Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

[१६१]                                                                    श्री.                                                  १ आगस्ट १७५१.                      

विनंति उपरी. पत्रें पाठविली ती पावलीं. लिहिलें वर्तमान साद्यंत कळले. आजी तीन महिने सागरी येऊन जालें, आपणांस तीन पत्रें पाठविली; परंतु एकही पत्राचें उत्तर न पाठविलें, ह्मणून लिहिले. जी पत्रें तुमची आली त्यांचे जबाब चिरंजीव काशिबाजवळ पाठविले आहेत. त्यांनीं तुह्मांस पावते केले असतील. इकडील कामकाज, दहाबारा गढी घेतली. यमुने पलीकडे भरताळे ह्मणून मातब्बर गढी होती, तिजलाही मोर्चे लाऊन, नांवावरोन उतरोन, तेही फते जाली. तेथील बंदोबस्त करून उदईक येथून कूच होईल. येथून चहू कोशावर एक गढी आहे, ती घेवोन, देशीहून मीरखान, दादूखान, राणोजी जगदळे, बिंबाजी ह्मसे, भवानजी जाधव, तुकाजी कवडे, आले ते दोचोरोजांनीं आह्मांजवळ येतील, त्यांची आमची भेट झाली ह्मणजे त्यांजला येथे बंदोबस्तास जें ठेवणें तें ठेवून आह्मी सागरी येतों. तूर्त तुह्मी सागरी राहणें. आह्मी तेथें येतो. सर्वांचे हिशेब होणें ते घेऊन, तुह्मांस ज्या जागा ठेवणें ते तजवीज करून ठेवून. तिळमात्र फिकीर न करणें. सागरीच राहणे. सागरी येतों. दसरेयासी तीर्थरूपांची रवानगी देशास करून. तुह्मांस जेथे ठेवणें तेथे ठेवून. फिकीर न करणें. मित्ती भादो वद्य ६. इकडे जमीनदारांनी मोठी फजिती केली होती. परंतु, श्रीमंतांचे पुण्येकरून बारा वाटेस गेले. नक्षच जाला. मुलूखहि वसला. हे आशीर्वाद.



[१६२]                                                                    श्री.                                                  १२ जानेवारी १७५१.                   

आशीर्वाद उपरी. श्रीमंतांनी कांही ऐवजांची निकड लावली आहे. त्यास, जरकरितां रदबदलीमुळे चार दिवस तकूब जाले, तर उत्तम जाले न जो, कांहीं देणेंच लागतें, तर लाखपावेतो देणेंच लागले तर कांहीं तुह्मांकडे असेल तो देणे. बापू शिदाप्पासुध्दा, वगैरे यात्रेकरूसुध्दां, बाकी भरतीस लागला ऐवज तर, जोशीबोवास पत्र लिहिलें आहे हें त्याजकडे पाठवून भरतीस ऐवज घेऊन येणें. जरकरितां तूर्त काम नसलें तर जोशीबावाकडे पत्र न पाठवणें. नाहीं तर व्याज वाढों लागेल. मित्ती माघ वद्य ११. शहरचें देणें पांच लाख जालें, येथें चार लाख, अशी वोढ जाली आहे. ऐवज निघत नाहीं. हुंडी वजिराचे कजियामुळें होत नाहीं. मित्ती. बहुत काय लिहिणें. हे आशीर्वाद.

                         

[१६०]                                                                    श्री.  २                                                 १५ मे १७५१.                        

