Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

अष्टमीचे दिवशीं रविवारीं दोन प्रहरीं गोखले याजकडील आरब व सरकाचे गोसावी याणीं जाऊन येलवडे गांव घेऊन आंत आरब व गोसावी शिरले. तेव्हां मोठे कलागतीस आरंभ जाहाला. ते दिवशीं पेशवे याचा लढाईचा बेत नव्हता. परंतु त्याचा नेट पडला. तेव्हां * * * * *. पुढें तोफखान्या परियंत यांणीं * * * * *. यांणीं गणपतराव पानशे यांसी सांगितलें कीं माहांकाळीचे बार काढावे. तेव्हां पानशे यांणीं तोफांची सुरुवात केली. आणि आरब व गोसावी यांणीं पुढें लढाईची शर्त केली. मागें तोफांचा भडमार होत आहे. इंग्रज बहादर याणेंहि आपले लढाईची शर्त करीत करीत पुढें चाल धरीत चालले. असें वर्तमान आवशीस रविवारीं प्रहर रात्र परियंत जाहालें. पुढें गोखले व पुरंधरे यांशीं कांहीं फितूर असें समजलें आणि श्रीमंत याणीं पळ काढिला तो बापदेवाचे घाटांत जाऊन उभे राहिले. विंचुरकर पुरते फितुरी असें समजण्यांस आलें. गणेशखिंडीकडे मिसल त्यांची होती. त्यांनीं तिकडून वाट दिली. असेंहि जाहलें. स्वारी बरोबर माधवराव रास्ते व चिंतामणराव आपा ऐसे उभयतां गेलें. तेव्हां फौजेचा भणभणाट जाहाला. त्यास उपमा द्यावयास सुचत नाहीं. पुढें दोन प्रहर रात्रीं फौजेचा जिकडे तिकडे भणभणाट जाहला. तेव्हां ठिकाणीं गोखले व पुरंदरे व नारो विणू मात्र राहिले. त्याजपाशीं फौज सुमारी दहा पाच हजार राहिली. ते वेळेस असें अवघड पडलें कीं तोफा कशा निघतात. ते वेळेस पानशे याणीं तोफा काढिल्या. आणि तळावर तोफा दोन राहिल्या, एक महांकाळी व दर्याभवानी ऐशा दोन तोफा राहिल्या. बाकी तोफा सु॥ १० घेऊन गणपतराव सिहिगडास गेले. रात्र मागील पाच घटका राहिली. तों इंग्रज याणीं विंचुळकर होते ते बाजूनें चाल केली. ते वेळेस फेर जी झडली तिची गणीत नाहीं. इकडूनही घोडयांचे तोफांचे व दोन तळावर राहिल्या त्यांचे बार एक सरबत्ती केली. आणि काढावा काढिला तों प्रात:काळ जाहला. आबा परंधरे याणीं (महांकाळी काढण्याची आज्ञा दिली) तों फिरंगी याजकडील तोफेचा गोळा दहा हातावर पडला. तैसेच गोखले व पुरंधरे उभयतां निघाले. ते स्वारीचा शोध करीत करीत सासवडास गेले. तेथें सारे जमुनी जेजुरीस गेले. तेथून पुढें जात जात माहोलीचे मुक्कामास गेले. तेथून पुढें पाडळीस जाऊन मुक्काम केला. आतां मागील पुणेकडील मजकूर. मागें शु॥ नवमी सोमवार ऊन पडतां बेटांत पलटणें शिरलीं, आणि तेथुनीं गोळे तोफांचे दोन टाकिले. ते हरी चिंतामण दीक्षित यांचे घरास लागले. एक गोळा तीन भिंती फोडून व तावदान फोडून पार गेला. गावांत बातमी कीं रूपराम चवधरीचीं पलटणें आहेत. इतकियांत घटका दिवस आला. तों बुधवारचे रस्त्यानें हजार स्वार पळत गेला. लोक बातमी बोलूं लागले कीं त्याचे कुमकीस हे स्वार जातात. ऐसें होतां होतां चार घटका दिवस आला. फिरंगी याणीं सरकारचें डेरे येऊन जाळले आणि त्या तळावर आला. माहांकाळी तोफेचा व दुसऱ्या तोफेचा गाडा जाळिला आणि पाहों लागले तों काण्यांत खिळे ठोकिले आहेत. गावांत आईस लेकरूं पुसेनासें जाहालें. पळ असा निघाला कीं रस्त्यांत वाट मिळेनाशी जाहाली. कोणी पर्वतीचे डोंगरांत, कोणी कोणीकडे, ऐशीं गेलीं. नवरा एकीकडे, बायको एकीकडे, पोर एकीकडे, ऐशी अवस्था जाहाली. गावांत बातमी, आतां पुणें जाळितो, आतां लुटतो. इतकियांत गोसावीपुऱ्यांतील बंगला पेटविला. त्यानें लोकांची फार हवालदिलता जाहाली. त्या समयास उपमा घ्यावयास राहिली नाहीं. इतकियांत एक सांडणी स्वार आला कीं गोखले याची हवेली कोणती पुरंधरे याची कोणती असें पुसत बुधवार रस्त्यानें गेला. चारी सरकारचे (वाडे ओस पडले.) एक शूद्र ब्राह्मण राहिला नाहीं. त्यांत एक कारकून व पाच पहारेकरी मात्र राहिले. विश्रामबागचे वाडयांत दिनकर जोग पहारेकरी व मराठी माणसें ऐशीं दीक्षित दी॥चीं होतीं. बुधवार वाडयांत कोणी नाहीं. भृगुवार वाडयांत हि कोणी नाहीं. असें जाहालें, तों दिवस दोन प्रहर जाहाला. पुढें बातमी गावांत ऐशी आली कीं इंग्रज नाकेबंदी करितो. बाहेर कोणास जाऊं देत नाहीं. तेव्हां जी गावचे मनुष्यांची गत जाहाली ती ईश्वरास ठावूक. पुढें दिवस दोन प्रहर पाच घटका जाहाला, तों गावांत दवंडी आली कीं द्वाही बाबासाहेब व हुकूम कुंपणी बहादर यांचा, लोकांनीं दुकानें उघडावीं, आमचे कडून रयतेस उपद्रव होणार नाहीं. ऐशी द्वाही आली. आणि हरेश्वरभाई यांसी अल्पिष्टीन साहेब याणीं बलावून नेलें. आणि विश्रामबागचे वाडयातील पहारेकरी दिनकर जोग यासी बलाविलें. उभयता तेथें गेले तों बाळाजीपंत नातू व आणखी चार साहेब असे बसले होते.

सु॥ अर्बा खमसैन मया व अलफ. इन ११६३ फसली.
अवलसाल छ ३ साबान, ५ जून १७५३,
ज्येष्ठ शुध्द ४ शके १६७५.

