Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
घावदाव पाहून लढाई होत होती. त्यास, नबाब सिंदखेडास जाऊन खासा अंबारी सिंदखेडच्या दरवाजाजवळ नेऊन, जाधवराव यास ठाण्यातून आणून, खास अंबारीत घेऊन, त्याची फौज व बुणगे बाहेर काढून माघारे फिरले. ते दिवशी सरकारच्या सरदारांनी लढाईचें तोंड लावून प्रहर दीडप्रहर मातबर युध्द झालें. ते समयीं त्याजपासून पंचवीस लक्षांचा मुलूख घेतला. विश्वासरावसाहेब गंगातीरास आले. नवाबही आले. तेव्हां नानासाहेब भाऊसाहेब नगरच्या मुक्कामाहून गंगातीरास गेले. भेटी नवाबाच्याही जाल्या. त्यास, विश्वासरावसाहेबांच्या कुमकेस यावयाविशी जानोजी भोसले सेनासाहेबसुभा यांस पत्रें गेली असतां न आले. यास्तव त्यांस जरब द्यावयाकरितां घाटमाथा गेले. तेव्हां त्यांणीं येऊन बाजिदी केली. मग माघारे फिरोन पुण्यास आले. दसरा झाल्यावर कर्नाटकच्या स्वारीस चालिले. कृष्णातीरास गेले. त्यावर्षी सिंहस्थ होता, याजकरितां कृष्णातीराहून महादाजी अंबाजी याजबराबर फौज व तोफखाना देऊन कर्नाटकास रवाना केले आणि श्रीमंत त्रिंबकास गेले. महादाजी अंबाजी कर्नाटकास जाऊन संस्थानिकांस शह पोहोचवून खंडण्यांचा ऐवज घेऊन पुण्यास आले. मानिल्हेबरोबर मुजफरखान होते. ते रुसवा करून कर्नाटकांत राहिले. त्यांनी सावनूरकर पठाण व मुरारराव घोरपडे सामील करून घेऊन बिघाड केला. तेव्हां श्रीमंत दसरा करून दरमजल कृष्णातीरास गेले. तेथें दादासाहेबांचे दुसरे लग्न करून दरमजल बागलकोटास जाऊन किल्ला घेऊन सावनुरास जाऊन वेढा घातला. श्रीमंत नानासाहेब व भाऊसाहेब व दादासाहेब व विश्वासरावसाहेब व माधवरावसाहेब व सरदार मल्हारजी होळकर व नारोशंकर व विठ्ठल शिवदेव वगैरे होते. व जानोजी भोसले सेनासाहेबसुभा आणिले. व नवाबाकडे त्याचें राजकारण लागलें होते. परंतु सरकारचे वकील परशराम महादेव होते, त्यांणी नवाबास श्रीमंतांचे कुमकेस आणिले. ते आल्यावर त्यांचेही मोर्चे बसवून त्यांचा तोफखाना प्रहर दीडप्रहर सुटोन दीड दोन हजार गोळे सावनुरात पडिले. तेव्हां सारे घाबरे होऊन सलूखाचा मजकूर मल्हारजी होळकर यांचे हातून करविला. सावनूरकरांचा निम्मे मुलूख सरकारांत घेऊन मुरारराव घोरपडे भेटीस आले. तेथून पुढें संस्थानिकांपासून खंडण्या घेऊन आषाढमासी पुण्यास आले. त्याजवर दो-ती वर्षी भाऊसाहेबांस नबाब निजामअल्लीखान याजवर रवाना केले. ते समयीं भाऊसाहेबीं नगर किल्ल्याचे राजकारण करून कवीजंग याजपासून किल्ला घेऊन पुढें दरमजल चालिले. निजामअल्लीखानही भागानगराहून दरमजल पुढे आले. उदगिरीवर समीपता होऊन लढाई सुरू झाली. श्रीमंत विश्वासराव साहेबही समागमें होते. दोन महिने सडे स्वारीनें रात्रंदिवस घोडयावर जिन ठेवून सभोवत्या फौजा ठेवून दावघाव पाहात होते. जिकडे नवाबाचा चालावयाचा रोख तिकडील गांवखेडी सरकारच्या फौजांनी जाळून लुटून फस्त करीत होते. त्यास उदगिरीहून त्यांणी कूच करून पुढे तोफांच्या मारगिरीने रेटीत चालिले. त्यास, अवसा किल्ला नवाबाचा तेथे जाऊन नवाब पोचले. ते समयीं भाऊसाहेब व विश्वासरावसाहेब यांही मोंगलावर दोन प्रहरच्या समयांत हल्ला केला. तेव्हां त्यांणी तोफा व बाण व जेजाला व बंदुकाचा मार अतिशय केला. तितकाही पिऊन पुढें जाऊन हातेर लावावें तो चारणाच्या बैलांची दाटी झाली त्यामुळे हातेर न लागलें. मोंगलांचा चंडोल ह्मणजे दुमदारीचा सरदार धरून आणिला. मोगल जेर झाला. चौफेर फौजा ठेवून तीन चार दिवस बतंग केला. ते समयीं साठ लक्षांचा मुलूख सरकारांत व दीड लक्षाचा दरबारखर्चाचा, एकूण साडेएकसष्ट लक्षांचा मुलूख व दौलताबाद व आशेर व सालेर व मुल्हेर व विजापूर व बराणपूर एकूण सा किल्ले सन सितैनांत सरकारांत घेतले. तेथून पुण्यास यावें. त्यास अबदाली दिल्लीवर चढाई करून आला. याजकरितां पातशाहाचा फरमान नानासाहेबांस फौजेविशीं आला. त्याजवरून भाऊसाहेब व विश्वासरावसाहेब यांची रवानगी फौजसुध्दां केली. दिल्लीस जाऊन पुढें अबदालीची गाठ कुरुक्षेत्री सोनपतपानपताजवळ पडोन लढाई होता अबदालीस मोडले. त्या समयांत विश्वासरावसाहेबांस अंबारीत गोळी लागोन कामास आले.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
त्यांची यांची गांठ भालकीच्या मुक्कामीं पडोन लढाई सुरू होऊन नवाबास जेर केलें. तेव्हां खानदेश सुभा व नाशीक व पैठण वगैरे पन्नास लाखाचा मुलूख घेतला. गाजुदीखान अवरंगाबादेस आले. त्याणीं सा सुभे दक्षणचा सुभा करावा. त्यास निजामअल्लीखान याचे आईनीं विष घालून मारिलें. नबाब सलाबतजंग अवरंगाबादेस आले. रघुनाथपंत दादासाहेब यांस गुजराथ प्रांतीं अमदाबादेस रवाना केलें, आणि नानासाहेब व भाऊ यांणीं भालकीहून कुच करून, मजल दरमजल करनाटकांत जाऊन श्रीरंगपट्टण आदिकरून संस्थानिकांस जरब देऊन, खंडण्या करून, मातबर पैका मेळवून आगोटीस पुण्यास येऊन दाखल जाहले. दादासाहेब मजलदरमजल अमदाबादेस फौज सुध्दा जाऊन, तेथील बंदोबस्त करून, तिकडून स्वारी हिंदुस्थानांत करून, कुमाऊच्या पहाडापावेतों जाऊन, शत्रूचीं पारपत्यें करून, तिसरे वर्षी पुण्यास आले. करनाटकप्रांतीं संस्थानिक पाळेगार मवासगिरी करून होते. त्यांचीं स्थळें मजबूद. तोफांशिवाय जेर व्हावयाची नाहीं. याजकरितां तोफखाना व गाडदी नवी तरतूद करून, दरसाल करनाटकांत स्वाऱ्या करून सोंधे बिंदनर व सावनूर व श्रीरंगपट्टण व