Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

सरकारकुनांनीं विचार केला होता तो संभाजी राजे यांस कळला. तेव्हां सरकारकुनांनी पारिपत्यें करून राज्य करीत होते. त्या समयीं अवरंगजेब पातशहा दक्षिणेंत होते. विजापूर वगैरे पातशाहाती आक्रमिल्यानंतर संभाजी महाराज यांस धरून न्यावें या प्रेत्नांत होते. उपाय न चाले. ते समयीं कबजी कनोजा ब्राह्मण मातबर होता. त्यांणीं धरावयाची मसलत कबूल करून महाराजांजवळ आला. त्यास वशीकरण विद्या होती. त्यांणीं येऊन संभाजी महाराजांस मोहित केलें. सर्व कारभार कबजीच करूं लागला. संभाजी राजे व राजाराम राजे पन्हाळयास जाऊन, राजाराम यास पनाळयास ठेऊन, संभाजी राजे स्वारीस फिरों लागले. ते समयीं कबजींनीं पातशाही फौज आणविली. त्या फौजेवर संभाजी राजे यांहीं चढाई केली. युध्दप्रसंग होतां यांस मोडिलें. तेव्हां कोंकणात गेले. मागें फौजा लागल्या. संभाजी महाराज व त्यांचे पुत्र श्रीमंत शाहू राजे यांस संगमेश्वराहून धरून, अवरंगजेब पातशाह तुळापुरास होते, त्यांजवळ नेलें. पातशहाजवळ नेलें असता मुजरा न केला. संभाजीराजे खुबसुरत फारच होते. त्यांस बाटवावें असें मनांत आणून यास बाट म्हणून सांगून पाठविलें. तेव्हां संभाजीराजे यांही सांगून पाठविलें कीं तुमची बेटी बेगम आहे ती द्याल तरी बाटतों. त्यास, त्या रागांनीं संभाजीराजे यांचा शिरच्छेद करावयाचा हुकूम झाला. हें वर्तमान बेगमेस कळतांच अर्ज करावयास गेली तों शिरच्छेद केला. त्याजवर बेगमेस दादला करावयाविषयीं विचारलें. ते समयीं बोलिलीं कीं संभाजींनीं मला बायको करतों असें म्हटलें; याउपरि आपल्यास करणें नाहीं. ती तशीच राहिली.

शाहूराजे पातशहा लष्करांत होते. इकडे राजाराम राजे राज्य करीत होते. त्यास, संभाजी राजे मारल्यावर अवरंगजेब पातशहा घेतले. गडकिल्याचा बंदोबस्त करीत चालिले. ते वख्ती राजाराम राजे व त्यांच्या स्त्रिया ताराबाई व राजसबाई पनाळा किल्यावर सरकारकुनांसहवर्तमान होते. त्यास पनाळा किल्ला मोर्चे देऊन घेतील, यास्तव पनाळा किल्याहून रांगण्यास गेले. तेथून चंदीस करनाटकांत स्त्रिया व सरकारकुनांसह निघोन गेले. हें वर्तमान पातशाहास कळतांच आसदखान वजीर याचे पुत्र झुलपुकारकान यास फौजसुध्दां चंदीस पाठविलें. त्यांनीं चंदीस जाऊन वेढा घातला. ते समयीं संताजी घोरपडे फौज घेऊन बाहेर राहून मोगलाशीं युध्द करीत; परंतु मोंगलांपुढें उपाय न चाले, चंदीही जेर होत चालली. त्या समयांत संताजी घोरपडे यांणीं प्रयत्न करून तजविजीनें राजाराम राजे यांस काढोन वेळुरास पोहोंचविलें. तेथून पनाळयास आले. बायकांस गणोजी शिर्के मोगलाईचा कर त्यांणीं, आपल्या बहिणी राजाच्या स्त्रिया असें न समजों देतां,झुलपुकारखानास विचारोन काढोन पनाळयास पोंचविल्या. सरकारकून चंदीस सांपडले त्यांणीं पैका खंड देऊन सुटोन आले. त्या दिवसांपासोन संताजी घोरपडे यांस हिंदुराई व सेनापती दिली. राजाराम राज्य करीत होते. कोणे दिवशीं राजाराम दरबारास बसले होते. ते वेळेस संताजी घोरपडेही होते. ते समयीं बोलिले कीं मी होतों ह्मणून राजे वांचले. त्यास सेवाधर्म करून दाखविला तो महाराजांचे चित्तांत होताच. परंतु त्यांणीं समक्ष बोलून दाखविलें. तेव्हां महाराजांचे चित्तास विषम वाटलें. तें संताजी घोरपडे यांस ही समजलें. तेव्हां येथें चाकरी करणें, राहणें वाईट, असें समजोन घोरपडे यांजवळ चाळीस पन्नास हजार फौज असतां उठोन चालिले. ते समयीं फौज सरकारची सारी राहिली. पंचवीस राउतांनिशीं जात होते. त्यास घोरपडे यांणीं पूर्वी शिलेदार म्हसवडकर जिवें मारिला होता, त्याचे घरीं अकस्मात् गेले. त्यांस उमजलें नव्हतें. परंतु त्या शिलेदाराचे बायकोस नांव कळतांच कुन्हा धरून भोजनास चांगले करून घातलें आणि वाटेंत मारेकरी ठेवून आपल्या दादल्याचा सूड घेऊन मारविलें. त्याजवर सेनापती धनाजी जाधवराव यांस दिल्ही.