छ १ जिल्काद रोजीं (३० आगस्ट १७५३) दादासाहेब स्वारीस अवशीस चार घटका रात्रौ डेरे मुहूर्तानें बाहेर दिल्हे. थाळनेरास गेले. छ ११ जिल्काद रोजीं (९ सप्टेंबर १७५३) थाळनेराहून दहिवलें येथे गेले. दरम्यान छ २९ जिल्काद रोजीं (२७ सप्टेंबर १७५३) नवाब सलाबतजंग यांजकडून सैद फतुल्ला वकीलीस आले होते. खानदेशाहून दादासाहेब हिंदुस्थानांत दत्ताजी शिंदे व मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव यांस बराबर घेऊन अजमीर प्रांती गेले. तेथें लूट करून चौथ व सरदेशमुखी घेतली व जागोजागी खंडणी घेऊं लागले. परंतु जाटलोक युध्दावांचून खंडणी देईनात. त्यांचा किल्ला कुंभेरी होता. त्या किल्ल्यांत ते लोक शिरून लढू लागले. त्या लढाईत खंडेराव होळकर मयत झाले. त्यांचे क्रियेस दहा हजार रुपये सरकारांतून दिल्हे, छ २९ जमादिलावल (२४ मार्च १७५४). पुत्र वारल्याचें वर्तमान ऐकून मल्हारराव होळकरही तेथें आले. तो किल्ला हस्तगत जाला नव्हता, सबब मल्हारराव होळकर इर्षेस पडून चार महिने लढले. पुढें सुरजमल्ल जाटापासून शिंद्यांच्या विद्यमानें साठ लक्ष रुपये खंडणी घेऊन खमस खमसैनांत छ १० रमजान रोजीं (२ जुलै १७५४) जयाजी शिंदे मारवाडांत गेले. जयाप्पा यांजबरोबर दादासाहेबांनी चार हजार फौज दिली होती. दिल्लीत कारभारी लोकांत एकमेकांशी वाकडेपणा आला होता. गाजुद्दीनखान मयत झाल्यावर त्याचा पुत्र मीर शाबुद्दीन यानें आपल्याविषयी सफदरजंग वजीर यास मोह उत्पन्न करून फार लीनता दाखविली. त्यावरून त्यास दया येऊन बापाचें गाजुद्दीनपण व अधिकार-अमीर उमरावतीचा-त्यास देवविला. असा वजिरानें त्याजवर उपकार केला असतां, त्या वजिराचेच नाशाविषयी प्रवृत्त होऊन त्याची वजिरी आपल्या आतेच्या नव-यास पातशहाकडून देवविली. यामुळे पहिला वजीर सफदरजंग व बादशहा यांचे युध्द सहा महिनेपर्यंत होत होतें. शेवटी तो वजीर कंटाळून आपलें ठिकाण लखनौ येथें जाऊन राहिला. या युध्दांत मीर शाबुद्दीन यानें बळेंच शिरून आपले साह्याकरितां पेशवे दादासाहेब हिंदुस्थानांत आले होते त्यांस बोलाविलें. ते फौजेनिशी शिंदे होळकरसुध्दा आले. परंतु हे दिल्लीस येण्यापूर्वीच सफदरजंग युध्द सोडून गेला होता. मग शाबुद्दीनानें आपल्यास मदत आलेले लोकांसुध्दां त्या सफदरजंग वजिराचा पक्षपाती सुरजमल्ल जाट याच्या पारिपत्यास गेला. परंतु तो जाट आपल्या किल्ल्यात शिरून युध्द करूं लागला. त्यावेळेस शाबुद्दीनानें बादशहापाशी युध्दाकरितां तोफा मागितल्या. तेसमयीं नवे वजिरानें बादशहास सांगितलें कीं, हा शाबुद्दीन आपल्यासच सर्व सामर्थ्य असावें असें इच्छितों, यास अनुकूल होऊं नये. त्यावरून बादशहानें तोफा दिल्या नाहीत. सुरजमल्ल जाट हाही बादशहास शरण आला होता, ह्मणून बादशहा शहाबुद्दीन व मराठे यांचे निवारणार्थ फौजेसहित निघाला. हें वर्तमान पेशव्यांस कळतांच एकदम पातशहाचे फौजेवर जाऊन पडले. तेवेळेस ते लोक बेसावध होते ह्मणून पळू लागले. तेव्हा मराठ्यांस फार लूट मिळाली. नंतर दादासाहेब यांनी नवे वजिरास दूर करून शाबुद्दीन यास वजिराची वस्त्रें छ १० साबान (२ जून १७५४) रोजीं संध्याकाळीं दिल्लीस दिली. व लागलीच पहिला बादशहा अमदशा यास काढून दुसरा बादशहा, पूर्वी जाहांगीर बादशहा होता त्याचा नातू इजुद्दीनशा याचें नांव दुसरा अलमगीर असे ठेवून, छ ११ साबान रोजी (३ जून १७५४) बसविला. पहिला बादशहा अहमदशा याचे डोळे शाबुद्दीनानें काढून त्यास कैदेंत ठेविलें. पहिला वजीर सफदरजंग या संधीत मरण पावला. त्याचा पुत्र सुजाअतद्दौला बापाचे जागीं अयोध्या प्रांताचा अधिकारी जाला. याप्रमाणें हिंदुस्थान प्रांती हकीकत जाली. याच स्वारीत मल्हारजी होळकर यास जखम लागली होती. जखम बरी जाली ह्मणून दादासाहेब यांजकडून पत्रें श्रीमंतांकडे छ १६ जिल्हेजेस (४ अक्टोबर १७५४) आली.

