Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

लेखाक २२२
१७७४ माघवा। १४

श्री
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्राह्मण क्षेत्रकराड स्वामीचे शेवेसी

विद्यार्थी मोरभट बिन पाडुरगभट जोशी का। काले साष्टाग नमस्कार विज्ञापना तागायत माघशु।। १३ आपले कृपे करून सुखरूप असो विशेष आमचे चुलते वो।। राजश्री हरभट जोशी कानेरे याचा मुलगा बाबाजी हा अदमासे सोळा सत्रा वर्षे घरात वेड लागून कोठे बाहेर गेला तो मृत्य पावला त्याचे क्रियाकर्मातर हरभटजी करीत नाहीत असे वाटते त्याचे कारण खाली लिहिले असे त्या वरून ध्यानास आणा जो पिशाच्च जाला आणि आमचे बहिणीचे आगात येऊन त्याणे आपले नाव सागितले आणि याने क्रिया करावी ह्मणजे मी गती घेतो असे बोलला परतु ते काहीच करीत नाहीत आमची बहीण त्या पिशाच्याने मारली या स्तव हाली मन कुठित आहे तर भटजी याणे आपले लेकाचे क्रियाकर्मातर करीत नाहीत यास्तव याज वर बहिष्कार घालावा ह्मणजे ते क्रिया करतील आणि पिशाच गति घेईल हाली ते आह्मास उपद्रव करीत आहे या स्तव या वेळी तजवीज फार जरूर जाहाली पाहिजे ही अर्जी लिा।। सही तारीख १८ फेब्रुवारी १८५२ इसवी त्याज कडून क्रिया करविली पाहिजे ता। मा।र
                                    सही मोरेश्वरभट जोशी दस्तूर खुद
                                    साक्ष

                                   १ गोपालभट बिन गोविंदभट जोशी
                                    कालेकर दस्तूर खुद
                                   १ बाळकृष्णभट बिन नारायणभट
                                   येळगावकर राहणार वस्ती मजकूर दस्तूर खुद

                                   १ पाडुरगभट बिन आत्मारामभट
                                   डोइफोडे चोरगावकर हाली वस्ती मौजे काले

                                   १ गोविंदशास्त्री चिवटे दस्तूर खुद

लेखाक २२१
१७६६ आश्विनवा। १३

श्री
रुजू पुरुषोत्तमाचार्य हस्ताक्षर खुद
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्राह्मण क्षेत्रकराड यासी

प्रीतीपूर्वक समस्त आचार्य कालगावकर विशेष रो। बापू त्रिंबक मसूकर याणे समस्त देहाय व भोरगाव यास क्षेत्राचे पत्र आणून लाविले त्यात मजकूर रो। रो। रावजी व्यास व अताचार्य कालगावकर व हरभट बुधकर मसूरकर या त्रिवर्गाखेरीज करून पूर्ववत् प्रमाणे अन्नोदकव्यवहार करीत जाणे ह्मणोन ता। तारगाव व ता। उब्रज यास पत्र आणून लाविले त्याज वरून आह्मी समस्त आचार्य क्षेत्री आलो त्यास नारोपत भगवत कुलकर्णी यास स्थलसुध्यतीर्थ आह्मी दिले व पुढे मसुरात तटा जोती भगवता ब॥ जाहला त्याज वरून गुडभट आला त्यास आह्मी तीर्थ मागितल्या वरून दिले क्षेत्रस्थाचे अधिकारसबधी अन्य गावात तीर्थ दिले नाही अन्य गावात दिले असे जाहल्यास तुह्मी सागाल त्या प्रमाणे वागू कळावे बहुत काय लिहिणे ही विनती मिती आश्विनवा। १३ सके १७६६
रुजू आचार्य मडळी
हस्त आक्षर बाबाजीचार्य बिन रा-          १ अनताचार्य बिन वासुदेवाचार्य
वजी व्यास आचार्य                             १ व्यकटाचार्य बिन मधुसुदनाचार्य
१ सितारामाचार्ये                                १ दादाचार्य
                                                     १ रुजु अनताचार्य हस्त अक्षर खुद