राजारामराजे पनाळा किल्ल्यावर राज्य करीत होते. त्यास, अवरंगजेब पातशाहा विजापुराकडे होते. ते समयीं बाहादूरशाहा वडील पुत्र दिल्लीस होते व धाकटे पुत्र अजमशाहा जवळ होते. त्यास अवरंगजेब दक्षिणेंत वारले. तेव्हां अजमशाहा बहादुरशाहावर चढाई करून दिल्लीस चालिले. राजाराम, राज्यातील गडकिल्ल्याचा बंदोबस्त करावयास आले होते. ते सिहीगडास कैलासवासी झाले. पांच सात वर्षें राज्य केलें. त्यांचे मागें त्यांची स्त्री ताराबाई राज्य सरकारकुनांसह वर्तमान करीत होती.

॥ श्री ॥
पेशव्यांची बखर
इ. स. १७८३ पर्यंत.

श्रीमंत महाराज राजश्री रावसाहेब पंतप्रधान स्वामीचे सेवेसी विनंति सेवक आज्ञांकित बाळाजी गणेश कारकून नि॥ चिटणीस सरकार विज्ञापना. श्रीमंत शिवाजी महाराज यांनीं महाराष्ट्र राज्याचे वृध्दीविषयीं साहस करून राज्याभिवृध्दि कशी केली तें विस्तारें निवेदन करणें म्हणून शके १७०४ शुभकृत्ना संवत्सरीं कृपाळू होऊन आज्ञा केली. ऐशास, महाराजांनीं राज्यसाधन केल्याचें वृत्त येणेंप्रों:- मालोजी पाटील भोसले मौजे हिंगणी; देऊळगांव, वगैरे प्रांत पुणें येथून वेरुळास जाऊन राहिले. तेथें श्रीभवानी प्रसन्न झाली. त्यांचे पोटीं शहाजी राजे झाले. त्यांनीं दौलताबादेस पातशहाकडे जाऊन सेवा वजिरी करून राजे असा मरातीब मेळविला. वजिरी करीत होते. पातशाहाचीं मुलें लहान, त्यांस घेऊन मसनतीवर आपण बसोन मांडीवर बसवून दरबार करीत. जाधवराव वगैरे मनसबदार मातबर उभे राहून मुजरे करीत. त्यास, शाहाजी राजे मसनतीवर बसों लागले, हें जाधवराव वगैरे यांस न साहे. याजमुळें दिल्लीस राजकारण करून तेथून फौज जाधवराव यांनीं आणविली. त्या फौजेचा पेंच पडला. तेव्हां शहाजी राजे यांनीं पातशाहाचीं मुलें घेऊन कोकणांत माहुली किल्ल्यावर गेले. तेथें फौज येऊन वेढा घातला. ते समयीं रात्रीस मोर्चा करून आपण व बायको चालिले. पाठीवर जाधवराव व फौज लागली. तेव्हां बायकोस टाकून निघाले. बायको जिजाऊ, जाधवराव याची लेक, यांनीं राऊत देऊन शिवनेरी किल्ला शाहाजी राजे यांजकडेच होता तेथें पोंचविली. ती गरोदर होतीं. तिने पुत्र झाल्यावर तुझें नांव ठेवीन असा नवस किल्यावरील शिवाई भवानीस केला. पुत्र झाला. नांव शिवाजी ठेविलें. शाहाजी राजे विजापुरास जाऊन, तेथें जागीर मनसब मेळवून, करनाटक प्रांतीं जाऊन, चंदीचंदावर घेऊन, तीं संस्थानें आपली करून, तेथें दुसरी बायको तुकाऊ व पुत्र एकोजीराजे ठेविले. शाहाजी राजे मोगलाईंतच होते. त्यास, मोगलांनी हिंदुधर्माचा उच्छेद करून म्लेंछमय करावें या दुर्वृत्तीस प्रवर्तक झाला. तें देवास न साहे. यवनाचें पारपत्य करून हिंदुधर्म स्थापावा, याजकरितां शिवाजी महाराज यांजवर श्रीची कृपानुग्रह होऊन- त्या कालीं साता वर्षांचे होते- वय लहान होत्साता तेव्हांपासून मोठमोठीं अमानुषीं कर्में करून राज्य मेळविलें. म्लेंच्छादि शत्रू पादाक्रांत करून धर्मक्षेत्रादि महास्थानें, तीर्थाचीं व