Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
१० स्नानसंध्या षट्कर्माचरणीं लक्ष असावें, होई ते जपोन नोमानें करावें; त्याचे गुण.
१ आराध्य देवतेचें पूजन करावें.
१ स्नान संध्या इत्यादिक कर्म आन्हिक आश्रयानें करावें.
१ यथासामर्थ्ये सत्पात्री दान द्यावें.
१ प्रतिगृहीं निर्लेप असावें.
१ विद्येची वृध्दी करावी.
१ पुत्रापासून व शिष्यापासून पराजय इच्छावा.
१ ब्राह्मणभोजनादिक अन्नशांति होत असावी.
१ भूतमात्राचे ठायीं दया असावी.
१ पापक्षयार्थ श्रौत, स्मार्त कर्मे आचरावी.
१ हृदयी सच्चिदानंदनामस्मरण करून आनंदित असावें.
१०
४ लोकापवादास चित्त भयभीत असावें. त्याचे गुण.
१ पापाचे ठायीं.
१ श्रापाचे ठायीं.
१ अपमानाचे ठायीं.
१ अपयशाचे ठायीं.
४
६ शरीरास जपावें, त्याचे गुण.
१ आहार नेमानें करावा.
१ औषधी उपाय कार्याकारण.
१ व्यायामाचा अभ्यास करावा.
१ इंद्रियें स्वाधीन ठेवावीं. त्याचे स्वाधीन आपण नसावें.
१ ग्रहपीडा पाहून कांहीं मार्जन योजना करावी.
१ चिंता न लागे असा धंदा करावा.
६
१ कुटुंबास आज्ञेंत ठेवावें, त्याचे गुण.
१ भयेकरून.
१ स्नेहेकरून
१ नित्यकर्माचे आर्गळेकरून.
१ वडिलांचे शिक्षेंत लज्जायुक्त मर्यादेकरून
४
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
मनुष्याचा उपयोग राज्यांत व्हावा एतन्निमित्त शिक्षेचा सारांश लिहिला आहे. हा सर्व व्यवहारीं उपमेस घ्यावा. सर्वांस शिक्षा एकरूप असावी. शंभर अश्व एक शिक्षेनें शिकवून
तयार केले तर त्यांचे स्वभाव, कार्य एकरूप होत असतें. तसें जें जें कार्य करणें त्या व्यवहाराचे मनुष्यास एक सारिखे शिक्षेनें शंभर माणूस तयार केले तरी तितके माणूस एक
कार्यास उपयोगी पडेल. त्यास म्हणावें शंभर शहाणें, अक्कल एक. नाही तर आपलाले बुध्दीनें शहाणें झाल्यास एकाचें शहाणपण एकास मिळणार नाहीं. तीं माणसें व्यर्थ श्रम
करून त्यांच्यानें कांहीं संरक्षण होणार नाहीं. यास्तव राजानें जपोन शिक्षायुक्त वर्तविल्यास
तोच विश्वकुटुंबी ह्मणावा. न केल्यास राजाचा व प्रजेचाहि नाश आहे. यास्तव जागा जागा पध्दती घालोन काम चालवावें.
९ उदमांत शहाणें असावें, त्याचे गुण.
१ नफा उदमांत गुंतवूं नये.
१ फार नफा घेऊं नये.
१ मूर्खाशीं धंदा करूं नये.
१ आहारीं देणें घेणें ठेवावें.
१ नोनें सत्य बोलावें.
१ शेवटीं सावकार व कुळ मोकळें होय असें मुळीं जपावें.
१ उधार थकूं देऊं नये. मुदतीस वसूल घेत जावा.
१ भोळें कोणाचें घेऊं नये.
१ भांडवल व पत बहुत सावधपणें जतन करावीं.
९
४ वतनसंबंधें आचरण, त्याचें गुण.
१ भोगवटा चालवावा.
१ वाद्याचें खोटें ठिकाणीं लावावें.
