Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

लेखाक २३८

स्वस्तिश्रीमत्परमहसपरिव्राजकाचार्यश्रीमच्छकराचार्यपरा-
त्परगुरुपादकपकजोपरिमधुपायमानमानसामानमानाहीनव-
रतमाहावाक्यस्फारतरविचारपारावारपारीणधुरधरामदान-
दसुधासिधुनिमज्जमानभारतीकश्रीमद्विद्यानृसिहभारतीस-
द्गुरुचरणारविद प्रति

सछिच्यातरगतेन क-हाटकस्थेन अरणके इत्युपनामकेन बाळशर्मणा दीक्षितेनानेकवदनपूर्वक विज्ञापना समुल्लालसतु अत्रत्य वृत्त मार्गशीर्षकृष्ण द्वादशी पर्यत सर्वत्र मडळी श्रीकृपाकटाक्षेपेण शिष्या कुशलिन स्म अपणा कडिल आज्ञापत्र आले ते पोचले त्यातील मजकुराचा विचार दाहा शिष्टमडळी मिळोन त्याचा विचार पाहात आहेत पत्रा अन्वये ग्रथ आधार सापडेल असे आहे चार दिवसात या विषई साधन घेउन मडळी घेउन निघोन येतो राघवाचार्ये कालगावकर यास आज्ञापत्र आले तें पोचते केले ते क-हा (डा) स आले ह्मणजे निघोन येतो

बहुत काय लिहिणे हे वदन
गणेशभट ग्रामोपाध्ये याचे वदन
जोति दिक्षित अरणके याचे वदन
भाउ दिक्षीत उब्राणि याचे वदन
बापुभट फाटक याचे वदन
नृसिह दिक्षीत ग्रामोपाध्ये याचे वंदन

लेखाक २३७

श्री

वेदमूर्ति राजेश्री समस्त ब्राह्मण क्षेत्र क-हाड स्वामीचे सेवेसी

विद्यार्थी भ१गवतराव सिवदेव सरदेशमुख प्रात कराड दोन्ही कर जोडून साष्टाग नमस्कार विनति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लेखन करीत असले पाहिजे वेदमूर्ति राजेश्री माणिकभट आपणा कडे आले आहे ते मुखवचने वर्तमान सागता विदित होईल त्या वरून आपण कार्यसिद्धि केली पाहिजे गृहस्थ आमच्या व तुमच्या पदरीचा आहे याचे अगत्य धरून कार्यसिद्धि सत्वर केली पाहिजे बहुत ल्याहावे तरी आपण सुज्ञ आहा तेथे विशेषकाय ल्याहावे हे विनति

