Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २५७
श्री
यादी समस्त ब्राह्मण क्षेत्रकराड याचे व सिरालकर याचे वागणुकी आचारव्यवहारपदप्रायश्चिता बद्दल खटले होऊन ग्रामण्य तटा जाहला सिरालकर याचे पक्तीस कोणी भोजन करु नये आपल्या घरी सिरालकर आले असता त्यास पक्तीस घेऊ नये जो कोणी घेईल त्यास पक्ती बाहेर राहावे असा निर्बध ठरला आहे तर याविसि समते
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २५६
श्रीक्षेत्रपाळो जयति
स्वस्ति श्रीमत्सपूर्णजलधिवेलावलयतिलकायमाननिखलभू-
पालमौलिमालामिलन्मुकुटमणिमरीचिमजरीपिंजरितमजु-
पादाबुजेषु विलसदनेकगद्यपद्यविद्याविनोदद्योतिकृद्विद्याप-
तिविद्याधरप्रमुखमुखोदीर्यमाणकीर्तिप्रवाहेषु स्वदानसता-
नसतोषितविद्वज्जनजेगीयमानयश पूरकर्पूरसपूरितदिड्ना
केषुश्रीमन्ममहाराजाधिजश्रीछत्रपतीषु श्रीमदीयकृपावलोकननिरातकसमासादितश्रीकरहाटकक्षेत्रस्थतीर्थपुरोहित-गिजरेइत्युपनागकविरेश्वरदीक्षितकृतानेकाशिषशर्मदाभूयासु।
अनतर मधुबहुळद्वादश्यवधि भवदीयराज्यस्य क्षेम चितयन् श्रीसन्निधौवसामि ।
अनुदिनमनुगाग शैवमभ्यर्च्य लिग
भवदुदयपतग तुगमभ्यर्थयामि॥
मम सकलपुमर्थानदसदोदकर्त्ता
स जयति भगवान्वा दैत्यहर्त्ता भवान्वा ॥
विशेषस्तु अह्मी स्वामीचा दर्शनास पूर्वी अलो होतो ते, समई वर्षासना विषयि विज्ञप्ति केली होती परतु अवकाश पडला नाहि अत कारणात् सूचनार्थ पत्र लिहिले तर पितृदत्त वार्षिक स्वामीनी निरतर चालवावे यदर्थी श्लोक। अपर च।
आशु विस्मरसि दत्तमर्थिने
विस्मरस्यपकृत परेण यत्॥
पितृदत्त मभिवर्धय राजन्
प्रार्थयामि हृदि त न विस्मर।
अपर च ।
पितृमात्रग्रजैर्दत्त द्विजेभ्यो यच्च किचन॥
तच्चालयति ये राजन्नमृतत्व भजति ते ॥
त्वत्कीर्त्तिमौक्तिकफलानि गुणैस्त्वदीयै
सदर्भितु विबुधवामदृश प्रवृत्ता ।
नातो गुणेषु न च कीर्तिषु रध्रलेशो
हारो न जात इति ताश्च मिथो हसति ।।
अभिमतफलदाता त्व च कल्पद्रुमश्च
प्रकटमिह विशेष क च नोदाहराम ।।
कथमिव मधुरोक्तिप्रेमसमानमिश्र
तुलयति सुरशाखीदेवदान त्वदीय॥ इति।।
नित्य ब्रह्म यथा स्मरति मुनयो हसा यथा मानसम्
सारगा जलदागम वनगजा ध्यायति रेवा यथा।।
युष्मद्दर्शनलालसा प्रतिदिन युष्मन्मस्मरामो वयम्
धन्य कोपि स वासरोत्र भविता यत्रावयो सगम ।।
श्रीमत्सु विशेष किमुल्लेखनीय इत्यल पल्लवितेन।
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २५५
श्री
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्राह्मण क्षेत्र कराड
१ रघुनाथ दीक्षित गिजरे
१ नागेश दीक्षित काका ढवलीकर
१ अणादीक्षित उमराणी
१ गोविद दीक्षित भाऊ गरूड
----