१ दायादभाग वाटून खावा.
१ वडीलपणाचें स्वामित्व कांहीं समजोन राखावें.
४
४ समाधानवृत्ति असावी. त्याचे गुण
१ लाभ होईल तो ईश्वरास निवेदन करावा. अभिमान करूं नये.
१ अभिमानी पांडवांचा वनवास स्मरावा. तेथेंहि धर्म सोडिला नाहीं हे समजावें.
१ गमाविल्याचा शोक करूं नये.
१ करावयाचें तें आधीं बोलूं नये.
४
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
५ मामलतींत शहाणें असावें.
१ लावणी बिघ्यापर्यंत सांभाळावी.
१ हप्त्याचा वसूल आहे तो आगाव घ्यावा.
१ रयत राजी राखावी.
१ निभावणी होय अशी सरकारकिफायत समजोन करावी.
१ लोभ धरून सीमाहरण किंवा वृत्तिच्छेद करूं नये.
५
२१ धनीपणाचे गुण
१ कुलिनाचें महत्व रक्षावें.
१ समयोचित नेलें द्रव्य सेवकांस द्यावें.
१ मंत्रीउपदेशीं विश्वास ठेवावा.
१ शत्रू जिंकोन खजीना बाळगावा.
१ प्रजा पुत्रवत् पाळावी.
१ सेना क्षीण करूं नये.
१ मित्र कोण, शत्रू कोण, याचा परिणाम कसा, तो पूर्वीं समजावा. आधीच इरेस पडूं नये.
१ संपादिली कीर्ति संरक्षण करावी.
१ अमात्यपदवी रक्षावी.
१ व्यायाम श्रमसहिष्णी असावा: *हसगे, तालीमखाना, इत्यादिक.
१ दुर्व्यसनाचे अभ्यासाचें आर्जव करील तो शत्रू समजावा.
१ बंधुवर्ग आज्ञेंत ठेवावे; योग्यता पाहून कामास ठेवावे.
१ प्रतिज्ञा सत्य करावी.
१ औदार्य व शूरत्व असावें.
१ दुष्टाचें पारिपत्य करून शिष्टाचें पालन करावें.
१ सेवकजनांचे सुबुध्द पुत्र पाहून अश्वशिक्षेप्रमाणें लहानपणापासून ज्यास ज्या व्यवहाराचें कारण आहे त्या व्यवहारीं एकशिक्षेनें तयार करावे.
१ काम सांगोन कसोटी पहावी.
१ इमानशाबुदी कशी आहे ती दृष्टींत ठेवावी.
१ इमानी मनुष्य, कृतकर्मा दिसेल त्यास वाढवीत जावें.
१ सर्व कारखाने चालवावयाचीं माणसें असतात व स्वराज्यांतील व परराज्यांतील उपयोगी वगैरे त्यांचे माहीतगारीचा शिलशिला जागा परंपरेनें अनुभवयुक्त चालवावा. शिलशिला उठूं देऊं नये.
१ धन्यापासून अमर्यादा व दंड व अधर्म घडल्यास तो धनी प्रजेस मान्य होत नाहीं, हें समजोन, एक मर्यादा हीच खरी संपदा, अशा निश्चयानें धर्म सोडूं नये.
