Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

सु ॥ अर्बैन मया व अलफ, सन ११४९ फसली,
अवल साल छ २७ सफर, २५ मे १७४९,
वैशाख वद्य १४ शके १६६१.

छ १ जमादिलावलचे सुमारें (२७ जुलै १७३९) बाजीराव बल्लाळ परत पुण्यास आले. हिंदुस्थानची स्वारी असें वाटतें. छ १० जमादिलाखर रोजी (३ सप्टेंबर १७३९) चिमाजी अप्पा वसई सर करून पुण्यास परत आले. कांही ठाणी किरकोळ घेणें राहिली, ती तेथे सरदार ठेविले त्यांस सोंपून आपण स्वत: परत आले. छ ९ रजब (२ सप्टेंबर १७३९) धाराशीव व वसेवे हे दोन महाल खंडोजी माणकर याणी घेतले. सबब नवस फेडला. छ १० साबान कार्तिक शुध्द ११ (१ नोव्हेंबर १७३९) बाजीराव बल्लाळ मुहूर्त करून स्वारीस निघाले. छ १५ साबान रोजी निघून छ २१ रमजानास (१२ डिसेंबर १७३९) चालते झाले. छ ९ रमजानपर्यंत (३० नोव्हेंबर १७३९) उभयतांची स्वारी एकच होती. पुढें छ १० रमजानीं (१ डिसेंबर १७३९) श्रीमंतांची स्वारी वेगळी होऊन सवाल महिन्यांत (जानेवारी १७४०) औरंगाबादेस होते. तेथून उलटून नजीक हिवरे पे॥ नेवसेंवरून छ १९ जिल्हेज रोजी (७ मार्च १७४०) लोणी पे॥ येकदुणी येथें येऊन हिंदुस्थानचे स्वारीस गेले. अप्पासाहेब देशी निघाले. छ २० जिल्काद रोजी (८ फेब्रुवारी १७४०) औरंगाबादेस गेले. छ २९ सवाल रोजी (१८जानेवारी १७४०) वर्तमान आले की, गोपिकाबाईस ऋतु प्राप्त झाला, नानासाहेब यांचे कुटुंबास छ १६ जिल्काद माघ व॥ २ (४ फेब्रुवारी १७४०) दादासाहेब यांचा व्रतबंध श्रीमंत स्वारीस गेल्यामागें नानासाहेब यांणी केला. मुंजीस शाहू महाराज आले होते. छ १९ जिल्काद (७ फेब्रुवारी १७४०) सदाशिव चिमणाजी यांचे लग्न झालें. नांव उमाबाई ही खमेसनांत वारली. छ १० जिल्हेज (२७ फेब्रुवारी १७४०) मोंगलांचा सल्ला केला. रात्री बोली झाली. मुक्काम हिवरे पो नेवासें. छ १२ जिल्हेज (२९ फेब्रुवारी १७४०) अप्पासाहेब याची व मोंगलांची भेट झाली. मु॥ वरखेड नजीक गंगातीर पो नेवासें. छ १५ जिल्हेज (३ मार्च १७४०) बाजीरावसाहेब यांची नासिरजंगाची भेट झाली, मु॥ वरखेड. छ १७ जिल्हेज (५ मार्च १७४०) पुन्हा मोंगलांवर उलटले. छ २१ जिल्हेज रोजी (९ मार्च १७४०) अप्पासाहेब औरंगाबादेस गेले. यावेळेस तह होऊन नोमाड प्रांत मिळाला. छ १६ मोहरम (३ एप्रिल १७४०) अप्पासाहेब मोंगलाईतून परत येऊन पुण्यास दाखल झाले. बराबर महादजी अंबाजी पुरंदरे होते. छ १७ मोहरम रोजी (४ एप्रिल १७४०) नानासाहेबसुध्दां चिमाजीअप्पा कोंकणांत गेले. छ १८ रोजी (५ एप्रिल १७४०) पालींचें ठाणे फत्ते झालें. पुढे कुलाब्यास गेले. रेवदंडा किल्ला घेण्याचे मसलतीस गेले. आंग्रे याशी लढाई झाली. सफर महिन्यांत (मे १७४०) कुलाब्यास होते. मानाजीचे साहाय्यास गेले. तुळाजी पळून गेला. छ १२ सफर (२८ एप्रिल १७४०) बाजीराव बल्लाळ मु॥ रावरें पो खरगाणें रेवातीरी वारले. बराबर जनार्दनपंत होते. छ २० रविलावल (४ जून १७४०) इहिदे अर्बैनांत परत आले. बाजीरावसाहेब वारल्याचें वर्तमान कुलाब्यास चिमाजीअप्पा व नानासाहेब यांस कळलें. नंतर तेथे क्रिया वगैरे करून छ २६ सफर रोजी (१२ मे १७४०) पुण्यास येण्यास निघाले ते छ १० रा वल (२५ मे १७४०) इहिदे अर्बैन रोजी पुण्यांत दाखल झाले. छ २३ मोहरम (१० एप्रिल १७४०) उरुणचें ठाणें सर केल्याचें वर्तमान आलें. छ १३ सफर (२९ एप्रिल १७४०) फावडी किल्ला ता॥ रत्नगड जावजी मराठे यांणी सर केल्याचे वर्तमान आलें.