१५. प्रताप बिंबाच्या नवीन राज्याला महिकावतीचें राज्य ऊर्फ माहीमदेशचें राज्य म्हटलें असतां तें याथार्थ्याला सोडून नाहीं. देश हस्तगत झाल्या वर प्रताप बिंबानें पैठणास विक्रम भौमास व चांपानेरास गोवर्धन बिंबास देशाची वसाहत करण्या करितां रयत पंचायत पाठविण्या विषयीं व आपला पुत्र मही बिंब यास धाडून देण्या विषयीं पत्रें लिहिलीं. तदनुरूप मही बिंब चांपानेरा हून ६६ कुळें घेऊन ठाणें माहीमास आला. सासष्ट कुळां खेरीज आणीक हि बरींच कुळें मही बिंबा बरोबर आली, परंतु मुख्य नावाणिक अशीं कुळें सासष्ट होती. त्यांत २७ सोमवंशी कुळे, १२ सूर्यवंशीं कुळें व ९ शेषवंशीं कुळें होती. देश उजाड झाला होता व गांवें ओस पडली होतीं, सबब, वाणी, उदमी, वगैरेंचीं हि बरींच कुळें आणावीं लागलीं. लाड, दसालाड, विसा लाड, गुजर वैश्य, पंचाळ, मनुमाया, सीलीक, त्राटक, दैवज्ञ, घोडेल, मोड, दसामोड, विसा मोड, वगैरे कुळें चांपानेराहून आली. पैठणाहून मही बिंबानें कांहीं ब्राह्मणकुळें आणिलीं, त्यांत शास्त्रो, वैदिक, पंडित, आचार्य, उपाध्ये, ज्योतिषी, पुरोहित, व नाईक वगैरेंचीं कुळें होतीं तात्पर्य, व्यापार, उदीम, शास्त्र व संस्कृति ह्यांची स्थापना ह्या उजाड अरण्यमय देशांत प्रताप बिंबाला सर्वतो प्रकारांनीं करावी लागली. इतकी विलक्षण हलाकी पन्नास वर्षांच्या अराजकानें देशाला प्राप्त झाली होती ! शिलाहारांच्या ऐन भरभराटीच्या वेळच्या संस्कृतीचा केवळ नायनाट होऊन गेलेला होता. मिळविलेल्या नवीन राज्याचा प्राणप्रतिष्ठासमारंभ यथाशास्त्र उरकण्यास योग्य ब्राह्मण हि मिळण्याची पंचाईत पडली. पैठणाहून शास्त्री, पंडित व पुरोहित वगैरे मंडळी जेव्हां आली तेव्हां हा राज्यप्रतिष्ठासमारंभ यथासांग साजरा झाला. राज्यारोहणसमारंभ वाळुकेश्वरा नजीक ठाण्यास झाला ठाण्यास म्हणजे प्रताप बिंबाच्या लष्करांत ऊर्फ कटकांत. त्या कालीं कटकाला स्थानक ऊर्फ ठाणें म्हणत. प्रताप बिंबाच्या ह्या ठाण्या हून शिलाहारांचे ठाणे शहर निराळें. शिलाहारांनीं प्रथम जेव्हां उत्तरकोंकणांत राज्य स्थापिलें, तेव्हां त्यांच्या सैन्याचें जें मुख्य कटक ऊर्फ स्थानक तें च पुढें वाढून मोठें राजधानीचें शहर झालें व ठाणें या प्राकृत नांवाने सर्व पृथ्वी भर गाजलें. शिलाहारांच्या त्या जगप्रसिद्ध व इतिहासप्रसिद्ध ठाण्याशीं प्रताप बिंबाच्या वाळुकेश्वरच्या नवीन तात्पुरत्या लष्करवजा ठाण्याचा कांहीं एक संबंध नाहीं. ठाण्यास वैदिक, शास्त्री, पुरोहित, सेनाध्यक्ष वैश्य, वगैरे समुदाय जमून, त्या पैकीं ब्राह्मणांनीं प्रताप बिंबाला आशिर्वाद दिला व ब्राह्मणेतरांनीं जोहार म्हणजे जयकार केला. ह्या वेळीं पैठणाहून जी ब्राह्मणमंडळी आली त्यांची याद बखरकार जी देतो ती अशी:-

                    (१) गंगाधर नाईक सांवखेडकर-शेषवंशिकांचे कुळगुरू
                    (२) विश्वनाथपंत कांबळे- राजपुरोहित
                    (३) भास्कर पंडित चामरे
                    (४) गोवर्धनाचार्य देवधर-प्रधान
                    (५) अनंत नायक छत्रे
                    (६) केशव राम घोडे
                    (७) मोगरे
                    (८) जाधवे
                    (९) हेमटे

