Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
बाजीराव याचा निरोप त्यास आला कीं आह्मांस गुजराथची चौथ व सरदेशमुखी द्याल तर माझा भाऊ तुमचे मुलखाचा बंदोबस्त करील. त्यावरून सरबुलंदखानानें तें बोलणें मान्य केलें. मग त्यानें सुरत खेरीजकरून बाकी मुलखाची जकातसुध्दां चौथ व सरदेशमुखीं दिल्ही. अमदाबाद शहर सबंध कांही दिल्हे व कांही न दिले असें केलें. या अमलाबद्दल २५०० अडीच हजार स्वार ठेऊन मुलखाचा बंदोबस्त पेशवे यांनीं ठेवावा असें कबूल केलें. शाहूमहाराज एके दिवशीं शिकारीस गेले असतां उदाजी चव्हाण याजकडील मारेकरी भेटले. त्यांच्यानें मारवेना. महाराजांनी त्यांस सोडलें. परंतु हें कृत्य चव्हाणाचें, सबब त्याजवर प्रतिनिधीस पाठविलें. तेव्हा चव्हाणाचा पक्ष संभाजीनें धरिला. तेवेळेस प्रतिनिधींनीं पूर्वी निजामुन्मुलूक याशीं मसलत केल्यामुळें शाहूमहाराजाचें मनांतून तो उतरला होता. त्यास असें वाटलें कीं, यासमयी संभाजीचा पराभव आपण केला तर आपली योग्यता वाढेल. ह्मणून त्यानें फौजसुध्दा एकदम संभाजीच्या तळावर येऊन संभाजीस व उदाजी चव्हाण यास पन्हाळ्याकडे पिटऊन लाविलें. तेव्हां संभाजीचीं बायकामाणसें सांपडली ती धरून साता-यास आणिली. त्यांत ताराबाई व तिची सून राजसबाई सांपडली. ताराबाई बोलली की, तुह्मीं व ते सर्व एकच आहा. मला कोठें तरी कैदेतच राहणें आहे. त्यापक्षी मी येथेंच राहतें. असें भाषण झाल्यावर सातार किल्ल्यावरील वाडा नीट करून खर्चाचा बंदोबस्त करून व लवाजिमासुध्दां व्यवस्था लावून यादो गोपाळ कारभारी नेमून ताराबाईस व राजसबाईस किल्ल्यावर ठेविलें व बाकीचीं माणसें परत ठिकाणी पावतीं केली. हें वर्तमान शके १६५१ साली झालें. आनंदराव महादेव खासनीस याजकडून अपराध झाला, सबब त्याचे सावत्र बंधू यशवंत महादेव यास खासनिशी व पोतनिशी सांगून इनाम सरंजाम वगैरेविषयीं सनदापत्रें दिली. उदाजी चव्हाण बंड करून चव्हाणचौथाई अशी बाब गांवगन्ना घेत होता. जबरीनें त्याजवर यशवंत महादेव यास पाठवून त्याचें पारपत्य केलें. सेखोजी आंग्रे वारले शके १६५१ सालीं, सबब संभाजीस सरखेल पदाची वस्त्रें झाली शके १६५२. सबब संभाजीनें येसाजीस विजयदुर्ग सुवर्णदुर्ग सुभा सांगून पे॥ सरदारी मानाजीस सांगितली. त्याचें बनेना. तो फिरंग्याकडे गेला. त्यानें तुळाजीस दिवाणगिरी देऊन कुलाब्यास आलें. छ २९ जमादिलाखर माघ शु॥ १ सलासीन सालीं (८ जानेवारी १७३०) त्र्यंबकराव दाभाडे यास पदाची वस्त्रें झाली.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
खंड ४ था.
श्री.
नारायणव्यवहारशिक्षोपक्रम.
श्रीगणेशायनम: । श्रीगोपालकृष्णायनम: । श्रीगुरुभ्योनम: ।
वर्णाश्रमधर्माच्या आश्रयानें आपलाले व्यवहार करावे. राज्याधिकारी
व राजकारणी आश्रित आहेत त्यांनीं अधिकारसंबंधें धर्माची स्थापना
करावी. त्याचे गुण. आज्ञा श्रीगोपालकृष्णकुलकृत. शके १७११
सौम्यनामसंवत्सरे, माघ शुध्द पंचमी.
लाभाचे गुण | |||
कित्ता | कित्ता | ||
१ | जमाखर्ची लिहिणार | १ | मुत्सदगिरी कारस्थानीं असावे. |
१ | स्वधर्माचे ठायीं विश्वास ठेवावा. | १ | मामलतींत शहाणे. |
१ | पुत्रास शहाणें करावें. | १ | धनीपणाचे गुण |
१ | इंद्रियभ्रष्टाचा सहवास नसावा. . | १ | उदमांत शहाणे |
१ | मिष्ट भाषण करावें. | १ | वतनामध्यें आचरण. |
१ | वृध्दपरंपरेची मर्यादा रक्षावी. | १ | समाधानवृत्ति. |
१ | धन्याचे कामाची एकनिष्ठता | १ | स्नानसंध्या षट्कर्मे |
१ | असावी. | १ | लोकापवादाचें भय. |
१ | न्यायी निष्ठुरता असावी. | १ | शरिरास जपावें. |
१ | कुटुंबास आज्ञेंत ठेवावें. | १ | नाशकर्ते ओळखावें. |
१ | दुष्ट व्यवहारी ओळखावे. | १ | मनुष्याचा गौरव. |
१ | सत्पुरुषाचा सन्मान करावा. | १ | स्वरूपज्ञान असावें. |
१ | पापद्रव्य मेळवूं नये.. | १ | सेवकवृत्तीनें धनी आर्जवावा |
१ | * शिष्टाशीं सख्य राखावें. | १ | शरणांगताचें संरक्षण करावें |
१ | बंधूशीं अंतर देऊं नयें. | १ | शिक्षाप्रतिबंध सोसलेला असावा |
१ | हिशेब मोसबवार लेख असावा. | १ | १ बंदोबस्ताच्या पध्दति. |
१ | जाबसाली शहाणें. | १ | सारासार विचार करावा. |
१ | परोत्कर्षाचें सहन. | १ | वावगा खर्च करूं नये. |
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
सु ॥ सलासीन मया व अलफ, सन ११३९ फसली,
अवल साल छ ७ जिल्काद २५ मे १७२९,
ज्येष्ठ शुध्द ९ शके १६५१.