यासी प्रति कृष्णभट वैद्य व बालदीक्षित अर्णिके याचा साष्टाग नमस्कार विनति येथील क्षेम ता। श्रावण वा। १ पावे तो आपले कृपे करून मुकाम इसलामपुर येथे वर्तमान उत्तम असे विशेष येथील ब्राह्मण्यप्रकर्णी मा।र सविस्तर लिहून लाखोटा करून श्रु॥ ११ एकादशीचे रोजी पाठविला होता तो गडी श्रीमत राजश्री मत्री सरकारचा आपले कडे पोहचून पत्र पावले न पावले अद्याप उत्तर आले नाही त्या वरून काळजी लागली आहे त्याज करिता पुन्हा आणखी हे पत्र लिहून पा आहे व मुजरत या च कार्याकरिता गडी पाठविला आहे साराश कुरळपकर कुळकर्णी याज वर मोठा च दोष असता क्षेत्रास जाऊन शुद्ध व्हावे ते न करिता इसलापूरकर ब्राह्मण याणी च कुळकर्णी यास शुद्ध केला क्षेत्राची आह्मास गरज नाही आह्मी पुसले असता तुह्मी कोण पुसणार ह्मणतात व क्षेत्राची निंदा करितात हे ऐकवत नाही इसलामपूरकर ब्राह्मण यानी शुद्ध कसा केला हे सभवत नाही आसपास भोवरगावी वगैरे मडली व इसलामपूरचे राजकीय ग्रहस्त कसे करावे ह्मणून आपआपले ठिकाणी विचारात च आहेत विना कराडकर यानी शुद्ध ह्मटल्या खेरीज ते हि पक्तीवेव्हारास कोणी धजत नाहीत आपापले ठिकाणी दबदबून आहेत या स्तव आपले येणेची मार्गप्रतीक्षा करीत आहो विना आपले येणे जाले खेरीज बदोबस्त होऊन खूळ मोडत नाही या करिता पत्रदर्शनी सहस्त्र अडचणी असल्या तरी या समयी त्या अडचणी ठेवून येणे प्राप्त आहे याज करिता कृपा करून पत्रदर्शनी सत्वर निघोन यावे ह्मणजे सर्व बदोबस्त होईल आपले येणे जाले खेरीज काही बदोबस्त होत नाही विशेष क्षेत्राची निदा करितात ती श्रवणे करून ऐकवत नाही त्या पेक्षा क्षेत्राचा अभिमान आपलेस असावा हे जाणोन इतके विस्तारे लिहिले आहे सहस्त्र वाटेने आपले येणे व्हावे हे चागले च न च जालेस निग्रहाचे पत्र इसलामपुरास येक व नुरठाणेस येक देऊन ग्रामस्थ जोशी यास पत्रदर्शनी पा। द्यावे ह्मणजे थोडेसे खूळ मोडेल या स्तव पत्रदर्शनी ग्रामस्थ जोशी यास पुढे पा। देऊन आपण मागाहून येणेचे करावे बहुधा आपण च आले खेरीज निर्वाह नाही सदरहू नुरठाणेचे ब्राह्मणाचे प्रकर्ण येक व दुसरा चितोबा ह्मणोन ब्राह्मण येक आहे त्याचे हि येक प्रकर्णी तदन्वये च आहे तो मजकूर पूर्वपत्री लिहिला च आहे त्या वरून कळेल त्यास आपले येणे जाले खेरीज बदोबस्त होत नाही त्यास सहस्त्र अडचणी ठेऊन या बदोबस्ता विषयी आले च पाहिजे आपले येण्यास अवधि लागलेस पुढे ग्रामस्थ जोशी यास निग्रहाचे पत्र देऊन पाठवावा या पत्राचे उत्तर पुढे पाठवावे बहुत काय लिहिणे हे नमस्कार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २५४
श्रीवेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री रामजोशी आपा व आबा व बापू व भास्करभट पढरपुरे यासी
प्रती राघोबा गिजरे व दाजीदिक्षीत गिजरे व बाबाचार्य घळसासी साष्टाग नमस्कार इकडील मजकूर तरी परशरामक्षेत्रास मडळी लग्नास गेली होती त्यास तेथील वर्तमान इकडील मडळीस सीमतपूजनास व देवकप्रतिष्ठेस व लग्नसमयी ऋक्चवास व भोजनास अगदी बोलाविले नाही व भुयसी दिली नाही नव-या कडे ग्रहयज्ञ जाहला त्यास इकडील मडळीस होमास लाविले नाही झाडून ब्राह्मण तिकडील च होते येक दिवस बळे च भोजनास तिकडे येतो ह्मणोन गेले त्यास त्यानी निरनिराळी पगत आमचे कडील