लेखाक २३६

श्री
श्रीमद्वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री नागेश दीक्षित व रघुनाथ दीक्षित व अणा दीक्षित व बाबा दीक्षित क्षेत्र श्रीकरहाटक याशि
प्रीतिपूर्वक गोविद दीक्षित गरुड क्षेत्र मजकूर मुकाम नेवरी कृतानेक साष्टाग नमस्कार विनति ऐशी जे येथील मजकूर तरि श्रावण वद्य १४ बुधवार पावेतो आपुले कृपे करोन वर्तमान यथास्थित असे विशेष आह्मी काही कार्योद्देशे ग्रामातरास जावयाकरिता निघालो ते नेवरी मुकामीस मार्गेकरोन आलो तेथे हरी सखाराम याची गाठ पडली त्याने आपली निप्कृति होण्याचा विचार पुसला तेव्हा आह्मी त्यास जो विचार सागण्याचा होता तो क्षेत्रतरफेने सागोन त्यास दुराचार न घडण्याचा तोडी बहुत प्रकारे सागितल्या परंतु तो परावृत्त निकालसपणे होत नाही आणि परभारा बोलणे बोलतो की मी क्षेत्रास जावोन शुत्धपत्र हरत-हेने घेऊन येईन मजला वरकड तोडजोडीची गरज नाही ऐसा मजकूर ऐकण्यात आला सबब आपणास सूचनार्थ हे पत्र लिहिले असे क्षेत्रातील विचार सर्व आपुले ध्यानात वागत च आहे अलीकडील अप्रौढमडळीत फुट होऊन भलता विचार होईल याचा निर्बध आपुल्याकडोन जरूर राखला पाहिजे ज्या दोषा ज्या दोषा वर बहिष्कारपत्र आपण पाठविले त्या कलमाची निकालसता बापभाऊ व भोवर गावी शरीरसबधी ज्ञातिवर्ग आहेत त्याचे विचारास येयील तैशी जाहली असता च नीट नाही तरी केवळ द्रव्यव्यवहाराचा लोभ ठेवोन कोणी केल्यास क्षेत्राचा वकूब जायील आणि आसमतात मोठे मडळीचा उपहास बहुत च होयील या सर्व गोष्टी आपुले लक्षात वागत च आहेत केवळ आह्मी लेहून कळवावे ऐसा प्रकार नाही
ताजाकलम-खटावकर कोणी ब्राह्मण येथे आठ चार दिवसा मागे आला होता तो हरीपताशी बोलिला की वरघाटी कराडकरास पत्र पाठवावयास सबध नाही दोष गैरदोष ह्मणण्याचा वरघाटी अधिकार आम्हा खटावकरास च आहे हाहि मजकूर आपणास श्रुत जाहला पाहिजे निरतर लोभवृद्धि करीत जावी हे विनति

लेखांक २३५

श्री पाडुरग प्रसन्न श्रीसमुद्रेश्वराय कृष्णककुद्मतीप्रीति
सगमो जयति । ।
वेदशास्त्रसपन्न राजश्री समस्त क्षेत्र क-हाड स्वामी
गोसावी यासी

आज्ञाधारक भटभट गोपीनदन क्षेत्रश्रीपढरपूर चरणा वरी मस्तक ठेऊन साष्टाग नमस्कार विनति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशललेखन करीत असले पाहिजे विशेष हणमत वडिहे येथील कुळकर्णी याने व्रिशभ मारिला त्यास वीस दिवस होऊन गेले आह्मास न भेटता तिमणभट नाहावीकर व वडिहेकर प्रायश्चित्ताचा धणी ऐसे उभयता आह्मास न कळता क्षेत्रास येणार आहेत याची स्वामीनी आह्मास पूर्वीपासून आज्ञा केली आहे जे घाटमाथा जे प्रायश्चित्त होईल ते आह्मी येऊन स्वामीस निवदन करावे ऐसी आज्ञा आपली पूर्वी पासून आहे त्यास आह्मास न कळता येणार आहेत आणि आपण आह्मास कागद पण हि करून दिल्हा च आहे आमचा हि कागद स्वामी पासी आहे पूर्वी वडिहेकराच्या प्रायश्चित्ता साठी स्त्रम हि बहुत केले ते आपणास विदित आहे तरी आता प्रायश्चित्ताचे धणी आले आहेत यासी आह्मा वाचून अभ्य न द्यावे आह्मी आ+++++++++

लेखाक २३४
१७८० अधिक ज्येष्ठ शु॥ १० बाळबोध

श्री
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजेश्री समस्त ब्रह्मवृद श्रीक्षेत्रक-हाटकस्थ स्वामी यासि
कागद बेशमी धोडभट बिन चितामणभट जोतिषी मौजे वोड प्रात क-हाड तालुके वाळवे कृतानेक साष्टाग नमस्कार विज्ञापना लिहून दिला कागद ऐसा। जे क्षेत्रा हून बोटका साळी याचे खटल्या बदल मौजेमजकुरी पत्र आले त्या पत्रा प्रमाणे आह्मा कडून वहिवाट न झाल्या मुळे आपले निर्बधपत्र आह्मास आले त्याज वरून आह्मी क्षेत्रास आलो त्यास आपले पत्राचा अपमान केला ही चूक आमची आहे इत पर असे करणार नाही आपले आझे प्रमाणे वागेन हा कागद लिहून दिला सही मिति शके १७८० कालयुक्तनामसवत्सरे मिति अधीक जेष्ठ शुक्ल दशमी हे विज्ञापना खुद धोटभट बिन चितामणभट पाठक जोतिषी मौजेमजकूर