छ १५ जिल्काद रोजी (१२ जून १७२९) पिलाजी जाधवराव याशी तगीर केले, मु॥ गदेकोटा. हिंदुस्थानचे स्वारीहून श्रीमंत बाजीरावसाहेब पुण्यास आले. छ १ मोहरम (१७ जुलै १७२९) पिलाजी जाधवराव याचा सरंजाम राणोजी शिंदे यास देऊन तेच वेळेस पालखी दिली. व पिलाजीची सरदारीही त्याच दिवशीं शिंद्यास दिली, छ ५ मोहरम (२१ जुलै १७२९). श्रीमंताची स्वारी छ १५ मोहरम रोजीं (३१ जुलै १७२९) साता-याहून निघाली. छ १६ मोहरम (१ आगस्ट १७२९) चिमाजी अप्पा व नानासाहेबसुध्दां साता-याहून निघाले ते साता-याहून छ ८ रविलाखर (२० अक्टोबर १७२९) रोजी सुप्यास गेले. चिमाजी अप्पा छ २० र॥ खर रोजीं (१ नोव्हेंबर १७२९) निघाले ते फलटन देशी जाऊन उरमुडीस येऊन छ १४ जमादिलाखर रोजी (२४ डिसेंबर १७२९) पुण्यास आले. लग्नाचे आमंत्रणाकरितां गेले असावेत. छ १२ रजब रोजीं (२१ जानेवारी १७३०) नानासाहेब यांचें लग्न माघ शु॥ १४ रोजी झालें. रास्ते भिकाजी नाईक यांची कन्या गोपिकाबाई. मंडप जुने कोटांत दिला होता. छ १ रजब माघ शु॥ ३ मंदवारीं (१० जानेवारी १७३०) शनवारचा वाडा बांधावयास आरंभ केला. पायागड घेतल्याचें वर्तमान आलें, छ २३ रजब (१ फेब्रुवारी १७२९). छ १४ साबान रोजीं (२१ फेब्रुवारी १७३०) श्रीमंत उंबरजेस गेले होते. अखेर सालपर्यंत तेथें होते. महाराज यांचा मुक्काम तेथें होता, सबब गेले होते. र॥ वल महिन्यास (सप्टेंबर १७२९) अप्पा स्वारीस निघून गुजराथेत गेले. व छ १३ रमजान रोजी (२२ मार्च १७३०) ढवळकें शहर लुटलें. पिलाजी जाधव यास मुक्त करून कोवळणांत फिरंगीयावर सवाल महिन्यांत (मे १७३०) पो. मांडवगड घेतल्याची खबर मल्हारजी होळकर व उदाजी पवार यांजकडून आली, छ १८ जमादिलाखर (२८ डिसेंबर १७२९) मु॥ मियाबाद. गुजराथचा सरबुलंदखान यानें दिल्ली बादशहाकडे बहुतप्रे॥ बोलणें लाविलें कीं मुलखाची हैराणगत झाली, वसूल येत नाही, तर द्रव्य देऊन माझें रक्षण करावें. परंतु बादशहानें कांहीं उत्तर दिलें नाही. आणि चिमाजी अप्पानीं लष्करसुध्दा पेटलादेस येऊन त्या शहरची खंडणी घेऊन ढवळकें लुटलें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
सु॥ तिसा अशरीन मया व अलफ, सन ११३८ फसली
अवलसाल छ २५ सवाल. २४ मे १७२८,
वैशाख वद्य १२ शके १६५०.
