लेखाक २१७
१७१२ कार्तिकशुद्ध ११
श्रीशंकर
श्रीमच्छकराचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्याशकरभारती-
स्वामिकरकजोद्भवश्रीविद्यानरसिहभारतीस्वामिकृतनारायणस्मरणानि
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृद वा। क्षेत्रकराड या प्रति विशेषस्तु अत्रत्य कुशल जाणून स्वकीय ल्याहावे या नतर रा। बापू दत्तात्रय देशपाडे ता। वारुण यास निग्रहपत्र पाठविले होते त्या वरून ते येथे मठसकेश्वरी हुजूर येऊन निष्कृती विषयी विनति केली आणि महिन्या पधरा दिवसात येतो ऐसा करार करून तत्रस्थली आले आहेत आपणास कळावे ह्यणून लि॥ असे कळले पाहिजे बहुत काय लिहिणे आज्ञेयमुल्लसति
पौ। कार्तिकशुद्ध ११ रोज सौम्यवासरे शके १७१२ साधारणनामसवत्सरे गु।। येसू जाधव हुजरे मु॥ कराड