मग किल्लेदारानें येऊन विनंति केली की, जंजीरकराप्रें॥ करार कराल तर किल्ला देतों असें बोलूं लागला; परंतु तें चिमाजी अप्पानी मान्य केलें नाहीं. नंतर जागजागी मोर्चे बांधून तोफेचा मारा चुकवून जावयाकरितां जमिनीतून चर खणून मोठमोठ्या वाटा केल्या आणि किल्ल्याचे तटास भोंक पाडलें. त्यांतून जावयाजोगा रस्ता नव्हता, सबब कोटाखाली सुरुंग पाडू लागले, तेव्हां किल्लेकरीही त्याच सुरुंगाचे सुमारें आंतून सुरुंग पाडूं लागले, यामुळें मराठ्यांचा यत्न व्यर्थ गेला. मग विचार ठरला की पांच सुरुंग लावून तटास मोठें खिंडार पाडावें. त्याप्रें॥ पाच सुरुंग तयार केले. पो॥ प्रथम तीन सुरुंगास आग घातली. पो॥ दोन उडाले. खिंडार मोठे पडलें. त्यांत मराठे लोक जाण्यास निघाले, तों तिसरा सुरुंग उडाला, त्याने मराठे लोक फार गेले. तेव्हां किल्लेकरांनीही लागलीच तो रस्ता बंद केला. आतां जावयास उपाय राहिला नाहीं. एक सुरुंग पहिलाच उडविला होता, परंतु त्यानें कांहीच कार्य झालें नव्हतें. पांचवा सुरुंग तयार करण्याचे काम मल्हारजी होळकर यांजकडे होतें. त्याणी तें काम पक्कें केलें होते. तो सुरुंग उडविल्याबरोबर मोठा बुरुज ढासळून मोठा रस्ता झाला, व आंतील लोकांस खाण्यापिण्याची वगैरे सामग्रीही राहिली नव्हती. सबब त्यांणी शेवटी सल्ला केला कीं आठ दिवसांत किल्ला खाली करून देतों. असा सल्ला होऊन लढाई महकूब झाली. वसईवर हल्ला छ ४ सफर (२ मे १७३९) रोजी होऊन छ ६ सफरी (४ मे १७३९) फत्ते झाली; व निशाण वैशाख व॥ ४ मंगळवार (१५ मे १७३९) दोनप्रहरीं पेशवे यांचे किल्ल्यावर लागले. श्रीमंत बाजीराव यास किल्ला सर झाल्याविषयी छ १८ सफरी (१६ मे १७३९) पत्रें कसबे रानाळी पे॥ जेनाबाद येथें आली. हा किल्ला घेण्याचे कामी खंडोजी माणकर व परशराम नाईक आंतुरकर व तुलबाजी मोरे यांणी अन्य वेषें कोणी गुराखी, कोणी कासार बांगड्या भरणार व कोणी सुतार असे वेष घेऊन किल्ल्यांतील भेद आणविल्यावर किल्ला सर झाला. या किल्ल्याचे मोहिमेंत एकंदर पेशवे याजकडील मनुष्यें बाराचौदा हजार सुमारें मेली व फिरंगी याजकडील मेले जखमी झाले, मिळून आठशें याप्रें॥ जालें. इराणचा बादशहा दिल्लीस येण्याचें कारण वजीर व उमराव यांणी विचार केला की, मराठ्यांचें प्राबल्य फार झालें. बादशहा वेडा. दिल्लीपर्यंत बाजीराव स्वा-या करितात व बंगाला अयोध्येपर्यंत भोसल्यांनी मुलूख घेतला. सबब इराणी बादशहाशी राज्यकारण करून दुसरा बादशहा स्थापावा असें करून महंदकुलीखान ऐशी हजार घोडा व पंचवीस हजार गाडद तोफखानासुध्दा आला. तेव्हा बादशहानें विचार केला की, आपलेच पदरचे लोक फितले. ह्मणून देवराव हिंगणे याचे विचारें बाजीराव पेशवे यांस दोन लाख फौज मागितली. निम्मे अंमल हिंदुस्थान सुभा घ्यावा असा करार ठरून पत्रें आली. तेव्हा वसईस राज्यकारण लागलें होतें, तें आटपून बाजीराव दस-यास हिंदुस्थानात निघाले. ही खबर लागतांच इराणी फौज मोठ्या मजला करीत दिल्लीत येऊन बादशहास कैद केलें. दौलत जप्त केली. बादशहाबेट्या बहिणीशी निक्के लावून नेल्या. दिल्लीत मोठी लूट झाली. लक्षावधी मनुष्यें मेलें. तेव्हां शहरचे लोकांनी इराणी लोकांवर हल्ला केला. इतक्यांत मराठ्यांची फौज जवळ आलीं, असें ऐकून अजीमशहास कैदेंतून मुक्त करून गादीवर बसविलें. तेव्हां दौलत व किल्ले गेले. आपण येथे राहून काय करावें ह्मणून अजमीर येथेंच राहिले. तामसखा दौलत घेऊन इराणास चालल्याची खबर समजतांच बाजीरावसाहेब स्वारीस निघून येणार तो नर्मदातीरी वैशाख व॥ १६६२ साली वारले.

सु॥ तिसा सलासीन मया अलफ, सन ११४८ फसली,
अवल साल छ १६ सफर, २५ में १७३८,
जेष्ठ वद्य ३ शके १६६०