छ १ रविलाखर रोजी (२४ आक्टोबर १७२८) श्रीमंत स्वारीस निघाले. बाजीरावसाहेब तुळजापुराकडे गेले व चिमाजी अप्पा हिंदुस्थानांत दयाबहादर याजवर गेले. माळवे प्रांती दिल्लीचे बादशहाकडून राजा गिरिधर होता, त्यास उदाजी पवार व चिमणाजी दामोदर यांनी युध्दांत ठार मारला होता. त्याचे जाग्यावर दिल्लीहून त्याचा आप्त दया बहादर ह्मणून आला. त्याजवर चिमाजी अप्पा, पिलाजी जाधव व मल्हारराव होळकरसुध्दां जाऊन लढाई केली व त्यास ठार मारिला. ही खबर छ १६ व छ २९ र॥वल (९ व २२ अक्टोबर १७२८) महिन्यांत पुण्यास आली. लढाई उज्जनीवर झाली. दया बहादर मयत झाल्यावर त्याचे जाग्यावर दिल्लीचे बादशहाकडून महंदशहा बंगष याची नेणूक झाली होती. त्याने हिंदुस्थानात येऊन बुंदेलखंडाचा राजा छत्रसाल याचे मुलखांत बहुत उपद्रव दिला. तो वयाने फार वृध्द होता. त्याच्यानें त्याचा पराभव होईना. सबब त्यानें बाजीरावसाहेब यास माझें साहाय्य करावें ह्मणून पत्र पाठविलें. त्यावरून एकदम बाजीरावसाहेब हिंदुस्थानात नर्मदा उतरून माळव्यांत आपले लष्कर होतें, तें आपले स्वाधीन करून घेऊन चिमाजी अप्पा व पिलाजी जाधवराव यांस परत पाठवून कोंकण प्रांतांतील बंदोबस्त करण्यास सांगून छ २३ साबान (१३ मार्च १७२९) रोजी छत्रसाल राजाची भेट मु॥ धामोरा नजीक मोहोळ येथे घेऊन बंगष याजवर निघाले. छ १० रमजान रोजी (३० मार्च १७२९) जेतपूर मुक्कामी बाजीरावसाहेब याची व बंगष याची लढाई होऊन त्यास छत्रसाल राजानें बुंदेलखंडातून पार घालवून दिले. या उपकाराबद्दल प्रथम त्या राजानें एक किल्ला व झांशीनजीक दोन अडीच लक्षांचा मुलूख दिला. पुढें त्या राजानें आपले मरणाचे वेळी आपल्यास दोन पुत्र आहेत, असा बाजीराव पेशवे तिसरा पुत्र समजून आपले राज्याचा तिसरा हिस्सा बाजीराव यास दिला. छ ४ सवाल (२२ एप्रिल १७२९) बऱ्हाणपुराहून साता-यास पत्रें आली की, श्रीमंतास पुत्र झाला. छ १६ सवाल (४ मे १७२९) दया बहादरावर स्वारी करून चिमाजी अप्पा परत निघून छ १० जिल्हेज रोजी (२६ जून १७२९) पुण्यास दाखल झाले. महमदखान बंगष याचा पराभव झाल्यावर याचाच कोणी कायमखान बंगष पुन्हा श्रीमंतावर लढण्यास आला. तेव्हा त्याशीही छ १० सवाल रोजी (४ मे १७२९) लढाई होऊन त्याचें लष्कर लुटलें. हत्ती घेतले. खाशास मोर्चे लाविले असतां शंभर स्वारानिशी पळून गेला. मु॥ जेतपूर, कान्होजी आंग्रे मयत झाले. याचे पुत्र : १ सेखोजी, १ संभाजी, नाटकशाळा ३ होत्या. त्या तिघींचे ३ पुत्र :- १ तुकोजी, १ येसाजी, १ मानाजी असे होते. सेखोजीस पदाची वस्त्रें मिळाली. श्रीधरस्वामी पैठणास वारले.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
निजामाचे मुलखांत आपला प्रवेश आहे तो नाहीसा न व्हावा असे असता प्रतिनिधिं यांनी त्याविरुध्द केलें, यामुळे प्रतिनिधीशी वाकडे पडिले. हे वर्तमान निजामुन्मुलूक यास कळताच त्यानें चंद्रसेन जाधवराव, रंभाजी निंबाळकर, दाभाडे व पिलाजी गाइकवाड हे सरदार आपल्याला अनुकूल आहेतच, व कोल्हापूरचा मुख्य संभाजी तोही वश आहे. त्यास शाहू व संभाजी यांजमध्ये पुन्हा कलह उत्पन्न करावा यास हा वेळ चांगला आहे असें समजून संभाजीस निम्में हिस्सा मागावयास लावून तो कज्जा मोडावयाशी आपण मध्यस्थ होऊन न्याय मी करीन तोपर्यंत पैसा चौथाई व सरदेशमुखीचा शाहूस देण्याचा यास अटकाव केला. ही लबाडी बाजीरावानी शाहूचे मनात पक्की भरवून लढाईच करावी अशी शाहूमहाराजाची आज्ञा घेतली. नंतर छ १ सफर रोजी (२७ आगस्ट १७२७) बाजीराव सोो निजामुन्मुलुकावर स्वारीस निघाले. तेव्हां प्रथम निजामाचे लष्कराची गांठ पडली. तेव्हां त्याशीं हलकी लढाई देऊन पळ काढण्याचा रबा आकार दाखवून खानदेशात शिरला. निजाम आपलेजवळ आहे असें समजून कांही लोक ब-हाणपूरचे वाटेकडे त्यास ठकवावयाशी ठेऊन आपण फौजेसुध्दां गुजराथेंत शिरून मुलूख लुटला. आणि तेथील अधिकारी सरबुलंदखान यास असे समजाविलें की, आह्मी हे कृत्य निजामुन्मुलुकाचे मसलतीनें करितो. निजाम ब-हाणपुराकडे आला तेव्हां त्यास कळलें की, आह्मांस मराठ्यांनी ठकविले. नंतर तो माघारा