२१
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
पुरवणी :-
तीर्थरूप राजश्री राऊ तथा राजश्री आप्पा स्वामीचे सेवेसी. विनंति. आजि मंदवारी प्रात:काळी दरबारास गेलों होतों. राजश्री नारबोवा व आणीकही कित्येक लोक मुज-यास आले होते. तेव्हा राजश्री स्वामी बोलले की, राजश्री प्रधान पंत पुण्यास कोट बांधितात, येविषयी पहिले हुजुरे व कागद पाठविले. परंतु ते गोष्ट न ऐकता आपलाच हेका करून किल्ला बांधितात. तस्मात् मोंगलाचें पुण्याचें ठाणें बसावें, असे त्याच्या मनांत आहें की काय ? सिंहगड किल्ला जवळ तेथें चिरेबंदी कोट पक्के काम करितात. द्वाही हुजुरे याणीं दिली, तथापि मोजीत नाहीत आणि कोट बांधितात. राजश्री सचिव पंताचा किल्ला सिंहगड जवळ आहे. ऐशियास सचिवाकडील किल्ल्यास मोंगलाचा मोर्चा बसवावा असे त्याचे चित्तांत आहे, हे कांहीच कळत नाही. तसेंच जागा जागा किल्ले वाघोली व नांदडें व वाडी व आंबी वगैरे जागी किल्ले बांधितात. मोंगलाची आवाई झाली तरी यांतून एकही जागा रुजणार नाही. आणि आपलें आपल्यासच प्रतिबाधक कर्म कां करितात ? व वडीलही उगीच डोळे झांकितात. परंतु गळफांस बसेल. पूर्वी पिलाजी जाधव वाडा बांधीत होते, तेव्हां आह्मीं मनाई करीत होतों. परंतु राजश्री चंद्रसेनराव जाधव थोराताची पाठ राखीत, यामुळे वाडीस कोट जाला. शेवटीं राजश्री बाळाजीपंत धरिले. तेव्हां तीच वाडी पुरंदरास मोर्चा जाहला व मुलूख हेराण जाहला. आह्मी सांगत होतों तें न ऐकिलें. शेवटी त्याच गोष्टीस आलें. तसेंच हेंही कर्म आहे. राजश्री प्रधान पंतांनी कांही पुण्यांत कोट बांधावा असें काही नाहीं, ह्मणून बहुत श्रमी होऊन बोलले. स्वामीस विदित व्हावें ह्मणून लिहिलें आहे. चोरपाळतीनें बातमीही पाठविणार आहेत. किल्ला कसा बांधितात असें आहे. तरी स्वामींनी राजश्री स्वामीचे आज्ञेंप्रें॥ किल्ला न बांधावा. हवेलीभोंवती बुरुज न घालितां चार दिवाळी मात्र करावीं. जुनें काम आहे तें कांही फार पक्कें तो नाहीं. परंतु उगीच भ्यासूर दिसतें. त्यास पांढरे मातीनें भिंतीचें बाहेरील अंग सारवावें, ह्मणजे डोळेफोड दिसणार नाहीं. अर्थ सूचना लिहिला आहे. स्वामी खावंद आहेत. खातरेस येईल ते करावें. विदित झालें पाहिजे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.२१
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
सु॥ सल्लास सलासीन मया अलफ, सन ११४२ फसली,
अवलसाल छ ११ जिल्हेज, २५ मे १७३२
ज्येष्ठ शुध्द १२ शके १६५४.
