Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
मेस्तर शहानें मुंबईचे कोसलदारांची व जनरालाचे मर्जीची माहितगिरी सांगितली. प्रस्तुतची गोष्ट बंगालियांतूनच जाली आहे. मुंबईवाल्यांस अभिमान पडला आहे. ते श्रीमंताचा हात धरिला तो सोडणार नाहीं व दिलगीरही आहे. कारण दुसरा जनराल विलायतेहून रवाना केला तो महिन्या पंधरा दिवसांत मुंबईस पोहोंचेल. तेव्हां श्रीमंतांकडून जो लाभ होणें तो नव्या जनरालास होईल, आपल्यास कांही नाहीं ह्मणोन दिलगीर आहे. सारांश, आपलें काम विलायतेशिवाय होणार नाही. खुषकीचे वाटेनें कोणी शहाणा माणूस पाठविल्यास आठ दहा महिन्यांत बंदोबस्त पक्का होऊन येईल. याप्रमाणें सांगितलें. त्यांचे मान जावयाचें दिसतें. स्पष्ट बोलोन दाखवीत नाहींत. परंतु यास पाठवावयास सला ठीक नसे. याविसीं बापू सारस्वतासीं बोलिलो आहे. हा निवेदन करील. १
पु॥ सेवेसी विज्ञापना. मेस्तर माष्टीन व मेस्तर फ्लेचर उभयतां आमचे बिराडास बुधवारी सायंकाळी येऊन सांगितलें कीं, श्रीमंतास लिहिणें कीं, कोणेविसी फिकीर न करावी. मेस्तर माष्टीन गंगाबाई प्रसूतसमई पुण्यांत होते. त्यास पुत्राचा संषय पुसिला. त्याणीं सांगितलें कीं, प्रसूत जाली ते अर्भक निवर्तले, उपरांत दुसरे घेतले असेल, निवर्तल्याची खबर आह्मी ऐकिली, पांचजणी बायका गरोदर जवळ होत्या. याप्रमाणे सांगितले. १
श्रीमंतांस आह्मी पत्र पाठविले आहे कीं, कामकाज लागल्याची आज्ञा करावी ह्मणोन मेस्तर माष्टानानें सांगितलें. उपरांत बापू सारस्वताची गांठ घालून दिल्ही जे, सरकारचे कामकाज आज्ञेवरून हे तुह्मांस सांगतील, त्याप्रमाणें करून देत जावे. त्याणी कबूल केले. अनुष्टानाच्या ब्राह्मणाचा मजकूर सांगितला. त्याचे हरएक साहित्याविसी कबूल केले. तयास, महाराजांनी या उभयतांस पत्रें व किरकोळ आज्ञा करणें ते करीत जावी. आज्ञेप्रमाणे करितील. १
आज्ञेचे अन्वयें निकडीनें मुंबईस पोहचावें, ह्मणोन कस्त करीत आहें. परंतु पर्जन्य भारी व कीम नदीस उतरावयास उपाय नाहीं. यास्तव एक दिवस अधिक लागला. १
मेस्तर होमानें सरकारांत पत्र इष्टोलाचें लखोट्यांत घालून पाठविलें. रूबरू नेऊन गुदरणें, ह्मणोन त्याजला लिहिलें. मेस्तर टेलर बंगालियास श्रीमंताचे कामाकरितां गेला, भाद्रपद शुध्द ३ मंगळवार, आज दहा दिवस जाले, ह्मणोन सांगितले. त्यावरून मित्ती लिहिली असे व पत्र दिल्हें ते पाठविले आहे. सेवेसी पावेल. १
येणेंप्रमाणें येथील वृत्त कच्चे सेवेसी कळावे ह्मणोन लिहिलें आहे. सुरतेस जाऊन, गंभीरास बोलून, जलदीनें मुंबईस जातो. उभयतां मेस्तर ज्या गलबतावर बसोन मुमईहून आले, तें गलबत चांगले. त्याजवर बसोन जाणें, ह्मणोन उभयतांनीं सांगितलें. त्याप्रमाणें जातों. जनरालास स्वामीचे कामाचा अभिमान बहुत पडला आहे की, केली गोष्टी सिद्धीस न्यावी, याप्रमाणे बहुतजण इंग्रेज सांगतात. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ९८.
