लेखांक ५६.
+ + + + + + + + + सिरपावं काजकीर्द माहाराज छत्रपति व बाजीराव व चिमाजीआपा ता।
मौजे वरवड ता। पाटस गाव स॥ मोकासा मातुश्री राधाबाई यास यांचे तरफेनें कमावीस र॥ नारो बाबाजी ते वेळेस फिरंगोजी प॥ व बाबाजी प॥ देईकर यांस सिरपांव.
मौजे खडकी त॥ पाटस र॥ बापूजीपंत नाना दि॥ पेशवे याच्या वेळेस खंडणीस मकाजी प॥ काके यानीं यावें सिरपावं द्यावा.
मौजे सोनवडी हा गांवहि मोकासा मातुश्री राधाबाई पेशवी यास ते कमावीस नारो बाबाजी तेव्हां बाबाजी देईकर कारभार करीत होता हाली जयापा सिंदे मोकासा दरोबस्त हरबाजी प॥ पोवार कुळकर्णी गटाणे मौजे दउंड
मौजे दहीठाणे त॥ पाटस माहाराज छत्रपति याणी दरोबस्त गांव मोकासा फत्तेसिंगबावास दिल्हा.
मौजे आठगांव तरफ पाठस निमे पाटिलकी वडीलपण माहाराज छत्रपति निमे दरेकर चौगुले च्यार होने मोरे बाराते आगस्ते ए॥ सिरपावं ६ कुलकर्णी राज्यउपाध्ये.
मौजे सिरापूर पाटिलकी निमे र॥ रघूजी भोसले आधी सिरपावं या मागे सिरपावं माहाराज राजश्री छत्रपति माहाराज त्यांचे तरफेनें राजजी प॥ ठोंबरा कारभार करीत होता रघूजी भोसले यांचे तरफेनें बापुजी भोसला होता व कुलकर्णी राज्योपाध्यें.