जंजिरें येथे सिध्दीचा अंमल होता. त्या सिध्दीस मोंगलांनीं याकूब असें पद दिलें होतें. त्याशी व मराठ्याशी निरंतर युध्द होत असे. व तो शाहूचे मुलखांतही लूट वगैरे करीत असे. यास अवरंगजेब याणें दिलेला मुलूख होता तो मराठ्याचे हाती लागू दिला नाहीं. यास्तव याजकडील जंजिरा प्रांत व रायबाग किल्ला, सन १६९० इ॥ साली शाहूमहाराजास व त्याची मातोश्री येसूबाई यांस कैद करून दिल्लीस नेलें, तेव्हा तोही मोंगलाचे हाती लागला. व तो सिध्दी जंजीरकर याजकडे दिला होता, तोही घ्यावा असें शाहूहाराज व त्यांचे दरबारचे लोक इच्छित होते. जंजीरकर यास कपट करून जिंकावा अशी प्रतिनिधींनी मसलत केली. ती अशी की, त्या सिध्दीजवळ त्याचा विश्वासू याकूबखान मुसलमान होता. त्याशी वश करून ठरविलें की सिध्दीचें अधिपत्य नाहीसें झालें असतां, कांही किल्ले आह्मास देऊन बाकीचें राज्य तूच सांभाळ. ही मसलत शेवटास न्यावयाकरितां महाराजानी प्रतिनिधीबरोबर फौज देऊन कोंकणांत पाठविलें. त्या वेळेस यशवंतराव महादेव यासही महाराजांनी पाठविलें होतें. परंतु त्यास कांही प्राप्त न होतां सिध्दीपुढें कांही चालेना. सबब प्रतिनिधी तेथून निघून गोवळकोट किल्ल्यामध्ये गेले. तेथेंही जंजीरकर याणी लोक पाठवून छापा घालून प्रतिनिधीची दुर्दशा केली. याच सुमारें जंजिरे येथील सिध्दी गादीवर बसलेला मयत झाला. त्यास सहा पुत्र होते. वडील सिध्दी अबदूल जंजि-यात राहिला. त्याचे पाठचा अबदूल रहिमान मुर्दादफनास जंजि-याबाहेर आले. बाकी त्यापेक्षां धाकटे सिध्दी सबान व सिध्दी आरबाब व सिध्दी रहयान व सिध्दी याकूब असे चौघांनी विचार करून वडील सिध्दी अबदूल यास जिवें मारून आपण जंजि-यात राहिले. सिध्दी अबदूल रहिमान बाहेर आला होता, त्यानें चार बंधूंनी दगा केला हें ऐकून जंजि-यात न जातां राजपुरीस राहिले. त्याजकडे यशवंत महादेव याणीं संधान लावून त्यास वश करून ठेविला होता. हें वर्तमान याकूबखान मुसलमान यास कळताच तो सिध्दी रहिमान याचा पक्ष स्वीकारून त्याचे विचारें शाहूमहाराजाकडे मदत मागितली. त्यावेळेस बाजीराव माळव्यांतून येत होता. त्यास मदतीकरितां जाण्याविषयी आज्ञा देऊन शिवाय रिकामे लष्करी जे होते त्यांसही मदत करण्यास आज्ञा केली. त्याप्रमाणे बाजीरावसाहेब पेशवे छ २२ जिल्काद रोजी (२६ एप्रिल १७३३) ह्मणजे अखेर सालीं अजमासें वैशाखांत जंजि-याचे स्वारीस निघाले. यापूर्वी झालेली वर्तमानें : सरकारवाड्याचे ह्मणजे शनवार वाड्याचे कोटास आरंभ झाला, श्रावण व॥ ५ (३० जुलै १७३२). रविलावल महिन्यांत रामचंद्र बाजीराव मयत झाले. छ ११ जमादिलावल रोजी (२० अक्टोबर १७३२) चिमाजी अप्पा हिंदुस्थानचे स्वारीस निघाले. व बुंदेलखंड वगैरे ठिकाणी गेले. छ १६ जमादिलाखर त॥ २७ रमजान (२४ नोव्हेंबर १७३२-३ मार्च १७३३) निजामुन्मुलुकाचे भेटीस स्वारी गेली होती. छ १६ जमादिलाखर साता-यास जाऊन छ २७ रमजान परत पुण्यास आले. छ १० रमजान (१४ फेब्रुवारी १७३३) पो चापानेर सर केल्याची खबर आली, नजीक मईंजगावं, परगणें वोडसे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
४ मिष्ट भाषण करावें, त्याचे गुण.
१ मनोत्साह भंग कोणाचा करूं नये.
१ अनहित विचार सांगूं नये.
१ मित्राशीं कृत्रिम ठेवूं नये.
१ दीर्घ द्वेष धरूं नये.
४
४ वृध्दपरंपरेची मर्यादा रक्षावी.
१ कुलाचार पहावा.