चित्रदुर्ग व हरपन्हळळी वगैरे संस्थाने यांस जरब देऊन खंडण्या मातबर आणिल्या. संस्थानिक शरणांगत जाहले. कर्नाटकचे पाळेगार कोणास रुजू झाले नव्हते ते श्रीमंतांनीं मोठया पराक्रमें पादाक्रांत करून महाराजांच्या राज्याची अभिवृध्दी करून महाराजांची कृपा विशेषात्कारें संपादून कीर्ती भूंडळीं केली त्यास शाहू महाराज व संभाजी महाराज या उभयतांसही पोटीं पुत्रसंतान नाहीं याजमुळें चिंता करीत होते. त्यास ताराबाईस पुत्र शिवाजीराजे व राजसबाईस संभाजीराजे हे दोघे पुत्र राजारामसाहेबाचे. त्यास, शिवाजीराजे यांस एक पुत्र रामराजे व कन्या दर्याबाई, दोवें जहालीं. त्यास संभाजी राजे यांची स्त्री जिजाबाई यांचे भयास्तव ताराबाईंनी लांबविला. तो कोणास न समजे अशा रीतीनें जागा जागा देशांतर करून काल हरणें होता. तो बारा चवदा वर्षांचा होऊन तुळजापुराजवळ पानगांवीं येऊन नारोजी भुत्याकडे होता. त्यास शाहूहाराजांस वेथा होऊन चारसा महिने वेथिस्त होते. त्या दिवसांत नारोजी भुत्या यास रांडपोर नव्हतें. शंभर रुपये कुणगा होता. आपलें म्हातारपण यास्तव त्या मुलांस अंतस्ते सांगितलें. तेव्हां त्या मुलानें आपलें अंतरंग सांगितलें कीं मी शिवाजी राजे यांचा पुत्र. तेव्हां त्या मुलाची हेटाळणी करूं लागला. त्यास शिवाजीराजे यांस दर्याबाई कन्या, पुत्र हा रामराजा, दोघें जाहलीं होतीं. त्यास पुकार होतां होता दर्याबाई निंबाळकरांचे घरी दिली होती तिजला बारशीस खबर गेली. तिनें माणसे पाठवून घरी नेऊन चौकशी करून ठेविलें. तें वर्तमान शाहूमहाराजांस व ताराबाईस कळलें. तेव्हां बातमीस नेहमी खंडेराव न्यायाधीश पाठविले. व नानासाहेबींही बातमीस कारकून पाठविले. त्याजवर शाहूमहाराजांनी शके १६७१ शुक्ल नामसंवत्सरी मार्गशीर्ष वद्य तृतीयेस कैलासवास केला. तेव्हां फौज पाठवून बारशीपानगावाहून राजारामास आणून, नानासाहेब आदिकरून सर्व सरकारकून व सरदार सामोरे जाऊन आणून, सुमुहूर्ते राज्याभिषेक करून, राज्यावर बसवून नजरा व मुजरे केले. तेच समयीं दोन लग्नें मोहित्यांच्या कन्या करून केली. त्याजवर संभाजीराजे यास गोत्रपुरुषाचा पुत्र दत्त देऊन, त्याचें नांव शिवाजीराजे ठेऊन, करवीरच्या राज्यावर बसवून संभाजीराजे यांची धाकटी स्त्री दुर्गाबाई व कारभारी राज्य चालवितात. नानासाहेबीं विश्वासराव यांजकडून प्रथम स्वारी मोंगलांवर करविली. दरमजल औरंगाबादेस गेले. तेव्हां सलाबतजंग व निजामअल्लीखान व बसालतजंग अवरंगाबादेस होते. त्यांशी युध्दप्रसंग दोन तीन महिने होत होता. त्यास, रामचंद्र जाधवराव दोन हजार फौजेनिशीं भालकीहून नबाबास सामील येत होते. त्यांची बातमी येतांच विश्वासरावसाहेबीं दत्ताजी शिंदे यास पांच सा हजार फौजेनिशी त्याजवर पाठविले. तेव्हा रामचंद्र जाधवराव सरकारचें ठाणें शिंदखेडचें होतें त्या ठाण्यांत शिरले. दत्ताजी शिंदे यांणी जाऊन त्या ठाण्यांत मोर्चे देऊन बसले. याजकरितां निजामअल्लीखान फौजसुध्दा जाधवराव यास सामील करून घ्यावयास चालिले. त्याच्या पाठीवर विश्वासरावसाहेब चालिले.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
तें वर्तमान कुलाबियास असतांच आले. तेथून पुण्यास येऊन श्रीमंत शाहूमहाराजाचे दर्शनास गेले. नानासाहेबास इहिदे अर्बैनांत प्रधानपदाचीं वस्त्रें महाराजांनी कृपा करून दिल्हीं. महाराजाची आज्ञा घेऊन पुण्यास आले. त्यास अंबाजीपंत पुरंधरे यांचे पुत्र महादोबा यांस आपासाहेबांनीं नानासाहेबांबरोबर देऊन हिंदुस्थानास रवाना केले. पिलाजी जाधवराव व मल्हारजी होळकर व राणोजी शिंदे व यशवंतराव ताकपीर व कित्येक सरदार समागमें होते. हिंदुस्थानांत जाऊन, शत्रूचीं पारपत्यें करून, त्या वर्षी छावणीस राहून, दुसरे वर्षी बंगाल्यास स्वारी करून, त्या प्रांतीं रघोजी भोसले सेनासाहेब सुभा होते त्यांची व श्रीमंतांची गांठ पडोन, युध्दप्रसंग होऊन, भोसले यांस लुटून, मोडून, बंगाल्यास खंडणी दरसाल करार करून फिरले. त्यास, आपासाहेब पुण्यास होते त्यांस वेथा होऊन कैलासवास केला. श्रीमंत भाऊसाहेब लहान होते. वासुदेव जोशी व रघुनाथराव हरी यांणीं बंदोबस्त केला. त्याजवर नानासाहेब स्वारीहून येऊन राजदर्शनास गेले. रघोजी भोसलेही आले. आठ महिने बखेडा पडला. तेव्हां महाराजांनीं नानासाहेबाची व भोसले याची समजावीस करून आज्ञा दिल्ही. पुण्यास आले. नबाब किलिजखान औरंगाबादेस होते ते वारले. त्यांचे पुत्र थोरले नाशरजंग करनाटकांत स्वारीस गेले. हिदायद मोहिदीखान, आदवानीचा सुभा, त्याशीं लढाई होऊन नाशरजंग व हिदायद मोहिदीनखान दोघेही पडले. तेव्हां सलाबतजंग किलीजखानाचे पुत्र बराबर होते. त्यास रामदासपंत दिवाण यांणीं सलाबतजंगास स्वारीहून भागानगरास आल्यावर रामदासपंतांनीं बिघाडाचा डौल धरून दरमजल आले. तेव्हां श्रीमंत नानासाहेब व भाऊसाहेब व दादासाहेब बाहेर निघोन फौज जमा करून समीपता होऊन लढाई कुकडी नदीवर सुरू जाली. नबाबाजवळ फौज भारी, व तोफखाना व सुबासी फरासीस, जंगी सामान असतां श्रीमंतांनीं मराठे का यानें चौफेर फौज लढाई करीत होते. त्या समयांत त्रिंबक किल्ला त्रिंबक सूर्याजींनी कोळी लोक जमा करून, किल्ल्याचा भेद करून, रात्रीस जाऊन किल्ला फत्ते केला. तें वर्तमान रामदासपंतास कळतांच कोरोगांवाहून माघारे फिरोन गेले. तहरह सुरळीत न जाहला. श्रीमंत गंगातीरास