Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीशंकर.
लेखांक १२७.
१६९७ पौष वद्य १४.
राजश्री लक्ष्मणपंत आण्णा स्वमीस:-
पोष्य सखाराम हरि साष्टांग दंडवत प्राा विनंति येथील वर्तमान ताा पौष वद्य चतुर्दशीपर्यंत सुखरूप जाणून स्वकीय कुशल लिहित जावें. विशेष. आपण पत्रें विस्तरें मजकुराचीं श्रीमंतास वद्य तृतीयेचीं पाठविलीं तीं एकादसीं पावलीं. आह्मांस संकलित हवाला देऊन चिठीमागें तरवारेचा
-----------------------------------------------------------------------------------------------------------
मजकूर लेहून पाठविलीं, त्यावरून व सरकारचे पत्र पाहून सर्व कळलें. सारांश, तूर्त सर्व मसलत, अपटण आले, त्याजवर आहे. येविसीचें साधन जनरालापासून वगैरे जसें पडेल तिकडोन पाडून अण्णा ! मसलत सिद्धीस जाई, तुमचे आमचे मनोदयें व श्रीमंताची इच्छा पूर्ण होये, ते गोष्ट हरप्रेत्नें, अर्थें, प्राणें, खर्च तुमचा आमचा जाला तरी करून, लढाईचीच ठरून, फितुरिभाचीं पारपत्यें घडेल ते गोष्ट, अण्णा ! करावी. मुंबईवाले जनराल यांचे हातून अपटण व मुंबईतील कोशलदार ऐसे लोभाविष्ट. पेशजीचे दारमदाराखेरीज आणखीही उमेदवार करून पल्यावर आणावे. बल्की, कलकत्तेवाले व कुंपनी यांचीही आणखी आशा दाखवावी. परंतु सर्व प्रकारें मसलत शेवटास न्यावी, हेंच घडवावें. सर्व मदार तुह्मांवर आहे. मसलतीचा मोहरा सर्व अण्णा ! तुमचे माथां आहे. यशच घेऊन, आह्मां सर्वांत वरिष्ठता करून दाखवावी. तुह्मी प्रसंगानुरूप समय पाहून बोलाल, कबूल कराल, तें श्रीमत् निभावितील. येविसीं सविस्तर कोठवरी ल्याहावें ? वरकड इकडील सर्व अर्थ, श्रीमंताचे आज्ञेची पत्रें आहेत, त्यावरून कळतील. वरकड सर्व राजकारणें वगैरे जीं साधनें त्यांची लक्ष्यें सर्वांची इंग्रजाकडे आहेत. याचे अनुकूलतेवर सर्व अनकूलता आहे. याणीं नेट मात्र धरावे. लढाई न पडतां महिन्या दोन महिन्यांत मसलत सिद्धीस जाऊन, सर्व लोभ इंग्रजांचे प्रविष्ट होतील. गुंता नाहीं. कळेल तैसी खर्चाची खातरजमा करावी. वरकड घराऊ मजकूर तरी :- तूर्त कारनेलीची बेमर्जी आह्मांवर आज च्यार पांच दिवस फारच जाली आहे. कारण कीं, गोविंदरायांचें बोलणें आह्मी बोलतों. यामुळें त्याचे मनांत विक्षेप वाढत आला. बारीक मोठे जाबसाल सरकारतर्फेचे करणें पडतात. यामुळें, वकिलीस बोलणार त्याणीं त्यांस मन मानेसें चिडविलें आणि तुफान उठविलें कीं, सखाराम हरीचे राऊत जाऊन कही मारितात. फितुरियाकडील बेदड वगैरे येऊन फौजा घाट उतरल्या. नवापुरावर पांच सात हजार फौज आली. तेव्हांपासून नित्य कहीवर घालवितात. एथें दोन तीन महिने गुजरले. चारा जवळ नाहींसा जाला. लांब जावें लागते. एकीकडे कहीस रखवालीस जावें