पुढें दीक्षित व विंचुळकराकडील कारभारी बाळोबा बाबा हेही कामांत होते. इंग्रज याजकडील बोलणार पोटसाहेब येत होता. परंतु तो चाकर प्रभूकडील. मागें याचीं पलटणें चाकरीस माणकेश्वर याणीं रदबदली करून ठेविली होती. तेव्हां त्यास दरमहा रु॥६००० साहा हजार देत आणि दोन पलटणें चाकरीस असत. असा मजकूर पेशजी जाहाला होता. तेव्हां श्रीमंताकडील फौजा सरदार, उमराव जमा होतच चालले होते. त्यांचीं नावें आठविलीं तितकीं लिहिलीं आहेत. मुख्य बापू गोखले यांची फौज अजमासें पंधरा हजार पायदळ सुध्दां, व आबा पुरंधरे यांची फौज तीन हजार व नारो विष्णू, मिजरकर व रास्ते व थोरात व जाधव व नानाजी माणकेश्वर, श्रीमंत पंत प्रतिनिधी व दीक्षित यांचे दिमतीस फौज दोन हजार व विंचुळकर यांची फौज सुमारी दाहा हजार एकूण फौज सुमारी पन्नासा हजारांची भरती जाहाली पुढें कजिया कांहीं काढवा असें मसलतीस आलें. मसलत. गार मुत्सद्दीपैकीं गोविंदराव काळे हे मुख्य प्रभूपाशी. ढमढेरे वगैरे मंडळींची नावें कोण लिहितों ! मुख्यांचीं नावें लिहिली आहेत. अस्तु. कजिया काढिला कीं X X X X लढाईस उभे रहावें किंवा आमचा प्रांत खालसा केला आहे तो आमचा आम्हास द्यावा. तेव्हां इंग्रजाकडील बोलणें कीं आह्मीं तयार आहों. ऐशीं बोलणीं चालत आहेत तों सरकारच्या फौजा बाहेर उतरूं लागल्या. तेव्हां गोखले याजकडील सरदार पठाण, नाव त्याचे सरदारखा हा गारपीरास होता तो (बाहेर निघाला). तेव्हां इंग्रज याजकडील बोलणार दीक्षित याजकडे आले कीं हे काय? त्यासी ताकीद व्हावी. तेव्हां दीक्षितांनीं निघोन वाडयांत आले आणि यजमानाचे कानावर घातलें कीं त्यांचें बोलणें असें आहे कीं त्या पठाणास ताकीद व्हावी. तेव्हां आज्ञा जाहाली कीं हा मजकूर बापू गोखले यांस समजवावा, ते उत्तर करतील. तेव्हां दीक्षित यांणीं मशारनिल्हेयास मजकूर समजाविला. त्यांणीं उत्तर केलें कीं येथें त्यांस बहुमानें आणिलें आहे; तरी तुम्हीं आपले बेटांत जाऊन उतरांवे. असें उत्तर दीक्षित यांणीं इंग्रजांस सांगितलें. तेव्हां त्याणें यांचा जोर भारी असें बघून गारपीर सोडून जाऊन बेटापलीकडे उतरला. पुढें आश्विन वद्य ११ शके १७३९, ईश्वर संवत्सरी पुण्यांत हूल पडली कीं फिरंगी तयार जाहला. अशी आवई लोकांनीं खाऊनीं दुकानें बाजार बंद जाहाला. दोन प्रहरीं खासा स्वारी निघून पर्वतीस गेली. स्वारी ते दिवशीं घोडयावर होती. मागें गोखले व पुरंधरे वगैरे सरदार मंडळी जमुनी गेली. तेथें पाह्यरीवर बापू गोखले घोडयावरून उतरून पायावर डोकी ठेविली कीं मला आज्ञा असावी. ते वेळेस प्रभू साक्षात् सांब अवतार आशीर्वाद दिला कीं बाळाजी विश्वनाथ याचे पुण्य तुम्हांस तारो, सद्दी चालो. तेव्हां सर्वांनी पायावर डोकी ठेविली आणि आज्ञा घेऊन औंदचे मैदानांत गेले. त्यांची पलटणें खडकीच्या तळावर तयार जाहाली. दिवस पांच घटका राहिला. ते वेळेस यांची त्यांची लढाईची सुरवात जाहाली. नारो विष्णू याजकडील फौज X X X X जाहाली. तेव्हां इंग्रज आपले ठिकाणीं शिकस्त जाहाले. यांजकडील त्यांजकडील मिळून माणूस दोन हजार कामास आलें. पुढें ते आवळून खडकीवर तयार. यांजकडील फौजा गणेशखिंडीचे मैदानांत तयार. असें चारी प्रहर तेथें राहून प्रात:काळी सारे राजदर्शनास पर्वतीस आले. तेथें मसलत करून खासा स्वारी दोन घटका रात्रीस शुक्रवारचे वाडयांत आले. बारा घटका रात्रीं द्वादशीस निघून डेरा दाखल जाहाले. पुढें नित्य त्यांची यांची टाटू रोज होत चालली. विंचुरकर फितुरी अशी (बातमी) लष्करांत व शहरांत समजली. नारो विष्णू यांणीं नित्य कांहीं बैल वगैरे त्यांचे आणिले. पुढें अशी बातमी आली कीं नगराहून पलटणें तीन घेऊन दपटीन साहेब येत आहे. अशी वदंता येतांच नारो विष्णू पाच हजार फौज व दोन तोफा घेऊन गेले. आणि त्यांची यांची लढाई होत होत तिसरें दिवशीं साहेबाची खराबी बहुत होऊन खडकीस येऊन मिळाला. नारो विष्णू यांणीं दोन हजार बैल व चार गोरे धरून घेऊन आले. पुढें कार्तीक शुध्द ७ सप्तमीस दोन प्रहरीं इंग्रज यांणीं खडकी जवळ आहे ती सई केली. ते दिवशी गोखले व पुरंधरे छबिन्यास गेले. चारी प्रहर छबिना करून प्रात:काळी आपले लष्करांत आले. तेच दिवशीं रा चिंतामणराव आपा येऊन पोचले. तोफखान्यांतील महांकाळी तोफ गणपतराव पानशे यांणीं काढून नेली. तीहि लष्करापुढें सरकारचा तोफखाना तोफा सुमारी २० होत्या. तेथें नेऊन ही लाविली. ऐशी व्यवस्था शुध्द सप्तमीचे दिवशीं जाहाली.

श्रीमंत मोंगलाकडील कार्यभाग आटपून परभारें कर्नाटकांत भाऊसाहेबसुध्दां गेले. प्रथम श्रीरंगपट्टणास जाऊन तेथील खंडणी घेऊन छ १४ जमादिलावल रोजी (२० मार्च १७५३) ह्मणजे फाल्गुन वद्य १ मंगळवार रोजीं तेथून कूच करून होळी हुन्नर  किल्ल्यावर मोर्चे बसवून तो किल्ला सर करून सरकारांत घेतला. त्या लढाईत कृष्णाजी पलांडा मयत झाला. सबब याचे पुत्रास मुलुखची पाटीलकी दिली. नंतर धारवाड किल्ला सर करण्यास आले. तेथें किल्लेदार पृथ्वीसिंग मोंगलाकडील होता. त्याशीं लढाई झाली. नंतर सल्ला होऊन त्यास पस्तीस हजार रुपये देऊन छ ९ रज्जब रोजीं (१३ मे १७५३) त्याजकडील अम्मलदार घासीखान याचा लेक पेशवे यांनी ओलीस आपलेकडे ठेविला. किल्ला हस्तगत झाल्यावर दुसरे दिवशी छ १० रज्जब रोजीं (१४ मे १७५३) त्यास सोडून दिलें. करवीरकर महाराज यानीं भाऊसाहेब यास पेशवाईपदाबद्दल तीन किल्ले ईहिदे खमसैनांत देऊं केलेले या सालीं भीमगड व पारगड व विभर्गी असे तीन किल्ले व त्याखालील महाल खानापूर वगैरे पेशवे यास संभाजी महाराजांनी दिले. मोंगल व कर्नाटकसंबंधी काम आटपून श्रीमंत पुण्यास पावसाळ्यांत आले. दादासाहेब पुण्यास कांही दिवस होते ते छ ३ सफर (१० दिशंबर १७५२) रोजी गुजराथचे स्वारीस निघाले ते छ ९ रबिलाखर (१३ फेब्रुवारी १७५३) अमदाबादेस दाखल झाले. छ २० रबिलाखर (२४ फेब्रुवारी १७५३) पासून ता. छ १० जमादिलावल (१६ मार्च १७५३) शुक्रवारपर्यंत लढाई सुरू होती. धनाजी थोरात व शहाजी चौधरी सरकाराचे सरदार ठार झालें, छ १४ रबिलाखर (१८ फेब्रुवारी १७५३) रविवार. जवानमर्दखान मोंगलाकडील अमदाबादेस होता. तो वेढा घालून बसला होता. त्यास पट्टण अथवा पंचराथनपुर वगैरे महाल देऊन किल्ला घेतला. या युध्दांत नारो शंकर राजेबयाद्दर यांनी मोठा पराक्रम केला होता. अमदाबादेस पेशवे यांनी ठाणे घालून आपला मामलेदार ठेवून उत्पन्न होईल तें निम्मे गायकवाड व निम्मे पेशवे यांनी घ्यावें असें ठरलें. अमदाबाद किल्ल्याचे सर्व दरवाजांचे चौकीपाहा-यांचा बंदोबस्त पेशवे यांनी केला. एकंदर व्यवस्था गायकवाड यांजकडे असावी असें ठरलें. अमदाबादची स्वारी करून दादासाहेब दत्ताजी शिंदे यास बरोबर घेऊन हिंदुस्थानांत परभारे गेले. यास खंडेराव होळकर मिळाले, त्यासुध्दां अजमीर प्रांती गेले. किल्ले कर्नाळा छ १६ रज्जब (२० मे १७५३) वैशाख व॥ ३ रोजीं सर झाल्याचें वर्तमान आलें. हडसर किल्ला सर होऊन सरकारांत आला. अमदाबाद फत्ते झाल्याची खबर श्रीमंतांस छ २० जमादिलाखरीं (२५ मे १७५३) समजली. छ १४ जमादिलावल (२० मार्च १७५३) रोजी बाई, नानासाहेब यांची मातोश्री वारली. भाऊसाहेबांस छ २२ जमादिलाखरी (२७ मे १७५३) समजलें. दमाजी गायकवाड याजकडून गुजराथप्रांताचा ऐवज दाभाड्याबद्दल ५२५००० करार केला. 