१६९७ भाद्रपद शुद्ध १३.
श्रीमंताकडे पत्रे रवाना, भाद्रपद शुद्ध १३ गुरुवार मुकाम भडोज :-
मेस्तर माष्टीन व मेस्तर फ्लेचर यांचें ह्मणणे : लडाई बंद जाहलियाची तकसीर जनरालाकडे अथवा कोषला याजकडे नाहीं. बंगाल्यांतून हे गोष्ट जाली आहे. इतके दिवस सरजनराल नव्हता. आह्मी श्रीमंताची कुमक केलियावर विलायतेहून आला. त्याजकडे मेस्तर टेलर पाठविला आहे. पंधरा दिवस, निदान वीस दिवसांत बंगालियास पोहोंचेल. तो सरजनरलास समजाऊन सांगोन खामखा गेल्या दिवसापासून दीड महिन्यांत परवानगी घेऊन पत्रें पाठवून देईल. तोपरियंत श्रीमंतांनी स्वस्थ असावें. इंग्रेजी लष्कर श्रीमंतासमागमें राहील. जनरालानें श्रीमंताचा हात धरिला आहे तो कदापि सोडणार नाही. श्रीमंताची बाजी सिध्धी जाईल. फिकीर करूं नये. बंगालेवाले मुमईकराची गोष्ट ऐकतील, ऐसें दृष्टीस येतें. याप्रमाणें बोलले. २
करनेल यांनी निशापत्र जातीनें लेहून दिल्हें. हें मिस्तर माष्टीनास व मेस्तर फ्लेचर यांस ठाऊक नाहीं. हें वर्तमान थोडेसे कळल्यावर त्याणी आश्चर्य केलें. या उभयतांस ठाऊक नाहीं, तेव्हां जनरालासही ठाऊक नसलेसे आहे. ते मुंबईस गेल्यास सर्व कळेल. उभयतां ह्मणत होते कीं, गोविंदराव गाइकवाड यांनी जनरालास पत्र पाठविलें कीं श्रीमंतांनीं फत्तेसिंग याजपासून रुपये घ्यावयाचा करार केला, यांत आमची खुषी आहे ह्मणोन पत्र पाठविलें असतां आतां कां श्रमी होतात ? त्यास, मीही समयिक उत्तर केलें. त्यास, याप्रमाणें सेनाखासखेल याणीं पत्र पाठविलें की काय, याचा शोध उगाच असावा. १
मेस्तर शहाकडे कांही अपराध असल्यास महिन्या पंधरा दिवसांत छाण करतां कळेल. अंगी असल्यास त्यास बरतर्फ करणार, त्याजकडे दोष फार आहेत, ह्मणोन इष्टोल सांगत होता. १
नर्मदेस पूर मातबर आला. यामुळें उभयतां मेस्तरांनी आह्मांस राहऊन घेतलें. पाणी उतरलें ह्मणजे जावें. पलीकडे कमी नदी आहे तीस पूर आला आहे. नर्मदेचा पूर उतरेल तेव्हां तेथे उतार सांपडेल. तेथें नावा नाहींत. उतार अवघड. ह्मणोन राहऊन घेतलें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ९७.
१६९७ भाद्रपद शुद्ध ४.
राजेश्री लक्ष्मण आबाजी गोसावी यांसि:-
सु।। सीत सबैन मया व अलफ. राजश्री विश्वासराव यशवंत याचीं पत्रें सुरत अठ्ठाविशींतून आलीं. त्यांत मजकूर लिहिला कीं, सरकारची फौज माहालचे रखवालीकरितां सोनगडाकडे गेली. हेबातमी फितुरियांचे फौजेस कळोन, सोनगड डावा टाकून, फितुरियांची फौज सरकारचे फौजेस आडवी आली, असें वर्तमान आलें. त्यास सरकारचे फौजेची मदत लौकर झाली पाहिजे, याजकरितां हें वर्तमान करणेल किटिणीस कळवीन, तिकडील रवानगीचा निश्चय करून, उत्तर लौकर पाठवणें.