पु॥ चिरंजीव राजश्री बाबूराव यासी आशीर्वाद. उपरि. याप्रमाणें परगणेयांचे वर्तमान. पंधरा वीस रोज सारे राहिले. बाकी सालगुदस्ताची होती ते तो पाटिलांस सोडून दिली. तेव्हां गावांवर आणून रब्बी काढविली. त्याजवर गल्ला स्वस्त, कोणी घेत नाहीं. गल्ले तैसेच आहेत. याजकरितां पैसा परगणेयात वसूल नाहीं. कर्जवाम, या प्रांतीं सावकारांशी सलूख होता, लाख दोन लाख समयीं मागितले; तर हुंडीपांडी मिळत होती, ते काम एकंदर राहिलें. एक रुपयाचें कार्य होत नाहीं. याजकरितां वरातदारांस ऐवज न पावला. त्यास, श्रीमंतांनीं दोन तीन जोडिया काशीद सावकारांचे रुपयेयाकरितां पाठविले. ते येऊन बसले. परंतु येथें इलाज नाहीं ! रोख रुपये घेऊन फिरले तरी हजार रुपयेयांची हुंडी घेत नाहीं. त्यास आमचा इलाज काय ? येथे बहुत इलाज केला, करीत आहों. परंतु सावकार ह्मणतात जे, आगरेयांत दुकानें सुचेताईनें बसतील. तेथून लिहिली सर्व जागा होतील, ह्मणजे हुंडीचीं कामें चालतील. त्यास आमचा इलाज काय ? दहा वीस हजार रोख वरात असती तर येथें देवितों, देतों. पुणेयांत रुपये दिल्हे पाहिजेत. हुंडीखेरीज कसा रुपया पावतो ? त्यास, तूर्त आह्मी तरतूद केली आहे. आगरे, छत्रपूर येथें माणसें पाठविली आहेत. त्यास, पठाणहि मारले गेले. याजउपरी सुचेताई होईल ह्मणजे हुंडी वरचेवर पाठवून देऊन. आह्मांस काळजी आहे. सारांश, पठाण मारिले न जाते, तरी आमचे अमल न राहते. जमीदार, पठाणसुध्दां, एक झाले होते. पठाणाचा मनसुबा पातशाही घ्यावयाचा होता. पातशाही हातांत न ये तर पातशाहास दबवून, वजिरास रून, वजीर, बक्षी व दिवाण आपण व्हावें. हा मनसुबा होता. श्रीगंगातीरीं बंदी बहुत केली, त्याचे फळ सध्यां पावला! असो. श्रीमंत राजश्री नानास्वामीचें पुण्य समर्थ आहे ! श्रीमंतांचे पुण्येकरून पठाणाचें यश आलें. नाहीं तर कांही लिहावेसें नव्हते ! तुरवाईवाला पठाणास मिळाला होता ! पाचशे स्वार, एक भाऊ, पठाणाकडे चाकर ! पंचवीस लक्ष रुपयेयाची जागीर पठाणापासून लिहून घेतली ! सिरोंज, सागर, त॥ भोवरासें, कुरवाई, व झाशी करारा, भदावर, कोचकनार, हे सर्व जागीर लिहून त्याणीं घेतली होती. आणि नित्य पठाणास सांगोन पाठवी कीं, ठाणें टाकोन जातात, हे देशी कुणबावा करितात, बाकीं सान आहेत, आषाढ जाला ह्मणजे हे देशास पळोन जातील, तुह्मी तिळमात्र फिकीर न करणें ! कागदपत्र सांपडलें. सारांश, इजतखानाचे जे स्वार त्या पठाणाकडे चाकर होते ते सर्व मारले गेले. लुटिले गेले. निदान फजीत जाला. असा बेइमान ! श्रीमंतांसहि लिहिले आहे. तुह्मीही साद्यंत सांगणे. येथें उभयतां सरदारहि त्याजवर इतराजच आहेत. वरकड किरकोळी जबाब लिहिलेत, त्यांचा जबाब आलाहिदा लिहिला आहे. चिरंजीव विसाजीपंत व चिरंजीव सो॥ बच्याबाई यांजला तूर्त पुणेयांस असो देणें. मार्ग सुबत्ता जालियावर माणसें येथून पाठवून, तेव्हां रवाना करणें. पुणेयांत त्यांजला रोख देणें, श्रीमंत र॥ महादाजीपंत बाबास, शिवजीपंत, धोंडोपंत, सखारामपंत यांसी पत्रें लिहिलें आहे. त्यांजला देणें. फर्मास त्यांची पाठविली त्याप्र॥ देणें. सोनेयाचे नग तयार जाले. मार्ग चालत नाहीं. सुबत्ता पाहोन रवाना करितों. देशी सुबत्ता जाली ह्मणजे पाठवितो. माणसे येतील ते नगही घेऊन येतील. बहुत दिवस नगास लागले. त्यास, दंगा इकडे. कारीगर न मिळे, याजकरितां लागले. तयार जाले. पाठवून देऊन. मित्ती ज्येष्ठ शु॥ १. बहुत काय लिहिणें. लोभ असो दीजे. हे आशीर्वाद.

                         

[१५९]                                                                        श्री.                          

पु॥ जिरजीव र॥ बाबूराव यासी आशीर्वाद उपरी. श्रीमंत र॥ महादाजीपंत बाबासी तुह्मी उत्तमप्रकारें स्नेह राखणें. वरकड वर्तमान पंधरा रोजांनी लिहीत जाणें. आमची जोडी नसली तर जोशीबाबाकडे पत्रें पाठविणें. तेथून ते अजुरदार करून सागरीं पावतीं करितील. ईश्वरें मोठे संकट इकडेही प्राप्त केले होतें ! परंतु श्रीमंतांचे प्रतापेंकरून अरिष्टनिरसन होऊन बोलबाला जाला. मोठा नक्ष जाला ! पातशाही बुडालीशी जाली. याजउपरी धर धरून, पातशास धीर देऊन, जें जें कार्य पाहिजे तें केलियास होई असा समय आहे. वरचेवर तुह्मांस लिहीत जाऊन. पुणेयाची वरात जाली. असामीवार रूपये

३२००००  कित्ता वरात कापडकरी
  ५२०००  कित्ता वरात तुह्मी प॥
------------------
३७२०००
   २६०००  विठ्ठलशिवदेऊ
-----------------
३९८०००

