लेखाक २२०
१७६६ आश्विनवद्य १२ बाळबोध
श्री
क्षेत्रक-हाड यास
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजेश्री अणादीक्षित उबराणि
व तथा गोविददीक्षित भाउ गरुड व नागेशदीक्षित
ढवळिकर व रघुनाथदीक्षीत गिजरे परमाप्तवर्येषु
प्रीत्यभिलाषुक माधवाच्यार्य व पुरुषोत्तमच्यार्ये कालग्रामकर कृतानेक विनति विशेष अमचे बधुवर्गातिल रावजि व्यास व अनताच्यार्य हे उभयता ग्रामण्या विशि प्रमुख होऊन तुमचा क्षेत्रधर्माचा अवलब करुन मसुरकर हरभट बुधकर यास सामिल घेउन गावच्यास व परगावच्यास रावजि भगवत कुलकर्णि कवठेकर याच्या पक्ति समधे सासर्गिक दोष ठेउन तीर्थ देउन शुत्धपत्र देतात ये विसि मजकुराचे पत्र पूर्वी वो। राजेश्री बापु त्रिबक याज बराबर पाठविल्ले त्याज वरुन व बापुनि हि मुखजवानि मजकूर सागीतला त्या वरुन अपण प्रातास पत्र पाठविल्ले ते मसूरकर ब्राह्मण यानी सर्वास कळउन अह्मा ही विदीत केले त्यास ब्राह्मण्यधर्मसस्थापक आपण आहा त्या पेक्षा जे असे ग्रामणी आहेत याची पुरी चौकसी जाहाल्या सिवाय मुक्तपत्र होउ नये अनन्वित करणारास जी शिक्षा होणे ती असे आचर्ण पुन. न करीत असे घडावे आपले पत्र आले ते अह्मास मान्य नाही व क-हाडक्षेत्रस्थाचा अह्मा वर अधिकार नाही अश्या अनेक प्रकारे आमचे बधुवर्ग भाषणे करीत आहेत या प्रमाणे मजकुर आहे आवरोध निवृत्त जाल्या नतर अह्मी क्षेत्रास येणार अव्हो अल्या नतर सर्व मजकूर कळेल सूज्ञा प्रति विशेष काय लिहावे हे विनति मिति शके १७६६ अस्वीनवद्य १२