लेखाक २२०
१७६६ आश्विनवद्य १२ बाळबोध

श्री
क्षेत्रक-हाड यास
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजेश्री अणादीक्षित उबराणि
व तथा गोविददीक्षित भाउ गरुड व नागेशदीक्षित
ढवळिकर व रघुनाथदीक्षीत गिजरे परमाप्तवर्येषु

प्रीत्यभिलाषुक माधवाच्यार्य व पुरुषोत्तमच्यार्ये कालग्रामकर कृतानेक विनति विशेष अमचे बधुवर्गातिल रावजि व्यास व अनताच्यार्य हे उभयता ग्रामण्या विशि प्रमुख होऊन तुमचा क्षेत्रधर्माचा अवलब करुन मसुरकर हरभट बुधकर यास सामिल घेउन गावच्यास व परगावच्यास रावजि भगवत कुलकर्णि कवठेकर याच्या पक्ति समधे सासर्गिक दोष ठेउन तीर्थ देउन शुत्धपत्र देतात ये विसि मजकुराचे पत्र पूर्वी वो। राजेश्री बापु त्रिबक याज बराबर पाठविल्ले त्याज वरुन व बापुनि हि मुखजवानि मजकूर सागीतला त्या वरुन अपण प्रातास पत्र पाठविल्ले ते मसूरकर ब्राह्मण यानी सर्वास कळउन अह्मा ही विदीत केले त्यास ब्राह्मण्यधर्मसस्थापक आपण आहा त्या पेक्षा जे असे ग्रामणी आहेत याची पुरी चौकसी जाहाल्या सिवाय मुक्तपत्र होउ नये अनन्वित करणारास जी शिक्षा होणे ती असे आचर्ण पुन. न करीत असे घडावे आपले पत्र आले ते अह्मास मान्य नाही व क-हाडक्षेत्रस्थाचा अह्मा वर अधिकार नाही अश्या अनेक प्रकारे आमचे बधुवर्ग भाषणे करीत आहेत या प्रमाणे मजकुर आहे आवरोध निवृत्त जाल्या नतर अह्मी क्षेत्रास येणार अव्हो अल्या नतर सर्व मजकूर कळेल सूज्ञा प्रति विशेष काय लिहावे हे विनति मिति शके १७६६ अस्वीनवद्य १२

लेखांक २७०                                                                                                                                                     १५७५ कार्तिक शुध्द २                     

अजरख्तखाने खुदायवंद सेख अजम सेख अली से अबदुल अजीम सालबलाई वाडीकर मा। आगसी तपे अठागर मामले पाछाबाद उरुफ चेऊल सु॥ अर्बा खमसैन व अलफ कारणे वालजी हरिदास खोतु मा। तहूक मामले मजकूर यासि कतबा लेहौनु दिधला ऐसा जे तुह्मापासुनु कर्ज घेतले लारी २२५ यासि मु॥ १२ माह इ॥ छ १ जिल्हेजु ता। छ ३० जिलकादी सन खमस खमसैन यासि ये स्थल ऐवज रो। भंडारीवाडी ठेह दरोन टके ॥। सदरहू मुदतवेरी तुह्मास दिधला असे उगवणी करणे यासि खुर्दा रमारमी हरकारेस टका १॥९ प्रमाणे दिधले असती पैकी मुदती मजकुरी पाटेलकी १०० भंडारी जाये दले तरी तुह्मास आह्मी मुबदला देउनु याखेरीज मुदतीस का। सवासे राहेल त्यास गाहण भागालीसलाठी दो सुपारिआ दिधली असे भादवेयामधे सुपारी प्रभावळी करुनु देउनु बाकी सदरहूचे पाठी राहेल ते सदरहू अखेर मुदतीस देउनु देऊ न सको तरी सदरहू पैकेयास पुढिले साली सारोन भंडारी भायनाक तो हि तुह्मास दिधला असे हा तह सही

