लेखाक २०८
१७८९ ज्येष्ठवा॥ १३
श्रीशंकर
।। श्री।।
श्रीमच्छकराचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्याशकरभारती-
स्वामिकरकजोद्भवश्रीविद्यानरसिहभारतीस्वामिकृत नारायण-
स्मरणानि
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री नरिसहादि।। ग्रामोपाध्ये वा। क्षेत्रकरहाटक परमसिष्योत्तम यासि विशेषस्तु तुमचे कल्याण इच्छित श्रीनिकट असो अत्रत्य कुशेल जाणोन स्वकीये लेखनी मानस सतोषवीत आसिले पाहिजे तदनतर श्रीगुरुविद्याशकरभारतीस्वामी याची अलीकडे फार च बिघडून अशक्तता जाहल्या मुळे श्री याणी जेष्ट वा। ११ भृगुवारी प्रात काली तास दिवसाचे सुमारे आह्मास सस्थानच्या साप्रदाया प्रमाणे विधियुक्त सन्यासआश्रम देऊन उपदेश करून सिष्य केले आणि सस्थानचा दरोबस्त अधिकार आह्मास देऊन जेष्ट वा। ११ रोजी सायेकालचे णवतासी श्रीगुरुविद्याशकरभारतीस्वामी हे समाधिस्त जाहले तुह्मास कलावे विशेष लिहिणे ते काय शके १७८९ प्रभवनामसवत्सरे जेष्ट वा। १३ महानुशासन वरीवर्ति