फिरून पुणें जाळून टाकावें असा विचार करून तो अहमदनगरास येईतोपर्यंत अगोदरच त्यास कळलें की बाजीराव करवंदबारीने येऊन मुलूख लुटला. तेव्हा निजाम माघारा फिरून गोदावरीपलीकडे गेला. तेथें बाजीरावाची गांठ पडून प्रथम हलकी लढाई झाली. नंतर ज्या ठिकाणी दाणापाणी नाहीं असे जागी निजामास घुलवीत नेऊन अगदी लढून जेर केले. ही लढाई छ २५ रजब रोजीं (२५ फेब्रुवारी १७२८) पालखेड येथे झाली. तेव्हां निजामास तह करणे भाग पडलें. नंतर तहाचे बोलणें चालता बाजीराव पेशवे यांनी कोल्हापूरकर संभाजी राजे आमचे हाती द्यावे व आमचे मराठे लोक वसूल जमा करणारे यांशी हरकत न करावी. याकरितां त्या मुलुखातील किल्ले आमचे स्वाधीन असावेत. तेव्हा निजामाने संभाजीशिवाय बाकी गोष्टी कबूल केल्या. संभाजीस आह्मी पन्हाळ्यास पोहचवितों असें निजामानें सांगितल्यावरून पेशवे याणी मान्य करून छ ५ साबान रोजी (६ मार्च १७२८) मुंगी पो शेवगाव या मुक्कामी तह ठरून परस्परांशी भेटी झाल्या. संभाजीराजे दक्षिणेत येऊन आपले स्वस्थळास गेले. आवजी कवडे यास छ २९ जिल्हेज रोजी (२५ जुलै १७२८) फौजेची सरदारी सांगून तैनात १५०० रुपये केली. नानासाहेब ह्मणजे बाळाजी बाजीराव पेशवे यांची मुंज माघ शु ॥ ११ दिवशी झाली. दमाजी थोरात याणें पुन्हां बंड केले होते. त्याजवर स्वारी करून धरून आणून पुरंदरावर ठेविला, तो तेथें मयत झाला.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
सु ॥ सबा अशरीन मया व अलफ, सन ११३६
फसली, अवलसाल छ ३ माहे सवाल. २४ मे
१७२६, ज्येष्ठ शुध्द ४ शके १६४८.
श्रीपतराव प्रतिनिधि यास सवाल (मे १७२६) महिन्यांत पुत्र झाला. छ ८ मोहरम रोजी (२६ आगस्ट १७२६) साताऱ्याहून श्रीमंताची स्वारी पुण्यास दाखल झाली. व पुन्हा छ १२ माहे म॥ (३० आगष्ट १७२६) स्वारीस निघाले. खंडेराव बल्लाळ चिटणीस आश्विन शु ॥ ५ स (२१ सप्टेंबर १७२६) वारले. पुत्र १ जिवाजी, १ बापूजी, १ गोविंदराव, १ बहिरराव याप्रमाणे असोन वडील जिवाजी खंडेराव यास चिटनिशीची वस्त्रें झाली. दावळजी वाळके यास ममलकतमदार ह्मणोन किताब दिल्हा छ १५ रविलावल (३० अक्टोबर १७२६) रोजी.
सु ॥ समान अशरीन मया व अलफ, सन ११३७
फसली, अवल साल छ १४ माहे सवाल. २५ मे
१७२७, ज्येष्ठ वद्य १ शके १६४९.
छ ३० सवाल रोजी (५ जून १७२७) श्रीमंत सासवडास होते. छ २६ जिलकाद रोजी (४ जुलै १७२७) सासवडास साताऱ्याहून आले. निजाम यांनी आपले हैदराबाद राजधानीत चौथाई मराठे घेतात, त्या ऐवजी दुसरें उत्पन्न कांही देऊन मराठे यांचे येणे जाणें या मुलखी बंद करावे, असे मनांत आणून प्रतिनिधि याचे विद्यमाने शाहू महाराज याशीं बोलणे करून कांही द्रव्य व इंदापुराजवळ काही मुलूख मराठयांस द्यावा व प्रतिनिधि यासही व-हाड प्रांतांत कांही जहागीर करून दिल्ही. हें वर्तमान बाजीराव यास कळताच त्यास राग आला.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
(४) “पेशवाईच्या अखेरची अखबार” हें ह्या खंडातील तिसरें प्रकरण आहे. पुणें येथील रामाजी नाईक भिडे यांच्या दप्तरांतील हे प्रकरण आहे. ह्यांतील विषय त्याच्या नांवावरूनच कळून येण्यासारखा आहे. बाहेरगांवच्या सरदारांना, दरखदारांना व सावकारांना पुण्यास जें जें कांहीं होईल त्याची बातमी देणारे अखबरनवीस असत; त्यांपैको एकाने ही अखबार सजविली आहे. अखबारी बखरीचें पूर्वरूपच होत. ही अखबार पूर्णपणें विश्वसनीय आहे.
(५) “रमास्वयंवर” हें ह्या खंडांतील चवथें प्रकरण होय. ह्याचा कर्ता कोण तें सांगतां येत नाहीं. कदाचित् बाळ सदाशिव वाळिंबे हा ह्या त्रोटकाचा कर्ता असावा असें उपसंहारावरून वाटतें. ह्यांत सवाईमाधवरावाच्या लग्राचें लहानसें प्रास्तविक वर्णन आहे. हें काव्य पुणें येथील श्रीमंत तुळशीबागवाले ह्यांच्या दप्तरांतील आहे. काव्य जसें लिहिलें होतें तसेंच छापले आहे. शुद्धाशुद्ध पहाण्यास दुसरी प्रत मिळणें बहुशः अशक्य असल्यामुळें हा मार्ग स्वीकारला आहे.
(६) “शके १७३८” सालांतील हकीकत” हें ह्या ग्रंथांतील पांचवें प्रकरण आहे. ह्याचा कर्ता कोण तें समजत नाहीं.