२२५

गोही

(पुढे कागद फाटला आहे)

लेखाक २१९
१७१३ माघवद्य ११

श्री

श्रीमद्रमारमणचरणसपर्यापरायणात करण राजमान्य राजश्री देशाधिकारी व देशमुख व देशपाडे व राजकीय ग्रहस्त व ब्राह्मणसमुदाय वास्तव्य को। खटाव व मौजे कुरुड व मौजे वडूज यासि

स्नेहयुक्त समस्त ब्राह्मण क्षेत्रकरहाटक कृतानेकाशिष सतु विशेष सखभट बिन जिऊभट व मुगरभट बिन जिवभट जोतिषी व रत्नाकर त्रिमळ कुलकर्णी मौजे वडूज प्रातमजकूर या त्रिवर्गास शुद्धपत्र देऊन तुह्मा कडे पाठविले होते त्यास मागाहून येका दोघानी पत्र पा। की आह्मास कळले नाही ह्मणून जिवभट उभयता क्षेत्रास आले त्याज वरून पुन ज्यानी पत्र लिहिले होते त्याची एकवाक्यता करून तुह्मा कडे पत्र देऊन पाठविले आहेत तर पूर्वी शुत्धपत्र दिल्हे आहे त्या प्रमाणे येकपक्ति अन्नोदकव्यवहार करणे तेथे क्षेत्रस्थ ब्राह्मण येऊन अन्नोदकव्यवहार करण्या विषई दिक्कत न करणे त्यास येथे च पक्तिपावन करून पा। आहेत तर मधील पत्राचा सशय न धरणे मिति शके १७१३ विरोधकृतनामसंवत्सरे माघवद्य ११ हे आशीर्वाद

हा प्रसंग शक ९९८ च्या सुमारास घडला. जयकेशी कदंब व माम्वाणि शिलाहार हे दोघे हि कल्याणीच्या चालुक्यांचें मांडलिक होते. तेव्हां ह्या मांडलिकांतील हा प्राणघेण्या बखेडा चालुक्य सम्राटांनीं निमूटपणें कसा चालूं दिला, अशी शंका येण्याचा संभव आहे. परंतु शक ९९८ त चालुक्यांच्या राज्यांत गादी करितां आपसांत भांडण उपस्थित झालें होतें. पहिल्या सोमेश्वर चालुक्याचे सोमेश्वर व विक्रमादित्य असे दोन मुलगे होते, वडील सोमेश्वर व धाकटा विक्रमादित्य. सोमेश्वर हा ऐदी, थंड व संशयी माणूस होता. विक्रमादित्य त्याच्या अगदीं उलट स्वभावाचा म्हणजे साहसी, पराक्रमी व लोकप्रिय होता. सोमेश्वराच्या बाजूला ठाण्याचा शिलाहार माम्वाणि असून, विक्रमादित्याची साथ जयकेशी कदंब करीत असे. विक्रमादित्याच्या सोमेश्वराशीं ज्या शेवटच्या झटापटी झाल्या त्यांत जयकेशी कदंबानें सोमेश्वराचे भिडू जे राजेन्द्र चोल व माम्वाणि शिलाहार त्यांचा पराभव करून, माम्वाणि शिलाहाराला ठार करून टाकलें. अश्या त-हेनें उत्तरकोंकण ऊर्फ कवडीद्वीप जयकेशी कदंबाच्या ताब्यांत शक ९९८ च्या सुमारास गेले. तें सुमारें पंचवीस वर्षे कदंबाच्या अंमला खालीं होतें. पुढें शक १०१६ च्या सुमारास माम्वाणि शिलाहाराचा पुतण्या व नागार्जुन शिला हाराचा मुलगा जो अनंतपाल शिलाहार त्यानें जयकेशी कदंबाचा पुत्र जो पहिला विजयादित्य कदंब त्याला हटवून उत्तरकोंकणचें म्हणजे कवडीद्वीपाचें आपलें राज्य परत घेतलें; परंतु, थोड्या च अवधींत कदंबांनीं कवडीद्वीपाचें पुन: आक्रमण केलें (शक १०४८).दहा पांच वर्षे उत्तरकोंकण कदंबांच्या ताब्यांत राहिल्या वर, अपरादित्य शिलाहारानें तें पुनः हिसकावून घेतलें; असा गोंधळ उत्तर कोंकणांत पन्नास वर्षे चालल्या मुळें, शिलाहारांची सत्ता अगदीं डळमळून गेली व देश सर्वस्वीं नागविला जाऊन केवळ अरण्यमय झाला. शिलाहारांच्या अश्या हलाकीच्या काळांत शक १०६० त चांपानेरच्या बिंबोपनामक क्षत्रियांनीं उत्तरकोंकणा वर स्वारी करण्याचा घाट घातला.