१ देशाचर पहावा.
१ श्लाघ्यसंबंध करावा.
१ स्त्रीच्या बुध्दीकडून अमर्यादा न घडे तें करावें.
४
४ धन्याच्या कामाची एकनिष्ठता असावी. जो ज्याचा धनी तो त्यास राजा असें समजावें. त्याचे गुण.
१ राजपत्नीशीं एकांत करूं नये.
१ वारंवार लोभ करूं नये.
१ धन्याशीं अनृत भाषण करूं नये.
१ समयीं शरिराची आशा ठेवूं नये. आज्ञाभंग न करावा.
४
५ न्यायासंबंधानें निष्ठुरता असावी. त्याचे गुण.
१ दुसरियाचें नुकसान जाणावें.
१ परेंगित ज्ञान असावें.
१ पुढें दोष न येई असा पंचांमतें निश्चय करावा.
१ जाहाल्या पात्रास व वचनास दोष आला तरी त्यास शिक्षेनिमित्त प्रायश्चित्त द्यावेंच द्यावें.
१ पुत्रास व परकीयास समान मोजावें.
५
५ मुत्सदगिरी कारस्थान असावें. त्याचे गुण.
१ धनी आपला ह्मणोन अवज्ञा करूं नये.
१ धन्याचें अनहित धन्याशीं गुप्त ठेवूं नये.
१ परदरबारचा गुप्त लाभ तो लाभ मोजूं नये.
१ धन्याशीं कळलें नाहीं ते आपण सांभाळावें. टाकूं नये. समयीं निवेदन करावें.
१ ऐखत्यारी जतन करावी.
५
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
सु॥ इसने सलासीन मयाव अलफ, सन ११४१
फसली, अवल साल छ २९ जिल्काद, २५ मे
१७३१, ज्येष्ठ शुध्द १ शके १६५३.
छ ३ जिल्हेज रोजी (२९ मे १७३१) श्रीमंत साता-यास गेले, ते छ २० जमादिलाखर रोजी (९ डिसेंबर १७३१) पुण्यास परत आले. छ २० जमादिलाखर (९ डिसेंबर १७३१) चिमाजी अप्पाचें दुसरें लग्न झालें, नांव अन्नपूर्णाबाई. छ ५ साबान रोजीं (२२ जानेवारी १७३२) स्वारी कुलाब्यास गेली होती. छ १० रमजान रोजी (२६ फेब्रुवारी १७३२) परत आले. दिल्लीत बादशहानें ऐकिलें कीं सरबुलंदखानानें मराठ्यास चौथ व सरदेशमुखी दिली. यामुळे त्यास राग येऊन त्यानें अभेसिंगाबरोबर लष्कर देऊन गुजराथेंत पाठविलें व सरबुलंदखानास माघारें बोलाविलें. तो तिकडे गेल्यावर त्याचा अपमान केला. अभेसिंग याच्या फौजदारानें बडोदा किल्ला पूर्वी मोंगलांनीं गाइकवाडाकडून घेतलेला तो आपण घेतला. परंतु तेथील लोकांस पिलाजी गाइकवाड याचें अगत्य फार असें. त्याणें कित्येक जागीं आपली ठाणी बसविली होती. करितां त्याशी तह करण्याचें निमित्त करून कित्येक वेळां माणसे पाठविली. बोलणी चालली होती त्याप्रमाणें एकेदिवशी त्याशी बोलण्याकरितां मनुष्य पाठविला. तो बोलून परत निघाला. नंतर काही वस्तु आंत राहिली असें मिष करून काही गोष्ट कानांत सांगण्याचा आकार दाखवून पिलाजीजवळ जाऊन एकाएकी खंजीर पोटांत खुपसून ठार मारिले. त्या मारेकरियासही पिलाजीच्या माणसांनी त्याच ठिकाणी ठार मारिलें. पिलाजीचे मरणामुळे अभेसिंग लाभ चिंतीत होता, तो त्यास प्राप्त झाला नाही. पिलाजीचा मित्र पाद्रागांवाचा ठिकमा नांवाचा तेथील देसाई होता. त्यानें पिलाजीचा भाऊ महादजी यास बोलावून आणून बडोदा किल्ला त्याणें घेतला. तो अद्यापपर्यंत गाइकवाड यांचे वंशजांकडे आहे. पिलाजीचा वडील पुत्र सोनगडास होता. त्यानें मोठे लष्कर जमा करून बडोद्यापासून जोतपूरपर्यंत स्वा-या करून अभेसिंगास बहुत उपद्रव दिल्यामुळें तो अहमदाबादेस आपला विश्वासू मनुष्य ठेऊन आपण जोतपुरास जाता झाला. महाराज याणीं बाजीराव पेशवे यास सरदेशमुखीचे बंदोबस्ताकरितां हिंदुस्थानांत पाठविलें होतें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
तपशील
एक एक योगाची साधनोगता. कलमें सुमार.