शिंदे, होळकर उभयतां अवरंगाबादेहून श्रीमंतांस जाऊन भेटले. श्रीमंतही होळकरांचे डे-यांत भेटावयास गेले होते. नाजुद्दीनखान अवरंगाबादेस आल्यावर त्याचेजवळ मसलतगार सैद हशमतखान व महंमद अनवरखान होते. त्यांनीं श्रीमंतांस सांगून पाठविलें की, भागानगराहून बोलण्याकरितां निंबाळकर व सैदलष्करखान आले आहेत, त्यांस निरोप न देतां आपण त्यासुध्दां शहागडावर यावें, आपले व आमचे विचारें ठरेल तसें करा. त्यावरून श्रीमंतांनी कूच करून निंबाळकर व सैद लष्करखानसुध्दां शहागडावर गेले. गाजुद्दीनखान याचा व पेशवे याचा असा तह ठरला होता की, तुची निजाम पदवी तुह्मांस देवविली असतां तुह्मी आह्मांस व-हाडचे पश्चिमेस तापीपासून गोदावरीपर्यंत मुलूख द्यावा असा ठराव झाला होता. परंतु गाजुद्दीन यास निजामअल्लीचे मातोश्रीनें अवरंगाबादेस जेवणास बोलावून विषप्रयोग करून मारिलें. ही खबर श्रीमंतांस कळतांच त्यांनी बोलण्यास आलेले निंबाळकर व सैद लष्करखान यांस निरोप दिला व होळकर यास हिंदुस्थानांत पाठविलें व शिंदे देशी राहिले. पुढें गाजुद्दीन याणें देऊं केल्याप्रमाणें गाजुद्दीन मेल्यामुळें सलाबतजंग देण्यास हरकत करूं लागला. तेव्हां पुन: होळकर यास येण्याविषयीं पत्र पाठवून बाकीची फौज जमा करून पेशवे लढाईस सिध्द झाले. सलाबतजंगही मोठे फौजेनिशी पेशवे यांचे फौजेवर ग्रहणाचे दिवशी पौर्णिमेस छापा घातला. नंतर दुसरे दिवशी मोहरम महिन्यांत (डिसेंबर १७५२) लढाई झाली. त्यांत महादजी अंबाजी व दत्ताजी व महादजी शिंदे व कोन्हेरपंत एकबोटे वगैरे असामींनी लढाई देऊन मोंगलांशी झुंज केलें. ही लढाई भालकी मुक्कामीं झाली. तेव्हां गाजुद्दीन यानें देऊं केल्याप्रमाणें मुलूख देण्यास सलाबतजंग सिध्द झाला. परंतु रघोजी भोसल्यानें आमचे मुलुखांत पैनगंगा व गोदावरीचे दरम्यान ठाणीं घेतली आहेत ती उठवावी असे त्यानें बोलणे लाविलें. तेव्हां पेशवे यांनी मान्य केलें व भोसले यांनी ठाणी उठविली. सलाबतजंगानें तहाप्रमाणें जहागीर पेशव्यास दिली. व नगर व खानदेश जिल्ह्यांतील बहुतेक जहागीर अंमल व पुणे जिल्ह्यापैकी कांही भाग प्रांत जुन्नरपैकीं जहागीर पेशव्यांस आली. नंतर छ १८ मोहरम रोजी (२५ नोव्हेंबर १७५२) सलाबतजंग व पेशवे यांच्या भेटी झाल्या. पोषाग श्रीमंतानें त्यास केला, व श्रीमंतांस तिकडून पोषाग आला. होळकर यांस येण्याविषयी पत्रें गेली होती. त्याचें उत्तर त्यांजकडून आलें कीं, रोहिले पठाण कमाउंचे पहाडांत आहेत त्यांचें निर्मूल करावें असें होतें. परंतु स्वामीकडून एक दोन पत्रें आली कीं, कळेस तसा निर्गम करून तुह्मी येणें. त्याजवरून रोहिले पठाण व वजीर यांचा सल्ला करून घेऊन कूच करून भागीरथी उतरून दक्षिणतीरास आलों व वजीरही एक दोन दिवसांत येतील. मजल दरमजल येत आहेत त्यास वजिराकडून व दिल्लीकडून बातमी आली की, स्वामीचा व सलाबतजंगाचा तह होऊन सल्ला झाला. त्यास सल्ला झाला असेल तर तसेंच लिहून यावें. मजल दरमजल येतों. सल्ला झाला असेल तर हिकडेही कोण आहेत. जसें वाटत असेल तशी आज्ञा केली पाहिजे. 

श्रीशंकर.
पेशवाईच्या अखेरची अखबार.