१३. शक १०६०त कल्याणी येथें तिसरा सोमेश्वर भूलोकमल्ल चालुक्य सर्व दक्षिणापथाचें साम्राज्य करीत होता. मानसोल्लास ऊर्फ अभिलषितार्थचिंतामणि नामक ग्रंथाचा कर्ता जो सोमेश्वर चालुक्य तो हा च. ह्याचा कल राज्यरक्षणा पेक्षां साहित्यशास्त्रसेवे कडे विशेष होता. ह्याच्या कारकीर्दी नंतर चालु क्यांच्या सद्दीला ओहोटी लागली, कलचुर्यांनीं कल्याणीचें राज्य बळकाविलें, बसव लिंगायतानें बखेडा केला व त्या बखेड्याच्या घालमेलींत कलचुर्यसत्ता संपुष्टांत आली. ह्या च अवधींत अणहिलपट्टणास प्रख्यात सिद्धराज जयसिंह चौलुक्य हा कर्ता पुरुष राज्य करीत होता व त्याचा प्रसिद्ध पुत्र कुमारपाल चौलुक्य पांच वर्षांनीं आपली विजयी कारकीर्द सुरू करणार होता. म्हणजे ह्या कालीं कल्याणीच्या चालुक्यांची सत्ता क्षीण होत जाण्याच्या मार्गास लागली होती आणि अणहिलवाडच्या चौलुक्यांची सत्ता ऐन विजयश्रीच्या भरांत होती. अणहिलवाडच्या अश्या भरभराटीच्या उमेदींत चौलुक्यांचें मांडलिक जे चांपानेरचे बिंब राजे त्यांनीं उत्तरकोंकणा वर चढाई करण्याचा मनोदय शक १०६० त केला. ह्या मनोदयानें चौलुक्यांचे मित्र जे गोव्याचे कदंब त्यांची हि बाजू उचलल्या सारखी झाली. युद्धयात्रेला मुहूर्त आश्विन-कार्तिकांतील न धरतां, मुद्दाम माघफाल्गुनांतील धरला. कारण, उत्तरकोंकणांतील सरदगर्मी व तापसराई माघ महिना उजाडे तंव वर निखालस संपत नाहीं. माघशुद्धांत दोन मुहूर्त होते; एक वसंतपंचमीचा दुसरा रथसप्तमीचा. पैकीं पंचमीला मंदवार पडत असल्या मुळें, सप्तमीचा मुहूर्त पसंत ठरला. ह्या शुभ मुहूर्ता वर चांपानेर पंच्यायशी वर राज्य करण-या गोवर्धन बिंबानें आपला धाकटा भाऊ प्रताप बिंब ह्याज समागमें दहा हजार घोडा देऊन स्वारी सिद्ध केली. दहा हजार घोडा या शब्दांनीं केवळ दहा हजार घोडेस्वार असा अर्थ घ्यावयाचा नाहीं. पाईक, बाजारी, बुणगे, वगैरे उपसाहित्याचे सर्व लोक मिळून, सैन्यसंख्या सुमारें दहा हजार होती, एवढा च अर्थ लक्षित आहे. खरे ऐन लढवय्ये घोडेस्वार सुमार पांच चार हजार असावे. स्वारीस निघण्याच्या संकल्पाचा दृढाव गोवर्धन बिंबानें आपला मुख्य सेनापति नाईकराव व मुख्यमंत्री रघुनाथराव ह्यांच्या संमतीनें केला. प्रताप बिंबा बरोबर पूर्वप्रघातानुरूप राजगुरु ऊर्फ राजपुरोहित हेमाडपंत चामरे ऊर्फ चावरे ह्यांस सल्लामसलती करितां दिलें होतें. पुरोहिता खेरीज आणीक आधकारी प्रताप बिंबाला जे गोवर्धन बिंबानें नेमून दिले त्यांची नांवनिशी अशी:--- (खालील तक्ता वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

