध सप्तमी पर्यत क्षेमेणास्म भवत्क्षेमो लेखनीय ॥ अथ कन्यागतकृष्णवेणीस्नानकार्यमिति बहुकाल मनोगतमभूत् अस्मच्छ्रीस्वामिमाहात्म्येन तिस्त्र कोट्यर्त्धकोट्यश्च तीर्थानि भुवनत्रये॥ आयाति कृष्णवेण्याया कन्यास्थे च बृहस्पतावित्यादिप्रमाणोक्त महामहात्म्यसपन्न कन्यागतकृष्णवेणीस्नान समजनि तन्निमित्त श्रीस्वामिना सु + + + प्तिरभूत् भवता देशकालानुसारेण श्रीरामवेदव्यास + + सदर्शनेन भाव्यमित्यस्मन्मनसि वर्तते तदानुकूल्य यथा स्यात्तथा विधेय भवन्निमित्त जयतीर्थाचार्यहस्तेन फलगधप्रसादमत्राक्षतवस्त्राणि प्रेषितानि स्वीकार्याणि अवशिष्टवृत्तातनिवेदन जयतीर्थाचार्यमुखाद्भविष्यतीति निरूपण ॥ ॥
।।
महिकावती (माहीम)ची बखर
दिसण्याला हा पुंल्लिंगी क्रियापद- प्रयोग कोंकणांत चित्पावनांत व क-हाड्यांत अद्याप हि आढळतो. ही कोंकणी लकब झाली. जुनी संस्कृत लकब, स्वप्न सांगविला (पृष्ठ ५३, ओळ ११) ह्या प्रयोगांत दृष्टीस पडत्ये. स्वप्न हा शब्द संस्कृतांत प्राय: पुल्लिंगी आहे. सबब, सांगविला हें पुल्लिंगी रूप केशवाचार्यानें प्रौढपणें आपल्या लिखाणांत घातलेलें दिसतें. परंतु, लौकिकांत स्वप्न हा शब्द मराठींत नपुंसकलिंगी आहे, हें केशवाचार्याच्या दृढ परिचयाचें होतें. सबब, हें हें नपुंसकलिंगी सर्वनामरूप स्वप्न ह्या पुल्लिंगी शब्दा मागें केशवाचार्यानें किंवा त्याच्या नकलकाराने लावून "हे स्वप्न सांगविला" हें विचित्र वाक्य निर्माण केलें असावें ! ह्या बखरीत सरता हा जुनाट शब्द आलेला आहे. "सरता केला संतांत” हें वाक्य संतमालांतून आलेलें जुन्या मराठी भाषेच्या अभ्यासकांना अवगत आहे च. येथें सरता म्हणजे गणणा केला जाणारा, स्मरण केला जाणारा, स्मर्यमाण, असा अर्थ आहे. तो सरता केला संतांत म्हणजे तो संत लोकांत स्मरला गेला, गणला गेलो असा अर्थ होतो.
तो जातींत सरता केला म्हणजे तो जातींत गणला गेला. हा सरता शब्द संस्कृत स्मृ धातू पासून निघालेला आहे. स्मृ चा अपभ्रंश सर असा मराठींत होतो. उदाहरणार्थ, विस्मृ चा मराठी अपभ्रंश विसर, करूं बद्दल करोन अशी अक्षरवटिका ह्या बखरींत एकदां आली आहे. अनुनासिका च्या टिंबा बद्दल सबंद न हें अक्षर लिहिण्याची संवय बाजीरावादि पेशव्यांच्या पत्रांत आढळते. ती च लकब ह्या कोंकणी बखरींत आढळल्यास चमत्कार नाहीं. असले आणीक कांहीं प्रत्यय व प्रयोग ह्या बखरींत आहेत, ते सर्व देऊन जागा अडविणें प्रशस्त दिसत नाहीं.
७. बहि:स्वरूपाची छाननी झाल्या वर, आतां बखरीच्या आंतील मजकुराचा परिचय निर्धास्तपणें करून घेण्याच्या उद्योगास लागणें सुयुक्त दिसतें. आंतील मजकुराचा परिचय करतांना, छाननीची पहिली बाब म्हटली म्हणजे बखरींत दिलेली शकसंवत् वगैरे कालगणना बरोबर आहे किंवा नाहीं तें तपासणें. कोणत्या शकाला कोणता संवत् जुळतो, ही स्थूल बहि:छाननी मागें होऊन गेली च आहे. तीथ, वार वगैरेंच्या सूक्ष्म छाननीला आतां हात घालूं. एकंदर सबंद बखरींत शकसंवताचे जेवढे म्हणून स्थूल किंवा सूक्ष्म उल्लेख केले आहेत त्यांचा तक्ता असा:-- (तक्ता पाहाण्यासाठी येथे क्लिक करा.)
सूक्ष्म तपासणीच्या कार्यास लायक अश्या नोंदी ह्या तत्त्क्यांत १, ७, ८, १०, २५, २७, अश्या फक्त सह आहेत. कारण त्यांत महिना, पक्ष, तीथ, व वार अशा तपशिलाच्या दोन दोन, चार चार बाबी दिल्या आहेत. बाकीच्या एकवीस नोंदींत हा तपशील सबंध किंवा आंशिक, बिलकुल नाहीं. सत्तावीस नोंदीं पैकीं नोंद २७ खेरीज करून कोणत्याहि एका नोंदींत संवत्सराचें नांव दिलेलें नाहीं. तें हलगर्जीपणानें दिलें नाहीं, असाच केवळ ग्रह करून घ्यावयास न लगे. संवत्सराचें नांव न काढण्याचें कारण असें आहे कीं, बखरकार शक व संवत् असे दोन्ही आंकडे मनांत धरून वर्षगणना करण्यास शिकलेला होता. दोन किंवा अधिक मोजण्यांनीं वर्षगणना करण्याची ही संवय किंवा अपरिहार्यता परराज्याखालीं रखडणा-या प्रजेस सहज प्राप्त होत असते. स्वराष्ट्रांतील जुन्या कालगणने बरोबर परकीय राजांनीं प्रचलित केलेली काळगणना सांगितल्याशिवाय वर्षगणना बिनचुक एकदम वाचकाच्या किंवा श्रोत्यांच्या ध्यानात येण्यास विलंब लागेल, अश्या भीतीनें परराज्याच्या दडपणाखालीं खितपतणा-या हल्लक लेखकांस स्वकालगणनेच्या गौण साक्षीला परकीयकालगणनेची प्रमुख साक्ष देणें सोईचें वाटतें. वंशपद्धति ऊर्फ प्रकरण दुसरें हा प्रबंध रचणारा जो केशवाचार्य त्याला त्यानें आपला प्रबंध ज्या मूळ टिपणांवरून रचिला त्या टिपणांत गुजराथेतीलं अन्हिलवाड पट्टणाहून आलेल्या परकीय बिंब राजांचा विक्रमसंवत् स्वकीय देशांत चालणा-या शकाच्या जोडीला लावलेला आढळला.