लेखाक २०६
१७७९ फाल्गुनशु॥ ६
श्रीशंकर
।। श्री।।
श्रीमच्छकराचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्याशकरभारती-
स्वामिकरकजोद्भवश्रीविद्यानरसिहभारतीस्वामिकृतनारायण-
स्मरणानि
राजश्री वहिवाटदार व पाटीलकुलकर्णी व पोलीसकामगार देहाय गावगनासि विशेषस्तु शक १७७९ पिंगलनाम सवत्सरे मठ सकेश्वरा हून वेदशास्त्रसपन्न राजश्री नरसिह दीक्षित ग्रामउपाध्ये कराडकर हे अपले घरी कराडास जात असून बराबर त्याचा चिरजीव एक १ व गडी असामी एक १ बीनहत्यारी व घोड एक १ एणे प्रमाणे आहे त्यास मार्गी जातानी कोणी हरकत करू नये हा दाखला अज पासून पधरा दिवस पर्यत चालेल तेरीख छ ४ माहे रजब फालगुण शु॥ ६ महानुशासन वरीवर्ति