तों भलतेकडे दगा होतो. फत्तेसिंगाकडीलहि पेंढारी, राजपिंपळेवाले वगैरे यांचेहि राऊत फिरतात; परंतु सांप्रत फितुरियांकडीलच लोक येऊन, मारामार करून, कहीचे घोडे लष्करचे आजपर्यंत पांच सासें नेले. हाली इंग्रजाचे गाडे एकादशीस सुरतेहून येत होते ते लुटले. माणसें तोडलीं. फितुरियाचें पेंढारे यांनीच कृत्य केलें. त्यासमयीं लष्करची कधीहि पाडली. त्यांत माणसें दहावीस धरून नेलीं. तीं नवपुरास नेऊन सोडलीं. ऐसें असतां, आह्मांवरच तुफान घडलें. सुरतअठ्ठाविशीचा अंमल गोविंदरायाकडे होता, तो फत्तेसिंगाकडे द्यावा, हे मोठी रदबदली कारनेलीची. इंग्रजाजवळ गमाजी पाटील वगैरे कारकून. त्यांचे बोणियावर पार. तेव्हां उत्तर हेंच कीं, फत्तेसिंगाकडील ऐवज झाडून पंचवीस लाख.पैकीं गोविंदरायास तिजाई मूलूक होता तो हिसा तरी सारा ऐवजाचा वजा करून, सोळा लक्ष सासष्ट हजारांचा भरणा करावा. ह्मणजे अंमल सोडितों. निदानीं तूर्त पांच लक्ष तरी द्यावें. पेशजी साडेसातपर्यंत पावले आहेत. त्याजकडील दहाचा भरणा जाला तो ऐवज अमानत तुह्मांजवळ आहे तो द्यावा. ते देईनात, ह्मणोन अंमल सोडिला नाहीं. गोविंदरायाचा अंमल कमाविसदार राखून सरकारांत वसूल आणविला. तूर्त वोढीस लाख पन्नास हजार रुपये घेतले. यामुळें इंग्रज आह्मांवर फारच रुष्ट, आह्मीच घडो देत नाहीं ह्मणोन, जाले. आणि हेनिमित्त मुद्दा पत्ता नसतां नाहक ठेऊन मारूं, हल्ला करूं, श्रीमंतानीं आह्मांस निरोप द्यावा किंवा सखाराम हरी घालवावे, पारपत्य करावें, नाहीं तरी आह्मी करितों, ऐसें अटीस आले. विलाज नाहीं ! श्रीमंतही लाचार जाले ! निरुपाय झाला ! मोठे संकट सर्वांस प्राप्त झालें. केवळ निदानास गोष्ट आली. श्रीमंतही खरे लाचार जाले. तेव्हां पुढें प्रसंग जाला तो पुरवणीवरून कळेल. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १२६.
१६९७ पौष वद्य ११.
पु॥ राजश्री लक्ष्मी आप्पाजी गोसावी यांसि :-
सु॥ सीत सबैन मया व अलफ. पौष वद्य तृतीयेचीं विनंतिपत्रें तुह्मीं पाठविलीं तीं छ २३ जिलकादीं पावलीं. विस्तारें मजकूर लिहिले, ते कळले. कलमें. त॥
हैदर नाईक व राजश्री भगवंतराव प्रतिनिधी याजकडील बातमीचें व अपटणाकडील वगैरे बातमीचें वर्तमान पांच सात कलमें विस्तारें लिहिलीं तीं सविस्तर कळलीं. याउपरींहि अधिकोत्तर आढळेल तें लिहीत जाणें. कलम १
सुरतेचे चौथाईविसीं जनरालास पत्र तुमचे लिहिल्याप्रों पाठविलें असे. तरी वाजवी चौथाईचा अम्मल घ्यावयाविसीं मोगलास व गंभीरास ऐसीं पत्रें पाठवणें. कलम १
पेशजीचे कराराप्रों रुपये देणें अथवा जकातीची वगैरे हस्तबूद अंमल देणें ऐसें ल्याहावें. दोहींसहि आह्मी राजी. हस्तबूद अंमल दिल्यास तोटा जाला तरी आह्मांस कबूल असे.
