या विद्यमाने स्वस्तिश्री शके १६४० विलंबीनाम संवत्सर कार्तिक शु॥ द्वितीया भोमवासर ते दिनी सिदोजी बिन बहिरोजी घारगे क॥ निमसोड अग्रवादी याशी लेहून दिल्हा महजर ऐसाजे, - तुह्मामध्ये व पश्वमवादी सिदोजी बिन बहिराटजी घारगे देशमुख क॥ मायणी यामध्यें वेव्हार लागोन तुह्मी व ते भांडत दरबारांत राजश्री स्वामीचे शेवशी उभे राहून बरहाक धर्मता आपली मनसुफी करून विल्हे लाविले पाहिजे ह्मणून विनंती केली. त्याजवरून राजश्री समस्त गोतसभा मोक्षसर वतनदार बोलाऊन मज्यालशी केली आणि गोतावर शेफत घातली. वाराणशीत गोहत्या ब्रह्महत्याचें पातक आहे. धर्मता दोघाचे निवाडा तकरिरा मनास आणून करणें. त्यावर गोत नाइकांनीं जमानची तकरिरा लेहून द्यावी ह्मणून आज्ञा दोघां वादीयांस केली. मग तुह्मी दो वादी यांनी अर्ज केला कीं, पूर्वी जन, येणे पे॥ राजश्री प्रतिनिधींनी घेतले होते.
बतपशील | |
अग्रवादी संताजी बिन बहिरोजी व सिदोजी बिन मुधोजी व बजाजी बिन चंदजी व आनाजी बिन सूर्याजी घारगे देशमुख क॥ निमसोड १ |
पश्विमवादी सिदाजी बिन बहिराटजी घारगे देशमुख क॥ यणीं. १ |
यास जमान डोंगरोजी यादव देशमुख क॥ औंद. |
यास जमान सुलतानजी यादव देशमुख क॥ औंद. |