लेखाक २१८
१७१२ कार्तिकवा। १२
बाळबोध


श्री
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री बाजीदीक्षित गिजरे या प्रती
येसजोशि बिन नानाजोशि सप्रे वा शेटेतरप सवदळ नजीक राजापुर कृतानेक साष्टाग नमस्कार विज्ञापना ऐशि जे आह्मी आपल्यास तीर्थउपाध्यपण लिहोन दिल्हे असे आमचे वशीचे कोणी तीर्थास येतील ते तुह्मास उपाध्यपण देतील पूर्वी आमचा वडिलानी लिहोन दिल्हे असल्यास हे पत्र रद असे बहुत काय लिहिणे कृपा लोभ करावा हे विद्यापना मीती शके १७१२ साधारणनामसवत्सरे कार्तिकवा।। १२ भृगुवार लक्ष्मीनृसिह

१२. शक १००० पासून शक १०६५ पर्यंतच्या काळांत गुजराथ, महाराष्ट्र व कोंकण या प्रांतांत जे मुख्य राजे व उपराजे झाले व ज्यांचा संबंध प्रकृत इतिहास भागाशीं प्राधान्यानें येतो त्यांच्या राजांच्या नकाशाची स्थूल रूपरेषा खालील रेखाटणी - तल्या प्रमाणें होती.