तेव्हां प्रताप बिंबाच्या मनांत स्वदेशाहून भले भले मराठे व ब्राह्मण लोक आणून देशाची वसाहत करण्याचा विचार आला. माहिमाहून मुख्य प्रधान जो बाळकृष्णराव सोमवंशी त्यास प्रताप बिंबानें वाळुकेश्वरा पर्यंतचा सर्व मुलूख कबजातींत आणण्या करितां पाठविलें. मध्यें ठाणे कोंकणचा राजा कोणी यशवंतराव शिलाहार होता, त्याच्याशीं युद्ध होऊन तो मारला गेला. अपरादित्य शिलाहाराला बाजूला सारून, ह्या यशवंतरावानें शक १०६२ च्या सुमारास ठाण्याची गादी उपटली असावी असे दिसतें. हा यशवंतराव शिलाहार इतका क्षुद्र होता कीं ह्याच्या लहानश्या कारकीर्दीतील एक हि शिलालेख किंवा ताम्रपट वगैरे लेख बिलकुल उपलब्ध नाहींत. ह्याच्या हयातींत उत्तरकोंकणचा दक्षिणे कडील बराच भाग गोव्याच्या कदंबांच्या हातीं गेला होता आणि हा ठाणें जिल्ह्यांतील दहा पांच गांवांत कसा तरी जीव धरून होता. ह्याची व प्रताप बिंबाचा मुख्य प्रधान बाळकृष्णराव सोमवंशी याची गांठ पडून, बाळकृष्णरावाच्या तरवारीला हा बळी पडला. यशवंतराव शिलाहाराला मारून बाळकृष्णराव कळव्यास आला. तेथें कोकाट्या नांवाच्या क्षुद्र मराठ्याचा अमल होता. लढाई बिढाई न होता, तो निमुटपणें शरण आला. तेथून सोमवंशी मठास किंवा मढास समुद्रतीरीं पोहोचला. मठ येथील ब्रह्मकुंड, हिरबादेवी व मुक्तेश्वरदेव बघून बाळकृष्णराव येसावें, जुहूं, वाहिनळें, राजणफर, ह्या गांवा वरून थेट वाळुकेश्वरीं गेला. तेथील बाणगंगा तीर्थ व हनुमंताची प्रतिमा देखून, मुख्य प्रधानानें पांच दिवस समुद्रकांठीं मुक्काम केला. बरोबर सैन्य होतें, सबब बाळकृष्णरावाचा तळ बाणगंगेच्या काठीं सध्यां जेथें गव्हर्नमेंट हाउस आहे तेथें उघड्या जागेत पडला असावा. केळवेंमाहीम हा मध्य बिंदू धरून दमण पासून वाळुकेश्वरा पर्यंत एकंदर लांबी पक्के २८ कोस म्हणजे सध्याचे ८४ भैल होते, असें बाळकृष्णराव प्रधानाच्या मोजणींत आलें. सर्व देश केवळ रान होऊन गेला आहे, आपण एकदा स्वतः येऊन पहावा, अश्या अर्थाचें पत्र प्रधानानें राजा प्रतापबिंबास माहिमास पाठविलें. त्या प्रमाणें स्वतः येऊन व देशाची दुरवस्था पाहून, तेथें नवीन वसाहत करण्याचा निश्चय प्रताप बिंबानें केला.

