Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २३० ,
१७७९ आषाढवद्य ७ नकल
श्रीशंकर
सिका
श्रीमच्छकराच्यार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्याशकरभारतीस्वामीकर-'' कजोद्भवश्रीविद्यानरसिहभारतीस्वामीकृतनारायणस्मरणानि
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री नाना दीक्षित व सीताराम दीक्षित उमराणी मौजे पाल परमशिष्योत्तम यासी विशेषस्तु तुमचें कल्याण इच्छित श्री निकट असो अत्रत्य कुशल जाणून स्वकीय लेखनी मानस सतोषवीत असले पाहिजे. तदनतर तुह्मास सस्थानातून मठाधिपत्याची वहिवाटीची आज्ञा होऊन आज्ञापत्र दिल्हे त्यात पाल वगैरे क्षेत्रकरहाटक याचे हद्दीतील आहेत ती न पाहणेची आज्ञा व्हावी या प्रो। क्षेत्रस्त ब्रह्मवृद यानी समक्ष मठ सकेश्वर मुकामी श्रुत केले वरून हे आज्ञापत्र सादर जाहले असे तरी पाल वगैरे गाव क्षेत्रकरहाटक याचे हद्दीतील गाव रहित केली असती तेथील मठाधिपत्य वगैरे तुह्मी पाहू नये विशेष लिहिणे ते काय आषाढवा॥ ७ निशान मोर्तब
असल बरहुकूम नकल रामचद्र बापूजी कारकून नि॥ श्री
शेरा
अजमितीचे पत्राबरोबर क्षेत्रकरहाटक येथील समस्त ब्रह्मवृदा कडे रवाना मिति आषाढवा॥ ७ शके १७८१ सिध्धार्थीनामसवत्सरे
गोविंद हणमत कारभारी नि।। श्री
सस्थान करवीर
बार अक २५ सन १२६९ फसली
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २२९
१७७९ आषाढवा। ५
श्रीशंकर नकल
सिका
श्रीमच्छकाचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्याशकरभारतीस्वामीकर-
कजोद्भवश्रीविद्यानरसिहभारतीस्वामीकृतनारायणस्मरणानि
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृद व ज्योतिषी व राजकीय ग्रहस्त व देशमुख व देशपाडे व पाटील कुलकर्णी का। मा।र परमशिष्योत्तम यासी आज्ञा केली ऐसी जे शके १७७८ नलनामसवत्सरे सस्थानदेवतेचे स्वारीचे सचारउदेशे सातारप्राती आगमन जाहाले समईं गावगनानी पाहता हिदुलोकात ज्ञातीधर्मास विरुद्ध वहिवाट होत असल्याचे दिसून आले सबब ये विषयीचा विचार सस्थानातून जाहला पाहिजे याज करिता सदरहूच्या बदोबस्तास सस्थानातून मठाधिकारीपणाचे कामावर वो। राजश्री नाना बिन कृष्ण दी।। व सिताराम बिन बाबा दी।। उबराणीकर राहणार पाल या उभयतास नेमून आज्ञापत्रे दिल्ही आणि ज्ञातिधर्मास विरुद्ध वागतील त्याज विसीचे सस्थानास कळऊन आज्ञे प्रमाणे बदोबस्त ठेवीत जाणे अशी आज्ञा जाहली त्या प्रमाणे सदर उभयेतानी तजवीज ठेविली असून क्षेत्रकरहाटकस्थ ब्रह्मवृद याणी मठाधिकारीपणाचे आज्ञापत्र घेतले त्याज मुळे उभयता बरोबर द्वेष करून निग्रहपत्र पालीकर ब्रह्मवृद यास लिहिले त्याची नकल सदर उभयतानी आणून हजर केली ती अबलोकनात येऊन आज्ञापत्र तुह्मास