याखेरीज कलमें उगवावीं:-
दरमहाचे पांच ल- १ निम्मे मुलूख अक्षांत गुजरात वगैरे थवा रुपायास दररसद व फत्तेसिंगाक-माहाचे उशीर ला- डील धरूं नये. गल्यास त्या वेळेस त्याणीं रोख पाठ. कुच करून हमराहा वावे. मजकूर पार-पत्यास गुजरून छ ३ चलावें. ठीक करणे. रजब. जाणिजे.
(लेखनावधि:)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ९६.
१६९७ श्रावण.
श्रीमंतास जाबसाल ल्याहावें. इष्टोलाविसींचा मजकूर येण्या राहण्याचा तेथें दोघे ममतेचे आहेत.
१ मेस्तर हो . १ मेस्तर हटली, गाईकवाडापों. दाहा किटीणीकडे आले. पो साडेसाहा सरकारांत आले. बाकी ऐवज अमानत ठेवावा. दरमहा घेतला पाहिजे, ह्मणून किटीण ह्मणतो. त्यास, दरमाहांत माहाल लाऊन दिल्हे आहेत. मसलत सेवनास गेली पाहिजे. त्यास, जनरालास पुसोन दोहोंचे जमेची घेऊन पाठवणें ह्मणून पत्रीं आज्ञा. त्यास, दरमहाचे ऐवजांत गाइकवाडाचा ऐवज घेणें, हें सेवकास अगोदरच समजलें आहे व सेवेसीही लिहिलें आहे. हालीं यास पुसावें तरी हे ऐवज देवीत नाहीं आणि उगेंच हलकें व्हावेंसें होतें. महालाचा तपसील तरी उज्याड मुलुक आहे. आमोद तरी नेहमीं दिल्ही. हसोटचा कजीया ऐसा. हे तपसिलाखालींच जे समजोन कांहीं बोलिलों नाहीं. बंगाल्याचा हुकूम आलियावर सर्व नीट होईल.
कारनेलीची वाईट गोष्ट जनरालाजवळ आजपर्यंत बोलिलों नाहीं. व मागील गोष्टीचें प्रयोजनही नाहीं. सेवकाचा दोष निवारण व्हावा ह्मणून दुभाषास दाखवावयाकरितां सेवकाचे पत्रावर मोहर करून पाठविली, ह्मणोन पत्रीं आज्ञा. त्यास, मोहरेचें पत्रच आलें नाहीं. तेव्हां शोध करावा.
ओझ्यास उंटें पन्नास व सासे बैल दिल्हे असतां, हजार गाडे आणावयास डबईस माणसें किटणीनें पाठविलीं आहेत. येविसीं बोलून हुकुमाप्रों चालत तें करणें, ह्मणून पत्रीं आज्ञा. त्यास, खंबाइताहून निघतेसमयीं आमचें वोझें दोन तक्षिमा न चाले म्हणून राहिले. एक तक्षम मात्र आलें. त्यास, तंबुखेरीज इंग्रजाची राणगत जाली, म्हणोन मेस्तर वारलीस बोलत होता. त्यास, वोझ्याविसींची गोष्ट त्यास रुचणार नाहीं. यास्तव तूर्त बोलणें ठीक नव्हे. बंगाल्याची अवधी होऊन जाजती दिवस जात आहेत. तात्पर्य उगेंच रहावें हें ठीक दिसतें.
अवधी राहिली नाहीं. प्रसंगास्तव बोलितों. आज्ञेपूर्वींच सारे अर्थ सेवकाचे ध्यानांत आहेत. परंतु हा समय नाहीं. याचा संतोष राहून जें होईल तें करणें उचित. आपला काल प्रतिकूल आहे. या समयांत एकादी गोष्ट बोलतां बोलतां त्याणीं वाईट मानिल्यास जर सनद त्याजवळ नसिली तरी पुढें ऐवज सरकारांत मागतील. यास्तव समज द्यावी. याशिवाय कांहीं दिक्कत असिल्यास आज्ञा व्हावी. १ सुरतकर मोगलाकडील बाकीचा फडशा निमेवर जाला. त्यास साऱ्या ऐवजाचें कबज सुरतकर मागतो. येविसीं जनरालास बोलोन साराच ऐवज सुरतेस येई, ऐसीं पत्रें पाठवावीं, भडोजेस निम्मे, सुरतेस निम्मे, ऐवज द्यावा, ऐसा करार. तेव्हां कराराप्रमाणें त्याजवळ दस्तऐवजी असली पाहिजे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
हू.
