Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २४६
।। श्रीविद्याशकर।।श्रीमत्परमहसादियथोक्तबिरुदाकितश्रृगेरीसिहासनाधीश्वर-
श्रीमच्छकराचार्यान्वयश्रीविद्याशकरभारतीकरकमलसजाता-
भिनवश्रीविद्यानरसिहभारतीस्वामिकृतनारायणस्मरणानि
श्रीमत्सकलगुणालकरण हरिगुरुभक्तिपरायण राजमान्य राजश्री रत्नाकर विठ्ठल परमभक्तोत्तम या प्रति विशेषस्तु तुमचे कल्याण इच्छित करवीरक्षेत्री श्रीनिकट राहिलो असो तदनतर येथील कुशल जाणून आपण पत्र पाठविले पाऊन लिहिला भावार्थ अवगत जाहला तेथे अर्थ की केशव सामराज हे अपक्त होते त्यास साप्रत स्वामी कडे आले आहेत ते पावन करावे ह्मणून तरी केशवपताचा विचार आपणास पहिले च सागितले च आहे त्या नतर मठा कडील राजश्री अताजीपताचे विद्यमाने शत रुपये पावे तो बोली परतु आपणा विरहित उरकूं नये ह्मणोन मान्य केले नाही त्या हि वरी आपण लिहिलेस ते आले नाहीत समाधान वाटत नाही ह्मणोन क्षेत्रस्थानी लिहिलेया वरून आपण विचार मनास आणावा मुख्य आह्मास आपले अगत्य जाणोन शुद्धपत्र देऊन पाठविले आहे या वरून जो विचार करणे तो केला पाहिजे बोली कराल ती निर्गमा नतर पत्र द्यावे सुज्ञा प्रति विशेष लिहिणे नलगे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २४५ बाळबोध
श्री
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री तात्यादी (क्षी)त गिजरे याशि
प्रति नागेशदीक्षित ढवळिकर साष्टाग नमस्कार विनती उपरि अपला नीरोप घेउन अलो ते सोमवारि प्रहर दिवसास पोचलो येथिल वर्तमान बापू व गोलभट्ट या उभयतास आणुन अपले बिराडि बशिविले या उपरि राजश्री हरिपत ठाणेदार नवनीत रा। गोविंद वासुदेव याचा तरफेने अहेत त्याच कडुन बोलावणे अले त्या वरून वाड्यात गेलो त्याचे अमचे बोलणे बहुत जाहाले परतु काहि ठरले नाही त्या ठाणेदार याचे बोलणे वाळवेकर या पासोन कागद लिहून घेतो किं पूर्वापार क-हाडकर या शिवाय पदप्रायश्चित्त करित आलो ऐशि पूर्वणि करून देतो पूर्वणि न जाहल्यास सरका(रा) चे गुणेगार या प्रमाणे अह्मास पत्र मागतात हल्लि वाळते दोघे घेऊन यावे तर सरकारातुन चवक्या ठेविल्या अहेत अह्मि अणु लागिल्यास अमचा हातुन हिरावुन घेतात या विषि राजश्री अबाजी शकर याचे पत्र वाळव्याचा ठाणेदारास तेथिल ब्राह्मण क-हाडास पाठउन देणे ऐसे परभारा करावे येथे पत्र ठाणेदारास यावे या प्रमाणे रा। रामाजी वासुदेव याचे पत्र यावे येथे ग्रामस्त व वाळते वाळवेकर येणे प्रमाणे मडळी सुत्धा चार माणसे देउन
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
सिंहगड-कोळी
लेखांक २७३ श्री १६०३ चैत्र वद्य ७