सादर जाहले असे तरी सदर कराडकर याणी उबराणीकर उभयता यासी द्वेषबुद्धीने निग्रहपत्र लिहिले हे अयोग्य आहे मठाधिकारी वगैरे याची वहिवाट पाहून निग्रह ठेवणे अगर शुद्ध करणे हा अधिकार सस्थान मठ करवीरकरचा कराडकर दरम्यान धादल करून पत्र लिहिले हे बरोबर नाही कराडकर हे परभारे धादल करितात ये विसीचा बदोबस्त सस्थानातून होणे लौकर होईल तुह्मी सदर उभयता मठाधिकारी उबराणी राहणार पाल याचे घरी व पक्तीस अन्नोदकव्यवहार पूर्ववत् प्रो। करीत जाणे आणि कराडकर याणी पत्र लिहितील ती कोणी मानू नयेत असा बदोबस्त ठेवूत विनतिपत्र पा। देणे विशेष लिहिणे ते काय मिति फाल्गुनव॥ ३ महानुशासन वरिवर्ति मोर्तब असे पो। आषाढवा। ५ शके १७७९ हस्ते सितारामभट उबराणी पालकर
महिकावती (माहीम)ची बखर
पुरोहिता सुद्धां हे आठ अधिकारी ऊर्फ प्रधान प्रताप बिंबा बरोबर होते. फक्त एकटा पुरोहित तेवढा ब्राह्मण, बाकीचे सात एकोनएक मराठे. ह्या साता हि मराठ्यांना गोत्रें होतीं व तंत्रागमानुरूप त्यांच्या निरनिराळ्या कुळदेवता होत्या. ह्या सर्व समुदाया (सैनिक, अधिकारी व बुणगे) सह प्रताप बिंब मोहिमेस निघाला, तो थेट लाट देशांतून उत्तरकोंकणांत शिरला नाहीं. कारण, लाट देश त्या कालीं अणहिलपट्टणच्या अंमला खालीं नसून, बारप्प चौलुक्याच्या स्वत:च्या व वंशजांच्या अंमला खालीं होता. हा बारप्प चौलुक्य अणहिलपुरकर चौलुक्यांच्या विरुद्ध असून कल्याणीच्या तैल चालुक्याच्या बाजूचा होता. सबब, लाटदेश उजवी कडेस टाकून, प्रताप बिंब नर्मदा उतरून व सातपुडा वलांडून बहुश: अजंठ्याच्या घाटानें पैठणास गेला. त्या काली नर्मदा, सातपुडा, अजंटा व पैठण त्या प्रांतांत निरनिराळे संस्थानिक असून, हे संस्थानिक कल्याणीच्या चालुक्यांना विरोध करणा-यां पैकीं होते. शिवाय, पैठणास त्या काली भौम आडनांवाचा जो संस्थानिक होता तो चांपानेरच्या बिबांच्या स्नेहसंबंध्यांतला, बहुश: शरीरसंबंध्यांतला होता. पैठणच्या विक्रम भौमानें (बखरींत भोम अशीं अक्षरें आहेत) प्रताप बिंबाला त्याच्या परिवारा सह, म्हणजे त्याच्या दहा हजार सैन्या सह, दोन वर्षे खतः जवळ ठेऊन घेतलें. प्रताप बिंबाला हि पैठणास तळ देऊन पाहुणचार खाण्याशिवाय गत्यन्तर नव्हतें. कारण, त्याची पैशाची टंचाई होती. दोन वर्षांत मुख्य प्रधान बाळकृणराव सोमवंशी यानें पैशाची व्यवस्था लावून, शक १०६२ त पैठणाहून दक्षिणेस चाल केली. प्रताप बिंबाला उत्तर कोंकणांत म्हणजे सध्यांच्या रामनगर, जव्हार, कल्याण, ठाणें व मुंबई या टापूंत शिरावयाचें होतें. तेव्हां पैठणाहून देवगिरी, अंकाईटंकाई, बागलाण ह्या रस्त्यानें नवसारी प्रांतांत न उतरतां, प्रताप बिंब पैठण, नेवासें, जुन्नर ह्या रस्त्यानें दवणप्रांतांत