Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
सु॥ सीत अर्बैन मया व अल्लफ, सन ११५५ फसली,
अव्वल साल छ ४ जमादिलावल, २५ मे १७४५,
ज्येष्ठ शुध्द ६ शके १६६७.
छ १० जमादिलावल (३१ मे १७४५) भाऊसाहेब सालगुदस्ता छ २८ रबिलाखरी (३० मे १७४४) साता-यास गेलेले आजरोजी पुण्यास परत आले. रामजी शिंदे सुजहालपुराजवळ राणीगंज नावाचें खेडे आहे, त्या ठिकाणी मयत होऊन दहन झाले. दुखोटा छ २९ जमादिलाखर रोजी (१९ जुलै १७४५) बायकोस व पुत्रास श्रीगोंदे मुक्कामी पाठविले. बायकोचे नाव मीनाबाई होते. मलकामचे बुकात नमूद आहे. छ १३ रज्जब (२१ जुलै १७४६) नानासाहेब व बापूजी भिवराव सुभा भेलशाची स्वारी करून पुण्यास परत आले. छ १८ रज्जब (१९ जुलै १७४६) धर्मादाय देणें बजरबटू, बैरागी, अष्टमीचे उत्साहाबद्दल सालमजकुरीं मात्र दिलें. दरसाल न द्यावें. मोईन नव्हे. याप्रमाणे झालें. छ ८ रमजान आश्विन शुध्द दशमीस (१३ सप्टेंबर १७४६) स्वारीस साता-यास निघाले. छ २९ सवाल (३ नोव्हेंबर १७४६) मार्गशीर्ष मासीं खंडेराव जाधव मयत झाले.
सु॥ सब्बा अर्बैन मया व अल्लफ, सन ११५६ फसली,
अव्वलसाल छ १५ जमादिलावल, २५ मे १७४६,
ज्येष्ठ वद्य २ शके १६६८.
छ २५ जमादिलावल (४ जून १७४६) अव्वल साल जैंतपूर घेतल्याचे वर्तमान साता-यास आलें. छ २१ जिलकाद (२४ नोव्हेंबर १७४६) मार्गशीर्षमास भाऊसाहेब यांस मुलगा झाला. छ ३ जिल्हेज (५ डिसेंबर १७४६) भाऊसाहेब साता-याहून स्वारीस निघाले. कर्नाटक प्रांतास सखारामबापू बरोबर होते. छ ३ जिल्हेज (५ डिसेंबर १७४६) रतनगड फत्ते झाल्याचें वर्तमान आलें. मोहरम महिन्यांत (जानेवारी १७४७) अडर आजरें येथे लढाई झाली तीत भाऊसाहेब मायनहळ्ळी बिदनपूर येथें लढाई झाली रबिलावल (मार्च १७४७ महिन्यांत) याच मुक्कामी मुरारराव घोरपडे यांची भेट झाली. छ २९ रबिलावल रोजी (३० मार्च १७४७) बहादूरबिंडा किल्ला घेऊन स्वारी परत निघाली. छ १३ रबिलाखर (१३ एप्रिल १७४७) श्रीमंत नानासाहेब यांनी निरोपाची वस्त्रें घेतली. नंतर पंढरपुरास गेले. तेथून परत येताना, जेजोरीनजीक भाऊसाहेब कर्नाटकांतून आलें, त्यांची भेट झाली. दोन्ही स्वा-या एकत्र होऊन छ २४ जमादिलावल रोजी (२४ मे १७४७) पुण्यास आले, सखाराम भगवंतसुध्दा श्रीनिवास परशराम ऊर्फ श्रीपतराव प्रतिनिधि मार्गशीर्ष वद्य ८ रोजी शांत झाले. स्त्री राधाबाई माहुलीस सहगमन गेली. श्रीनिवासराव यास पुत्र नाहीं. सबब जगजीवन परशराम यास प्रतिनिधिपदाची वस्त्रे दिली. यमाजी शिवदेव यास मुतालिकीची वस्त्रें दिली. छ १४ जिल्हेज पौष वद्य १.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
सु॥ खमस अर्बैन मया व अल्लफ, सन ११५४ फसली,
अव्वल साल छ २२ रबिलाखर, २४ मे १७४४,
ज्येष्ठ वद्य ९ शके १६६६.
छ १ रमजान (२७ सप्टेंबर १७४४) चावड किल्ला फत्ते झाल्याचें वर्तान आलें. छ २५ सवाल (१९ नोव्हेंबर १७४४) हसडर किल्ला घेतल्याचें वर्तमान आलें. छ २६ सवाल (२० नोव्हेंबर १७४४) नानासाहेब व भाऊसाहेब व जनार्दनपंतसुध्दां स्वारीस निघाले. नानासाहेब हिंदुस्थानांत चालते झाले. भाऊसाहेब व जनार्दनपंत नाशिकाहून माहुलीस गेले. छ ५ मोहरम (२८ जानेवारी १७४५) बहिरवगड ऊर्फ खाप-या किल्ला घेतल्याची खबर आली. छ १८ मोहरम (१० फेब्रुवारी १७४५) भेलशास मोर्चे लाविले. छ २५ मोहरम (१७ फेब्रुवारी १७४५) गोपिकाबाई प्रसूत झाली. छ २५ मोहरम माघ वद्य ११/ १२ मंदवार ११ घटिका दिवसास माधवराव याचा जन्म मकरराशी होता. सफर महिन्यांत (मार्च १७४५) भेलशावर लढाई झाली. किल्ला घेतला. छ २९ सफर (२२ मार्च १७४५) वि॥ पिलाजी जाधवराव, भूपाळचा दोस्त महमद याचा नातू फैज महमद याशी तह होऊन निम्मे वांटणीचे पेशवे याजकडे महाल आले ते :- १ भेलसे, २ इच्छावर, ३ अष्टें, ४ सुजानपूर, ५ उदेपूर, ६ ताल, ७-११ जमोवार पंचमहाल, १२ शिकारखम, १३ ओडा, १४ वरशा, १५ उरया, ०॥० सिवणी निमे, असे साडेपंधरा महाल किल्ले वगैरेसुध्दां आले. दोस्त महमद यास फैज महमद व यसीत महमद व हियत महमद असे तिघे नातू होते. रबिलाखर महिन्यांत वैशाख शु॥ ४ बुधवारी (८ मे १७४५) बयाबाई भाऊसाहेब यांची कन्या इचें लग्न झालें. गंगाधर नाईक ओमकार यास दिली. छ २८ रबिलाखर (२० मे १७४५) भाऊसाहेब साता-यास गेले. छ १७ रबिलावल (९ एप्रिल १७४५) नानासाहेब यांनी भेलसे घेतल्याची खबर भाऊसाहेब यास आली. छ २८ रबिलावल रोजी (२० एप्रिल १७४५) नानासाहेब स्वारी करून परत आले. अंजनवेल उर्फ गोपाळगड शामळ जंजीरकर याजपासून माघ शु॥ २ भौमवारी (२३ जानेवारी १७४५) रात्रौ तुळाजी आंग्रे यांनीं घेतला. नंतर तुळाजी बिन कान्होजीराव यास सरखेलीची वस्त्रें दिली. रघोजी भोसले सालमजकूर अव्वल साली बरसातीकरितां व-हाडास जाऊन पर्जन्य समाप्त झाल्यावर आपला प्रधान भास्करपंतास व त्याचे बरोबरचे मानकरी वगैरे फौज वीस हजार देऊन बंगाल देशांत ओरिसा प्रांतांत पाठविलें. तेथें अल्लीवर्दीखान यानें कपटाशिवाय आपले कार्य साधावयाचें नाहीं हे जाणून तुचा आमचा तह आहे असें बोलून भास्करपंतास व त्याचे बरोबरचे मोठमोठे सरदार वीस असामी मेजवानीस बोलावून नेऊन एकाएकी मारेकरी घालून ते सर्व मारून टाकिले. बाकी राहिले लोक युध्द न करिता माघारे जाऊ लागले. त्यांतील कित्येक लोक निराळे सांपडले तेही गावकरी यांनी मारून टाकिले. यासमयीं कार्य सिध्दीस गेले नाहीं. सबब मराठे लोक आपला समय येण्याची वाट पाहात बसले. पुढें थोडे वेळानें अल्लीवर्दीखानाचे लष्करात अफगाण लोक होते ते कांही दगा करू लागले. त्यांचे बंदोबस्ताकरितां आपण फौज घेऊन जाऊन उरुष प्रांती हिंदू अधिकारी ठेविले. ही बातमी रघोजी भोसल्यास जासुदांनी कळवितांच त्यानें ओरिसा प्रांतीं स्वारी घालून, कित्येक परगणे घेऊन, बाकी मुलुखाची खंडणी तीस कोटी रुपये मांगू लागला. तेव्हां अल्लीवर्दीखानाने त्यास युक्तीनें भूलथाप देत देत कित्येक दिवस घालविले. नंतर अफगाण लोक स्वाधीन करून घेतल्यानंतर उलट्या गोष्टी सांगून अल्लीवर्दीखान युध्दास सिध्द झाला. पुढें युध्द होतां होतां मराठे लोकांचा मोड होऊन युध्द राहिले. कारण रघोजीस आपल्या मुलखांत जाण्याचे जरूर कारण लागलें, तें खाली लिहिलें आहे. देवगडचा गोंडवणांतील तक्ताधिपति मेल्यानंतर राजपुत्र भांडू लागले. ह्यांतील वलीशा ह्मणून होता त्यानें आपले दोघे भाऊ कैदेंत ठेविले होते. दुसरा चांदाचा राजा नीलकंठशाहा होता, त्यास आपण सामील होऊन मराठ्यांस चौथाई व सरदेशमुखी न द्यावी अशी हरकत घातली होती. त्याचा शेवट असा झाला की रघूजी भोसल्यानें त्या उभयतांचा मुलूख घेतला. तेव्हां वलीशानें दोघे भाऊ कैदेंत ठेविले होते, त्यापैकी एकास रतनपूर दिलें. याशिवाय खजिन्यांतून कांही पैसा देण्याचें कबूल केलें. तें आजपर्यंत कांही मिळत होतें. दुसरा भाऊ अकबरशा ह्मणून होता तो निजामच्या आश्रयानें कांही वर्षे होता. पुढें तो मयत झाला.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
सुरुसन्न अर्बा अर्बैन मया व अल्लफ, सन ११५३
फसली, अव्वल साल छ ११ रबिलाखर, २५
मे १७४३, ज्येष्ठ शुध्द १३ शके १६६५.
छ ३ जमादिलाखर (१४ जुलै १७४३) ब-हाणपूरकर सुभेदार नासरुद्दौला मयत झाला. छ १ रज्जब रोजीं (११ आगष्ट १७४३) नानासाहेब व भाऊसाहेब यांची स्वारी साता-यास गेली. बरोबर महादाजी अंबाजी पुरंधरे होते. छ २१ रज्जब (३१ आगष्ट १७४३) श्रीमंत मोरेश्वरास गेले. छ ४ साबान (३१ आगष्ट १७४४) खमस अर्बैन सालीं परत आले. नाना फडणीस यांचा जन्म झाला, आई रखमाबाई, चित्रा नक्षत्र, माघ वद्य १४, शुक्रवारी (११ फेब्रुवारी १७४३) वृध्दियोग, बवकरण, अकरा घटका रात्रीस. भाऊसाहेब गंगाथडीस जाऊन आले. भोसले व पेशवे यांचा तह महाराज यांचे विद्यमानें झाला. तो असा कीं, पेशवे आपला पूर्वीचा संपादित जो मोकासा व आपण मिळविलेली जहागिरी आणि पूर्वार्जित ज्या जहागिरी व कोंकण आणि माळवा यांचे अधिपत्य, याशिवाय अमदाबाद व आंग्रे अजमीर यांची खंडणी आणि पाटणा प्रांतांतील तीन तालुके व अर्काट परगण्यातील जमेपैकी वीस हजार रुपये याखेरीज रघोजीचे सत्तेतील कितीएक गांव हे सर्व पेशवे यांनी अनुभवावे, अशी राजानें सनद दिली व रघोजीस सनद दिली की, लखनौ व पाटणा व पैनबंगाला याचा वसूल खंडणी त्यानें घ्यावी व याखेरीज व-हाडपासून कटकपर्यंत खंडणी जमा करावयाचें काम रघोजी भोसले याने करावें. याप्रमाणें राजानें उभयतांस सनदा दिल्या. त्या वेळेस असें ठरलें की, दमाजी गायकवाड यानें माळव्यांतील खंड घेतल्याचा हिशेब पेशव्यांस दाखवून तो ऐवज त्यांचे हवाली करावा. असेंच दाभाडे याजकडेही राजाचे देणें होतें; परंतु त्यावेळेस ती चौकशी झाली नाही. मोमीनखान गुजराथचा सुभा मेला. त्या जागेवर अबदुल अजीमखान होता. त्यास गायकवाड याजकडील लोकांनी नाहीसे केले. पुढे फकीरउद्दौला सुभा झाला. यासाली बारामती महाल बाबूजी नाईक बारमातीकर यास शाहू महाराज यांनी दिला. इहिदे अशरीन मयातैन व अल्लफपर्यंत होता, पुढे जप्त झाला, बाजीराव याचे अमलांत. जनार्दनपंत यांचे लग्न वैशाख वद्य ५ रोजी (२० एप्रिल १७४४) झालें, रामाजी नाईक भिडे यांची कन्या, नांव सगुणाबाई. त्रिंगलवाडी किल्ला कर्णाजी शिंदे यांनी फत्ते केला हे वर्तमान आले. निजामउल्मुलूख याचे पुत्रानें बंड केलें ते मोडावयाकरितां दिल्लीहून निजाम औरंगाबादेस गेला. तेथें युध्द