छ २९ सफर (७ जून १७३८) अवलसाल चिमाजी अप्पा स्वारीहून पुण्यास दाखल झाले. छ ७ र॥खर (१४ जुलै १७३८) श्रीमंत हिंदुस्थानचे स्वारीहून पुण्यास आले. छ २४ जमादिलावल (२९ आगष्ट १७३८) स्वारीस निघाले. जेजुरीपर्यंत गेले. छ १८ रजब (२१ अक्टोबर १७३८) तासगांव घेतल्याची खबर श्रीमंतांकडून पुण्यास आली. छ २४ साबान [२६ नोव्हेंबर १७३८] चिमाजी अप्पा स्वारीस निघाले ते छ २८ रमजानात [२९ डिसेंबर १७३८]. कोंकणप्रांतीं माहिमास जाऊन लढाईत दाखल झाले. छ ५ सवाल [५ जानेवारी १७३९] राणोजी शिंदे याणीं डाहाणू घेतल्याचें वर्तमान आलें. छ २४ सवाल [२४ जानेवारी १७३९] बाजीभिवराव शेलूकर तारापूरचे हल्ल्यांत ठार झाले. किल्ले अशरी फत्ते झाली, छ २ जिल्काद (२१ फेब्रुवारी १७३९). छ ६ जिल्काद [५ फेब्रूवारी १७३९] बदलापारडी फत्ते झाली. छ ११ जिल्काद [१० फेब्रुवारी १७३९] वेसवे फत्ते झाल्याचें खंडेराव माणकर याजकडून पत्र आलें. श्रीमंत स्वारीस निघाले. (११ फेब्रुवारी १७३९) छ १२ जिल्काद. छ १८ जिल्काद (१७ फेब्रुवारी १७३९) शिदोला किल्ला मखमूल अलमखान यास दिला. छ ६ जिल्हेज (६ मार्च १७३९) धाराशीव घेतल्याचें वर्तमान आलें. छ ६ जिल्हेज चिमाजी अप्पांनी वसईस मोर्चे लाविले. छ ७ जिल्हेज (७ मार्च १७३९) व्यंकटराव नारायण याजकडून फोंडा मर्दनगड किल्ला घेतल्याचें वर्तमान आलें. छ १४ जिल्हेज (१४ मार्च १७३९) रामचंद्र हरी पटवर्धन यास वसई मुक्कामीं पालखी दिली. व गोविंद हरी यास सरदाराची वस्त्रें दिली अप्पांनी. छ १५ जिल्हेज (१५ मार्च १७३९) वांद्रे पाडावयास आरंभ केल्याचें वर्तान धुळ्यास आलें. पोर्चुगीज लोकांचें व मराठ्यांचें युध्द होत असतां सेनासाहेब सुभ्याच्या पुतण्यानें कोणाची आज्ञा न घेतां अलाहाबादपर्यंत स्वा-या करून मुलूख लुटला. त्याजवर आवजी कवडा यास पाठविलें असतां त्याचा पराभव त्यानें केला. मग बाजीराव याचा सूड उगवावयास निघाले तों इतक्यात वर्तमान आलें कीं, नादिरशहा बादशहा इराणचा दिल्लीस येऊन त्यानें मोंगलाचा पराभव केला, व दिल्लीची खंडणी बादशहास मागूं लागला व खानडौरानही मयत झाला असे ऐकिलेवर पुढे जात असतां पुढें असें वर्तमान कळलें की, नादिरशहाने दिल्लीबादशहा महंमदशहा यास कैद केलें व आठ हजार लोक ठार मारिले, आणि शहर लुटलें, आणि तो लक्ष फौज जमा होऊन दक्षिणेंत येत आहे, असें समजलें. तेव्हां चिमाजी अप्पा यास कोंकणातून बोलावून बराबर घेऊन लोकांस विदित केलें की, जे कोणी हिंदू, मुसलमान असतील त्यांणी येऊन माझें साहाय्य करावें. याप्रें॥ होळकर व शिंदे यासमयी श्रीमंतांस मिळाले. इतक्यांत वर्तमान आलें की, तो नादिरशहा आपले मुलखी स्वसंतोषें जाऊन पहिला दिल्लीबादशहा मला मान्य, माझे बंधूप्रे॥ आहे, व याचे आज्ञेंत सर्वांनी वागावें, जर कोणी असें न करील तर मी माघारा येऊन त्याचें पारपत्य करीन, याप्रें॥ जालें. हे वर्तमान बाजीरावसाहेब यांस छ २४ सफर रोजी (२२ मे १७३९) पाच्छाइ यांजकडून फरमान घेऊन काशीद घेऊन आले. मुक्काम जेनाबाद येथें आले छ ३ सफरी (१ मे १७३९) बसविले ह्मणून. नादिरशहा दिल्लींत सन १७३९ चे नवंबरांत येऊन मार्च सन १७३९ साली दिल्लीत कत्तल केली होती. वसई प्रांतांतील बहुतेक महाल सर जाले. परंतु मुख्य वसई किल्ला हस्तगत होण्याचे कामीं पेशवे यांनी बहुत प्रयत्न चालविला. तो असा कीं, सन १७३९ चे फेब्रुवारी महिन्याचे १७ वे तारखेस चिमाजी अप्पाचा बिनीवाला शंकराजी नारायण याणें खुषकीवरून व आंग्रे यांनी पाण्याचे बाजूनी असा चोहोंकडून वेढा घातला.

सु॥ समान सलासीन मयाव अलफ, सन ११४७
फसली, अवल साल छ ६ सफर २५ मे
१७६७, ज्येष्ठ शुध्द ७ शके १६५९.