होते. तेथून पुण्यास यावें. त्यास महाराजांनीं निमे गुजराथ श्रीमंतास दिल्हीं असतां अंमल बसला नव्हता. तो बसवावयाकरितां दादासाहेबाबराबर फौज देऊन गुजराथ प्रांतीं रवाना केलें. आणि नानासाहेब व भाऊसाहेब दरमजल पुण्यास आले. त्यास दमाजी गाईकवाड फौजसुध्दां पूर्वी दुर्बुध्दीनें आले. त्यांशीं लढाई होऊन धरून बेडी घालून कैदेस ठेविले होते. त्याजबरोबर फौज देऊन दादासाहेबाकडे गुजराथेस रवाना केलें. गुजराथेचे महाल निम्मे सरकारांत घेऊन निम्मे गायकवाडाकडे दिल्हे. आणि दमाजी गाइकवाड याची बेडी तोडून वस्त्रें दिलीं. सरकारांत महाल घेतलें. तेथें कमाविसदार पाठवून दादासाहेबीं कूच करून मजल दरमजल पुण्यास आलें. नबाब भागानगरास गेल्यावर रामदासपंत वारले. शाहानवाजखान दिवाण जाले. त्यास, मल्हारजी होळकर व राणोजी शिंदे यांचे पुत्र जयाजी शिंदे हिंदुस्थानांत होते. त्याजकडून पातशाहास अर्ज करवून गाजुद्दीखानास सुभा सांगविला. त्यास, नबाब किलीजखान याचे थोरले पुत्र नाशरजंग त्या मागें गाजुद्दीखानांनीं सुभा करावा. किलीजखानांनीं गाजुद्दीखानास पातशाहाजवळ ठेविलें. त्याजमुळें इकडे सलाबतजंग दौलत करीत होते. त्यास, दक्षिणचा सुभा गाजुद्दीखानास सांगावा हेंच उचित पातशाहांनीं जाणून, व नानासाहेबही त्यास अनकूल त्याजवरून, गाजुद्दीखानास पातशाहानीं मेहेरबान होऊन सुभ्याची खिलत साबिलादस्तूर हत्ती, घोडे, जवाहीर, समशेर, शिक्केकटार रवाना केलें. मल्हारजी होळकर व जयाजी शिंदे गाजुदीखानास घेऊन आले. उभयतां सरदारांस माहीममरातीब दिल्हे. त्या वर्षी नानासाहेब व भाऊसाहेब व दादासाहेब आषाढ मासीं बाहेर पडोन फौज जमा करीत करीत चालिले. नवाब सलाबतजंग व निजामअल्लीखान व बसालतजंग व मीर मोगल भागानगराहून पुढें आले.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
महाराज यांची प्रकृति बिघडली. तेव्हां सकवारबाई नेहमी जवळ असे. कदाचित् आपल्यास बाहेर जाणें झाल्यास आपले पक्षाचे लोकांस बसवून जात असे. पेशवे यांनी इतक्यांतूनही संधि साधून शाहू महाराजाशीं एकांत करून त्यांजपासून सनद करून घेतली. ती अशी कीं, मराठ्यांचें सर्व राज्य पेशवे यांनी करावें व लौकिकांत राजाचा मान राखावा. ताराबाईचा नातू अधिकारी करावा. तो व त्याची संतति होईल तिचा उत्तम रीतीनें सांभाळ करावा. कोल्हापूरचें संस्थान संभाजीचें प्रथक आहे असें असूं द्यावें. याप्रमाणे पेशवे यांनी बंदोबस्त करून घेतल्यानंतर शाहूहाराज छ॥ १५ मोहरम मार्गशीर्ष व॥ २ शुक्रवारी (१५ डिसेंबर १७४९) सकाळीं चार घटिका दिवसास वारले. त्यावेळेस पृथक प्रतिनिधि व त्याचा मुतालीक यास कैद करून, पायांत बिड्या घालून, प्रतिनिधीस पुरंदरावर व यमाजी गमाजी शिवदेव यांस आणकाई किल्ल्यावर ठेवून नजरबंदी केली व सातारे किल्ल्यावर पेशवे यांनी आपली शिबंदीच ठेवून बंदोबस्त केला. सातारा शहरची नाकेबंदी केली व राणीसाहेब यांस तिचे बापाचे मार्फत सांगून पाठविलें की, महाराजांचे आज्ञेप्रमाणें करावयाचें किंवा सहगमन जावयाचें ? तेव्हां राणीसाहेब यांनी विचार केला की, प्रधान पराक्रमी आहेत, प्रतिनिधिच्यानें मसलत शेवटास जात नाहीं, ताराबाईचे आज्ञेंत राहणे हेंही योग्य नाही. सहगमन जाणें असा निरोप आल्यावर, प्रधानपंत यांनी वाड्यांत जाऊन बंदोबस्त करावा. नंतर महाराज यांचें प्रेत सकवारबाईसुध्दां माहुलीस कृष्णावेणीसंगम जाणून दहन झालें. सकवारबाई सती गेली. उत्तरकार्य मालोजी भोसले मुंगीकर यांजकडून करविलें. दहन कृष्णावेण्यासंगमी प्रवाहांत झालें. त्या ठिकाणीं देवालय करूं नये असा दृष्टांत झाला. एक थडगे करून महाराजांचे लिंग व बाईसाहेबांची मूर्ति स्थापन केली. नदीस पूर आले असतां मोठाले पाषाण वाहून जातात, तत्राप तें लिंग व मूर्ति अद्याप कायम आहेत ! महाराजांजवळ एक कुत्रा असें. तो सर्वकाळ महाराजांपाशी गादीजवळ असे. कोणे एकेदिवशी महाराज वाघावर शिकारीस गेले. बरोबर हा कुत्रा होता. महाराजांनी वाघावर बंदुकीची गोळी मारली. ती चुकून जाऊन वाघ महाराजांवर चालून आला, तेव्हां त्या कुत्र्यानें वाघ येतो असें पाहून एकदम वाघाचे मागले अंगास जाऊन त्याचें अंड धरिलें. इतक्यांत महाराजांजवळ बंदूक होती. दुसरी गोळी वाघावर मारिली. वाघ मारिला. त्या दिवशीं या कुत्र्यानें महाराजांचा प्राण वांचविला. तेव्हांपासून त्याजवर महाराजांची प्रीति होती. महाराजांचा अंतकाळ झाल्यावर मराठे चालीप्रमाणें प्रेत पालखीत घालून मोठे समारंभानें माहुलीस आणिलें. त्याजबरोबर कुत्राही आला. पुढें महाराजांचे दहन होऊन मंडळी माघारी येण्यास निघाली, त्यांत महाराजांची पालखी व महाराज मयत असें कुत्र्यानें पाहून त्या नदीचे काठी डोकें आपटून प्राण दिला. त्या कुत्र्याचेंही थडगें कृष्णेच्या कांठी महाराजांच्या थडग्यानजीक अद्याप कायम आहे. त्या थडग्यावर दगडाचा कुत्रा हुबेहूब कुत्र्याप्रमाणें करून बसविलेला अद्याप आहे. प्रथम दिवशीं विधि झाल्यावर महाराजांचे पूर्वीचे आज्ञेप्रमाणें बारसीपानगांवाहून रामराजे यांस आणावयाकरितां ताराबाईकडील चिंतो विनायक व बापूजी खंडेराव व इंद्राजी कदम वगैरे मंडळी लागलीच पाठविली.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
सु॥ खमसैन मया व अल्लफ, सन ११५९ फसली,
अव्वल साल छ १९ जबादिलाखर, २५ मे
१७४९, ज्येष्ठ वद्य ५ शके १६७१.