वैदिक मडळीची बसविली इकडील क्षेत्रातील वर्तमान वर्षप्रतिपदेस सरकारात सालाबाद प्रमाणे पचागश्रवण समस्त मडळी जाऊन जाहले हुकूम सरकारचा कसा होता तो तुह्मास माहीत आहे त्या प्रमाणे राजश्री चितोपत आबानी विठ्ठलपतास सागितला परतु त्यानी तिकडील मडळीचे मनोदयानुरूप केले त्यास सरकारचे निकालपत्र बदोबस्ता विशी आल्यास नीट पडेल आणि आमची आबरू राहील ये विशी पत्र अगत्य आले पाहिजे पत्रा शिवाय भास्करभटास पाठवू नये हे नमस्कार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २५३
श्रीअबा प्रा।
तीर्थरूप मातोश्री बाई व राजश्री नाना स्वामी वडिलाचे सेवेसी
बालके आनद रामाने चरणा व मस्तक ठेऊन सिरसाष्टाग नमस्कार विज्ञापना तागाईत छ २४ माहे मोहरम सुकुरवार पर्यत मुकाम वडगाव पर्यत वडिलाचे आसीर्वादे करून सुखरूप असो या नतरी तुह्मा कडील वर्तमान कळत नव्हते तो चाद्याच्या मुलाबरोबर पत्र आले त्याज वरून कळले मूल गेले हे वर्तमान ऐकून मनात खेद जाहाला ईश्वरसत्तेस उपाय नाही आह्मा कडील वर्तमान तारीख १७ रो। युद्ध झाले श्रीमतास यश आले त्या कडील दोन चार से खासे जखमी जाहले से पनास ठार झाले दोन हात्ती जरीपटके सुद्धा व दोनसे घोडी पाडाव इकडी आली आता कूच करून पचगगे वर करवीरच्या रोखास जाणार काय घडेल पाहावे तुह्मा कडील वर्तमान वरचेवर लिहून पाठवित जावे दारा पुढील कुसू पाच हात उची प्रमाणे घालवणे चार रुपये पडले तरी देणे गावकीचे लिहिणे बहुत चौकसीने करीत जावे महिना पधरा दिवसी तट्टाचा ऐवज पाठऊन देतो चिता नाही घरी बहुत सावधपण असावे सेताची मेहनत चालू ठेवणे बैलास पेड सरकी खर्च करीत जाणे सोवळी दोन किंमत पा। पावणेतीन रुपयास करून पाठविली आहेत घेऊन परत कोणी येईल त्याज बरोबर उत्तर पाठविणे लक्ष्मण राव वाघा बरोबर आहो भिकाखानाची आसामी चालवितो +++++++
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २५२
श्री
वो। राजश्री तात्या दीक्षित गिजरे यासी.
प्रति अनतभट वारुणकर साष्टाग नमस्कार विनति उपरि श्री स्वामी कडील वाळितपत्र मौजे नाटवडे येथे आले त्यास त्याचे घरी अन्नोदकवेव्हार न करणे ह्मणोन ताकीद जाहती परतु क्षेत्रातील असामी बि।।
१ तात्या अयाचित असामी २ १ प्रलाढबोवा गोसावी सेरकर
१ बाबदेवभट वारुणकर ३ तेरीज
१ जिवाजी खडो जोसी मौजेमजकूर ----
--- ४
४
येणे प्रमाणे क्षेत्रातील असामी याणी भोजन केले आणखी कोणी येतील त्यास न येणे विसी ताकीद करावी आणि आमचे गोटातील असामी २ दोन सर्वास टाकून भोजनास गेले त्यास पेशजी आपण ताकीदपत्र पाठविले परतु मानीत नाहीत तर त्यास मसाला करून घेऊन जावे उभयतास आमत्रण न करणे विसी देशमूखदेशपाडे व समस्त ब्राह्मणास पत्र पाठवावे राजश्री जगन्नाथपत आबानी वधू विसी पाठविले आहे त्यास वो। राजश्री बालकभट पुणेहून आले असल्यास त्याचे विच्यारे करार करून ल्याहवे अगर आपण सविस्तर ल्याहवे बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनति
