इतकें तुह्मांस आपण देत असें आपणास अन्न देऊनु वाचवणे ह्मणऊनु बोलिलों. तरी बोलिले कीं तुझे तकसिमे मधे तकसी घ्यावी हे गोष्टी काही मधे होत नाहीं. पा। मारचे देसक व तुझे बापभाऊ यां विदमानें त्यास राजी करून देत अससील तरी जरूर. तूं गळां पडतोस ह्मणऊनु अंकीकार करून. ह्मणऊनु बोलिले. बाजद आपण देसकास भेटोनु त्यास वर्तमान सांगितले. आपले बापभावास ही सांगितलें. देसक व आपले बापभावांनीं निरोप दिल्हा कीं आपले रक्षणार्थ आपले त मधे विकितोस तरी विकी ह्मणऊनु त्यांचा निरोप घेतला. आणि आपली तकसीम पैकी एक चावर वजा करुनु उरले
चावर ठी ॥ गैरमो। वडीलपण
१॥। ४ कलम १
सदरहू तकसीम वडीलपण माहादजी पाटील का। मसूर यास विकत किमती होनु २० विसास खंडून दिल्हे व याचे क्रयपत्र देसक व आपले बापभावांचे साक्षीनें करून दिल्हे असे व ठाणा राजमुद्रा व देसक व गोत यांचा महजर करून द्यावयाची शर्त आहे. ह्मणऊन साहेबसदर व देसक पा। मा। व गोत यां पाशीं आलों आहे. महजर करून द्यावयास आज्ञा केली पाहिजे. ह्मणऊनु अर्ज केला. बाजदसदर व देसक व गोत यांनीं मादजी पाटील मसूरकर यास लिहिलें कीं संताजी चव्हाण पाटील कोणेगाऊकर बोलतो तें यथार्थ आहे किंवा विपरीत आहे. मग माहादजी पटेल बोलिला कीं, संताजी पटेल बोलतो हें यथार्थ आहे. साहेबीं महजर करून दिल्हा पाहिजे. ह्मणऊनु बोलिला. बाजद संताजी चव्हाणाचे बापभाऊ व गावींचे बारा बलुते यांस विचारिलें. तेही बोलिले कीं आपले शरीरपक्षणार्थ विकितो. तरी सुखी विकीना कां ? साहेबी महजर दिल्हा पाहिजे. ह्मणऊनु बोलिले. या वरुन महजर केला असे. संता बिन भिवजी पटेल कोणेगाऊकर वडीलपण व गावाचे तिसरे तकसिमेचा पटेल
मशाती चावर गैर मो। ठिकणे वडीलपण कलम पान
४ १४ ६ मान व तश्रीफ व माहार
पैकी वजा नांगर कलम १
मशाती चावर गैर मो। ठि॥ वसले
२।१४ २
देसकुळकर्णी पा। मा। यास पहिलेच
विकत दिल्हे हाली खाशा सताजी भिव-
जीने खाशाखाली ठेविली
मशाती चावर ठि॥ गैरमो। चावर
१।१४ २ १