उतरला, पैठणाहून हरबाजी देशमुख ऊर्फ देस प्रताप बिंबाला, कोणाच्या सांगीशिफारसीनें नव्हे तर स्वत:च्या ईर्ष्येनें, येऊन मिळाला आणि विक्रम भौमाच्या शिफारसी वरून युद्धांत प्रखर म्हणून नांवाजलेला बाळाजी शिंदा दोन हजार घोड्या निशी प्रताप बिंबाच्या साह्यास सिद्ध झाला. एकूण बारा हजार घोड्या निशी प्रताप बिंबानें दवण प्रांता वर झडप घातली, कल्याण, ठाणें, माहुल ह्या दक्षिणेकडील महालांत न उतरतां, दमण प्रांतांत च सह्याद्रीच्या रानांतून शिरण्याचें कारण असें कीं उत्तरकोंकणची राजधानी जें ठाणें शहर तेथें शिलाहारांचें ऐश्वर्यानें जरी नव्हे तरी वास्तव्यानें अस्तित्व होतें. उत्तरकोंकणस्थ शिलाहारांत प्रतापानें प्रखर असा कोणी हि पुरुष यद्यपि त्या कालीं नव्हता, तत्रापि शिलाहारवंशांतील अपरादित्य, यशवंतराव वगैरे कित्येक राजन्यक ठाणेप्रांतांत व शहरांत रहात असत. करतां, त्यांच्याशीं त्यांच्या मुख्य शहरांत जाऊन टक्कर घेण्या पेक्षां, उत्तरे कडील दमण प्रांतांत भोकं पाडून, तेथून रागरंग पाहून उत्तरकोंकणचें राज्य आक्रमण करण्याचा सोपा मार्ग प्रताप बिंबानें स्वीकारिला, खुद्द ठाणें शहरा वर हल्ला केला असतां, परमप्रतापी जो क-हाडचा विजयादित्य शिलाहार त्याच्याशीं प्रसंग पडेल व प्रथमप्रासीं च मक्षिकापात घडेल, या भीतीनें प्रताप बिंबानें दूरच्या दमण महाला वर चाल केली. दमणास त्या काळीं काळोजी सीरण्या नामें करून कोणी पुंड राजा म्हणून मिरवत होता. ठाणेकर शिलाहारांच्या पडत्या काळांत ठिकठिकाणचे जे अनेक नाइकवडे स्वतंत्र बनले त्यांपैकीं काळोजी सीरण्या हा दमण प्रांतांत राजा बनला होता. तो प्रताप बिंबास दर्शनमात्रें च शरण आला. तेणें करून दमण पासून चिखली पर्यंतचा प्रांत प्रताप बिंबाच्या हवाली झाला. दमण शहर व प्रांत स्वभावतः च बहुत रम्य आणि तेथील समुद्रतीर तर केवल नयनमनोहर ! तें रम्य स्थळ काळोजी सीरण्याच्या रानटी धबडग्या खालीं उद्धस्त व वैराण होऊन गेलें होतें. त्या स्थळाची ऊर्जा करण्या करितां तेथें प्रताप बिंबानें कायस्थ हरबाजी, कुळकरणी अधिकारी ठेविला. तेथून चाल करीत तारापुरा वरून प्रताप बिंब महिकावतीस ऊर्फ माहिमास प्रविष्ट झाला. माहिमास त्या काळीं विनाजी घोडेल राज्य करीत होता. केवळ आगमनें करून त्या घोडेलाला प्रताप बिंबानें दूर केलें आणि कांहीं काल माहिमास राहून देशाची स्थिती अवलोकन केली. सर्व देश वैराण व उद्धस्त झालेला दिसला. घोडेल वगैरे अतिशूद्रांच्या हातांत राज्ययंत्र जाऊन, ढुंगणाला वस्त्र देखील नाहीं अश्या नीच लोकांच्या कचाटींत रम्य समुद्रतीर सांपडलेलें आढळलें. शिलाहारां सारख्या सुसंस्कृत मराठ्यांच्या अंमलांत सुपीकतेचें बाळसें जें देशाला चढलें होतें तें पार ओसरून जाऊन, देश पावरी, घोडेल, कोळी व ठाकरे वगैरे वन्य लोकांच्या बदअंमला खालीं पोरक्या पोरा प्रमाणें अन्नान्न दशे प्रत पोहोचलेला दिसला.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २२८