पेशजी बहिरो आपाजी याचे घरी सावसर्गिक दोष घडला ह्मणोन पत्र आले त्याची इतिकर्तवेता काय ती लिहून पाठवावे त्याज प्रा। वर्तणूक केली जाईल हे विनति
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २५१
श्रीसाबसदाशिवी जयति
श्रीमदुमारमणचरणपरायणात करणनिखिळगुणगणभूषण-
महाराजशाहूभूपतिचक्रवर्तीप्रतिनिधिमूर्तिश्रीपतिरावस-
म्राटस्थपतिवाजपेयीप्रभुवर्योत्तमेषुआश्रितातर्गतश्रीकरहाटकक्षेत्रस्थसमस्तब्राह्मणकृतानेकअशिर्वाद उपरि येथील कुशल कार्तिककृष्ण पचमी जाणोन स्वीय कुशळलेखनाज्ञा केली पाहिजे विशेष अमचे क्षेत्रस्थ ब्राह्मण तेथे सदैव यजमान गृही राहताति ते साप्रत अपल्या दर्शनास येउन समस्त ब्राह्मण अमचा द्वेष करिताति या स्तव क्षेत्र वियोग करू आह्मास जे स्थळ द्याल तेथे राहू ऐसे बोलताति हे वर्तमान ऐकिले ह्मणून हे पत्र लिहिले समस्त ब्राह्मणाचे प्रतिपाळक महाराज अपण राजसदृश कर्मज्येष्ठ ब्राह्मणोत्तम आहेत समस्तानी त्याचा व्यतिक्रम काय काय केला तो त्यास पुसोन अह्मास जे आज्ञा करणे ते करावी समस्त मान्य करू त्याचा अमचा सप्तपुरुष कळह नाही सांप्रत चारी मास ते भिन्न स्तोम करून समस्ताचा द्वेष करिताति ते च समस्ताचा अपवाद सागताति हा परिहार पत्रे करून होत नाही राजश्री अण्णा सर्वज्ञ आहेत ते अपण एकत्र बसोन अह्मास बुद्धिवाद सागोन जे करणे ते कळह निवारण करून केले पाहिजे हे ऐकून अम्हि च यावे परतु अपली आज्ञा होईल तेव्हा यावे त्याचा अमचा कळहाचे काही निमित्त नाही कळह बाबादीक्षिताचा ते गेले आता पूर्ववत् अपल्या गृही सत्कर्माचरण करून राहावे हे शिष्टास श्रेयस्कर आहे बहुत काय लिहिणे परपरा जे चालते तसे त्याणी अम्ही चालावे म्हणजे कळह होणार नाही क्षीरनीरविभाग करणार राजहस प्रभु विवेकी असता अन्याये वर्तेल तो ते च सुख पावेल कृपावर्धमान करणे हा अशिर्वाद श्री श्री श्री श्री श्री
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २५०
श्री
नकल
स्वस्ति श्रीमत्सकलसौभाग्यनिदानभूतमहालक्ष्म्याराधि-
तचरणासु पतिवृताधूरिणासु देवब्राह्मणप्रतिपालकसधासु
मातुश्रीलक्ष्मीबाईत्याभिधासु प्रतिनिधिषु
आश्रित तात्या दीक्षित गिजरे वास्तव्य क्षेत्रकरहाटक कृतानेकाशिष समुल्लसतु विनति येथील वर्तमान ता। ज्येष्ट वा १२ पर्यत यथास्थित असे विशेष दर्शनास बहुत दिवस जाहले येण्याचा मानस परतु प्रस्तुत पर्जन्या मुळे घडले नाही येथे श्री पाशी प्रार्थना करीत आहो आपले मनोदयानरूप श्री करील चिरजीव अनतभट पगु याचे चालविण्या विसी श्रीमत यजमान स्वामी याज पाशी मसूरचे मुकामी विनति केली त्याज वरून कृपाळु होऊन मौजे भुरभुसी हा गाव पडीक शभर रुपयाचे आकाराचा इनाम करून दिल्हा आहे त्याचे लावणीची खटपट हाली करीत आहे त्यास वो । राजश्री सखभट वैद्य याज पाशी त्या गावचे पत्र श्रीमत कैलासवासी कृष्णाजी परशराम याचे नावचे ऐसी नवद वर्षाचे आहे ह्मणोन ऐकितो त्यास श्रीमत कैलासवासी थोरले