प॥ चिखली, वासंदे, बलसाड येथील जकातीचे अमलाविसी व भुतसर, बोहारीव भाटे यांची जप्ती गंभीरानीं केली त्याविसीं जनरालाशीं बोलिलों. त्याणीं सांगितलें कीं, गंभीर माहीत आहे, तो श्रीमंतपासीं गेला असे. तेथेंच जाबसाल होईल. ह्मणून बोलिले. त्याचा विस्तार लिहिला तो विदित जाला. ऐशास गंभीरानीं आलिया उपरीस सदरहुविसीं फार वोढिलें. तेव्हां प॥ भुतसर हा महाल दरमहाचे ऐवजीं द्यावयाचें केलें. वरकड जकात वगैरे सोडावयाचा करार मशालनिलेनी केला. हा मजकूर तुह्मीं जनरालास सांगणें. याउपरी दिक्कत पडणार नाहीं. पडली तरी लिहिलें जाईल. कलम १ अमलांत येईल तेव्हां खरें.
येकूण कलमें तीन. जाणिजे. छ २५ जिलकाद. बहुत काय लिहिणें ?
(लेखनावधि:)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १२५.
१६९७ पौष वद्य ४.
राजश्री लक्ष्मी आपाजी गो॥ यांसि:-
सु॥ सीत सबैन मया व अलफ. तुह्मीं विनंतिपत्र पाठविलें तें पावलें. रा। गोपाल धोंडदेव याचें पत्र पाठविलें तें पावलें. ऐशास, मारनिलेचे पत्राचें उत्तर व ताकीदपत्रें पाठविली आहेत तीं त्याजकडे पावती करणें. राजकारणें घडेल तें करवणें. जाणिजे. छ १७ जिलकाद, बहुत काय लिहिणें ?
(लेखनावधि:)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १२४.
१६९७ पौष शुद्ध १२.
पुरवणी राजश्री लक्ष्मण आप्पाजी गोसावी यांसी :-
सु॥ सीत सबैन मया व अलफ. कारनेल आप्टण कलकत्त्याहून रवाना जहाले होते. ते पुणियास येऊन पोंहचले तेव्हां मसलती लांबेलसें दिसतें. त्यास, अपटणाची कांहीं दुराशा असली अगर सर जनराल कलकत्त्येकरास दहा पांच लाख कबूल केलियानें लडाई सुरू होऊन फितुरियाचें पुरतें पारपत्य होत असलियास जनरालाचे विचारें कबूल करोन मसलत शेवटास न्यावयाचें करणें. सध्यां आपटण आला आहे, त्यास याची दुराशा कांही आढळलियास, कबूल करावें. व कलकत्तेकराची दुराशा जनरालाकडून कळली तरी प्रसंगोत्तर दहा पांच पडती तरी कबूल करोन मोगलसुद्धां फितुरीं नेस्तनाबूद करावें. याप्रमाणें होत असलियास करणें. जाणिजे. छ १० जिलकाद. बहुत काय लिहिणे ?
हरयेक देण्याघेण्याची गोष्टी प्रयोजन पडल्यास करावी. उगीच कशास करावी ? येथें कारनेल ह्मणतात कीं आह्मी पहिल्या करारासिवाय कांही मागत नाहीं. इंग्रेजाचा स्वभावहि आहे कीं हरयेक कारभार पक्काच करावा. शंभरदां मागों नये, लटकें बोलों नये, ऐसें तरी आहे. तथापि बनेल प्रसंग तसा करावा. तुह्मांस आमची मर्जी विदितच आहे. इंग्रेजाची कारभाराची रीतही वाकीफ जहाली आहे. तेव्हा बनेल प्रसंग तसें करावें. सारांश, आपलें काम मनोदयानुरूप होय तसें करावें. ज्या रीतीनें आपले मतलब साधतील व ओझें जड न पडे तसें बोलणें. छ मजकूर.
(लेखनावधि:)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १२३.
१६९७ पौष शुद्ध ३.