६ जमाखर्च लिहिणार. शाळाशुध्द लिहिणेंयाचा अभ्यास करावा. त्याचे गुण.
१ धन्याची आज्ञालेखकाची मर्यादा रक्षावी. संशयिक अक्षर लिहूं नये.
१ लबाडाचा संग नसावा.
१ वर्तणुकेचें स्मरण ठेवावें.
१ शीलशिला जमाखर्च बाकींत चूक न लागावी.
१ मनुष्याची योग्यता + समजोन विश्वास ठेवावा.
१ गुणाकार, भागाकार इत्यादि सर्व हिशेब शिकावे.
६
४ स्वधर्माचे ठायीं विश्वास ठेवावा, त्याचे गुण.
१ खरें बोलावें.
१ नेमानें चालावें.
१ लोक वाईट ह्मणतील तें टाकावें.
१ वडिलाचे आज्ञेंत रहावें.
४
५ पुत्रास शहाणें करावें, त्याचे गुण.
१ देशाटणें करवावीं.
१ पंडितांचा समागम करवावा.
१ राजसेवा करावी.
१ शिक्षायुक्त विद्याअभ्यास करावा. * दुर्वासनेस जपावें.
१ पुत्रें संपादिलें द्रव्य त्यांतील अंशरूप दक्षणा + ठेवावी. हाच सद्वययास प्रारंभ
५
४ इंद्रियभ्रष्टाचा सहवास नसावा, त्याचे गुण.
१ लटकें बोलतो तो जिव्हेंद्रियभ्रष्ट समजावा.
१ अविश्वासी, कर्णेंद्रियभ्रष्ट, हाच बुध्दिभ्रष्ट समजावा.
१ कामातुर, परस्त्रीरत, हाच सर्वेंद्रियभ्रष्ट समजावा.
१ लोभी, मनेंद्रियभ्रष्ट, हाच निमकहरामी समजावा.
