पत्नी दुहितरश्चैव पितरौ भ्रातरस्तथा ॥
तत्सुतो गोत्रजो बंधु शिष्य स्र्रह्मचारिण: ॥१॥
पिंडदोंशहरश्चैपां पूर्वाभावे परःपर इति ॥
वृध्दमनुरपि ॥
पत्न्याः समग्रधनसंबंध वक्ति ॥
अपुत्रा शयनं भर्तुः पालयंती व्रते स्थिता ॥
पत्न्येव दद्यात्तपिंडं कृत्स्रमंशं लभेत च ॥
बृहत्मनुरपि ॥
कुल्येषु विद्यमानेषु पितृभातृसनाभिषु ॥
असुतस्य प्रमीतस्य पत्नी तद्भागभागिनी ॥
अस्मिन्नेवार्थे विज्ञानेश्वरस्य उपसंहारफक्किकापि ॥
तस्यादपुत्रस्य स्वर्यातस्य विभक्तस्यासंसृष्टिनोधनं परिणीता स्त्री सकळमेव गृण्डातीति स्थितमिति ॥
ऐसीं वचनें शास्त्रीचीं असेती. तरी शास्त्र व साक्षीप्रमाणें उभे वर्गी वर्तावें. बित ॥
बाजी बिन बानजी रणनोवरे मोकदम यांसि कागदीपत्रीं मोकदमीचे नांव एकच याचेच लिहित जावें व नागर एकच इहींच करावा व दिवाणांतील व हरएक ठाईचीं लुगडीं व पानें व दिवाळीचे व हरएक वाजंत्र व वोवालणें व वोवालणी व पोळियाचे बैल व बाजे मान जे असतील ते तमाम आधीं यास. यामागून कृष्णाजी बिन सिदोजी रणनोवरे यासी. एणेप्रमाणें मानमाननूक घेणें. व हक जो मोकदमीस काळीस व पांढरीस उत्पन जें होईल तें दो ठाई बराबरी करून निमे इहीं खावा व मोकदमास राबता माहार आहे तोहि दो ठाई असे. होळीस पोळी एकींच इहीच बांधावी.
कृष्णाजी बिन सिदोजी रणनोवरे यासी बाजी बिन बानजी मोकदम मागे मानमाननूक कृष्णाजीनें घेणें. मोकदमीचे निसबतीनें हक उत्पन्न काळीस व पांढरीस होईल त्याची निमे एणें घेणें, व राबणूक माहाराची तेहि निमे यास असे.
एणेप्रमाणें निवाडा केला आहे व याखेरीज यांच्या वडिलाचें सेत मोकदमीचें मिरासीचें असेल तेंहि निमे बाजी बिन बानजीनें घेणें, निमें कृष्णाजी बिन सिदोजनें घेऊन लेकुराचे लेकुरीं खाऊन सुखें असणें. यासि जो हिलाहरकती करून निवडिलेप्रमाणे वर्ते ना तेणें दिवाणातु होन ५०० व सिसे पांच देणे, व गोताचे अन्याई. हा महजर सही.''