१७७९ वैशाखशु॥ ८
श्री
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृद क्षेत्रकराड यासि
समस्त ब्राह्मण कसबे उब्रज साष्टांग नमस्कार विनति विशेष तागाइत वैशाखशु।। ८ शके १७७९ पावे तो क्षेम असो विशेष पेशजी आपण पत्र उभयता उंब्राणी पालकर याज विषी पाठविले होते त्या प्रमाणे वहिवाट चालली हाली उभय उब्राणी पालकर याणी श्रीजगद्गुरुशकराचार्यस्वामीचे पत्र आणिले त्याची नकल अलाहिदा पाठविली आहे उब्राणी याचे ह्मणे पत्रा प्रमाणे वहिवाट चालवावी नाहीं पेक्षा पत्र माघारी घ्यावे सबब आपणांस लिहिले आहे तर जगद्गुरुचे पत्र माघारी देणे हे हि कठीण याज करिता उत्तर यावे बहुत काय लिहिणे लोभ करावा हे विनती
उत्तर
विशेष श्रीस्वामीजगद्गुरु याचे पत्राची नकल व आपले पत्र पा। ते पावले लिहिला मजकूर कळला या प्राती पूर्वी पासून मठाधिकारीचा साप्रदाय नाही हे आपणास माहीत च आहे त्यास श्रीस्वामी जगद्गुरुचे पत्र आले ते ठेऊन घेऊन पूर्वी क्षेत्रा हून पत्र आपणास गेले आहे त्या प्रमाणे वहिवाट ठेवावी सूज्ञा प्रति विशेष काय लिहिणे हे नमस्कार व अनुक्रमे आशीर्वाद मिति १७७९ वैशाख शुद्ध १०
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २२७
१७७८ फाल्गुनवद्य १३ बाळबोध
श्री
वेदमूर्ति राजश्री समस्त ब्रह्मवृद व देशमुख व देशपाडे व ज्योतिषी व कुळकर्णी व राजकीय ग्रहस्थ मौजे काशेगाव याशि
समस्तब्राह्मणक्षेत्रकरहाटकस्थकृत नमस्कार व अनुक्रमे अशिर्वाद विशेष पूर्वी पासून आचारव्यवहारपदप्रायश्चित्त कर्ण्याचा अधिकार क्षेत्राचा पूर्वापार असून त्या प्रमाणे वहिवाट चालत अस्ता पेशजी जगनाथपत हासबनिस याज वर काहि अरोप अला होता ते समयी शिराळकर यानि क्षेत्राची अवज्ञा केली तेव्हा क्षेत्रस्थमडळी जाउन शिराळकर याचा कागद लेहून घेतला त्यात हाशील की क्षेत्राचे अज्ञे प्रमाणे वागणूक करू आणि पदप्रायश्चित पूर्वी पासून तुह्मी करित अला त्या प्रमाणे तुह्मी करावे असा अहे नतर मशारनिले हासबनीस याज कडून प्रायश्चित करउन शुध केले असे असून हाली विनाकारणी शिराळकर दाडगाहि करतात या स्तव ते क्षेत्राचे द्रोही अहेत
त्यास शिराळकर व बिळासकर ज्योतिषि याचे घरी कोणी अन्नोदकव्यवहार येकपक्ति करू नये असा निर्बध ठेवावा आणि श्रीस्वामिशकराचार्य याचे पत्र शिराळकर यानी आणिल्यास मान्य करू नये अणि पत्राचे उत्तर यावे कळावे हा नमस्कार व अनुक्रमे अशिर्वाद शके १७७८ फालगुणवद्य १३
