लेखांक ५९
श्री.
हकीकती मोकदमी मौजे वडिगांव ता। नीरथड प्रा। पुणें मोकदम कदीम चोथे मचलियानी मारून काढिले मग मचाले करीत होते त्यावरी मचाले निंबाळकर वणंगपाळ यांनी मारून काढिले मग त्या निंबाळकरानी राजाळेकर निंबाळकर आले त्या घरास विठोजीस पाटिलकी दिधली त्यास विठोजीस पांचजण लेक वडील कान्होजी.
वडील कान्होजी | संताजी | मालोजी | निंबोजी | खंडोजी |
१ | २ | ३ | ४ | ५ |
यामध्ये कान्होजीचें बुडालें व निंबोजी व खंडोजीचें बुडालें यांमधें विठोजीचा चुलतभाऊ डाकोजी याचा लेक सिदोजी धाकटा त्याचे लेक मानाजी व सुभानजी हे दोघे जण हैबतरायाबराबर असती यांचा परामृश करणे सिदोजी निंबाळकर सदरहू संताजीचा लेक त्याचा यमाजी हाली असे.