लेखांक ५३.
तारीख १६५४ कार्तिक शुध्द १३
खरीदीखत श्रीशके १६५४ परिधावी नाम संवत्सरे कार्तिक सुध त्रयोदसी सुक्रवार त दीनी खरीदी खत लिखीते खरीदकर्दे राणोजी बीन जनकोजी पाटील सीदे साकीन कन्हेरखेड समस्त कोरेगाऊ प्रांत वाई यासी फरोक्तकर्दे सूर्याजी बीन कोडाजीये बीन रखमाजी व त्रीबकजी बीन रखमाजी पाटील राजवडे मोकदम मौजे आऊध तर्फ हवेली प्रांत पुणे सु॥ सन सलास सलासैन मया व अलफ सन हजार ११४२ कारणे खरीदखत लेहोन दिल्हे ऐसेजे आपणावर कर्ज बेमोबलग जाले फेडावयास ऐवज नाहीं व पेसजी वतनामुले कित्येक खाले पडिले यामुले आपली नातवानी बहुत झाली याकरितां आपण तुमच्या गला पडोन तुह्मास भाऊ केले आणि आपली मोकदमी मौजे मजकुरीची दरोबस्त आहे त्यापैकी निमे मोकदमीचे वतन खुष रजावंदीने विकत दिल्हे किमत रुपये करार करून सदरहू रुपये घेऊन मिे मोकदमीचे वतन तुह्मास विकत दिल्हे असे. याउपरी पांढरीची लावणीसंचणी तुह्मी व आपण करून सदरहु वृत्तीच्या मानापानाची वाटणी तुमची आमची एणेप्रमाणे बि॥
नाव नागर | |
राणोजी बिन जनकोजी पा। सिंदे निमे मोकदम |
सूर्याजी बिन कोंडाजी एबिन रखमाजी व त्र्यंबकजी बिन रखमाजी पा। राजवडे निमे मोकदम |
नि॥ नांगर |
सीरपाउ दिवाणीचे पागोटी दोघानी बराबर घ्यावी व विडे बरोबर १
गावात कुळास कउल देणे अगर गावातील टिळा विडा आधी सिंदे मग राजवडे. १
अर्जदास व कागद हरकोण्हास लि॥ तो सिंदे व मागून राजवडे या पधतीने ल्याहावा १
नागपंचमीस वारुळाची पूजा आधी सिंदियाच्या बाइकानी करावी, मग राजवडीयाच्या बाइकानी करावी १
सिरलसेटी आधी राजवडे याचा पुढे चालावा, मागे सिंदीयाचा चालऊन नदीत टाकावा १
गणेशचौथीचा गणेश पुढे राजवडीयाचा मागून सिंदियाचा १
जोसियाचे पातडे :- दसरा व गुडियाचा पाडिवा आधी सिंदे मग राजवडे दिवाळी व संक्रांती आधी राजवडे मग सिंदे.
दसरियाचे आपट पूजन दोघानी बराबर करावे १
संवत्सर प्रतिपदेस आढियाचे पूजन दोघानी बरोबर करावे १
घरठाणा वाडा. आपला मोकदमीचा आहे तो निमा उजवीकडे आपला आपले डावीकडे निमे तुह्मास दिल्हा १
पोलियाचे बैल बरोबर दोघाचे चालावे उजवीकडे सिंदे डावीकडे राजवडे १
दिवाळीचे ओवालणे वाजंतर आधी सिंदे मग राजवडे १
दरनागराची पूजा दोघानी बरोबर करावी १
कुंभारानें मातीचे बैल पोलियाचे दिवसी दोघास दोनी बरोबर आणून द्यावे १
दसरियाचे वाजंतर आदी राजवाडे मग सिंदे १
दसरियाचा घट श्रीचे देऊली बसेल त्याची पूजा दोघानी बरोबर करावी १