याजपैकी तूर्त लाख रुपयेयाची हुंडी अवरंगाबादेहून कर्ज घेऊन पाठविली आहे. त्यास थोडथोडा ऐवज देणे. तो आणीक मागाहून कांही ऐवज घेऊन पाठवितो. हुंडी येथे मिळत नाहीं. इलाज नाहीं. त्यास, सरकारी काशीद यथें आह्माजवळ आहेत. यमुना उतरून आलियावर त्याजला रवाना करून. हालीं जोशीबावाकडून लाख रुपये पाठविले आहेत. तजविजेनें थोडथोडे देणें. तो आषाढसीं आणीक ऐवज पाठवितो. तुह्मी कळेल तसें करून श्रीमंतासी विनंति करणें. श्रीमंत ह्मणतील कीं, ऐवज येणें, तुह्मी देत नाहीं. तर स्वामी ह्मणतात, ऐवज देणें खरा. परगणेयांत ऐवज एकंदर वसूल होत नाहीं. कर्ज हिंदुस्थानांत कजिया, यामुळें सावकारा बंद. इलाज काय करावा ? जर परगणेयांत चार दिवस न मिळाले तर कर्जवाम सावकारियांत मिळत होतें. त्यास, देशीं सावकारा बंद, आगरेयांत बंद, सर्वत्र बंद. इलाज काय करावा ? लाखों रुपये, सावकारियाखेरीज काय इलाज करावा ? रुपये घेऊन फिरलियास हुंडी न मिळे, असा प्रसंग आहे ! रुपये जे वरात जाली ते देऊन, परंतु चार दिवस मागें पुढे देऊन, ह्मणून बोलले. आह्मांस सत्वर लिहून पाठविणें. मोठा बखेडा ! सालगु॥ जमा जाली त्याची निम्मे जमा सालमजकुरीं हातास येत नाहीं. असो. प्रसंग सवंगाईनें जाला. आह्मी एकटेच नाहीं. सर्व माळवा वगैरे मामलेदारांची गत एकच आहे. तुह्मी वरचेवर वर्तमान लिहीत जाणें. पुणेयांत वस्तभाव, भाडेबिडे आहे, किल्लेयावर घर करून तेथें जतन ठेवणें. वारंवार काय लिहिणे? मित्ती ज्येष्ठ शुध्द २. बहुत काय लिहिणें. लोभ असो दीजे हे आशीर्वाद. केसोबा नाईक सरदेसाई व लक्षुण केशव यास पत्रें लिहिली, हें लक्षुमण केशव याजवळ देणें ह्मणजे तो त्यास प्रविष्ट करील. हे आशीर्वाद. चिरंजीव आप्पास आशीर्वाद. लिहिले परिसीजे. आपले कुशल वर्तमान लिहीत जाणें. लोभ असो दीजे, हे आशीर्वाद.

                         

बरें ! पुढें कार्तिकमासी तरी आले तरी कार्ये होतील. इकडील साद्यंत वर्तमान श्रीमंत राजश्री नानास्वामी, श्रीमंत राजश्री भाऊस्वामी, र॥ रामचंद्रबाबा, श्रीमंत र॥ दादा, यांजला पत्रें लिहिली आहेत. श्रीमंत साताराकडे, पुणेयांकडे असिले तर पत्र हेच काशीद घेऊन जातील. कूच असिले तर अजुरदार काशीद करून देऊन, अगर ह्याच लष्करीं पावत असें असिलें तर सोबत उत्तम लष्करी पावत असें लावून देऊन, श्रीमंताजवळ पावती करणें. तेथून जबाब येईल तो रवाना करणें. श्रीमंतांनी वराता आह्मांवर केल्या, त्यास पठाणाचे दंगेयाकरितां श्रीकाशी, प्रयाग, उजाड जालीं; आगरेयास उभयतां सरदार व वजीर एकत्र जालें; सबब मातब्बर सावकार दिल्लीस गेले; हुडीचे काम बंद जालें; फरकाबाद, मोहू, समसाबाद व कनवज, मेरट, जहानाबाद, शहाजापूर, लखनौ वगैरे मातब्बर शहरें, जयनगरसुध्दा लुटिली, मारिली गेली. त्याजवर मातब्बर सावकारांची दिवाळी निघाली, कितेक मारले गेले. याजकरितां छत्रपूरचे गामास्ते सावकाराचे होते ते कामकाज करीत होते तेही बंद जालें. शहरीं नवरंगाबादेहून तमाम लिहिली आलीं, आगरेयाहून आलीं, गेलीं, जे कजिया जाला, या समयीं एकंदर हुंडी न करणें, देणें न करणें. याजकरितां तमाम सावकारा बंद जाला. रोख रुपये घेऊन गेले तरी एक रुपयाची हुंडी होत नाहीं. परगणेयाचें वर्तमान तर, आश्विनमासीं गारा पडल्या, खरीफ बुडालें. दुसरेयाने फाल्गुनमासीं पडल्या. रब्बी बुडाली. असा नास होऊन शेताआड शेत वचले. त्यास धान्यास कोणी पुसत नाहीं. याजकरितां तमाम रयत पाटिल पळतात. चवथाई वसूल या सालांत जाला नाहीं. गल्लेयाची खळी तैशींच टाकून पाटिल पळाले. गल्लेयासी कोणी घेत नाहीं. बहुत काय लिहिणें. लोभ असो दीजे. हे विनंति.

[१५८]          पै॥ आषाढवद्य ३, आदितवार.                                  श्री.                                                      १५ मे १७५१.