प्रसंग न पडतां पुत्र स्वाधीन करून घेतला. तेव्हां निजामानें विचार केला की, कृष्णेच्या दक्षिणेस मोंगलाईचे मुलुखी अव्यवस्था असून, शिवाय अर्काटचा नबाब सफदरअली यास त्याचा मेहुणा मोर्तीजाखान यानें मारलें. सबब यासमयीं आपलें आधिपत्य स्थापावयास ही संधि बरी आहे. ह्मणजे त्यानें हैदराबादेहून लष्कर जमा करून कर्नाटकांत चालला. तेथें कितीएक मुलूख घेऊन एक वर्षानंतर त्यानें मराठे लोक साता-यास फौज जमा करितात, ह्मणून त्यास शंका उत्पन्न होऊन तो माघारा फिरून हैदराबादेस चालला. तेसमयीं आपला हस्तक अनवरउद्दीन याजला कर्नाटकांतच घांटी ठेविला व आपला नातू हिदायत मोहीदीन उर्फ मुजफरजंग यास अदवानी परगणा देऊन त्यानें विजापुरास रहावें असें केलें; आणि हैदराबादेच्या वाटेने जात असतां आपल्यावर मराठ्यांची मसलत नाहीं असे समजून आपल्या राज्याचा बंदोबस्त करीत तेथेंच राहिला. तेव्हां निजाम दूर गेला असे पाहून मराठे यांचे मनांत आपला स्वार्थ साधावा असें आलें; परंतु रघोजी भोंसला यानें आपले सत्तेंतील बंगाल्यासंबंधी मुलूख गेला तो परत घेण्याचे योजिलें. यामुळें तो मराठ्यांचा बेत सिध्दीस गेला नाहीं. पेशवे यास दुसरी शंका उत्पन्न झाली कीं, आपण कबूल केल्याप्रमाणें रघोजी भोसले याचें निवारण झालें ह्मणजे बादशाहाचा दोष आपल्यावर येईल. याजकरितां दक्षिणेत कामें बहुत आहेत असे मिष करून उत्तरेकडे गेला नाहीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
आह्मी राणोजीसिंग, मल्हारजी होळकर, यशवंतराव पवार आणि पिलाजी जाधव स्वदस्तूर लिहून देतों की :- बाळाजीराव मुख्य प्रधान यांनी बादशाहाची नोकरी करणे कबूल केली आहे. त्यास जर तो यापुढें चाकरी करण्यास मागें पुढें पाहील तर आह्मी त्यास दोन गोष्टी सांगून तसें करूं देणार नाही आणि आह्मी सांगितले असतां जर बाळाजीराव चाकरी न करण्याचा हट्ट करील तर आह्मी सारे पंडितप्रधान याची चाकरी सोडूं. दाखल्याभावी हा दस्ताऐवज लिहून दिला असे. हा दस्ताऐवज सन १७४३ त छ ७ बिलावल (२१ एप्रिल १७४३) बादशाही कारकीर्दीच्या विसावे वर्षी ह्मणजे सन २४ जुलूस साली लिहून दिला. याप्रमाणें पेशव्यांची कबुलात झाल्यावर दिल्लीबादशाहा महमदशाहा यांनी आपले पुत्र अहमदशाहा याचे नावाच्या सनदा व परवाने शिरस्तेप्रमाणे छ २२ जमादिलावलचा (४ जुलै १७४३) व दुसरी सनद छ १८ रजबची (२८ आगस्ट १७४३) याप्रमाणें दोन पेशवे यास दिल्या, अर्बा अर्बैनात. बादशाहाकडून सनदा पदरी पडेतोपर्यंत या सालांत पेशवे यांनी हिंदुस्थानांत असतां व पुण्यास दादासाहेब वगैरे यांनी काय काय कामें केली ती खाली दाखविली आहेत. छ ८ रमजान (२६ अक्टोबर १७४२) महिन्यांत गढे मंडळावर लढाई झाली, व छ १ सवालरोजी (१८ नोव्हेंबर १७४२) गढे मंडळ फत्ते झालें. छ ९ सवाल उंडे-याचे (२६ नोव्हेंबर १७४३) अहीर यासी लढाई होऊन मोर्चे लाविले. छ २२ सवाल (९ डिसेंबर १७४२) झाशी घेतल्याची खबर आली. छ ३ जिलकाद (२० डिसेंबर १७४२) भाऊसाहेब व दादासाहेब जनार्दनपंतसुध्दां नाशिकास गंगास्नानास गेले. नानासाहेब हिंदुस्थानांत असतां छ ११ जिल्हेज रोजी (२७ जानेवारी १७४३) प्रयागास यात्रेकरितां आले. छ २४ जिल्हेज (९ फेब्रुवारी १७४३) रामपुरा काशी दक्षिणतीरास मुक्काम केला. तेव्हां श्रीमंतांच्या मनांत काशीक्षेत्र हस्तगत करावें ह्मणून आल्यावर स्वारीच्या ढाला काशीकडे फिरविल्या. त्यासमयीं काशींत सफदरजंग अधिकारी होता, त्यास ही गोष्ट कळली. तेव्हां त्यांनी घाबरून सर्व काशी क्षेत्रांतील नारायण दीक्षित पाटणकर आदि शिष्ट ब्राह्मण जमा करून आणून त्यांस सांगितलें की, तुमचे ब्राह्मण राजे यांनी काशी घ्यावयाचा बेत केला, याप्रमाणें ढाल उभी करून हिकडे येतात, त्यांस माघारे फिरवावें, नाहीतर तुह्मां सर्वांस मुसलमान करीन. अशी जरब देतांच सर्व ब्राह्मणांनी भिऊन त्यास सांगितलें की, आह्मी माघारें फिरवितों. असे बोलून दीक्षित आदिकरून चारशें ब्राह्मण उघडे बोडके काशीबाहेर श्रीमंत ज्या ठिकाणी उतरले होते त्या ठिकाणीं रात्रीस चार घटिका रात्र झाली त्यावेळेस पोहोंचले. ब्राह्मण समुदाय पाहून श्रीमंत डे-याबाहेर येऊन उभे राहून दीक्षित पाटणकर यांस पाहून बोलले कीं उघडे बोडके कां आला ? तेव्हां झालेला मजकूर श्रीमंतांस कळवून ब्राह्मण राखावयाचे असल्याचे आपण माघारें फिरावें हें चांगले आहे. हा मजकूर श्रीमंतांनी ऐकून इतक्या ब्राह्मणांस आह्मांकरिता दु:ख होतें तर आह्मांस या गोष्टीची जरूर नाही. तेव्हा ब्राह्मणांनी आपण माघारे फिरावें असे सांगितले. नंतर श्रीमंत बोलले की आह्मांस गंगास्नान करावयाचें आहे ते कसें घडेल ? हे ऐकून दीक्षित बोलले, आमचे मेळ्यांत आपण चलावें, आपल्यास स्नान घालून परत पाठवितों. त्यावरून श्रीमंत एकटेच त्या ब्राह्मणांबरोबर काशीत जाऊन स्नान करून माघारे उलटले. हा मजकूर सफदरजंग यानें ऐकिल्यावर त्याचा सन्मान झाला नाहीं ही आमची चूक झाली असें बोलले. श्रीमंत काशीहून गयेस चालते झाले. छ १० मोहरमी (२४ फेब्रुवारी १७४३) गयेस जाऊन गयावर्जन केले. त्यावेळेस बरोबर पिलाजी जाधवराव, महादजी अंबाजी पुरंदरे, बाजी भिवराव चावेरीकर व रघोजी भोसले होते. छ १४ सफर रोजीं (३० मार्च १७४३) मुस्ताफाखान याची भेट झाली व छ १५ सफरी (३१ मार्च १७४३) सौराज्य प्रांतांत मक्षुकाबादेस मुक्काम झाला तेथें अलाबकस याची भेट झाली. छ २३ सफर (८ एप्रिल १७४३) मौजे पलटी यापैकी मनोर येथें अलीवर्द्दीखान भेटीस आले होते. छ २९ रबिलावल (१३ मे १७४३) अखेरसाल साता-यास जाऊन छ १८ जमादिलावल (३० जून १७४३) अर्बा अर्बैन सालीं परत आले. महाराजांची प्रकृति बिघडली होती, सबब खुद्द पेशवे यावेळेस पुण्यास नव्हते. भाऊसाहेब गेले असावे. संभाजी आंग्रे मयत झाले.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
नंतर रघोजी भोसल्याने पेशवे याकडे वकील पाठवून बोलणे कळविलें की, तुह्मी राज्यरीतीप्रमाणें जी वर्तणूक करितां ती फार उपयोगी आहे असें आता मला कळतें. अशी मनाची निर्मळता दाखविल्यावर पेशवे यांनीही बंगालप्रांत रघोजीकडे ठेवणे बरोबर आहे, असें मनांत आणून रघोजीशी सल्ला करून भेटून त्यास आपलेबरोबर मोंगलाईकडे नेले होते. पुढे देशीं अर्बा अर्बैन साली आल्यावर महाराज सातारकर यांचे विद्यमानें तह ठरला. याचा प्रकार खाली लिहिला आहे. रघोजीचा बंगाल्यांतून पराभव केल्यावर बादशहानें आपल्यास माळव्याचा अधिकार देऊ केला होता तो कायम करण्याकरितां माळव्यांत पेशवे आले. तेव्हां महमदशहा बादशहा यानें विचार केला कीं, येवढा मुलूख दिला ह्मणजे आपली मानहानी होईल. यास्तव लोकांत प्रसिध्द होण्याकरितां आपला मुलगा अहमदशहा आहे, याचे नावे सनद करून वहिवाट पेशव्यास सांगावी असें ठरविले. नंतर माळवा प्रांत देऊन पेशवे यांनी कोणत्या रीतीनें बादशाहाशी वागावें असेविषयी कबुलायत पेशवे याजकडून घेतल्याचे मालकम साहेबाचे बुकांत हकीकत आहे, त्यावरून खाली लिहिल्याप्रमाणे उतारा घेतला आहे. बादशहानी कृपावंत होऊन नोकर बाळाजीराव व चिमणाजीराव यांस माळवे सुभ्याचे काम सांगितले. त्यास आह्मी बाळाजीराव व चिमाजीराव खाली लिहिल्याप्रमाणे नोकरी बजाविण्यास तयार आहों. बादशहाचे हुजूरास आह्मांस पदवी प्राप्त होऊन आमची इभ्रत वाढावी असा आमचा अर्ज आहे. आह्मी लिहून देतो की, माळवा सोडून जाऊन दुस-या देशावर स्वारी करणार नाही व लुटालूट करून देश उद्ध्वस्त करणार नाही. कोणी मराठे सरदार नर्मदेच्या पलीकडे हिंदुस्थानातील सुभ्यांत जाणार नाहीं. याची जबाबदारी आह्मी आपले माथ्यावर घेतों. कोणी तरी लायक मराठी सरदार पांचशे स्वारांनिशी बादशहाच्या हुजुरास चाकरीस हमेशा राहील. या सालीं जो ऐवज आह्मास बादशहानी इनाम दिला तो आह्मी ग्रहण करितों; परंतु पुढे आह्मी बादशाही दरबारांतून छदाम मागणार नाही. बादशाही दरबार पृथ्वीचा मध्य आहे. आह्मी आपल्या कामांत बादशहाचे सेवेंत हमेशा तत्पर राहूं. जेव्हा जेव्हां सरकारचें गाजी सैन्य बाहेर निघेल तेव्हा तेव्हा चार हजार स्वारांची टोळी त्या लष्कराबरोबर आह्मी पाठवून देऊ; परंतु जर जास्ती लोकांचे जरूर असेल तर हुजूराहून त्याचा खर्च मिळावा. चमला नदीचे पलीकडील जमीनदारांपासून ठरलेल्या पेशकश खेरीज एक छदाम आह्मीं जास्ती घेणार नाहीं. चमला नदीच्या पलीकडील मुलुखांत कोणा एखाद्या लहानसहान जमीनदाराचें शासन केल्यास हुजूर फर्मावतील तर आह्मी चार हजार स्वार तिकडे पाठवूं. हे लष्कर तें काम तडीस नेण्यास हरप्रकारया नेतील. किल्लेदार लोकांच्या जहागिरी, कोट, गांव, मुत्फीक यांचे हक्क, इनाम व जमिनी व पेशकश व धर्मादाय वगैरे हुजूरच्या देणग्यामध्यें आह्मी व्यत्यय आणणार नाहीं. ज्या ज्यास त्या दिल्या आहेत त्यांनी त्यांनी उपभोगून बादशहाशी हमेशा बढती व्हावी या हेतूनें दुवा देत असावें, ह्मणून त्या आह्मी चालवू. येणेंप्रमाणें पेशवे यांनी बादशहाशी कबुलात लिहून देऊन पुढे पेशवे यांच्या स्वा-यापासून कांही एक उपसर्ग होणार नाही अशी खातर तसली करण्यासाठी मराठ्या सरदारांनी खाली लिहिल्याप्रमाणें कबुलात महमदशाहा बादशाहास लिहून दिली.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
सु॥ सल्लास अर्बैन मया व अल्लफ, सन ११५२ फसली,
अव्वल साल छ १ रबिलाखर, २५ मे १७४२,
ज्येष्ठ शुध्द ३ शके १६६४.