स्वस्ति श्री राज्याभिषेकशक ७ दुर्मति नाम संवत्सरे चैत्र बहुत सप्तमी गुरुवासरे क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर श्री राजा शंभु छत्रपति स्वामी याणी राजश्री रघोजी अहीरराऊ मुद्राधारी प्रचंडगड यासि आज्ञा केली ऐसी जे गडमजकूरचे कोळी मेटकरी गडाचे घेरियाखाले राहतात त्या पैकी कितेक लोक गडमजकुरी चाकर आहेती व कितेक सोनजी इतबारराऊ याचे दिमतीस आहेती त्याकडे गुरे ह्मैसी व गाई आहेती त्या पैकी दर एकास हवालदार नाईकवाडी रजपूत यास दोनी गुराची वणीसोड करून वरकड बदल मु॥ बार करावी ऐसी तीर्थस्वरूप कैलासवासी स्वामीची सनद आहे त्याप्रमाणे हालीं सनद देविली पाहिजे ह्मणून यां लोकी अर्ज केला ऐशास गाईची वणी तों एकंदर माफ केली आहे ह्मैसीची वणी घ्यावयाचा तह आहे त्या पैकी या लोकास दर एकास ह्मैसीची वणीसोड देविली असे तरी हवालदारास ह्मैसी २ व नाईकवाडियास ह्मैसी २ व रजपूतास ह्मैसी २ या प्रमाणे सोड देऊन बाकी ह्मैसी ज्याच्या ज्या उरतील त्याची वणी जे होईल त्यास गडमजकुरी चाकर असतील त्याची वणी त्याच्या नावे लिहिणे बाकी वजा करणे सोनजी इतबाररायाचे दिमतीस लोक आहेती त्यांकडे जे वणी होईल ते त्याच्या नावे तपसीलवार खर्च लिहिणे आणि नावनिसी जाबिता हुजूर पाठवणे त्यावरून त्याच्या आवर्जां बार होईल घरटका हि ज्याकडे जो होईल तो त्याचे नावे बार करणे हुजूर लेहून पाठवणे हे वणीचे व घरटकियाची जमाई माहालाकडे असेल तरी हे च सनद माहालचे कारकुनी मसमू जाणून एव हे प्रमाणे चालवावे गडी जमाई असेल तरी तुह्मी चालवावे साल दर साल ताजे सनदेचा उजूर न करणे तालीक लेहून घेऊन असल हे पत्र कोळियापासी देणे निदेश समक्ष
रुजु सु
रुनिवीस
सुरू सूद बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २४४
श्री
स्वस्ति श्रीमछांतादुर्गाचरण नलिनात करणसारासारवि-
चारधुरीणेषु श्रीसद्विद्यादिसकळगुणगणविराजमानकृत-
राजसन्मानश्रीकल्पतरूपमानसरस्वतीराजहसायमानस्वान्न-
दानसतानसतोषितविद्वज्जनजेगीयमानयश पूरकर्पूरसपूरि-
तदिक्नाकेषु श्रीमन्मत्रिकुलावतसश्रीश्रीभास्कररायप्रभुवर्येषु
आश्रितातर्गतश्रीमन्निखिलवसुधातलक्षेत्रावतसश्रीकरहाटकस्थसमस्तविद्वद्वदानामने-
काशीराशय शर्मदा भूयासू अत्रत्य कुशल भव्यमव्याहतमनुदिनमेध-
मानमुश्म विशेषस्तु
सुज्ञ प्रति विशेष किमु लेखनीयमित्याशी सहस्त्रमजस्त्रम्।
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २४३
श्री
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री बाजीदीक्षित दादा
गिजरे स्वामी वडिलांचे शेवेसी
आपल्या समान बलवतराव माहादेव कशेलकर साष्टाग नमस्कार विज्ञापना येथील कुशल ता। जेष्ट वा। ७ पर्यत आपले आसीर्वादे कुशल असे विशेष आपणा कडून बहुत दिवस पत्र येऊन वर्तमान कलत नाही तरी सविस्तर ल्याहावे या नतर आह्मी सकुटुब चिरजीव आनदराव गगाधर याचे कन्येच्या विवाहा करिता निदर्गीस माघमासीं गेलो होतो मुलीचे लग्न शापुरबेलगावी श्रीचिदबर दीक्षित याचे आज्ञेवरून जाहाले त्या नतर आह्मी चैत्र वद्यपक्षी तिकडून निघोन वैशाखमासी इकडे आलो तिकडील मडळी सर्व कुशलरूप आहे आपणास कलावे दर्शनाची इच्छा फार आहे परतु घरास आलो तो घराचा नाश