चिरंजीव राजश्री बाबूराव याप्रती गोविंद बल्लाळ आशीर्वाद उपरी येथील कुशल त॥ ज्येष्ठ शुध्द १ मु॥ कनवज श्रीगंगातीर येथें उभयतां सरदारांजवळ सुखरूप असो. विशेष. यानंतर तुह्मी, बहुत दिवस जाले परंतु काहींच वर्तमान लिहिले नाहीं. याजवरून तुह्मांस काय ह्मणावें? देशी गडबड, वर्तमान येत नाहीं, याजकरिता चिंता प्राप्त जाली. त्यास, आमचे जासूद, काशीद, न पावले तर तुह्मी अजूरदार करून शहरी पत्रें वर्तमान लिहून पाठवावीं. तेथून ते सागरीं पावतीं करितील. परंतु वरचेवर वर्तमान लिहित जाणें. कालीं एक पत्र तुमचें दीड महिनेयाचें आले. त्यांत दमाजी गायकवाड लुटलेयाचें (वर्तमान) आले. त्यास, एक जुंज जालें, त्याजवर वर्तमान काय जाले? श्रीमंत भागानगरप्रांतीं गेले, निजामअल्लीशीं व श्रीमंताशीं भेट जाली, त्याचे व श्रीमंताचें कसकसे सौरश जाले? श्रीमंतास निजामअल्लीनें काय दिल्हें ? पैका, मुलुख व किल्ले - तें सविस्तर लिहिणें. दमाजी सातारा होता, श्रीमंताच्या फौजाही सातारी होत्या. यास, काय वर्तमान जाले तें लिहिणें. श्रीमंत भागानगराहून आलेच असतील. त्यास, दमाजीचें पारपत्य कोणप्रकारें जालें ? व मातुश्री ताराबाईशीं सख्य अथवा काय कसे जाले ? ते सविस्तर लिहिणे. इकडील वर्तमान तर, पठाण व रोहिले दोनी फौज मातब्बर बुडविली. पातशाही जमीदार अगर अमीर हे दोन्ही होते. याजला बुडवितांच पातशाहास मोठा वसवसा जाला जे श्रीमंत र॥ नानांची फौज इकडे आली त्यामुळे हे पातशाही बुडवितात, मोडितात, तेव्हा आता मराठेयाहून आणीक कोणी तब्बर नाहीं. त्यास वजिराचें वर्तमान तर, वजिरांत कांहींच पीळ नाहीं, तिळत्र मर्दुमी राहिली नाहीं, निर्माल्य जाला आहे. जर करितां श्रीमंत राजश्री नानास्वामी अगर श्रीमंत राजश्री भाऊस्वामी कोणी एकजण असतें, तर आजीं पातशाहीचा मामला हलका पडला होता. या समयीं मातब्बर कार्य पातशाहापासून करून घ्यावयाचा समय होता.

तथापि हल्लीं चौकशीकरितां पेशजी दिव्य होऊन राजपत्रें जालीं, त्याजवर शिक्केही जाले, तथापि दिव्याचे मजकुरातून तुह्मास विभाग न द्यावा ऐसें होत नाहीं, याप्रमाणें सिध्द जाहालें. यास्तव पुन्हां चौकशी करावी ह्मणून लक्ष्मणराव शिर्के यांणीं विनंती करून आठ हजार रुपये सरकारांत नजर देऊन रायरी मामल्याचे सरदेशमुखीचे दरोबस्त वतन आपल्याकडे चालतें करावयाविशीं पत्राची यादी करून घेऊन त्याप्रमाणें पत्रें तयार करविलीं. त्याजवर शिक्के व्हावयाचे राहिले आहेत. तीं पत्रें व यादी रद्द करून त्यावरून कान्होजी शिर्के यांणीं सौ॥ सकवारबाईसाहेबांचे हिमाइतीनें आग्रहामुळें दिव्य केलेसें करून दोनी वतनास देवजीराव शिर्के याशीं संबंध नाहीं ह्मणून राजपत्रें घेतलीं. त्यावरून दोनी वतनाचे धनी लक्ष्मणराव शिर्के होतात ऐसें घडत नाहीं व गोतमहजरापूर्वी रामोजी शिर्के यांणीं पूर्वील पत्राचा लोप करून लोभास प्रवर्तून आपले साधकांचीं दुसरीं पत्रें घेतली ऐसे चंदीचे साक्षीमोझे पुरले. त्यामुळें विठोजीराव व दौलतराव व बहिर्जीराव व कान्होजीराव शिर्के इनसाफास उभे न राहात. सबब दोन्ही वतनाशीं त्यांस संबंध नाहीं ह्मणून राजपत्रें तुह्माजवळ आहेत. त्यावरून दोनीं वतनें तुमचींच कैसी होतील ? यास्तव दिव्यपत्रापूर्वीं शाहूहाराज यांणीं सरकारकून व मुत्सद्दी व जमीदार मिळवून बावन असामियांचे विद्यमानें चंदीचे साक्षीमोझे मनास आणून मामले रायरी शिर्काण येथील सरदेशमुखीचें वतन वडिलांचे, तेथील वडीलपण शिक्का मानपान तश्रीफ आधीं कानोजीराव बिन रामोजीराव शिर्के यांणीं घ्यावी, त्याचे मागून मानपान तश्रीफ पिलाजीराव बिन गणोजीराव शिर्के यांणीं घ्यावी, व सुभा दाभोळ येथील देशमुखीचें वतन अजरामऱ्हामत गणोजीराव याचे नांवें यास्तव तेथील वडीलपण शिक्का मानपान तश्रीफ आधीं पिलाजीराव बिन गणोजीराव यांणीं घ्यावी. त्याचे मागून मानपान तश्रीफ कान्होजीराव बिन रामोजीराव यांणीं घ्यावी. व दोन्ही वतनाचें उत्पन्न निमेनीमप्रमाणें दोघांनीं वांटून घ्यावें. ह्मणून गोतमहजर शिक्यानिशी शके १६४० विलंबीनाम संवत्सरीं करून दिल्हा त्या अन्वयें राजपत्रें जालीं. सदरहू महजराचे अन्वयें वंशपरंपरेनें चालावयाविशी तळेगांवचे मुक्कामीं खंडेराव दाभाडे सेनापति व मातबर सरदार यांचे विद्यमानें कान्होजीराव शिर्के यांणीं देवजीराव शिर्के यांचे नांवें प्लवंगनाम संवत्सरी श्रीशिर्काईंची व काशींत महापातकें केल्याची शपथपूर्वक पत्र लेहून दिल्हें. ऐसें असतां फिरोन कजिया करूं लागले. तेव्हां शाहूहाराज यांणीं शिर्के याशीं पूर्वील साहेबांचें देणें आहे. यानिमित्यें सत्य-सुकृत व थोरले महाराजाची शपथ व गंगा स्मरोन निवाडा करावा ह्मणून कैलासवासी ताराऊसाहेब यांशी विनंती करून गंगोदकाच्या कुप्या व श्री बाळकृष्णदेवाच्या तुळशी व यादवभट उपाध्ये व रघोजी भोसले व राणोजी भोसले व कित्येक मातबर सरदार यांबरोबर उभयतां शिर्के यांशीं देऊन त्याजकडे पाठविलें. त्यांणीं मागील माहितगारीनें इनसाफाची छान करून महजराचें अन्वयें सर्वांचे विद्यमानें निवाडा करून देवजी शिर्के यांचे नांवें दुर्मतिनाम संवत्सरीं निवाडपत्र करून दिल्हें. येकूण तिन्हीं पत्रें विचार होऊन पायशद्ध जालीं. त्याच अन्वयेंकरून हल्लीं हें पत्र दिल्हें असें. तरी सन इहिदेचे सालीं पंचाइतमतें निवाडा होऊन तुमचे नांवें निवाडपत्रें करून दिल्हीं तीं यथार्थ आहेत. त्याजवर तुह्मी शिक्के करून घेऊन त्याप्रमाणें तुह्मीं व त्यांनीं चालावें. त्या पत्रांत वरकड विभागाचा मजकूर सर्व यथास्थीतच उगवला आहे. परंतु गोतमहजरीं मामले रायरी शिर्काण येथील सरदेशमुखीचे वतनाचे वडीलपण शिक्का मात्र लक्ष्मणराव शिर्के यांचे वडिलाकडे. याप्रमाणें ठरलें असतां शिक्यासंबंधीं उत्पन्न नक्त व वस्त्रें दरोबस्त लक्ष्मणराव शिर्के याजकडे, वरकड उत्पन्नापैकीं निमे तुह्मांकडे, असें लिहिलें आहे तें निवाडपत्रीं समजानें लिहिलें नाहीं. यास्तव पेशजी कैलासवासी शाहू महाराज यांणीं गोतमहजरीं ठराव केला आहे. त्याप्रमाणें मामले रायरी शिर्काण येथील वडीलपण शिक्का मात्र लक्ष्मणराव शिर्के याजकडे. वरकड दरोबस्त वतनसंबंधीं उत्पन्न निमे त्याजकडे व निमे तुह्मांकडे, याप्रमाणें ठराव केला आहे. त्याप्रमाणें तुह्मी आपला विभाग अनभवीत जावा. सुभा दाभोळ येथील देशमुखीचे वतनाचा कजिया आहे त्याचा विचार पेस्तर मनास आणून आज्ञा होईल त्याप्रमाणें वर्तणूक करणें.