चौलुक्य ऊर्फ सोळंकी ह्यांचें राज्य सरस्वतीनंदी पासून लाटदेशापर्यंत पसरलेले होते. चालुक्यांचें बडें साम्राज्य नर्मदे पासून कुमारी पर्यंतचा विस्तीर्ण प्रदेश व्यापून राहिलेलें होतें. शिलाहारांचें मांडलिक राज्य क-हाड-कोल्हापुर व उत्तर कोंकण ह्या दोन टापूं वर दोन शाखांनीं मंडित झालेलें होतें. आणि हाळशीचे कदंब दक्षिण कोंकणांतील शिलाहारांच्या गोवेप्रांता वर आपला अंमल नुकताच बसवून उत्तरकोंकणा कडे दृष्टि फेंकीत होते. शक १००० च्या सुमारास अशी राजकीय स्थिति गुजराथ, महाराष्ट्र व कोंकण या प्रांतांत होती. ही राजकीय स्थिति कशी बनत आली तें पाहिल्या शिवाय शक १०६० त प्रतापबिंबानें उत्तरकोंकणा वर स्वारी करण्याचा घाट कां घातला तें नीट उलगडणार नाहीं. मालखेडच्या राष्ट्रकूटांचें राज्य शक ८९६ त जेव्हां चालुक्यचक्रवर्ती नुर्माडितैलानें आक्रमण केलं, तेव्हां राष्ट्रकूटांच्या साम्राज्यांतील बहुतेक सर्व प्रांत यद्यपि त्याच्या अंकित झाले तत्रापि गुजराथेंतील लाट देश त्याच्या पंजा खालीं आला नाहीं. राष्ट्रकूटांच्या अंमला खालील लाट देश अणहिलवाडच्या चौलुक्यांनीं ऊर्फ सोळंकींनीं राष्ट्रकूटांच्या हलाकीच्या दिवसांत आपल्या घशांत जो एकदा घातला तो नुर्माडि-तैलाच्या कारकीर्दीत हि सोडला नाहीं. चौलुक्यांचें व चालुक्यांचें वैर उत्पन्न होण्यास व ते अक्षय्य टिकण्यास लाटदेश कायमचा कारण होऊन बसला होता. चौलुक्यांच्या हातांत राहो कीं चालुक्यांच्या हातीं जावो, कोणत्या तरी एका पक्षाच्या असंतोषाला त्याचें अस्तित्व सदा भरती आणी. ह्या सहज शत्रूं पैकीं चालुक्यांच्या बाजूला क-हाड, उत्तरकोंकण व दक्षिणकोंकण ह्या तीन प्रांतांतील शिलाहार राजे असत. राष्ट्रकूटांचें राज्य नुर्माडितैलानें जें पादाक्रांत केलें त्यांत त्याला क-हाडच्या शिलाहारांचें साहाय्य झालेलें होतें. तशांत उत्तर कोंकणांतील शिलाहारांजा प्रांत तर लाट देशाला अगदीं भिडून होता. सबब, प्रातिवेशिकधर्मानें ठाण्याच्या शिलाहारांचें व अणहिलवाडच्या चौलुक्यांचें सहज वैर बनून गेलें होतें. असा बनाव बनून गेला असतां, अणहिलवाडच्या चौलुक्यांनीं कल्याणच्या चालुक्यांची व शिलाहारांची जूट फोडण्याचा प्रयत्न केला. क-हाड, उत्तरकोंकण व दक्षिणकोंकण, अशीं शिलाहारांचीं तीन संस्थानें होतीं. पैकीं क-हाडकर शिलाहार चालुक्यांच्या मैत्रीला सोडून जाणा-या पैकीं नव्हते. ठाणेकर शिलाहार शेजारपणा मुळें चौलुक्यांच्या स्नेहाची अपेक्षा कधीं करतील हा संभव च नव्हता. राहिले चंद्रपूरचे दक्षिणकोंकणांतील शिलाहार. त्यांना अणहिलवाडकरांनीं जुटींतून फोडिलें व आपल्या भाऊबंदांच्या व चालुक्यांच्या कुशींत एक पीडा उत्पन्न करून ठेविली. चंद्रपूरकर ऊर्फ गोवेंकर शिलाहारांना ह्या दुष्कर्माचें लवकरच प्रायश्चित्त मिळालें. शक ९३९ च्या सुमारास ठाण्याच्या केशिदेव अरिकेसरी नांवाच्या शिलाहारानें गोव्याच्या रट्टराज शिलाहाराला जिंकून त्याचें राज्य कायमचें खालसा केलें. ह्या कृत्यानें उत्तरकोंकण व दक्षिणकोंकण अशीं दोन्हीं कोंकणें शक ९३९ च्या सुमारास उत्तरकोंकणीय शिलाहारांच्या राज्यांत समाविष्ट झालीं व अणहिलपट्टणच्या चौलुक्यांचा एक स्नेही अजीबात नष्ट होऊन त्यांचें पारडें हलकें पडलें. दक्षिण कोंकण ठाण्याच्या शिलाहारांच्या ताब्यांत शक ९३९ च्या पुढें चाळीस पंचेळीस वर्षे राहिलें. त्या अवधींत अणहिलवाडच्या चौलुक्यांनीं हाळशीच्या कदंबाचीं उठावणी केली व त्यांच्या कडून दक्षिण कोंकणावर चाल करविली. हाळशीच्या कदंबांत जयकेशी कदंब या नाभें करून एक मोठा शूर व साहसी पुरुष निर्माण झाला. त्याची मुलगी मयाणल्लदेवी अणहिलवाडच्या कर्ण चौलुक्यानें वरिली आणि कदंब व चौलुक्य ह्या दोन घराण्यांचा शरीरसंबंधानें दृढतर स्नेह जुळवून आणिला. मुख्यतः ह्या स्नेहाच्या पाठिंब्या वर व गौणतः स्वत:च्या जोरावर जयकेशी कदंबानें केवळ दक्षिण कोंकण च तेवढें जिंकलें असें नव्हें, तर उत्तरकोंकण ऊर्फ कवडीद्वीप चुरडून तेथील राजा जो माम्वाणी शिलाहार त्याचा जीव घेतला.