देवाचीं, स्थापना, पूजा ब्राह्मणापासून ब्रह्मकर्मे यागादि करवून श्रीरामेश्वरापासून गोदातीरपर्यंत धर्मस्थापना केली. शयाद्रि पर्वताचे किल्ले व समुद्रांतील बेटें, जंजिरे बांधून, फौज व पागा व हशम चाकर ठेऊन राज्यवृध्दी केली. मोठमोठे बलाढय तांब्र विजापूराहून व दिल्लीहून चालून आले. त्यांचा पराभव करून महाराष्ट्र राज्याची अभिवृध्दी पाववून निर्वैर केलें. त्या कालीं चित्तांत आणिलें कीं सर्व शत्रू पराभव झाले. आपल्या जवळ द्रव्यसंग्रह व मुलुख, किल्ले, कोट, फौज, पागा व पदाती व सरकारकून व सरदार पराक्रमी राज्य संरक्षणास असे आहेत. याजउपरि आपण सिंहासनाधीश्वरत्व करावें. हा संकल्प करून चाळीस वर्षांचें वय झाल्यानंतरीं किल्ले रायगडावर शालिवाहन शके १५९५ आनंदनामसंवत्सरीं ज्येष्ठ शुध्द त्रयोदशीस यथाशास्त्रोक्त सर्वांसमोर थोर थोर शिष्ट ब्राह्मण आणून राज्याभिषेक करून सिंहासनाधीश होते झाले. अष्टप्रधान ज्यास जें पद योग्य, स्वामीसेवेचे ठायीं तत्पर, कार्यकर्ते, पाहून योजिले. सिंहासनारूढ झाल्यावर सात वर्षेंपर्यंत धर्मरीतीनें राज्यपालन करिते झाले. महाराजांस दोघे पुत्र : वडील श्रीमंत महाराज संभाजी राजे व धाकटे राजाराम राजे. त्यास, संभाजी राजे महाराजांवर यागी होऊन किल्ले पनाळियास गेले. धाकटे राजाराम साहेब जवळ होते. त्याजवर, महाराजांस वेथा होऊन अत्यावस्थ राहिले. ते समयीं सर्व कारकुनांनीं विचार केला कीं संभाजी राजे उग्र, राजाराम शांतस्वरूप, यांस आसनीं बसवून राज्य करवावें. असा सिध्दांत केला. महाराजांस वेथा झाल्याची बातमी संभाजी राजे यांजकडे न जाई असा बंदोबस्त केला असतां, त्यांस वर्तमान जाऊन पावतांच निघोन रायगडास आले. त्यास शके १६०२ रौद्रनामसंवत्सरीं चैत्र शुध्द पोर्णिमेस दोन प्रहरीं कैलासवास महाराजांनीं केला.

नाशसंरक्षणाचे गुण.
कित्ता.

१ अकर्म हेंच फजितीचें कारण आहे. तें अगोदर समजोन आपली खोड आपण टाकावी.
१ आपल्या चुकीचा अन्याय असेल तो *तात्काळ पदरीं घेऊन एकांतीं आपले हातीं कानास खडा लावून घ्यावा.
१ गमाविल्याचें दु:ख किती आहे तें अगोदर समजावें. तरीच तो दुसरी वस्त जतन करील.
१ कांहीं एक अकर्म झालें तरी त्याचा पश्चात्ताप चित्तास व्हावा, तरी तो मुक्त होईल.
१ पुन्हा अकर्म घडूं नये असें नित्य वर्तावें.
१ अहंकाराच्या ओढी अनिवार आहेत, यास्तव त्यांचें दमन करावें. त्यांचे स्वाधीन होऊं नये.
१ मन वश करावें, धर्माकडे योजावें.
१ सरळ, चित्तप्रशस्त असावें. कुचर नसावें.
१ नाशाचा स्वभाव ओळखून त्याची मोड आपलें चित्तांतून उपटोन टाकावी. हेंहि बुध्दीचें सामर्थ्य असावें.
१ आपलें मन आपणास गुरू करून गेलें वय, गेलें वित्त व गेलीं विद्या हीं तीन सार्थकीं योजावीं. याचें नांव शहाणपण.
१०

सदर्हू गुण लिहिले आहेत. या प्रकारें फिरोन आपला आपण सावध होऊन वर्तला तरी गेली गोष्ट संभाळोन पुन्हा त्याजवर ईश्वर कृपा करील. श्रीकृष्णार्पणमस्तु.