१४. असें दिसतें कीं दमण पासून वाळुकेश्वर पर्यंतचा मुलूख काबीज करण्यास प्रताप बिंबाला सुमारें दोन महिन्यां हून जास्त काळ लागला नसावा, काळोजी सीरण्या, विनाजी घोडेल, यशवंतराव शेलार व कोकाट्या ह्या चार क्षुद्र राजांशीं लढाया किंवा साम करण्यास ह्या हून जास्त वेळ लागण्याचें कारण नव्हतें. शिवाय, सर्व देश वैराण झालेला होता, त्या मुळें रस्त्यांत इतर अडथळे होण्याचा संभव नव्हता. सैन्याला दाणावैरण पुरविण्यांत जो कालातिपात झाला असेल तो जर वगळला, तर ही मोहीम सुमारें वीस पंचवीस दिवसांत खलास झाली असावी. देशाला अरण्याची अवस्था प्राप्त झाली होती, असें बखरकार लिहितो. त्या वरून अनुमान होतें कीं अनंतपाल शिलाहाराच्या नंतर जीं पन्नास वर्षे गेलीं त्या पन्नास वर्षांत गोव्याच्या कदंबांना उत्तरकोंकणांत सुखानें राज्याराम घेतां आला नाहीं. शिलाहारवंशीय व्यक्तींनीं व शिलाहारांच्या अधिका-यांनीं कदंबांना इतकें भंडावून सोडिलें असावें कीं शक १०१६ पासून शक १०६० पर्यंत देशांत झुंझें, छापे व जाळपोळ ह्यांचा सुळसुळाट होऊन, शेती, उदीम, व्यापार धंदा, ग्रामसंस्था व आमदरफ्त अगदीं बंद झाली व दमण पासून वाळुकेश्वर पर्यंतचा मुलूख बेचिराख अरण्य बनलें. अश्या दुरवस्थेंतून देश सुखरूप बाहेर पडावयाचा म्हणजे पूर्वीच्या राजांचा अंमल देशा वर पुनः स्थिर झाला पाहिजे किंवा नवीन बाहेरच्या राजांनीं येऊन तेथें स्थिरस्थावरता उत्पन्न केली पाहिजे. आणि शक १०६० च्या नंतर उत्तरकोंकणांत हे दोन्ही प्रकार सुरू झाले. बाहेरचा बिंबवंशीय राजा येऊन त्यानें उत्तरकोंकणचा समुद्रतीरा लगतचा पश्चिमेकडील प्रांत आक्रमिला; आणि ठाणें कोंकणच्या मल्लिकार्जुन शिलाहारानें क-हाडकर शिलाहारांच्या साहाय्यानें उत्तर कोंकणच्या पूर्वेकडील प्रांता वर पुन: राज्य स्थापिण्याचा संकल्प केला. प्रताप बिंबानें केळवेंमाहीम हें राजधानीचें गांव नवीन निर्मिलें. कल्याणा जवळील ठाणें ही शिलाहारांची पूर्वीची राजथानी होती च, शक १०६२ त बिंबोपनामक प्रतापानें दमण पासून वाळुकेश्वर पर्यंतच्या समुद्रीय प्रांतांत एक नवीन राज्य कसें स्थापिलें त्याचा हा असा वृत्तान्त आहे. हें नवीन राज्य शक १०६२ पासून शक ११६३ पर्यंत सुमारें शंभर वर्षे टिकलें. ह्या शंभर वर्षांत ज्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व भौमिक उलाढाली झाल्या त्यांचें वर्णन बखरीच्या अनुरोधानें पुढें करितों.

लेखाक २३३
१७८० आधिक ज्येष्ठ शु॥ १ बाळबोध

श्री
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृद श्रीक्षेत्र
क-हाटक यासि