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २२६
१७७८ फाल्गुन शु ।। ५
बारनिशीपत्रक देहाय गावगना, निर्बधपत्र पाठविली त्याचा तपशील
नाना व सिताराम भेट उब्राणी पालकर या देशात , साप्रदाय नसून मठाधिपत्याचे पत्र श्री.स्वामीकडून करून घेतले त्याजबद्दल निर्बंधपत्रे पाठविली ती बी ।। आरलेस, हरीपत मोकासी याज बा॥
१ मौजे तारले पत्रे गेली ती बी।। १ मौजे पाल १ मोकदमास
१ मौजे इदुली १ हरीपतास
१ मौजे उब्रज १ बापूनाईक
१ मौजे चरेगाव १ शामराव देशपाडे
३ मौजे कासीळ १ आपा दाजी देशपाडे
१ बोरबन १ राणूबाई मोकसीण
१ मौजे तालुके तारगाव १ चरण मोकदमास
१ मौजे वेणेगाव ३ कुरले पत्रे
१ मौजे अतीत १ मोकदमास
१ मजरे तुकाईचीवाडी १ बाबाजी अराणके वालीत
१ मौजे चाफळ १ बलवत आपाजी शुधपत्र
१ सस्थान चाफलकर बवा
१ मौजे पाडली
१ मौजे निनाम
१ सासपड
१ मिरली व चोरे
१ चोरे कालगाव
१ सिरगाव
सदर गावास पत्रे लिहिली त्यातील हशील मजकूर वो। रो। नाना व सितारामभट बिन कृष्णभट उब्राणी वा। मजकूर याणी इकडील देशातील पूर्वी पासून साप्रदाय मठाधिपत्याचा नसून श्रीस्वामीजगद्गुरु याज पासून मठाधिकाराचे आपले नावे मशारनिलेनी पत्र करून घेतले त्यावेलेस पाली मुकामी आमचे क्षेत्रा पैकी मडळी तेथे होती त्याणी श्र जगद्गुरूचे समक्ष मा।रनिलेस ताकीद केली नतर ते समयी पत्र राहिले पुढे त्यानी आह्मास न कलता परभारे नेहले हा मजकूर क्षेत्री श्रुत जाहल्या वरून तुह्मास लिहिले आहे त्यास पदप्रायश्चित्तआचारव्यवहार वगैरे जे करणे ते क्षेत्राहून होत आले याची माहिती आपणा हि आहे असे असून क्षेत्राचा अधिकार आपण करावा ह्या दुर्बुद्धीनें पत्र करून घेतले हा मजकूर क्षेर्त्री श्रुत जाहला या स्तव ते क्षेत्राचे द्रोही आहेत याज करिता आपणास लि॥ आहे तरी भटजी उब्राणी यासी व याचे घरी येकपक्ती अन्नोदकव्यवहार न करणे असा निग्रह ठेऊन पत्राचे उत्तर पाठवावे व पुन त्याज विसी स्वामीचे पत्र आले असता कोणी मानू नये कळावे बहूत काय लिहिणे हे नमस्कार व अनुक्रमे आशीर्वाद मिति शके १७७८ फाल्गुनशुद्ध ५ सदर्हू प्रो। वर गाव लिहिले आहेत त्यास पत्रे लिहिली असेत
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २७१ श्री १६०३ आश्विन शुध्द १३
*
श्रीसकलगुणमंडित अखंडित लक्षुमी प्रसन्न राजमान्य राजश्री गणोराम देशाधिकारी व देशलेखक प्रांत कुडाल वर्तमान व भावी गोसावी यासि पोष्य मोरेस्वर पंडितराय नमस्कार सु॥ इसन्ने समानीन अलफ राजाभिषेक शके ८ दुमर्ती नाम संवछरे आस्वीन सूध त्रयोदसी मंदवार वेदमूर्ति अनंतभट मादेभट वस्ती मौजे कांदळगाउ ता। मसुरे ब्राह्मण योग्य वैदिक निराश्रित ऐसे देखोन दरमाहे देविले तांदूल कैली कोठी मापे .lll.l.५। जावेरी भट गोसावी ++१ करतील तोवेरी प्रतीवर्षी परामर्श घेउनु मण आदा करणे प्रतिवर्शी नूतनपत्राचा आक्षेप न करणे प्रती लिहून घेउनु मुख्यपत्र भट गोसावी याजवली देणे रा। छ ११ माहे साबान मोर्तबसुद हे विज्ञाप्ति