४
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
पेशवे यांजकडील नारायणजी ढमढेरे पडले. याप्रों लढाईचा शेवट झाला. यावर्षी ब्राह्मणांस तळेगांवी दक्षणा मिळाली नाहीं. ब्राह्मण पुण्यास आले. तुह्मी सेनापति मारिले असें बोलू लागले. तेव्हा हुजूर साता-यास लिहून ब्राह्मणांस ठेवून घेतलें. उत्तर आल्यावर श्रावण शुध्द ७ स (३० जुलै १७३१) दक्षणा दिली. शु॥ ५ मीस (२८ जुलै १७३१) दाभाडे देत होते. ही दक्षणा पुढें पेशवे अखेरपर्यंत ब्राह्मणास दरसाल श्रावणमासी देत होते. त्र्यंबकराव याचे पुत्र व उमाबाई दाभाडी व बाजीराव पेशवे यांशी महाराजांनीं साता-यास बोलाऊन माळवा व गुजराथची हद्द करून देऊन तह ठरविला की, निम्में निम्में ऐवज फौजेस वगैरे खर्च करावा, व निम्में रसद हुजूर यावी. जातीचे खर्चास नेमणूक करून दिली. पेषकसी होईल ती हुजूर यावी. याप्रों तह ठरवून पुत्र यशवंतराव यास पदाची वस्त्रें सेनापति हुद्द्याची दिली. ते व्यसनी बेहुष राहू लागले. सबब त्याचा कारभार गायकवाड यांनी बाईचे विचारें करावां असें केलें. बाजीरावसाहेब दाभाडे यांची लढाई झाल्यावर लागलीच छ १ जिल्काद रोजी (२७ एप्रिल १७३१) चिमाजी अप्पासुध्दां परत आलें. दुसरे वर्तमान सालगुदस्त प्रतिनिधींनीं संभाजीचा पराभव करून पन्हाळ्यास लाविलें. ते पन्हाळ्यास गेल्यावर जिजाबाईचें विचारें पारसनीस बाळप्रभू व चिटणीस चिटको प्रभू याशींह सल्ल्याकरितां शाहू महाराजाकडे पाठविलें. याप्रमाणें महाराजांनी मान्य करून महाराज यांची स्वारी उंबरजेस आली, व संभाजी महाराजही भेटावयास आले. उभयतांच्या भेटी क-हाडानजीक जखीणवाडीस झाल्या, शके १६५२ फाल्गुन शु॥ ३ साधारण संवत्सरे (२८ फेब्रुवारी १७३१) उंबरजेहून साता-यास आले. तहनामा शके १६५३ छ १६ सवाल वरोधीकृत संवत्सरे चैत्र व॥ २ (१३ एप्रिल १७३१) बिपतशील. अहद वारूणमहाल तहत संगम दक्षिणतीर कुलदुतर्फा मुलूख दरोबस्त देखील ठाणी व किल्ले तुह्मास दिले असत कलम १. किल्ले कोपल तुह्माकडे दिला. याचे मोबदला तुह्मीं रत्नागिरी आह्माकडे केली, कलम १. वडगावचे ठाणे पाडून टाकू. कलम १. तुह्मापाशी जे वैर करितील त्यांचें पारपत्य आह्मी करावें, व आह्माशी जे वैर करितील त्यांचे पारपत्य तुह्मी करावें. आह्मी तुह्मी एकविचारें वागून राज्यभिवृध्दि करावी, कलम १. वारणेच्या व कृष्णेच्या संगमापासून दक्षिणतीर तहत निवृत्तिसंगम तुंगभद्रापावेतों दरोबस्त देखील गड, ठाणीं तुह्माकडे दिली असत, कलम १. तुंगभद्रापासून तहत रामेश्वर देखील संस्थान निम्में आह्माकडे ठेऊन निम्में तुह्माकडे करार करून दिले असत, कलम १. कोकणप्रांती साळशिपलीकडे तहत पंचमहालपावेतों दरोबस्त तुह्माकडे दिले असत, कलम १. इकडील चाकर तुह्मी ठेऊ नये, व तुह्माकडील चाकर आह्मी ठेऊ नये, कलम १. मिरजप्रांत विजापूर प्रांतींचीं ठाणीं देखील अथणी, तासगांव वगैरे तुह्मी आमचे स्वाधीन करावीं. कलम १. एकूण नऊ कलमें करार करून तहनामा लिहून दिला असे. सदरहूप्रें॥ आह्मीं चालवूं. याशीं अंतर होणार नाहीं. मोर्तब.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
सु॥ इहिदे सलासीन मयाव अलफ, सव ११४०
फसली, अवल साल छ १८ जिल्काद, २५ मे
१७३०, ज्येष्ठ वद्य ५ शके १६५२.