फार जाहला दग्यात घर सोडिले त्यास नऊ महिने जाहले याज मुळे लाकूडफाटे वगैरे फार गेले त्याची दागदोजी पडीझडीची करीत आहे आणखी मासपक्ष लागेल अद्यापि कुटुब इकडे आणिले नाही सडा आहे पधरारोजात कुटुब आल्या नतर मी आपले दर्शनास येईन या नतर कराडकर समस्त ब्राह्मण याची व वालवेकर याची कटकट प्रायश्चिता बदल जाहली आहे ह्मणोन कलले त्यास रिकामे खटले कशा करिता ब्राह्मण माजिवतात यात लाभ काय हे काही ध्यानात येत नाही त्यात येकादा प्रायश्चित्ति आला आणि आविधि त्यास प्रायश्चित्त दिल्हे आसे आसले तरी मग ब्राह्मण्या करिता कटकट करणे प्राप्त तसे हि केवल वालवेकर अविध्युक्त करितील असे वाटत नाही तेथील ब्राह्मण चार बरे च जाणते विद्वान आहेत व पहिले पासून असे विषय त्या जाग्यास बहुत पडत आलेयाची निष्कृति हि करीत गेले परतु आज पर्यत खटला कोणी क्षेत्रस्थानी कोणता केला असे ऐकण्यात नाही आले असे असता हालीच्या प्रायश्चित्तास श्रीशकराचार्य सुद्धा समते करून केले असे श्रवणात आले असता क्षेत्रस्थानी कटकट करावयास कारण काय हे आपले ध्यानात आले असल्यास सविस्तर ल्याहावयासी आज्ञा करावी आपणा कारणे भाजी पा। आहे घ्यावी बहुत काय लिहिणे सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २४२ बाळबोध
श्री
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजेश्री समस्त ब्राह्मण क्षेत्रक राड याशि
प्रति रावजीभट्ट रागणे क्षेत्रमाहुली साष्टाग नमस्कार विनति उपरि तुह्मी अह्यास विचारिले जे चरणामध्ये राजेश्री बहिरोपत कुळकर्णि याचे घरि गर्भाधान जाहले ते वेळेस ब्राह्मण अरळेकर व बापूभट नेरलेकर आले होते त्यास काही कुभध्वनि नाटवडेकर मोकाशियाचि निघाली होति त्यास जे त्याचे घरि ब्राह्मण नाटवड्यास गेले होते ते हि तेथे आले त्यास पक्तिव्यवहार करावा ऐसा सरकारचा अग्रह नतर गर्भाधान जाहले साहिंकाळ जाला मग अह्मि बोलिलो की अह्मास भोजनास घालणे तर घालावे नाही तर दुसरे घरि भोजन करु मग त्या नतर अह्मि व वेदमूर्ति बापूभट नेरले व राजेश्री सखोपत वेळगावकर अैसे त्रिवर्गानि भोजन वेगळे केले त्या नतर असे इकीकडेस जेवले भोजन जाला वर अह्मास जुलूम केला ऐसे रामभट अणिखि येकदोघे बोली या प्रमाणे तेथील वर्तमान जाहाले ते अपणास निवेदन केले बहुत काय लिहिणे हा नमस्कार हस्त अक्षर खुद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २४१ बाळबोध
श्री
वेदशास्त्रसपन्न राजश्री मोरदीक्षित नाना अरणके यास समस्त अष्टेकर व भिलवडीकर सा। विनति उपर अपलि अमचि उभयताचि गाठ बोलिला होता परतु अपले क्षेत्रस्थ विसलापुरास आले त्या मधे अपणा सारिखे मुख्य होते किंवा कैसे होते तेथे प्रकार जिनस्वार झाला ऐसे सुज्ञ कोणते होते आणि कैसे झाले हे सविस्तर लिहावे अह्मी अपले पत्राचे उत्तर यावे यदर्थि क्षेत्रास अपणास विनति लिहिलि आहे तर समस्ताचे उत्तर पाठवा ये विषयी अपले यजमानाचि आज्ञा कि उत्तर आणिवणे तर अपण सत्वर उत्तर पाठवावे गडी रोजगारि आहे नवमीस सायकाळ मर्यादा पोहचे ऐसे करणे सूज्ञा प्रति विशेष काय लिहिणे हे नमस्कार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २४०