वतनाची कष्ट मेहनत जीवाभ्य श्रमसाहस गणोजीराव शिर्के यांणींच केले ह्मणून चंदीचे साक्षींत गोतहजरापूर्वीच पुरले. त्याच समयीं विठोजी व दौलतराव व कान्होजीराव व बहिर्जीराव शिर्के यांशीं महाराजांनीं हुजूर आणून मनसुबीस राजी होऊन राजीनामे देणें ह्मणून आज्ञा केली. ते जामीन न देत व मनसुबीस उभे न राहात. यास्तव दोन्ही वतनास त्याजला संबंध नाहीं. तुमचे वडिलीं दोनी वतनें अनभवावीं ऐशीं राजपत्रें जालींच आहेत. त्याजउपरी पुन्हां महाराजापाशीं उभयतां वादियांचा फिरोन कजिया पडिला. यास्तव पुन्हां चंदीचे साक्ष मोझे मनास आणून महाराजांनीं गोतमहजर शिक्यानिशीं करून दिल्हा. त्याच अन्वयें कान्होजीराव शिर्के यांणीं संवादपत्रें लेहून दिले. व मातुश्री ताराऊसाहेब यांणीं चंदीचे माहितगिरीनें मनास आणून शपथपुरस्सर निवाडपत्र करून दिल्हें. येकुण तिन्हीं पत्रें यथान्यायें जालीं असतां फिरोन कजिया उपस्थित करून, कान्होजी शिर्के यांणीं श्रीकृष्णेचें दिव्य केलें. त्याचा विचार पाहतां तुह्मां उभयतां वादियांचा मूळपुरुष वाघोजी शिर्के; त्यास पुत्र तानाजीराव, पिलाजीराव येकूण दोघे; पैकीं वडील तान्हाजी याशी पुत्र कानोजी; त्याचे रामोजी; त्याचे कान्होजी; त्याचे हल्लीं लक्ष्मणराव; धाकटे पिलाजी; त्यास पुत्र देवजीराजे शिर्के; त्यांचे हल्लीं तुह्मी : हा एका मूळपुरुषाचा वंश असतां मामले रायरी शिर्काण येथील सरदेशमुखीचे वतनाचे वडीलपण शिक्का आपला ऐसे देवजी शिर्के ह्मणत नसतां, वडीलपण आह्मी देऊं ते देवजीराव शिर्के यांणीं घ्यावें ऐसें कान्होजीराव शिर्के यांचे बोलणें असतां, वडीलपण शिक्का आपला ह्मणून श्रीकृष्णेचें दिव्य कान्होजीराव यांणीं केलें. त्यास, कान्होजीराव यांचे घराणें वडील असतां वडीलपण शिक्का आपला ह्मणून दिव्य केलें, तें दिव्य विरुध्द कैसे पडले ? व दिव्याचे उच्चारांत देवजी शिर्के यांशी वतनास संबंध नाहीं ऐसें असतें तरी दिव्य लागतें. ते गोष्ट कांहींच नाहीं. तेव्हां वडील असतां वडीलपणाचें दिव्य केल्यामुळें देवजी शिर्के यांशी वतनास संबंध नाहीं ऐसें कसें घडेल ? वडिलोपार्जित वृत्तीचे जीर्णोध्दाराविशी कोणत्याही भावबंदांनीं टकापैका खर्च करून मेहनत केली असिली तथापि वरकड भावापासून तक्षिमेप्रमाणें खर्चाचा ऐवज घेऊन ज्याचा विभाग त्यास द्यावा असें असतां, कष्ट मेहनत येकले रामोजीराव शिर्के यांणींच केली ऐसेंही नाहीं. राज्यांत मातबरी गणोजी राजे यांची. त्यांचे भिडेवरून व त्यांणीं चंदीचे समयीं जिवाभ्य मेहनत श्रमसाहस केल्यामुळें दोनी वतनें साधन केलीं. ऐसे चंदीचे साक्षमोझे महाराजांनीं पाहिलें असतां, त्याविशी दिव्य करणें योग्य नव्हे हाच अर्थ महाराजांनीं समजोन, पुढें दोन वर्षांनीं तुळाजी आंग्रे सरखेल यांशीं हातरोखा सौभाग्यवती सकवारबाईसाहेब यांचे आग्रहास्तव दिव्यपत्राचें अन्वयें सिध्द झाला त्या हातरोख्याचे शेवटीं माहाराजांनीं स्वदस्तुरें लिहिलें आहे कीं, यांशी पूर्वी राजश्रियांहीं पत्रें वतनाचीं दिल्हीं आहेत त्याप्रमाणें आह्मीं दिल्ही आहेत, त्याप्रमाणें तुह्मी चालवणें. उजूर न करणें ह्मणून लिहिलें आहे. तेव्हां दिव्य भिडेमुळें जालें असें तेच समयीं महाराजांचे ध्यानांत येऊन पूर्वील पत्राप्रमाणें चालवणें ह्मणून लिहिलें आहे. व या दिव्याचा विचार सालतिगस्ता तुमचे नांवें निवाडपत्र दिल्हें आहे त्या निवाडपत्रीं सर्व मजकूर उगवलाच आहे.