रावसाहेब याज पासून गुदस्त पावे तो सुभा कडे वसुली तो गाव यजमान स्वामीनी पगूस दिल्हा आहे त्या पेक्षा चालविणार धनी समर्थ आहेत आपणास मजकूर श्रुत असावा यदर्थी लिहावयाचे कारण साराश पगू याचे स्थापनेचा उच्छेद नसावा श्रीमत साहेब याणी वृक्ष लाविला आहे यास च कृपोदकसेचन करून वृक्षाची वृद्धि असावी आपले सत्कीर्तिगुणानुवादश्रवणे करून निरतर सतोश आहो बहुत काय त्याहावे लोभ केला पाहिजे हे विनति
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २४९
श्री
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृद क्षेत्रश्रीकरहाटक यासी
प्रति बालभट बीन रामचद्रभट व बालभट बिन भाऊभट ज्योतिषी को। बिलासी पो। सिराळे कृतानेक साष्टाग नमस्कार विनति येथील क्षेम ता। पौष वा। ३० पावे तो यथास्थित असे विशेष काल चतोर्दशी मदवार रोजी सिराले येथे श्रीजगद्गुरु स्वामी याणी आह्मास बोलावणे केले त्याज वरून आह्मी तेथे गेलो नतर सिरालकर याणी बोलणे स्वामी पाशी काढले की बिलासकर हे कराडकर याचे अनुमते वागतात व आह्मास क्षेत्र असे ह्मणत नाहीत त्या पेक्षा याचे आमचे ठरऊन दिल्हे पाहिजे बिलासकर याणी आह्मास सदर दोन्ही मार्ग चालणार नाही असे लिहून द्यावे असे श्री पाशी त्याचे ह्मणणें पडले वरून आह्मी विनति केली की हे वर्तमान कराडकर यास कळवू नतर त्याचें उत्तर येईल तसे करूं असे ह्मणून हें पत्र तुह्मांस लिहिले आहे तर आपण उदईक श्री ची स्वारी असेल तेथे येऊन पोचावे अनमान होऊ नये स्वारी सिरालेत च आहे न येणे जाहलेस पत्राचे उत्तर पाठवावे नतर आह्मीं ते सांगतील तसे ऐकू कळावे हे विनति
सह्या
१ सही बाळभट बिन रामचद्रभट बिळासीस्कर जोशी
१ सही बाळभट बिन भाऊभट जोशी
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २४८
श्री
श्रीकृष्णककुद्यतीप्रीतिसगमो जयति
स्वस्ति श्री समस्तवेदपरायणब्राह्मण क्षेत्रकराड यानि याविराजित राजमान्य राजश्री हिरोजी पा। व रुद्राजी पाटील व समस्त मौजे अतीत ता। उब्रज आशीर्वाद उपरी तुह्मी पत्र पाठविले ते पावले व तकरीरा पाठविल्या ते पावले लिहिला अभिप्राय अवगत जाहला धनाजी पा। व नथू काबरे याचा करीना कैसा आहे तो सत्य स्मरून लेहून पाठविणे ह्मणऊन लिहिले तरी पुरतुलाखान कडेगावास आले मुलकात धामधून जाली तमाम गाव जाऊन कौल घेऊन आले ते समयी सैदापुरास हि रोखा आला त्यास धनाजीं रोखा घेऊन आह्मा कडे आला आपण कौलास जावे की काय ह्मणऊन आह्मास विचारिले त्यास आह्मी सागितले जे टाणे जवलीक गाव आहे येकायेकी भेटायास येत नाही आह्मा वरी शब्द येईल तुह्मी भेटो नका वसतगडास जाणे मग पुढे कैसा विचार होईल तो मनास आणून त्या सारखी वर्तणूक करणे ह्मणऊन त्यास सांगितले त्यास तो निरोप घेऊन गावास गेला गावी अवघे आपले भाऊबद बैसोन विचार केला की मुलूक अवघा जाऊन भेटला आह्मी पळालियाने पुरे पडत नाही जाऊन भेटावे ऐसा विचार केला मग भेटीस जावे ऐसे जाहले मग वेदमूर्ति वासुदेव