राजाश्रियाविराजित राजमान्य राजश्री हरी विठ्ठल स्वामीचे सेवेसी :- पो॥ वेंकट बल्लाळ सा नमस्कार विनंति येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत असावें. विशेष. आपणाकडून अलीकडे कांहींच मजकूर समजत नाहीं; त्यास सविस्तर कळवावा म्हणून लिहिलें. त्यास, इकडील मजकूर राजकी देवकी लिहिला आहे. पाहून उत्तर यावें. कलयुगीं म्लेंच्छ मर्दून साधुप्रतिपालक केवल ईश्वरी अवतार श्रीमंत कैलासवासी बाळाजी विश्वनाथ यांचा जाला. त्यांज मागें बहुत लढाया मारून दुष्टसंहार करीत करीत आले. त्यांचे पाठीं श्रीमंत कैलासवासी माधवराव बल्लाळ यांनींही प्रताप तसाच केला. पुढें ते निजधामास गेले. मागें श्रीमंत कैलासवासी नारायणराव यांणींहि थोडेच दिवस राज्य करून कैलासास गेले. पुढें श्रीमंत कैलासवासी रघुनाथ बाजीराव यांणीं राज्य कांहीं दिवस केलें. पुढें श्रीमंत कैलासवासी माधवराव नारायण होऊन चोवीस वर्षे राज्य करून वैकुंठास गेले. त्यांपुढेंश्रीमंत महाराज बाजीराव रघुनाथ राज्य करीत असतां पदरचे सरदार होळकर व शिंदे यांची लढाई पुणेयावर होऊन महाराज वसईस गेले. पुढें जळचर यांशीं आणून राज्य करूं लागले. त्यावर चवदा वर्षें राज्य प्रभू यांणीं जशी प्रजापालन करणें ती केली. पुढें बडोद्याहून गंगाधर शास्त्री येथें आला. त्यामुळें कलहास आरंभ जाहला. पुढें दोचहूं महिन्यांनीं येथील प्रभूचे कारभारी सदाशिव माणकेश्वर व जळचराकडील वकील मोधीशेट या उभयताला काढून आपण कारभार करावा असें शास्त्री याचे मनांत आले. तेव्हां मोधी यांणीं प्राण दिला. प्रभू यांसी बहुत अवघड पडलें. तेव्हां श्री पंढरीचे यात्रेस सर्व मिळून गेले. तेथें शास्त्री यासी दगा जाहला. पुढें जळचर याणें प्रभूवर निमित्य घेतलें कीं शास्त्री यासी दगा आपले कडील माणसांनीं केला. त्यास, आमचे स्वाधीन तीं माणसें करावीं. तेव्हां बहुत संकटेंकरून त्रिंबकजी डेंगळा यास स्वाधीन केलें. त्याणें नेऊन साष्टीचे बेटांत कैद करून ठेविलें. कित्येक दिवस कैदेंत राहून डेंगळे यानें पलायन केलें. पुढें तो आपज्याळ प्रभूवर जळचरांनीं आणून जाबसालांत कोंडून कुंठित केलें. पुढें प्रभूची स्वारी फुलगांव आपटीस गेली. तेथें वाटेनें रथ मोडून हात दुखावला. तेव्हां स्वारी तीन मास राहून पुणें मुक्कामीं आली. तेव्हां इंग्रज याचे बोलणें कीं डेंगळा पळविला तुम्हीं व पेंढारी आणिले तुम्हीं.याचा बंदोबस्त करावयास तुह्मांस सांगत असतां तुमचेनें होत नाहीं. तेव्हां आम्हांस बंदोबस्त करणें प्राप्त. याजकरितां कांहीं पलटणें येथें ठेवावीं लागतात. त्यासी, मुलूख तुम्हीं आम्हांस द्यावा. न द्याल तरी आह्मीं तुम्हापासून घेऊं. ऐसे ७ सप्तमीस हें वर्तमान होऊन, इंग्रज यांणीं शहर पुणे याची नाकेबंदी केली. तेव्हां सदाशिव माणकेश्वर मधें पडून जाबसाल ठरविला कीं तीन किल्ले तूर्त घ्यावे. मग बोलणें जें होणें तें होईल. तेव्हां तीन किल्ले इंग्रज याचे हवालीं केले:- किल्ले रायगड, किल्ले सिंहगड, किल्ले पुरंधर, एकूण तीन किल्ले देऊन वेढा उठविला. पुढें वारी श्रीपंढरीची आली. तेव्हां स्वारी जाणें. अवकास थोडा. तेव्हां जो मुलूख पाहिजे तितका त्यांस देऊन, अजमासें लाख छत्तिसाचा देऊन, स्वारी श्रीस गेली. पुढें तेथें मास एक राहून माहुली क्षेत्रीं आलें. तों येथे पुणें मुकामीं हें केलें हें टीक नाहीं असे समजून हैदराबादेहून मळकट साहेब म्हणून एक मोठा माणूस इंग्रजांकडील आला आणि स्वारी माहोलीस आली असें समजल्यावर तेथें गेला. बरोबर दीक्षित नाना ही गेले. तेथें जाऊन कांहीं जवाहीर नजर करून बोलिला कीं महाराजांनी X X X X वाईट केली. हालीं मी आपलें सारें माघारें (देतों. हें बोलणें) प्रमाण कशावरून ? तेव्हां सांगितलें कीं आज पासून दहा दिवशीं आपले किल्लें आपल्यास देतों.त्याप्रमाणें किल्ले माघारें दिल्हे. आणि मुलूख द्यावा तो अल्पिष्ट त्याचें ऐकेना. सबब तो निघोन गेला. किल्ले मात्र त्याचे हस्तगत जाहाले. तेथें मसलतीचा घाट घालून राजश्री बापु गोखले, गोविंदराव काळे याणीं मससती करून घाट असा केला कीं (इंग्रजांशीं लढावें). ऐसा निश्चय करून (तयारीस लागले). पुढें मोर दीक्षित कामामध्यें इंग्रजांचे वागूं लागले. पुढें फौजा जमा भारी केल्या.