वसवें फत्ते झाल्याचें वर्तामान आलें; छ २४ सफर [१२ जून १७३७] छ १९ रविलावल [६ जुलै १७३७] श्रीमंत बाजीरावसाहेब यांची स्वारी हिन्दुस्थान वगैरे स्वारी करून परत आले. हिंदुस्थान, गुजराथ, माळवा वगैरे अंमल बसवून परत आले. छ ४ र॥वल [१ जुलै १७३७] चिमाजी अप्पा ठाणें साष्टी, वगैरे स्वारी करून पुण्यास आले. छ ११ रजब रोजीं [२५ अक्टोबर १७३७] श्रीमंत बाजीरावसाहेब व चिमाजी अप्पा असे उभयतां स्वारीस निघाले ते छ ११ साबान रोजीं [२२ नोव्हेंबर १७३७ ] सांगवीनजीक करवंदबारीनें बाजीराव भोपाळकडे गेले, व अप्पा परतोन खानदेशांत येऊन तारापुराहून साष्टीकडे गेले, छ १४ जिल्काद [२३ फेब्रूवारी १७३८] निजामुन्मुलूक सरोजेस होता. तो भोपाळजवळ चांगली जागा पाहून बाजीराव याची वाट पाहत बसला होता. बाजीरावाचें लष्कर तेथें पोहोंचतांच त्याणीं, निजामुन्मुलूक आसरा धरून बसला; तस्मात् याचे मनांत भीति आहे असें समजून छ ३ रमजान रोजीं [१५ डिसेंबर १७३७] भोपाळाजवळ लढाई सुरू झाली. त्यांत निजामाकडील रजपूत लोक ५०० पडले. घोडेस्वार सातशें मेले. मराठ्याकडील १०० पडले, व ३०० जखमी झाले. तेसमयीं बाजीराव दोन बाणाचे टप्यावर उभा राहून निजामुन्मुलूक आपली जागा सोडून निघाला असतां त्याजवर एकदम हल्ला करावा अशी वाट पहात होता. परंतु ती जागा त्याणें सोडिली नाहीं. मग बाजीराव याणें फौजेच्या टोळ्या करून निजामासभोवतीं गराडा घातला व त्यास धान्य व गवत वगैरे मिळेनासें केलें. छ १९ रमजान रोजीं [३१ डिसेंबर १७३७] याप्रोंं तजवीज केली. निजामास असें संकट प्राप्त झाल्याचें वर्तान कळतांच तिकडून त्याचे मुक्ततेविषयीं कुमक पाठविण्याची तयारी होऊं लागली. परंतु बाजीराव यास पक्कें ठाऊक होतें कीं, खानडौराण वजीर याचें निजामाशीं वांकडे होतें, यामुळें तिकडील फौज येणार नाहीं. कदाचित् हैदराबाद व औरंगाबादेकडून मदत येऊं लागल्यास त्याचे बंदोबस्ताविषयीं पेशवे याणीं व शाहू महाराज याणीं रघोजी भोसले यास लिहिलें असतां त्याणें ऐकिलें नाहीं. बाजीराव याचा भाऊ चिमाजी अप्पा हा मात्र लोक जमा करून तापीच्या कांठीं राहिला होता. त्यास बाजीराव याणें पत्र पाठविलें कीं, यासमयीं तुला फौज मिळेल ती जमा कर; व दक्षिणेंत पत्र पाठवून फत्तेसिंग भोसले व शंभुसिंग जाधव व सरलष्कर यांस आण. बांडे व दाभाडे हे मजकडे येत नसतील तर तूं आपल्याजवळ घेऊन तापीवर राहा. यावेळेस मराठे एकचित्त झाले तर मुसलमान लोक दक्षिणेंतून हाकून द्यावयाची संधी हीच आहे. निजामुन्मुलूक अशा अडचणींत पडला तेव्हां ती जागा सोडून दूर गेला. परंतु तोफा वगैरे सामान फार होतें, सबब तो माघारा फिरून भोपाळचे किल्ल्यांत शिरला. ती जागा लहान; कांही लोक आंत व कांहीं बाहेर असे राहिलें. तेव्हां तो नबाब कांहीं सामान भोपाळ येथें व कांही इसलामगड येथें ठेवून बाहेर पडून दाराई सराई गांवपावेतों पोहोंचला. तेथें पेशवे यांणी शिंदे, होळकर यांस पाठवून मिरमाजीखान फौजदार शाहाजापूरकर मारला. दोन हजार फौज बुडविली. खुद्द पेशवे यांणीं नबाबाचे रोखे जाऊन तीन कोसांचे अंतरानें मुक्काम केला. नबाबानी पाठ देऊन कूच केलें. भोपाळचे तळयाचा आश्रा केला. व पेशवे यांजकडील फौजांनी दाणा, वैरण बंद केली. तीन शेर धान्य नबाबाचे लष्करात झालें. नबाब ढेंकळाचे कुसू रचून अडचणींत राहिले. रात्रंदिवस तिरंदाजी व गोळी पेशवे यांणीं त्याजवर चालविली, यामुळें नबाबाचे लोक रात्रंदिवस घोडयावरील व हत्तीवरील हौदा न उतरतां राहिले. नबाब हौद्यांत बसून राहिले, अशी फजिती होऊं लागली. तेव्हां छ २६ रमजानीं (७ जानेवारी १७३८) सल्ला होऊन तह ठरला कीं, बाजीराव यास चंबळा व नर्मदा यांधील मुलूख आहे, त्याचें अधिपत्य प्राप्त होण्यास बादशहास नवाबानी अनुकूल व्हावें; व याशिवाय पन्नास लक्ष रुपये बाजीराव यास स्वारीखर्चाबद्दल द्यावे, असें ठरून लढाई महकूब झाली. सरकारवाडयापाशीं प्राचीन गांवकुसूं होतें, तें मोडून चिमाजी अप्पा यांणीं पेठ मुद्याबादची जमीन घेऊन केदारवेशीपासून मावळत्या वेशीपर्यंत कोट बांधण्यास आरंभ केला. प्रतिनिधींनी मिरज घेऊन डुबल याजकडे सुभा सांगितला. नजीबउद्दवला मोमीनखान गुजराथचा सुभा झाला. त्यानें रत्नसिंग भांडारी अहमदाबाद याजवर दमाजीकडील मदत रंगोजी यास घेऊन स्वारी करून अहमदाबाद घेतली छ २० मराठी व मोंगल निम्मेंनिम तह ठरला. सुज्याइतखान यास रघोजी भोसले याणीं बुडवून पांच हजार घोडे व हत्ती, पालख्या व जेजाला जाडाव केले. याखुदखान यास परत करून पांच लक्ष रुपये खंड घेऊन सोडून दिलें. पुढें मयत झाल्याची ही खबर आहे.

