लेखांक ६
१५६० माघवद्य ७.
(तालीक)
+ + + + बहुधान्य संवछरे माघवद्य सप्तमी बृहस्पतिवार सुहुरसन तिसां सीसन अलफ छ २० माहे सवाल बिहुजूर
ठाणे कर्याती सासवड | |
त्रिंबक मलनाथ हवालदार शिक्का |
राजश्री नागोजी दादो मुजुमदार |
बाजी व ताऊजी देशमुख शिक्का |
होनाजी व हिराजी मोकदम क॥ मजकूर |
गोविंद त्रिमळ देशकुळकरणी | संतसेटी व तुकसेटी सेटिये व संतसेटी महाजन |
प्रा। पुणे | |
मौजे गराडे | मौजे चांबली |
धाक मोरोजी पाटिल मोकदम काऊ प॥ घारा चौगुला मौजे हिवरे |
चाऊ पाटिल मोकदम मौजे भिवंडी |
दसप॥ सोनाजी मोकदम गोमाजी निभोरा चौगुला |
जयंतप॥ मोकदम रावजी व राघोजी चौगुला चांदजी चौधरी |
मौजें काढीत कर्यातीं मजकूर | |
बाबाजी राजिवडा तुक पाटिल फंड | भिकाजी राजिवडा चौगुला |
सोमाजी दादो कुलकर्णी व जोसी | हरजी दिघा |
लुख माहाला न्हावी व कान्हो माहाला | राम दरणा गुरव |
न्हावी | नाऊ सुतार |
बहिरो कुंभार भिका बिन काळा | महार विर्तीकार |
भाऊ परिट | भिका बिन काळा बंका |
सोम ठाकूर |
सदरहू काळी व पांढरी दो ठाई केली असे. बापदेवाचे उजवीकडे गाधा या दुतर्फा जमीन मौजे कोढीत कर्यात मजकूर केले. तमाम मौजे मजकूरचे भूमगणे थळे सखर निखर पाहून, मनास आणून मौजा अज कास रुके .। =
दो ठाई काळी व बरड बरहक केले
तपसील
तरफ सूर्याजी बिन दाद तरफ सूर्याजी बिन माहाद
सदरहूप्रमाणें बारहक वाटून दिल्हे असे. एणेप्रमाणें वर्तावयास जो हरकत करील तो दिवाणाचा गुन्हेगार व गोताचा अन्याई. केले मोडील त्यास नवखंडी याची क्रिया मोर्तब असे.
पहिले जे कागद निवाडियाचे असतील ते रद असेती. मोर्तब असे.
तेरीख छ २० माहे.
रबिलावल