छ ४ रबिलाखर (२८ मे १७४३) काशीबाई बाजीराव पेशवे याची बायको रामेश्वरयात्रा करून आली. छ ३० जमादिलावल (२२ जुलै १७४२) गोपिकाबाई, नानासाहेब याची स्त्री, प्रसूत होऊन मुलगा झाला, नांव विश्वासराव. पुत्र झाल्याची खबर नानासाहेब यांस स्वारीत कळली. बरसात खलास होताच माझे साह्यास यावें अशी विनंति अल्लीवर्दीखान याने बादशहास व पेशवे यांस पाठविली ह्मणजे पत्रें पाठविलीं. परंतु त्या अल्लीवर्दीखानानें ती कुमक येण्याचे अगोदर बरसातीतच आपले मुलुखातील आज्ञेत वागणारे शिपाई लोक जमा करून खटाव्यास भास्करपंतावर चालून जाण्याची तयारी केली. तेव्हा हुगळीची नदी व आजी नदीस पाणी फार असतां होडयांचे पूल बांधून पलीकडे जात असतां होडीचा पूल तुटून हजार पंधराशे माणसे वाहून गेली. तशीच निकड करून रात्रीसच एकाएकी भास्करपंताचे लष्करावर जाऊन अशी गर्दी केली की मराठे लोक लढाई न करितां पळून गेले. नंतर जाधवराव आल्याची खबर कळतांच पुन: मराठे लोक मिदीना परगण्यांत शिरले. परंतु अल्लीवर्दीखान पाठीशी लागला. तेव्हां ते युध्द न करितां आपले स्वस्थळास परत गेले. ते लोक ठिकाणी येण्याचे अगोदर रघोजी भोसला फौजेसहित कर्नाटकांतून वऱ्हाडास पोहोंचला होता. त्यावर भास्करपंताचे मदतीकरितां ज्या वाटेनें भास्करपंत बंगाल्यास गेला त्याच वाटेने जाऊ लागला. हें वर्तमान दिल्लीत बादशहास कळतांच अयोध्येचा नवाब सफदरजंग यास मराठे लोक आपले मर्यादेबाहेर जाऊं देऊ नयेत अशी आज्ञा केली. याशिवाय या कामास मदतीकरितां पेशवे अनुकूल होण्याकरितां त्यास लिहून पाठविलें की, अल्लीवर्दीखानाकडे अजिमबादच्या खंडाबद्दल पैसा येणें त्याबद्दल चौथाई तुह्मांस देऊ व माळवें प्रांताची सनदही देऊं असे पत्र पाठविलें. या आशेनें बाळाजी बाजीराव माळवे प्रांती होते त्यांनी हें पत्र पाहतांच माळवा सोडून मोरशदाबादेस येऊन पोहोंचलें. नंतर अल्लीवर्दीखानास आपल्यास बादशहानें दिलेले पैशाबद्दल तगादा लाविला. तेव्हां त्याने हिशेब करून पैसा देतों असें कबूल केलें. ही पेशवे याची कुमक आल्याची खबर रघोजी भोसले यास कळतांच तो डोंगरांत पळू लागला. त्याचे मागें अल्लीवर्दीखान लागला. परंतु या लोकांचे हाती भोसला लागणार नाही अशी अटकळ करून बाळाजी बाजीराव पेशवे यानी लष्करासह दुसऱ्या आडमार्गाने अल्लीवर्दीखानाचें लष्कर येण्यापूर्वीच रघोजी भोसल्याचा पाठलाग करून साबान महिन्यांत (अक्टोबर १७४२) पहिली लढाई कसबा जावळ येथे झाली. नंतर छ ३० साबान रोजी (१९ अक्टोबर १७४२) भंडाले परगणा खटाव येथें जी लढाई झाली, त्यांत त्या रघोजीचा अगदी मोड केला.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
रविलावल अखेरसाल या महिन्यांत (मे १७४१) ढवळपूरचे मळीस मुक्काम असतां, सवाई जयसिंग माळवे प्रांतांचा सुभेदार त्याची भेट नानासाहेब यांणी माळवा मिळण्याकरितां घेऊन बोलणें होऊन अखेर ज्येष्ठ शुध्द १४ ह्मणजे छ १२ रबिलाखर रोजी संवत् १७९७ इसवी सन १७४१ रोजी (१८ मे १७४१) उभयतांमध्ये तहाचे बोलणे ठरलें. तें असें की :- पहिलें कलम :- परचक्र चढ करून आलें असतां अगर परचक्रावर चढ करून जाणें झाल्यास जयसिंगांनी व मराठे यांनी एकमेकांची मदत ठेवावी. दुसरें कलम विचित्र आहे. बादशाहाशी बेइमान होण्याचा प्रसंग येईल अशी कल्पना मनांत घेऊन हें कलम लिहिले आहे कीं, हा प्रसंग मी येऊं देणार नाहीं, कदाचित् आल्यास मी जयसिंग पेशवे याचे पाठीशीं असेन. कलम ३ व ४ मोघम आहेत. पांचव्या कलमांत जयसिंग वचन देतो कीं, चमेला नदीच्या उत्तरेकडील ज्या रजपूत सरदारांविषयी बाळाजीनें शिफारस केली आहे, त्यांच्या हितावर मी दृष्टि देईन, जरासें बादशाहाच्या ताबेदारीत फरक करणार नाहीं, तर व खंड देतील तर त्यांच्या जमिनी त्यांजकडे चालवीन. शेवटील कलम सर्वांत महत्त्वाचें आहे कीं, सुभे माळव्याचे वजरीची सनद व त्याबद्दल रिवाजाप्रमाणें खिलत शाहूकडे पाठविण्याविषयी व चंबळा नदीचे उत्तरेकडील राज्यावर बसविलेला खंड घेण्यास परवानगी देण्यास सहा महिन्यांच्या आंत मी बादशाहाचा हुकूम आणितों. याप्रमाणें तह सन १७४१ इसवींत ठरून दुसरे वर्षी जयसिंग मयत झाला. शिंदे होळकर यांनी ग्वाल्हेरीस येऊन छावणीस राहून छ ४ जमादिलावल (७ जुलै १७४१) इसन्ने अर्बैन साली पुण्यात आले. बाबूजी नाईक यास पेशवेपद मिळालें नाही तेव्हां त्याचा कर्जाऊ पैसा पेशवे याजकडे येणें होता तो येण्याविषयी तो फार तगादा करूं लागला. यामुळें पेशवे यास बहुत संकट प्राप्त