छ २९ जिल्काद (६ मे १७३०) अवल साल जासूद दिम्मत पिलाजी जाधवराव कोहज किल्ला प्रे॥ कोंकण पे॥ सर केल्याचें वर्तमान घेऊन आला. जिल्हेज महिन्यांत (जून १७३०) अप्पासाहेब पायागडची स्वारी करून उंबरजेस गेले. महाराज तेथें गेले, भेट झाली. छ ३ मोहरम रोजीं (८ जुलै १७३०) पुन्हां चिमाजी अप्पा उंबरजेस गेले. छ ३ सफर रोजीं (६ आगष्ट १७३०) उंबरजेहून साता-यास बाजीराव बल्लाळ यांची स्वारी आली व छ ९ मिनहू रोजी (१२ आगष्ट १७३०) पुण्यास आले. छ ४ सफर रोजी (७ आगष्ट १७३० खबर चिमाजी अप्पास पुत्र जाला ह्मणोन आली. छ ११ रोजी (१४ आगष्ट १७३०) नामकर्ण ठेविलें. सदाशिवराव भाऊसाहेब याचा जन्म. छ २८ सफर रोजी (३१ आगष्ट १७३०) चिमाजी अप्पाची बायको बाळंत असता मयत झाली, नांव रखमाबाई. छ ११ रविलाखर (१३ अक्टोबर १७३०) बाजीराव साहेब याची स्वारी निघाली चिमाजी अप्पासुध्दां. पुढे छ ४ रमजान रोजीं (२ मार्च १७३१) बाजीराव अप्पाचे लष्करांत आलें. ही स्वारी गुजराथचे दाभाड्यावर झाली. ही स्वारी व्हावयाचें कारण निजामुन्मुलुकाचा व बाजीराव याचा तह होऊन भेट झाली असतांही त्याजला बाजीराव याणीं नाश केल्याचें स्मरत होतें. त्यानें आपलें अंग न दाखविता दुस-याकडून सूड उगविण्याचें मनात आलें. त्या कामाचे उपयोगीं त्र्यंबकराव दाभाड्या आहे असें वाटलें. त्याचें व बाजीराव याचें पहिलेंच वाकडें होतें. पुढें गुजराथची चौथ व सरदेशमुखी पेशवे यांस प्राप्त झाल्यावर तो फौज ठेवावयास लागला असोन ३५००० फौज जमा केली. व निजामाचेंही साहाय्य आपणांस मिळेल असें समजून दक्षिणेंत येण्यास सिध्द झाला, व लोकांत असेंही प्रसिध्द करूं लागला कीं, आमचा धनी मराठा याचें राज्य बाजीरावानें घेतलें, ते त्यास द्यावयास जातों. असे बोलून आपल्यास मदत पिलाजी गाइकवाड व कंठाजी, रघूजी कदम बांडे व उदाजी, व आनंदराव पवार व चिमाजी दामोदर वगैरे घेतले. हें वर्तमान पेशवे यास कळतांच तेही फौजेसहीत च ५ सवाल रोजी (२ मार्च १७३१) डभई मुक्कामी आलें. त्यावेळेस लढाईस आरंभ झाला. दमाजी गाईकवाड यानें बिनीवाला याशीं लढून त्याचा पराभव केला. नंतर पेशवे खुद्द चालून येऊन मोठें युध्द झालें. दाभाडे याची फौज मारून त्र्यंबकराव दाभाडे यास गोळी लागून ठार झालें. व मालोजी पवार ठार झालें. उदाजी पवार व चिमणाजी दामोदार पाडाव झाले. आनंदराव पवार व पिलाजी गाइकवाड व यशवंतराव व जावजी दाभाडे व कुवर बहादूर हे जखमी होऊन गेले. त्र्यंबकराव याचा मुडदा व पिलाजीचा थोरला लेक सयाजी गाइकवाड जखमी होऊन पाडाव होते, त्यांस पाठवून दिलें.