मराठ्यांचे व पार्चिगीज लोकांचे युध्दप्रसंग बहुत होऊन शेवटी साष्टी प्रांता पे॥ महाल वगैरे खालीं लिहिलें तारखेस पेशवे यांणीं आपला अंमल बसविला. छ ९ जिल्हेज रोजीं (३० मार्च १७३७) उरुळाचें ठाणें सर केलें. याविषयीं वर्तमान पेशवे यांस आले. छ १८ जिल्हेज (८ एप्रिल १७३७) किल्ले दत्ताजी मोरे याणीं घेतल्याची खबर साष्टीस आली. छ १९ जिल्हेज (९ एप्रिल १७३७) बेलापूरचा पडकोट घेतल्याचें वर्तमान आलें. छ २१ जिल्हेज (११ एप्रिल १७३७) ठाणें साष्टीचे कोटास आरंभ केला. छ ७ मोहरम (२७ एप्रिल १७३७) बेलापूर घेतल्याची खबर आली. छ १५ मोहरम (५ मे १७३७) तालीमवाडी व कालदुर्ग फत्ते झाल्याचें वर्तमान हरबाजी ताकपीर याजकडून आलें. घोडबंदरावर छ २७ मोहरम (१७ मे १७३७) साष्टी घेतली, सबब तेथील लोकांस बक्षीस दिलें. ६६ गांव आहेत ह्मणून साष्टी ह्मणतात चैत्र शु॥ ७ शके १७५९ रोजीं घेतली. किल्ले मजारी फत्ते झाल्याची खबर छ १ सफर अखेर सालीं (२० मे १७३७) आली. छ ३ सफर (२२ मे १७३७) वांद्र्याचे कोटास मोर्चे लाविले. नारो शंकर पंत सचीव वारले. दत्तक चिमणाजी नारायण यास घेऊन पदाची वस्त्रें दिलीं. नागेश्वराचें देवालय पुण्यांतील रामभट चित्राव याणीं बांधिलें. जंजीरकर हब्शी याचा व पेशवे यांचा तह पूर्वी अर्बा सलासीनांत संकेत झाल्याप्रें॥ शेवटास गेला. तो प्रकार असा कीं, राजापुरी प्रांत ११ महालापे॥ जंजीरकर याजकडे प॥ १ नांदगांवमुरूड पा १ श्रीवर्धन पा १ दिवें १ ह्मसनें ता १ मांडूळ ता गांवल -॥- गांव ४९ पा दिल्यापा निम्में गांव २४॥, येणेंप्रमाणें साडेपांच महाल जंजीरकर याजकडे जाऊन बाकी ५॥ ह्मणजे मामले तळें १, पा घोसाळें १, ता गोरेगांव १, ता बिरवाडी तर्फ निजामपूर १, ता गोवळ, चाणगांव निम्मे महाल, येणेंप्रमाणें ११ महाल दोहोंकडे वांटणी झाली; परंतु एकंदर ११ महालांत दुतर्फा पाहणीदार फिरून दुतर्फा अंमलदार यांचे विद्यमानें जमाबंदी होऊन ज्याचे महालाचा आकार त्यास देऊन फाजील बाकी बराबर करून घ्यावी असें ठरलें. याशिवाय रायगड १, व तळें १, घोसाळें १, अवचितगड १, बिरबाडी १, हे किल्ले व ता नागोठणें व अष्टमी वशी महाल पाली येथील अंमल निम्मेंनिम आजपर्यंत चालत आला असून या तहापासून हे महाल दरोबस्त पेशवे यांणीं घ्यावे, जंजीरकरांनीं हरकत करूं नये, असें ठरलें. प्रतिनिधीस चव्हाणावर पाठवून त्याचा बंदोबस्त करून ठराव करून घेतला, व दुसरे वर्षी मिरजेवर पाठवून मोंगलांकडून किल्ला घेऊन डुबाल यास सुभा सांगितला. मिरज प्रांत मराठ्यांचे हातीं लागला. शाहू महाराज स्वत: स्वारीस निघाले. सेनासाहेब सुभा, सेनाखासखेल, आघाडीस; प्रतिनिधि व मुख्य प्रधान, अमात्य व सचीव, सोयरे लोक व पंडितराव, सुमंत, न्यायाधीश, चिटणीस, पोतनीस, जामदारखाना मंत्री, उजवेबाजूस; सेनापति व आणखी सरदार, पथकी, फडणीस, दप्तरदार, शिलेदार, डावे बाजूस; पिच्छाडीस सर लष्कर व त्याचे निजबतीचे काकडे व कोकाटे वगैरे; मागें जनानखाना; सर्वांपुढें बिनीवाले त्यामागें निशाण; त्याचे पश्चात् वाद्य; त्याचे पिच्छाडीस हत्ती; नंतर सरदार; तदनंतर इटेकरी; तदनंतर बोथाट्या; त्यामागे खासबारदार; नंतर नगरखाना याप्रों स्वारी निघून शके १६५८ सालीं उंबरजेस आली. दोन वर्षें छावणी तेथें होती. नंतर साता-यास आले. 

  अष्टप्रधान
सेनापति धनाजी जाधवराव यांस मंत्रीपद नारोराम शेणवई यांस
प्रधानपद बहिरोपंत पिंगळे यांस  सुमंत आनंदराव यांस.
अमात्यपद बाबूराव यांस न्यायाधिशी होनाजी अनंत यांस.
सुरनिसी नारो शंकर यांस पंडितराई मुद्गलभट यांस.
   
     
  सेनाकर्त बाळाजीपंत नाना यांस.   सचीवपंतांकडे सिहीगड व पुरंदर व पुणें सुभा
      व जुन्नर सुभा व साठोत्रा कुळ दिल्हा.
  प्रधानपंताकडे लोहगड व राजमाची   परशरामपंत यांस प्रतिनिधीचें पद पूर्ववत्-
  वगैरे किल्ले दिल्हे.   प्रमाणें शाहू महाराजांनीं कृपा करून दिल्हें.
  गदाधरभट यांस प्रतिनिधी राजाराम    
  साहेबीं दिली होती. त्याजवर परशराम-    
  पंतास दिली.    