साष्टीमुंबईहून जहाजें आणून निघोन गेला. गाडर इंग्रजांनी हिंदुस्थानांत जागा जागा लढाया करून शेर होऊन त्या तऱ्हेनी इकडे आला होता. परंतु स्वामीच्या तेजप्रतापेंकरून शत्रूचें पारिपत्य करून पराभव केला. महाराष्ट्र राज्यसाधनाचें वृत्त विस्तारे सारांश लिहिला आहे. त्यांत मुख्य शिवाजीमहाराज यांणीं स्वत: साहसकर्म करून राज्यसाधन केलें. त्यांचे मागें शाहूमहाराजांचे तेजप्रतापें श्रीमंत बाळाजीपंतनाना व बाजीरावसाहेब व नानासाहेबीं त्याहीपेक्षां राज्यवृध्दी केली. शाहूमहाराजांचे मागें राजारामसाहेबीं राज्यासनीं आरूढजाहल्यावर नानासाहेब व माधवरावसाहेब यांणीं शत्रू पादाक्रान्त करून त्याहीपेक्षां राज्याचीवृध्दी अधिक केली. राजारामसाहेबीं सत्तावीस वर्षें राज्य केलें. त्यांसी वेथा होऊन वेथित होते. पोटीं पुत्रसंतान नाहीं. महाराजांची वंशवृध्दी चालवून राजमुद्राविराजित राज्य शोभिवंत असलें पाहिजे. याजकरितां स्वामींनी विचार करून महाराजांचे गोत्रपुरुष त्रिंबकजी भोसले वाईकर यांचा पुत्र आणून सुमुहूर्ती दत्तविधान करून, महाराजांचे मांडीवर बसवून शाहूराजे नांव ठेविलें. त्याजवर शके १६९९ हेलंबी नामसंवस्सरीं मार्गशीर्ष शुध्दपक्षीं राजाराम साहेब कैलासवासी जाहाले. त्याजनंतर शके १७०० विलंबीनामसंवत्सरीं मार्गशीर्ष वद्य ८ सन तिसा सवैनांत सुहूर्तें राज्याभिषेक करून राज्यारूढ केलें. त्यास, या महाराजांचे कारकीर्दीस खाम प्रतापी आहेत. इंग्रजांनीं हिंदुस्थानांत व दक्षिणेंत सौखी केली. गर्व होऊन सरकारांत अमर्यादा करून लढाईस सन्मुख जाहाले. त्यांचें पारिपत्य स्वामींनीं सरदार फौज पाठवून पारिपत्य करविलें. स्वामींचे तेजप्रतापें करून इंग्रजांनीं तह करावयासी वकील पाठविले. हात जोडून अर्जमात केला. त्यांणीं घेतलेले किल्ले वसई व बेलापूर व कल्याण व अमदाबाद देखील मुलूख सरकारांत दिल्हा. यास्तव राजश्री माहादजी शिंदे यांणीं, त्याचे बाजिदीवर चहोंकडील बखेडा तुटोन, राज्याचा बंदोबस्त होता त्याजवर नजर देऊन, सरकारचा दाब बसवून तह केला.*

 नबाब निजामलीखान, सासुभे दक्षणेचे सुभेदार, तेही स्वामींसी फार निखालसपणें वर्तत होते. लग्नसमयासी आपण यावें, हें त्यांचेही चित्तांत गतवर्षापासून होतें. परंतु यंदा जाबतजंगाच्या मसलतीस गुंतले याजमुळें त्यांनीं आपले पुत्र पोलादजंग व तवहारजंग कारभारी यांसी फौजबराबर देऊन पाठविलें. महाराजही साताऱ्याहून कृपा करून आले.लग्नाचा समारंभ राजश्री नानांनी मंडप, कापड व आरशाचे, वाडयांत व बागांत व वधूमंडप फारच तऱ्हेचे केले. व कागदी बाग व मेणाचीं झाडे तऱ्हेतऱ्हेचीं केलीं. आतषबाजीचें दारूचें काम फार केलें. कळसूत्रीचा रथ व थोर चवरंग व तक्तरावे करून, माणसाचे खांद्यावर देऊन, त्याजवी कळवंते स्वारी चालतां वधूमंडपावेतों जातां येतांना चिठीकागदीबाग चालवावे; सरकावाडयापासून वधूमंडपापर्यंत दिवे व चिराखदान व हिलाल दुरस्ता सारी रात्र लावावे; शहराभोंवत्या व शहरांत नाकेबंदी फौज व गाडदी ठेऊन कुल गलबला सभोंवता होऊं न द्यावा; या रीतीनें बंदोबस्त केला. नूतन कल्पना करून आरास फार चांगली केली. थोर थोर शिष्ट ब्राह्मणांस आमंत्रणें व पालख्या व घोडीं पाठवून आणून, ब्राह्मणभोजनाचा समारंभ करून, दक्षणा, वस्त्रें, स्वरूप पाहून अपार दिल्हीं. महाराजांच्या सेवेसी समारंभेंकरून वस्त्र, अलंकार, हत्ती, घोडे नजर देऊन महाराजांची स्वारी सातारियासी गेली. यांवर नबाबाचे पुत्र आले होते ते पंधरा दिवस पुणियास राहून, वाडयांत येऊन, भोजन करून, रागनृत्य पाहून स्वइच्छेनें येणें जाणें करीत होते. त्यांचे लष्करांत व सरदार राज्यांतील यांच्या लष्करास सामुग्री सर्व साहित्य दिल्हें. नवाबाच्या पुत्राची व सरदारांची मुदारत यथायोग्यतेनुरूप वस्त्रें, अलंकार, हत्ती, घोडे बहुमान करून ते निरोप घेऊन आपले स्वस्थळास गेले. सरकार दौलतींतील व देशोदेशींचे वकील व मुत्सदी, शिलेदार, कारकून, दरकदार, जमीदार, देशमुख व देशपांडे, पाटील, कुळकर्णी, बारा बलाते आदीकरून सर्वांसी वस्त्रें व भोजन बहुमान यथायोग्यतेनुरूप दिल्हें. या प्रकारें लग्नसमारंभ जाहला. फडणीस याणीं यथास्थित केला. या प्रकारें पूर्वीपासून राज्यआक्रमणाचा इतिहास जाहला ह्मणोन साद्यंत संकलित निवेदला आहे. निवेदन जाहला ह्मणजे साद्यंत ध्यानास येईल. श्रीमंत सवाई माधवराव अवतार धारण केल्यापासून अलीकडे सडयांनी पुण्यापासून दिल्लीपावेतों लाखों रुपयांचा जिन्नस, सोनें, रूपें व जवाहीर घेऊन गेलें असतां मार्गांत निर्भय जाऊन यावें, याप्रमाणें स्वतेजप्रतापेकरून सहज रीतीनें बंदोबस्त आहे. पूर्वी महाराज राजे राज्यरीती करून राज्य चालवीत होते त्या अन्वयें नीतीकरून, राज्याचा उपभोग करून, प्रजापालन होत आहे. ही कीर्ति दिगंतरी विराजली आहे. तेथें सेवकांनीं विस्तारें वर्णन काय करावें ? सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.

सु॥ सल्लास खमसैन मया व अलफ, सन ११६२ फसली,
अवल छ २० रज्जब, २४ जून १७५२,
ज्येष्ठ वद्य ७ शके १६७४.

