लेखांक ९
१५५१ कार्तिक वद्य २
अज रख्तखाने राजश्री आबाजी राजे घाटिगे दामदौलतहू बजानेब कारकुनानी पटेल व मोकदमानि व रयानी का। मसूर ता। मजकूर पा। कर्हाड बिदानद सु॥ सलासैन अलफ अर्जदास्त छ ७ माहे रबिलोवल पा। छ १४ मिनहू पा। होउनु मालूम जाहाली आहाली नफराई व मशाखती व कसबे व गावगन्ना लावणीसचणीची खबर बहुत बयानवार लिहिली एक ब एक हुजूर मालूम जाहाली व माकोजी घाटिगे तेही सदर्हूप्रमाणे बयानवार खबर लिहिली, त्या हि वरून मालूम जाले तू दिवाण न्याहाईम व हलालखोर साहेबकामास तकसीर नाही आपले कुणबिकीमधे राहात असौनु लावणी व उगवणी करणार ऐसे आह्मास मालूम आहे हाली तुवा कोण्हता बेतालुक आदेसा न करिता बेशक होउनु कसबामधे एउनु कसबा व गावगन्ना मोकदमास कौलुबोल देउनु मामुल करून लावणी उगवणी करणे एक जरी याचे शक न धरणे तुज ह्माकोजी घाटिगे जैसा कौलुबोल भाक भरवसा देतील तैसा आह्मास आहे आह्मापासि हर कोण्ही सांगेली ते गोस्टी आह्मी आईकणार नव्हो, रह रास मनास आणितो, हे हि तुज कळले आहे पुढे हि तुझे कामावरून व हालतीवरून बहुत सरफराजी होईल हाली कोण्हे गोस्टीचे गुमान न धरणे व खातीरजमा करून दिवाणकाम चालवणे कौलु असे तुझे बाबे नरसो दामोधरे हुजूर हलालखोरी बहुत वजा सागितली, त्यावरून मालूम जाले तू दाईम हलालखोर आहेसी देसगतीचे बाबे लिहिले तरी देसगतीचे सालाबाद जैसे चालले असेली तेणे प्रमाणे सरजामी होईल पाहिजे जैसे आमचे खुद खत सादर आहे, त्यासि जैसे चालिले असेली तेणे प्रमाणे सरजामी करून तुवा कोण्हे बाबे आदेसा न करिता गावास एईने ह्माकोजी घाटिगे व माहालीचे कारकून जैसे सागतील तो आमचा आहे दिल, जाब, सिरपाव, तोरण, भेटीची सिस्त व विलातीची सिस्त करून दिवाण नफराई करणे
तेरीख १५ माहे रबिलोवल
रबिलोवल
पै॥ छ २८ रबिलोवल
आवर्दे + + जी दरोजी अफराद
ठाणा ता। मसूर