[११०] श्रीराम.
सेवेशी अपत्यें शिवाजी हरी कृतानेक स॥ नमस्कार. विनंति. उपरीं स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें पावलें. ब्राह्मणाचा म॥ लिहिला. त्यास तुळाजी आंगरे हुजूर येणार आहेत. आलियावरी मनोदयावरून नीट करून देऊं. तुळ्याविशी व शालाविशी लि॥ तर तुळ्या सिध्द आहेत. गाड्या पाठवून देणें. शालजोडीचा तल्लास करून पाठवितों.अंतर सेवेशी पडणार नाहीं. येविशी सविस्तर स॥ बाईसाहेबी लिहिलें आहे, त्यावरून विदित होईल. सेवेशक्ष श्रुत होय. हे विज्ञापना.