शिक्षात्रय मिदं जानंञ् लाभपालननाशनं ॥
शासनं वर्तनं येन कुरुते स जगद्वशी ॥१॥ कलम.

सु॥ खमस सलासीन मयाव अलफ, सन ११४४
फसली, अवल साल छ ३ मोहरम, २५ मे
१७३४, ज्येष्ठ शुध्द ४ शके १६५६.

माळव्यांत महमदखान बंगष मयत झाल्यावर तो अधिकार व आग्रा या दोहो अधिकारांवर बादशहा दिल्ली याणें राजा जयसिंग यास सन १७३४ सालीं पाठविला. त्याचा व बाजीरावसाहेब यांचा पूर्वीपासून स्नेह होता. ह्मणोन ती जागा त्यास मिळाल्यानें मराठे बहुत संतोष मानूं लागले. परंतु तो बादशहाचा हस्तक ह्मणून मराठ्याचें सारें बोलणें मान्य करीना. नंतर त्याच्यापुढचे वर्षी बाजीराव याचें व त्याचें बोलणें होऊन माळवा प्रांत बाजीरावसाहेब यास दिल्हा. व बादशहासही समजावून तोही वश केला. परसोजी भोसले याचे पुत्र कान्होजी व दुसरे परसोजी व तिसरे साबाजी. त्या साबाजीस संतान नाहीं. त्याची बायको राजाऊ साता-यास राहत असे. त्यास राजाऊचा गोट असें ह्मणतात. परसोजीचे पुत्र संताजी व राणोजी भोसले. पैकीं संताजी दिल्लीस बाळाजी विश्वनाथ याजबरोबर गेले होते, ते लढाईत ठार झाले. बिंबाजी भोसले वडील स्त्रीस पुत्र रघोजी भोसले याप्रमाणें असोन कान्होजी भोसले याणीं महाराजाची अवज्ञा केली. सबब त्यास कैद करून रघूजीस पदाची वस्त्रे दिली. तो शिकारीचे कामास मोठा धीट असे. शाहूमहाराज यांणीं आपले बायकोची बहीण शिर्क्याची कन्या यासी दिली, व व-हाडची सुभेदारी सांगितली. त्याजबद्दल त्याजकडून नेहमीं पांच हजार स्वारांनिशीं चाकरी करावी, असें ठरवून दरसाल नऊ लक्ष रुपये पोत्यास पावते करावे. याशिवाय पेशवे मोहिमेस निघतील, त्यावेळीं त्यांजबरोबर दहा हजार स्वारांनिशी जावें असें ठरविलें. छ ६ रविलावल [२६ जुलै १७३४] बाजीरावसाहेब साता-यास गेले. छ १५ साबान [३० डिसेंबर १७३४] साता-याकडून सुप्यावरून पुण्यास आले. छ १ रजब [१७ नोव्हेंबर १७३४] पिलाजी जाधव स्वारीस निघाले ते अखेरसालपर्यंत हिंदुस्थानांत होते. पेस्तर सालीं छ २४ मोहरम रोजीं [५ जून १७३५] पुण्यास परत आले. छ २९ रमजान [१२ फेब्रुवारी १७३५] मु॥ सागरतलाव पे॥ ओंडसे येथें कमरोदिन याजबरोबर लढाई झाली, वि॥ पिलाजी जाधव. कान्होजी आंग्रे यास दोन पुत्र. वडील सेखोजी कुलाब्यांत व धाकटा संभाजी सुवर्णदुर्गास याप्रें॥ होते. कान्होजीस आणखी नाटकशाळेचे तीन पुत्र; तुळाजी, येसाजी व मानाजी असे तीन कान्होजी शके १६५० सालीं वारले. सेखोजीस वस्त्रें झालीं. नंतर लागलीच शके १६५५ सालीं सेखोजीही वारले. तेव्हां संभाजीस पदाचीं वस्त्रें झालीं. तेव्हां त्यानें आपले सावत्र तिघे भावांपे॥ तुळाजीस आपलेजवळ ठेऊन येसाजीस मुलखाचा बंदोबस्त सांगितला, व मानाजीस किल्ल्याचा व फौजेचा बंदोबस्त सांगितला. तेव्हां त्या उभयतांध्यें कांहीं कलह झाल्यावर मानाजीनें कपट करून फिरंगी लोक किल्ल्यांत आणून तुळाजीस दिवाणगिरी देऊन कुलाब्यास येऊन रात्री किल्ल्यास शिड्या लावून आंत उतरून येसाजीचे डोळे काढले, आणि बंदींत टाकलें. नंतर संभाजी मानाजीचे पारपत्यास गेला. तेव्हां मानाजीनें पेशवे यांस साहाय्याकरितां बोलाविलें. त्यावरून छ २१ रमजान रोजीं [४ फेब्रुवारी १७३५] स्वारी कुलाब्यास गेली, पेशवे यांची. तेथें छ २० जिल्कादपर्यंत [३ एप्रिल १७३५] होती. स्वारी कुलाब्यास गेल्यावर छ १६ सवाल रोजीं [१ मार्च १७३५] राजमाची व छ २० रमजान रोजीं [३ फेब्रुवारी १७३५] कुलाबा व छ २२ रमजान रोजीं [५ फेब्रुवारी १७३५] खांदेरी किल्ला पेशवे यांणीं सर केला. पुढें छ १२ सवाल रोजीं [२५ फेब्रुवारी १७३५] किल्ला कोहाला फत्ते केला. पुढें याच सालीं मानाजी आंग्रे यांशीं तह झाला. त्यांत मामलेपाल किल्ले, सरसाट, मृगगड व किल्ले राजमाची व कोपनगड व किल्ल्याखालील महाल तर्फ चौपळ बारोटी व पे॥ नसरापूर पोट तर्फ सु॥ अंमल पेशवे यांजकडे आला. बाकी कुलाबा वगैरे ठाणीं आंग्रे याजकडे दिलीं. हा तह नवदरे अलीबाग मुक्कामीं झाला. मानाजीस कुलाबा देऊन वजारतमाब किताब दिल्हा, व संभाजीस सरखेल असा किताब देऊन पेशवे यांणीं तंटा तोडला. अंबाजीपंत पुरंदरे काशीस गेले. मुतालिकीवर हुजूर दादोपंत वाघ होते. भाद्रपद शु॥ १४ वारले. [२१ आगस्ट १७३४] माहुली मुक्कामीं. आनंदनाम संवत्सरीं रघुनाथराव यांचा जन्म, मिति श्रावण शु॥ १३ [१आगस्ट १७३४].  

