[१०७] श्री. २३ मार्च १७११
राजश्री देशमुख व देशपांडे प्र॥ वाई गोसावी यांशी. अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने॥ जोत्याजी केसरकर सर खवास रामराम. सु॥ इहिदे अशर मया अलफ. प्र॥ मजकूरची फौजदारी राजश्री मोरो जिवाजी सेनाखासकील याचे हवाला केली असे. तरी तुह्मी याचे रजेतलबेंत वर्तोन वसूल देत जाणें. नि॥ जमीन आकार निम्में व मोहत र्फाबाब निम्में व जकाती निम्में, येणे प्र॥ मशारनिल्लेकडे उसूल देत जाणें. पेशजीजे कुलकैफीयत दाखल करून पेस्तर याचे रजेंत वर्तत जाणें. निम्में जमीनपैकीं जो उसूल राहिला असेल तो मजूरा घेऊन बाकी जो ऐवज निघेल तो मशारनिल्लेकडे उसूल देणें. देखील शेरी निम्में सरंजास दिला असे. तरी मशारनिल्लेकडे वसूल देत जाणें. जाणिजे. र॥ छ १४ हे सफर.