लेखांक ९५.
१६९७ चैत्र वद्य ७.
अजम वुइलिम हारनबी इस्कोयर प्रजीदेंत गोवर्णदोर जनराल बंदर मुंबई दाममहबतह :
शाहामत अवली मर्तबत हशमत व मजीलत मवलात दस्तगाहाय अतिजाद दोस्तां अजि ज्यानीब चितीं विठ्ठल सलाम अजाम आंके येथील खैरखुशी जाणून आपलीं खैरखुशी हमेषा कलमीं करीत गेले पाहिजे. दीगर. बहुत रोज मोहिबाकडून खत येऊन खबर मालू होत नाहीं. याजवरोन ताजूब दिलांत आलें आहे. तरी हे बात दोस्तीचे जागां लाजीम नसे. खतखतूत हमेषा पाठऊन दिलखुषी बेयैत करावे. शाहामतअवलीपन्हा महादजी सिंदे फौजसुद्धां शाहामतपन्हा तुकोजी होळकर फौजेसुद्धां गुजराथप्रांतें दरकुच येऊन नर्मदापार मुकाम केला आहे. इजानेबाही याचे सोबत आहेत. त्यास, याची व मोहिबाची दोस्ती एकरंग चालावी हें इजानेबाचे दिलांत येऊन हें खत कलमीं केलें आहे. तरी आपले दिलांतील खुलाशाचा मजकूर कलमी करावा. त्याबमोजी शाहापतपन्हा यांजसी जवाबसाल होऊन कलमी केला जाईल. पेशजी इज्जतमहा दादो मल्हार मोहिबानजीक रवाना केले ते जाऊन पोहोंचोन मजमून मालूम केलाच असेल. तरी ज्या बातेंत दुतर्फा दोस्ती इज्यानेबाचे दरम्यानगिरीनें चालेल तेच बात दिलांत आणावी यांतच नफा असे. ज्या बाता त्या मकानीं असतां रुबरू बोलण्यांत आल्या होत्या, त्याप्रमाणें गुदस्तां दरपेष अंमलांत आल्या. याची हायेस दिलांत आलीच असेल. हेंच जाणून दोस्तीचे जागा कलमीं केलें आहे. तें दिलांत यावें. परस्परें दोस्ती यांची व मोहिबाची असावी, यांत नफाच दुतर्फा आहे. व दीगरबात परस्पर असिल्यानी नफा नाहीं, हेंच इजानेबाच्या बातांत व दोस्तीचे जागां मालू व्हावें, सबब कलमीं केलें आहे. तरी हे बात दिलांत आणून जबाब पाठवावा. रा। छ २१ सफर. ज्यादा काय लिहिणें ? हे किताबत.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ९४.
१६९७ चैत्र वद्य २.
चैत्र व॥ २ हबशास पत्र कीं आं- साहेबांनीं शेकअल्ली जमातदार याचे जबानीं मजकूर ऐकोन मेहेरबानी करून खत पाठविलें तें पावोन खुषवक्ती हासील जाली. कितेक मजकुराचा मारनिलेचे जबानीं हवाला देऊन लिहिला तो कलम जमातदार याणीं येथें येऊन आपले दिलांतील अर्थ जाहीर केला. तो दर्यास करून बयानवार हकीकत हजूर श्रीमंतसाहेबाकडे अर्जदास्त लेहून पाठविला असे. हुजुरून हुकूम आल्यावर साहेबांस जाहिर करूं. कितेक मजकूर जमातदार मारनिले याचे जबानीवरून कळतील.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ९३.
१६९६ भाद्रपद वद्य १.