(७) “पेशव्यांची वंशावळ” हें ह्या ग्रंथांतील सहावें व शेवटलें प्रकरण आहे. ह्याचा कर्ता कोण तें माहीत नाहीं.
ह्या खंडांत छापिलेल्या सहा प्रकरणांपैकी पहिलें व चवथें खंड वगळलें असतां, बाकी जी चार प्रकरणें राहतात तीं बखर ह्या सदराखालीं मोडण्यास हरकत नाहीं. ह्या बखरी अस्सल पत्राप्रमाणें पूर्णपणें विश्वसनीय आहेत व म्हणूनच त्या मीं येथें छापिल्या आहेत. (१) पेशवाईचा इतिहास जातीनें माहीत असणा-या अशा थोर व बहुश्रुत लोकांपुढें ती बखर जावयाची असल्यामुळें व ती सवाई माधवरावाकरितां लिहिलेली असल्यामुळें तींत विश्वसनीय अशीच माहिती दिलेली आहे. (२) “शके १७३८ सालांतील हकीकत” दफात्यावरून उतरून घेतली असल्यामुळें ती विश्वसनीय आहे. (३) ‘पेशवाईच्या अखेरची अखबार’ समकालीन लेखकानें आपल्यासमोर होत असलेल्या रोजच्या प्रसंगाची हकीकत म्हणून लिहिली असल्यामुळें विश्वसनीय आहे. (४) “पेशव्यांची वंशावळ” मोठ्या काळजीनें दफात्यांतून जुळविली असल्यामुळें पूर्णपणें विश्वसनीय उतरली आहे. विश्वसनीय बखरी कशा निर्माण होतात ह्याचे ह्या चार बखरी मासलेच आहेत. समकालीन तज्ज्ञ लोकांपुढे समकालीन योग्य लेखकानें समकालींन गोष्टीचें वर्णन स्वदृष्टीनें पाहून केलें असल्यास विश्वसनीय ठरतें, किंवा योग्य लेखकानें योग्य आधारावरून अफरातफर न करता मजकूर जुळविला असल्यास तो विश्वसनीय उतरतो. ही कसोटी शिवकालीन बखरींना लाविली असतां त्या विश्वसनीय कां नाहींत, हें समजून येणार आहे. शिवकालीन बखरींत विश्वसनीय अशी मानिली जाणारी बखर म्हटली म्हणजे सभासदी बखर होय. तिच्यांत मुख्य गोम ही आहे कीं ती केवळ स्मृतीवर हवाला देऊन लिहिलेली आहे. शिवाजीची जेवढी कारकीर्द सभासदानें प्रत्यक्ष पाहिली होती तिचें वर्णन त्यानें जरासें विस्तृत केलें आहे, व जी दारकीर्द त्याला समजूं लागल्याच्या अगोदर संपली तिचें वर्णन त्यानें अत्यंत त्रोटक केलें आहे. केवळ स्मृतीवर हवाला ठेवल्यामुळें विस्तृत वर्णंनाचा भाग व त्रोटक वर्णनाचा भाग, दोन्हीहि अविश्वसनीय व संशयित उतरलेले आहेत. केवळ स्मृतीवर हवाला ठेवून मुद्देसूद व क्रमवार हकीकत लिहिली जाणें बहुतेक अशक्य असतें. मानवी स्मृतींत सामान्य गोष्टींचीं टिपणें टांचलीं जातात. क्रमवार, तपशीलवार, मुद्देसूद व तारीखवार हकीकतीचा बोजा सहन करण्याचा व वर्षोनवर्षे वहाण्याचा जोम मानवी स्मृतींत नाहीं. सभासदी बखर बहुत स्थलीं अविश्वसनीय आहे त्याचें कारण हेंच आहे. इतर शिवकालीन बखरकार विषम कालीन असल्यामुळें, जुन्या टिपणांचा उपयोग करून घेण्याचें सामर्थ्य त्यांच्यांत नसल्यामुळें, दफतीं व पत्रें जितकीं मूबलक मिळावीं तितकीं त्यांना मिळालीं नसल्यामुळें व कोणत्याहि प्रकारच्या शास्त्रीय शिक्षणानें त्यांची बुद्धि कसली गेली नसल्यामुळें, त्यांच्या हातून हे असले अर्धवट लेख उतरले गेले आहेत. केवळ जुन्या टिपणांचे उतारे देऊन हे बखरकार स्वस्थ बसले असते तर तें बरेच विश्वसनीय ठरतें. परंतु, जुन्या टिपणांच्या उता-यांत आपली वेडीबागडी मखलाशी करण्याची आवश्यकता बखरकार ह्या नात्यानें त्यांना अपरिहार्य झाल्यामुळें अद्भूत प्रसंगांनीं तुडुंब भरलेल्या शिवाजी महाराजांच्या चरित्राचें रूप आधुनिक वाचकांना ह्या कुलेखकांनीं कोरडें ठणठणीत असें करून दाखविलें आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
सु ॥ सीत अशरीन मया व अलफ, सन ११३५
फसली, अवल साल २२ रमजान. २५ मे
१७२५, अधिक ज्येष्ठ वद्य ९ शके १६४७.