राजश्री लक्ष्मण आपाजी गोसावी यांसि :-
सु॥ सीत सर्बैन मया व अलफ. फत्तेसिंग गायकवाड याजकडील तेरा लक्ष रुपयेपर्यंत आले, असें फत्तेसिंगाकडील कारभारी सांगतात. इंग्रेज दहापावेतों वसूल सांगतात. सरकारांत साडेसहापावेतों वसूल झाला आहे. कारनेल व होम दरबारास आले, तेव्हां तुह्माविसीं जनरालानीं लिहिलें आहे, हा मजकूर सांगितला व फत्तेसिंगाच्या ऐवजाविसीं लिहिलें आहे. परंतु हुकूम आला नाहीं. कापड वगैरे जिन्नस आपले काय उपयोगी, ऐसा मजकूर लिहिला आहे. याजवरून अर्धी परवानगी तरी आहे. परंतु हुकूम नाहीं, ऐसें बोलले. ऐसियासी, आमची बहुत ओढ हें जाणून मागितल्यास कांहीं कापड वगैरे देतीलसें दिसून येतें. परंतु, त्याचा मजकूर कांहीं बोलण्यांत नाहीं. ऐवज आलाच नाहीं, ऐसें बोलतात. यास्तव त्यास निक्षूण ताकीद यावी कीं, जो जिन्नस फत्तेसिंगाकडील आला असेल तो बाजार- निरखाचे भावें देणें. त्याप्रों फत्तेसिंगाचे ऐवजांत मजुरा पडतील. सोनें रूपें, कापड, जवाहीर जें असेल तें देणें, ह्मणून हुकूम यावा तेव्हां आह्मांस प्राप्त होईल. दोन तीन लक्षांचा जिन्नस व नक्त मिळोन आल्यास महिनाभर स्वस्थ चालेल. नाहीं तर कांहीं अबरू रहातां दिसत नाहीं. नित्य दहा बारा हजार रुपये तलब चढते. पैशास ठिकाण नाहीं. बंगाल्याचे हुकुमाची वाट किती दिवस पहावी ? कारनेलीचा अथवा जनरालाचा दोष नाहीं. आपले दैवाचा दोष आहे ! याचा तपसील किती लिहावा ? जाणिजे. छ २ जिलकाद. बहुत काय लिहिणें ?
(लेखनावधि:)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १२२.
१६९७ मार्गशीर्ष.
स ठाऊक. त्या कोषलांतील मग गुंता काय ? त्यांचे बोलण्यावरून माझी खातरजमा पटत्ये कीं, बंगालियाहूनच कामें होऊन येत. दोनी महिने पुर्ते लागत नाहींत. त्यांत दहा दिवस टेलरास जाऊन जहाले. निमे वाट बंगालियाचा गेला. फौजेची खातरजमा करून जैसें गांठोडें आहे तैसें महाराजांनीं जतन करोन राखावें. श्री कृपा करील. चिंता नाहीं. मी लौकर मुंबईस जातों. मजला चैन पडत नाहीं. सारा वेळ ह्याच उद्योगांत आहे. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १२१.
१६९७ मार्गशीर्ष.
राजश्री लक्ष्मणपंत अण्णा स्वामीचे सेवेसी :-
विनंती उपरी. इकडील वर्तमान श्रीमंतांचे पत्रावरून अवगत होईल. अमीनखान याची रवानगी अमदाबादेस तुह्मी येथें असतांच झाली होती. त्याउपरी जनरालाचें पत्र लडाई मौकूफ करावयाविसीं आलें. मशारनिलेस पाठविले ते फिरोन आणावयाचा पेंच युक्तीनें करणें तें जालें पाहिजे. याजकरितां आपाजी गणेश यांजकडून राजकारण हुजूर गेलें होतेंच. तेव्हां पांच लाख रुपये त्याजपासून घेऊन त्याजकडे अंमल सांगावा. याप्रमाणें करोन अमीनखानास समजोन सांगावें व आपाजी गणेश याजकडून ऐवज घ्यावा यास्तव राजश्री सदाशिवपंत श्रीमंतांनी अमदाबादेस पाठविलें. आपाजीपंतांकडून कराराप्रमाणें ऐवज न आला व अमीनखानाची सिबंदी फार चढली ती वारल्याखेरीज उठणें होत नाहीं, ऐसें दिसोन आलें. व अमीनखानाकडून लडाई मौकूफ करविली असतां, एक दिवशीं शहरांतून त्यांनीं याचे मोरच्यावर घालविलें. त्यास, इत्यादिक पेच पाहून, अमीनखानाकडे मामलत सांगितली. ऐशास आपाजी गणेशाकडून कारकून सदाशिवपंताकडे बोलावयास आले होते, त्यांस अमीनखानानें कैद केलें. बदराहाची गोष्ट बोलावयास आले त्यांस धरणें युक्त नव्हे. त्याणीं तो त्यांच्या लबाड्या समजोन केलें असेल. परंतु सरकारचे आज्ञेशिवाय केलें तें कार्याचें नव्हे. परंतु उपाय काय ? दक्षणेकडे निघावयाचें केलें. याजकरितां उपेक्षा करणें प्राप्त जाली. इंग्रेजाकडून दोन तोफा खांबाइताहून खान मशार्निलेकडे देविल्या होत्या त्या माघाऱ्या देविल्याच आहेत; परंतु अमीनखान देतीलसें वाटत नाहीं. याजकरितां येविसींची सूचना जनरालास करावी. श्रीमंतांनी सविस्तर मजकूर तुम्हांस कळावे, याजकरितां लिहिले आहेत ते समजोन, युक्तायुक्त ध्यानांत आणून तेथील मर्जी पाहून, व श्रीमंत सोनगडेचे सुमारें जातात, लडाई सुरूच होईल हें समजोन, जें बोलावयास युक्त तें बोलावें. केवळ पंचाईतीवर येऊन पडे तें करावें. याजखेरीज आह्मांस आश्रय नाहीं. घासल्यांनीं परिणाम काय हें आपणांस कळतच आहे. तेथें विस्तार काय ल्याहावा ?