पालनाचे गुण.
कित्ता.

१ आपला वर्णाश्रम धर्म असेल तोच आचरावा.
१ उदरपूर्तीनिमित्य कांहींएक रोजगार करावा.
१ सारें मलाच पाहिजे, मीच करीन, अशी दुराशा वाढवूं नये.
१ दिवसात असें कर्म आचरावें कीं रात्रीस सुखरूप निद्रा यावी.
१ रात्रौ कर्म असें आचरावें की दिवसास पुण्यशीळामध्यें जाऊन बसावें.
१ जें कर्म करणें तें योग्यायोग्य पाहून विवेकेकरून गुरुशिक्षेप्रमाणें करीत जावें.
१ दृष्टीनें, अवलोकनेकरून अथवा श्रवणेकरून अथवा मननेकरून सद्गुणाचा संग्रह करीत जावा.
१ विद्या शिकोन आचरण नाहीं तर तो व्यर्थ, मुखावलोकन करू नये.
१ रोजगारासाठीं महाराची खिचडी उतरावी, आपली चढवावी, असें ह्मणोन ज्या समयीं ज्यास जशी बुध्दी होईल तशी मनस्वी वर्तणूक करितात. हेंच नाशाचें कारण आहे. हा लोभ.
१ विवेक चित्ताचे ठायीं करून अधर्म सोडावा, तो आपण दुसऱ्यास समजवावा.
१ हानि, मृत्यु, यश कर्मानुसार ईश्वर जन्मास घालून भोगवितो. ईश्वरास निवेदन केलें पाहिजे. भोग सरतो. त्यास दुसरा उपाय नाहीं. हळहळ करूं नये.
१ यतो धर्मस्ततो जय:, वचनावर विश्वास ठेवावा. शास्त्राची आज्ञा सार्थकासाठीं आहे. मान्य करावी. हें सार्थक आहे. धर्माची दुसरी परीक्षा पाहूं नये.
१२

सदर्हू पालनाचे गुण लिहिलें आहेत. याप्रमाणें उन्मत्त न होतां आपलें स्वरूप, दैव, बुध्दि, बल, पराक्रम पाहून, दुसऱ्याचें स्वरूप समजोन गुणग्राहक बुध्दीनें लाभाचा प्रतिपाल
केला तर तो वंशपरंपरेनें लाभदायक होईल.