छ ५ जिलकाद रोजी (७ जुलै १७२५) साता-याहून निघून छ १४ पर्यंत (१६ जुलै १७२५) माहुलीस होते. तेथून पुढें अपसिंग्यास होते. छ ७ जिल्हेज (८ आगष्ट १७२५) सुप्याकडून सासवडाहून पुण्यास आले. छ २३ जिल्हेज रोजीं (२४ आगष्ट १७२५) पुन्हा साता-यास गेले ते छ १ मोहरमपर्यंत (२९ आगष्ट १७२५) फिरत फिरत छ म॥ पुण्यास आले. छ १ सफर रोजीं (२८ सप्टेंबर १७२५) मुक्काम पुण्यास होता. छ १ रविलावल रोजी (२७ अक्टोबर १७२५) मौजे पिंपळेनजीकसासवडावरून साता-यास जाण्याकरितां त॥ २४ रोजी (२२ अक्टोबर १७२५) निघाले. साता-यास गेल्यानंतर फत्तेसिंग भोसले यास कर्नाटकचे स्वारीस तुळजोजी राजे तिकडे होते त्याजकडे पाठविलें. त्याजबरोबर महाराजांनी बाजीराव पेशवे व प्रतिनिधि, दाभाडे व रघूजी भोसले सेनासाहेब सुभा व सरलष्कर असे सरदार देऊन पन्नास हजार फौज पाठविली. संताजी घोरपडे पुरातन सेनापति यांचे पुत्र संभाजीकडे गेले, ते तिकडेच राहिले. त्यांच्या घराण्यांतील पिराजी व मुरारराव घोरपडे गुत्तीचें संस्थान रक्षून होते, त्यांस सेवा करून दाखवावी ह्मणून महाराजांनी लिहिल्यावरून तेही फत्तेसिंग याजबरोबर कर्नाटकांत गेले. सुरापूर, चित्रदुर्ग, गदग, लखमेश्वरापासून पूर्वीच्या खंडण्या घेतल्या. सालाबाद घे-याचा ठराव करून, शिवाय हुजूरची ठाणी पूर्वीची होतीं ती सोडविली. त्रिचनापल्लीस दादखान ह्मणून होता त्याशीं लढाई करून संस्थान घेतले, नंतर परत आले. छ २२ जमादिलाखर (१५ फेब्रुवारी १७२६) अबदुल गफर पठाण याची व पेशवे यांची भेट बेदवटी येथें झाली होती. कर्नाटकचे स्वारीहून श्रीमंत छ २६ रमजान (१७ मे १७२६) रोजी परत आले.२०
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
ह्या सात दोषांचे शोधन करण्यास खालील तोडगे मीं सांगितले आहेतः-
(१) शक, सन, महिना, तीथ, वार, नक्षत्र, करण, इत्यादि जसजशी जास्त तपशिलवार माहिती दिली असेल तसतशी चिती विश्वसनीयता जास्त धरावीं. हा तोडगा कालापुर्ताच तेवढा प्रमाण आहे.
(२) स्थलांचा किंवा व्यक्तींचा लोप किवा विपर्यास झाला आहे, असा संशय आला असतां, व ह्या दोहोंसंबंधीं निरनिराळ्या बखरींत निरनिराळा मजकूर असल्यास, अमकाच अस्सल मानण्याच्या भरीस पडूं नये. अशा बाबतीत बहिःप्रमाणाचेंच साहाय्य पाहिजे.
(३) बखरी अस्सल प्रमाण नाहींत. परंतु त्यापैकीं काहीं भाग कोठें कोठें अस्सल प्रमाण असूं शकेल. तो तसा कोठें असूं शकेल हें बहिःप्रमाणांच्याच साहाय्यानें समजणार आहे.
(४) बखरींतील प्रत्येक वाक्याचें कोठें ना कोठें तरी योग्य स्थळ आहे. परंतु कोणत्या विशिष्ट वाक्याचें कोणतें विशिष्ट स्थल असावें हें बहिःप्रमाणांच्याच साहाय्यानें ठरणार आहे.
(५) कित्येक बखरींत सबंद प्रसंगाचा लोप झालेला आहे हें मुसलमानी तवारिखाशी ताडून पाहतां समजून येईल. मुसलमानी तवारिखांत जो प्रसंग जास्त दिला असेल त्याला मराठी किंवा मुसलमानी अस्सल पत्राचा आधार असल्याशिवाय तो खरा धरून चालू नये.
(६) परमार्थानें लिहिलेल्या अस्सल पत्रांतील सर्व मजकूर व महजरांतील बहुतेक सर्व मजकूर प्रमाण समजावा.
(७) ग्रांट डफचा इतिहास बहुत ठिकाणीं अप्रमाण आहे. त्याचीहि तोडजोड बखरींच्या प्रमाणेंच कमजास्त प्रमाणानें करावी. अस्सल पत्रांच्या आधारानें जेवढा मजकूर किंवा मजकुराचा भाग लिहिला असेल तेवढा खरा मनावा.
(८) समर्थांचा दासबोध व तुकारामाचें अभंग पूर्णपणें प्रमाण आहेत.
(९) पोवाडे बखरीपेक्षां जास्त प्रमाण आहेत.
(१०) रामदासस्वामींची बखर व इतर बखरींहून क्वचित् स्थळीं जास्त प्रमाण आहे.
(११) महाराष्ट्राचें भूज्ञान हें बहिःप्रमाणांचेंच एक अंग ओहे.
(१२) बखरीचें बहुमत किंवा एकमत प्रमाण नाहीं.
(१३) तोंडी पुरावा प्रमाण नाहीं.