राजश्री गोविंदराव गायकवाड सेनाखासखेल याजकडे सिनोर द्यावें ह्मणून जनरालानीं यास लिहिलें आहे, ह्मणून आपण श्रीमंतांचे पत्रीं लिहिलें, परंतु कारनेलीनें मजकूर येथें बोलिले नाहींत. वांत्तणीही देत नाहीं. ऐवज येत नाहीं. हा पेंच ! याजकरितां सोनगड-भोडगांवपावेतों जावयाचा विचार केला आहे. च्यार रुपये तिकडे तरी मेळवून फौजेस द्यावे लागतील. इंग्रेजास चिखलीपर्यंत जाणेंच होतें. सोनगडापर्यंत जावयाची परवानगीही याणीं आणिली आहे. भोडगावापर्यंत गेलियानें सरकारची सोय, ह्मणून यासी बोलतो. हेही युक्तीनें परवानगींपाणी लागतें याप्रों लेहून आणितो ह्मणतात. परंतु हें अंतर्यामचें बोलणें. याचें जनरालास कळूं न देतां पर्यायेंकरून पाण्याचें निमित्य सांगून त्याची परवानगी भोडगांवापासीं रहावयाची आलियास उत्तम आहे. घाटतोडींच भोडगांव. गेलियानें फितुरी चढोन येतील. तेव्हां हें झुंजतील. अंगावर आलियास जुंजावें, ऐसी यास परवानगी आहेच. कजिया लागला ह्मणजे जनराला समागून साहित्य पुरविणेंच लागे. परवानगीही इतकियांत येतच आहे.त्याचेंही मानस तुह्मीं लिहिलें होतें कीं त्याजकडून कजिया लागलियास मग हे लडतील, निमित्य पाहता. याप्रों आहे. त्यास तुमचे सलेस येईल तें करावें. हे दिवस लढाई सुरू व्हावयाचे आहेत. या दिवसांत पंचाईत न पडतां होईल तें करावें. कारनेलीची सरकारची पंचाइती पडली, ह्मणजे कामाचे वख्त विरुद्ध पडेल. सारे धारवट पहावे, लिहिणें तें तुह्मांस सर्व समजावें, या अर्थें श्रीमंत लिहितात. परंतु तुह्मी तेथील भावमर्जी पाडून कराल हे निशा आहे. कळावें. मजलाही श्रीमंतांची आज्ञा होती त्यावरून लिहितों. कळावें. रा॥ राघोपंत सुखरूप आहेत. चिंता न करावी. बहुत काय लिहिणें ? लोभ असावा हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १२०.