५ बंदोबस्ताच्या पध्दती आधीं शिष्यपणा करून शिकाव्या; मग कोणतेही काम करावें, त्याचे गुण
१ धन्याजवळ कोणत्या कामास कसें रहावें, त्याच्या पध्दती.
१ सरदारी, फौजेसंबंधी वगैरे, कोणे योग्यतेनें कशी जतन करावी, त्यांत इमान कसें सांभाळावें, त्याची धर्ती.
१ किल्ले व भुईकोट व आरमार येथील माणसांनीं कशी हिम्मत धरावी, तरतूद कशी करावी, याच्या पध्दति.
१ शहरचे बंदोबस्त कसे राखावे, याच्या पध्दति.
१ याशिवाय वरकड व्यवहार पध्दतियुक्त असावे व पध्दतीचे पाठ एकास एकाचे व्यवहारी मिळत असावे. ती पध्दत खरी.

६ सारासार विचार स्वहितास अनुकूल पडे ऐसा. त्यांत धर्म सांभाळावा. त्यास इतकें आचरण केलें पाहिजे :-
१ आपण सर्व कामांत शहाणा आहे तर दुसऱ्याचें शहाणपण समजतें, हें ज्याचें त्यानें समजावें.
१ आपण मूर्ख आहे तरी दुसऱ्याचें शहाणपण मातींत जातें, हें ज्याचें त्यानें समजावें.
१ गरज नसतां वस्तुमात्राची किंमत हलकी पडते, हें ज्याचें त्यानें समजावें.
१ गरजवंताची अक्कल जाते, हें ज्याचें त्यानें समजावें.
१ आतुरास स्वहित अनहित समजत नाहीं, हें ज्याचें त्यानें समजावें.
१ लोभानें बुध्दि शाश्वत रहात नाहीं, लोभ सर्व गुणांचा नाश करितो, हें ज्याचें त्यानें समजावें.

सदर्हू गुण लिहिले आहेत. अशा ठायीं अनेक विचार करून यांतून चांगले निवडून घ्यावे. याचें नांव सारासार विचार.
३५

सदर्हू लाभाचे गुण लिहिले आहेत. यांत मुख्यत्वें जो ज्याचा रोजगार असेल त्यांत त्यानें आपला स्वधर्म सांभाळोन रोजगार करावा. अधर्माचे व्यवहारीं बहुत लाभ होत असला तत्रापि तो व्यवहार टाकून स्पर्श न करावा. इतकें धैर्य करील. तोच श्रेष्ठ, तोच पुण्यवान, तोच सर्वांचा गुरू होय. अशा मननें जो व्यवहार करील त्यास स्वधर्म कोणता व परधर्म कोणता तोहि समजूं लागेल, मार्गासहि लागेल, यशहि निश्चयेकरून त्यास आहे.
सर्व कर्मांस शास्त्रें आहेत. परंतु शास्त्रमतें एक आणि दुसरे प्रकारची वहिवाट पडते. त्यास प्रत्यवाय पडतो. तो दृष्टींत येत नाहीं. यास्तव पस्तीस गुणांचे कामास अधिकारी पस्तीस भिन्न भिन्न धर्मजाणते बुध्दिमान योजून ठेविले पाहिजेत. त्यांनीं आपण त्या गुणाप्रमाणें आचरण करून खावंदांस अधिक उणें समजावून शिक्षा चालवावी. म्हणजे सर्वांस मार्ग लागतील.

४ मनुष्याचा गौरव करावा, त्याचे गुण.
१ कृपावलोकनेकरून.
१ प्रिय भाषणेकरून.
१ द्रव्येकरून.
१ सन्मानेकरून.

४ स्वरूपज्ञान असावें, त्याचे गुण.
१ आचारकर्त्याचें स्वरूप.
१ व्यवहारकर्त्याचें स्वरूप.
१ पराक्रमी मनुष्याचें स्वरूप.
१ गुणी जन इत्यादिक सर्व कामाचीं मनुष्यें आहेत, त्यांचीं नानाविधें स्वरूपें असतात, तितकीं समजावीं. उपयोगी असेल तो मात्र घ्यावा. आपण बहकों नये.
 

६ सेवकवृत्तीनें धनीं आर्जवावा, त्याचें गुण.
१ धन्याचा राग सोसून घ्यावा.
१ गुणानें धनी वश करावा.
१ धनी देईल त्याचा लाभ मानावा.
१ आज्ञेस उजूर करूं नये.
१ गैरमाहिती गोष्ट बोलूं नये.
१ खोटी खुशामत करूं नये.

५ शरणांगताचें संरक्षण करावें, त्याचे गुण.
१ संकटापासून सोडवावें.
१ उच्छेदाचें स्थापन करावें.
१ पुत्रवत् पालन करावें.
१ अभिमानयुक्त प्रतिज्ञा सत्य करावी. त्या निमित्य आपला प्राणही खर्च करावा. येथपर्यंत शरणांगतास रक्षावें.
१ संरक्षण केलें असतां त्याजपासून उदकप्राशनाची देखील इच्छा धरूं नये.