प्रति समस्त ज्योतिषी क्षेत्र मजकूर कृतानेक साष्टाग नमस्कार विज्ञापना लिहून दिल्हा कागद ऐसा जे मौजे मद्रूळ मजरे जानुगडेची वाडी येथील जोशी यास सभापूरकर बोटगा साळी याचे खटल्याबदल दाखल्याचे पत्र पाठविलें त्या पत्रा वर कृष्णककुद्मती करून पाठविले त्याज बद्दल तुह्मी आमचे वृत्तीस अटकाव केला परंतु कृष्णककुद्मती करून पत्र पाठविले ही आमची चूक जाहली आहे इत पर आह्मी परगावास वाळीत अगर शुद्धपत्रा वर कृष्णककुद्मती करून पत्र लिहिणार नाही लिहिले तर तुह्मी आज्ञा कराल त्या प्रमाणे वागू हा कागद लेहून दिल्हा सही मिति शके १७८० कालयुक्तनामसवत्सरे अधिकज्येष्ट शु।। भृगुवार दस्तुर वासुदेव जोशी बिन मोरजोशी क्षेत्र मजकूर
साक्षी करणार जोशीमडळी
१ सही रामजोशी बिन व्यकण-                      १ सही बडोबा बिन बाबा जोशी
जोशी क्षेत्र मा।र दस्तूर खुद                          दस्तूर खुद
१ मोरजोशी बिन नारायणजोशी                     १ भाऊ बाळकृष्णजोशी दस्तूर
दस्तूर खुद                                               खुद
१ रगजोशी बिन विठलजोशी दस्तूर                १ सही वासुदेवजोशी बिन शाम
खुद                                                        जोशी दस्तूर खुद
१ गुड जोशी दस्तूर खुद                               १ भिकु जोशी विन सदाशिवजोशी
१ गोविंदजोशी बिन यज्ञेश्वर जोशी                   कराटकर दस्तूर भाऊ बाळ
दस्तूर खुद                                                कृष्ण जोशी
१ काशिनाथ जोशी बिन कृष्ण
जोशी दस्तूर गोविंद जोशी बिन यज्ञेश्वर जोशी

लेखाक २३२
१७८० वैशाखशु।।१ सुमार

श्री
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्राह्मण क्षेत्र
कराड स्वामी गोसावी यासी

मोकदमानी मौजे वाडे पेठा पेठ तो। वालवे कृतानेक साष्टाग दडवत विज्ञापना तागायत वैशाखवा। ६ पावे तो आशीर्वादे करून येथास्थित असे विशेष आपले कडून वैशाखशु।। १ शके १७८० चे मि।। चे पत्र आले त्यात लि।। की कुशा बोटका साळी सभापूरकर याजवर दोष आहे त्या सासर्गी साळई तुमचे गावात नादत आहे त्याचे घरी लग्न वगैरे काही जाहल्यास तुमचे जोशी याणे त्याचे कार्यास जाऊ नये ताकीद करावी ह्मणून त्याज वरून आमचे गावचा चितामणभट बिन बापूभट जोसी यास ताकीद करून आपले पत्र आले ते हि वाचून दाखविले परतु त्याने पत्राचा धिक्कार केला की हे पत्र समस्त ब्राह्मणाचे नव्हे मध्ये कोणी तरी तोतयाणे दिल्हे असेल असे ह्मणोन निघोन गेले आणि काल मिति वैशाखवा। ५ स सभापुरकर याचे सगतीचे साळी याची लग्ने लाविली पुढे मर्जीस येईल तसे करावे सेवेशी श्रुत होय हे विज्ञापना

लेखाक २३१
१७७९ आषाढवद्य ११

श्री
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्राह्मण
क्षेत्रकराड यासी

समस्त ब्राह्मण कसबे मसूर साष्टाग नमस्कार विनति विशेष वेदमूर्ति राजश्री नानाभट बिन कृष्णदीक्षित व सीतारामभट बिन बाबादीक्षित उमराणी पालकर याणी या देशातील साप्रत मठाधिपत्याचा अधिकार क्षेत्रमजकूरचा असोन दुर्बुद्धीने आपले नावे सस्थानाकडून आज्ञापत्रे करून घेतली त्यास ते क्षेत्राचे द्रोही याज करिता त्याचे घरी येकपक्ती अन्नोदकवेव्हार करू नये असे क्षात्राहून पेशजी फाल्गुनशु॥ १ शके १७७८ चे पत्र आले त्याचे उत्तर पूर्वी आपा जोशी बिन बाळकृष्ण जोशी क्षेत्र मजकूर याज बरोबर फाल्गुनशु।। ११ शके मजकूरचे पाठविले च आहे हाली सस्थाना कडून श्रीस्वामीजगद्गुरु याचे पत्र फाल्गुन वा॥ ३ शके मजकूरचे मितीचे आले ते आज आपास वा। ५ शके १७७९ दिवसी वा। सीमारामभट उमराणी याणीं दिल्हे त्याची नकल करून आपणा कडे पाठविली आहे मनन होऊन पत्राचे उत्तर जरूर यावे अनमान करू नये कळावे बहुत काय लिहिणे लोभ करावा हे विनति मिति आषाढवा॥ ११ शके १७७९ पिंगलनामसवत्सरे