छ ९ साबान रोजीं (१३ जुलै १७४९) स्वारी पेशवे यांची सासवडास गेली ती रमजानांत (आगष्ट १७४९) परत आली. साता-यास शाहू महाराजांची प्रकृति फार बिघडली. तेव्हां जवळ मंडळी होती त्यांनी मसलत केली की, राजानें दत्तक पुत्र घ्यावा. परंतु शाहू महाराज यांची प्रकृति अलीकडे कांही दिवस भ्रांतासारिखी झाली होती. त्यापूर्वी प्रकृति साफ असतां राजाचे दोन पुत्र दोन तीन वर्षांचे होऊन वारले. वृध्दापकाळ सबब तेच वेळेस असा विचार ठरला कीं, कोल्हापुरास संभाजीस पुत्र झाला तर तो मी दत्तक घेईन. संभाजीस संततीच झाली नाहीं. तेव्हां मालोजीचा बंधू, शाहाजीचा चुलता, विठोजी होता, त्याचा वंशज घ्यावा, तर त्याचाही शोध लागेना. तेव्हां शाहू महाराज यांनी महादाजी अंबाजी पुरंदरे, गोविंदराव चिटणीस यांस सांगितलें कीं ताराबाई साता-यास आहे. तिनें आपला नातू, शिवाजीचा पुत्र, शिवाजीचे मरणानंतर जन्मला, त्यास ताराबाईनें कोठें लपवून ठेविला आहे त्याचा शोध आणावा. मग ताराबाईस विचारितां त्यांनीं सांगितलें कीं, शिवाजी मेला, तेव्हां त्याची बायको भवानीबाई गरोदर होती, तिला पुत्र झाला, तो रामराजाच्या भीतीस्तव त्या मुलास पन्हाळ्यावरून काढून गुप्तपणें त्याचे मावशीचे घरी ठेविलें, तिने बारशीस नेला, तो अप्रसिध्दपणें तेथें आहे, असें सांगितलें. हें वर्तमान सकवारबाईस कळतांच ताराबाईचा नातू निघाला तो खोटा आहे अशी मसलत केली. यास प्रतिनिधि व त्याचा मुतालीक व दमाजी गायकवाड यास अनकूल करून घेऊन घांटमाथ्यास व कोंकणांत शिबंदी ठेवण्यास कारभारी पाठविलें. याप्रमाणें आपला बेत सिध्दीस जाण्याकरितां याची प्रसिध्दि लोकांत न व्हावी ह्मणून नित्य बोलत असे कीं, मी आपल्या भ्रताराबरोबर सती जाईन. हा मनसोबा पेशवे यांनी जाणून छ १८ रमजान रोजी (२१ आगस्ट १७४९) आपण व जनार्दनबाबासुध्दां शिंदे, होळकर असे सरदार ३५००० फौजेनिशी पुण्याहून निघून साता-यास आले. पुण्यास बंदोबस्तास दादासाहेब व भाऊसाहेब यांस ठेविलें. पेशवे साता-यास आल्यावर यांनी असा विचार केला कीं, या वेळेस ताराबाईचा पक्ष स्वीकारावा. सकवारबाईनें प्रतिनिधि व सेनापति वगैरे अनुकूल करून फौज जमविली. त्यांनीं संभाजी करवीरास आहेत याजकडे जावें, व संभाजीनीं त्या फौजेसुध्दां साता-यावर यावें अशी मसलत केली. तेव्हां शाहू महाराज यांनी तिकडे बापूजी खंडेराव यास पाठवून जिजाबाई व कारभारी मंडळींत भेद करून ही गोष्ट सिध्दीस जाणार नाही असे संभाजीस सांगून माघारें फिरविलें. सकवारबाईनें रघोजी भोसले व सेनापति गायकवाड यांस जलद येण्याविषयीं पत्रें पाठविली. ते वेळेस आले नाहींत. यमाजीपंत यांनी राणीचे आज्ञेनें ताराबाईचे बंदोबस्तास आपले बंधु अंताजी शिवदेव याजबरोबर लोक देऊन पाठविलें. पंतप्रधान यांनींही किल्ल्याशीं राजकारण करून लोकांस बक्षिसें द्यावयाचें कबूल करून यादो गोपाळ व गोपाळ यादव व बाजी यादव यांस ताराबाईजवळ ठेवून किल्लेदार अनंतराव जाधव, जोतीपंत सुभेदार हे वश करून ठेविले.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
सु॥ तिसा अर्बैन मया व अल्लफ सन ११५८ फसली,
अवल साल छ ७ जमादिलाखर, २४ मे १७४८,
ज्येष्ठ शुध्द ८ शके १६७०.