४ शिक्षाप्रतिबंध सोसलेला असावा, त्याचे गुण
१ पहिला, वडिलाचे शिक्षेचा प्रतिबंध.
१ दुसरा, गुरुशिक्षेचा प्रतिबंध.
१ तिसरा, धन्याचे शिक्षेचा प्रतिबंध.
१ चवथा, ईश्वरप्राप्तीनिमित्य सत्कर्माचा प्रतिबंधच आहे. इतकी आंच मनात लागली पाहिजे.

४ बंधूंशीं अंतर देऊं नये, त्याचे गुण.
१ सन्मान मर्यादायुक्त करावा.
१ मर्मस्पर्श न करावा.
१ वंचना करून खाऊं नये.
१ द्वेषबुध्दी धरूं नये.

४ हिशोबाचा मोसबवार लेख असावा, त्याचे गुण.
१ गळाठला कागद त्याचा खर्च धन्यास समजवावा, त्यांत अंतर नसावें, असा तर्क असावा.
१ अंतस्थ वेगळें असावें.
१ धनी देईल तें बक्षीस घ्यावें.
१ तफावतीचें काम करूं नये.

४ जाबसालीं शहाणें असावें, वकीली इत्यादिक सर्व, त्याचे गुण.
१ सभाचातुर्य.
१ शास्त्रचातुर्य.
१ विद्याचातुर्य.
१ समयीं स्पष्टवक्ता

५ परोत्कर्षाचें सहन करावें, त्याचे गुण.
१ वंशज अस्सलाई जाणावी.
१ आपला स्वभाव वाईट बरा ओळखावा.
१ स्वकर्म तेंच आचरावें.
१ विनययुक्त गुणनिपुणता असावी.
१ चित्त प्रशस्त असावें.

५ नाशकर्ते ओळखावे, त्याचे गुण.
१ दीर्घसूत्री.
१ वाचाळ.
१ आळशी.
१ छद्मी, कुचर, कपटी.
१ द्वेषी व अहंकारी व लोभी.

४ दुष्ट व्यवहारी ओळखावे. त्याचे गुण.
१ आत्मार्थ दुसरियाचा नाश करितो, बेरड इत्यादिक, हे दुष्ट.
१ अतिवाद घालून खोटा कागद, खोटा व्यवहार करितो, हाहि दुष्ट.
१ गाफल बेवकूबीनें गमाविलें हाहि दुष्ट.
१ भयभीत अवसानीं घालवितों, हाहि दुष्ट.

४ सत्पुरुषाचा सन्मान करावा. त्याचे गुण.
१ जो कांहीं परमार्थ आचरला, हा सत्पुरुष.
१ जो प्रपंच सात्विक बुध्दीनें करितो, हाहि सत्पुरुष.
१ एकनिष्ठ सेवक हाहि सत्पुरुष जाणावा.
१ परोपकारी हाहि सत्पुरुष. तळीं बांधावीं, अन्नसत्रें घालावीं, इत्यादिक कार्याचे.

४ पापद्रव्य मिळवूं नये. त्याचे गुण.
१ विश्वासघाताचें द्रव्य.
१ धन्याचें नुकसान करून मेळविलें तें द्रव्य.
१ चांडालसंबंधें संकेतद्रव्य.
१ अति लोभ नाकबूल जावें अथवा अज्ञानास फसवावें हेंहि पापद्रव्य.

६ वावगा खर्च करूं नये, त्याचे गुण.
१ घर चालीपुरतें बांधावें.
१ धर्मकार्य पुरतें होईल तें पक्कें करावें.
१ अन्न-वस्त्र कुटुंबास सारिखें द्यावें. असेल त्यांत पुरवून खावें.
१ मेळविलें किती, खर्च केला किती, हें नित्याचें नित्य पहावें.
१ प्रयोजनीं नेमस्त खर्चावें, कर्ज न करावें.
१ रांडबाजी, किमया करूं नये.

४ वरिष्टाशीं सख्य राखावें, त्याचे गुण.
१ विद्याबुध्दीकरून वरिष्ठ.
१ बळेकरून वरिष्ठ.
१ द्रव्येकरून वरिष्ठ.
१ तपेकरून वरिष्ठ.

सु॥ अर्बा सलासीन मया व अलफ, सन ११४३
फसली, अवल साल छ २१ जिल्हेज,
२५ मे १७३३, ज्येष्ठ वद्य ८ शके १६५५.

