[१२७] श्री. १९ आगस्ट १७४९.
अखंडितलक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री मोरो शिवेदेव गोसावी याशी सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार. सु॥ खमसेन मया अल्लफ. येथील अर्थास निखालसतेस वाकीफ होऊन गेला. सांप्रत तुह्मी केलिया सर्व होतें, असें असतां विलंब व संशय ठेविला हें अपूर्व दिसलें! या उपरी सविस्तर दिनकर महादेव यास लिहिले आहे. ते समजाऊन घेऊन त्याप्रमाणे करणें. आमचे इतबारी प्रामाणिक जाणून तुम्हास म॥निलेशी बोलावल्याविषी लिहिले आहे. जेणेंकरून आईसाहेबांचे मनोदयसिध्दि आमचे ठायीं पहिल्यापेक्षा विशेष कृपा, राजश्री राजी, लौकिक उत्तम, हे तिन्ही अर्थ करणें. इतके लिहिले असतां न करा तर ईश्वर इच्छाप्रमाणें! जाणिजे. छ॥१६ रमजान.