याजकरितां हें वतन त्यास दिल्हे, उभयतां शिर्के यांचें आहे, येविशीं विदित केलें. त्याप्रमाणें विठोजी व दौलतराव व कान्होजी व बहिर्जी शिर्के यांशीं मान्य करून वतन अनभवणें ह्मणून आज्ञा केली. परंतु, ते मान्य न होत. यास्तव, स्वामी तुह्मावर कृपाळू होऊन तुह्मांस मामले मजकूरचें वतन बहाल केलें असे, तुह्मी व तुमचे पुत्रपौत्रादि वंशपरंपेनें अनुभव करून सुखरूप राहणें. ह्मणून यावरून पंचाइतमतें मनास आणितां तुमचा व लक्ष्मणराव शिर्के यांचा मामले रायरी शिर्काण येथील सरदेशमुखीचा कजिया लागोन मनसुबी हुजूर पडिली. त्याची चौकशी करोन पेशजी सालतिघस्तां सन इहिदे समानीनचे सालीं रायरी मामल्याचे सरदेशमुखीचे वतनाचा निमे विभाग तुह्मी घ्यावयाअन्वयें निवाडपत्रें तुमचें नांवें तयार जालीं. त्याजवर शिक्के व्हावे तों इंग्रेज बोरघाटाच्या माथां आला, पुण्यांत गडबड झाली. यास्तव, नजरेचे ऐवजाचा भरणा न होय. सबब ऐवजाचे तरतुदीकरितां निवाडयाची यादी घेऊन तुह्मी नागपूर प्रांतीं गेला ही संद पाहून तुह्मी गैरहजर जाल्यामुळें पुन्हां चौकशी जाली पाहिजे ह्मणून लक्ष्मणराव शिर्के यांणीं विनंति करून आठ हजार रुपये सरकारांत नजर देऊन रायरी मामल्याचें सरदेशमुखींचे वतन दरोबस्त आपल्याकडे चालतें करावयाविशी पत्रें तयार करविलीं. त्याजवर शिक्के व्हावे तों तुह्मी नजरेचे ऐवजासुध्दा हाजर होऊन त्याचे पत्रावर शिक्के न व्हावे याविशी अडथळा करून विनंति केली कीं, पेशजीचे कराराप्रमाणें सरकारचे नजरेचा ऐवज सरकारांत घेऊन रायरी मामल्याचे सरदेशमुखीचे निमे विभागाविशी आमचे नांवें पत्रें तयार जाली आहेत. त्याजवर शिक्के करून द्यावे ह्मणून. त्यास, कैलासवासी शाहू महाराजांचे वेळेस कान्होजी शिर्के यांणीं सदरहू दोन्ही वतनांचे वडीलपण शिक्का आपला ह्मणून श्रीकृष्णेचें दिव्य करून राजपत्रें घेतलीं होतीं ते गळाठलीं. यास्तव सातारियाचे दप्तरचे बार लेहून आणवून भिकाजीराव शिर्के यांशी निवाडयाची यादी करून दिल्ही आहे त्याची पुन्हां पुरती चौकशी करावी, ह्मणून लक्ष्मणराव शिर्के यांणीं आक्षेप केला. त्याजवरून कृष्णराव अनंत किल्ले सातारा यांशीं पत्रें लिहिलीं. त्यांणीं तेथील मजमू दफ्तरीं शोध करून दहा पत्रें बार जालीं त्याची यादी पाठविली. त्यांशीं व दोनी वतनास विठोजी व दौलतराव व कानोजी व बहिर्जीराव शिर्के यांशीं संबंध नाहीं. सदरहू दोन्ही वतनें पिलाजीराव बिन गणोजीराव व देवजी बिन पिलाजीराव शिर्के यांनीं अनभवावीं, ह्मणोन गोतमहजरा पूर्वील राजपत्रें तुह्मापाशीं आहेत. त्याची चौकशी करितां, येकले गणोजीराव शिर्के यांसच दाभोळ सुभ्याचे देशमुखीचें वतन दिल्हे. मामले रायरी शिर्काण येथील सरदेशमुखीचें वतन गणोजीराव शिर्के यांचे भिडेवरून रामोजीराव शिर्के यांस महाराजांनीं आपणाजवळ ठेऊन घेऊन, वतनावर पाताणे परभू मुतालीक होता त्यास दूर करून गणोजीराव व रामोजीराव या उभयतांचे नांवें रायरी मामल्याचे सरदेशमुखीचे वतनाचीं पत्रे करून दिल्हीं. त्या पत्रांचा लोप रामोजीराव यांणीं करून दुसरीं पत्रें आपल्या साधकांचीं घेतलीं आणि दोन्ही वतनें आपण अनभवूं लागले.