राजश्री चिंतो विठ्ठल स्वामी गोसावी यांसि :-
विनंति उपरी, हैदर नाईक याजकडे सालगुदस्त तीर्थस्वरूप राजश्री दादासाहेबीं ऐवज करार केला. त्यापैकीं राजश्री कृष्णाजी नाईक दातार यांस दोन लक्ष रुपये द्यावयाचा ठराव तुचे विद्यमानें आपाजी-राम याजवळ जहाला. त्याविसीं मागें तुमचें व नाइकाचें पत्र घेऊन आपाजी राम याजकडे पाठविलें होतें. त्याचे जाब साल आले ते पाहून, नाइकांस दाखऊन, राजश्री नारो. आपाजी याजकडे पाठविले आहेत. ते तुह्मासी बोलतील. त्याविसीं फिरोन कागदपत्र काय लागतील ते तयार करऊन, नाईक सांगतील त्याप्रमाणें ऐवज आणावयाची तर्तूद करून, ऐवज सरकारांत सत्वर येई तें करणें. जाणिजे. छ १३ रजब, सु।। खमस सबैन मया व अलफ. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ९२.
१६९६ आषाढ वद्य १२.
यादी त्रिंबक सूर्याजी विज्ञापना ऐसीजे. सु।। खमस.
सेवकाचें गांव जफ्त आहे तें मोकळें करावयाच्या सनदा खानदेश व पाल हवेली मामलेदार व जमीदारास सनदा. १ कसबें साकोरें पा माणिकपुंज १ मौजे नरें, ता पाल्हवें. --- २ दोन गांव दौलतीचा बंदोबस्त जाल्यानंतर तुह्मांकडे चाकरींत दिल्हे जातील. करार. तूर्त साकोरे याची मोकळीक चिटी देणें. |
ताासी माहाल ताा अवचितगड येथील हवाला पुरातन गणेश सूर्याजीचे नांवें चालत आला. हालीं रा बाजी गोविंद याणीं आपले भावाच्या नांवें करून घेतला आहे. तो पेशजीप्रों चालवणार धणी समर्थ आहेत. सालिना मोइना. १५० मोईन तूप. २४ पोरगा. ३६ दिवट्या तेल वजन पक्के ![]() दरमहा ![]() |
छ २५ जमादिलावल सु।। खमस सबैन. मोकळीक सनदा असत. १ नारो कृष्ण तरवे सर-सुभेदार पां खानदेश. १ जमीदार. १ मोकादम. -- ३ |
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ९१.
१६९५.
यादी मोगलाई अमलाच माहाल सु।। अर्बा सबैन-
१६९५.
यादी मोगलाई अमलाच माहाल सु।। अर्बा सबैन-
किता-- किता--
० पाा पडदूर १ को पानगांव
१ पाा नरसी १ को रमणपूर
१ पाा वासीम १ को खलविरें
१ पाा जिंतूर १ को शाहागड
१ पाा बर्दापूर १ को भोंगाव
१ पाा सीरसाले १ को टाकळी लालाईची
१ पाा पोहनेर १ अंदूरें वगैरे गांव धारूरपैकीं
१ पाा वळूर १ अष्टी सैद जुनदीची
१ पाा शेलगांव १ पाा टाकळीपों फुटगांव राजे विनायकदास याजबा
१ पाा लोणार ४ पाा अंबाडपोां फुटगांव
१ पाा बाह्मणी १ बाल्हेगांव
१ पाा पाचळेगांव १ चंदनपुरी
१ पाा कोसडी १ कडेठाण
१ पाा वेस १ दरेगांव
--------- -------
१३ ४
१ मौजे कसनेर
------
१४
माहाल व गांव २७
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री मार्तंड भैरव.
लेखांक ९०.
१६९५ पौष वद्य १३.
राजाश्रियाविराजित राजमान्य राजश्री भावान नाईक राक्षे स्वामीचे सेवेसी :-
पो भगवंतराव शंकर सां।। नमस्कार विनंति उपरी. राजश्री बाबूराव रामचंद्र यांसि रु ५२०० पांच हजार दोनशें तुह्मांकडून देविले आहेत. हे वैशाखअखेर देणें. मित्ती सके १६९५ विजईनाम संवत्सरे, पौष वद्य १३, मु।। तुंगभद्रातीर. ज्येष्ठ शुध प्रतिपदेपासून रु।। पुढें राहिले तर दर सद्दे रु।। ०॥० प्रों ब्याज देऊं. हें खत लिहिलें सही.
हस्ताक्षर कृष्णाजी सखदेव, दिमार.