छ २३ रज्जब (९ जुलै १७४८) श्रीमंत नानासाहेब जनार्दनपंतसुध्दां नेवाईची स्वारी करून पुण्यास परत आले. भाऊसाहेब यास पुत्र झाला, छ १५ साबान (३० जुलै १७४८). छ २९ साबान (१३ आगष्ट १७४८) नानासाहेब यांस यशवंतराव ह्मणून पुत्र झाला होता. छ ११ रमजान रोजी (२५ आगष्ट १७४८) साता-यास जाऊन छ १ सवाल रोजीं (१४ सप्टंबर १७४८) परत पुण्यास आले. छ ३ साबान (१८ जुलै १७४८) गडगडा किल्ला शंकराजी केशव हसबनीस यांनी घेतल्याचें समजलें. छ १० साबान (२५ जुलै १७४८) हरिश्चंद्रगड कर्णाजी शिंदे यांनी फत्ते केला. सबब सोन्याचें कडें बक्षीस दिलें. छ ७ जिल्हेज रोजी (१८ नोव्हेंबर १७४८) स्वारीस निघाले व छ १० रोजीं (२१ नोव्हेंबर १७४८) परत आले. थेऊरास जाऊन कल्पलतादान देऊन. छ २४ मोहरम (३ जानेवारी १७४९) नानासाहेब साता-यास जाऊन लागलीच छ ११ रबिलावल रोजीं (१८ फेब्रुवारी १७४९) परत आले. मुंजीचे आमंत्रणाकरितां गेले असावे. छ ५ सफर (१४ जानेवारी १७४९) समशेर बहादर याची मागणी घातली, लक्षधीर दौलतराव, संस्थान पेंठ, व पुढें जमादिलावल महिन्यांत लग्न झालें. छ ११ सफर (२० जानेवारी १७४९) नानासाहेब व भाऊसाहेब व जनार्दनपंत स्वारीस निघाले व छ ९ रबिलावली (१६ फेब्रुवारी १७४९) परत आले. छ ३० रबिलावल (९ मार्च १७४९) विश्वासराव यांजी मुंज झाली. छ २९ रबिलाखर (७ एप्रिल १७४९) जयाजी शिंदे व मल्हारजी होळकर यांजकडून करेरा घेतल्याची व दतियाशीं पण केल्याची खबर आली. छ २४ जमादिलावल (१ मे १७४९) देवदेवेश्वर पर्वती याची स्थापना झाली. पर्वताई भवानी पूर्वीचीच पाषाणाची स्थापिली. गणपति व महादेव रुप्याचा व पार्वती सोन्याची व बाण देवदेवेशर छ २९ रबिलाखर (७ एप्रिल १७४९) छ जमादिलावल (६ मे १७४९) पर्यंत वैशाखमासीं स्थापना झाली. शाहू महाराज यांची धाकटी बायको अजारी होती, तिजला महाराजांनी घेऊन जेजुरीस आले. तेथें या साली निवर्तली. दहन माहुलीस नेऊन केलें. श्रीपतराव व केदार हत्ती मेला. चित्त उदास झालें. वृध्दापकाळी पोटी संतान नाहीं. काळविपर्यास आला, ह्मणून वनवास करावा या हेतूनें सातारा व माहुलीचे दरम्यान वाडी होती तेथें राहिले होते. त्या वाडीचें नांव वनवासवाडी पडलें. निजामउन्मुलूख बऱ्हाणपुरी मयत झाले. यास या वेळेस पुत्र होते ते : १ गाजुदीनखान, २ नासरजंग, ३ सलाबतजंग, ४ निजामअल्ली, ५ महमदसरीफ, ६ मोगलअल्ली. यांत प्रथम दोघे एक आईचे. दुसरे चार यांच्या आया निरनिराळया होत्या. निजामउन्मुलूख मरण पावला तेव्हां गाजुदीन दिल्लीस होता, ह्मणून दुसरा पुत्र नासिरजंग तोच तक्ताधिपत्य करूं लागला. यानंतर दोन तीन महिन्यांनी दिल्लीबादशाहानें नासिरजंगास भेटीस बोलाविलें. याप्रमाणें निघून नर्मदेपर्यंत गेला तोंच न येण्याविषयी पुन: पत्र आलें. तत्राप तो उदासचित्त न होतां त्याचा पुतण्या मुजफरजंग याचे व चंदासाहेब याच्या साह्यानें व फ्रान्सिस्कोच्या आश्रयानें दंगा करीत होता हें वर्तमान व दुसरें वर्तमान आणखी कळलें की निजामउन्मुलुखानें आपला हस्तक अनवरुद्दीन कर्नाटकांत पैन घाटीं ठेविला होता तो मेला. नंतर नासरजंगानें रघोजी भोसल्यास पत्र पाठविलें कीं, माझ्या साह्यास आला तर मी कांहीं मुलूख देईन. याखेरीज जे मागील संबंधी लोक होते त्यांसही मी तिकडे येतों, तुह्मीं मला मिळावें. तेव्हां तो कर्नाटकांत चालला. तेव्हां ते लोक त्यास मिळाले. त्यांस मुरारराव घोरपडा असे. त्यास निजामउन्मुलुखानें गुत्तीची जहागिरी दिली होती. ह्मणून त्यास जाणें अवश्य झालें. दुसरा महीदपूरचा राजा व कितीएक नबाब व अनवरउद्दीन याचा दुसरा पुत्र महमदअल्ली असे सर्व स्वत: किंवा लष्कर पाठवून साह्य करीत असत. महमदअल्लीचे स्नेहास्तव मद्रासचे इंग्लिश लोकही नासिरजंगाचे उपयोगीं पडले. मोरोबादादा फडणीस यांचे लग्न झालें. आईचें नांव पार्वतीबाई, बाबूराव फडणवीस याची बायको.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
सु॥ समान अर्बैन मया व अलफ, सन ११५७
फसली, अव्वल साल छ २५ जमादिलावल,
२५ मे १७४७, वैशाख वद्य १३ शके १६६९.
छ १० रमजान ( ५ सप्टंबर १७४७) स्वारी सिध्दटेकास जाऊन आज रोजी निंबाळकर यास भेटून परत आले. छ १७ सवाल (११ अक्टोबर १७४७) किल्ला घेतल्याचे वर्तमान आलें, होळकर याजकडून. छ १ जिलकाद (२५ अक्टोबर १७४७) नारो अपाजी खिरे यास पुणें मुक्कामी सुभ्याची दिवाणगिरी सांगितली. छ १ जिलकाद (२५ अक्टोबर १७४७) शिंदे होळकर यास हिंदुस्थानांत जाण्याची परवानगी झाली. छ ६ जिलकाद (३० अक्टोबर १७४७) किल्ले हरिश्चंद्र फत्ते झाल्याचे वर्तमान आलें. छ २४ जिलकाद (१७ नोव्हेंबर १७४७) पर्वती येथील महादेव रुप्याचा वजन ६७३४॥। व गणपति ६८६॥। पार्वती वजन १२४५५ येणेंप्रमाणे मूर्ति तयार झाल्या. छ १८ जिल्हेज (१० डिसेंबर १७४७) स्वारीस निघाले ते मौजे पिंपरखेडे परगणे छ ४ सफर रोजी (२४ जानेवारी १७४८) गेले. तेथून श्रीमंत हिंदुस्थानांत गेले. भाऊसाहेब यांची प्रकृति बिघडली. सबब दादासाहेबसुध्दां परत पुण्यास आले. श्रीमंत गुजराथेंतून नेवळीचे स्वारीस गेले. छ १८ जमादिलावल (६ मे १७४८) माधवसिंग सवाई जयसिंगाचा पुत्र मौजे बागथडी, प्र॥ तोडा, प॥ जयनगर येथें श्रीमंताया भेटीस आला. भेट झाली. त्याचे डे-यास गेले होते. मुलूख देऊन रवाना केले. आणि माघारे उलटून अखेर साली उज्जनीवर आले. छ २ जमादिलाखर (१९ मे १७४८) माणिकगड घेतल्याची खबर आली. छ १ रज्जब थेऊरास (१७ जून १७४८) परत आले. छ २ रज्जब (१८ जून १७४८) भाऊसाहेब यांचे पुत्राचें बारसे झालें. छ ९ जमादिलाखर (२६ मे १७४८) भिऊबाई बारामतीकर यांचे घरी अबाजी नाईक यास दिली होती ती मयत झाली. बाळाजी विश्वनाथ याची मुलगी इचीच बहीण अनुबाई इचलकरंजीकर यांचे घरी व्यंकटराव नारायण घोरपडे यास दिली होती. पागा मुक्काम कवडी येथें नवा बाण स्थापन केला, छ २ रबिलाखर (२१ मार्च १७४८). खासा स्वारी देहेर व खानदेशपर्यंत गेली. तों नासरजंग व कारभारी रामदासपंत चालून आले व लढाई झाली. नंतर अशीउंबरीवर फाल्गुन मासी (मार्च १७४८) तह होऊन पुढें हिंदुस्थानास गेले. खासा व बाबा यांचे कारभारांत पेंच पडू लागले. भाऊसाहेब लहान असता कारभार करू लागले. अहमदशा अबदली इराणी बादशाहानें दिल्लीवर स्वारी केली तेव्हां दिल्ली बादशाहा महमदशाहा याने आपला पुत्र अमदशा यास पाठविलें. त्याने याचा पराभव करून काबुलापर्यंत मागें हटविले. नंतर तो दिल्लीस माघारा येत असतां याचा बाप महमदशाहा मयत झाला होता. मग त्याचे जागी या अहमदशाहाची स्थापना सन १७४८ एप्रिल महिन्यांत झाली. त्यावेळेस निजामउन्मुलूख यास वजीर होण्याविषयीं बहुत आग्रह केला. परंतु यानें वृध्दापकाळामुळें तें काम करण्याचे कबूल केलें नाहीं. तेव्हां तें वजिराचें काम अहमदशाहा बादशहानें सफदरजंग औंदचा नबाब यास दिलें. निजामउन्मुलूख तारीख २९ जून सन १७४८ रोजीं ब-हीणपुरास मयत झाला. या वेळेस याचें वय १०४ वर्षांचे होते.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
तेव्हां संभाजी आंग्रे विजेदुर्गाहून कुलाबियास येऊन धोंडजी आंग्रे यास ठेऊन बंदोबस्त करून विजेदुर्गास गेले. संभाजी आंग्रे याचा व मानाजी आंग्रे याचा पेंच होता. याजमुळें संभाजी आंग्रे आले तेव्हां मानाजी आंग्रे पळोन रेवदंडयास फिरंगी याचे आश्रयास गेले. संभाजी आंग्रे विजेदुर्गाकडे गेल्यावर मानाजी आंग्रे कुलाबियास जाऊन किल्ला हस्तगत केला. तें वर्तमान संभाजी आंग्रे यांस कळतांच आरमारसुध्दां धाऊन आले. ते समयीं मानाजी आंग्रे यांचें पत्र येतांच राऊसाहेब व आपासाहेब थोर थोर मजला करून जाऊन पावले. मानाजी आंग्रे याची कुमक केली. ते समयीं राजमाची व कोथळा किल्ले दोन व बोरटी व छत्तिशी दो महाल, सरकारांत घेतले, आणि पुण्यास आले. यावर वसई साष्टीकडील भेद आला. यास्तव हशमी, मावळे व कोंकणचें लोक चाकरी ठेऊन खंडोजी माणकर व रामाजी महादेव यांस पाठविलें. ते जलद जाऊन कळव्याची खाडी उतरून जाऊन साष्टी घेतली. शंकराजी केशव यांस वसईस रवाना केले. ते गोखाव्याचे दादराजवळ जाऊन राहिले. त्यास, हें वर्तमान गोव्यास फिरंगी यास गेले. फिरंगी यांणीं तयारी केली. ती बातमी इंग्रजास मुंबईस आली. त्यांणीं पत्र बाजीरावसाहेबांस पाठविलें कीं तह करावा; नाहींतर फिरंगी येऊन साष्टी घेतो; मसलतीस खर्च केला तो व्यर्थ होऊन लोक मारले जातात. तेव्हां त्याचे उत्तर समर्पक पाठवून तेच वक्तीं मल्हारजी होळकर यास साष्टीस कुमकेस पाठविलें. ते जाऊन पावले तो फिरंगी जहाजें तयारी करून साष्टीस पावबुरजाजवळ आला. ते समयीं साष्टीवरून तोफाची मारगिरी केली. तेव्हां जहाजावर दोन किपीतान होते ते गोळयांनीं ठार पडिले. जहाजें निघोन गेलीं. कदाचित् फिरोन फिरंगी येईल याजकरितां गोव्यास पायबंद बसवावयाकरितां व्यंकटराव नारायण घोरपडे दहा हजार फौजेनिशी पाठविले. त्यांणीं जाऊन साष्टी बारदेस मारून मुलूख ताराज केला. त्याजवर आपासाहेब व राणोजी शिंदे वसई प्रांतीं जाऊन माहीम, शिरगाव, तारापूर घेतलें. ते समयीं बाजी भिवराव कामास आले. सदर्हू किल्ल्यांचा बंदोबस्त करून वसईस आले. मोर्चे किल्ल्यास देऊन सुरुंग खणून किल्ल्याचा भेद घेतला. त्या समयीं इराणी दिल्लीवर चढाई करून आला. ते समयीं पादशाहाचा फौजेविषयीं फरमाना आला. त्याजवरून बाजीरावसाहेब यांचें पत्र आपासाहेब यास गेलें कीं वसईस मोर्चे राहून दिल्लीचे स्वारीस जाऊन कार्य मातब्बर करावें, येविशीं महाराजांची आज्ञा जाहली आहे. त्यास वसईचा शह सोडावयाची मर्जी आपासाहेब यांची नाहीं ऐसें उत्तर जहालें. याजमुळें दिल्लीस जाणें न जहालें इराणी दिल्लीस येऊन दिल्ली लुटून खजीना घेऊन गेला. वसईचे मसलतीस मुबलख पैसा रावसाहेबीं पाठविला. वसई किल्ला जेर केला. गोव्याची कुमक न येई तेव्हां फिरंगी याणीं किल्ला देऊन गोव्यास जाऊन पुर्तकालास गेले. आपासाहेबीं वसईचा सुभा शंकराजी केशव यांसी व साष्टीचा सुभा खंडोजी माणकर यांसीं सांगोन आपण सरदार सुध्दां पुणियासी आले. वसईचे मसलतीस बारा चौदा हजार माणूस, स्वार व हशम, कामास आले. आपासाहेबी वसईचे मसलतीस भगीरथ प्रेत्न करून फिरंगाण प्रांत हस्तगत करून, धर्मराज्य हिंदुधर्माची स्थापना केली, दसरा जाहल्यावर फौज जमा करून, स्वारीची तयारी करून श्रीमंत रावसाहेब स्वारीस हिंदुस्थानांत गेले. आपासाहेब व श्रीमंत नानासाहेब पुण्यास राहिले. त्या वर्षी संभाजी आंग्रे फिरोन कुलाबियास आले. ते समयीं मानाजी आंग्रे याचें पत्र येतांच आपासाहेब व नानासाहेब दरमजल कुलाबियास गेले. तुळाजी आंग्रे संभाजी आंग्रे याबराबर होते. युध्दप्रसंग होतेसमयीं तुळाजी आंग्रे यांस धरून आणिलें. त्या स्वारीस मानाजी आंग्रे वजारत माब सरखेल यांजपासून पाली व मिरगड घेतले. बाजीराव साहेब नर्मदातीरास होते. तेथें कैलासवासी जालें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