१६९७ मार्गशीर्ष
व आपली फौज न फुटों देतां आहां तैसेंच मुंबईहून जाब येईतोंपर्यंत स्वस्त राहावें श्रीकृपेंकरून तुचे मनोदय खामखा सिद्धीस जातील. संशय न धरावा. बंगालवाले आमचें ह्मणणें ऐकतील. आम्ही केलें कर्म सिद्धी नेऊं. चिंता न करावी. हे गोष्ट गुप्त मनांत ठेवावी. गाईकवाड याचाही कारभार आहे तसाच असो द्यावा. मुंबईहून लिहिलें येईल तेव्हां सर्व समजेल. श्रीमंतांस कोणी कांहीं समजावील, हर एकाधी सला देईल, तरी कोणाचेंही ऐकों नये. याप्रमाणें ल्याहायासी सांगितलें. बारभाईंची फौज व फत्तेसिंगाचे लोक एकत्र होऊन विश्वासराऊ यसवंताची लडाई जाहाली. दोनीशें माणूस विश्वासरायानें कापून काढिलें. हें वर्तमान जासूद महाराजाकडे विश्वासरायाकडून पत्रें घेऊन येत होता त्याचे जबानीं ऐकोन उभयतां इंग्रजापासीं सांगितलें कीं, लडाई बंद जाहाली असतां बारभाईंनीं व गायकवाडानीं मिळून सरकारचा अंमल कसा उठविला व जुंजले कसे ? हें ऐकोन आश्चर्य मानिलें व महमद इसफावर बसराईची फौज याउपरीं जाणार नाहीं हें त्याणीं सांगितलें. त्यास, हे इंग्रज अगोदर अन्याय कोणाचा होतो हा लक्षांत धरितात. यास्तव अमीनखान अमदाबादेचें कामकाज होणार नाहीं व इंग्रजांचा शब्द लागेल ऐसी वर्तणूक होऊं नये येविसीं अमीनखानास सूचना लिहिणें सैती ल्याहावी. सबाह्य अभ्यंतर इंग्रजाचें लक्ष महाराजांकडे दिसतें. हे उभयतां कोषलदार गुप्त खलबत्ये आहेत. टेलर बंगाल्यास गेला. बाकी पांचजण मुंबईस राहिले. परंतु तिघेही फार शहाणे, समंजस व आपले मसलतीची चिंता करणार असे आहेत. या उभयतांनीं फार खातरजमा केली आहे कीं, त्यांस म्हटलें कीं, बंगालेवालें तुमचें न ऐकत, तेव्हां मग काय कराल, तुमच्या वचनावर आम्हीं फसावें कीं काय ? असें थोडेंसेंही बोललों. परंतु त्यांचें म्हणणें एकच, खामखा बंगालेवालें आमचें म्हणणें ऐकतील; फिकीर न करणें. याप्रों बोलणें जाहालें. मी जें त्यांसी कोंडून युक्तीचे वाटेनें काईल करून बोलिलों तें पत्रीं ल्याहावें तरी विस्तार होतो. यास्तव त्याचें बोलणें लिहिलें आहे. मुंबईस गेल्यावर सविस्तर सेवेसी लेहून पाठवितों. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.
टेलराची रवानगी करून मग हे मुंबईहून निघाले. मुंबईकराचे हृद्गत या.
(पुढें मजकूर गहाळ.)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ११९.
१६९७ मार्गशीर्ष वद्य १४.
पुरवणी राजश्री लक्ष्मण अप्पाजी गोसावी यासि:-
सु।। सीत सबैन मया व अलफ. हैदरअल्लीखान याणीं बसालतजंगाची फौज लुटली. त्यास, बजिन्नस पत्रें हैदर नाईकाचीं व राजश्री बाजीराव गोविंद व विठ्ठल विश्राम यांची सरकारांत आलीं. त्यांच्या नकला करून तुह्माकडे पाठविल्या आहेत, त्यावरून कळेल. जाणिजे. छ २७ सवाल. बहुत काय लिहिणें ?
(लेखनावधि:)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ११८.
१६९७ मार्गशीर्ष वद्य ९.
राजमान्य राजश्री भवानजी विसाजी यासि :
रघुनाथ बाजीराव प्रधान. आशीर्वाद. सु।। सीत सबैन मया व अलफ. तुमचे निष्ठेचे अर्ज राजश्री लक्ष्मण अप्पाजी याणीं हुजूर लिहिले तें कळलें. उत्तम आहे. तुह्मीं खातरजमेनें सरकारसेवा करीत जाणें. तुह्मास सर्फराज केलें जाईल. जाणिजे. छ २२ सवाल. आज्ञा प्रमाण.
(लेखनावधि:)