झालें. तेव्हां महादजी अंबाजी पुरंदरे पेशवे यांचे दिवाण यांनी त्या संकटांतून पेशवे यांची मुक्तता केली. यामुळे त्या दिवाणावर अत्यंत प्रीति करू लागले. रघूजी भोसले यानें चालविलेली खटपट व्यर्थ गेली. सबब तो बाबूजी नाईक यास बरोबर घेऊन कर्नाटकांत प्रतिनिधि श्रीमंत राव व फत्तेसिंग भोसले यांसुध्दां जाऊन सन्न १७४१ चे मार्च महिन्यांत त्रिचनापल्ली मराठ्याच्या हातीं लागली, व चंदासाहेब तेथील धनी कैद करून साताऱ्यास पाठविला आणि मुरारराव घोरपडे यास ठेवून दरसाल वीस हजार रुपये पेशवे यास देत जावे असें ठरलें. बाळाजी बाजीराव पेशवे यांनी शाहू महाराजांस आपली गरिबी दाखवून, फिरंगी लोकांकडील साष्टी, वसई वगैरे मुलूख सर केला त्याची सनद करून घेतली, व गुजराथ खरेदी करून नर्मदेच्या उत्तरेकडील मुलुखांतील खंडणी जी द्यावयाची त्याचाही वसूल पेशवे यांनीच करावा अशी सनद महाराजांकडून घेतली. बंगालचा नबाब सुजायतखान यानें आपला हस्तक लाहोर सुभ्यावर अल्लीवर्दीखान ठेविला. तो सुजायत मयत झाल्यावर त्याचा पुत्र तक्ताधिपति झाला; परंतु त्याची व याची लढाई होऊन तो तक्ताधिपति मरण पावला, सबब अल्लीवर्दीखान यास तें आधिपत्य प्राप्त झालें. त्यावेळेस उरसा सुभ्यामध्ये पहिले नबाबाचा हस्तक मुशरद कूली ह्मणून होता, त्याचा दिवाण मीर हबीब याशी अल्लीवर्दीखानानें युध्द करून त्यास सुभ्याचे पार घालविले. पुढें तो कांही दिवस गेल्यानंतर त्या अल्लीवर्दीखानाकडे चाकरीस राहिला. तो बंगाल्यात मराठे लोकांची सत्ता होण्याच्या कामी पुढे उपयोगी पडला. मुशरद कूलीखान यास अल्लीवर्दीखान यानें मुलुखांतून पार केल्यावर मीर हबीबाचा व व-हाडांत रघूजी भोसले याचा हस्तक भास्करपंत यास कटक सुभा सुटणेविषयी मसलत करून सल्ला दिला. तेव्हां भास्करपंतानें आपला धनी कर्नाटकांत होता त्याची येण्याची वाट पाहिली. इतक्यांत अल्लीवर्दीखान लष्करसुध्दां येऊन सुभा घेतला. त्यास मीर हबीबही जाऊन मिळाला. नंतर कांहीं निमित्त करून भास्करपंत बंगाल्यांत जाण्यास निघाला. बाळाजी बाजीराव पेशवे हिंदुस्थान प्रांत आपले सत्तेत आणण्याची वाट पाहात होता. त्यांनी हिंदुस्थान प्रांतातील गढा व मंडळा किल्ला हस्तगत केला. पुढें बरसात नजीक आली. सबब नर्मदा तीरीं छावणीस शिंदे होळकर यांस ठेवून आपण स्वत: परत निघाला. तो छ ४ जमादिलावल (७ जुलै १७४१) इसने अर्बैन साली पुण्यांत दाखल झाला. रामचंद्र हरी पटवर्धन यांची स्वारी इस्तकबिल छ २८ सवाल (६ जानेवारी १७४१) इहिदे अर्बैन तागायत छ २३ रबिलाखर (२६ जून १७४१) इसने अर्बैन.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
सु॥ इहिदे अर्बेन मया व अल्लफ, सन्न ११५० फसली,
अव्वल साल छ ९ रविलावल, २४ में १७४०,
ज्येष्ठ शुध्द १० शके १६६२.
वीरगड फत्ते झाल्याचें वर्तमान आलें त्याप्रमाणें नवस केलेला छ ८ रविलावल रोजीं (२३ मे १७४०) फेडला. छ २० रविलावल रोजी (४ जून १७४०) निघून सातारा, वाई वगैरे करून छ २ जमादिलाखर रोजी (१४ आगष्ट १७४०) परत आले. वस्त्रें आणण्याकरितां स्वारी गेली होतीं. छ ११ रविलाखर आशाढ शु॥ १२ बुधवार रोजी (२५ जून १७४०) सातारे मुक्कामीं दहा घटका दिवसास बाळाजी बाजीराव यास पेशवाईची वस्त्रें झाली. बरोबर चिमणाजी अप्पाही होते. छ २७ जमादिलाखर रोजी (८ सप्टेंबर १७४०) पेशवे व फिरंगी गोवेकर यांचे दरम्यान तह झाला. त्यांत वसई प्रांत पेशवे यास दिला. त्यांत पुन: फिरंगी यांनी उपद्रव करूं नये. छ २४ रविलाखर (८ जुलै १७४०) दिपाजी जाधवराव पुण्यास परत आले. कार्तिक शु॥ ३ छ १ साबान (१२ अक्टोबर १७४०) भांबवडें येथे स्वारी गेली. पुढें जाणार इतक्यांत चिमाजी अप्पांची प्रकृति बिघडली. सबब छ २० साबान (३१ अक्टोबर १७४०) परत आले. छ १४ रमजान (२३ नोव्हेंबर १७४०) नानासाहेब स्वारीस निघाले, मुक्काम कोरेगांव. हिंदुस्थानचे स्वारीस गेले. छ १७ रमजान (२६ नोव्हेंबर १७४०) बहिरजी बलकवडे यांजकडून कुरंगगड व तुरूप किल्ले घेतल्याचें वर्तान आलें. छ ३ सवाल (१२ डिसेंबर १७४०) रेवदंडा फत्ते झाल्याचें वर्तान खंडोजी माणकर यांजकडून आलें. छ ८ सवाल रोजीं (१७ डिसेंबर १७४०) चिमाजीअप्पा कैलासवासी झाले. अन्नपूर्णाबाई सती गेली, पौष शु ॥ १० सह ११ बुधवार (१७ डिसेंबर १७४०) पहिली रखमाबाई अगोदरच मयत झाली होती. छ २७ सवाल (५ जानेवारी १७४१) मल्हारजी होळकर याजकडून किल्ले धार फत्ते झाल्याचे वर्तमान आलें. छ २९ सवाल (७ जानेवारी १७४१) मुक्काम बेदे परगणें यदलाबाद नबाब निजाम उल्मुलूक यांची भेट झाली. पूर्वी पेशवे यांजकडून पिलाजी जाधवराव गेले होते. त्यावेळेस पेशवे यांनी माळवे प्रांताबद्दल मागणें केलें व त्याची उत्तरें निजाम उन्मुलूक यांनी दिली ती येणेंप्रमाणें :- (१) प्रथम कलमांत हा अर्ज आहे कीं, बादशहानीं बाळाजी बाजीराव यास माळवे सुभ्याचें काम सांगावें आणि त्या सर्व प्रांताची जहागीर द्यावी. याजवर निजाम उल्मुलूख याचा जबाब असा झाला कीं, सुभेदार तर आह्मी खुद्द आहोत, जर हुकुमाची तामिली करीत जाऊं अशी पेशवे यांची इच्छा असेल तर नायबीच्या सनदा त्यास दिल्या जातील. दुसरे कलमांत अर्ज आहे की, बादशहानी पेशवे यास मदतखर्चास पन्नास लक्ष रुपये देण्याचें कबूल केलें ते द्यावे. त्याजवर जबाब आहे कीं, ही रकम बादशहाकडून घेऊन तुह्मांस देण्याविषयीं प्रयत्न केला जाईल. हा बोलण्याचा प्रकार, नादिरशाहा हिंदुस्थानांतून परत गेल्यावर जेव्हां निजामउल्मुलूक दक्षिणेत आपल्या मुलानें पुंडावा माजविला होता त्याच्या शासनास जातांना माळव्यांत आला तेव्हां झाला असें दिसतें. छ २० जिलकाद (२७ जानेवारी १७४१) त्र्यंबक हरी सुभेदार याजकडून पुन: बांडे फत्ते झाल्याचें वर्तमान आलें, परगणे नेमाडपैकी. जिल्हेज महिन्यांत (फेब्रुवारी १७४१) देवरीवर लढाई होऊन छ १ मोहरम रोजी (८ मार्च १७४१) ठाणें फत्ते होऊन आवजी कवडे यांचे स्वाधीन केले. छ २५ सफर (३० एप्रिल १७४१) भाऊसाहेब रघुनाथपंत व जनार्दनपंतसुध्दां साताऱ्यास जाऊन छ ३ रविलावल रोजी (८ मे १७४१) पुण्यास परत आले.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
सु॥ इसन्ने अर्बैन मया व अलफ, सन ११५१ अव्वल
साल छ २० रविलावल, २५ जून १७४१, ज्येष्ठ
वद्य ६ शके १६६३.
छ १२ रविलावल (१७ मे १७४१) भाऊसाहेब व नानासाहेब साता-यास जाण्याकरितां निघून साता-यास जाऊन छ २१ रजबीं (२१ सप्टेंबर १७४१) पुण्यास परत आले. छ २० सव्वाल रोजीं (१८ डिसेंबर १७४१) भाऊसाहेबासुध्दां हिंदुस्थानचे स्वारीस निघाले ते छ १६ जिलकाद (१३ जानेवारी १७४२) देवठाण्यापैकी पाटोदे येथेपर्यंत जाऊन त्या मुक्कामाहून भाऊसाहेब परत पुण्यास आले, नानासाहेब पुढें हिंदुस्थानात गेले, ते दोन वर्षे तिकडे राहून अर्बा अर्बैनांत माळव्याची सनद घेऊन छ १९ जमादिलाखरास (२९ आगष्ट १७४३) परत आले. सव्वाल महिन्यांत (डिसेंबर १७४१) नासरुद्दोला ब-हाणपूरचा यांची भेट झाली होती. छ ३० जिल्हेज (२५ फेब्रुवारी १७४२) दादासाहेब यांचे लग्न झालें, गणेशभट कर्वे याची कन्या. जिवाजी खंडेराव चिटणीस पौष वद्य ७ रोजी (२ जानेवारी १७४२) वारले. यास बंधू बापू, गोविंदराव व बहिरराव असे होते व पुत्र रामराव व देवराव व जिवाजी असे असून, रामराव सात वर्षांचे परंतु चिटणीशी त्यास सांगितली. बापूजी खंडेराव यास सरदारी सांगितली. हिंदुस्थानांत पेशवे गेल्यावर अलहाबादेस स्वारी करावी असा पेशवे यांचा बेत होता. परंतु भोसले यांचे मनांत पूर्वेकडे बंगाल प्रांताचा लाभ आपल्यासच मिळावा, तिकडे पेशवे याचा प्रवेश होऊं नये. अशी तजवीज करण्यास भोसले यांनी दमाजी गायकवाड व बाबूराव बारामतीकर यांस माळवे प्रांतांत पाठवून त्यास लुटावयास सांगितलें. तेव्हां पेशवे यांनीं अलहाबादेकडे जाण्याचें टाकून माळव्याकडे बंदोबस्ताकरितां गेले. इकडे भास्करपंत बंगाल्याकडे जात असतां बहारपरगणा येथें त्यांनीं स्वारी घातली. त्यावेळेस अल्लीवर्दीखान याच्या पुतण्याचा पुत्र कटाप्रांतीं बंडे करीत होता. त्यास तें बंड मोडण्याकरितां अल्लीवर्दीखान बहाराहून जाऊन बंड मोडून तो मुरशिदाबादेकडे जात असतां, मराठे बहारांत शिरले अशी बातमी आल्यावरून त्याचे पारिपत्याकरितां आला. तेसमयीं मराठी लष्कर सुमारें बारा हजार होतें. परंतु आवई पन्नास हजारांची झाली. अल्लीवर्दीखान ह्याजपाशींही तीन साडेतीन हजार स्वार व चार हजार पायदळ होतें. परंतु त्याच्या लष्कराभोवतीं मराठ्यांनी वेढा घालून त्याचें सामान लुटलें, त्यामुळें त्याचे कित्येक लोक पळाले, व काही मारले गेले. बाकी राहिलेले लोक अजमासें तीन हजार होते. तेव्हा अल्लीवर्दीखानानें मरावें किंवा मारावें असा निश्चय करून युध्द करीत खटावापर्यंत आला. त्या युध्दांत अल्लीवर्दीखान याचे लष्करांत मीरहबीब होता. तो पहिले दिवशींच मराठे यांनी धरिला. नंतर त्यानें मराठयांचा पक्ष स्वीकारून भास्करपंताचा तो परम विश्वासू झाला. यानें तो मुरशिदाबादेस आपला भाऊ कैदेंत होता त्यास