स्वामीस थोरले कैलासवासी स्वामीचें वचन प्रतिपाळावें व कैलासवासी राजश्रीकाका स्वामीचें प्रतिपालन करावें. हें अगत्य ह्मणून तुह्मावर स्वामी कृपाळू होऊन मामले दाभोळचे देशमुखीचें वतन तुह्मासच बहाल केलें. असें तुह्मीं व तुमचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेनें वतनाचा उपभोग करून दंडक प्रमाणें वतनाची सेवा करीत जाणें. या वतनास रामोजी शिर्के याचे पुत्रास व विठोजी व दौलतराव शिर्के यांस संबंध नाहीं ह्मणून व रायरी मल्याचें पत्र राज्याभिषेक शके ४४ हेमलंबीनाम संवत्सरचे राजा शाहू छत्रपती यांचे पिलाजीराव बिन गणोजीराव व देवजीराव बिन पिलाजीराव शिर्के सरदेशमुख मामले रायरी यांचे नांवें दिल्हें. वतनपत्र ऐसजे:- तुह्मांध्ये राजश्री देवजी शिर्के यांनीं विदित केलें कीं, रायरी मामला महाल बारा येथील सरदेशमुखीं शिर्के याची पुरातन निजामशहा पातशानीं दिल्ही होती ती बहुत दिवस भोगवटा चालिला. त्याजवर आपले वडिलांनीं वतनावर मुतालीक दलपतराव ह्मणून पातेना परभू ठेऊन आपण पातशाही मनसब दौलत करूं लागले. त्या उपरी जावलीकर चेपरराव यांनीं रायरी किल्ला घेतला. त्या कारकीर्दीस मुतालिक तोच सरदेशमुख ह्मणून वतनाचा भोगवटा करूं लागले. त्यानंतर स्वामीचें राज्य जालें तेव्हां दलपतरायास कांहीं हक्काची मोहन करून दिल्ही. तेवडयावर चाकरी करून वतन अनभविली आहे. त्या उपरी स्वामी राज्याधिकारी होऊन चंदीस गेले. तिकडे मोंगलांच्या फौजा नामजाद झाल्या. चंदीस वेढा जुलपुकारखानानें घातला ते समयीं गणोजीराव व त्याचे पुतणे रामोजी शिर्के मोंगलाईत होते. त्यास कौल देऊन चंदीस आणिलें. दौलतेचा सरंजाम करून चालवीत होते. त्या प्रसंगी वतनदाराचीं पुरातन वतनें ज्यांचीं त्यांस दिल्हीं व कित्येकांस नवीं करून दिल्हीं, ते समयीं गणोजीराव व रामोजीराव यांणीं रायरी मामलेयाची सरदेशमुखी पुरातन आपली आपणास द्यावी. मुतालिक दूर करावा ह्मणून विनंति केली ते प्रसंगीं आयाजी दलपतराव मुतालिक दूर करावा ह्मणून विनंति केली ते प्रसंगीं आयाजी दलपतराव मुतालिक चंदीस आला होता त्याजला स्वामींनी शपथ घालून करीना पुशिला; तेव्हा तो आपण मुतालीक ह्मणोन कबूल जाला. त्याजवरून शिर्के सरदेशमुख ऐसें खरें जालें. तो मुतालीक दूर करून सरदेशमुखीचें वतन गणोजीराव व रामोजीराव शिर्के यांशीं करार देऊन तानाजीराव वडील भाऊ त्याचे कान्होजी त्याचे रामोजी यास्तव त्यांचें नांव आधी लेहून पिलाजीराव धाकटे भाऊ त्याचे पुत्र गणोजीराव ह्मणून त्याचें नांव मागून लेहून राजपत्रें करून दिल्हीं. त्या उपरी राजश्री स्वामी देशास आले. समागम रामोजी शिर्के पत्रें घेऊन आले. त्यांणीं नवीन ताकीदपत्रें मागितली. त्यांत गैर वाका समजावून आपले एकाचेंच नांवें पत्रें घेऊन वतनाचा अनुभव करू लागले. आपला विभाग द्यावयाशी कथळा करितात. येविषयीं मनास आणून पारपत्य केलें पाहिजे ह्मणून त्याजवरून विठोजी व दौलतराव व कान्होजी व बहिर्जी शिर्के यांशीं हुजूर आणून जामीन देऊन मनसुबीस उभे राहणें, निवाडा होईल त्याप्रणें वर्तणूक करणें ह्मणून आज्ञा केली. त्यास तुह्मी राजीनामा द्यावयाशी सिध्द जाले ते चौघेजण राजीनामा न देतां नसतें कथळे करूं लागले. यास्तव, त्यास सदरेवरून उठविलें, आणि सभासद, हुजूरचे सरकारकून व शंकराजी मल्हार पूर्वी चंदीस होते ते मोंगलाईंतून स्वामीसंनिध आले त्यांस, व राजश्री खंडेराव दाभाडे सेनापती व मानसिंग मोरे व सुलतानजी रावजी निंबाळकर व वरकड भले लोक यांशीं करीना पुशिला. त्यांनीं चंदीचे प्रसंगीं गणोजीराव शिर्के यांनी स्वामीसेवा करून कार्यास आले.