निरूपणाच्या भरांत शक १०६० पासून शक १३७० पर्यंतच्या ३१० वर्षांत राजकीय घडामोडी बरोबर सामाजिक पडझड काय व कोणती झाली तें सांगितलें. बिंब राजे उत्तम, अमदाबादेचे मुसुलमान पातशाहा अधम किंवा पोर्तुगीज लुच्चे, हा राजकीय इतिहास निवेदन करण्याचा केशवाचार्याचा मुळीं च कटाक्ष नव्हता. भगवान् दत्त व केशवाचार्य ह्यांची दृष्टि ही अशी सामाजिक व धार्मिक असल्या कारणानें, राजकीय इतिहासकथेंत फेरबद्दल, अफरातफर, आवडनिवड किंवा वगळावगळ ह्या दोघांच्या हि हातून झाली नाहीं, बखरींच्या रचनेचा व संकलनाचा हा असा प्रकार असल्या मुळें, शक १०६० पासून शक १४२२ पर्यंतच्या कालांतील महिकावतीच्या राज्यांतील राजकीय ऐतिहासिक व्यक्तींच्या नांवांची लब्धि जितपत अकलुषित व्हावी तितपत होण्याची सोय आपणास सुदैवानें लाभली आहे. अमदाबादच्या पातशाहांच्या नांवांचे अपभ्रंश बखरींत आढळतात, परंतु ते कोणत्या मूळ नांवांचे अपभ्रंश आहेत किंवा निव्वळ कल्पित अहेत ते विशेष प्रयास न पडतां अंधुकपणें ओळखतां येतात. ह्या पलीकडे व्यक्तिनामांचा अपभ्रंश बखरींत फारसा आढळत नाहीं.