महाराज फारच कृपावंत झाले. पो। कडेरांजणगांव वगैरे पांच महालचे सरदेशमुखीचें वतन नानास दिल्हें. सैदही दक्षणेस येऊन सा सुभ्यांचा सुभा करीत होते. त्यास, कांहींका दिवशीं पातशहांनीं किलिजखान यास दक्षिणचा सुभा सांगून रवाना केलें. सैदाजवळ फौज व जंगी सामान पोक्त होतें. किलीजखान यांणीं दिल्लीहून निघाल्यावर फौज जमा करीत करीत आले. पातशहाची सैदावर अवकृपा आणि किलीजखान याजवर कृपा. तेण्हेकरून सैदास मोडून नेस्तनाबूद करून दक्षणचा सुभा करूं लागले. स्वदेशीं कितेक पुंड पाळेगारी करीत होते. त्यांचीं पारपत्यें नानांनीं केलीं. त्यास, प्रथम जाधवराव याजकडे जाऊन, तेथें बाबतीचा सुभा करून, तेथून श्रीमंत शाहूमहाराजांपासून सेनाकर्त मिळविलें. महाराजाची सेवा निष्ठेनें, करून, मर्द व शहाणे राज्यांत मनुष्य नाना ऐजा लौकिक वाढवून, महाराजाची कृपा संपादून प्रधानपद मेळविलें. जीवाभ्य श्रम करून, शत्रू पराभवातें पाववून, महाराजाच्या राज्याचा बंदोबस्त केला. त्याजवर, कांहींका दिवशीं नाना कैलासवासी जाहले. तेव्हां श्रीमंत बाजीराव साहेब व चिमाजीआप्पा सातारियास महाराजाचे दर्शनास गेले. रावसाहेबांस प्रधानपदाचीं वस्त्रें दिलीं. आपासाहेबांस दमाजी थोरात याचा सरंजाम सरकारांत घेतला त्याची सरदारी सरंजामासुध्दा देऊन वस्त्रे दिलीं. सातारियाहून पुण्यास आले. धनाजी जाधवराव याचे पुत्र चंद्रसेन जाधवराव सेनापती यांजवर महाराजाची अवकृपा झाली. याजमुळें ते मोगलाई नबाब किलीजखान असफजाहा याजकडे गेले. तेव्हां खंडेराव दाभाडे यास सेनापती व त्याचे पुत्र त्रिंबकराव दाभाडे यास सेनाखासखेल हीं दोन पदें महाराजांनीं कृपा करून दिल्हीं. त्याजवर कित्येका दिवशीं खंडेराव दाभाडे वारले तेव्हां सेनापती त्रिंबकराव दाभाडे यास दिल्ही. गुजराथ प्रांत त्याजकडे होता. त्रिंबकराव दाभाडे त्या प्रांतीं गेले होते. त्यास, रावसाहेब व आपासाहेब सातारियाहून आल्यावर दहा बारा हजार फौजेनिशीं गुजराथ प्रांतीं गेले. तेव्हां दाभाडे यांनीं बिघाडाची सुरत दाखविली. चाळीस हजार फौज त्यांजवळ होती. नबाब किलिजखान पन्नास साठ हजार फौज, बलाय तोफखाना, पायागडाकडे होते. ते समयीं वर घाटीं यावयास मार्ग न दिसे. इकडे दाभाडे व तिकडे नबाब. नाइलाज झाला. रावसाहेब व आपासाहेब यांजवळ थोडकी फौज, परंतु नामी नामी मर्द माणूस एकदिल, स्वामीकार्यास तत्पर, उभयतांनीं सर्व सरदार व लोकांचें मनोधारण करून, वडिलांचें पुण्य पदरीं व महाराजाचे एकनिष्ठ, तद्योगें लढाईचा कस्त करून, दाभाडयावर चालून जाऊन, युध्द करूं लागले. लढाई मातबार केली. ते समयीं त्रिंबकराव दाभाडे यास गोळी अंबारींत लागून कामास आले. फौजेवर हल्ला करून लुटून फस्त केली. मोठी फत्ते करून, पुण्यास येऊन राजदर्शनास गेले. दर्शन घेऊन पुण्यास आले. दसरा झाल्यावर रावसाहेब पुण्यास राहिले. आपासाहेब स्वारीची तयारी करून हिंदुस्थानांत स्वारीस जाऊन उज्जनीस दयाबहादूर सुभा होता त्याजवर जाऊन लढाई मातबर करून सुभा बुडविला. मुलूख सरकारांत घेतला. महाराजांच्या राज्याची अभिवृध्दी करीत चालले. मल्हारजी होळकर व राणोजी शिंदे हे उभयतां सरदार सलाबतीचे दिवसेंदिवस आक्रम करीत चालिले. त्या स्वारीहून देशीं आल्यावर महाराजाचे दर्शनास गेले. त्यास शामळांनीं कोंकणांत उपद्व्याप करून तमाम किल्ले घेतले. त्याजवर मोहीम करावयाची मर्जी महाराजाची. परंतु जंजिरा समुद्रांत; हस्तगत होणें कठीण; व गडकिल्ले मजबूत. तेव्हां कांहीं फितूर असावा यास्तव शेखजी सुभेदार होता त्याजकडे राजकारण लाविलें. शेखजींचें व शिद्दी रसूल याकूबखान याचें चित्त शुध्द नव्हतें, याजमुळें फितूर करावयास जागा जहाली. राजपुरीस दाखल झाल्यावर पन्नास हजार रुपये त्यास द्यावे व जंजिरा घेऊन द्यावा आण पन्नास हजार रुपये घ्यावे, असा करार करून ठेविला. त्यास शिंद्दी रसूल याकूबखान वारले. ते समयीं त्यांचा थोरला पुत्र शिद्दी अबदल्ला जंजिरे यांत राहिला व धाकटा लेक शिद्दी अबदूल रहिमान मूर्दा दफन व्हावयास राजपुरीस आला. तेव्हां शिद्दीसंबूल, शिद्दीयाकूत, व शिद्दीआफवानी, व शिद्दीरहाण या चोघांनीं थोरले लेकास जिवें मारून जंजिरेयाचे दरवाजे देऊन किल्ला बळाविला, शिद्दीअबदूल रहिमान मुर्द्याबराबर आला तो राजपुरीस राहिला. त्या गर्दीसमयीं सेखजीचें पत्र श्रीमंत बाजीरावासाहेबास येतांच कुच करून मोठयामोठया मजली करून येकबेग राजपुरीस जाऊन दाखल झाले. जंजिरेयांत खबर पोचतांच शिद्दी रहाण लोकसुध्दां बाहेर आला. बाला ? राज्यावर लढाई होऊन शिद्दी रहाण पडला. रावसाहेबीं मोर्चे देऊन बसले. फत्तेसिंग भोसले व श्रीमंत राव प्रतिनिधीही होते. किल्ले कोट, अवचीतगड, सुरगड, बिरवाडी, तळाघोसाळा, कुरडू, महाड, रायगड घेतले. शिद्दी अबदूल रहिमान सापडला. तो रावसाहेबाजवळ होता. सा महिन्यांनीं तह करून शिद्दी अबदूल रहिमान यास जंजिरेयांत तक्तावर बसवून किल्ले घेतले. त्यांपैकीं रायगड व महाड हुजूर महाराजांनीं ठेवून वरकड किल्ल्यांचा बंदोबस्त रावसाहेब यांणीं केला. साडेपांच माहाल हबशास देऊन वरकड माहाल सरकारांत घेतले. तह करून पुण्यास येऊन महाराजांचे दर्शनास गेले. कान्होजी आंग्रे सरखेल कुलाबियास होते. ते वारलियावर त्यांचे वडील पुत्र शेखोजी आंग्रे दौलत कुलाबियास करीत होते. ते व धाकटे पुत्र संभाजी आंग्रे विजेदुर्गास होते. त्यास, शेखोजी आंग्रे वारले.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