छ १६ रमजान आषाढ व॥ २ सह शुक्रवार (१७ जुलै १७५२) श्रीमंत नानासाहेब व भाऊसाहेब व दादासाहेब मुहूर्तानें निघून सोमवार पेठेंत राहिले. दादासाहेब थेऊरास गेले. श्रीमंत नाना व भाऊसाहेब छ ७ सवाल रोजी (६ आगस्ट १७५२) वानवडीवरून पुढें पाटसाकडून मोंगलाईत मीडसांगवीकडे गेले. दिल्लीकडून वर्तान अहमदशा अबदाली दिल्लीस असतां अफगाण बादशहा दिल्लीवर येऊं लागला तेव्हां लाहोरचा अधिकारी यानें त्यास खंडणी देऊन माघारा फिरविला. त्यासमयीं सफदरजंग वजीर दिल्ली याचे मनांत आलें की, रोहिले लोक मोठ्या योग्यतेस चढले असून हल्ली ते आपआपसांत तक्ताविषयी भांडतात यावरून त्यांस जिंकावयाची हीच संधि बरी आहे. ह्मणून त्यांवर स्वारी करून, तो रोहिल्यांचा मुलूख घेऊन, आपला हस्तक नेवलराई या नांवाचा कायत यास ठेवून आपण दिल्लीस माघारा आला. नंतर रोहिले यांनी मिळून त्या कायतास मारून टाकिलें. त्याजवर पुन: सफदरजंग यानें स्वारी केलीं; परंतु त्यांस जय आला नाहीं. इतक्यांत नासिरजंग मेल्यावर त्याचे जागीं दक्षिणेंत दुसरा सुभा यावा हें राजकारण करण्याविषयीं पेशवे यांनी शिंदे, होळकर यांस लिहिलें होतें ते या वेळेस दिल्लीस होते. त्यास सुरजमल्ल जाट यास आपले साह्यास घेऊन सफदरजंग रोहिले यावर गेला. तेव्हां रोहिल्यांचा मुलूख घेऊन या साहाय्याबद्दल शिंदे, होळकर यांसही कांही मुलूख दिला. अफगाण बादशहा पुन्हा दिल्लीवर आला. तेव्हां सफदरजंग वजीर दिल्लीस नसतां त्यास येण्याविषयीं बादशहानें पत्र लिहिले; परंतु तो येण्याचे पूर्वीच बादशहानें लाहोर व मुलतान प्रांत त्या अफगाण बादशहास देऊन परत पाठविला. नंतर वजीर दिल्लीस आला तेव्हां बादशहास समजलें की, अफगाण बादशहास काढून टाकण्याबद्दल वजिराने मराठ्यांस घेण्याचें ठरून साहाय्य करण्याचें ठरविलें होतें. त्या वजिराचे कामासाठी मराठ्यांनी रोहिल्यांपासून पन्नास लक्ष रुपये घेण्याचे बाबतीत पत्र लिहून घेऊन मुलूख सोडविला होता. तेव्हां मराठ्यांचे उपकार आपल्यावर झाले, याजबद्दल त्यांस काय बक्षीस द्यावें व काय काम सांगावें या विचारांत वजीर होता. इतक्यांत सलाबतजंग जिंकावयाकरितां शिंदे, होळकर यांस पेशवे यांनी बोलाविलें होतें. तेव्हां सफदरजंगानें गाजुद्दीन यास दक्षिणेची सुभेदारी देऊन त्याजबरोबर शिंदे व होळकर यांस देऊन याचे कार्याविषयी तुह्मीं उभयतां पेशवे यांचें साहाय्य करावें असें सांगून दक्षिणेंत रवाना केलें. ही बातमी फेरोजंगास कळली. त्याजवरून सलाबतजंग व बसालतजंग व निजामअल्ली व मोगलअल्ली भागानगरास असतां त्यानें दिल्ली बादशहास पत्र लिहून पेशवे यांजकडे शहानजवाखान ऊर्फ सैदलष्करखान व जानोजी निंबाळकर यांस भेटण्याकरितां पाठविलें. इतक्यांत दिल्लीहून गाजुद्दीनखान यास बरोबर घेऊन देशी येतांना होळकर यानीं मोंगलाकडील किल्ले मार्कंडा, इंद्राई, चांदवड व धोडप, कान्हेरा, राजदेहर व काळदेहर येणेंप्रमाणें सात किल्ले घेतल्याची खबर छ १९ सवाल श्रावण व॥ ६ (२९ आगष्ट १७५२ बुधवारी) कळली. गाजुद्दीन यासह शिंदे, होळकर छ २१ जिलकाद रोजी भाद्रपद व॥ ७ (३० सप्टंबर १७५२) अवरंगाबादेस दाखल झाले. हे सात किल्ले घेतले त्याच वेळेस चांदवड परगणा फत्तेसिंग काळे याजकडून घेतला असावा. कारण हा परगणा सरकारांत आल्याबद्दल नवस छ २६ सवाल रोजी (२५ आगस्ट १७५२) फेडिला होता. 

हरी गोपाळ यास सरदारी दिली व नारो अप्पाजी यास पुण्याच्या सुभ्याचे कारभारावर पाठविलें. दमाजी गायकवाड यास कैद करून पुण्यास ठेवून पेशवे कारभार करू लागले. तेव्हा आईसाहेबांनी मोरो शिवदेव यास चिटणीशी सांगितली. राज्यकारण करूं लागली. प्रतिनिधीचेनीं काही होत नाहीं, सबब जगजीवन परशराम यास पद दूर करून बाबूजी नाईक यास द्यावें, या बेतानें नाईक फौजेसुध्दा साता-यास आले. प्रतिनिधींचे तालुके घ्यावयास गेले. तेथें तांदुळवाडीनजीक लढाई होऊन नाईकास जखम लागली. पळून बारामतीकडे गेले. साता-याचा बंदोबस्त असावा ह्मणोन दादोपंत वाघ दहा हजार फौज देऊन पाठविलें. चंदनवंदननजीक छावणी करून राहिले. तेव्हां आईसाहेबाकडील बखेडा मोडला. रघोजी भोसले वारले. त्याच्या धाकट्या बायकोचा परंतु वयानें वडील जानोजी यास सेना साहेब व सुभ्याची वस्त्रें दिली. वडील बायकोचे परंतु मागाहून झाले. सबब यास नवें पद सेनाधुरंधर दिले. छ २ रबिलाखर फाल्गुन शु. ३. दमाजीचा भाऊ खंडेराव यास नवीन परगणा व भडोच सुभा देऊन त्यास बाळाजीनें तिकडे घालविलें. रघोजी भोंसला असतां त्याणीं आपला पुत्र जानोजी कर्नाटकांत गेलेला परत आल्यावर या साली त्यास बंगल्यांत मीरहबीब याचे साहाय्यास पाठविलें होतें. त्यासमयीं अल्लीवर्दीखान याणें निरुपाय होऊन कटक प्रांतांतील बक्सरपर्यंत मुलूख मीरहबीब यांचे स्वाधीन केला. पुढे रघोजीचा पुत्र जानोजी ह्याचे व मीरहबीब यांचे दरम्यान तंटा उत्पन्न होऊन शेवटीं त्या मीरहबीबास त्या भोसल्यानें कैदेंत ठेविलें होतें. त्यास तो प्रतिबंध सोसवेनासा होऊन चौकीदारावर जाऊन त्यांत तो मारला गेला. अल्लीवर्दीखानानें रघोजीस कटक प्रांत दिला. त्यावेळेस रघोजीनें बंगाल व बहार प्रांतांचे चौथाईबद्दल बत्तीस लक्ष रुपये घेतले. नंतर बंगाल्यांत शिरून त्याणें गाविलगड व नरनाळा व माणीकदुर्ग हे तीन किल्ले घेतले. यानंतर मोंगलाचें लष्कर पुण्याकडे चाललें अशी खबर ऐकून गंगा व गोदावरीचे दरम्यानचे मोंगलाकडील मुलुखांत खंडणी घेऊन भोंसले यांणी जागोजाग आपली ठाणीं बसविली. दमाजी गायकवाड मुक्त करतेवेळेस त्याजकडून पंधरा लक्ष रुपये पहिले खंडणीबद्दल त्यानें द्यावे, नंतर निम्मे गुजराथचा भाग द्यावा, व नवीन मुलूख सुटले त्यांतही निम्मे भाग द्यावा, व जे समयीं स्वारी होईल तेव्हां दहा हजार फौज चाकरीस पाठवावी, व दाभाडे याचे मुतालकीबद्दल पांच लक्ष रुपये द्यावे, व पेशवे यांची ठाणीं बसविल्यास मदत करावी, शिवाय सातारकर राज्यासही खर्चास देत जावें, असें कबूल करून दादासाहेब यांजकडे पाठविला. जानोजी भोसल्यास सेनासाहेब सुभ्याची वस्त्रें दिली, त्या वेळेसही त्याजकडून सातारकर राजे ह्यांचे खर्चास दरसाल नऊ लक्ष रुपये देत जावे, व आज्ञा होईल त्या वेळेस दहा हजार फौज चाकरीस पाठवीत जावी, अशी कबुली करून घेऊन मग वस्त्रें दिली. 