नंतर बादशहानें निजामास लिहिलें कीं, तूं लौकर दिल्लीस यावें; नाहीतर मुसलमानी राज्य बुडेल. असें लिहिल्यावरून निजाम दिल्लीस आला. पुढें त्याचें मन वश होण्याकरितां त्याचा पुत्र ग्याजुद्दीन यास माळवा व गुजराथ प्रांताचा अधिकार देऊन सर्व मांडलीक यांणीं याचे हाताखालीं वागावें, असें ठरविलें. या वेळेस निजामाजवळ फौज चौतीस हजार जमली होती. शिवाय तोफखानाही फार होता. बाजीराव पेशवे यांणींही फौज ऐंशी हजार जमवून तयार केली होती. बाजीराव यांणीं अमर्याद मागणें केलें, याजकरितां यांशीं लढावें असा दिल्लीदरबारांत संकेत ठरला. हें वर्तमान बाजीरावसाहेब यांणीं ऐकून आपलेबरोबरचें जड सामान छत्रसाल राजापाशी ठेऊन सडे स्वारीनिशीं यमुनेचे कांठीं उतरला. व त्यास मल्हारजी होळकर व राणोजी शिंदे छ १३ रमजान रोजीं (४ डिसेंबर १७३६) वेत्रवती पे॥ भलेसें या मुक्कामीं येऊन भेटले. नंतर छ २८ सवाल (१८ फेब्रुवारी १७३७) आठरे पे॥ चंदावर येथें लढाई झाली. त्यांत मोंगलाचा पराभव होऊन बाजीराव याचा जय झाला. पेशवे यांजकडील इंद्राजी कदम सरदार लढाईत पडला. मग बाजीरावसाहेब परत ग्वालेरीकडे येण्यास निघाले. तेव्हां खानडौरान यानें बाजीरावसाहेब यांस सांगून पाठविल्यावरून माळवा प्रांताचा अधिकार व तेरा लाख रुपये स्वारीखर्च घेण्याचें ठरवून सल्ला केला. नंतर बाजीरावसाहेब कोंकण प्रांती आंग्रे याचे साहाय्याकरितां गेला. तो प्रकार असा कीं, मानाजी आंग्रे याणीं पूर्वी कुलाबा घेण्याविषयीं फिरंगी लोकांचें साहाय्य मागितलें होते त्याप्रमाणें ते येऊन मानाजीस कुलाबा प्राप्त झाला. परंतु तेव्हां जें कांहीं त्यास देऊं केलें होतें, तें दिलें नसल्यामुळें फिरंगी लोकांनीं संभाजीस अनुकूल करून कुलाबा घ्यावयास आले. तेव्हां बाजीराव यांणीं याचें साहाय्य करून आलेले फिरंगी वगैरे फौज हाकून लाविली. तेव्हां मानाजी आंग्रे यांणीं सात हजार रुपये रोख व तीन हजारांचें बिलोरी वगैरे सामान देत जावें, असें ठरविलें. नंतर परत आले. छ १९ र॥वल समान [६ जुलै १७३७] सलासीन. छ १३ रमजान रोजीं [४ जानेवारी १७३७] चिमाजी अप्पा निघून जेजुरी सुप्यापर्यंत जाऊन पुढें आळेगांव तर्फ पाठस येथें गेले. मांडवगणपर्यंत जाऊन छ ६ जिल्काद रोजीं [२६ फेब्रुवारी १७३७] पुण्यास आले. कोंकण प्रांतीं फिरंगी लोकांकडे साष्टी प्रांत होता. तो घेण्याची मसलत ठरवून चिमाजी अप्पा छ १ जिल्हेज [२२ चैत्र १७३७] ह्मणजे अखेर साली चैत्र मासीं निघून कोंकणात गेले. बरोबर राणोजी शिंदे व मल्हारराव होळकर व चिमणाजी माणकर यास घेऊन गेले. व्यंकटराव नारायण घोरपडे इचलकरंजीकर यासही फौज देऊन गोव्याकडे पाठविलें होते. 

सु॥ सबा सलासीन मयाव अलफ, सन ११४६
फसली, अवल साल छ २४ मोहरम, २५ मे
१७३६, ज्येष्ठ शुध्द ११ शके १६५८.