ताराबाईचा वसवसा याजमुळें महाराजांस पंगतीस घेऊन भोजन करावयाचा मराठे अनमान करूं लागले. त्यास परसोजी भोंसले म्हणों लागलें कीं हे संभाजी महाराजांचे पुत्र, आह्मी व ते एक जागा भोजन करतों. तेव्हां परसोजी भोसले व धनाजी जाधवराव वगैरे मराठे मिळोन महाराज एक पंगतीस भोजन केलें. तेव्हां परसोजी भोसले यांजवर कृपा करून सेनासाहेबसुभा हें पद नूतन उपस्थित करून वस्त्रें बहुमानसांप्रदाययुक्त देऊन पद दिल्हें. ते समयीं सिदोजी गुजर याजवळ सुवर्णदुर्गास कान्होजी आंगरे चाकर होते. सिदोजी गुजर राजाराम साहेबाबरोबर चंदीस गेले. तेव्हां कान्होजी आंगरे यांणीं मर्दुमकीनें सुवर्णदुर्ग बळावून तेथून विजयदुर्ग वगैरे किल्ले घेतले. ते समयीं राजारामसाहेबीं सरखिलींचें पद दिलें. त्याजउपरी तेथून येऊन कुलाबा, खांदेरी, सागरगड घेतले. ताराबाईचा व शाहू महाराज यांचा पेंच होता. याजमुळें कान्होजी आंगरे यांणीं महाराज शाहूराजे यांच्या राज्यांतील किल्ले लोहगड व राजमाची, तुंग, तिकोना, धनगड हे किल्ले घेतले. व लोहगडाहून बहिरोपंत पिंगळे यांस आंगरे यांणीं धरून नेले. याउपरी कान्होजी आंगरे सातारियापावेतों येतो; महाराजांजवळ द्रव्याचें बळ नाहीं; कान्होजी आंगरे यांणीं दर्यांत पुंडावा करून खजाना मेळविला व जातीनें मर्द, तेव्हां महाराजांस विचार पडला कीं बहिरोपंतास धरून नेलें; राज्याचा बंदोबस्त झाला पाहिजे; पिंगळे नाकर्ते. ते समयीं परशरामपंतास पेशवाई तुह्मीं करून राज्याचा बंदोबस्त करणें; आंगरे यांणीं घेतले त्याचें पारिपत्य करून किल्ले घेणें, म्हणून आज्ञा केली. त्यास, परशरामपंत यांणीं विचार केली कीं बाळाजी विश्वनाथ यांजकडे फौजेचें वळण आहे; त्यांस पेशवाईची वस्त्रें द्यावी; ते बंदोबस्त करतील. तेव्हां खंडो बल्लाळ चिटणीस यांसही महाराजांनीं विचार पुसून बाळाजीपंतनानास आज्ञा केली, त्यांहीं मान्य केलें. ते समयीं वस्त्रें व शिक्केकटार प्रधानपंताची देऊन रवाना केलें. त्यांहीं तीन चार हजार फौज जमा करून दरमजल लोहगडाखाली गेले. नानांचा व आंगरे यांचा कागदींपत्रीं घरोबा होता. आंगरे यांस पत्र लिहून पाठविलें व दरमजल कुलबियास गेले. सरखेल पुढें सामोरे येऊन भेटीचा समारंभ झाला. उपरांत, खलबतास बसोन त्यांस सांगितलें कीं तुमचा व आमचा भाऊपणा. पेशवाई तुमच्या घरांत. आयते किल्ले देत असाल तरी तसेच सांगावें. शिक्केकटार व वस्त्रें त्यांस दाखविलीं व त्यांस विचार सांगितला कीं सरखेलींचें पद ताराबाईकडून आहेच; इकडूनही करार करून देवितों. महाराजांचे चाकर होऊन कृपा संपादून घ्यावी. त्याजवरून त्यांनी मान्य करून राजमाची मात्र ठेवून लोहगड व घनगड, तुंग, तिकोना, या किल्ल्यांच्या चिठ्ठया देऊन किल्ले देविले. जंजीरकर हबशाचा व आंगरे यांचा कलह लागला होता तो तह करून दिला. बहिरोपंत पिंगळे यांस धरून नेलें होतें त्यांस सोडून समागमें घेऊन आले. महाराजांचे लोक किल्ल्यावर चढविले. नाना सातारियास गेल्यावर महाराजांचें दर्शन जालें. कानोजी आंगरे यांस सरखेलींचे पद करार करून वस्त्रें व शिक्केकटार पाठविली. त्यास, दमाजी थोरात हिंगणगांवकर पुंडावे करून होता. त्यास, शंकराजी मल्हार, सैद सुभेदार दक्षणचे याचे दिवाण, त्याजकडून फौज नानांनीं आणवून दमाजी थोरात याचें पारिपत्य करून त्याचा सरंजाम होता तो हुजरातीकडे ठेविला. नारो शंकर सचीव यांस थोरातांनीं धरून नेलें होतें त्यांस सोडून आणिलें. ते समयीं नारो शंकर यांची मातुश्री येसूबाईंनीं किल्ला पुरंदर व पुणें सुभा व जुन्नर स्वराज्याचा अंमल सचीवाकडे होता तो नानाकडे दिल्हा. त्या काळीं दक्षणेस पातशाहाकडून सैद सुभेदार सा सुभ्यांचे होते. त्यांचे व फरोखशहा पातशहाचें चित्त शुध्द नव्हतें. याजकरितां पातशहावर स्वारीस सैद जाऊं लागले. ते समयीं शाहूमहाराजांजवळ कुमकेस फौज मागितली. दररोज पन्नास हजार रुपये द्यावयाचा करार केला. तेव्हां महाराजांनीं नानांस जाण्याची आज्ञा केली. फौज व सरदार बराबर दिले. फौजसहवर्तमान सैदाजबळ गेले. सैद व नाना मजलदरमजल दिल्लीस जाऊन पातशहास धरून त्याचे नेत्रास अपाय केला आणि त्याचे पुत्रास तक्तावर बसविलें. ते समयीं पुणें सुभा व जुन्नरसुभा येथील मोगलाई अंमल, दरोबस्त तमाम मोगलाई राज्याची चौथाई, स्वराज्य व सरदेशमुखीचे वतन महाराजांस करार करून पातशाही सनदा घेऊन आले. सैदाकडून पन्नास हजार रुपये दररोज पावत होते. त्याजपैकीं निमें फौजेस खर्च करून बाकी खजाना बाळगून सातारियास महाराजांचे दर्शनास गेले.