(१४) सुरत येथील व्यापा-यांचे लेख प्रमाण नाहींत; त्यांना वळा बातमी मिळत नसे म्हणून व जी बातमी मिळत असे ती सदा खरींच असे, असें नसे म्हणून, तपशिलाचे संबंधी येथें विचार कर्तव्य आहे हें ध्यानात धरलें पाहिजे.
(१५) गोवें येथील पोर्तुगीज सरकारच्या दप्तरांतील लेख इंग्रज व्यापा-यांच्या लेखांपेक्षां जास्त विश्वसनीय समजावें. कारण, सुरतेंतील इंग्रजांपेक्षा गोवें येथील त्या वेळचे अधिकारी जास्त सुशिक्षित व व्यवस्थित होते.
(१६) भूषणकवीच्या काव्यांतील उल्लेख बहुतेक अस्सल प्रमाण समजावे.
(१७) संभाव्यतेचें प्रमाण इतिहासाचें शोधन करण्याच्या कामीं बहुतेक अगदीं निरुपयोगी आहे. ऐतिहासिक संभाव्यता दोन प्रकारची असूं शकेलः-
(१) एक ऐतिहासिक प्रसंगाची व (२) दुसरी ऐतिहासिक प्रसंगाच्या तपशिलाची. अमूक एक प्रसंग शिवाजीच्या हातून किंवा हयातीत किंवा आसपास होणें संभाव्य आहे किंवा नाहीं, ह्या प्रकारचा प्रश्न उद्भवला असतां संभाव्यतेच्या प्रमाणानें तो प्रसंग संभाव्य आहे किंवा नाहीं हें सांगता येईल. परंतु तो प्रसंग साक्षात् घडला किंवा नाहीं हें सांगता येणार नाहीं. प्रसंगाच्या तपशिलासंबंधीं प्रश्न उद्भवला असतां अमुक व्यक्ति, अमुक स्थळीं व अमक्या कालीं अमुक त-हेनें, वागल्या किंवा नाहीं हें सांगणे संभाव्यतेच्या प्रमाणानें होणार नाहीं. हा तपशील निश्चयानें सांगण्यास अस्सल पत्रांचेच प्रमाण पाहिजे.
(१८) पूर्वग्रहानें आविष्ट होऊन, किंवा मनोदेवतेचें प्राबल्य होऊन पूर्वीचे दोष झांकण्याकरितां, किंवा राष्ट्रीय अभिरुचीला पसंत पडावें ह्या इच्छेनें, किंवा परकीय लोकांच्या मताला मान देण्याच्या खोडीनें, ऐतिहासिक प्रामाण्याची कसोटी दूषित होण्याचा संभव असतो. ही कसोटी जितकी शुद्ध ठेवितां येईल तितका ऐतिहासिक सत्यतेचा उद्रम जास्त होईल.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
खरें म्हटलें असतां शिवकालीन बखरींतील एकोनएक वाक्यांचे पृथक्करण, वर्गीकरण व एकीकरण करून ह्या त्रिविध करणीनें ऐतिहासिक सत्याची कशी निष्पति होते, काय सिद्धांत उत्पन्न होतात, काय शंका निघतात, हें बारीक तपशीलवार असें दाखवून देणें जरूर आहे. परंतु शिवकालीन अस्सल ऐतिहासिक लेख मिळण्याची थोडीबहुत आशा जोंपर्यंत कायम आहे तोंपर्यंत हा प्रयत्न करणें अप्रस्तुत, कदाचित् अनावश्यक, आहे असें वाटल्यावरून प्रस्तुत स्थलीं बखरींतील व ग्रांट डफच्या इतिहासांतील कांहीं शंकाग्रस्त स्थानें काढून दाखविण्यावरच समाधान मानून रहाणें भाग पडलें. अस्सल पत्रे मिळण्याची आशा जर निष्फळ झाली अथवा थोडीफार पत्रें मिळून तेवढ्यानें जर यथास्थित काम भागलें नाहीं, तर पुढेंमागें वरील प्रयत्न साद्यन्त करणें जरूर होईल. बखरीतील शंकाग्रस्त स्थानांची यथास्थित निवृत्ति करावयाला अस्सल पत्रांचाच तोडगा पाहिजे आहे. तो जर मिळाला नाहीं, तर कितीहि वर्गीकरण, कितीहि पृथक्करण व कितीहि एकीकरण केलें, तरी मनाचें समाधान होणार नाहीं. फारच मजल मारिली, तर आद्यतन ग्रीक किंवा रोमन इतिहासापेक्षां शिवकालीन मराठ्यांचा इतिहास जास्त विश्वसनीय होईल, इतकेंच. ह्यापलीकडे ह्या त्रिविध करणीपासून जास्त फलप्राप्ती होणार नाहीं, उल्लेख, वगैरे गौण आधारांच्या साहाय्यानें रचिलेला आहे. साक्षात् तीच गती नाहीं, तरी बहुतेक त्याच्या सारखीच गती बखरकारांच्या लिहिण्याचा मेळ घालण्याच्या कृतीनें आपल्या इकडे होणार आहे. बखरकारांच्या लिहिण्याचा मेळ घालण्याचा खटाटोप करणें म्हणजे अप्रमाण साक्षीदारांच्या कैफियतींची संगती लावण्याच्या निष्फळ उद्योगाप्रमाणेंच अल्पफलप्रद आहे. बखरकार एकेक दोन दोन वेळाच तेवढें चुकलेले असते तर