अवल साल मोहरम महिन्यांत [२५ मे १७३६] चिमाजी अप्पा जुन्नरापर्यंत जाऊन 
केंदूरपाबळ मुक्कामाहून छ १ सफर रोजीं ३१ मे १७३६ पुण्यास आले. बाजीरावसाहेब सालगु॥ हिंदुस्थाने स्वारीस गेले होते ते या अवलसालीं छ २५ सफर रोजीं [२४ जून १७३६] पुण्यास आले. मोहरम महिन्यांत बाई महायात्रेस गेली, ती परत येऊन मावंदें झालें. छ ५ जमादिलावल त॥ छ १४ जमादिलाखर [३१ आगस्ट ९ आक्टोबर १७३६] स्वारी रावसे॥ यांची साता-यास ग्रहणाकरितां गेली. ग्रहण करून राणोजी शिंदे व मल्हारराव होळकर महाराजास भेटविलें. छ १९ रजब रोजीं [१२ नोव्हेंबर १७३६] बाजीरावसाहेब हिंदुस्थानचे स्वारीस निघाले. आग्राप्रांतीं गेले, त्यावेळीं बाजीराव याणें फौज बहुत ठेविली. या कारणानें तो बहुत लोकांचा देणेदार झाला. व फौजेस पैसाही वक्तशीर न मिळाल्यामुळें आज्ञेंत अंतर पडूं लागलें. त्यावेळीं धावडशीकर स्वामी यांस बाजीरावानें विनंतिपत्र पाठविलें होतें. त्यांत हांशील:- मी बहुत लोकांचा देणेदार होऊन माझी कुतरओढ झाली, हेंच मला नरकयातना वाटतें. आणि सावकार व शिलेदार यांच्या पाया पडतां पडतां माझे कपाळाचें कातडें गेलें, असा हांशीलम॥ होता. बाजीरावसे॥ हिंदुस्थानांत गेल्यावर माळवे प्रांतांतील चौथ व सरदेशमुखीचा ऐवज वसूल करून जयसिंगाचे योगें बादशहापासून माळवा मुलूख आपणास मागितला. याशिवाय गुजराथ प्रांतांतील चौथाई व सरदेशमुखी सरबुलंदखानानें देऊं केली होती, त्याचीही आज्ञा व्हावी असें मागणें केलें. या मागण्याप्र॥ बादशहा व वजीर यांणीं देण्याचें कबूल केले. परंतु त्याचे पदरचा दुराणी सरदार याणें तें न देण्याविषयीं हरकत घातली. तेव्हां खानडौरान याणें आपला वकील याकूबखान यास बोलण्यास बाजीरावसे॥ याजकडे पाठविला. व त्याच्या हातीं चौथ व सरदेशमुखीच्या सनदा गुप्त देऊन सांगितलें कीं समय पाहून नंतर सनद घ्यावी. हें वर्तमान खानडौरान याजपाशीं बाजीरावसे॥ याचा वकील धोंडोपंत पुरंदरे होते यांणीं श्रीमंतास खबर ही कळविली. याकूबखान वकील बाजीरावसे॥ याजकडे आल्यावर बाजीरावसे॥ यांणीं एकंदर मागणें केलें, तें येणेंप्रमाणें- 'संपूर्ण माळवा मुलूख द्यावा, चंबळा नदीचे दक्षिणेकडील मुलूख द्यावा, किल्ला मांडू, किल्ला धार, व किल्ला रेमीन हे तीन किल्ले व पन्नास लक्ष रुपये रोख, शिवाय सरदेशपांडेपण साहा सुभ्यांचे द्यावें, याप्रमाणें मागितलें. यानंतर या मागण्यांपैकीं सरदेशपांडेपणाची सनद मात्र दिली. खानडौरान याचें व निजामाचें वांकडें होतें, याकारणानें खानडौरानें सनद देवविली. 

सु॥ सीत सलासीत मयाव अलफ, सन ११४५
फसली, अवल साल छ १३ मोहरम, २५
मे १७३५, ज्येष्ठ शुध्द १५ शके १६५७.

छ २४ मोहरम रोजीं [५ जून १७३५] पिलाजी जाधवराव यांची स्वारी पुण्यास परत आली. छ १७ सफर रोजीं (२८ जून १७३५) चिमाजी अप्पा स्वारीस निघोन छ १० रविलावल (२० जुलै १७३५) पंढरीस जाऊन माघारे आले. छ २९ सफर रोजीं (१० जुलै १७३५) दादासाहेब यांचे पाठीवर जनार्दनपंत याचा जन्म झाला. व्यतीपात होता. छ ५ रविलाखर रोजीं (१३ आगष्ट १७३५) श्रीमंतांची स्वारी साता-यास गेली. छ १५ जमादिलावलपर्यंत [२२ सप्टंबर १७३५] होती. छ म॥ परत आले. छ ७ जमादिलाखर रोजीं [१३ अक्टोबर १७३५] स्वारीस निघून अप्पासुध्दा नारायणगांवपर्यंत जाऊन छ २० रजब रोजीं [२५ नोव्हेंबर १७३५] अप्पा परत आले. श्रीमंत हिंदुस्थानांत गेले अजमीरपावेतों. छ २१ जमादिलाखर [२७ अक्टोबर १७३५] पिलाजी जाधवराव यांची स्वारी झाली. परंतु ते स्वत: गेले नाहींत. व सटवाजी जाधवराव गेले ह्मणून स्वारी बाजी भिंवराव असें लागलें. छ ४ रजब [९ नोव्हेंबर १७३५] किल्ले माहुली हें स्थळ बाळाजी गोविंद व खंडपाटील झुंजारराव व जानजी कराला याणीं सरकारांत हस्तगत करून दिलें, ह्मणून कांहीं इनाम देण्याचें ठरलें. छ १५ साबान रोजीं [१९ डिसेंबर १७३५] उष्टावण जनार्दनपंत याचें झालें. छ १ रमजान रोजीं [४ जानेवारी १७३६] चिमाजी अप्पा साता-यास गेले. नंतर जेजुरीस जाऊन महाराजांची भेट घेऊन छ २४ रमजानांत [२७ जानेवारी १७३६] परत आले पुण्यास. छ २९ रमजानांत [१ फेब्रुवारी १७३६] नवीन दिवाणखान्यांत मुहूर्त करून गेले. छ २९ सवाल [२ मार्च १७३६] मुंज सदाशिव चिमणाजी याची झाली. छ १७ जिल्काद [२० मार्च १७३६] चिमाजी अप्पा साता-यास गेले ते मुकामास येऊन परभारें कोंकणांत शामलावर गले. चरईहून अली बागेकडून तळे घोसाळ्यास जाऊन छ २० मोहरम रोजीं [२१ मे १७३६] पुण्यास आले. आवजी चिटणीस मेले, सबब पुत्रास दुखोटा केला, छ १४ जिल्हेज [१५ एप्रिल १७३६] छ १८ जिल्हेज [१९ एप्रिल १७३६] शामलाशीं युध्द झालें. सिध्दी सात हब्शी बुडविल्याची खबर अप्पाकडून आली. कामारल्यास लढाई होऊन युध्दांत ठार पडला. व सिध्दी याकूब उदेरीचा किल्लेदारही ठार पडला. मु॥ चरईनजीक रेवास. छ १४ जिल्हेज [१५ एप्रिल १७३६] बाजीरावसे॥ प॥ अजमर पुष्कराज येथें गेले होते. छ ६ मोहरम रोजीं [७ मे १७३६] हब्शी मारल्याचें वर्तमान बाजीराव यांस कळलें मु॥ झुजारा. छ २२ मोहरम रोजीं [२३ मे १७३६] बाजीराव यांचा मुक्काम डंग पे॥ गंगराड येथें होता. कंठाजी कदम याचा अंमल उठून सर्व गुजराथची चौथ दमाजी गाइकवाड याजकडे झाली. 