११. एणें प्रमाणें काल, स्थल व व्यक्ति एतत्संबंधक विश्वसनीयता निश्चित केल्या नंतर, बखरीच्या गद्यभागांत व्यक्तिकृत कार्यांचा जो तपशिल सांगितला आहे त्याचें संगतवार प्रदर्शन अर्वाचीन मराठी भाषेंत करण्याचा उपक्रम क्रमप्राप्त होतो. आनर्त देशांत म्हणजे सध्यांच्या पालणपुर संस्थानांत सरस्वतीनदीच्या काठीं अहिनल वाडपाटण ऊर्फ अणहिलवाडपाटण नावांचें शहर व प्रांत शक १०६० च्या सुमारास होता. संक्षेपतः पट्टण किंवा पाटण असें हि ह्या शहराला व प्रांताला म्हणत. तेथें सोळंकी नांवाचें राजे राज्य करीत. त्या प्रांतांतील चंपानीवर ऊर्फ चांपानेर पंच्यायशी महालांत बिंब ह्या आडनांवाचें एक क्षत्रिय कुल असे. सूर्यवंशी क्षत्रियांच्या ह्या बिबोपनामक कुळाचें गोत्र भारद्वाज व शाखा कात्यायनी असून, प्रवर पांच असत व कुळदेवता प्रभावती असे, पंचप्रवरांचीं नांवें बखरींत दिलेलीं नाहींत. ह्या बिंब आडनांवाच्या क्षत्रियांचा संबंध पैठण येथें राज्य करणा-या भौम आडनांवाच्या क्षत्रियांशीं होता. ह्या वरून उघड च झाले कीं बिंब आडनांवाचे चांपानेरचे क्षत्रिय भौम आडनांवाच्या पैठणच्या क्षत्रियां प्रमाणें च महाराष्ट्रिय ऊर्फ मराठे होते. पट्टणचें सोळंकी ऊर्फ चौलुक्य हें मराठा कुळ जेव्हां अणहिलपट्टणा वर स्वारी करून राज्य करूं लागलें तेव्हां त्या कुला बरोबर इतर जी अनेक मराठा कुळें पाटणप्रांतीं गेलीं त्यांत बिंबांचें हि एक मराठा कुल त्या प्रांतीं जाऊन चांपानेर पंच्यायशींत लहानसे संस्थानिक किंवा सरदार म्हणून प्रस्थापित झाले. शक १०६० त चांपानेर पंचायशींतील ह्या लहानश्या संस्थानांत गोवर्धन बिंब नामें करून संस्थानिक राज्य करीत होता. त्याचा धाकटा भाऊ जो प्रताप बिंब त्यानें दक्षिणे कडील उत्तरकोंकण प्रांतावर मोहिम करण्याची परवानगी गोवर्धन बिंबा जवळ शक १०६० च्या सुमारास मागितली. शक १०६० च्या सुमारास म्हणजे शक १०६० च्या आधीं पांच दहा वर्षे उत्तर कोंकणा वर स्वारी करण्याचा बूट चांपानेर येथें निघाला असावा. उत्तरकोंकणा वर स्वारी करण्याचें कारण असें कीं त्या कालीं तो प्रांत बहुतेक अराजक अश्या स्थितींत होता. त्या प्रांतीं उत्तरकोंकणीय शिलाहारांचें राज्य नांवाला देखील होते किंवा नव्हतें अशी स्थिती होती. वस्तुतः शक १०६० त किंवा शक १०६० च्या पूर्वी पंचवीस तीस वर्षे तेथें शिलाहारवंशीय कोणी संस्थानिक राज्य करीत असल्याचा शिलालेखांतून किंवा ताम्रपटांतून दाखला मिळत नाहीं. शक १०१६ त उत्तरकोंकणांत शिलाहारवंशीय अनंतपाल राज्य करीत होता. तदनंतर शक १०६५ त शिलाहारवंशीय मल्लिकार्जुन गादी वर येई तों पर्यंतच्या पन्नास वर्षांत उत्तरकोंकणांत राजकीय गडबड चाललेली होती. ही गडबड कोणत्या स्वरूपाची होती तें विशद करण्या करितां तद्युगीन पाऊणशें शंभर वर्षांचा गुजराथ व महाराष्ट्र या देशांतील राजांचा इतिहास विहंगमदृष्ट्या नजरे खालीं घालणें इष्ट आहे.

लेखाक २१७
१७१२ कार्तिकशुद्ध ११

श्रीशंकर


श्रीमच्छकराचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्याशकरभारती-
स्वामिकरकजोद्भवश्रीविद्यानरसिहभारतीस्वामिकृतनारायणस्मरणानि

वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृद वा। क्षेत्रकराड या प्रति विशेषस्तु अत्रत्य कुशल जाणून स्वकीय ल्याहावे या नतर रा। बापू दत्तात्रय देशपाडे ता। वारुण यास निग्रहपत्र पाठविले होते त्या वरून ते येथे मठसकेश्वरी हुजूर येऊन निष्कृती विषयी विनति केली आणि महिन्या पधरा दिवसात येतो ऐसा करार करून तत्रस्थली आले आहेत आपणास कळावे ह्यणून लि॥ असे कळले पाहिजे बहुत काय लिहिणे आज्ञेयमुल्लसति 


पौ। कार्तिकशुद्ध ११ रोज सौम्यवासरे शके १७१२ साधारणनामसवत्सरे गु।। येसू जाधव हुजरे मु॥ कराड