बार सूद बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २२५
१७७८ फाल्गुनशु॥ ५
श्री नकल
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृद श्रीक्षेत्रवैराज याशि
प्रति समस्त ब्रह्मवृद करहाटकक्षेत्र साष्टाग नमस्कार येथील क्षेम तागाईत फाल्गुन शुद्ध ५ मी पावे तो सर्व वृत्त यथास्थित असे विशेष वो। नाना बिन कृष्णभट व सिताराम बिन कृष्णभट, उबराणी पालकर व शिराळकर भिक्षुक व गृहस्त याणी क्षेत्राची अवज्ञा करून नवीन पदप्रायश्चित वगैरे करितात व मशारनिले याणी मठाधिपतीचे नवीन पत्र साप्रदाय नसता करून घेऊन आह्मी क्षेत्रस्थ ह्यणून धटाई करितात यास श्री क्षेत्र मजकूर येथून वर लिहिले असामीस अन्नोदकव्यवहारा विषी निर्बधपत्रे गावगन्ना गेली आहेत तरी आपणास लिहिले आहे त्यास आपण क्षेत्री व आपले प्राती पालकर उभयता असामी व शिराळकर भिक्षुक व ग्रहस्थ यास अन्नोदकव्यवहारा विषई निर्बध ठेवावा क्षेत्राचा अभिमान क्षेत्रानी ठेविला पाहिजे या पत्राचे उत्तर यावे सुज्ञा प्रति विशेष काय लिहिणे लोभाची वृद्धि असावी मिति फाल्गुन शुद्ध पचमी शके १७७८ नळनामसवत्सरे हे नमस्कार
समत मुख्य असामींच्या
१ रघुनाथ दीक्षित गिजरे १ अनताचार्य घळसासि
१ रामकृष्ण दीक्षित गिजरे १ बाबाचार्य काळे
१ जगन्नाथ श्रौति ग्रामउपाध्ये १ सिद्धेश्वर दीक्षित गरूड
१ नारायण भट वैद्य १ मोर जोशी अणा
१ बाळभट अरणके १ बाबू दीक्षित वळवडे
१ बाबा दीक्षित गिजरे १ दादा दीक्षित उबराणी
१ भाऊ दीक्षित, ढवळीकर १ नाना विदार
१ राघवाचार्य टोणपे १ कृष्ण दीक्षित उब्राणी
१ दादा दीक्षित अटकेकर १ सखारामभट ढवळीकर
१ दादा दीक्षित गिजरे १ भाऊ निंळकट देशपाडे
१ भाऊ दीक्षित गिजरे १ बाळभट विदार
१ नारो आपाजी देशपाडे १ उद्धव जोशी
१ मोर दीक्षित अयाचित १ नारो पात्धे
१ गोविंद दीक्षित अटकेकर १ शिऊ पाठक
१ रामदेव १ गोविंद चार्य घळसासि
१ विनायक दीक्षित गिज्रे १ वामनाचार्य टोणपे पुराणिक
१ श्रीधरशास्त्री बहिरे १ बाळकाचार्य जगी
१ गणेशभट ग्रामउपात्धे १ दाजी दीक्षित उब्राणि
१ गोपाळभट ढवळीकर १ तात्याचार्य घळसासि
१ विष्णुशास्त्री सप्रे १ बाळकोबा ढवळीकर
१ कृष्णाचार्य कवटी १ मार्तड दीक्षित उबराणि
१ केशवभट राम पाटणकर १ बाबू भट लाटकर
१ केशवभट रायपाटणकर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २२४
१७७८ श्रावणशु॥ १३
श्री
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृद क्षेत्रकराड स्वामीचे सेवेसी