सलास सलासीनांत अखेरसालीं बाजीरावसाहेब जंजि-यास गेल्यावर त्यांनी लागलीच महालोमहालीं ठाणी सर करण्यास आरंभ करून छ २१ जिल्हेज (२५ मे १७३३) अवलसालीच मंडणगड किल्ला घेतला, व याच महिन्यांत बिरवाडी, मांडल, अष्टमी, अश्राधार, आंतोण, नागोठणें, तळें, घोंसाळे, निजामपूर वगैरे महालांचा अंमल घेतला. इतक्यांत प्रतिनिधि यांनीं माघारें उलटून रायगड किल्ला छ ६ मोहरमी रोजीं (८ जून १७३३) सर केला, व या खालील महाल याच वेळेस आले. महाड घेतल्याबद्दल महाराजास छ २६ रमजानांत नजराही आल्या आहेत. सदरहू तालुका पुढें यशवंत महादेव यांचेच स्वाधीन महाराजांनी करविला होता. तो सलास सबैन सन १७७२ पर्यंत त्याजकडे होता. पेशवे यांजकडे नवता. छ ११ रविलावल (११ आगस्ट १७३३) चिमाजी अप्पा महाराजांकडे आले. बराबर पिलाजी जाधवराव यास नेलें होतें. यास मुलूखगिरीस पाठविलें होतें. छ २१ जमादिलावल (१९ आक्टोबर १७३३) चिमाजी अप्पा साता-यास जाण्यास निघाले. बाजीराव पेशवे यांनी जंजिरे प्रांतांतील अशी महालोमहाली ठाणी बसविल्यानंतर, ज्या चौघांनी वडील अबदुला यास मारिलें, त्यापैकी सिध्दी रहयान बाजीरावसाहेब यांशी लढला; परंतु त्यातच तो ठार जाला. नंतर जंजिरा घ्यावयाचें मनांत आल्यावर बाजीराव यांणीं खुषकीवरून मोर्चे लाऊन तोफांचा मार चालविला. त्यावेळेस मानाजी आंग्रेही साहाय्यास येऊन त्यांणीं समुद्रांतून तोफांचा मार चालविला. तत्राप किल्ला हस्तगत होईना. जर या कामाकरितां आपण राहिलों, तर दुसरी मोठाली कामें तशीच राहतील, इतक्यांत सिध्दीचे लोकही तह करण्यास कबूल जाल्यावरून तह करण्याचा विचार ठरून बाजीरावसाहेब छ १४ रजब रोजीं [ ११ डिसेंबर १७३३ ] परत साता-यास गेले. तहनामा पुढें सबा सलासीन सन ११४६ फसलींत जाला. सिध्दी अबदूल रहिमान गादीवर बसले. छ २६ रजब रोजीं [२३ डिसेंबर १७३३] नानासाहेब नसरापुरास गेले. पुढें सुप्यावरून छ २१ साबान [१६ जानेवारी १७३४] रोजीं पुण्यास आले. तेच दिवशीं चिमाजी अप्पा साता-याहून आले. छ ३ रमजान रोजीं [२८ जानेवारी १७३४] मुलगा होऊन बारसें झालें. छ १९ सवाल [१४ मार्च १७३४] बाणकोट फत्य झाल्याचें वर्तमान समजलें. छ ६ जिल्काद (३१ मार्च १७३४) कर्नाळ्याची बाब होऊन परत आले. सेखोजी आंग्रे र॥खर (सप्टंबर १७३३) महिन्यात मयत झाले. तुळाजी सुवर्णदुर्गास होते, त्यास सुभा सांगितला. माळव्यांतून बाजीरावसाहेब हप्शी याजवर आले. त्यामागें माळव्यांत मल्हारजी होळकर लष्करासहीत तेथें होता. आंग्रे पलीकडेही जाऊन स्वारी करून मुलूख लुटीत होता. त्यावेळेस बादशहाचा वजीर खानडौरान होता. त्यानें आपला भाऊ मुजफरखान याजबरोबर फौज देऊन मल्हारराव याजवर पाठविला. त्यानें सिरोंजपर्यंत जाऊन मागें फिरून दिल्लींत येऊन मराठ्यांचा मोड केला, अशा गप्पा मारिल्या. मल्हारराव होळकर त्या सरदाराबरोबर हलके हलके युध्द करण्यास थोडे लोक पाठऊन आपण फौजसुध्दां मुलखांत वसूल जमा करून बाजीराव याजकडे पाठवीत असे. मराठे लोकांशिवाय रोहिले लोकही त्या मुलखास उपद्रव देत असत. याशिवाय गुजराथेंतही मल्हारजीनें एकाएकी अमदाबादपर्यंत स्वा-या घालून कित्येक गांव लुटून परत हिंदुस्थानांत आला. २२