त्यास, साबाजी भोसले गंगाथडीस धामधूम करीत होते. त्यांचे पारपत्यास दादासाहेबीं त्रिंबकराव मामाबरोबर फौज देऊन पाठविले. त्याणीं भोसले यांस सामील करून घेऊन पुरंदरच्या मनसुब्यास सामील जाहले. हे वर्तमान दादासाहेबांस कळतांच माघारे फिरोन दरमजल कृष्णातीरास आले. निजामअल्लीखान फौजसुध्दा येऊन मामास सामील जाहले. दादासाहेब पंढरपुरास गेले. त्रिंबकराव मामा फौज दहा पंधरा हजार घेऊन, नवाब भोसले यांस मागें टाकून, आपण जाऊन लढाई होता मामास धरून नेले. तेव्हां फौज पळों लागली. त्यास, राजश्री हरिपंत याणीं हिम्मत धरून, थोर धाडस करून, फौज व सरदार जमा करून, त्यांचें मनोधारण बहुता रीतीनें सरदारी सावरून व साबाजी भोजले यांस भेटून पुढें आले. दादासाहेब दरमजल बऱ्हाणपुरास गेले. त्यांस सर्वांचे पालग्रहण करावयाकरितां शके १६९५ मध्ये स्वामींनी अवतार घेतला. हे संतोषाचें वर्तमान सरदार व फौजेस कळोन दादासाहेबापासोन निघोन हरिपंत यांस भेटले. दादासाहेब दरमजल नर्मदातीरास जाऊन पार गेले. तुकोजी होळकर व महादजी शिंदे यांच्या भेटी जाल्या. त्याजवर हरिपंत फौजसुध्दां नर्मदा पार गेले. दादासाहेबाच्या समजाविशीचा मजकूर करून त्यास घेऊन बेरूळास आले. इकडून नाना व सखारामपंत आले. त्यास, दादासाहेबास संशय होऊन माघारे फिरोन दरमजल गुजराथेस गेले. पाठीवर हरिपंत व शिंदे व होळकर गेले. लढाई होऊन ते सडे भावनगरास जाऊन जहाजांत बसोन मुंबईस गेले. हरीपंत व उभयता सरदार देशीं आले. त्यास, श्रीमंत भाऊसाहेबांचे नार्वे तोतया करेऱ्यास निर्माण जाला. त्यास आणून कैदेस ठेविला असतां रत्नागिरीस फितूर करून बळाऊन कोंकणचे किल्ले आक्रमिले. तेव्हां स्वामींनी महादजी शिंदे व भीवराव यशवंत पानसी यांस पाठवून तोतयाचें पारपत्य केले. त्यास, सन तीसा सबैनांत दादासाहेबास इंग्रेज घेऊन, घाटमाथा येऊन, तळेगाव पावेतों आले. तेव्हां स्वामींनी नाना व सखारामपंत व शिंदे व होळकर यांस पाठविले. लढाई करून इंग्रेज जेर झाला तेव्हा तह करून मुंबईस गेला. दादासाहेबीं महादजी शिंदे यांचे विद्यमानें गंगातीरीं राहण्याचा करार केला. शिंदे यांही फौज व हरी बाबाजी बरोबर देऊन रवाना केले. त्यास, हरी बाबाजीपासून कांही अमर्यादा जाली. तेव्हां दादासाहेबांनी त्याचे पारपत्य करून दरमजल सुरतेस गेले. याजवर गाडर इंग्रेज कलकत्यास खुष्कीनें सुरतेस गेला. तेथून वसईस जाऊन किल्ल्यास मोर्चे देऊन बसला. तेव्हां सरकारांतून रामचंद्र गणेश व बाजी गोविंद यांस फौजसुध्दा पाठविले. त्यांणी वसईस जाऊन उपराळा करावा. त्यासी, गाडर इंग्रेज यांणीं गोखर्व्याचे दादरावरून मार्ग धरून बसला. तेथे लढाई पाडिली. मुंबईहून जहाजावर तोफा वगैरे लढाईचा सरंजाम आणून मोर्चे देऊन किल्ला घेतला. गाडराचे व सरकारचे फौजेचे झुंज होता रामचंद्र गणेश कामास आले. त्याजवर गाडर हावभरी होऊन दरकूच बोरघाटास येऊन खंडाळयावर राहिला. हरीपंत फौजसुध्दा कोंकणात होते. ते वर घाटीं येऊन अलीकडे खंडाळे याजवर पांच सात कोशांचे तफावतीनें राहिले. तेथून सडे स्वारीनें जाऊन तोफा लागू करून गोळे त्याजवर टाकीत होते. त्यास, खंडाळे तळघाटांत अडचणीची जागा; फौजेचा उपाय न चाले; परंतु महिना दोन महिने याप्रमाणे होते. त्यास, दाणावैरण इंग्रजास कोंकणातील येत होते व मुंबईहून जिन्नस सामान येत असे. याजकरितां हरीपंत यांणी तुकोजी होळकर व परशराम रामचंद्र फौजसुध्दां दुसरे घाटाने खाली पाठविले. त्यांणी जाऊन इंग्रजाचा दाणावैरण बंद केली. तेव्हां इंग्रजांस महागाईचा पेंच पडला. ते समयीं छबिन्याचे लोकांची नजर चुकवून रात्रीस कूच करून जाऊन घाटाखाली खालापुरास जाऊन मुक्काम केला. ते समयीं हरीपंत फौजसुध्दा घाट उतरून त्याचे पाठीवर पाऊण कोसाचे तफावतीनें रात्रीस उभे राहिले. इंग्रजांनी प्रहर रात्र राहतांच चंद्र सविसाचे रविलाखरी कूच करून चालिला. तेव्हां हरीपंत व सरदार व गारदी लोक व हशम यांणी लगट करून झुंजाचे तोंड लागलें, चिकाटी बसली, व तुकोजी होळकर व परशरामपंत यांणी अघाडीस तोंड लाविले. इंग्रज झुंज करीत करीत तीन कोस चौक गांव आहे तेथें गेला. तेथून मध्यरात्रीस चंद्र अठ्ठाविसाचे रविलाखरी कूच करून चालिला. ते समयीं सरकारच्या लोकांनी निकड करून झुंजाचें तोंड लाविले. तोफांची व बाणांची मारगिरी करून इंग्रजास जरबेस आणून शिकस्त केला. गाडर हिमतीचा माणूस, लढाईचा चांगला जंगी, सामान कवाइती फार चांगले, म्हणोन मोठे कसबानीं पनवेलीस जाऊन पोंचले. त्याचे लोक फार पडले व जखमी जाले.