श्री
तीर्थस्वरूप राजेश्री बाजीपत पोतनिवीस काका वडिलाचे शेवेशी
अपत्या समान रावजीबावाने व बाबाने कृतानेक नमस्कार विनती उपरी येथील
वर्तमान भाद्रपदशुद्ध १२ पर्यत श्रीकरहाटकक्षेत्र येथे समस्त सुखरूप असो विशेष आपली अज्ञा घेऊन निघालो ते श्रावणकृष्णसप्तमीस घरास सुखरूप पावलो आल्या तागाईत आपल्या कडील वर्तमान काही कळत नाही तर ऐसे न करावे सदेव पत्रद्वारा परामर्ष करावा वर्कड वर्तमान आह्मा कडील व्यकणभट्ट सागता निवेदन होईल बहुत काय लिहिणे आपण बोलिले होते की सप्तशतीचे वरणीचा शोध करू त्यास वरणी लागावयाची अशली तर शोध करून लिहून पाठवावे ह्यणजे येतो सर्व भरवसा आपला आहे कृपा निरतर करावी हे विनती इहैव सौभाग्यवती वज्रचूडेमडित मातुश्री उमाबाई काकीस नमस्कार वडिलास लिहिले आहे त्यावरून सर्व मजकूर निवेदन होईल बहुत काय लिहिणे हे विनती सौभाग्यवती वज्रचूडेमडित पाखराबायीस अशीर्वाद चित्तास खेद न करीत जावा बहुत काय लिहिणे लोभ असो देणे हे अशीर्वाद तीर्थस्वरूप राजेश्री देवबावास नमस्कार सागणे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
मालवण
लेखांक २७२ १५०२ वैशाख शुध्द ३
(फारसी दोन शिक्के)
(सात ओळी फारशी मजकूर)
(फारशी शिक्का)
१ अज दीवाण कीले पनाळे सु॥
२ इहीदे समानीन तीसा मैया ता।
३ मोकदमानी वा रया देहाय का।
४ बाळाघाट कीले मा। बीदानंद
५ की हर्ची तकसीम सरदेसाई
६ देसाई हुजुरु हजर ते सीले
७ मानी पेसजी चीटी सादीर
८ आहे ह्या चीटीपैकी आदा कीजे
९ मौजे देवर अष्टे मौजे चीचणी
१० पडिली सीरगाऊ
११ वांगी माहासुर्णे
१२ सेवगाऊ नीबसवाडी
१३ सेडे उपलटे
१४ नांदोसी ऐतगाऊ
१५ बीलावाडी आंबवडे
१६ हीगुणगादे खेडरे
१७ रा। ६ रजबु
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २३९
श्री
वेदशास्त्रसपन्न समस्तब्रह्मवृद क्षेत्रकराड स्वामीचे सेवेसी -
विद्यार्थी भगवत आपाजी साष्टाग नमस्कार विनति उपरि येथील क्षेम जाणोन स्वकीय आसिर्वादलेख करून सतोशे पाववीत असावे विशेष वेदमुहुर्ती व्यकणभट व पुटभट जोतीश हुकेरी या उभयेतास आपणा कडे जोतीशपणाचे निवाडे बद्दल पाठविले होते त्यासी आपण निवाडा करून उभयेतास पाठविले उभयेता येथे आले उभयेतास स्वामीचे आज्ञे प्रमाणे सागितले वो। व्यकणभट आपणास हा निवाडा कलला नाही आपण स्वामी कडे जाईन एैसे बोलले वो। पुटभटास हि विचारिले निवडले प्रो। ऐकावयास हि रजावद व्यकणभटाने न ऐकलेस स्वामी कडे जावयास हि रजावद एैसे बोलोन उभयेता स्वामी पासी आले आहेत उभयतास रजावद करून उभयताची पत्रे येकाची येकास करून देऊन पस्टपणे आज्ञा करावी तेणे प्रो। वर्तणूक करू कृपा केली पाहिजे हे विनति