शाहूराजे यांस अजमशहानीं बराबर नेलें. त्यास, अजमशहास झुलपुकारखानांनीं सल्ला दिल्हा कीं राज्य घेतलें तें जाईल. याजकरितां शाहूराजे आपले ह्मणवून निरोप द्यावा. असें सांगितलें व बेगमही महाराजांवर कृपा करीत होती. ते समयीं माहाराजांस आदरें बहुमान करून माळव्यांतून निरोप दिल्हा. अजमशाहा मजल दरमजल करीत दिल्लीस चालिले. अवरंगजेब दक्षिणेंत असतां त्याजवळ अमीरउमराव व तोफखाना, सलतनत होती. ते अजमशाहाबराबर होतीच व बहादुरशाहा दिल्लीच्या तक्तावर बसोन पातशाहात करूं लागले. तिकडे अमीरउमराव थोर थोर होते ते त्यास सामील झाले. सातआठशें तोफांची तयारी केली व फौज ऐशीं हजार जमा करून दिल्लीबाहेर निघोन आले. त्यास, बहादुरशाहा, अवरंगजेब पातशाहाचा वडील पुत्र, पातशाईस तो योग्य व जमीयत व खजाना त्याच्या स्वाधीन लागले व दिल्ली त्यांणीं आक्रमिली. अजमशाहाबराबर फौज भारीच होती. लढाई मातबर होऊन अजमशाहा मोडिला व ठार पडला. तेव्हां अजमशाहाबराबरचे अमीरउमराव बाहादूरशाहास जाऊन भेटले. श्रीमंत शाहूहाराज माळव्यांतून दरमजल खानदेशांत आले. तेथे चिमणाजी दामोदर व परसोजी भोसले भेटले. त्यांचे विचारें मसलत करून फौज जमा करीत करीत गंगातीरास आले. तेथें आठ पंधरा दिवस मुक्काम करून तेथून कुच करून गंगा उतरून पुढें आले. फौज रोजच्या रोज नवीन ठेवीत दरमजल आले. त्यास, हें वर्तमान ताराबाईस कळलें. तेव्हां त्यांहीं बातमीस पाठविलें. बातमी आणविली. त्यास, शाहूराजे यांचे डोईस केंस होते. जोगडा, गोसावी, तोतया आहे असें राज्यलोभाचे अर्थे बोलून धनाजी जाधवराव यास चाळीस पन्नास हजार फौजेनिशीं शाहूराजे यांजवर पाठविलें तेही दरमजल भीमातीरास खेडास आले. तेथे शाहूराजे यांची व जाधवराव यांची गांठ पडोन युध्दप्रसंग मांडला. जाधवरायाजवळ भारी फौज व महाराजांजवळ थोडकी फौज असतां जाधवराव यास मोडिलें. तेव्हां कित्येकांचीं राजकारणें लागोन महाराजांस भेटले व जाधवरावही घोडयावरून उतरून कुरनीस करून रुजू जाहले. महाराज दरमजल दहीगांवास येऊन,चंदनवंदन किल्ल्याचें राजकारण करून किल्ले सर केले. ते समयीं परशरामपंत यांणीं सातारा किल्ला बळविला. साताऱ्यावर शेखमिरा होते. त्यांणीं परशरामपंतांस कित्येक गोष्टी महाराजांस भेटावयाच्या सांगितल्या असतां त्यांचे विचारास न आले. शेखमीराजवळ पांचसातशें माणूस होतेंच. परंतु परशुरामपंत स्नान करते वेळेस धरले. तेव्हा किल्ल्यावर गडबड होऊन तरवारी झळकूं लागल्या. त्या चंदनवंदनाहून पाहतांच महाराजांनीं स्वारी करून किल्ल्यावर गेले. किल्ला हस्तगत झाल्यावर परशरामपंताचे डोळे काढीत होते. तें वर्तमान खंडो बल्लाळ चिटणीस यांस कळतांच, धाऊन जाऊन सख्त रदबदल करून वांचविले. ते समई पायांत बेडी घातली. त्याजवर कृष्णराव खटावकर, मोगलाई मनसबदार होते, ते फौजसुध्दा सातारियास चालू आले असतां, महाराज फौजसुध्दां त्यांजवर गेले. लढाई होऊं लागली. ते वेळेस परशरामंपत यांनीं आपलें पुत्र श्रीपतराव यांस सांगितलें कीं आज लढाई करून महाराजांची कृपा संपादून माझी बेडी तोडवणें किंवा मरणें. याजवरून श्रीपतराव यांनीं जिवित्वाकडे न पाहतां सफेजंग लढाई करून कृष्णराव खटावकर यास मोडून पस्त केले. संध्याकाळीं महाराज सातारियास येतांच परशरामपंताचे पायांतील बेडी तोडून परम कृपावंत महाराज झाले. बाळाजीपंतनाना धनाजी जाधवराव याजपाशीं बाबतीचा रोजगार करीत होते. जाधवरावाचा व नानाचा पेंच पडिला. याजमुळें अगोदरच नाना महाराजांस येऊन भेटले. महाराज सातारियास शके १६३९ संवत्सरी दाखल जाहले. राज्याचा बंदोबस्त करूं लागले. सरकारकुनांस पदाची वस्त्रें बहुमान यथायोग्यतेनरूप दिल्हीं. पदें येणेंप्रमाणें:-