तिकडे तांब्रांच्या फौजा जुलपुकारखान जाऊन चंदीस वेढा घातला. ते समयीं गणोजीराव मोंगलाचे चाकर असतां त्यांणीं स्वामीस व सौ॥ ताराबाई व राजसबाई व राजकुवरसहित चंदींतून काढून रात्रीचीं अरणीस पाठविलीं. त्या सेवेमुळें राजश्री राजारामसाहेब संतोषी होऊन काय पाहिजे तें मागा ऐसी आज्ञा केली. तेव्हां गणोजीराव यांणीं विज्ञप्ति केली जे, दाभोळचे देशमुखी इदलशहांनीं अनामत केली होती ते त्यांणीं आपले बाप पिलाजीराव यांसी दिल्ही. परंतु, भोगवटा न जाला. त्या वतनावर कोणी वतनदार नव्हता ह्मणून चंदीचे मुक्कामीं राजश्री खंडो बल्लाळ चिटणीस यांस दिल्ही आहे. ऐसियासी आपणांस पुत्र जाला आहे त्याचें नांव पिलाजीराव ठेविलें असें. तरी तें वतन आपणांस द्यावें त्यावरून राजश्री खंडो बल्लाळ यांचें समाधान करून त्यास दुसरें वतन देऊं केलें आणि दाभोळचे देशमुखीचें वतन गणोजीराजे यासी देऊन पत्रें करून दिल्हीं; व खंडो बल्लाळ यांस पत्रें दिल्हीं होतीं तीं घेऊन गणोराव याजपाशीं दिलीं. येळुराहून स्वामी स्वार होऊन स्वराज्यांत स्वदेशीं आले. त्याज समागमें रामोजी बिन कान्होजी शिर्के गणोजीरायाचे पुतणे देशीं आले. त्याजपाशीं वतनाचीं पत्रें देऊन इकडे पाठविलें. देशीं आल्यावर वतन चालवावयाबद्दल ताकीदपत्रें मागितलीं. तीं राजश्री स्वामींनीं देवविलीं. त्या पत्रांत आपलें नांव घालून राजपत्रें घेतलीं; आणि वतनाची कमावीस करूं लागलें. आपणास वतनास दखल होऊं येत नाहीं, यामुळें याचा आमचा कथळा होऊ लागला आहे. त्यास त्याचा आमचा करीना मनास आणून गणोराव यांचें वतन त्याचे पुत्रास व आपण बंधू आपणांस दिल्हें पाहिजे ह्मणोन विदित केलें. तें स्वामींनीं अंत:करणांत आणून याची व त्याची मनसुबी करावी, स्थळ व गोत लाऊन द्यावें ऐसें करून विठोजीराव व दौलतराव व कान्होजीराव व बहिरजीराव शिर्के यांशी हुजूर आणून गोतांत राजीनामे द्या व स्थळांत जाऊन वेव्हार सांगा. गोतमुखें न्याय होईल त्याप्रणें वतन चालविलें जाईल, ऐशी आज्ञा केली. त्यास विठोजी व वरकड मान्य न होत व राजीनामे न देत. नसती दिकत घेऊन कथळे करूं लागले. त्या उपरी स्वामींनीं चंदीस सर कारकून होते त्यांध्ये जे हजीर आहेत व राजश्री शंकराजी मल्हार मोंगलाईंतील सैदाचे तर्फे जे आले होते व राजश्री मानसिंग मोरे व खंडेराव दाभाडे सेनापति हे चंदीस राजश्री काका स्वामीसंनिध होते त्यास बलाऊन व राजश्री सुलतानजीराव निंबाळकर सर लष्कर व वरकड भले लोक व कितेक परगणियांचे देशमुख व देशपांडे व मोकदम व मक्ष्तसर यांस सभेस बसवून त्यांस यांचा करीना पुशिला तेव्हां समस्तांनीं विदित केलें कीं, देवजी शिर्के यांनीं करीना विदित केला तो यथार्थ आहे. वतन गणोजीराव शिर्के यांसी दिल्हे. रामोजी शिर्के त्याचे पुतणे ह्मणून त्याणीं वतनाचीं पत्रें त्यापाशीं देऊन इकडे पाठविले. तेवडियानेंच रामोजी व त्यांचे भाऊ वतन अनभवूं लागले. वतनाचें खावंद पिलाजी शिर्के हे खरे ऐसें साक्षपूर्वक विदित केलें. त्यावरून विठोजी व दौलतराव व कान्होजीराव व बहिर्जी शिर्के हे खोटे ऐसें कळों आलें. त्यास सदरेवरून उठवून लाविलें.