सोडवून त्या शहरी राहणार जगतशेट सावकार याचें घर लुटून पंचवीस लक्ष रुपये घेऊन भास्करपंतास मिळाला. त्यास द्रव्याचा लोभ दाखवून बंगाल्यांत ठेवून घेतले. तेव्हां त्याचे मसलतीप्रमाणें भास्करपंत माघारा फिरून हुगळी शहर हस्तगत केलें व खटावापासून मिदिनापूरपर्यंत बहुतेक मुलूख त्याचे हाती लागला. त्यावेळेस हुगळीचे नदीस पाणी फार असल्यामुळें पुढें जाऊन मुरशिदाबाद घेणें राहिलें. दिल्लीहून बादशाहाकडील कारभारी बंगाल्याची खंडणी मागावयास आला. ते अल्लीवर्दीखानानें त्यास उत्तर केले कीं, मराठ्याचे उपद्रवामुळें मला यावेळेस अनुकूल नाहीं, तरी स्वामीनीं माझे साहाय्यास लष्कर पाठवून माझें रक्षण करावें. असें त्याशीं बोलून व-हाडप्रांती भोसल्याचा मुलूख लुटण्यास पेशवे यास सूचना केली. हें वर्तान बरसात सुरू होण्याचे अगोदरपर्यंत झालें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
छ १८ सफर (४ मे १७४०) मीरगड घेतल्याची खबर आली. बाजीरावसाहेब रमजान महिन्यांत (डिसेंबर १७३९) स्वारीस निघाले याचें कारण, निजामाचे बोलण्याप्रों माळव्याची सनद मिळाली नाहीं. त्यावरून निजाम हा घातकी आहे. यास्तव त्याची दक्षिणेतील सत्ता नाहिशी करावी असे मनांत आणून औरंगाबादेस सवाल महिन्यांत (जानेवारी १७४०) गेले. तेथें निजामाचा पुत्र नासिरजंग हा दहा हजार फौजेसुध्दां होता. त्याजवर जाऊन सभोंवता फौजेकडून गराडा घातला. परंतु इतक्यात त्याच्या कुमकेस मोठे सैन्य आल्यामुळे तो हातचा सुटून अहमदनगरचे वाटेने मुलूख लुटीत चालला. इतक्यांत चिमाजीअप्पाकडून ते व त्याचें लष्कर येऊन पोहोंचताच त्यास पुढें न जाऊं देतां माघारा परतविला. नंतर कांही दिवस युध्द होत होतें; परंतु कोणा एकासही लाभ झाला नाहीं. सबब तह छ १० जिल्हेज रोजी (२७ फेब्रुवारी १७४०) झाला की इत:पर कोणी रयतेस उपद्रव करू नये. मोंगलांनी नर्मदेच्या काठी पेशवे यांस जहागीर द्यावी. असा तह झाल्यानंतर बाजीरावसाहेब पुण्याकडे परत न येतां हिंदुस्थानात जात असतां वर लिहिल्याप्रमाणे मयत झाले. बाजीरावसाहेब मयत झाल्यावर निजामुन्मुलूक कितेक दिवस दिल्लीस होता. पुढें बादशहानें त्याचे नावांस अमीरून उमराव असे पद जोडले. त्यास वर्तमान कळलें की, आपला पुत्र नासिरजंग दक्षिणेंत आहे. तो माझी सत्ता नाहिशी करून आपण कारभार करणार. हें बंड मोडण्याकरितां निजाम दक्षिणेंत निघतेसमयी बादशहास विनंति केली की, मला जे पद दिल्हें ते माझा वडील पुत्र ग्यासुदिन यास असावें. रघूजी भोसले व पेशवे यांचे दरम्यान कलह उत्पन्न झाला होता. परंतु नादरशा अफगाणचा बादशहा दिल्लीत आला होता. या गडबडीमुळें तें प्रकरण तसेंच राहिले होते. पुढे त्याची आपसांत समजूत होऊन पुढें कर्नाटकात रघूजी भोसले व प्रतिनिधि व फत्तेसिंग भोसले वगैरे सरदार गेले. त्यांत मुरारजी घोरपडाही आला होता. तो पूर्वीचें सेनापतिपद मागत होता. परंतु ते न देतां कांही पे॥ तुंगभद्रेचे कांठी देऊन वश केला होता. असें एकंदर लष्कर दोस्त अल्लीनबाब याजवर जाऊन त्यास ठार मारला. पुढे दोस्तअल्लीचा पुत्र सफदरअल्ली याणें मराठे यांस कांही द्रव्य देऊन माघारें फिरावें असे केलें. त्या वेळेस त्या सफदरअल्लीचें व भोसले यांचे बोलणें झालें की, त्रिचनापल्लीचा अधिकारी चंदासाहेब यास मराठ्यांनी हाकून द्यावा. त्या करारप्रें॥ मराठे सफदरअल्लीचा मुलूख सोडून माघारें सव्वाशे कोस जाऊन शिवगंगेचे काठी उतरले. त्याचा मनसोबा असा होता की, आपण येथें राहून चंदासाहेब असावध असतां एकदम त्याजवर जाऊन त्यास जिंकू. इतक्यांत रघूजी भोसला तेथून निघून साता-यास आला. आणि बाळाजी बाजीराव यांस पेशवाईची वस्त्रें न देता बाबूजी नाईक बारामतीकर यास पेशवा करावा, असा राजाजवळ उद्योग करूं लागला. आणि शाहू महाराज यांस समजविलें की, बाबूजी नाईक मोठा सावकार आहे; तो पुष्कळ द्रव्य देईल, अशी बहुत खटपट केली. तत्राप ती शेवटास गेली नाही. पुढचे वर्षी ह्मणजे इहिदे अर्बैन सालांत बाळाजी बाजीराव यांस पेशवाईची वस्त्रें र॥ खर महिन्यांत प्राप्त झाली. विरूबाई दाशी कन्हेरखेडकर शिंद्याकडून दिल्लीस शाहू महाराजाचे लग्नसमयी आंदण आली होती, तिजवर महाराजांची बहुत मर्जी होती. ती वर लिहिल्याशिवाय दोघी बायका यावेळेस होत्या. वडील सकुवरबाई व दुसरी सगुणाबाई. येसाजी व कुसाजी भोसले शिराळकर सरकारचे लेकावळे होते. त्यांस शिरोळ सुभा महाराजांनी दिल्हा. तहनामा होऊन नोड प्रांत पेशवे यांस मिळाला.