सेवक सिताराम माणकेश्वर बोकील इनामदार मौजे उपलव का। मायणी कृतानेकसिरसाष्टाग नमस्कार विनति विज्ञापना ता। श्रावणशु।। १३ पावे तो आशीर्वादे करून सुखरूप असो वि॥ आह्मी कराड मुकामी आमास येकपक्ती अन्नोदकवेवार होऊन पावन केले मौजे मजकुरी आमचे घरी वहिवाट कर्ण्या विषयीचा बदोबस्ता विसी नरसो अणा व पाडोबा तात्या ग्रामउपाध्ये या उभयेतास पा। त्याणी गावची वहिवाट चालू केली नाही सबब श्रावणी उभयता पो। पाडोवातात्या याणी करून नतर जावे अशा करारा प्रो। उलगडा करावा आशि गावचे बदोबस्ता विसी आपल्यास कळवून वहिवाट चालू करावी असे ठरले असून अन्नपानावर बसावयाचे वेलेस ऐवज पदरात घातल्या खेरीज तुमचे घरी जेवणार नाही असे बोलल्या वरून आमची खातरी नसेल तर निशा सावकारी देतो अगर तुमचे बरोबर शिपाई देऊन बोलल्या प्रो। उलगडेल असे बोललो असता कोणती हि गोष्ट कबूल न करिता निघोन गेले त्यास मज कडून बोलल्या जाबात व्यत्यय येणार नाही अशी खातरी श्रीस हि आहे व आपणास हि आहे असे असोन विटबना कर्णे नीट नये माझा श्वीकार केला च आहे हा अभिमान वागविण्याचा असल्यास सर्व बदोबस्त कर्णे आपल्या कडेस आहे मी बोलल्या प्रमाणे व्यत्यय आणीन तर श्रीची च शफत असे सर्वस्वी आधार आपला आहे जसा साभाळ कर्णे असेल तसा लौकिक सौरक्षण करून करावा तात्या कमजाजती मजकूर सागून माझे विसी वित्यय आणितील त्यास वित्यय येऊ नये
सेवेशी श्रुत होय हे विज्ञापना
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २२३
श्री
नकल बद
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णाजी सदाशिव कुलकर्णी मारुलकर यासी
समस्त ब्रह्मवृद सातारकर अनेक आशीर्वाद विा तुह्मी सातारा मुकामी येऊन विदित केले जे भिमाबाई बारामतीकर इचे कन्येशी शके १७७५ फाल्गुनशु।। ८ चे दिवशीं मौजे वरठेमुकामी भिमाबाई बारामतीकर इचे कन्येशी मी खुद विवाह केला नतर शके १७७७ श्रावणमासी भिमाबाई गारवडास आली तेथे तिच्या कुळाचा व तिच्या जातीचा व कन्या कोणा पासून झाली वगैर सर्वानी अदेशा घेतल्या नतर विचार करिता भिमाबाईबरोबर हाली एक वृद्ध पुरुष आहे त्याला भिमाबाई माझा पति असे ह्मणती परतु सभेत आणून उभयतास विचारता भिमाबाई पत्नी व हा भर्ता व आह्मी केली ही कन्या विवाहित पती पासून जाहली असा पुरावा त्याज कडून आला नाही त्याज वरून आह्मी त्या कन्येचा परित्याग करून सर्व शिष्टास शरण आलो तरी सर्वांनी कृपा करून विजातीय कन्येशी विवाहससर्गदोष घडल्या पासोन प्रायश्चित्त देऊन मुक्त केले पाहिजे ह्मणोन विदित करून लिहून दिल्हे त्याज वरून सर्व शिष्टानी तुमचा अनुताप व तुमची शक्ति पाहून श्रीलक्ष्मीनारायणाचे देवालयात समस्त विद्वत्समाजे द्वब्दप्रायश्चित विधिपूर्वक देऊन + + + +