त्यांच्या प्रामाण्याची इयत्ता बरीच चढली असती. परंतु दुर्दैवानें प्रत्येक बखरकार शेकडों वेळां शेंकड़ों ठिकाणीं चुकला असल्याकारणानें त्या प्रत्येकाच्या प्रामाण्याची इयत्ता शून्यलब्धीपर्यंत खोल गेलेली आहे. अनेक प्रसंगांची एका ठिकाणी गफलत करणें, वर्णनाचा एकच मासला अनेक प्रसंगांत आणणें, कालाचा व स्थलांचा बरोबर किंवा मुळींच निर्देश न करणें, व्यक्तींच्या नांवांचा अजिबात लोप करणें, अस्पष्ट व पुसटतीं विधानें करणें, कालाचा व स्थलाचा विपर्यास करणें, असें बहुतेक सर्व प्रकारचे दोष ह्या बखरींतून झालेले आहेत. ह्यामुळें बखरकारांनीं लिहिलेल्या ख-या गोष्टीहि, इतर बहिःप्रमाणांच्या अभावीं, ख-या धरून चालणें धोक्याचें काम आहे अशी मनाची प्रवृत्ति होते. ह्या प्रवृत्तीचा परिणाम असा होतो कीं बखरींतींल ख-या गोष्टींपासून खोट्या गोष्टी निवडून काढितां येत नाहींत व बखरींतील अमुक मजकूर निश्चयानें खरा असें म्हणण्याचें धाडस सहसा करवत नाहीं. ग्रांट डफची जी मोठी चूक झाली आहे ती हीच होय कीं, बखरींतील जो तपशीलवार मजकूर निश्चयानें खरा आहे असें म्हणवत नाहीं, तो, तो खरा धरून चालण्याचें धाडस करतो. शिवाजींने तोरणा किल्ला शके १५६८ त घेतला, शहाजी शके १५७१ त अटकेत पडला, चंद्रराव मो-याच्या पराभवाचा अमकाच वृत्तांत खरा, अफजलखानी प्रकरणाचें आपण देतों तेंच वृत्त विश्वसनीय, शिवाजीला चार बायका होत्या, शहाजी शके १५८६ त वारला, वगैरे जो मजकूर डफनें लिहिला आहे तो अविश्वसनीय आहे, ह्याचें कारण ग्रांट डफचें उपरिनिर्दिष्ट धाडसच होय. मिळाल्या होत्या त्या बखरींतील अमुक एक प्रकरणासंबंधी अमुक एक मजकूर संभाव्य असला म्हणजे खरा धरून चालावें असला धोपट व अंधळा मार्ग ग्रांट डफनें स्वीकारलेला आहे. पद्धतवार प्रमाणें लावून आपला मजकूर त्यानें पारखून व निवडून घेतलेला नाहीं. अर्थात् ग्रांट डफच्या बखरीवर बिनधोक विश्वरस ठेवण्यांत तात्पर्य नाहीं. बखरी व ग्रांट डफ विश्वसनीय आहेत असा पक्का ग्रह घेऊन एका मराठा ग्रंथकारानें अन्योन्याश्रयत्वाचा आपल्यावर दोष आणून घेतला आहे. (१) ग्रांट डफ विश्वसनीय आहे, (२) मराठी बखरी बहुतेक विश्वसनीय आहेत, (३) बखरींतील मजकूर डफच्या बखरींतल्यासारखाच आहे, (४) तेव्हां डफ विश्वसनीय आहे, व बखरीहि बहुतेक विश्वसनीय आहेत, व (५) ग्रांट डफनें नवीन कांहीं करावयाचें ठेविलें नाही, असा कोटिक्रम ह्या ग्रंथकाराचा आहे (लक्ष्मणराव चिपळोणकरकृत मराठ्यांचा इतिहास, प्रस्तावना). मराठी बखरींतून उतारे घेऊन, विशेष पूसतपास न करतां ग्रांट डफनें आपला ग्रंथ बनविला, ही गोष्ट लक्ष्यांत घेतली म्हणजे वरील कोटिक्रमांतील पांच वाक्यें एकाच वाक्याचीं निरनिराळीं रूपें आहेत हें स्पष्ट होईल. लक्ष्मणराव चिपळोणकरांची मोठी चूक हीच आहे कीं, ते बखरी व डफ विश्वसनीय समजतात. वास्तविक पाहातां, दोन्ही विश्वसनीय नाहीत. दोन्ही पदोपदीं संशयांनीं ग्रस्त झालेलीं आहेत. येणेंप्रमाणें बखरकारांच्या व ग्रांट डफच्या ग्रंथांच्या प्रामाण्याची इयत्ता आहे.
परीक्षा करतांना, बखरींचें प्रामाण्य व ह्या प्रामाण्याची इयत्ता ह्यासंबंधीं मीं जी विधानें केलीं आहेत ती संकलित येथें देतों.
(१) बखरकारानीं कालविपर्याचा दोष केला आहे.
(२) त्यांनीं स्थलविपर्यासाचा दोष केला आहे.
(३) त्यांनीं व्यक्तिविपर्यासाचा दोष केला आहे.
(४) त्यांनी ह्या तिहींचा प्रत्येकीं व सामग्राने लोप करण्याचा दोष केला आहे.
(५) त्यांना कोणत्याच प्रकारचें शास्त्रीय शिक्षण नव्हतें.
(६) त्यांना आपले विचार नीट प्रगट करितां येत नाहींत.
(७) व त्यांना सामान्य सिद्धांत स्पष्टपणें सांगण्याची ऐपत नाहीं.