लेखाक २०३
१७७८ आषाढशुद्ध ७
श्रीशंकर
।। श्री ।।
श्रीमत्परमहसपरिव्राजकाचार्यवर्यश्रीमच्छकराचार्यान्वयस -
जाताभिनवश्रीविद्याशकरभारतीस्वामिकरकजोद्भवश्रीवि-
द्यानरसिव्हभारतीस्वामिकृतनारायणस्मरणानि
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्राह्मणवृद व जोतीषी व राजकीय गृहस्थ व देशमुख व देशपाडे व पाटीलकुलकर्णी वा। क्षेत्रकरहाटक परमसिष्योत्तम यासि विशेषस्तु तुमचे कल्याण इछित छात्रसभासमवेत श्रीनिकट असो अत्रत्य कुशल जाणोन स्वकीय लेखनी मानस सतोषवीत असले पाहिजे तदनतर सस्थानदेवतेच्या स्वारीचे सचारउद्देशे करवीराहून निघणे होऊन या प्राती आगमन जाहाले आहे. चातुर्मास्या करिता क्षेत्रमजकुरास स्वारीचे आगमन होऊन स्थातव्य व्हावे. हा मनोदय याज करिता वो। राजश्री कोडदीक्षित आरणके यासी आज्ञा होऊन पाठविले आहेत सविस्तर समजावितील स्वारीचे येणे आषाढशुद्ध १५ अगर वद्य ४ चतोर्थीस होईल तुह्मी संस्थानचे सत्सिष्य पूर्ण साभिमानी तेथे विस्तारे लिहावे असे नाही विशेष लिहिणे ते काय शके १७७८ नळनामसवत्सरे आषाढशुद्ध ७ महानुशासन वरीवर्ति
